आरती
धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती आरती.
- अधिक आरती संग्रह वाचनासाठी वर्ग:आरती कडे जावे
आरती करण्याची कृती
*आरती करण्याची कृती आणि आरंभीचे संकेत
|
---|
|
आरत्या
- अधिक आरती संग्रह वाचनासाठी वर्ग:आरती कडे जावे
* गणपतीची आरती
|
---|
गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे. (*Add poets name, meaning in contemporary prose, religious and cultural back ground)
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती।
लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना ।
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें । जय देव जय देव जय मंगलमूर्ती तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको । जय जयजी गणराज विद्या सुखदाता । अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी । भावभगतिसे कोई शारणागत आवे । |
* उदो बोला
|
---|
उदो बोला उदो, अंबाबाई माउलीचा हो । अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,।
उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो । पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो । षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो ।
घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो । सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो ।
तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो । अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो ।
सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो । नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो ।
सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो । दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो ।
सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो । |
* दुर्गे दुर्गटभारी, तुजविण संसारी ।
|
---|
[२]साचा:मृत दुवा
दुर्गे दुर्गटभारी, तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे, करुणा विस्तारी ॥ जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी ।
सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता, तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु, न बोलवे काही ॥ जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥ प्रसन्नवदने, प्रसन्न होशी निजदासा ।
क्लेशापासुन सोडी, तोडी भवपाशा ॥ जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी ।
सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥ |
* लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, (श्री शंकराची आरती)
|
---|
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा । जय देव जय देव ॥धृ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥ - संत रामदास [३] |
* त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, दत्त हा जाणा (श्री दत्ताची आरती)
|
---|
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार, त्रैलोक्यराणा । नेती नेति शब्द, न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी, समाधि न ये ध्याना ॥१॥ जय देव जय देव, जय श्रीगुरूदत्ता । आरती ओवाळीतां, हरली भवचिंता ॥धृ०॥ सबाह्मा अभ्यंतरी, तूं एक दत्त । अभाग्यासी कैंची, न कळे ही मात । पराही परतली, तेथें कैचा हेत । जन्ममरणाचा, पुरलासे अन्त ॥ जय० ॥२॥ दत्त येउनियां, उभा ठाकला । साष्टांगे नमुनी, प्रणिपात केला । प्रसन्न होऊनी, आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा, फेरा चुकविला ॥ जय० ॥३॥ दत्त दत्त ऍसीं, लागले ध्यान । हरपलें मन, झालें उन्मन । मीं तू पणाची, झाली बोळवण । एका जनार्दनी, श्रीदत्तध्यान ॥ जय देव जय देव जय० ॥४॥ |
* श्री विठोबाची आरती
|
---|
युगे अठ्ठावीस, विटेवरीं उभा । वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटि, परब्रह्म आहे गा । चरणी वाहे भीमा, उध्दारी जगा ॥१॥ जय देव जय देव, जय श्री पांडुरंगा (हो हरी पांडुरंगा )। रखुमाईवल्लभा, राहींच्या वल्लभा, पावें जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळां, कर ठेवूनि कटीं । कांसे पीतांबर, कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर, नित्य येतीं भेटी । गरुड हनुमंत, पुढे उभे राहती ॥ जय० ॥२॥ धन्य वेणूनाद, अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे, वनमाळा गळां । राहे रखुंमाई, राणीया सकळा । ओवाळिती राजा, विठोबा सावळा ॥ जय० ॥३॥ ओवाळूं आरत्या, कुरवंट्या येती । चंद्रभागेमाजी, सोडुनिंया देती । दिंड्या पताका, वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा, वर्णावा किती ॥ जय० ॥४॥ आषाढी कार्तिकी, भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये, स्नानें जे करिती । दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव, भावें ओवाळिती ॥ जय देव जय देव जय० ॥५॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥ पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥ विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥ |
* श्री ज्ञानदेवाची आरती
|
---|
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ॥धृ०॥ |
* आरती एकनाथाची
|
---|
आरती एकनाथा महाराजा समर्था । त्रिभुवनि तुचि थोर जगद्गुरु जगन्नाथा ॥ध्रु॥
|
* मल्हारीची आरती
|
---|
पंचानन हय वाहन सूर भूषित निळा खंडा मंडित दंडित दानव अवळीला मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी / जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll / वारी दुर्जन वारी, तारी सज्जन तारी, निंदक अपहारी जय देव जय देव ll १ ll
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा नाना नामे गाईल हि तुमची सेवा अघटीत गुण गावया वाटतसे हेवा फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी / जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll / वारी दुर्जन वारी, तारी सज्जन तारी, निंदक अपहारी जय देव जय देव ll २ ll
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला तो हा मल्लांतक अवतार झाला यालागी आवडे भावे वर्णिला रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी / जय शिव मल्हारी हो राजा मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll / वारी दुर्जन वारी, तारी सज्जन तारी, निंदक अपहारी जय देव जय देव ll ३ ll |
* देवी मंगल चंडिके
|
---|
रक्ष रक्ष जन्मदाता,देवी मंगल चंडिके। हारिके विपदां,हर्ष मंगल कारिके॥ हर्ष मंगल दक्षेच,हर्ष मंगल दायिके । शुभे मंगल दक्षेच,शुभे मंगल चंडिके ॥ मंगल मंगल दक्षेच,सर्व मंगल मांगल्ये। सदा मंगलदे देवी,सर्वेषां मंगलाल्ये॥ पुज्ये मंगळवारेच, मंगलाभिष्ठ्य देवते । पुज्ये मंगळ भुपस्य, मनुवंशस्य संतति ॥ मंगलाधिष्ठितां देवी, मंगलनांच मंगले । संसार मंगलधारे, मोक्ष मंगल दायीनी ॥ सारेच मंगलधारे, पारेच सर्व कर्मणा । प्रति मंगळवारेच, पूज्य मंगल सुखप्रदे ॥ |
* दशावतारांची आरती आरती सप्रेम
|
---|
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी । पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी । सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । मातला रावण सर्वां उपद्रव केला । देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें । बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा । |
उत्तरार्ध संकेत आणि आरती उत्तरार्ध स्तोत्रे, श्लोक
*आरती करण्याची कृती आणि उत्तरार्ध संकेत
|
---|
|
* घालीन लोटांगण
|
---|
घालिन लोटांगण वंदीन चरण । |
* कर्पूरगौरं
|
---|
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् । सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि ॥ |
* त्वमेव माता
|
---|
त्वमेव माता च पिता त्वमेवच, त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव । |
* कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा
|
---|
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा, बुध्दयात्मना वा प्रकृतिस्वभावात । |
* अच्युतं केशवं रामनारायणं
|
---|
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । |
* हरे राम हरे राम
|
---|
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे । |
* मंत्र पुष्पांजली
|
---|
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:। ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान्कामकामाय मह्यम्। कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम:। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी। स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति। तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति। |
* आवाहनं न जानामि
|
---|
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । |
संदर्भ
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |