अर्थशास्त्राची मूलतत्वे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

पहिले कव्हर पान अर्थशास्त्राचीं मूलतत्वें

हिंदुस्थानची सद्यः सांपत्तिक स्थिति
आणि
ती सुधारण्याचे उपाय.


लेखक

गोविंद चिमणाजी भाटे, एम्.ए.
लाइफ मेंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणें.


(सर्व हक्क राखून ठेवले आहेत.)


पुणे येथें
आर्यभूषण छापखान्यांत छापिलें.

१९१०


किंमत २॥ रुपये हें पुस्तक पुणें येथें
आर्यभूषण छापखान्यांत नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें
व प्रो.गोविंद चिमणाजी भाटे, फर्ग्युसन् कॉलेज पुणें
यांनीं प्रसिद्ध केलें. हें पुस्तक
कै.ती.रा.चिमणाजी नारायण भाटे,
वकील, महाड जि. कुलाबा
यांस
त्यांच्या अंगच्या
असामान्य अपत्यवात्सल्य, अद्वितीय नीतिधैर्य
व अलौकिक लोककल्याणेच्छा
या गुणांची वारंवार आठवण काढणाऱ्या
त्यांच्या अपत्यानें प्रेमादरपूर्वक
अर्पण केलें आहे.  जी डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची जाहिरात या ग्रंथाच्या लेखनास निमित्तकारण झाली त्या जाहिरातीला आज बरोबर तीन वर्षे झालीं. त्या जाहिरातीस निमित्तकारण म्हणण्याचें कारण हें कीं कर्तव्य म्हणून, जिज्ञासा म्हणून, किंवा आवड म्हणून, पाश्चात्य शास्त्रवाड्मयरूपीं विस्तीर्ण उद्यानांत ज्या ज्या सुंदर वाटिकांत फिरण्याचा मला प्रसंग आला त्या त्या वाटिकांचें शब्दचित्र निवळ मराठी वाचकांकरितां रेखाटावें अशी पुष्कळ दिवसांची मनीषा होती. परंतु "उत्पद्यते विलीयंते दरिद्राणां मनोरथाः" या सुभाषितांतील उक्तीप्रमाणे आजपर्यंत दारिद्रयामुळे मनांतील हेतू मनांत राहिले. माझें हें दारिद्र्य दुहेरी आहे. मी ज्या संस्थेचा तहाहयात सभासद आहें त्या संस्थचें काम इतकें असतें की, ग्रंथलेखनास जी मानसिक स्वस्थता व जी फुरसत लागते ती मिळत नाहीं. शिवाय आपल्या देशांत अझून या बाबतींत श्रमविभागाचें तत्व अंमलांत आलें नसल्यामुळे ग्रंथलेखकास ग्रंथप्रकाशकाचीही जबाबदारी व काळजी अंगावर घ्यावी लागते. व ती घेण्याचें मला सामर्थ्य नव्हतें. परंतु वर उल्लेख केलेल्या जाहिरातीनें ही अडचण झाल्यास दूर होईल असें पाहून जाहिरातीप्रमाणें पुस्तक लिहिण्याचा बेत तर कायम केला. परंतु बेत कायम करणें व तो हातून शेवटास जाणें यांत किती तरी अडचणी उत्पन्न होतात. त्याप्रमाणें येथेंही झालें. मनुष्याच्या मनाला अगदीं व्यग्र करून टाकणारी, त्याची मानसिक स्वस्थता घालविणारी अशी प्रियपत्नीच्या असाध्य रोगाची घरगुती अडचण उत्पन्न झाली व यामुळे सोसायटीच्या जाहिरातींतील दोन वर्षे केव्हांच निघून गेलीं व पुस्तकाच्या लेखनास प्रारंभही झाला नाहीं. तरी पण प्रियपत्नीच्या आजारांत व तिच्याच प्रोत्साहनाने कायम केलेला बेत शेवटास न्यावयाचा असा विचार करून पुस्तकास प्रारंभ केला. अशी या पुस्तकलेखनाची पूर्वपीठिका आहे. अर्थात हें पुस्तक गेल्या नऊदहा महिन्यांतच प्रायः लिहिलें गेलें आहे. इतक्या थोड्या अवकाशांत सर्व पुस्तक लिहावें लागल्यामुळें रात्रीचा दिवस करून काम करावें लागलें हें सांगणें नकोच. म्हणूनच या पुस्तकांत घाईच्या लेखनाची छटा जागोजाग दृष्टीस पडेल. हे पुस्तक कोणत्याही एका पुस्तकाच्या आधारानें लिहिलेलें नाहीं. एकंदर अर्थशास्त्रावरील वाड्मयाचा थोडाफार व्यासंग जी माझे हातून झाला त्यावरून या शास्त्रांतील प्रश्नांवर जी माझी मते बनली ती स्वतंत्रपणें देण्याचा या ग्रंथांत प्रयत्न केला आहे. या विषयावर मराठीत दोन तीन लहान लहान पुस्तकें झालेली आहेत असें मला ठाऊक आहे. परंतु ती सामान्यतः भाषांतररूप असून अगदी प्राथमिक आहेत असे ऐकलें असल्यामुळे त्या पुस्तकांचा मीं कांहींच उपयोग केला नाहीं किंवा तीं पाहिलींही नाहींत. नवीन विषयावर मराठींत नवीन ग्रंथ लिहावयाचा म्हणजे पारिभाषिक शब्दाची मोठी अडचण येते. तशी येथेंही मला अडचण पडली. परंतु पुष्कळ विचार करून या पुस्तकांत बहुतेक सर्व इंग्रजी पारिभाषिक शब्दांना नवे मराठी शब्द केले आहेत. नवीन बनविलेले हे शब्द जितके लहान व जितके अन्वर्थक व जितके सुलभ करता येतील तितके करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेंच होता होईल तों निवळ मराठी वाचकांस सुद्धां विषय समजावा अशा तऱ्हेनें विवचन करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत सिद्ध झाला आहे हें ठरविणें वाचक वर्गाकडे आहे.
 वर सांगितलेच आहे की, या ग्रंथांतील विवेचन स्वतंत्रपणें केलेलें आहे. तरी पण पाश्चात्य भाषेतील पुष्कळ अर्थशास्त्रविषयक पुस्तकांचा मला उपयोग झालेला आहे. त्या सर्व पुस्तकांची यादी देत बसण्यांत अर्थ नाहीं. त्यांतल्यात्यांत अमेरिकन अर्थशास्त्री सेलिंग्मन व इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ निकलसन यांच्या ग्रंथाचा मला पुष्कळ उपयोग झालेला आहे हे येथे सांगणे जरुर आहे.
 शेवटीं ज्या डे.व्ह.ट्रां.सोसायटीच्या जाहिरातीमुळे हे पुस्तक लिहिलें गेलें त्या सोसायटीचे आभार मानणें रास्त आहे. या सोसायटीनें माझें पुस्तक उशिरानें पुरें झालें असतांही तें परीक्षणास घेण्याचे कबूल केलें याबद्दलही तिचे आभार मानणे अवश्य आहे. ज्यांचा अर्थशास्त्रविषयक व्यासंग दोनतीन तपांचा आहे, ज्यांचा हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीबद्दलच्या ज्ञानामध्यें आज कोणी हात धरणारा नाहीं व राज्यव्यवस्थेशीं प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे ज्यांना हिंदुस्थानच्या स्थितीचें अन्तर्बाह्य ज्ञान आहे असे महाराष्ट्रांतील दोन अर्थशास्त्रज्ञ व ज्यांचा मराठी भाषेचा व्यासंग आज २५|३० वर्षांचा आहे, जे स्वतः मराठी उत्तम लेखक व कवी आहेत व जे मार्मिक टीकाकार आहेत असे महाराष्ट्रांतील एक प्रसिद्ध ग्रंथकार अशा तिघांची या पुस्तकाच्या परीक्षणाची कमिटी आहे. अशा कमिटीकडून 'प्रथम प्रयत्न या नात्यानें पुस्तक बरें आहे' एवढा जरी अभिप्राय मला मिळाला तरी केलेल्या श्रमाचें सार्थक झालें असें मला वाटेल.

गद्र्यांचा वाडा, शनिवार पेठ, पुणे, ता.१३ ऑक्टोबर १९१०

लेखक गोविंद चिमणाजी भाटे अनुक्रमणिका.

 विषय.                           पृष्ठ.

१. पुस्तक पहिले - प्रास्ताविक १-४६

१. भाग १ ला-अर्थशास्त्राचा इतिहास...                १ 
२. भाग २ रा-अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धति           ३२ 
3. भाग 3 रा-संपत्ति म्हणजे काय ?                 ३८ 
४. भाग ४ था-अर्थशास्त्राचे विभाग ...                ४३ 

२. पुस्तक दुसरे - उत्पत्ति ४७-१३२

 १.भाग १ ला-सामान्य विचार.                   ४७ 
 २.भाग २ रा-संपत्तीचीं अमूर्ती कारणें                 ५१ 
 ३.भाग ३ रा-मृर्त कारणें-जमीन                   ६१
 ४.भाग ४ था-श्रम                        ६४ 
 ५.भाग ५ वा-भांढवल •••                    ७० 
 ६.भाग ६ वा-योजक अगर कारखानदार                ८०
 ७.भाग ७ वा-श्रमविभाग                     ८५
 ८.भाग ८ वा-मोठया प्रमाणावर व अल्प प्रमाणावर उत्पत्ति         ९४ 
 ९.भाग ९ वा-उतरत्या व चढत्या पैदाशीचा सिद्धांत व त्याचे विवरण      १०३ 
 १०.भाग १० वा-लेोकसंख्येची वाढ                  १०८ 
 ११.भाग ११ वा-भांडवलाची वाढ                   ११७ 
 १२.भाग १२ वा-सामान्य व औद्योगिक शिक्षण              १२७ 

३. पुस्तक तिसरें-वांटणी . . . १३३-२८२

१. भाग १ ला-सामान्य विचार                    १३३ 
२. भाग २ रा-वांटणीच्या मुळाशी असलेल्या कल्पना व संस्था        १३८ 
३. भाग ३ रा-भांडें अगर खंड                   १४३ २

विषय. पृष्ठ.

४. भाग ४ था-मजुरी व तिचे सिद्धांत             १५४
५. भाग ५ वा-व्याज                   १६४
६. भाग ६ वा-नफा                    १७१ 
७. भाग ७ वा-जमीनधाऱ्याच्या पद्धति             १७८
८. भाग ८ वा-अर्धेलीची कृषिपद्धति              १८५          
९. भाग ९ वा-प्रचंड शेती कीं छोटी शेती            १८८         
१०. भाग १० वा-हिंदुस्थानांतील जमीनधाऱ्याच्या पद्धति       १९५
११. भाग ११ वा-चढाओढीनें ठरलेल्या वांटणीची असमता व ती 
       नाहींशी करण्याचे उपाय           २०३
१२. भाग १२ वा-संप व त्यांचे सांपत्तिक परिणाम        २११
१३. भाग १३ वा-मजुरांचे संघ व त्यांची उपयुक्तता        २१९
१४. भाग १४ वा-सहकारिता                 २२७
१५. भाग १५ वा-सहकारि पतपेढ्या              २३४
१६. भाग १६ वा-सामाजिकपंथाचा इतिहास व त्या पंथाचे प्रकार   २४२
१७. भाग १७ वा-सामाजिकपंथी योजनांचा सारासार विचार     २६४

४. पुस्तक चवथें-विनिमय २८३-४१४

१. माग १ ला-सामान्य विचार               २८३
२. भाग २ रा-मोल व किंमत                २८७
३. भाग ३ रा-बाजार व त्याची उत्क्रांति            २९७ 
४. भाग ४ था-मागणी व पुरवठा यांचे नियम          ३०१
५. भाग ५ वा-मूळ किंमतीची मीमांसा             ३०७
६. भाग ६ वा-पैसा                    ३१५
७. भाग ७ वा-नाणी व धात्वात्मक पैशाचे प्रकार         ३२३
८. भाग ८ वा-द्विचलन पद्धति               ३३२
९. माग ९ वा-हिंदुस्थानांतील नाणीं व त्यांची चलनपद्धति      ३४७
१०. भाग १० वा-धात्वात्मक पैशाच्या मोलाची मीमांसा       ३५४
११. भाग ११ वा-अधात्वात्मक पैसा व त्याचे प्रकार        ३६० 
१२. भाग ९२ वा-पेढीची उत्पति               ३७२
१३. भाग १३ वा-पेढीचें स्वरूप व उपयोग           ३८० विषय. पृष्ठ. 
१४. भाग १४ वा-बहिर्व्यापार व त्याची मीमांसा          ३८८
१५. भाग १५ वा-विनिमयपत्रें                 ३९८
१६. भाग १६ वा-अप्रतिबंध व्यापार विरुद्ध संरक्षण         ४०७

५. पुस्तक पांचवें-राष्ट्रीय जमाखर्च ४१५-४९२

१. भाग १ ला-सामान्य विचार                ४१५
२· भाग २ रा-अॅडम स्मिथच्या मताप्रमाण सरकारचीं कर्तव्यकर्में    ४१९ 
३. भाग ३ रा-सरकारचीं कर्तव्यकर्में               ४३३
४. भाग ४ था-सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी           ४३७
५. भाग ५ वा-कराचीं तत्वें                  ४४१
६. भाग ६ वा-कराची संपात-मीमांसा              ४४७
७. भाग ७ वा-राष्ट्रीय कर्ज                  ४५३
८. भाग ८ वा-हिंदुस्थान सरकारचें कर्ज             ४७१
९. भाग ९ वा-हिंदुस्थानचा जमाखर्च              ४८२

६. पुस्तक सहावें-हिंदुस्थानाची सद्यः सांपत्तिक स्थिति

व तिला लागू पडण्यासारख्या सिद्धांतांचें विवेचन ४९३-५२७ 

अर्थशास्त्राचीं मूलतत्वें.


Arth shastrachi multatve cropped.pdf

पुस्तक पहिलें.


भाग पहिला.


उपोद्धात.


Arth shastrachi multatve cropped.pdf

अर्थशास्त्राचा इतिहास.


 एकोणिसाव्या शतकांतील जर कोणत्या एका शोधानें सर्व शास्त्रीय कल्पनांमध्यें मोठी क्रांति घडवून आणली असेल तर ती उत्क्रांतितत्त्वानें होय. डार्विननें प्रथम या तत्वाचा फक्त प्राणिशास्त्रांत उपयोग केला खरा, तरी पण त्यानें व कांहींसे त्याचे पूर्वींच हर्बर्ट स्पेन्सरनें तें तत्व सर्व विषयांस व सर्व शास्त्रांस सारखेंच लागू आहे असें सिद्ध केलें. तेव्हांपासूनच ऐतिहासिक पद्धतीला महत्व आलें व प्रत्येक शाखाचीं तात्विक व ऐतिहासिक अशीं दोन स्वतंत्र अंगें बनत चाललीं. पहिल्यामध्यें एखाद्या शास्त्राचीं मूलतत्वें, त्यावरून निघणारीं प्रमेयें, सिद्धांत व उपसिद्धांत यांचें सविस्तर विवेचन असावयाचें; व दुस-या अंगामध्यें त्या शास्त्राच्या उदयापासून तों पूर्णवाढीपर्यंतचा इतिहास असावयाचा. हा ऐतिहासिक भाग तात्विक भागांपेक्षां स्वाभाविकच मनोरंजक असून त्याच्यायोगानें शास्त्राचीं तत्वें व प्रमेयें सुलभ रीतानें समजूं लागतात. म्हणून अलीकडे प्रत्येक शास्त्राचे इतिहास प्रसिद्ध होत आहेत. तेव्हां हातीं घेतलेल्या शास्त्राच्या तत्वांचें व प्रमेयांचें सुलभ रीतीनें आकलन व्हावें अशा हेतूनें या उपोद्धातांत अर्थशास्त्राचा थोडक्यांत इतिहास देण्याचा विचार केला आहे; परंतु हा इतिहास युरोपीय राष्ट्रांमधलाच देणें अपरिहार्य कां आहे हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 पाश्चात्य विद्या व वाङ्मय आणि संस्कृत विद्या व वाङ्मय यांची तुलना केल्यास संस्कृतांतील कांहीं उणिवा चटदिशीं ध्यानांत आल्यावांचून राहात नाहींत. आमच्यामध्यें जगाच्या कविमालेमध्यें पहिल्या रांगेत बसण्यायोग्य असे कवी झाले आहेत; सर्व जगांतील सहृदय विद्वान् लोकांनीं ज्यांच्या कृती वाचून आनंदानें माना डोलवाव्या असे नाट्यकार झाले आहेत; ज्यांच्या कांहीं बाबतींतील ज्ञानाबद्दल अजूनही पाश्चात्य लोकांना आश्चर्य वाटतें असे नामांकित गणिती व ज्योतिषी झाले आहेत; ज्यांच्या कांहीं कांहीं वैद्याविषयक उपपत्ति व योजना सुधारलेल्या देशांत अलीकडे पसंत पडत आहेत असे प्रसिद्ध वद्यक ग्रंथकार झाले आहेत. धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र याबद्दल तर संस्कृत वाङ्मयाचा हात कोणत्याही वाङ्मयाला धरतां येणार नाहीं असें पाश्चात्य राष्ट्रें सुद्धां कबूल करतात. पाश्चात्य वाङ्मयाचा विशेष म्हणजे आधिभौतिक शास्त्रें व तत्संबंधी वाड्मय होय. परंतु अलीकडील शोधावरून रसायनशास्त्रासारख्या शास्त्राचेंही वाड्मय संस्कृतांत आहे असें दिसतें. मात्र इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तीन विषयांसंबंधीं पुष्कळ अंशानें आपल्याला मान खालीं घालावी लागेल, हें कबूल करणें भाग आहे. या तीन विषयांत आमच्या इकडे नामांकित ग्रंथकार झाले नाहींत इतकेंच नव्हे, तर या विद्यांचा व विषयांचा शास्त्रीय व सोपपत्तिक विचारच मुळीं आमच्या पूर्वजांनीं केलेला दिसत नाहीं. आमच्या विस्तीर्ण वाङ्मयप्रदेशांत या तीन विषयांचे भूमिभाग कधींही लागवड न केलेल्या ओसाड जमिनीप्रमाणें आहेत.
 हे प्रांत असे ओसाड कां राहिले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या विषयावर आमच्यांत सर्वमान्य ग्रंथ होते; परंतु काळाच्या प्रचंड ओघांत ते नाहींसे झाले व यामुळेंच ते उपलब्ध नाहींत असें सकृद्दर्शनीं कोणी म्हणेल; परंतु अशी वस्तुस्थिति असती तर बाकी विषयांचे ज्याप्रमाणें थोडे थोडे ग्रंथ राहिले त्याप्रमाणें या विषयाचेही कांहीं कांहीं ग्रंथ राहावयास पाहिजे होते. दुसरें, ही गोष्ट निव्वळ काकतालीय आहे, असें म्हणणें यत्कीस धरून दिसत नाहीं. तसेंच आमच्या हीनबुद्धीमुळें असें झालें असें म्हणावें तर तेंही बरोबर नाहीं. कारण, ज्या आमच्या पूर्वजांनीं आपल्या बुद्धिसामर्थ्यानें इतकीं शास्त्रे व विद्या निर्माण केल्या व त्यांवर नामांकित ग्रंथरचना केली त्यांना या तीन विषयांवर सर्वमान्य ग्रंथरचना करतां आली नसती असें समंजस मनुष्य म्हणणार नाहीं. तर मग आमच्या वाङ्मयांतील या विषयांच्या अभावाची मीमांसा काय?
 आमची समजूत अशी आहे कीं या अभावाला कांहीं सबळ कारणें आहेत; व त्यांचा थोडासा विचार करणें येथें अप्रासंगिक होणार नाहीं व ज्या अर्थी या उपोद्धाताचा प्रत्यक्ष संबंध अर्थशास्त्राशीं आहे त्या अर्थी या शास्त्राच्या आमच्या वाड्मयांतील अभावाचा मुख्यत्वेंकरून येथें विचार करणें बरें.
 आर्यलोक प्रथमतः हिंदुस्थानांत आले त्या वेळीं त्यांचेमध्यें वर्ण व जाती हा भेद नव्हता ही गोष्ट आतां निर्विवाद सिद्ध झाली आहे. परंतु येथें आल्यानंतर वर्णाची कल्पना समाजांत बद्धमूल होऊं लागली व येथल्या मूळच्या काळ्या वर्णाच्या रहिवाशांना आर्यलोकांनीं शूद्र या नांवाच्या चेौथ्या वर्णामध्यें सामील केल्यापासून तर वर्णावर्णामधील भेद कडक होत चालले. धर्मशास्त्रदृष्ट्या जरी विद्या व ज्ञान मिळविण्याचा अधिकार वरच्या तीनही आर्यवर्णांस होता, तरी प्रत्यक्ष व्यवहारांत ज्ञानाची गुरुकिल्ली ब्राह्मणांच्या हातांत आली व बाकींचे वर्ण आपापल्या धंद्यांत चूर होऊन गेले. विद्या व ज्ञान मिळविणें, तें जतन करुन ठेवणें व वाढविणें आणि तें दुस-यांस शिकविणें हें काम फक्त ब्राह्मणांचें, असा सक्त नियम झाला. दुस-या वर्णाच्या मनुष्यानें ब्राह्मणांचें काम करणें किंवा त्यांचे आचार पाळणें म्हणजे एक मोठें पाप आहे, असा दृढ समज झाला. याचें प्रत्यंतर रामायणांतील शंबुकाच्या गोष्टीवरून खासें येतें. रामासारख्या सत्वशील राजाला तपश्चर्या करणा-या शूद्र शंबुकाचा गुन्हा देहान्त प्रायश्चित्तास योग्य असा वाटला. या कडक नियमानुरूप समाजांतील ब्राह्मणवर्गच कायतो विद्याव्यासंगी वर्ग राहिला; व आपल्या विशिष्ट धंद्याखेरीज त्यांना जे कामधंदे करतां आले किंवा प्रसंगानें करणें भाग पडलें तितक्या धंद्यांसंबंधीं सोपपत्तिक ज्ञानाचें वाङ्मय त्यांनीं भाषेंत निर्माण केलें. धार्मिक आचार चालविणें व समाजाला धर्मशिक्षण देणें हें त्यांचें मुख्य काम असल्यामुळें धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र यांतच त्यांनीं आपलें बहुतेक बुद्धिसर्वस्व खर्च केलें व म्हणूनच हें वाङ्मय संस्कृतांत अपरंपार आहे. परंतु धार्मिक आचार योग्य त-हेनें पाळण्याकरितां आमच्या धर्मात मुहूर्त, विशेषकाळ व ऋतू सांगितलेले असल्यामुळे ही कालगणना करण्याकरितां ब्राह्मणांना ज्योतिषशाखाची उपपत्ति करावी लागली; व गणित, बीजगणित, त्रिकोणमिति वगैरेंसारख्या गणितशास्त्राची अवश्यकता, ग्रह व तारे यांच्या गतीचें ज्ञान होण्यास अवश्य असल्यामुळे, हेंही शास्त्र ब्राह्मणांनीं वाढविलें. गांवचे उपाध्याय, गांवचे जोशी, गांवचे धर्मोपदेशक व गांवचे शिक्षक या नात्यानें ब्राह्मणांना गांवांत व समाजांत साहजिक प्रमुखत्व होतें; व जुन्या काळीं वैद्यक व फलज्योतिष यांचा पुष्कळ संबंध असल्यामुळे ब्राह्मणांकडे वैद्यकीचा धंदाही ओघानेंच आला. म्हणूनच वैद्यकशास्त्र व त्याला उपयोगी असे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, शारीरशास्त्र व रोगचिकित्साशास्त्र यांच्याही थोडाबहुत व्यासंग ब्राह्मणांस करणें भाग पडले व यामुळेच या आधिभौतिक शास्त्राचं थोडेबहुत वाङ्मय आमच्यामध्ये सापडते.
 परंतु ब्राह्मणांनीं पूर्वकाळीं वाणिज्यवृत्ति कधींच पत्करलेली दिसत नाहीं. यामुळे उद्योगधंदे, कलाकौशल्य व व्यापारउदीम यांची शाखीय उपपत्ति करून त्यांचें एक स्वतंत्र शास्त्र बनविण्याची कल्पना साहजिकपणें त्यांच्या डोक्यांत आली नाहीं. आपल्या समाजांत कलाकौशल्याची, उद्योगधंद्याची व व्यापारउदीमाची वाढ व प्रगति वैश्यवर्गानें पुष्कळ केली. ही वाढ व प्रगति युरोप ज्या वेळीं अगदीं रानटी स्थितीत होतें त्या वेळेपासून झालेली होती हेंही खरें. आमच्या वैश्यवर्गानें हस्तकौशल्य, प्रत्यक्ष अनुभव व कामाचा 'बापापासून लेकाला' अशा सांप्रदायस्वरूपानें मिळे. यामुळे तें ज्ञान पुस्तकांत ग्रथित करून त्यावरून सामान्य तत्वें व सिद्धान्त काढणें व त्याची उपपत्ति बसविणें हें काम वैश्यवर्णाला शक्य नव्हतें. कारण, विद्या व ज्ञान याला ते अगदीं पारखे असल्यामुळे, असल्या तऱ्हेचा बुद्धिविकास त्यांच्यामध्यें झालेला नव्हता. यामुळे जरी आमच्या इकडे औद्योगिक प्रगति झाली व तत्संबंधीं संस्थाही पूर्णत्वास आल्या तरी त्यांची उपपत्ति व मीमांसा करणारें शास्त्र निर्माण झालें नाहीं. याचें एक उदाहरण अर्थशास्त्रातील एका विषयाचें घेता येईल. अर्थशाखांतील एक महत्वाचा व मनोरंजक भाग म्हणजे पैसा व विनिमय हा होय. या भागांत पैशाचें
स्वरूप व त्याच्यायोगानें होणा-या अदलाबदलीचें स्वरूप, पेढ्या व त्यांचा उपयोग, हुंडीचा व्यापार व त्याची उपयुक्तता वगैरे विषयांचा ऊहापोह केलेला असतो. आतां आमच्या समाजांत या सर्व गोष्टी पूर्णतेस आल्या होत्या व या संबंधाचा स्वतंत्र धंदा करणारे सराफ व पेढीवाले हेही होते. पैशाची देवघेव करणें, नाणीं पारखून घेणें,पेढीचा व्यापार चालविणें, हुंडीचा व्यवहार करणें वगैरे कामें हे लोक करीत, व मोठमोठया शहरीं पेढ्यांची दुकानें असत. व सर्व देशभर पेढ्यांचे जाळें पसरलेलें असे.पुण्यास पैसे भरले असतां काशीस हुंडी दाखवून पैसे मिळत अशाबद्दल जुने दाखले सांपडतात. पेढ्यांच्या व्यवहारासंबंधीं बहुतेक पारिभाषिक शब्द आमच्या भाषेत रूढ झालेले होते, परंतु या भागाची इतकी व्यावहारिक प्रगति झाली असतांना या विषयावर एखादा ग्रंथ झाला नाहीं.कारण,या उपयुक्त व्यवहाराची मीमांसा करण्यास लागणारा बुद्धिविकास वैश्य जातींत झाला नव्हता.
 वरील विवेचनावरून आमच्या वाङ्मयांतील अर्थशास्त्राच्या अभावाचें एक मोठं कारण म्हणजे आमच्यांतील तीव्र जातिभेद होय असें दिसून येईल. या अभावाचें दुसरें एक कारण आहे,तें म्हणजे आमच्या तत्वज्ञानानें आमच्यांत रुढ झालेल्या कांहीं कल्पना व भावना ह्या होत.
  "संसार हा असार आहे, विषयसुखाची इच्छा ही मनुष्यास अधोगतीस नेणारी आहे, संपति ही सर्व दुःखाचें मूळ आहे, मानवी आयुष्य क्षणभंगुर आहे; संसार, मानवी वासना, संपति, विषयसुख या सर्व गोष्टी नश्वर आहेत. या सर्व मायामय आहेत; यामध्यें सत्यत्व व सनातनत्व नाही; यामुळे या सर्व मोक्षविघातक आहेत. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यानें ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलें पाहिजे." अशा प्रकारच्या निवृतिपर वेदान्ताचा आमच्या ब्राह्मणवर्गावर बराच अंमल होता. यामुळेच इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तिन्ही विषयांकडे आमच्या ब्राम्हणांचे लक्ष गेलें नाहीं. कारण, हे तिन्ही विषय नश्वर गोष्टींबद्दल ऊहापोह करणारे; तेव्हां यांत तथ्य किंवा सनातनत्व तें काय असणार असें त्यांना वाटणें साहजिक होतें
 अर्थशास्त्राच्या उदयास अडथळा करणारी अशीच कारणें प्राचीन ग्रीक लोकांमध्येंही होती. त्यांच्यामध्यें गुलामगिरीचा प्रघात जारीनें चालू होता व कलाकौशल्याचीं कामें तेच गुलाम करीत; यामुळें उद्योगधंदे व व्यापारउदीम हीं हलक्या दर्ज्याची कामें अशी ग्रीक नागरिकांमध्यें दृढ़ समजूत होती. त्यांच्या मताप्रमाणें नागरिकांस योग्य असे धंदे म्हणजे शिपाईगिरी व राज्यकारभार. ग्रीक लोकांमध्यें प्रजासत्ताक राज्यपद्धति असल्यामुळे नागरिकांचा बहुतेक वेळ राजकीय उलाढालींत जात असे. ह्यामुळे त्या लोकांमध्यें इतिहास व राजनीति या शास्त्राचा उदय झाला. या विषयांत त्यांनीं इतकी पारंगतता मिळविली कीं, ग्रीक लोकांसारखे प्रख्यात इतिहासकार,प्रख्यात मुत्सद्दी व प्रख्यात राजनीतिकोविद फारच थोड्या राष्ट्रांच्या वांट्याला आलेले आहेत. परंतु ज्याप्रमाणें आमच्यांत जातिभेद व संसाराची असारता ह्या कल्पनांमुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं त्याप्रमाणेंच ग्रीक लोकांतील गुलामगिरी व त्यांची उद्योगधंद्याबद्दलची तुछाताबुद्धि यांच्यायोगाने अर्थशास्त्राचा उदय त्या लोकांत होऊ शकला नाहीं.
 वरील विवेचनावरून ज्या शास्त्राची पूर्वपीठिका आपल्यास पहावयाची आहे तें शास्त्र फार जुनें नाहीं हें तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु इतर शास्त्रांच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिण्याचा युरोपियन ग्रंथकारांचा रिवाज आहे. त्याला अनुसरून अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीही अर्थशास्त्राच्या इतिहासाचे तीन काळ कल्पिले आहेत. एक ग्रीक व रोमन लोकांच्या सुधारणेचा जुना काळ; दुसरा क्रिश्चन व रोमन कॅथलिकधर्माच्या प्रसाराचा व वाढीचा मध्यकाळ व तिसरा प्राटेस्टंटधर्माच्या उदायापासुंचा अर्वाचीन काळ.
 ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलामगिरीच्या प्रघातामुळे अर्थशास्त्राचा उदय होऊं शकला नाहीं हें वर सांगितलेंच आहे. परंतु ग्रीक लोकांनीं समाजशास्त्र व राजनीतिशास्त्र यांची चांगली वाढ केली होती; व या शास्त्रांच्या प्रमेयांचा विचार करतांना प्रसंगोपात ग्रीक तत्वज्ञान्यांनीं अर्थशास्त्रविषयक काही तत्वांचा उल्लेख केला आहे. व अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनी या उल्लेखांचा एकत्र संग्रह करून त्यालाच अर्थशास्त्राची पूर्वपीठिका मानली आहे. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो यानें "प्रजासत्ताक राज्य" म्हणून एक नामांकित ग्रंथ लिहिला आहे.त्यामध्ये श्रमविभाग या अर्थशास्त्राच्या एका तत्वाचें सुंदर तऱ्हेंनें वर्णन केले आहे. त्याप्रमाणेच अॅरिस्टॉटल याने आपल्या सुप्रसिद्ध "नीतिशास्त्र व राजनीतिशास्त्र ?" या ग्रंथामध्यें व्यापाराच्या स्वरूपाचें व पैशाच्या उत्पत्तीचें व कार्याचें मोठे मुद्देसूद व मार्मिक विवरण केले आहे. तसेच झेनाफन् या इतिहासकारानेंही आपल्या ग्रंथांत अर्थशास्त्रविषयक कांहीं बाबींचा विचार केलेला आहे. रोमन लोक शास्त्रांच्या कामांत ग्रीक लोकांच्या पुढें कधींच गेले नाहींत. ग्रीक लोकांनीं मिळविलेलें ज्ञान त्यांनीं आपल्या भाषेत आणिले इतकेंच. यामुळे अर्थशास्त्राला त्यांनीं एकही महत्वाच्या तत्वाची जोड करून दिली नाही यांत कांहीं एक आश्चर्य नाहीं.
 युरोपाचा मध्यकाळ सन ४०० पासून १३०० अखेर किंवा चेौदाव्या शतकाच्या अर्धापर्यंत मानतात. या सुमारास मुसलमान लोकांनीं कॉन्स्टॅटिनोपल हें शहर काबीज केलें व त्यामुळे तेथल्या बादशहाच्या पदरी असलेले ग्रीक व लॅटिन या भाषा अवगत असणारे विद्वान लोक यांचा राजाश्रय नाहीसा होऊन ते लोक सर्व युरोपभर पसरले व त्यांनीं सर्व युरोपभर ग्रीक व लॅटिन भाषा सामान्य जनास शिकविण्याची सुरुवात केली. याच काळाला विद्येच्या पुनरुज्जीवनाचा काळ म्हणतात व येथून अर्वाचीन काळाला प्रारंभ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्या मध्यकाळांत जरी अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष उदय झाला नाहीं तरी त्या उदयास अनुकूल अशी परिस्थिति याच काळांत निर्माण झाली. प्रथमतः ग्रीक व रोमन लोकांमध्यें प्रचलित असलेली गुलामगिरी क्रिश्चन धर्माच्या उदार कल्पनांनीं लुप्तप्राय झाली व सर्व धंद्यांना व उद्योगांना एक प्रकारची मान्यता आली. युरोपामध्यें निरनिराळीं स्वतंत्र राज्यें व राष्ट्रे निर्माण झाली. युरोपियन लोकांनीं येशूची जन्मभूमि जेरुसलेम ती मुसलमानांपासून हस्तगत करून घेण्याकरितां कित्येक शतकें धर्मयुद्धे केली. त्यांचा युरोपाच्या उद्योगधंद्यावर व व्यापारउदीमावर चांगलाच परिणाम झाला. प्रथमतः या युद्धाच्या योगानें सरदारांच्या जमिनी मध्यम स्थितीच्या, व उयोगी व भांडवलवाल्या अशा लोकांच्या हातीं आल्या; त्यामुळे शेतकींत सुधारणा होऊं लागली. "दमास्कस येथें धर्मयोद्धयांनीं कापड करण्याचीं व धातूचीं कामें करण्याची कला हस्तगत करून घेतली. रेशमाचा धंदा व रेशमी किडे वाढविण्याची विद्या युरोपांत धर्मयोद्धयांनीं नेली. टायर येथील कारखाने पाहून व्हेनिसच्या व्यापा-यांनीं आपल्या कांचेच्या कारखान्यांत सुधारणा केली." धर्मयुद्धामुळे नौकानयनास व लोकांच्या  साहसवृत्तीस उत्तेजन मिळाले.याचेयोगानें आशिया व युरोप यांच्यामध्यें दळणवळण वाढून या दोन खंडांमध्यें जोराचा व्यापार सुरू झाला व आशिया व हिंदुस्थान येथील उत्तम कलाकौशल्याचा माल युरोपमध्यें जाऊन तेथें लोकांना त्याची गोडी लागली व तसले कारागिरी धंदे युरोपांत सुरू करण्याची प्रवृत्ति सुरू झाली. याप्रमाणें धर्मयुद्धाचा मृळ उद्देश सिद्धीस गेला नाहीं तरी इसापनीतींतील शेतांत पुरून ठेवलेल्या संपत्तीच्या शोधार्थ शेत नांगरणा-या शेतक-याच्या मुलांप्रमाणें युरोपियन राष्ट्रांचा या धर्मयुद्धापासून फार फायदा झाला.
 याप्रमाणें युरोपामध्यें व्यापारधंदा वाढत असतांनाच त्यांत भर पाडणारी आणखी कारणें उत्पन्न झालीं. छापण्याच्या कलेचा शोध लागल्यामुळें ज्ञानप्रसार सामान्य लोकांत सुद्धां झपाट्याने होऊं लागला. ज्योतिष, रसायन वगैरे शास्त्रांत जे नवीन शोध लागले त्यामुळे ज्ञानलालसा वाढून सर्व शास्त्रांची भराभर वाढ होत गेली. धर्मयुद्धानें आधींच नौकानयनास व लोकांच्या दर्यावर्दीपणास उत्तेजन मिळालें होतें, त्यांतच होकायंत्राच्या शोधाची भर पडून युरोपांतील लोकांच्या धाडसास व साहसास अधिकच जोर आला व एकीकडे कोलंबसानें अमेरिका खंड शोधून काढिलें व त्याला हिंदुस्थानचा पश्चिम किनारा समजून हिंदुस्थान असें नांव दिलें. तर दुसरीकडे बास्कोडिगामा यानें आफ्रिका ओलांडून केप ऑफ गुड होपच्या मार्गे ख-या हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढिला. या दोन शोधांमुळे युरोपांतील जुन्या व्यापारी मार्गावरील राष्ट्रांचें व शहरांचें औद्योगिक व व्यापारी वर्चस्व कमी कमी होत जाऊन ते स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड व हॉलंड या अटलांटिक महासागरावरील राष्ट्रांना,येऊं लागले. शिवाय या राष्ट्रांनीं आफ्रिकेंत व विशेषतः अमेरिकेंत आपल्या वसाहती केल्या व या वसाहतींच्या सर्व व्यापार या देशांच्या ताब्यांत आला. याप्रमाणें युरोपांतील वर निर्दिष्ट केलेल्या देशांमध्यें उयोगधंद्यांची व व्यापारउदीमाची प्रगति होऊं लागून त्यांची संपत्ति वाढत चालली. त्यांतल्यात्यांत अमेरिकेमध्यें सोन्यारुप्याच्या खाणींचा शोध लागला व या पैशाच्या लोभानें हजारों लोक अमेरिकेंत जाऊ लागले व गवर हाऊन परत येऊं लागले. यामुळें युरोपखंडांत सोन्यारुप्याचा ओघ सुरू झाला व तिकडून पुढें तो ओघ हिंदुस्थानाकडेही वळला. युरोपांतल्या बहुतेक देशांत नाण्याचा सुकाळ झाला व पदार्थांच्या किंमती अतोनात वाढू लागल्या. ज्याप्रमाणें अलीकडील चारपांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत पदार्थाच्या बाजारभावांत विलक्षण क्रांति होत चालली आहे व यामुळे लहानथोर, अशिक्षितसुशिक्षित, गरीबश्रीमंत वगैरे सर्व वर्गाच्या लोकांचें लक्ष या विषयाकडे लागलें आहे, अशीच स्थिति त्या काळीं युरोपखंडांत झाली. दहावीस वर्षांत पदार्थांच्या भावांत जमीनअस्मानाचें अंतर पडू लागलें. या सर्व कारणांनीं विचारी लोकांचें लक्ष या संपत्तीच्या विषयाकडे लागलें व याचेंच फळ अर्थशास्त्राचा उदय हें होय.
 संपत्तीसंबंधाने युरोपियन लोकांच्या व राष्ट्रांच्या मनांत विचार येऊं लागून त्याला जें पहिलें व्यवस्थित स्वरूप आलें त्यालाच अर्थशास्त्राचे इतिहासकार अर्थशास्त्रातील पहिला पंथ म्हणतात. या पंथाचें नांव उदीमपंथ होय. या पंथाचीं दोन भिन्न भिन्न वर्णनें सांपडतात. या पंथाच्या प्रवर्तकांनी किंवा त्याच्या अनुयायांनीं या पंथाचीं तत्वे व मतें यांचा सविस्तरपणें विचार करून लिहिलेले ग्रंथ पुष्कळ काळपर्यंत उपलब्ध नव्हते. बराच काळपावेतों या पंथाच्या तत्वाची जी माहिती लोकांना होती ती या पंथाचा विरोधक अॅडम स्मिथ याच्या ग्रंथावरूनच काय ती होती. अॅडम स्मिथनें या पंथाचें खालीलप्रमाणें वर्णन केलें आहे.
 या पंथाच्या मताप्रमाणें संपत्ती म्हणजे सोनें, नाणें किंवा पैसा होय. अर्थात् संपत्ति व पैसा हे समानार्थक शब्द इतकेंच नव्हे तर संपत्तीचें सारसर्वस्व म्हणजे पैसा. ज्याप्रमाणें एखाद्या व्यक्तीजवळ हजारों रुपये असले म्हणजे आपण त्याला श्रीमंत म्हणतों, त्याप्रमाणेच ज्या देशांत पैसा व सोनेंरुपें मुबलक आहे तो देश श्रीमंत होय. म्हणूनच ज्या देशाला आपली भरभराट व्हावी अशी इच्छा असेल त्यानें देशांत पैसा जास्त येण्याचें धोरण ठेविलें पाहिजे. ज्या देशांत सोन्यारुप्याच्या खाणी आहेत,तेथें विशेष तजवीज करण्याची गरज नाहीं, परंतु जेथें अशी स्थिति नाहीं, तेथें बाहेरून देशांत सोनेरुपें येईल व देशांतील सोनेंरूपें बाहेर न जाईल अशी तजवीज केली पाहिजे व म्हणूनच या पंथाच्या पुरस्कर्त्यांनी प्रथमतः सोन्यारुप्याचा निर्गत व्यापार कायद्यानें बंद केला. परंतु असले कायदे सहज मोडतां येतात असें दिसून आल्यावरून या प्रत्यक्ष प्रतिबंधा-
पेक्षां दुसरा एक सुलभ उपाय त्यांनीं शोधून काढला. तो उपाय म्हणजे देशांतल्या आयातनिर्गत व्यापारावर नजर ठेवून देशांत पैसा जास्त येईल असें करणें हा होय. देशाबाहेर जो माल जातो त्याबद्दल देशांतील व्यापा-यांना पैसे मिळतात, व देशांत जो माल येतो त्याबद्दल पैसे देशाबाहेर जातात. तेव्हां निर्गत मालाची किंमत आयात मालापेक्षां नेहमीं जास्त असली म्हणजे या दोहोंमधला फरक देशामध्यें पैशाच्या रूपाने आला पाहिजे. यालाच उदीमपंथी लोक व्यापाराचें समतोलन म्हणतात. व प्रत्येक देशानें हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याचें धोरण ठेविलें पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता व हें समतोलन आपल्याला अनुकूल करून घेण्याकरितां उदीमपंथी मुत्सद्द्यांनी व राष्ट्रांनीं सहा उपायांची योजना केली होती. निर्गत व्यापार वाढविण्याकरितां योजावयाचे उपाय म्हणजे:-
 १ बाहेर देशीं माल पाठविणारास दरशेकडा काही प्रमाणानें बक्षीस देणें,
 २ त्यांना जकातीची सूट किंवा सवलत देणें,
 ३ दुस-या देशांशीं आपला माल सवलतीनें खपण्याकरितां फायदेशीर तह करवून घेणें,
 ४ आपल्या ताब्यांतल्या वसाहती स्थापून त्यांच्याकडील सर्व व्यापार अापल्या ताब्यांत ठेवणें,
 ५ आयात मालाचा व्यापार कमी करण्याकरितां जबर जकाती ठेवणे.
 ६ व कायद्यांनी मालाची आयात अजीबाद बंद करणें.
 या शटसाधनांनी आपल्या देशाचा निर्गत व्यापार अतोनात वाढेल व व्यापाराचें समतोलन आपल्याला अत्यंत अनुकूल झाल्यानें देशांत मुबलक पैसा व सोनेंनाणें खेळतें राहील असा उदीमपंथी लोकांचा दृढ समज होता
.   अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकामध्ये उदीमपंथाच्या तत्वांची व मतांची ही हकी}कत दिली आहे. अॅडम स्मिथच्या काळीं उदीमपंथाच्या स्थापनेला शें दोनशें वर्षें होऊन गेलीं होती व त्याच्या धोरणाचा कांहींसा अतिरेक झाला होता. कारण या पंथाचा राज्यकर्त्यांच्या व मुत्सद्द्यांच्या मनावर पूर्ण पगडा बसून त्यासंबंधीं अतोनात कायदे होऊन हजारों पदार्थांवर निरनिराळ्या प्रसंगीं निरानराळ्या कारणांनीं जबर जकाती बसविलेल्या होत्या व यामुळे अॅडम स्मिथचें वर्णन कांहीं अंशीं त्या काळीं तरी उदीमपंथाला लागू होते. शिवाय अॅडम स्मिथ हा उदीमपंथाचा विरोधक होता व त्याच्या पुस्तकाचा एक हेतु उदीमपंथाच्या मतांचें व धोरणाचें खंडन करणें हा होता. यामुळे त्याचें वर्णन एकतर्फी व एककल्ली व्हावें व त्याला उदीमपंथांत कांहीं एक ग्राह्यांश नाहीं असें वाटावें हें स्वाभाविक होत.
 परंतु एकोणिसाव्या शतकांत ऐतिहासिक पद्धतीला प्राधान्य मिळालें व प्रत्येक शास्त्राचा पूर्व इतिहास व पूर्व पीठिका तत्कालीन कागदपत्रांवरून व लेखावरून निःपक्षपातबुद्धीनें ठराविण्याचा प्रवात सुरू झाला व त्यामुळेच या पंथाबद्दलही पुष्कळ नवी माहिती उपलब्ध झाली व कनिंगहॅमसारख्या औद्योगिक चळवळीच्या इतिहासकारांनीं या पंथाबद्दल पुष्कळ विश्वसनीय माहिती मिळवून या पंथाचें यथार्थ स्वरूप जगापुढें आणिलें व या विस्तृत माहितीचा अलीकडील अर्थशास्त्राच्या इतिहासकारांनीं आपल्या इतिहासांत उपयोग केला आहे. त्यावरून असें दिसतें कीं, उदीमपंथाच्या प्रवर्तकांचें आपलें औद्योगिक धोरण ठरविण्यांत चार राष्ट्रीय हेतू होते. ते हेतू हे:-
 १. देशांतील कलाकौशल्यांना उत्तेजन देणें व होतां होईल तों देशांतील कच्च्या मालाचा पक्का माल तयार करून परदेशीं पाठविणें.असा पक्का माल देशांतल्या देशांत झाल्यानें देशांतील मजूर व कारागीर यांना भरपूर काम मिळतें व पक्क्या मालाला कच्च्या मालपेक्षां किंमत पुष्कळच जास्त येत असल्यामुळे तो सर्व फायदा देशांतील व्यापा-यांस व कारखानदारांस मिळतो.
 २. देशाच्या संरक्षणास व सामर्थ्यास देशामध्यें नावाड्यांचा मोठा वर्ग असणें व मोठं व्यापारी आरमार असणें जरूर आहे. याकरितां होड्या, बोटी व गलबतें बांधण्याच्या धंद्यास व त्यास लागणाऱ्या दुसऱ्या धंद्यास उत्तेजन देणें. तसेंच मासेमारीच्या धंद्यास मदत करणें व दर्यावर्दी लोकांस साहाय्य करणें. अशायोगानें देशांत नावाड्याचा वर्ग तयार होइल व व्यापारी आरमारही सज्ज राहील.
 ३. परचक आलें असतां देशांतील लोकांना दुस-याच्या तोंडाकडे
पहाण्याचा प्रसंग राहूं नये म्हणून लोकसंख्येपुरती अन्नसामग्री देशांतल्यादेशांत उत्पन्न व्हावी, याकरितां शेतीला उत्तेजन देणें. शिवाय देशांत शेतकीची भरभराट असली म्हणजे देशाला प्रसंगीं मोठे सैन्य जमवितां येतें. कारण शेतकरी हा थोड्याशा शिक्षणानें उत्तम शिपाई बनतो असा सर्वत्र अनुभव आहे. तेव्हां देशांतील शेतकरीवर्ग सुसंपन्न असला म्हणजे तें एक देशाचें मोठे गुप्त सामर्थ्यच आहे.
  ४. शेवटीं देशाच्या स्वातंत्र्यास व संरक्षणास खजिन्याची भरपूर तयारी पाहिजे व म्हणून सरकारजवळ व देशांत भरपूर नाणें व सोनेंरुप राहील अशी तजवीज करणें देशांतील सरकारचें कर्तव्यकर्म आहे.
 अर्वाचीन इतिहासकारांच्या मतें उदीमपंथाचे वर निर्दिष्ट केलेले चार हेतू होते. परंतु हें हेतुचतुष्टय सुद्धां दुसऱ्या एका अंतिम हेतूचें साधनचतुष्टयच होय. हा अंतिम हेतु म्हणजे देशाचा दर्जा, वैभव व सामर्थ्य वाढविणें हा होय. व हा अंतिम हेतु सिद्ध करण्याकरितां जरी देशांतील कांहीं व्यक्ती अगर एखादा वर्ग यांचें नुकसान झालें तरी हरकत नाहीं, परंतु या अंतिमहेतूच्या सिध्यर्थ व्यापारउदीम व कलाकौशल्य यांवर दाब ठेवण्याचा सरकारास आधिकार आहे असें त्यांच्या व्यापारी धोरणाचें एक तत्व होतें. इंगलंडमध्ये कॉमवेल व फ्रान्समध्यें कोलवर्ट हे या पंथाचे पुरस्कर्ते व अभिमानी असें समजलें जातें. या दोघांनीं आपापल्या देशांतील कलाकौशल्याला प्रत्यक्ष मदत दिली व परकीय मालावर जबर जकाती बसवून आपल्या देशांतील कारागिरांना परकीय कारागिरांच्या स्पर्धेपासून सोडविलें व या योगानें आपल्या देशाची सांपत्तिक स्थिति व तिच्या द्वारें देशाचें वैभव व सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला. कॉमवेलच्या काळीं व्यापारामध्यें इंग्लंडचा प्रतिस्पर्धी हॉलंड हा देश होता. या देशाचा व्यापार सर्व जगभर होता व जलमार्गावरील तर बहुतेक व्यापार या देशाच्या व्यापा-यांच्या हातांत होता. हॉलंडचें हें व्यापारी व आरमारी वर्चस्व हाणून पाडण्याकरितां इंग्रजी इतिहासज्ञांस पूर्णपणे माहीत असलेले प्रसिद्ध नौकानायानासंबंधी कायदे कॉमवेलने केले.या कायद्यांनी इंग्रज व्यापाऱ्यांना हॉलंडच्या गलाबतांतून मालाची नेआण करण्याची मनाई केली. इंगालांडांतून बाहेर जाणारा माल किंवा आंत येणारा माल इंग्रजांनी बांधलेल्या,इंग्रजांच्या मालकीच्या व इंग्रज नावाड्यांनी चालविलेल्या गलबतांतच आला पाहिजे असा सक्त नियम
कॉमवेलने केला व या कायद्याचा इष्ट हेतु लवकरच साध्य झाला. या कायद्यानें हॉलंडच्या व्यापारी वर्चस्वास मोठाच धक्का बसला व इंग्लंडांतील गलबतें बांधण्याच्या व नावाड्याच्या धंद्यास फारच तेजी आली. व त्याच्या अनुषंगानें दुस-याही धंद्यांचा वर पाय निघाला.
 वर सांगण्यांत आलेंच आहे कीं, या उदीमपंथाच्या मताची छाप युरोपातील सर्व राष्ट्रांत बराच काळ टिकली. इंग्लंडामध्यें तर या मताच्या अनुरोधानें झालेले कायदे व जकातीची पद्धति एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होती. या मताचा अवशेष म्हणजे इंग्लंडांतील प्रसिद्ध धान्याचे कायदे होत. या कायद्याविरुद्ध चळवळ कॉबडन व ब्राईट या उदारमतवादी मुत्सयांनीं १०।१२ वर्ष केली. तेव्हां एकदां हे कायदे १८४६ त नाहींसे झाले. व उदीमपंथाचा इंग्लंडमध्यें अगदीं बींमोड होऊन खुल्या व्यापाराच्या तत्वाचा पूर्णपणें जय झाला.

 फ्रान्समध्यें उदीमपंथाचा अभिमानी व पुरस्कर्ता कोलबर्ट हा मुत्सद्दी होता हें वर सांगितलेंच आहे. त्यानें आपल्या कारकीर्दीमध्ये कारागिरीला पुष्कळ उत्तेजन दिलें व अशा विशेष प्रकारच्या उत्तेजनानें ते ते कारखाने फ्रान्समध्यें भरभराटीस आले हे खरें. तरी पण या सर्व उदीमपंथी धोरणाचा देशाच्या सांपत्तिक स्थितीवर व बहुजनसमाजावर इष्ट परिणाम न होतां उलटच परिणाम झाला. कारण हे जे नवे कारखाने उभारले गेले त्याकरितां फ्रान्स सरकारला पुष्कळच खर्च आला. व हा सर्व खर्च फ्रान्समधल्या शेतकरीवर्गावर पडला. वास्तविकपणें फ्रान्स हा देश शेतकीला फार चांगला; परंतु या ठिकाणीं युरोपांत लुप्तप्राय झालेली जहागिरीपद्धति ब-याच काळपर्यंत अस्तित्वांत होती. यामुळे आधींच शेतकीसारख्या मोठ्या धंद्याची दैना होती. ह्यांतच कारखाने काढण्यास लागणारा पैसा या हलाख झालेल्या शेतक-यांच्याच बोकांडीं बसला. कारण जहागिरीपद्धतीच्या जुन्या काळच्या नियामानुरूप फ्रान्समधील सरदार, मानकरी, धर्मोपदेशक वगैरे जमीनदार लोक हे करापासून विमुक्त होते. शिवाय फ्रान्समध्यें राजाची सत्ता अनियंत्रित होती. यामुळे राजाच्या दरबारचे लोक व राजाच्या मर्जीतले लोक हे राजाची मर्जी संपादून आपली निरनिराळ्या करांतून मुक्तता करून घेत. सारांश, जहागिरीपद्धतीच्या अवशिष्ट चालींनीं व राजाच्या अनियंत्रित

[१४]

 सत्तेमुळे फ्रान्समधील बहुतेक सुखवस्तु व श्रीमंत वर्ग हे करापासून मुक्त झाले होते. व राजाच्या चैनीचा अवाढव्य खर्च, राज्यकारभाराचा खर्च व कोलबर्टसारख्या मुत्सद्याच्या एकपक्षी लोकहिताच्या धोरणानें कला-कौशल्याच्या उत्तेजनाचा खर्च-हा सर्व अवाढव्य खर्च मुख्यतः शेतक-यांवर व गरीब लोकांवर पडे. कारण, फ्रान्समध्यें त्या काळीं सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य चार बाबीच असत. पहिली बाब दरवर्षी शेतक-याच्या ऐपतीप्रमाणें आकाराला जाणारा जमिनीवरील कर. हा कर फक्त शेतकरी व शेत कसणारे यांवरच पडे हें वर सांगितलेंच आहे. दुसरी 'बाब मिठावरील जबर कराची. हा करही गरीब लोकांच्या वरच जास्त पडे हें उघड आहे. तिसरी बाब देशांतील आयातनिर्गत मालावरील जकाती व प्रांताप्रांतामधील आयातनिर्गत मालावरील जकाती; व शेवटची बाब म्हणजे सार्वजनिक रस्त्यावरील पट्टया. अर्थात् या सर्व बाबीचा मुख्य बोजा गरीब रयतेवर व विशेषतः शेतकरीवर्गावरच पडे.
 यामुळे फ्रान्समध्यें सामान्य लोकांची स्थिति फारच वाईट झाली होती. परंतु राजा व त्याच्या भोंवतालची मंडळी व वरच्या वर्गाचे लोक यांची सर्व प्रकारे चैन व आबादानी होती. या सर्व सामाजिक, राजकीय व औद्योगिक कारणांनीं फ्रान्समध्ये त्या काळीं सरकार व समाजव्यवस्था हीच आनिष्ट आहे व मनुष्याची स्वाभाविक व नैसर्गिक स्थिति हीच जास्त सुखकर आहे अशाप्रकारच्या कल्पना फैलावत चालल्या. त्यांतच इंग्लंडमधल्या लॉक वगैरे तत्त्वज्ञानच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांची भर पडून फ्रान्सांत विचारक्रांति होत होती. या कारणांनी वया क्रांतीपासून या नव्या विचाराच्या खळबळीतंच अर्थ्शास्त्रांतला निसर्गपंथ उदयास आला. या पंथाचीं राजकीय व सामाजिक मते तंत्त्वेत्त्यांसाराखींच होतीं.मनुष्य हा स्वभावतः स्वातंत्त्र्यप्रिय प्राणी आहे व त्याला पुष्कळ नैसर्गिक हक्क आहेत.अगदीं रानटी स्थितींत 'बळी तो कान पिळी'हा न्याय असल्यामुळें कोणत्याही व्यक्तीला आपले स्वाभाविक हक्क उपभोगितां येण्याची खात्री नसते म्हणून मनुष्यें आपले बाकीचे हक्क राखण्याकरीतां थोड्याश्या स्वातंत्र्यावर पाणी सोडून तें स्वातंत्र्य सरकारच्या हातांत देतात तेंव्हा सरकार हें समाजाला अत्यावश्यक आहे; परंतु तें एक अवश्यक अनिष्टांपैकी आहे.परंतु सरकारला व्यक्तीचे कांही स्वभाविक हक्क कधींच हिरावून घेतां येत नाही
मनुष्याला आपल्या श्रमाचें फळ उपभोगण्याचा हक्क आहे. तसेंच प्रत्येक मनुष्याला आपल्या श्रमाचा होईल तितका फायदा करून घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक मनुष्याला आपलें हित कशांत आहे हें समजतें व त्याला आपल्या या हिताचा मार्ग पत्करण्याचा हक्क आहे. समाजाचें हित व व्यक्तीचें हित यामध्यें विरोध नाहीं. फ्रेंच तत्वज्ञान्यांच्या व निसर्गपंथाच्या मतें हीं तत्वें स्वयंसिद्ध आहेत, व या तत्वांवरून त्यांनीं आपलीं अर्थशास्त्रविषयक कांहीं प्रमेयें व विशेषतः अप्रतिबंध व्यापाराचें तत्व सिद्ध केलें आहे. मनुष्याचे वरीलप्रमाणें हक्क असल्यामुळे त्याला उद्योगधंद्यास पूर्ण मुभा असली पाहिजे. त्याला वाटेल त्याप्रमाणें आपल्या श्रमाचा मोबदला मिळण्याची संधि पाहिजे. व्यापाराच्या कामांत पूर्ण चढाओढ व करार यांचा अंमल पाहिजे. सरकारला व्यापारांत ढवळाढवळ करण्याचा हक्क नाहीं. सरकारचें काम म्हणजे त्यांनीं मानवजीवित व मालमत्ता यांना सुरक्षितता देणें व त्यांचें संरक्षण करणें इतकेंच आहे. उद्योगधंदे व व्यापारउदीम यांसंबंधीं सरकारनें कायदेकानु करण्यापासून देशाचा फायदा नसून उलट नुकसान आहे. कारण व्यक्तीचें व समाजाचें हित हीं परस्पर विरुद्ध नसावींत व प्रत्येक व्यक्तीला आपलें हित कशांब आहे हें समजण्याचें सामथ्र्य असावें अशी मुळीं ईश्वरी येजनाच आहे. यामुळे व्यापारउदीमाच्या बाबतींत व्यक्तीस पूर्ण मुभा असण्यांत देशाचें हित आहे व व्यक्तिस्वातंत्र्यावरच देशाची सांपत्तिक भरभराट अवलंबून आहे.
 या वरील विवेचनावत्रून निसर्गपंथाचा सर्व रोंख उदीमपंथांविरुद्ध कसा होता हें स्पष्ट होईल. उदीमपंथाचें संरक्षक धोरण होतें. लणजे त्या पंथाचें मत व्यापारउदीम यावर सरकारचा दाब पाहिजे; व सरकारनें संरक्षणाचें तत्व अंगीकारिलें पाहिजे, तरच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारेल असें होतें. तर निसर्गपंथाचे मताप्रमाणें जें जें होईल तें तें पाहावें हेंच सरकारचें खरें धोरण व यानेंच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारणार.
 निसर्गपंथी लोकांची संपत्तीच्या स्वरूपाची व त्याच्या कारणांची कल्पनाही उदीमपंथी लोकांच्यापेक्षां निराळी होती. त्यांचे मतें देशाची संपति वाढविणारा धंदा शेतकीच होय. जमिनीचे मालक व शेतकरी एवढेच समाजांतले का वर्ग धनोत्पादक आहेत. कारण शेतकीच्या उत्पन्नांतून श्रमाचा पूर्ण मोबदला मिळून व भांडवलाचें व्याज व
फायदा निघून शिवाय पुष्कळ निव्वळ उत्पन्न शिल्लक राहतें. याचें कारण शेतकी व खाणीचें काम यांमध्यें मनुष्याच्या श्रमाला निसर्गाची मदत होते. व म्हणूनच खर्चापेक्षां उत्पन्न किती तरी पट जास्त होतें. कारखानदार, व्यापारी, बैौद्धिक धंदेवाले व घरगुती चाकरनैोकर हे समाजांतील वर्ग जरी उपयोगी आहेत तरी ते अनुत्पादक किंवा वांझ आहेत. यांच्या श्रमापासून देशांत जास्त संपात्ति उत्पन्न होत नाहीं. कारखानदार कच्च्या मालपेक्षां जास्त किंमतीचा पक्का माल तयार करून संपात्ति वाढवितो असें भासेल, परंतु तें खरें नाहीं. कारण, कापसापासून विणकर्यानें विणलेलें कापड जास्त मोलवान् असतें खरें, पण कापसाच्या व कापडाच्या किंमतींतील हा फरक म्हणजे विणक-याच्या श्रमाचा निवळ मोबदला आहे. कारण जितकी जास्त किंमत त्यानें निर्माण केली तितकाच त्याला उपजीविकेचा वगैरे खर्च अर्थात् त्याच्या मजुरीचे दिवस खर्च झाले. तेव्हां कारखानदार हे धनाच्या एका रुपाला दुसरें रुप देतात एवढेंच. त्यांच्या श्रमानें देशाची संपत्ति वाढत नाहीं. हे सर्व अनुत्पादक वर्ग जमीनदार व शेतकरी यांच्यावर अवलंबून आहेत. कारण यांची उपजीविका उत्पादकवर्गाच्या निवळ शिलकेपासून होते. म्हणून प्रत्येक देशानें शेतकीच्या सुधारणेकडे लक्ष दिलें म्हणजे झालें. शेतकीची सुस्थिति व प्रगति असेल तर इतर उपयुक्त धंदे आपोआप निघतील. परंतु शेतकीची जर दुःस्थिति असेल तर इतर धंद्यांना कितीही उत्तजन दिलें तरी ते ऊर्जियाकरितां फ्रेंच राजांनीं कारखान्याच्या उत्तेजनाचा नाद सोडून शेतकीच्या सुधारणेस लागावें. प्रथमतः तावस्थेस येणार नाहींत.

 ताप्रांतांमधील व देशादेशांमधील आयात व निर्गत मालावरील जबर जकाती काढून खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारावें. फ्रान्समध्यें चालू असलेली अन्यायाची, भानगडीची व गुंतागुंतीची कराची पद्धत मोडून सर्व जमीनदार व शेतकरी लोकांवर नेमस्त व वाजवी असा सरसकट एकच कर बसवावा. व त्यामध्यें वारंवार फेरबदल करूं नये. या सुधारणा ताबडतोब घडवून आणल्यास फ्रान्समधल्या शेतक-यांची स्थिति सुधरेल व फ्रान्सच्या तिजोरीची दैनाही नाहींशी होईल. व फ्रान्स सांपत्तिक भरभराटीच्या मार्गास लागेल. अशा प्रकारचें या पंथाचें औद्योगिक धोरण होतें. कियेक इतिहासकारांचें असें ह्राणणें आहे कीं, या निसगपंथी लोकांच्या म्हणण्याप्रमाणें फ्रान्समध्यें जर ताबडतोब सुधा

[१७]

 रणा घडवून आणल्या असत्या तर फ्रान्समधली भयंकर राज्यक्रांति व तिचे दुष्परिणाम टळले असते. परंतु या लोकांच्या मतांचा परिणाम आधिकारी लोकांवर झाला नाहीं, व त्यांचीं मतें व प्रमेयें त्यांच्या पुस्तकांतच राहिलीं. मात्र त्यांच्या अप्रतिबंध व्यापाराच्या तत्वाचा कांहीं काळानें अॅडाम स्मिथनें फैलाव केला, व एक दोन शतकें तरी हें तत्व अबाधित रााहलें.

 निसर्गपंथानंतरच्या अर्थशास्त्राच्या पंथाचा जनक अॅडाम स्मिथ होय. अॅडाम स्मिथच्यापूर्वी इंग्लंडमध्यें सुद्धां उदीमपंथाच्या विरुद्ध मताचे पुष्कळ लेखक झाले. त्यांत ह्या इतिहासकाराचे अर्थशास्त्रविषयक निबंध फार मह्त्वाचे आहेत; परंतु या सर्व ग्रंथकारांच्या ग्रंथांतील ग्राह्यांश अॅडाम स्मिथच्या अभिमत ग्रंथांत आल्यामुळे अॅडाम स्मिथच्या उज्ज्वल कीतींमध्यें या ग्रंथकारांचीं नावं मावळून गेल्यासारखीं झालीं आहेत. ज्याप्रमाणें अॅरीस्टाटलला तर्कशास्त्राचा जनक समजतात त्याप्रमाणें अॅडाम स्मिथला अभिमत अर्थशाखाचा जनक समजतात. याचा अर्थ त्यानें सर्व शास्त्र अगदीं अथपासून इतिपर्यंत नवेंच केलें असा मात्र नव्हें आतांपर्यंत आपण पाहिलेंच आहे कीं, अर्थशास्त्रासंबंधीं दोन पंथ अॅडाम स्मिथच्या पूर्वींच उद्यास आले होते. परंतु अंडाम स्मिथ यानें आपल्यापूर्वीं झालेल्या अर्थशास्त्रविषयक वांड्मयापासून घेण्यासारख्या सर्व गोष्टी ग्रहण करून आपल्या बहुश्रुतपणानें, विचारानें व अवलोकनानें मिळविलेल्या ज्ञानाची त्यांत भर घालून या शास्त्राला व्यवस्थित व संघटित असें स्वरूप दिले. त्यानें या शास्त्राची मर्यादा ठरवून त्याची स्पष्ट अशी व्याख्या केली.या शास्त्रांतील निरनिराळे प्रश्न व विषय हे एकमेकांशी कसे संलग्न आहेत व ते परस्परावलंबी असुन कांहीं सर्वमान्य साधारण तत्वांपासून कसे सिद्ध होतात, हें आपल्या सुंदर विचारसरणीनें व विशेषतः विषद भाषाशैलीनें त्यानें लोकांच्यापुढे मांडिले. यामुळें अॅडाम स्मिथचा ग्रंथ एकदम विद्न्मान्य होऊन त्याच्या मतांचा प्रसार झपाट्यानें होऊं लागला व युरोपांतील इतर देशांतही त्याच्या पुस्तकाचीं भाषांतरें व रूपांतरें होऊ लागलीं. इंग्लंडमधील प्रसिद्ध मुत्सद्दी पिट हा स्मिथच्या मताचा आभमानी झाला.

[१८]

}

{[gap}}अॅडाम स्मिथचा ग्रंथ पंचपुस्तकात्मक आहे. राष्ट्रीय संपति ही राष्ट्रांतील वार्षिक श्रमाचें फळ आहे, या विधानापासून पहिल्या पुस्तकाला प्रारंभ केलेला आहे. या विधानानें अॅडाम स्मिथनें उदीमपंथ व निसर्गपंथ ह्या दोहोंपासून आपल्या मीमांसेचा फरक दर्शविला आहे. उदीमपंथानें पैसा व परकी व्यापार हीं संपत्तीचीं मुख्य साधनें आहेत असें प्रतिपादन केलें होतें; तर निसर्गपंथानें शेतकीला सर्व संपत्तीची जननी केलें होतें. ह्या दोन्ही पंथांचा एकतर्फीपण दाखविण्याकरितां व आपल्या मीमांसेचें संपूर्णत्व स्थापन करण्याकरितां संपत्तीचें तिसरें उपेक्षित कारण मानवी श्रम होत असें प्रतिपादन करून स्मिथनें अभिमत पंथांतील कारणात्रयीचा संप्रदाय पाडला

 राष्ट्रीय संपत्तीचीं भांडवल, जमीन व .श्रम अशीं तीन कारणें आहेत, हें त्यानें प्रथमतः दाखविलें आहे व मग श्रमाच्या ज्या एक विशेष गुणावर संपत्तीची कमीअधिक वाढ अवलंबून आहे त्याचें विशेषतः वर्णन कलें आहे. श्रमाचा हा गुण म्हणजे श्रमविभागाचें तत्व होय. अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्रामध्यें या तत्वाचा एक नवा शोधच लाविला असे म्हणण्यास हरकत नाहीं. समाजांत श्रमविभागाचें तत्व सुरू झालें म्हणजे प्रत्येक माणसाच्या ब-याच गरजा दुस-याकडून भागविल्या जातात, म्हणून मालाच्या अदलाबदलीस सुरुवात होते व ही अदलाबदल सुलभ रीतीनें होण्याकरितां विनिमयसामान्य म्हणून पेसा आस्तित्वांत येता. तसेंच मालाची अदलाबदल मालाचें मोल ठरल्याखेरीज होत नाही. मालाच्या मोलाचें खरें प्रमाण म्हणजे तो माल उत्पन्न करण्यास लागणा-या श्रमाचें परिमाण होय. सारख्या परिमाणाच्या श्रमाची किंमत सर्व काळीं व सर्व ठिकाणीं सारखीच असते. सामान्यतः पदार्थाचे मोल पैशामध्यें मोजलें जातं व त्यालाच पदार्थाची किंमत म्हणतात. पैशाला उत्तम वस्तु म्हणजे सोनेंरूपें, कारण त्यांचें मोल सहसा बदलत नाही. समाजाच्या प्रथमावस्येंत वस्तूची किंमत बहुतांशीं श्रमावरच अवलंबून असते. परंतु समाजाच्या परिणतावस्थेंत किंमतीमध्यें तीन घटकावयव असतात. भाडें अगर खंड, मजूरी व नफा. जमीनदाराला भाडें मिळतें. कामगारांला मजुरी मिळते व संपत्ति उत्पन्न करणाराला नफा मिळतो. समाजाची संपत्ति ज्या प्रमाणानें वाढते, त्या प्रमाणानें भाडें व मजुरी वाढत जातात,

[१९]

 परंतु देशाच्या सांपत्तिक वाढीबरोबर नफा मात्र कमी होतो. कारण जसजसें देशांत भांडवल जास्त वाढतें तसतशी भांडवलवाल्यांत धंद्याबद्दल चढाओढ होऊन भांडवलवाल्यांचा नफा कमी होत जातो. तरी पण कांहीं विशिष्ट कारणांनीं निरनिराळ्या धंद्यांतील मजुरी व नफा यांमध्यें कायमचा फरक दिसून येतो.
 दुस-या पुस्तकामध्यें भांडवल, त्याची वाढ व त्याची सुस्थिति यासंबंधाचें विवेचन आहे. भांडवलाचे दोन प्रकार आहेत. एक स्थिर भांडवल व दुसरें चल भांडवल. यंत्रसामग्री, कारखान्याच्या इमारती वगैरे, शेताची कायमची सुधारणा धद्याचें व कलांचें ज्ञान हें स्थिर भांडवल होय. चल भांडवल म्हणजे पैसा, कारखानदाराच्या ताब्यांतील अन्नसामग्री, कच्चा माल व कारखानदाराच्या हातांतला पक्का माल. देशाच्या पैशाची दरवर्षी होणारी मोडतोड व झीज हीं भरून काढणें बरेंच खर्चाचें काम असतें, म्हणून देशांत व्यापारी पत, विश्वास व सचोटी यांचा उदय झाल्यावर कागदी चलन सुरू होतें व त्याचे योगानें बराच खर्च वांचतो, या पुस्तकाच्या शेवटीं अॅडाम स्मिथनें स्वाभाविकपणें उद्योगधंद्याच्या पाय-या कशा लागतात व देशांत वाढणारें भांडवल स्वाभाविक तऱ्हेनें कशा क्रमानें निरनिराळया धंद्यांत गुंतविलें जाईल हें सांगितलें आहे. अॅडाम स्मिथच्या मतानें भांडवल प्रथमतः शेतकींत जाईल. कारण तेथें सृष्टि मानवी श्रमाला मदत करीत असते. म्हणून या उद्योगांत फारच फायदा असतो. नंतर कारखाना, नंतर देशी व्यापार, मग परदेशी व्यापार व शेवटीं परदेशी अप्रत्यक्ष व्यापार, हा धंद्याच्या वाढीचा नैसर्गिक ऋम आहे
 या दोन पुस्तकांत अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्राचा तात्विकदृष्ट्या विचार केला आहे व पुढील अर्थशाखकारांनीं अॅडाम स्मिथच्या विवेचनांतील याच तात्विक भागांत कोठें भर घातली आहे तर कोठें त्याच्या मतांत फरक केला आहे<br.>

 अॅडाम स्मिथचें तिसरें व चौथें पुस्तक हीं ऐतिहासिक आहेत. तिस-यामध्यें युरोपांत निरनिराळ्या धंद्यांची व एकंदर संपत्तीची वाढ कशी व कोणत्या कारणानें झाली याचा इतिहास दिला आहे. चैौथ्यांत आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या पंथांची हकीकत देऊन त्यांच्यावर टीका केली आहे. यामध्यें विशेषतः उदीमपंथाच्या हेतूचें व त्यांच्या साधनांचें सविस्तर

[२०]

 खंडण आहे. निसर्गपंथाशीं अॅडाम स्मिथचा विरोध थोड्याच बाबतींत होता. पुष्कळ बाबतींत त्याचें व अॅडाम स्मिथचें मतैक्यच होतें. म्हणून या पंथावर अॅडाम स्मिथनें फारशी सविस्तर टीका केली नाहीं.अॅडाम स्मिथच्या ग्रंथाच्या शेवटल्या पुस्तकांत सरकारचीं कर्तव्यकर्में व त्यांच्या सिद्धयर्थ लागणारा खर्च याचा प्रथम विचार करून मग हा खर्च सरकार कोणकोणत्या उत्पन्नाच्या बाबीनें भागवितें हें सांगितलें आहे. सुधारलेल्या सर्व देशांत बहुधा सरकारचें बहुतेक उत्पन्न करांपासून उत्पन्न होतें असें अॅडाम स्मिथनें दाखविलें आहे; व पुढें कराचे चार नियम दिले आहेत, व करांचें वर्गीकरण देऊन प्रत्येक कर हा समाजांतील कोणकोणत्या वर्गावर अखेर पडतो व त्यांचा संपत्तीच्या वाढीवर काय परिणाम होतो हें सांगितलें आहे व शेवटीं राष्ट्रीय कर्जाची मीमांसा करुन ग्रंथ समाप्त केला आहे.[br]

   ज्याप्रमाणें बेकन हा पाश्र्चात्य शास्त्रीय प्रगतीच्या आधीं उद्यास आला, परंतु त्यानें शास्त्राची विलक्षण प्रगति होईल असें भविष्य केलें, त्याप्रमाणें अॅडाम स्मिथ हा युरोपांतील औद्योगिक क्रांतीच्या आधीं झाला; व त्याच्या काळीं यंत्रे व अर्वाचीन काळचीं वाफेवर चालणारी एंजिनें झालीं नव्हतीं. तरी त्यानें आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीनें भावी संपत्तीच्या वाढीच्या कारणांचा विचार करून संपत्तीची विलक्षण वाढ होणार असें भाकीत केलें होतें; व तें भाकीत सर्वतोपरीं खरें ठरलें.
  त्याचे नंतरचा अर्थशास्त्राला एका महत्वाच्या प्रश्नाची जोड करून देणारा ग्रंथकार म्हणजे मालथस होय. मालथसचें नांव लोकसंख्येची मीमांसा या प्रश्नाशीं अगदीं खिळलेलें आहे; परंतु त्याचें या प्रश्नाकडे एका आकस्मिक प्रसंगानें लक्ष गेलें
{gap}} गाडविन् म्ह्णून त्या काळीं नांवाजलेला असा मोठा ग्रंथकार होऊन गेला. त्यानें सामाजिक प्रश्नासंबंधीं लोककल्याणाच्या हेतूनें व लोकांची स्थिति सुधारण्याकरितां पुष्कळ लेख व ग्रंथ लिहिले. त्या एकामध्यें त्याचें असें म्हणणें होतें कीं, जगांत किंवा एखाद्या देशांत संपत्ति कमी असते म्हणून लोक दारिद्र्यांत, दैन्यावस्थेंत व हृालांत राहतात असें नाहीं. देशांत संपत्ति सर्व लोकांना पुरेशी असते व नेहमीं पुरेशी राहील. मात्र देशांतील सर्व वर्गांमध्यें संपत्तीची व श्रमांची सारखी वांटणी झाली पाहिजे. हल्लीं श्रीमंत लोक मुळीं श्रम न करतां अन्यायी कायद्याच्या[

[२१]

 मद्तीनें संपत्तीचा मोठा वांटा पटकवितात. यामुळें गरीब लोकांस जीवापाड श्रम करूनही पोटापुरता संपत्तीचा वांटा मिळत नाहीं; व म्हणूनच त्यांना हालांत, दुःखांत व एकंदर दैन्यांत दिवस कंठावे लागतात. म्हणून संपत्तीची वांटणी न्यायाची केल्यास व प्रत्येक मनुष्यानें आपल्या उपजीविकेकरितां श्रम करावयाचेच असा निश्चय केल्यास सर्वत्र सुख व शांति नांदेल; व असें एकदां झालें म्हणजे सर्वाना आपलीं मनें सुसंस्कृत करण्यास वेळ मिळेल. देशांत सर्व लोक सुखी व ज्ञानवान् होतील. मग गुन्हे, दुःख, हाल वगैरे सर्व अनिष्ट प्रकार समाजांतून नाहीसे होऊन सर्वत्र स्त्ययुगास सुरुवात होईल. अशा प्रकारच्या विचारसरणींतील एक ढोबळ चूक दाखविण्याकरितां मालथस यानें आपला निबंध लाहला. मालथसच्या मतें ही घोडचूक म्हणजे मानवी स्वभावांतल्या एका प्रवृतीची विस्मृति होय. मालथसनें असें दाखविलें कीं, असा समाज स्थापन झाला आहे अशी कल्पना केली तरी हें सत्ययुग शाश्वत टिकणारें नाहीं. पुनः कलियुगास प्रारंभ झालाच पाहिजे. कारण, सर्व मनुष्यांची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे प्रत्येक मनुष्य लग्र करील. कां कीं, विवाहाची प्रवृति मनुष्याला उपजत आहे व प्रत्येक कुटुंबाची सुस्थिति आहे असें मानलें म्हणजे मानवी प्राण्याच्या प्रजोत्पादनशक्तीला अमर्यादित मुभा मिळेल. मनुष्याला लागणारें अन्न गणितश्रेढीनें वाढतें तर मनुष्यची वाढ भूमितिश्रेष्टीनें होते. यामुळे मनुष्यें इतकीं वाढतील कीं, सर्वांना अन्न मिळण्याची पंचाईत पडून पुनः जीवनार्थकलह सुरू होईल व सदृढ मनुष्यें आपल्याला जास्त संपत्ति मिळवितील व संपत्तीची विषमता व त्यापासून होणारें दुःख व हालअपेष्टा हीं जगांत अवतरतील. तेव्हां ज्या कारणानें या मनुष्यस्वभावांतील सत्ययुग नाहीसें होईल त्याच कारणानें असें सत्ययुग अस्तित्वांतच येणार नाहीं. तेव्हां जगांत लोकसंख्या मर्यादित राहण्यास दुष्काळ, सांथ, आजार, दुःखे वगैरे स्वाभाविक आपत्ती व अनीति, लढाया वगैरे कृत्रिम आपत्ती या पाहिजेत. तेव्हां ही लोकसंख्या मर्यादित करणारीं सक्षात् कारणें म्हणजे सृष्टीक्रमांतील एक आवश्यक भागच आहे.

  या पुस्तकाबद्दल मालथसवर धर्माभिमानी लोकांकडून अतोनात टीका झाली. कारण, त्याच्या विचारसरणीप्रमाणें दुष्काळादि कारणें

[२२]

 ईश्वरनिर्मित जगांत सतत राहणार असें ठरत असल्यानें देवावर अन्यायीपणाचा दोष येतो. परंतु याचें पुस्तक श्रीमंत लोकांना मात्र आवडलें. कारण, गरीब लोकांची दुःस्थिति त्यांनीं आपल्या अविचारानें आपणावर ओढून आणलेली आहे, असा त्याच्या प्रतिपादनाचा एकंदर रोख होता.

 या निबंधाच्या दुस-या आवृत्तींत मालथसनें पुष्कळच फरक केला. खरोखरी त्याचा ग्रंथ नवीनच झाल्याप्रमाणें झाला. पहिल्या आवृत्तीइतकी एककल्ली विचारसरणी त्यामध्यें नव्हती. आपल्या ह्मणण्यास त्यानें ऐतिहासिक पुरावा पुष्कळ जोडला. विशेषतः लोकसंख्या मर्यादित करणारें आणखी एक कारण प्रमुखत्वेंकरून त्यानें पुढें केलें. तें कारण म्हणजे दूरदर्शीपणा हें होय. जर मनुष्यांनीं लग्नाच्या बाबतींत दूरदर्शीपणा दाखविला व आपल्या बायकोचें व भावी मुलांचें चांगल्या रीतीनें संगोपन करतां येईल अशी सांपत्तिक स्थिति प्राप्त होईपर्यंत लग्नाचा विचार पुढें ढकलला तर लोकसंख्या कमी करणाऱ्या साक्षात् कारणांचा जोर कमी होईल. याप्रमाणें मालथसनें आपल्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तींत समाजसुधारणेची शक्यता कांहीं अंशानें कबुल केली; परंतु ही सुधारणा घडून येण्यास मनुष्यांमध्यें विवाहसंबंधीं दूरदर्शीपणा व आपल्या मुलांबाळांचें संगोपन आपणच केलें पाहिजे अशी स्वावलंबी भावना उत्पन्न झाली पाहिजे असें प्रतिपादन केलें.

 याच्या पुढला अर्थशास्त्रकार म्हणजे रिकार्डो. यानें भाड्याची एक नवीन मीमांसा काढली. तसेंच राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराच्या तत्वाचा ऊहापोह केला. रिकाडेनें अर्थशास्त्र हें एक भूमितीसारखें तार्किक शास्त्र आहे असें प्रतिपादन केलें. या शास्त्राला अवलोकनाची गरज नाहीं. ज्याप्रमाणें संख्या व परिमाण यासंबंधींच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून गणितशास्त्र आपलीं सर्व तत्वें काढितें, त्याप्रमाणें मानवी स्वभावाच्या कांहीं स्वयंसिद्ध तत्वांपासून तार्किक पद्धतीनें सर्व प्रमेयें व सिद्धान्त अर्थशास्त्र काढितें. या शास्त्राचीं विधानें गणिताप्रमाणेंच सर्व काळीं व सर्व ठिकाणी व समाजाच्या कोणत्याही स्थितींत सारखींच लागू पडतात. अर्थशास्त्राला हें स्वरूप रिकॉर्डोनें दिलें ही गोष्ट फार अनिष्ट झाली कारण या तार्किक पद्धतीनें काढलेल्या या शास्त्रांतील पुष्कळ सिद्धांतांचा सत्याशीं व वस्तुस्थितीशीं विरोध येऊं लागला व म्हणूनच या शास्त्राच्या विफलतेबद्दल व खोटेपणाबद्दल ओरड होऊं लागली.

[२३]

' अर्थशास्त्राची व कराचीं तत्वें' या नावाच्या पुस्तकांत रिकार्डोचे बहुतेक सर्व विचार आलेले आहेत. रिकार्डोचा हा ग्रंथ म्हणजे या शास्त्रावरील साग्र व संपूर्ण असा ग्रंथ नाही; तर तो माल, किंमत, भाडें, मजुरी, नफा, कर, पैसा, पेढया इत्यादि अर्थशास्त्रांतील विषयांवरील एक निबंधसंग्रह आहे. तरी पण रिकार्डोच्या या निरनिराळ्या निबंधांतील विचारसरणी सारखीच असून त्या सर्वांमध्यें कांहीं एक सामान्य तत्वें प्रतिबिंबित झालेलीं आहेत यांत शंका नाहीं. या ग्रंथांत संपत्तीच्या उत्पत्तीच्या विषयापेक्षां संपत्तीच्या वांटणीच्या विषयालाच ग्रंथकारानें जास्त महत्व दिलेलें आहे. देशांत संपत्ति उत्पन्न झालेली आहे असें गृहीत धरून त्या संपत्तीची समाजांतील निरनिराळ्या वर्गांमध्यें वांटणी कशी होते व विशेषतः समाजाच्या प्रगतीच्या निरनिराळ्या पाय-यांमध्यें या वांटणींत. कसकसा फरक होत जातो या प्रश्नाचा ऊहापोह रिकार्डोनें विशेष प्रकार केला आहे.

  त्याची किंमतीची किंवा मोलाची मीमांसा होय. त्याच्या मतानें ज्या मालाचा पुरवठा अपल्या इच्छेप्रमाणं वाटेल तितका वाढवितां येतो, अशा मालाचें मोल चढाओढीच्या अमदानींत त्या मालाच्या उत्पत्तीला लागणा-या श्रमावर अवलंबून असतें. व्यावहारिक. भाषेत बोलावयाचें म्हणजे मालाची किंमत त्याच्या उत्पत्तीच्या खर्चावर अवलंबून असते. संपत्तीच्या उत्पत्तीला भांडवल लागतें खरें, परंतु भांडवल म्हणजे सांठविलेले श्रम होत. तेव्हां मालाची किंमत म्हणजे त्याला लागणा-या श्रमाची किंमत होय. याप्रमाणें रिकार्डोनें संपत्तीच्या एकाच कारणाला वाजवीपेक्षां फाजील महत्व दिलें. रिकार्डोच्या एककल्ली मतावरच सामाजिकपंथी ग्रंथकारांची मोठा भिस्त आहे, हें पुढील एका पुस्तकांत सामाजिकपंथाचा इतिहास द्यावयाचा आहे त्या वेळीं जास्त खुलासेवार दिसून येईल.
  या तत्वाच्या विवेचनानंतर रिकार्डोनें समाजांतील निरनिराळ्या वर्गामध्यें संपत्तीची वांटणी कशी होते हें दाखविण्याचा उपक्रम केला आहे व प्रथमतः त्यानें आपल्या प्रसिद्ध भाड्याच्या उपपत्तीचा ऊहापोह केला आहे. या उपपत्तीचा 'वांटणी' च्या एका भागांत सविस्तर विचार करावयाचा आहे. तेव्हां येथें त्याचें सामान्य स्वरूप दाखवेले. म्हणजे बस्स

[२४]

 होईल. जरी भाडयाची उपपत्ति हल्लीं रिकार्डोच्या नांवाखालीं मोडते तरी त्याच्यापूर्वी अंडरसन, मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधिशाच्या पदवीप्रत चढलेले वेस्टसाहेब व प्रसिद्ध अर्थशास्त्री मालथस या तिन्ही ग्रंथकारांच्या लेखांत ही उपपत्ति दृष्टीत्पत्तीस येते व ही गोष्ट रिकार्डो यानेंही कबूल केली आहे.थोडक्यांत या उप्पतीचे स्वरूप असें आहे.जमिनीचे भाडें म्हणजे जमिनीच्या उत्पादक शक्तीबद्दल जमीन कसणारानें जमिनीच्या मालकास दिलेली किंमत होय, व या किंमतीचें मान जमीन कसण्यास लागणारा खर्च व जमिनीच्या उत्पन्नाचीं येणारी किंमत यांच्या अंतराबरोबर असते व जसजशी देशाची लोकसंख्या वाढते तसतशी धान्याची किंमत वाढते व धान्याची किंमत वाढली म्हणजे कमकस जमिनीची लागवड करणें शक्य होतें. परंतु या अगदी निकृष्ट कसाच्या जमिनीचें भाडें येत नाहीं व या जमिनीचें उत्पन्न व सुपीक जमिनीचें उत्पन्न यांच्या अंतराइतकें जमिनीचें भाडे येतें. धान्याच्या किंमतीचा भाडें हा घटकावयव नसतो. तर धान्याच्या किंमती वाढल्यामुळे भाडे वाढतें. रिकॅर्डोच्या विचारसरणींत या भाड्याच्या उपपत्तीला विशेष महत्त्व आलेलं आहे. याचें कारण असें आहे कीं, त्यानें या उपपत्तीवरून समाजच्या एकंदर सांपत्तिंक स्थितीबद्दल व त्या समाजांतील निरनिराळ्या वर्गाच्या सांपत्तिक स्थितीबद्दल कांहीं विशिष्ट अनुमानें काढिलीं आहेत. त्याचे मतें देशाची जसजशी वाढ होते व लोकसंख्या वाढत तसतसे धान्याचे भाव चढत जातात व याचा परिणाम असा होती कीं, जमीनदाराचें भाड्याचें उत्पन्न सारखे वाढत जातें. धान्याचे भाव वाढले म्हणजे मजुरांच्या उपजीवनाचा खर्च वाढतो व यामुळे मजुरीचे दर वाढतात. परंतु या वाढत्या मजुरीच्या दरापासून मजुरांची सांपत्तिक स्थिति सुधारते असें मात्र नाहीं. कारण जीविताच्या अवश्यकालाच किंमत जास्त पडूं लागते व मजुरी जास्त झाली कीं, व्यापाच्यांचा व कारखानदारांचा नफा कमी होतो. अशा प्रकारची अनुमानें रिकाडेनेिं आपल्या उपपत्तीपासून काढिली आहेत. त्याच्या खरेखोटेपणाचा पुढल्या भागांत विचार करावयाचा आहे. तेव्हां सध्या इतकी माहिती पुरे आहे'
 रिकॅर्डोच्या मतांतील विशेष महत्त्वाचें दुसरें मत म्हणजे परकी व्यापारासंबंधीं होय. परकी व्यापाराचा विशेष फायदा कोणता व कोणत्या परि-
स्थितींत व्यापार चालू शकतो याचे रिकार्डोने मोठ्या मार्मिक तहेन विवेचन केले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे परदेशी व्यापाराचा खरा व एकच फायदा हा होय कीं, त्याचे योगाने देशांतील भांडवल व श्रम यांच्या मोबदला आधिक माल मिळू शकतो, म्हणजे परकी व्यापाराच्या योगानें जणू कांहीं देशाची संपाति वाढल्याप्रमाणे होते. याही विषयाचा पुढे आपल्यास विशेष तऱ्हेने विचार करावयाचा आहे. तेव्हां सध्या इतकें विवे चन वस्स आहे.
 ज्याला अर्थशास्त्राचे इतिहासकार अभिमत अर्थशास्त्र म्हणतात, ते मुख्यतः या तीन ग्रंथकारांनी बनविलें असें म्हणण्यास हरकत नाही. यापुढील या पंथाचा अभिमान व पुरस्कर्ता म्हणजे जॉन स्ट्अयूर्ट मिल्ल होय. अँडाम स्मिथच्या अर्थशास्त्रावर पुष्कळ ग्रंथकर्त्यांनी आक्षेप घेतले. यामुळे अर्थ शास्त्रातील पुष्कळ प्रश्न पुनः वादग्रस्त बनले; शिवाय रिकॅर्डोनंतर व कांहीं अंशी त्याच्याच एककल्ली सिद्धान्तामुळे सामाजिक पंथ नांवाचा एक अर्थ शास्त्रात नवीन पंथ निर्माण झाला. या पंथाचा हेतु संपत्तची वाटणी न्यायाने व समतेने करण्याचा होता. या पंथाची हकीकत या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकांत दिली असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ति करीत नाही. परंतु या पंथानेही अभिमत अर्थशास्त्राच्या कांहीं प्रमेयांच्या सत्यत्वाबद्दल लोकांच्या मनांत संशय उत्पन्न केला. तसेच अर्थशास्त्रविषयक कांहीं नवीनच प्रश्न उपस्थित झाले. या सर्व नवीन सामग्रीचा उपयोग करून मिल्लने जुन्याच पायावर व जुन्याच पद्धतीने परंतु सामाजिक पथाने व उदयोन्मुख अशा ऐतिहासिक पंथाने आणलेल्या नव्या ज्ञानाचा उपयोग करून एक मोठा व्यापक ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्रावरील त्याचा पहिला ग्रंथ ‘‘ अर्थशास्त्रातील कांहीं निकाल न लागलेल्या प्रश्नांसंबंधीं » होता. या ग्रंथांत केलेल्या विवेचनाचा पुढे मिल्लने आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत उपयोग केला. मिल्लची महत्वाकांक्षा ‘‘ अर्वाचीन अँडाम स्मिथ " लिहिण्याची होती, व ती पुष्फळ अंशी सफलही झाली. सुमारे पन्नास वर्षे अर्थ शास्त्रावरील मिल्लचे पुस्तक म्हणजे एक मोठा आधारभूत ग्रंथ गणला जात असे. मिल्लच्या लेखांच व ग्रंथांच प्रसाद हा एक विशेष गुण आहे. तसेच प्रतिपक्षाची मते योग्य तऱ्हेने मांडून मग त्यांचे यथार्थ खंडण कर

ण्याची त्याची शैली वर्णनीय आहे. तसेच कोणत्याही तत्वाला योग्य


[२६]

 दाखला व उपमा देऊन तें विषद करण्याची हातोटी मिल्लला उत्तम साधली होती. यामुळें त्याचें पुस्तक फार लोकप्रिय झालें, इतकेंच नव्हे तर अर्थशास्त्रांतील तत्वें व प्रमेयें हीं सामाजिक प्रश्नांना कशीं लागू करावयाचीं याचाही त्यानें ऊहापोह केला असल्यामुळें तें पुस्तक अॅडम स्मिथच्या पुस्तकांपेक्षांही जास्त महत्वाचें आहे असें लोकांस वाटलें. मिल्लनें या शास्त्राच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे व बहुतेक ठिकाणी रिंकार्डोचीं मतेंच प्रतिपादन केलीं आहेत.
 मिल्लच्या पहिल्या ग्रंथांत पांच विषयांवर पांच निबंध आहेत. पहिल्या निबंधाचा विषय म्हणजे राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापाराचे नियम हा होय. यामध्यें मिल्लनें असें दाखविलें आहे कीं, दोन देशांचा दोन मालांमध्यें व्यापार सुरू झाला तर त्या देशांची मागणी अशी होते कीं एका मालाची किंमत दुस-या मालाबरोबर होते. म्हणजे जरी राष्ट्रांराष्ट्रांमधील व्यापार पैशाच्या योगानें चालला तरी ता ऐनजिनसी अदलाबदलीसारखा असता व कांहीं विशेष कृत्रिम कारणें अस्तित्वांत नसलीं म्हणजे देशांतील आयात व निर्गत माल याची अदलाबदल होऊन व्यापाराची तोंडमिळवणी होते. या निबंधांतील तत्वांचें मिल्लनें आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत "राष्ट्रांराष्ट्रांतील मागणीचें समीकरण" या नांवाखालीं विवेचन केलें आहे. दुस-या निबंधाचा विषय 'संपत्तीच्या व्ययाचा उत्पत्तीवर परिणाम' हा होय. यामध्यें सुखवस्तु लोक आपलें खेडेगांवांतील उत्पन्न शहरांत राहून खर्च करितात याचा देशाच्या संपत्तीवर काय परिणाम होतो याचा मिल्लनें विचार केला आहे व जरी कायमचा संपत्तीच्या उत्पत्तीचा अतिरेक होणें शक्य नाहीं तरी क्षणिक अतिरेक होणें शक्य आहे हें सिद्ध केलें आहे. तिस-या निबंधांत उत्पादक व अनुत्पादक या शब्दांच्या व्याख्या ठरविण्याचा मिल्लनें प्रयत्न केला आहे; चवथ्यामध्यें व्याज व नफा यांचा विचार केला आहे व त्यामध्यें नफा हा मजुरीवर कसा अवलंबून आहे, या रिकार्डोच्या तत्वाचें स्पष्टीकरण केलें आहे; व शेवटच्या निबंधांत अर्थशास्त्राची व्याख्या व त्याची शास्त्रीय पद्धति याचा विचार केला आहे, व येथें मिल्लनें रिकार्डोच्या तार्किक पद्धतीचें समर्थन केलें आहे.

 यानंतरचा मिल्लचा ग्रंथ म्हणजे त्याचा प्रसिद्ध अर्थशास्त्रावरील ग्रंथ होय. वर सांगितलेंच आहे कीं, या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्याची

[२७]

 विषद भाषाशैली व शास्त्रीय तत्वांचें सोदाहरण स्पष्टीकरण होय. मिल्लचीं अर्थशास्त्रविषयक मतें सरासरी जुन्या म्हणजे अभिमत पंथाचींच आहेत. परंतु त्याचा काळ हा संक्रमणावस्थेचा काळ होता व मिल्लचें मन नव्या नव्या कल्पनांचें ग्रहण करण्यास योग्य असें होतें, यामुळे त्यानें पुष्कळ बाबतीत नवीन मतें ग्रहण केलीं आहेत. तो सामाजिक पंथ याचा अभिमानी झाला होता व त्यांच्या कांहीं कल्पनांचा स्वीकार त्यानें आपल्या पुस्तकांत केला आहे. उदाहरणार्थ, पुढील पुस्तकांमध्यें ज्या 'मजुरीफंड' नांवाच्या मजुरीच्या उपपत्तीचा ऊहापोह करावयाचा आहे, त्यावर प्रथमतः मिल्लचा भरंवसा होता, परंतु पुढे ही उपपत्ति वस्तुस्थितीला धरून नाहीं असें त्याच्या ध्यानांत आल्यापासून त्यानें ती उपपत्ति सोडून दिली. परंतु मिल्लच्या या नवीन कल्पनग्रहणक्षमतेपासून त्याच्या ग्रंथांत नव्याजुन्या कल्पनांची खिचडी होऊन त्यामध्यें बरीच विसंगतता आली आहे; तरी पण मिल्लचें सामान्य धोरण रिकार्डोच्या व मालथसच्या मतांचा अनुवाद करण्याचच असल्यामुळे मिल्ल हा अभिमतपंथीच अर्थशास्त्रज्ञ होता असें ह्मणणें भाग आहे.
 यानंतरचे या पंथाचे अभिमानी ग्रंथकार केअर्नस्, फॉसेट, सिजविक् व निकॉलसन् हे होत. पहिल्या दोघांनीं बहुतेक ठिकाणीं मिल्लचाच अनुवाद केला आहे. दुस-या दोघांनीं मात्र ऐतिहासिक पद्धतीचा व अभिमत अर्थशास्त्राविरुद्ध असणा-या दुस-या लेखकांच्या ग्रंथांचा उपयोग करून या जुन्या अर्थशास्त्राचीं प्रमेयें थोड्याबहुत फेरबंदलानें सध्यासुद्धां वस्तुस्थितीशीं कशीं सुसंगत आहेत हें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

 रिकार्डो, मिल्ल व केअर्नस् या ग्रंथकारांचे फ्रान्समधील अनुयायी कझन व जे. बी. से यांनीही तार्किक पद्धतीचा सर्वस्वी अवलंब केला व या शास्त्राचीं प्रमेयें सर्व ठिकाणीं व सर्व काळीं सारखींच लागू असली पाहिजेत असें प्रतिपादन केलें. परंतु अर्थशास्त्रांतील तत्वें भूमितिशास्त्राच्या तत्वांप्रमाणं त्रिकालाबाधित नसल्यामुळे, अभिमत अर्थशाखांतील सिद्धांतांचा दुस-या देशांतील वस्तुस्थितीशीं विरोध दिसून येऊं लागला. उदाहरणार्थ, अभिमत अर्थशास्त्राची तत्वें जर्मनीसारख्या औद्योगिक व राजकीय बाबतींत मार्गे असलेल्या देशाला लागू पडेनात. यामुळेंच जर्मनीमध्यें ऐतिहासिक पंथाचा उदय झाला. या

[२८]

 ऐतिहासिक पंथाच्या थोडेसे आधीं झालेले, परंतु ज्यांच्या श्रमानें ऐतिहासिक पंथ अप्रत्यक्षपणें उदयास आला अशा दोन लेखकांचा येथें उल्लेख करणें रास्त आह. ते लेखक अॅडम म्युल्लर व फ्रेडारिक लिस्ट हे होत.<gr>  अॅडम म्युल्लरनें मध्यकाळच्या औद्योगिक संस्था व वाली यांचें समर्थन केलें आहे, व त्याच्या काळच्या उदारमतपंथाचा निषेध केला आहं. त्याचे मतें अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र हें व्यक्तीच्या संपत्तीच्या वाढीचें शास्त्र आहे. तें राष्ट्रीय दृष्टीनें विचार करीत नाहीं, इतकेंच नव्हे, तर तें संपत्तीच्या पलीकडे कांहीं विशेष महत्वाच्या गोष्टी आहेत हेंही जाणत नाहीं. अर्थशास्त्रानें राष्ट्राच्या बौद्धिक, नैतिक व औद्योगिक अशा सर्व बाजूंचा विचार करून राष्ट्राच्या हिताच्या गोष्टी कोणत्या हें ठरविलें पाहिजे असें म्युल्लरचें ह्मणणें होतें. श्रमविभाग हा भांडवलाच्या वाढीवर अवलंबून आहे; हें अॅडम स्मिथच्या ध्यानांत नव्हतें; तसेंच श्रमविभागाच्या तत्वाचें पूरक तत्व श्रमसंघटना याचा अॅडम स्मिथनें विचार केला नाहीं, वगैरे दोष म्युल्लरनें अॅडम स्मिथच्या ग्रंथांत दाखविले आहेत. शेवटीं म्युलूरचें ह्मणणें असें आहे कीं, अॅडम स्मिथचें अर्थशास्त्र समुद्रानें वेष्टित अशा इंग्लंडसारख्या पृथक् देशास मात्र लागू आहे; परंतु यांतील तत्वें युरोपांतील इतर देशांस जर लागू केलीं तर ती गोष्ट राष्ट्रीयदृष्ट्या हानिकारक होईल.

मुल्लरच्या लेखांत दिसून येणारा राष्ट्रीयपणा लिस्टनें जास्त जोरानें पुढें आणला व त्यानें आपल्या ग्रंथास राष्ट्रीय अर्थशास्त्र असें नांव दिलें. त्याचे मतें स्मिथचें अर्थशास्त्र हें विश्वव्यापी आहे म्हणजे यामध्यें सर्व जग एकाच राज्यपद्धतीखालीं आहे असें गृहीत धरलें आहे. निदान त्यांत जगांत सध्या प्रचलित असलेल्या निरनिराळ्या व स्वतंत्र राज्यपद्धतीकडे कानाडोळा केला आहे व सर्व जगाच्या सांपत्तिक कल्याणाचा मार्ग कोणता हें ठरविलें आहे. त्यानें अप्रतिबंध व्यापाराचें समर्थन केलें आहे तें या दृष्टीनें बरोबरही आहे. परंतु लिस्ट याला या दोन्ही गोष्टी कबूल नव्हत्या. त्याचे मतें मनुष्याच्या स्वभावाकडे लक्ष देतां व सध्याच्या जगाच्या व्यवस्थेकडे लक्ष देतां प्रत्येक राष्ट्रानें आपापल्या हिताकडे पाहणें एकंदरींत हितावह आहे, व खरी मानवी प्रगति या मार्गानेच होईल. तेव्हां प्रत्येक राष्ट्रानें आपण पूर्णपणें स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याची खटपट केली पाहिजे. देशाच्या सर्वांगीय वाढीस उद्योगवैचित्र्य अवश्यक आहे.

[२९]

म्हणूनच प्रत्येक देशाने शेतकी, कारखाने, व्यापार या सर्व औद्योगिक अंगांची प्रगति केली पाहिजे, व ही प्रगति घडवून आणण्यास संरक्षक पद्धतीचा अंग र केल्याखेरीज गत्यंतर नाही. लिस्टच्या मताप्रमाणे समा जाचे किंवा राष्ट्राचे बाल्यावस्थेत अनियंत्रित व्यापार असावा. कारण अशा व्यापाराने सुधारलेल्या देशांतून कलाकौशल्याचे जिन्नस देशांत येतात, व त्यांचा लोकांत प्रसार होतो, व ह्यायोगाने  लोकांची अभिरुची परिणत होते व वासना व गरजा जास्त वाढतात. असे झाल्यानंतर संरक्षणपद्धतीचा अवलंब केला पाहिजे म्हणजे देशांत लोकांच्या नवीन वाढलेल्या गरजा, वासना व अभिरुची यांच्या तृप्तीसठी कारखाने निघू लागतात व असे वाल्यावस्थेतील कारखाने पूर्ण वाढ झालेल्या कार- खान्याच्या मालाशी बरोबरीच्या नात्याने टक्कर देऊ शकत नाहींत. व म्हणून याकाळीं देशांत संरक्षणपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. सर्व ग्रंथांची पूर्ण वाढ झाल्यावर व आपल्या देशांतील कारखाने दुसऱ्या देशांशी टक्कर देण्यास समर्थ झाले म्हणजे मग पुनः अप्रतिबंधव्यापारपद्धति सुरू केली पाहिजे. कारण, माल उत्तम होण्यास व त्याची किंमत कमी होण्यास चढाओढ अवश्यक आहे. अशी चढाओढ नसल्यास व आपलें गिऱ्हाईक कायम आहे अशी कारखानदारांस खात्री असल्यास सुधारणा करण्याची प्रवृति कमी होण्याचा फार संभव असतो. लिस्टच्या मतें सर्व युरोपांत इंग्लंड मात्र या शेवटल्या स्थितीप्रत आल्यामुळे तेथे अप्रतिबंध व्यापारतत्व फायद्याचें आहे; परंतु जर्मनीला संरक्षण अवश्यक आहे.
 लिस्ट याला सर्व जर्मनीच्या संस्थानांचे एक राष्ट्र व्हावें अशी फार इच्छा होती. व त्याच्या संरक्षक पद्धतीचा एक हेतु राष्ट्रीय ऐक्य घडवून आणणे हा होता. कारण संस्थानासंस्थानामधील जकाती काढून सर्व जर्मनीभर अप्रतिबंध व्यापार सुरू करावा व परराष्ट्रांशी मात्र संरक्षण पद्धतीचा अवलंब करावा असे त्याचे म्हणणें होते, व त्याचे लेखांनी जर्मनी च्या राष्ट्रीय घटनेस फारच मदत झालेली आहे असें जर्मन इतिहासकार म्हणतात
 ऐतिहासिक पद्धतीचा व समाजशास्राचा जनक फ्रच तत्वज्ञानी कोम्ट् हा होता. याच्या ग्रंथांनीच ऐतिहासिक पद्धतीला प्रथमतः महत्व आलें व त्याच्या प्रोत्साहनानें अर्थशास्त्रांतला ऐतिहासिक पंथ अस्तित्वांत आला.
[३०]  या पंथाचे प्रवर्तक रोशर, हैंल्डीबांड व नाइस हे होते. या पंथाचे मुख्य म्हणणे असें आहे की, अर्थशास्त्राचा तात्विकदृष्ट्या विचार कधींच करतां येत नाही. कारण समाजाचीं औद्योगिक व इतर अंगे यांचा अगदीं निकट संबंध आहे. तेव्हां प्रत्येक राष्ट्राची औद्योगिक स्थिति इतिहासदृष्टया ठरविली पाहिजे व या ऐतिहासिक निरीक्षणावरून काय ते सिद्धांत काढले पाहिजेत. तसेच अर्थशास्त्रामध्ये सर्व काळी व सर्व ठिकाणी व सर्व स्थितींत सारखे लागू पडणारे असे नियम नाहीत. सारांश, अर्थशास्त्र हैं तार्किक शास्त्र नाही व त्याची पद्वतिही तार्किक नाही, तर हैं शास्त्र अनुभ विक शास्त्र आहे व त्याची पद्धति ऐतिहासिक आहे
 ऐतिहासिक पंथाने या दृष्टीने अर्थशास्त्राचा विचार केला आहे व त्यांच्या श्रमानें अर्थशास्त्राचा सविस्तर इतिहास, तसेच प्रत्येक देशाचे औद्यो गिक इतिहास निर्माण झाले आहेत. व या नवीन माहितीवरून त्यांनींअभि- मत अर्थशास्त्रांतील बऱ्याच प्रमेयांचा व विधानांचा खोटेपणा सिद्ध केला आहे. जर्मनीमध्ये हा ऐतिहासिक पंथ व पूर्वी निर्दिष्ट केलेला सामाजिक पंथ यांचे फार प्राबल्य आहे. तर अभिमत अर्थशास्त्राचे इंग्लंडमध्ये फार प्राबल्य आहे. तरी पण तेथेही जर्मनीच्या ऐतिहासिक पंथाची छाप अलीकडील ग्रंथकारांवर पडलेली दिसते.
 द्द इंग्लंडमध्ये सुद्धां अभिमत अर्थशास्त्राच्या पुष्कळ तत्वांचे खंडन करणारे ग्रंथ प्रसिद्ध होतच आहेत. कांहींजणांनीं नीतिशास्त्रदृष्ट्या या शास्राच्या तत्वांचा विचार केला आहे; व नीतिशास्त्रदृष्टया हे शास्त्र भयाण आहे असे प्रतिपादन करणारे वाइमयविषयक ग्रंथकर्ते कार्लाईल व रस्किन यांनी या शास्त्राची सररहा निंदा केली आहे. कांहीं ग्रंथकारांनीं आभिमत अर्थशास्त्रकारांच्या कांही बाबतीतील चुका दुरुस्त करून पुष्कळ नवी प्रमेयें, सिद्धांत व नियम काढण्याचा प्रयत्न केला आहे, व या तऱ्हेने या शास्त्रांत पुष्कळ भर पडत आली आहे.अशा तऱ्हेने पूर्वीच्या शास्त्रात भर घालणारे ग्रंथकार म्हणजे जेहन्स, मार्शल, वाँकर, कॅरे वगैरे होत.
 कांहीं ग्रंथकारांनीं अभिमत अर्थशास्त्र हें सर्वथा असत्यमय व खोटं शास्त्र असून कुचकामाचे आहे असें प्रतिपादन केले आहे,आणि

नवीन अर्थशास्त्राची अगदीं पायापासून-नव्हे पूर्वीच्या पायासुद्धां पार

[३१]

 खणून टाकून-सर्व इमारत नवी रचण्याचा आव घातला आहे. असे ग्रंथकार म्हणजे प्रो० बेन व मिस्टर क्रोझिअर हे होत. बेन यांनी ‘संप त्तीच्या उत्पत्तीचें तत्व' या नांवाने एका तत्वावर नवीन शास्त्र बनवि ण्याचा प्रयत्न केला आहे; तर क्रोझिअर यांनीं ‘संपत्तिचक्र’ या नांव खालीं अर्थशास्त्राची अगदीं कोरीकरकरीत व नवी इमारत बनविण्याच प्रयत्न केला आहे.
 अर्थशास्त्राच्या वरील संक्षिप्त इतिहासावरून या शास्त्राची हळूहळू कशी वाढ होत गेली आहे हें ध्यानात येईल. ‘थेबे थेंबे तळे सांचे’ हाच न्याय शास्त्राच्या वाढीलाही लागू असतो. एका ग्रंथ कारानें एक कल्पन नवी काढली, दुसयाने एक तत्व नवीन शोधिलें, तिस- ऱ्याने याचें उदाहरण हुडकून काढले, तर चवथ्याने एखाद्या वस्तुस्थितीची उपपात्ति वसविली; याप्रमाणे हळूहळ शास्त्रात भर पडत गेली आहे. परंतु कित्येक वेळां नवीन कल्पना काढणारास मात्र आपण सर्व शास्त्रच बदलून टाकीत आहों असा भास होतो. कारण, त्याचे त्याने काढ लेल्या कल्पनेबद्दल विशेष प्रेम असते; व म्हणून ती त्याला अत्यंत मह त्वाची दिसते.ज्याप्रमाणे प्रत्येक बापाला आपला मुलगा वृहस्पतीचा अवतार वाटतो; कारण अंधभक्तीने सारासारविचार नाहींस होतो त्याप्रमाणेच कल्पनारूपी मानसपुत्राच्याही बद्दल अंधप्रेम वाटतें; व या कारणांनीच पुष्कळ वेळां नवन एखादी कल्पना काढणारा लेखक मागच्या सर्व ग्रंथकारांस कुचकामाचे ठरवून आपल्यास सर्वं ज्ञानाचा मक्ता मिळाला आहे असे मोठ्या आढ्यतेने सांगतों; परंतु ही गोष्ट अगदीं असंभवनीय आहे. कारण, एकाच ग्रंथकाराने सर्व शास्त्र अथपासून इतिपर्यंत एकदम निर्माण करावें हें उत्क्रांति-तत्वाला अगदी विरुद्ध आहे. ज्याप्रमाणे प्राणिमात्रांत लहान लहान फरक पडत जाऊन कालांतराने
त्यांच्या भिन्न दोन जाती बनत जातात, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या व शास्त्राच्याही वाढीची गोष्ट आहे व अर्थशास्त्राची वाढही अशीच हळूहळ व क्रमाने झाली आहे, हे मागलि संक्षिप्त इतिहासावरून दिसून आले असेल व पुढील विवेचनावरून ते जास्त स्पष्टपणे दिसून येईल. • भाग दुसरा. ]अर्थशास्त्राची व्याख्या व शास्त्रीय पद्धती एखादे स्थळ किवा प्रदेश पहावयास निघाले असतां ज्याप्रमाणे स्थळाचा किंवा प्रदेशाचा जवळ असला म्हणजे ते स्थळ किंवा

तो

प्रदेश पहाणे सुलभ जाऊन त्रास व वेळ वांचतो; व शिवाय आपल्याला मनोरंजन व ज्ञानप्राप्ती जास्त करून घेतां येते, त्याप्रमाणेच कोणत्याही विषयाच्या अगर शास्त्राच्या अरंभी दिलेल्या त्या विषयाच्या अगर शास्त्राच्या व्याख्येची गोष्ट आहे.त्याचेयोगाने तो विषय किंवा शास्त्र समजण्यास व त्यापासून सत्यज्ञान-ज्ञानाचा आभास नव्हे-होण्यास फार मदत होते. यामुळे सर्व ग्रंथकारांची प्रथमारंभीं हाती घेतलेल्या शास्त्राची व्याख्या देण्याची रीत आहेत्या रीतीस अनुसरून येथेही अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या देण्याचा विचार आहे.
अतज्ज्ञ अशा सामान्य माणसास अर्थशास्त्र स्हणजे काय असा प्रश्न केल्यास तो म्हणेल , व्यापारउदीम व उद्योगधंद्यांची माहिती देणारा जो विषय अर्थशास्त्र होय. या व्यावहारिक कल्पनेला पारिभाषिक शब्दांचा पोषाख चढवून कांहीं ग्रंथकारांनी हीच अर्थशास्त्राची शास्त्रीय व्याख्या म्हणून मानली ऊदारहणार्थ, मँकलाऊडने आपल्या ग्रंथांत अदलाबदल अगर विनिमय यांची मीमासा किंवा उपपत्ति करणारे शास्त्र त अर्थशास्त्र होय अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. या व्याख्येंत व सामान्य माणसाच्या कल्पनेत पारिभाषिक शब्दांखेरीज दुसरा भेद नाहीं हें वाचकांच्या तेव्हांच ध्यानांत येईल. परंतु या व्याख्येनें अर्थशास्त्राचा यथार्थ बोध होत नाही. शिवाय या व्याख्येवर अव्याप्तीचा दोष येतो. अर्थात् ही व्याख्या फार संकु चित आहे. व्याख्येत अर्थशास्त्रांत वास्तविकपणें अंतर्भूत होणाऱ्या सर्व
विषयांचा समावेश होत नाही.कारण,व्यापार विनिमय यांची

मीमांसा हा अर्थशास्त्राचा एक भाग अगर अंग आहे. परंतु अर्थशास्त्राचीं

[३३]

 दुसरी अंगे आहेत, तीं या व्याख्येने वगळली जातात; तेव्हां, ही व्याख्या सदोष म्हणूनच टाकाऊ आहे
{{gap}]अर्थशास्त्राची दुसरी एक व्याख्या केली जाते, याव्याख्येप्रमाणे अर्थशास्त्र हे एक नीतिशास्त्राचा भाग गणिलें असून तें मानवी कल्याणाच्या आधिभौतिक साधनांच्या सिद्धीबद्दलच्या व्यक्तीच्या व समाजाच्या कृत्यांचा विचार करतें असे म्हटले आहे. परंतु ही व्याख्या इतकी व्यापक आहे कीं, तिच्यावर अतिव्याप्तीचा दोष येतो. म्हणजे ही व्याख्या फारच विस्तृत आहे. कारण या व्याख्येच्या योगाने नीतिशास्त्र, आरोग्यशास्त्र वगैरे सर्व शास्त्रांचा या शास्त्रात अंतर्भाव होऊ लागेल. वरील दोन्ही व्याख्येतील दोष परस्पर विरोधी परंतु अगदीं उघड व स्पष्ट आहेत. यामुळे या दोन व्याख्या एखाद दुसऱ्याच ग्रंथकारानें ग्राह्य धरलेल्या दिसून येतात. सामान्यतः अर्थशास्त्रज्ञ किंवा इतर लोक यांना या दोन्ही व्याख्या पसंत नाहीत असे दिसते. परंतु या पुढे विचार करावयाची व्याख्या मात्र पुष्कळ ग्रंथांत दिलेली आढळून येते. ती व्याख्या ही. संपत्तीची उत्पाति, वांटणी व अदलाबदल यांचा ऊहापोह करणारे शास्त्र तें अर्थशास्त्र होय.,
 या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या तीन अंगांचा प्राधान्यकरून उल्लेख आलेला आहे. परंतु अर्थशास्त्रावरील बहुतेक ग्रंथांत सरकारच्या कराचीं तत्वें दिलेली असतात. तेव्हां हेही एक अर्थशास्त्राचे अंग आहे. व या दृष्टीने या अंगाच व्याख्येंत अंतर्भाव झाला पाहिजे असे म्हणावे लागते तसेच कांही ग्रंथकार व्यय किंवा उपभोग म्हणून अर्थशास्त्राचे आणखी एक अंग कल्पितात; तेव्हा याचाही उल्लेख व्याख्येत आला पाहिजे. याप्रमाणे अर्थशास्त्रांतील विषयाच्या वाढीबरोबर अर्थशास्त्राच्या व्याख्येत नवीन नवीन अंगाचा अन्तर्भाव करवा लागेल. परंतु वरच्या व्याख्येत स्वीकारलेली व्याख्या करण्याची पद्धति योग्य नाही. कारण कोणत्याही पधार्ताची व्याख्य
आपण त्यांत अंतर्भूत होणाया अंगावरून किंवा अवयवावरून करीत नाही. तर्कशास्त्रामध्ये ज्याला गुणागम म्हणतात त्यावरुन वस्तूच्या व्याख्या किंवा लक्षण करणें हीच खरी शास्त्रीय पद्धति आहे. वस्तूच्या संख्यागमावरून किंवा त्यांतील अवयवावरून व्याख्या करणे गैर आहे. अर्थशास्त्राच्या वर दिलेल्या व्याख्येत हा मोठा दोष आहे.अर्थशास्त्राची अमुक अमुक अंगे आहेत असे सांगणे म्हणजे त्या शास्त्राची व्याख्या करणें नव्हें; तर ते

• •

[३४]

शास्त्रविषयाचें वर्गीकरण करणें होय. खरी व्याख्या वस्तूमध्यें असलेल्या सर्वसाधारण महत्वाच्या गुणांवरून केली पाहिजे.

वर निर्दिष्ट केलेल्या व्याख्येमध्यें आणखी एक मोठा दोष आहे. तो हा कीं या व्याख्येच्या योगाने अर्थशास्त्राचीं सांगितलेलीं निरनिराळीं अंगें ही स्वतंत्र व एकमेकांपासून वेगळीं अंगें आहेत असा भास हातो. उदाहरणार्थ संपत्तीची उत्पत्ति व वांटणी या परस्परावलंबी गोष्टी नाहींत असा या व्याख्येवरुन एखाद्य चा समज होण्याचा संभव आहे. वास्तविक पहातां अर्थशास्त्राचीं सर्व अंगें परस्परावलंबी आहेत व तीं वेगवेगळीं कधींच करतां येणार नाहींत. विवेचनासाठी त्याचा निरनिराळा विचार करणें अवश्य असलें तरी संपत्तीचीं हीं अंगें अगदीं एकमेकांत निगडित झाली आहेत, हें नेहमीं ध्यानांत ठेविलें पाहिजे. अर्थशास्त्राच्या वरील व्याख्येमधले दोष अर्थशास्त्राचा जनक जो अँड म स्मिथ त्यानें आपल्या एका व्याख्येंत टाळले आहेत. त्यानं अर्थशास्त्राची व्याख्या गुणागमावरून केलेली आहे व म्हणून ती तर्कशास्त्राच्याही नियमानुरूप आहे. यामुळे पुष्कळ आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनीं सुद्धां ती मान्य केली आहे. अर्थशास्त्राच्या अॅडम स्मिथनें दिलेल्या प्रमेयापासून भिन्न अशी दुसरी कितीही प्रमेयें व तत्वें हल्ली पुढ़ें आलीं असलीं तरी अॅडम स्मिथनें केलेलें या शास्त्राचं लक्षण अजूनही कायम आहे. व जरी हें शास्त्र आणखी कितीही वाढलें तरी या व्याख्येमध्यें कांही फरक होण्याचें कारण नाहा.

"राष्ट्राच्या संपत्तीचें खरें स्वरुप व त्याच्या उत्पत्तींचीं कारणें याचें विवेचन करणारे शास्त्र ते अर्थशास्त्र होय" ही व्याख्या गुणागमानुरूप आहे हें उघड दिसून येईल. अॅडम स्मिथनें अर्थशास्त्राला व्यवस्थित स्वरूप देऊन त्याचें एक शास्त्र बनविल असें म्हणतात तें ह्या व्याख्येवरूनही सिद्ध होतें. ही व्याख्या इतर शास्त्रांच्या व्याख्येप्रमाणें सर्व शास्त्रांच्या रहस्याला अनुरूप अशीच आहे. कला व शास्त्र यांमध्यें भेद दाखवितांना शास्त्राचें रहस्य सांगण्यांत येते. कला म्हणजे कांहीं एक विषयाचें व्यावहारिक ज्ञान व त्या ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगाचे नियम होत. परंतु शास्त्र हें एखाया विषयाची उपपत्ति किंवा मीमांसा करतें. म्हणजे त्या विषयाचें खरें स्वरुप व त्याचीं कारण ही शोधून काढतें. तेव्हां यथार्थ स्वरूपज्ञान व कारणमीमांसा हे शास्त्राचे विशेष गुण आहेत. तेव्हां, अर्थशास्त्र हें जर शास्त्र 

[३५]

असेल तर त्यामध्येंही हे गुण असले पाहिजेत. व अर्थशास्त्र हें राष्ट्रीय संपत्तीचें शास्त्र आहे असें अॅडम स्मिथनें त्याचें विशिष्ट स्वरूप सांगितलें आहे. ज्याप्रमाणें वीज हें काय आहे व तिचीं कारणें काय आहेत हें शोधून काढणें विद्युत्शास्त्राचें काम आहे; उष्णतेचें खरें स्वरूप व तिचीं कारणें शोधून काढणें हें उष्णता शास्त्राचें काम आहे; किंवा जीवाचें यथार्थ स्वरूप व त्याचीं कारणें शोधून काढणें हें प्राणिशास्त्राचें काम आहे; त्याचप्रमाणें राष्ट्रीय संपत्तीचें यथार्थ स्वरूप व तिचीं कारणें शोधून काढणें हें अर्थशास्त्राचें काम आहे. या व्याख्येवरून अर्थशास्त्र हें सामाजिक शास्त्राचा एक पोटभेद आहे हें प्रथमतः दृष्टोत्पत्तीस येतें. राष्ट्राचा किंवा देशाची किंवा एखाद्या समाजाची संपत्ति-निव्वळ व्यक्तीची नव्हे-म्हणजे काय व ती देशांत किंवा राष्ट्रांत उत्पन्न कोणत्या कारणांनीं होते, याची मीमांसा करणें हें या शास्त्राचें काम आहे. अॅडाम स्मिथची ही व्याख्या व मागें दिलेली व्याख्या ह्यांमध्यें शेवटीं कांहीं फारसा फरक रहात नाहीं हें रवरें. अर्थशास्त्राची उत्पत्ति, वांटणी व अदलाबदल किवा विनिमय हीं जीं अंगें त्या सर्वांचा विचार अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकांत केला आहे. परंतु संपत्तीच्या कारणांचें विवेचन करतांना संपत्तीची वांटणी व तिचा विनिमय हीं अर्थशास्त्राचीं अंगें ओघानेंच येतात. हें अंडाम मिथ यानें दाखविलें आहे. म्हणजे विवेचनाच्या सोयीकरितां अर्थशास्त्रग्रंथाचे उत्पत्ति, वांटणी व विनिमय असे जरी तीन भाग करणें इष्ट असलें व त्याप्रमाणें सर्व ग्रंथकारांनीं केलेले आहेत; तरी पण व्याख्येमध्यें त्याचा अंतर्भाव करणें रास्त नाहीं. व्याख्येवरून शास्त्रविषय कसा एकरूप असून त्याचीं सर्व अंगें कशीं परस्पर संलग्न आहेत हें दिसून आलें पाहिजे
. वरील विवेचनावरून अॅडम स्मिथनंच दिलेली व्याख्या दोषरहित असून तिच्या योगानें अर्थशास्त्राचें स्वरूप चांगल्या तऱ्हेनें स्पष्ट होतें. म्हणून हीच व्याख्या सर्वमान्य होण्यास व या शास्त्राची कायमची व्याख्या होण्यास योग्य आहे असें वाचकांस दिसून आल्याखरीज राहणार नाहीं.

आतां अर्थशास्त्रासंबंधीं आणखी एक वादग्रस्त प्रश्न राहिला. तो समजण्याकरितां आपल्याला थोडेसें तर्कशास्त्रामध्यें शिरलें पाहिजे. तर्कशास्त्रज्ञांनीं अनुमानें दोन प्रकारचीं आहेत असें सांगितलें आहे, एक अनुभवसिद्ध अनुमान व दुसरें तर्कसिद्ध अनुमान. पहिल्यामध्यें आपण

[३६]


   ग करितों किंवा जे अनुभव घेतों त्यांवरून एक तत्व किंवा प्रमेय किंवा सत्य सिद्ध करावयाचें असतें. ज्याप्रमाणें प्राणवायु व हैद्रोजनवायु हे दोहोंस एक या प्रमाणांत मिसळण्याचा प्रयोग करून व त्यापासून पाणी उत्पन्न होतें हें पाहून पाणी हा संयुक्त पदार्थ आहे हें प्रमेय आपण काढतों. याला अनुभवसिद्ध अनुमान म्हणतात; व ज्यामध्यें एक स्वयंसिद्ध तत्व किंवा अनुभवसिद्ध तत्त्व यापासून दुसरें एक सत्य तर्कपद्धतीनें काढलें जातें त्याला तर्कसिद्ध अनुमान म्हणतात. या भेदावरूनच शास्त्रामध्येंही दीन मुख्य भेद मानतात. एक अनुभवप्रधान किंवा अनुभविक शास्त्रें व दुसरी तर्कप्रधान अगर तार्किकशास्त्रें. ज्या शास्त्रांतील नवीं नवीं सत्यें किंवा विधानें निरनिराळ्या प्रयोगानें किंवा अनुभवानें सिद्ध करावीं लागतात, त्याला अनुभविक शास्त्रें म्हणतात. म्हणजे येथें प्रत्येक नवीन ज्ञान अनुभव किंवा प्रयोग यावरूनच काढावें लागतें. पूर्वीच अवगत असलेल्या तत्वापासून नुसत्या विचारशक्तीनें दुस-या विधानाची सिद्धता करतां येत नाहीं. परंतु कांहीं शास्त्रांमध्यें तर्कानुमान हेंच प्रधान असतें. म्हणजे या शास्त्रांना प्रयोगाची व अनुभवाची गरज लागत नाहीं. यामध्यें नवीन विधानें किंवा सत्यें पूर्वी अवगत असलेल्या तत्वांपासून निवळ तर्कपद्धतीने काढता येतात .या कोटीमधील प्रमुख शास्त्रें म्हणजे गणितशास्त्राच्या सर्व शाखा होत. यांतील सत्यें तर्कसिद्ध असतात. त्या शास्त्रांना प्रयोग किंवा अनुभव लागत नाहीं. भूमितीचे सर्व सिद्धांत किंवा सत्यें त्या शास्त्रांतील व्याख्या, स्वयंसिद्धतत्वें व गृहीत पदें या तीन जातीच्या मूळ तत्वांपासून तर्कानें काढतां येतात. असा प्रकार प्राणिशास्त्रांत किंवा रसायनशास्त्रांत शक्य नाहीं.
आतां अर्थशास्त्राबद्दल वादग्रस्त प्रश्न असा आहे कीं, या शास्त्राची नवीन सिद्धांत काढण्याची पद्धति कोणती? अर्थात् हें शास्त्र अनुभवप्रधान आहे कीं तर्कप्रधान आहे. उपोद्धातावरून हा वाद आतां शुष्कवाद आहे असें दिसून येईल. कारण प्रत्येक शाखामध्यें निरनिराळ्या ठिकाणीं निरानराळ्या पद्धतीचा अवलंब केली जातो. उपोद्धातामध्यें जो अभिमत पंथ सांगितला आहे त्या पंथानेंच अर्थशास्त्र हें एक तर्कसिद्ध शास्त्र आहे असें एककल्ली मत दिलें. याचा स्वाभाविक परिणाम असा झीलों कीं, ऐतिहासिक पंथ निघून त्यानें अर्थशास्त्र हें अगदीं अनुभव.

[३७]

} सिद्ध शास्त्र आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्र हें समाज शास्त्राचा पोटभेद आहे व समाजशास्त्र हें अनुभवसिद्धशास्त्र आहे. त्याअर्थी अर्थशास्त्रही अनुभवसिद्धशास्त्र आहे हें उघड होतें. परंतु या शास्त्रामध्यें तर्कानें कोणती गोष्ट सिद्ध होत नाहीं किंवा करीत नाहीं असें मात्र नाहीं. या शास्त्राच्या कांहीं कांहीं भागांत तर्कपद्धतीचा अवलंब करणें सोयीचें असतें; तर कांहीं भागांत अनुभव किंवा प्रयोगपद्धतीचा अवलंब करणें इष्ट असतें. अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ यानें आपल्या प्रख्यात ग्रंथांत दोन्हीही पद्धतींचा लागेल तसतसा उपयोग केला आहे; व हेंच करणें सयुक्तिक आहे. अॅडम स्मिथ याच्या पुढील जे ग्रंथकार झाले त्यांनीं मात्र अनुभवपद्धति पुष्कळ ठिकाणीं टाकून दिली व रिकार्डो यानें तर या शास्त्राला गणितशास्त्रासारखे तार्किक स्वरूप दिलें. रिकार्डोच्या या करण्यानें तर या शास्त्राबद्दल बराच गैरसमज उत्पन्न झाला. तेव्हां या वादांतलें तथ्य म्हणजे अर्थशास्त्र हें प्राधान्येंकरून अनुभवसिद्ध शास्त्र आहे, परंतु त्याच्या पुष्कळ भागांत तर्कपद्धतीचाही उपयोग होतो. म्हणून या शास्त्राच्या दोन्हीही पद्धति आहेत असें म्हटलें पाहिजे.

भाग तिसरा.

संपत्ति म्हणजे काय?

 अर्थ, धन, संपत्ति हे किंवा असेच दुसरे पुष्कळ शब्द सामान्य व्यवहारांत लोक समानार्थक म्हणून वापरतात. व यांचा अर्थ काय असें विचारलें असतां घरेंदारें, जमीनजुमला, पैसाअडका, कपडालत्ता, धान्यधुन्य, मालमसाला, जिन्नसपान्नस, ही सर्व संपति आहे, व हाच संपत्तीचा अर्थ असें व्यावहारिक माणुस उत्तर देईल, परंतु साक्रेतिसानें एके ठिकाणीं म्हटल्यांप्रमाणें हीं सर्व संपत्तीचीं उदाहरणें झालीं. व संपत्ति हजारों वस्तूची झालेली असल्यामुळे आणखीही हजारों वस्तूंचीं नांवें सांगून हा संपत्तीचा अर्थ असें कोणी म्हणल; परंतु आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या संपत्तीचा अर्थ ठरवावयाचा आहे. म्हणजे संपत्तीची व्याख्या करावयाची आहे, व शास्त्रीय व्याख्या ही गुणवाचक असली पाहिजे हें मागल्या भागांत स्पष्ट करून सांगितलें आहे. ज्या हजारों वस्तू संपत्ति या नांवाखालीं मोडतात, त्या निरनिराळ्या वस्तूंमध्यें असे कोणते सामान्य गुण आहेत कीं ज्यामुळे त्या सर्वांना संपत्ति हें सामान्य नांव मिळतें?
 ज्या ज्या वस्तूला संपत्ति म्हणतात, ती ती वस्तु मनुष्यापासून भिन्न व अलग राहणारी असली पाहिजे. मानवी प्राण्यापासून स्वतंत्र राहण्याची शक्ति हा एक गुण सर्व संपत्तीमध्यें असला पाहिजे. यावरून मनुष्य किंवा त्याचे गुण ही संपत्ति होऊं शकत नाहीं. ज्या ठिकाणीं गुलामगिरी कायदेशीर पद्धति आहे, तेथें एक मनुष्य दुस-या मनुष्याचां संपत्ति होऊं शकेल. परंतु आपली स्वतःची संपत्ति होऊ शकणार नाहीं. तसेच त्याचे गुणही संपत्तींत मोडणार नाहीत. मनुष्याचे गुण हे संपत्तीच्या उत्पत्तीचीं कारणें असूं शकतील. जसें एखादा मनुष्य आपल्या बौद्धिक गुणानें पुष्कळ संपत्ति मिळवील किंवा एखादा आपल्या गाण्याच्या गुणावर श्रीमंत होईल. परंतु हा त्याचा गुण म्हणजे संपत्ति नव्हे. तो संपत्ति उत्पन्न करणारा झरा होय. वाङ्मयांत विद्याधन, सामर्थ्यधन, आरोग्यधन, असे शब्दप्रयोग येतात. परंतु हे प्रयोग अलंकारिक आहेत हें उघड आहे. येथें निरानराळ्या गुणांवर रुपक केलेलें आहे.
 संपत्ति या नांवावालीं मोडणा-या वस्तूंमधला दुसरा सामान्य गुण म्हणजे त्यांची मानवा वासनांची तृप्ति करण्याची शक्ति होय. याला वस्तूची उपयुक्तता म्हणतात. अर्थ या शब्दानें व्युत्पत्तिदृष्ट्या हा गूणच व्यक्त केला जातो. जें मनुष्याकडून प्रार्थिलं अगर इच्छिलें जातें तो अर्थ. म्हणजे धन, संपत्ति किंवा अर्थ यांमध्यें मनुष्याचा इच्छा वासना किंवा त्याचें काम भागविणारी शक्ति असलीच पाहिजे हें उघड-होतें. ज्या वस्तूंमध्यें मनुष्याची कोणतीच वासना भागावण्याच सामथ्य नाहीं ती वस्तू संपत्ति किंवा धन या पदाप्रत पावणारच नाही. मनुष्याच्या वासना नीतिवर्धक आहेत किंवा अनीतिप्रवर्तक आहेत; त्या स्वाभाविक आहेत किंवा कृत्रिम आहेत, या गोष्टीचा विचार अर्थशास्त्रामध्यें येत नाहीं. यामुळें ज्या ज्या वस्तूंना लोकांत मागणी आह किंवा त्यांचा खप लोकांत होतो, त्या त्या सर्व वस्तू संपत्ति या पद प्रत पावतात. म्हणूनच दारू, तंबाखू वगैरेसारख्या वस्तूंचें सेवन अनीतिकारक असलें तरी अर्थशास्त्रदृष्ट्या त्या संपत्तींतच मोडतात.
 संपत्तीच्या ठायीं वास करणारा तिसरा सामान्यगुण गुण म्हणजे तिची दुर्मिळता किंवा कष्टसाध्यता होय. जे पदार्थ इतके विपुल आहेत कीं, ते मिळविण्याकरितां कांहीं एक काम करावें लागत नाहा व ते कितीजणांनाही लागले तरी मुबलक असतात, अशा पदार्थाची कोणीही संपत्तीमध्यें गणना करणार नाहीं. या वस्तूच्या ठिकाणीं मनुष्याची वासना तृप्त करण्याची उपयुक्तता असेल, व मनुष्यापासून विलगपणाही असेल, परंतु तेवढ्यानेंच त्या वस्तू संपत्ति होणार नाहींत. संपत्तीमध्यें दुर्मिळता किंवा कष्टसाध्यता हा गुण असला पाहिजे. म्हणजे हवा, पाणी, नवीन वसाहतीमध्यें जमीन व लांकूडफांटें या वस्तू संपत्ति म्हणून समजल्या जात नाहींत. तर त्या सृष्टीनें मानवी प्राण्यास फुकट दिलेल्या देणग्याच समजल्या जातात. यांना कोणीही आपली संपत्ति अगर धन म्हणणार नाहीत; परंतु विशेष प्रसंगीं या वस्तूही संपत्ति होतात, म्हणजे जेथें जेथें ह्या दुर्मिळ तेथें तेथें त्यांना धनाचें स्वरूप येतें. मारवाडच्या रुक्ष प्रदशांत लोटाभर
 पाण्याला एक पैसा द्यावा लागतो. तेथें ज्याच्याजवळ मुबलक पाणी आहे तो मोठा श्रीमंत होतो. ज्याची स्वतःची विहीर आहे असा मनुष्य तेथें रहाटगाडग्यानें किंवा मोटेनें पाणी काढून विकतो व हा एक मोठा किफायतशीर धंदा होतो. तसेंच शहरांत पाण्याची दुर्मिळता असते म्हणून तेथें सुद्धां पाणी धन बनतें व त्याला किंमत द्यावी लागते.
 संपत्तीमधला शेवटचा व अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे संपत्ति असणारी वस्तू, कोणाच्या तरी खासगी मालकीची पाहिजे. ज्या वस्तू सर्वांना सामान्य आहेत व ज्यांवर एखाद्याचा अनन्यसामान्य ताबा नाहीं अशा वस्तू संपतिपदाप्रत पावणार नाहींत. उदाहरणार्थ, हवा, पाणी, जमीन, जंगल वगैरे. ज्या वस्तू आपल्याला स्वतःच्या ताब्यांत घेऊन मालकीच्या करितां येत नाहींत अशा वस्तूंना आपण आपली संपत्ति असें कधींच समजत नाहीं. तेव्हां मालकी व तिचा खरा निदर्शक गुण अनन्यसामान्य ताबा व उपयोग करण्याचा हक्क हे गुण संपत्तीमध्यें आवश्यक असले पाहिजेत. हा ताबा किंवा मालकी व्यक्तीचीच पाहिजे असा मात्र अर्थ नाही. ही मालकी एका व्यक्तीची असेल व व्यक्तिसमूहानें झालेल्या मंडळींची किंवा सभेची असेल किंवा देशांतल्या सरकारची असेल, परंतु कोणाच्या तरी ताब्यांत असण्याचा म्हणजे अधीनतेचा गुण सर्व संपत्तीमध्यें अवश्यमेव असलाच पाहिजे.
 वरील विवेचनावरून संपत्ति, धन किंवा अर्थ म्हणून जेवढी जेवढी वस्तू आहे ती पृथकता, उपयुक्तता, दुर्मिळता व अधीनता या गुणचतुष्टयानें अन्वित असलीच पाहिजे. या गुणचतुष्टयापासूनच दुसरें गुण निष्पन्न होतात. जसे संपत्ति ही मोलवान् वस्तू असते किंवा ती विकतां अगर खरेदी देतां येते म्हणजे तिला विनिमयमोल असतें. संपत्तीचा हा गुण प्राथमिक नाहीं. एखादा पदार्थ मनुष्याची वासना तृप्त करणारा असला, तो दुर्मिळ असला, तो मनुष्यापासून पृथक असला व तो कोणाच्या तरी मालकींचा असला म्हणजे ती मिळविण्याकरितां मनुष्य कांहीं स्वत: श्रम तरी करील किंवा तो पदार्थ दुस-यानें श्रमानें मिळविला असल्यास त्याच्या मोबदला कांहीं तरी देण्यास म्हणजे त्या पदार्थास विनिमयमोल देऊन घेण्यास तयार होईल.
 या विवेचनावरून संपत्ति किंवा धन याची खाली दिलेली व्याख्या
ठरते. मनुष्यापासून जो पृथक असतो, जो थोडया फार अंशानें दुर्मिळ असतो व जो एखाद्याच्या खासगी मालकीचा झालेला असतो असा मानवी वासना तृप्त करणारा पदार्थ म्हणजे संपत्ति होय.
 आतां जरी संपत्तीची वरील गुणवाचक कल्पना एकच असली तरी समाजाच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणें संपत्ति या सदरांत मोडणा-या वस्तू मात्र फार भिन्न भिन्न असतात. समाजाच्या बाल्यावस्थेंत मनुष्याच्या गरजा किंवा वासना फारच अल्प असतात व त्याच्या आयुष्यक्रमांत व उत्क्रांतितत्त्वाप्रमाणें त्याच्या खालच्या वर्गाचे जे पशु त्यांच्या आयुष्यक्रमांत फारसें अंतर नसतें. या समाजाच्या स्थितीला समाजशास्त्रकार मृगयावृत्ति म्हणतात. या स्थितीमध्यें मनुष्य शिकार करून आपली भूक भागवितो व झाडाच्या ढोलींत राहतो. या स्थितींत संपत्तीची वाढ शक्यच नसते. याच्या पुढची पायरी म्हणजे गोपालवृत्ति होय. यामध्यें लोकांची स्थाथिक अशी कोठेंच वसति नसते. त्यांचीं गुरेंढोरं व शेळ्यामेंढ्या यांच्यावर उपजीविका चालते व जेथें जेथें नवीं नवीं कुरणें सांपडतात तेथें तेथें लोक आपली राहण्याची जागा बद्लीत असतात. या स्थितीमध्यें गुरेंढोरें व शेळ्यामेंढ्या व त्यांचें दूधदुभतें व लोंकरकातडीं हेच संपत्तीचे जिन्नस असतात. ज्याच्याजवळ हीं पुष्कळ असतात ती श्रीमंत अगर सधन समजला जातो. या वृत्तीचा निदर्शक संस्कृतांतील दुहितृ हा शब्द आहे. दूध काढणें हें त्या काळीं मुलीचें काम असावें व म्हणूनच दुहिता-दुध काढणारी-या शब्दाचा पुढें मुलगी असा अर्थ झाला असावा. याच्यापुढील समाजाची पायरी म्हणजे कृषिवृत्ति होय. यामध्यें समाजांतील लोक एका प्रदेशांत स्थायिक होतात व तेथें शेतकीवर उपजीविका करून राहतात. या समाजाच्या पायरीमध्यें समाजाच्या पुष्कळ गरजा वाढलेल्या असतात; व त्या त्या गरजा भागविण्याकरितां पुष्कळ पदार्थ तयार केले जातात. तरी पण या पायरीवर समाज असतांना समाजांत वासनांची वाढ फार झालेली नसते; परंतु याची पुढील पायरी जी उद्योगवृत्ति तो समाजाच्या औद्योगिक पूर्ण वाढीचा काळ होय. यामध्यें समाजाच्या वासनांची पुष्कळ वाढ झालेली असते व ती ती वासना तृप्त करणयाकरितां हजारों धंदे निर्माण झालेले असतात; व यामुळे नानातन्हेची संपत्ति देशांत निर्माण होऊं लागते.
 याप्रमाणें मृगयावृत्ति, गोपालवृत्ति, कृषिवृत्ति व उद्योगवृत्ति अशा समाजाच्या चार अवस्था समाजशास्त्रज्ञ मानतात. समाजाची औद्योगिक प्रगति या क्रमानें झालेली दिसून येते व सुधारलेलीं युरोपांतील राष्टें हीं हल्ली शेवटच्या अवस्थेप्रत येऊन पोंचलेलीं असून त्यांची औद्योगिक बाबतीत सारखी प्रगति चाललेली आहे. युरोपांतील राष्ट्रें उद्योगवृत्तीच्या पूर्वीच्या सर्व वृत्तींमधून बाहेर आलेलीं आहेत.
 हिदुस्थानच्या पुराणप्रियतेमुळे म्हणा किंवा हिंदुस्थानांतील हिंदूंच्या जातिभेदानें म्हणा किंवा हिंदुस्थानच्या विस्तारामुळे म्हणा, परंतु हिंदुस्थान देशाचा हा एक विशेष आहे कीं, वर निर्दिष्ट केलेल्या व युरोपांत एकामागून एक झालेल्या समाजाच्या निरनिराळ्या अवस्था या येथें एकसमयावच्छेर्देकरून प्रत्यक्षपणें पहावयास सांपडतात. हिंदुस्थानामध्यें अनादि कालापासून मृगयावृत्तीनें राहणा-या जाती आहेत. अर्थात या जाती समाजाच्या पहिल्या अवस्थेपुढें आजतागाईत गेलेल्या नाहींत. अशा जाती म्हणजे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या डोंगराळ प्रदेशांत राहणा-या कातवडी, भिल्ल वगैरेसारख्या आर्यलोक येथें येण्यापूर्वीच्या मूळ रहिवाशांच्या जाती होत. या जातींचें अजूनही मुख्य उपजीविकेचें साधन म्हणजे शिकार व रानांत अनायासें सापडणारीं फळेंमुळें होत. यांचीं शिकारीचीं हत्यारें म्हणजे तीरकामठा व गोफण हीं होत. या जाती काटक्याकुटक्यांच्या केलेल्या झोंपड्यांत राहतात. या लोकांना इंग्रज सरकारनें फुकट जमिनी देऊन शेतकी शिकविण्याचा प्रयत्न चालविला आहे व खानदेशासारख्या कांहीं ठिकाणीं तो थोडाफार यशस्वी होत चालला आहे; परंतु या जातीच्या स्वाभाविक आलस्यामुळे त्यांना औद्योगिक प्रगतीच्या वरच्या अवस्थेप्रत आणणें हें काम बरेंच कठीण असतें. वंशपरंपरेनें गोपालवृत्तीत राहणाच्या जातीही हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. युरोपामध्यें जीप्सी म्हणून जे गोपालवृत्तीनें राहणारे लोक होते हेही आशियांतीलच किंवा कदाचित हिंदुस्थानांतून गेलेले असतील. हिंदुस्थानांत वडारी, वैदू, धनगर वगैरे जाति अजून गोपालवृत्ति आहेत. या जातींना कायमचीं घरें करून राहणें आवडत नाहीं; गुरेंढोरें बाळगावीं, शेळ्यामेंढ्या पाळाव्या व आपआपल्या गुरांच्या सोईप्रमाणें व काम मिळेल त्याप्रमाणें प्रांतोप्रांती हिंडत राहावें हाच यांचा सतत क्रम. हिंदुस्थानांतील बहुजनसमाज अजून कृषिवृत्तीतच आहे. हिंदुस्थानांत शेंकडा ७५ लोक शेतकरी आहेत. या बाबतींत हिंदुस्थानाला ब्रिटिश अंमलाखालीं थोडेथोडें ओद्योगिक स्वरूप येत चाललें आहे खरें; तरी पण प्रमुखत्वेंकरून हिंदुस्थान अजूनही कृषिवृत्ति देश म्हणण्यास हरकत नाहीं. ब्रिटिश अंमलापासून व इंग्रजी शिक्षणानें लोकांच्या गरजा वाढत आहेत, अभिरुचि बदलत चालली आहे, संपत्तीचा उपभोग घेण्याची प्रवृत्ति होत आहे, तसेंच उद्योगधंद्यांचीं साधनें वाढत आहेत, यामुळे हिंदुस्थानांतील कांहीं शहरें उद्योगधंद्यांचीं आगरें बनू लागलीं आहेत. अशा शहरांमधील एखाद्या लक्ष्मीपुत्राच्या राजवाड्यासारख्या सुंदर बंगल्यांत व कातवाडयाच्या झोपडींत जमीनअस्मानचें अंतर दिसून येतें व यावरून मृगयावृत्ति व उद्योगवृत्ति या दोन अवस्थांमधल्या राहणींतील फरक दिसून येतो.

          --------------------
            भाग चवथा
           مختھے چھینچ
          अर्थशास्त्राचे विभाग.
          --------------------

 आमच्या प्रास्ताविक पुस्तकाचा हा शेवटला भाग होय. यामध्यें या शास्त्राचे सामान्यतः कोणकोणते भाग पाडले जातात व आम्ही कोणते पाडले आहेत, व कोणत्या क्रमानें आम्ही सर्व विषयांचें विवेचन करणार आहों; याचें थोडेंसें शब्दचित्र रेखाटून हें प्रास्ताविक पुस्तक संपविण्याचा विचार आहे.
 पहिल्या प्रास्ताविक पुस्तकाचा हेतु व विषय हा आतांपर्यंतच्या विवेचनावरून वाचकांच्या ध्यानांत आला असेलच. ज्या शास्त्राचें विवेचन या ग्रंथांत करावयाचें योजिलें आहे,त्याची पूर्वपीठिका, त्याची व्याख्या व त्या शास्त्राचा विषय जी संपत्ति तिचें शास्त्रीय लक्षण व आतां त्या शास्त्रांतील विवेचनाच्या सोईकरतां केलेल्या पुस्तकांचें स्पष्टीकरण इतका भाग या प्रास्ताविक पुस्तकांत आणला आहे.
  या ग्रंथाच्या दुस-या पुस्तकांत संपत्तीच्या उत्तपत्तीच्या कारणांचा विचार करावयाचा आहे. तेव्हां उत्पति हा एक अर्थशास्त्राचा भाग झाला. तिस-या पुस्तकांत संपत्तीची वांटणी व तिचे सर्व नियम यांचा व तत्संबंधीं सर्व प्रश्नांचा ऊहापोह केला जाईल. जरी विवेचनाच्या सोयीकरतां उत्पत्ति, वांटणी व विनिमय असे अर्थशास्त्राचे तीन पृथक भाग करण्याचा अर्थशास्त्रकारांचा सांप्रदाय आहे, तरी पण हे भाग वस्तुतः पृथकू नसून ते एकमेकांशीं संलग्न झालेले आहेत. इतकेंच नव्हे तर ते परस्परावलंबी आहेत याचें मागें दिग्दर्शन केलेंच आहे. संपत्नीची उत्पत्नी कशी होते याचा विचार करतांना आपल्याला असें दाखवावयाचें आहे की, राष्ट्रीय संपत्नीच्या उत्पादनांत समाजांतील निरनिराळ्या वर्गाचें प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साहाय्य लागतें व अप्रत्यक्षपणें किंवा प्रत्यक्षपणें त्यांचे श्रम कारणीभूत होतात. आतां या सर्व वर्गाच्या एकवटलेल्या श्रमानें उत्पन्न झालेल्या संपत्नीमधून प्रत्येकाच्या श्रमाच्या मोबदल्याबद्दल त्याला वांटा मिळाला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय संपनीच्या उत्पादनाच्या प्रश्नापासून साहजिकपणें संपत्नीच्या वांटणीचा प्रश्नही निष्पन्न होतो. तसेंच कांहीं एक प्रकारची वांटणी होत असली ह्मणजे त्या पद्धतीचा परिणाम उत्पत्तीवर होतो. उदाहरणार्थ, आयर्लंडमधल्या शेतकीच्या उत्पन्नाच्या असमतेच्या वांटणीमुळं आयरिश शेतक-यांना शेतांमध्यें जास्त उत्पन्न करण्याची बुद्धि होणें अशक्य होतें; यामुळे आयरिश शेतीपासून फार कमी उत्पन्न येत असे. तेव्हां वाटणी व उत्पति है भाग परस्परावलंबी आहेत हें उघड़ झालें. तसेच उत्पत्ती व विनिमय यांचा निकट संबंध आहे. संपत्तीची वाढ होण्याचें माेठें साधन ह्मणजे श्रमविभागाचें तत्व होय. परंतु श्रमविभागाचें तत्व जितक्या प्रमाणानें समाजांत अस्तित्वांत येईल तितक्या प्रमाणानें विनिमयही वाटलाच पाहेिजें. कारण जसजसा एक मनुष्य आपलें श्रमसर्वस्व एकाच धंद्यात किंवा एका धंद्याच्या एका विशिष्ट क्रियेंत घालवितो तसतसें त्याच्या सर्व गरजा भागविण्याकरतां त्याला दुस-याच्या श्रमाकडे पाहावें लागतें. म्हणजे असा मनुष्य आपल्या श्रमाचें फळ दुस-याच्या श्रमाच्या फळाशीं विनिमय करून त्याचा उपभोग घेतो.
  या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत सरकारी उत्पन्नांची मीमांसाव व विशेषतः कराच्या तत्वाचा विचार व तात्संबंधी प्रश्न यांचा विचार करावयाचा आहे. सकृद्दर्शनीं या भागाशीं अर्थशास्त्राचा फारसा संबंध नाहीं असें वाटण्याचा संभव आहे. विशेषतः अलीकडे राष्ट्रीय जमाखर्च या नांवाचें नवीनच शास्त्र बनूं लागल्यापासून तर अर्थशास्त्रांत हा भाग आगंतुक आलेला आहे असें भासेल. परंतु अर्थशास्त्राच्या शास्त्रीय व्याख्येकडे थोडें लक्ष दिल्यास या शंकेचें निरसन होईल. राष्ट्रीय संपत्तीच्या स्वरूपाचा व तिच्या कारणांचा विचार करणारें शास्त्र तें अर्थशास्त्र, अशी आपण अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. परंतु राष्ट्राला दोन अंगें आहेत. एक राष्ट्रांतले सर्व लोक व दुसरें त्यांतलें सरकार, हीं दोन्हीं अंगें अगदीं परस्परसंलग्न आहेत. राष्ट्रांतील लोकांखेरीज सरकारचें अस्तित्व संभवत नाहीं; व कोणत्या तरी सरकाराखेरीज राष्ट्रत्वही संभवत नाहीं. तेव्हां राष्ट्रीय संपत्तीचेही दोन भाग होतात. एक राष्ट्रांतील सर्व लोकांची संपत्ती व एक राष्ट्रांतील सरकारची संपत्नी. केव्हां केव्हां सरकारची कांहीं संपत्ती किंवा उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या संपत्तीपासून किंवा उत्पन्नापासून भिन्न असेल. उदाहरणार्थ, सरकारची जमीन असेल किंवा कारखाने असतील किंवा खाणी असतील, व केव्हां केव्हां सरकारचें उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या उत्पन्नाचा एक वांटा असेल. कोणीकडूनही सरकारच्या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय संपत्नीची मीमांसा करणा-या शास्त्राच्या मार्यादेबाहेरचा नाहीं, हें उघड दिसून येईल. तेव्हां सर्व अर्थशास्त्रकारांचीं कराचीं तत्त्वें यांचें विवेचन करण्याची जी रूढी आहे तिचें युक्तीनें समर्थन करतां येण्यासारखें आहे. म्हणून आम्हीं आमच्या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत सरकारचें उत्पन्न व कराचीं तत्वें यांचा उहापोह करणार आहों.
 या ग्रंथाच्या सहाव्या पुस्तकांत हिंदुस्थानचें अर्थशास्त्र याचा विचार करावयाचा आहे. अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्त्वें सध्या हिंदुस्थानाला लागू करतां येण्यासारखीं आहेत हें ठरवावयाचें आहे. परंतु हें ठविण्याकरतां हिंदुस्थानच्या पूर्वीच्या औद्योगिक स्थितीचें थोडेंसें पर्यालाेचन केलें पाहिजे, व सध्याची हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिती कशी आहे व ती सुधारण्याकरितां अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्वें हिंदुस्थानच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितींत हिंदुस्थानाला लागू करणें हिंताचें आहे, याचा ऊहापोह या शेवटल्या पुस्तकांत करावयाचा आहे. हें पुस्तक केवळ शास्त्रीय नाहीं हें उघड आहे. परंतु यामध्यें शास्त्र व व्यवहार यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला आहे; व शास्त्रीय तत्वें फलटूप होण्यास असा मिलाफ अवश्यक असतो. वर दिलेली ही या ग्रंथाची निव्वळ बाह्य आकृती झाली. आतां ही आकृती पूर्णपणें भरून समग्र विषयाचें हुबेहूब चित्र वाचकांच्यापुढें मांडण्याचे काम पुढील पुस्तकाचें आहे.

अर्थशाश्वाचीं मूलतत्वें.

पुस्तक दुसरें.

ܕܒܨ

भाग पहिला

.

सामान्य विचार.

 प्रास्ताविक पुस्तकाच्या शेवटल्या भागांत सांगितल्याप्रमाणें या पुस्तकांत राष्ट्रीय संपत्तीच्या उत्पत्तीच्या सर्व प्रश्नांचा विचार करावयाचा आहे. यांतला प्रमुख व अत्यंत वादग्रस्त प्रक्ष संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा होय. कां कीं, समाजांत उत्पन्न होणारी संपत्ती ही किती तरी बहुविध असते. तेव्हां या अशा बहुविध पदार्थांना कांहीं एक सामान्य कारण-समुच्चय असेल हैं मकद्दर्शनीं खरेंच वाटत नाहीं. ज्याप्रमाणें संपत्ती या नांवाखालीं मोडणा-या हजारों वस्तूंमधील सामान्य गुण शोधून काढणें हें बरेंच कठीण काम आहे; त्याप्रमाणें संपत्तीचीं करणें शोधून काढणें हें तितकेंच किंबहुना जास्त कठीण काम आहे; व ज्याप्रमाणें संपत्तीचा अर्थ काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य जमीनजुमला, कपडालत्ता, पैसाअडका, ही संपत्ती असें चटकन् उत्तर देतो, त्याप्रमाणें संपत्तीचीं कारणें काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य असें उत्तर देईल कीं, देशांतील निरानराळे धंदे व कला हीं संपत्तीची कारणं आहेत. तेव्हां या सर्व कला व हे सर्व धंदे अर्थशास्त्रांतील संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांमध्यें येतात किंवा काय ? नाही. या कला व हैं धंदे विशिष्ट स्वरूपाच्या संपत्तीचीं कारणें आहेत. कापड कसें उत्पन्न करावें हें विणकला सांगेल. परंतु अशा विशिष्ट कलांची माहिती देणें हें अर्थाश्स्त्राचें काम नाहीं, व असल्या प्रकारच्या विशिष्ट कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा नाहीं, व असा विचार करणें शास्त्राला शक्यही नाहीं. अर्थशास्त्र संपत्तीच्या विशिष्ट स्वरुपाकडे लक्ष देतच नाहीं. कापड कसें होतें, धान्य कसें पिकतें, कांचेचें सामान कसें करतात किंवा पितळेचीं भांडीं कशीं तयार होतात, इत्यादि प्रश्नांचें उत्तर अर्थशास्त्र देऊं शकणार नाहीं. विशिष्ट संपत्ती कोणत्याही स्वरूपाची असो परंतु तिच्यांत कांहीं एक सामान्य गुण असतात. अशी सामान्य स्वरूपाची संपत्ती देशांतील कोणत्या परिस्थितींत समाजाच्या कोणत्या स्थानांनी व समाजाच्या कोणत्या स्वरूपामध्यें व कोणत्या सामाजिक उपायांनीं उत्पन्न होऊं शकते हें आपल्याला येथें पाहावयाचें आहे. अर्थांत् संपत्तीच्या सामाजिक व सामान्य कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा आहे. हीं सामाजिक व सामान्य कारणें किती व कोणतीं असतात, त्यांचें यथार्थ स्वरूप काय,त्या कारणांच्या कोणत्या विशिष्ट गुणांवर व परिस्थितीवर संपत्तीची वाढ अवलंबून आहे; तसेंच संपत्ती वाढविणाच्या या कारणांची स्वतःची वाढ कोणत्या नियमांनुसार होते, इत्यादि पुष्कळ प्रश्नांचा येथें सविस्तर ऊहापोह करावयाचा आहे.
 वर सांगितलेंच आहे कीं, संपत्तीची कारणमीमांसा बरीच बिकट आहे. कारण ज्या मानानें एखादें कार्य हें संकीर्ण व बहुविध स्वरूपाचें असेल त्या मानानेंच त्यांचीं कारणें संकीर्ण व बहुविध असतात. जसजसें संपत्तीच्या संकीर्ण स्वरूपाचें यथार्थ ज्ञान लोकांस होऊँ लागतें तसतशीं त्याचीं बहुविध कारणेंही लोकांच्या नजरेस येऊँ लागतात, आभिमत पथांत प्रतिपादन केलेल्या कारणसमुच्चयाचा शोध अशाच त-हेनें लागला. उदीम पंथांचें लक्ष एका कारणाकडे गेलें वj संपत्तीच्या कारणांचें सारसर्वस्व त्यांत आहे असें त्यांनीं प्रतिपादन केलें. पैसा हें संपत्तीचे स्वरूप व व्यापार हें संपत्तीच्या उत्पत्तींचें साधन हें त्यांच्या मतांचें सार. म्हणजे उदीमपंथानें पैसा अगर भांडवल याचें संपत्तीच्या वाढीचे कामीं फार महत्व आहे असें शोधून काढले. परंतु हें मत एककल्ली असल्यामुळें जरी त्यांत सत्याचा अंश होता तरी त्या मताच्या अतिशयोक्तीनें तें मत खेटें असें वाटूं लागलें, व यामुळें उदीमपंथाच्या प्रतिस्पर्धी पंथानें शतकी अगर जमीन हें संपत्तीच्या कार णांचें सारसर्वस्व असें आपलें मत प्रस्थापित केलें. शेतकी हेंच संपत्तीच्या वाढीचें एकमेवाद्वितीय कारण आहे. व्यापार, भांडवल व कारखाने हे उपयोगी असले तरी अनुत्पादक आहेत. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीची ही उपपत्ति उदीमपंथाच्या उपपत्तीप्रमाणें एकदेशीयच होती. उदीमपंथ व निसर्गपंथ यांच्या उपपत्तीमध्यें सत्याचा अंश नव्हता असें नाहीं. परंतु प्रत्येक पंथानें आपली उपपत्तिच सर्वास्वी खरी व दुस-याची उपपत्ति सर्वस्वी खोटी अशा त-हेचा एकदेशीय कोटिक्रम लढविल्यामुळे त्या उपपत्ति खोट्या व अतएव त्याज्य आहेत असें लोकांस वाटूं लागलें. परंतु अभिमत पंथाचा जनक अॅडम स्मिथ यानें दोन्ही मतांतील सत्याचा अंश कबूल केला व शिवाय संपत्तीच्या उत्पत्तीचें एक उपेक्षित कारण शोधून काढलें. तें कारण मानवी श्रम व श्रमविभागाचें तत्व हें होय. तेव्हांपासूनच अभिमत पंथांत व हल्लींच्या अर्थाश्स्त्रांतील बहुतेक पुस्तकांमध्यें जमीन, श्रम व भांडवल अशीं तीन संपत्तीचीं कारणें म्हणून सांगण्याचा सांप्रदाय पडला. परंतु पुढें या तीन कारणांच्या स्वरूपाबद्दल पुष्कळ वादविवाद वाढला व जेव्हां अभिमत पंथाच्या पुष्कळ मतांवर आक्षेप येऊं लागले, तेव्हां या कारणसमुच्चयाच्या पूर्णतेबद्दलही शंका उत्पन्न होऊं लागल्या; व आणखी कांहीं उपेक्षित कारणें दुस-या ग्रंथकारांनीं पुढें आणलीं. हीं कारणें पूर्वीच्या ग्रंथकारांनीं प्रमुखत्वेंकरून निर्दिष्ट केलीं नसलीं तरी तीं कारणें त्यांनीं गृहीत धरलीं होतीं. परंतु त्यांचा स्पष्ट्र उच्चार न झाल्यामुळे व अतएव तीं सर्वदा डोळ्यांपुढें न राहिल्यामुळें अभिमत अर्थशास्त्रकारांच्या विचारसरणीत कित्येक चुका झाल्या व या चुका दाखवितांना या कारणांचा प्रमुखत्वेंकरून निर्देश कांहीं अर्वाचीन ग्रंथकारांनीं केला. याप्रमाणें अभिमत पंथाच्या आक्षेपकांनीं संपत्तीच्या कारणांत भर घातली. परंतु प्रास्ताविक पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें कांहीं ग्रंथकारांनीं आपण शोधून काढलेलीं कारणें म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीच्या मीमांसेचें खरें रहस्य व अभेमतपंथाची कारणमीमांसा हीं खोटीं व कुचकामाचीं अशा प्रकारची टीका केली. परंतु ही टीकाही कांहीं अंशी एककल्लीच आहे असें खालील विवेचनावरून दिसेल.
 या सर्व वादविवादाकडे जरा बारकाईनें पाहिलें तर असें दिसून येईल कीं, हा वादविवाद खरोखरी शुष्क आहे. आजपर्यंत संपत्तीच्या उत्पत्नीसंबंधीं ज्या ज्या उपपत्ति पुढें आल्या आहेत त्या वास्तविक एकमेकींना विरोधी नाहींत तर त्या एकमेकींच्या पूरक आहेत. ह्मणजे प्रत्येक उपपत्तीमध्यें संपत्नीच्या एकेक कारणाचा निर्देश केलला आहे.
 तेव्हां या वादविवादांतील बराच घोटाळा व गोंधळ संपत्तींच्या कारणांचें वर्गीकरण करण्यापासून नाहींसा होणार आहे असें आह्मांस वाटतें व ह्मणून आम्हीं संपत्तीच्या कारणांचे दोन पोटभेद खालील विवेचनात केल आहेत.
 अर्वाचीन शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या कार्याच्या उपपत्तीला ज्या ज्या गोष्टी अवश्य असतील ह्मणजे ज्यांचेवांचून कार्योत्पत्ति होणार नाहीं, त्या सर्वाचा एकाच 'कारण' या संज्ञेमध्यें अंतर्भाव होतो हें खरें आहे; तरी पण कांहीं कांहीं शास्त्रांच्या सोयीकारतां कारणांचें वर्गीकरण करण्याची पद्धति आहे. उदाहरणार्थ, वैद्यकशास्त्रांत रोगाचीं प्रत्यक्ष कारणें व रोगाकडे कल असणारीं कारण असा भेद करतात. तसेंच पुष्कळ ठिकाणीं अप्रत्यक्ष कारणें व प्रत्घक्ष कारणें असा भेद करतात; परंतु हा भेद शास्त्राला धरून नाहीं. कारण अप्रत्यक्ष कारणें ह्मणजे कारणांचीं कारणें होत: तरी पण एखादया विषयाच्या सोयीकरितां असा भेद करण्यास हरकत नाही. या न्यायानें येथें अर्थशाखाच्या विवेचनाच्या सोयीकरितां कारणांचे अमूर्त व मूर्त असे दोन वर्ग केले आहेत. मूर्त कारणें हीं चटकन् ध्यानांत येणारीं कारणें होत. कारण तीं जडस्वरूपी असल्यामुळें वरवर पहाणाराच्याही तेव्हांच लक्षांत येतात. अमूर्त कारणें हीं जडस्वरूपी नसल्यानें तितकीं चटदिशीं लक्षांत येत नाहींत. मूर्त कारणें हीं दृगोचर असतात; तर अमूर्त कारणें हीं दृश्या दर नसतात. ज्याप्रमाणें वृक्षाचा वरचा भाग स्पष्ट दिसतो; परंतु मुळें जमिनींत खोल असल्यामळें सहज दिसत नाहींतें; त्याप्रमाणें अमूर्त व मूर्त कारणांचाही संबंध आहे. या भेदांचें स्पष्टीकरण एक दोन दाखव्ल्यांवरून सहज होईल. वृक्षाच्या वाढीचीं मूर्त कारणें ह्मणजे पाणी,खत व माती हीं होत. हीं सहज दृश्य असून तेव्हांच ध्यानांत येतात. या वाढीचीं अमूर्त कारणें म्हणजे हवा व उष्णता हीं होत. र्ह पहिल्याइतकीं लौकर ध्यानांत येत नाहींत. ह्मणूनच या अमूर्त कारणांचा शोध मूर्त कारणांचे मागून लागला आहे. विस्तवाचें मृत कारण जळण होय; तर अमूर्त कारण हवा होय. पाणी वर काढण्याच्या पंपाच्या यंत्रामध्यें पाणी वर येतें तें मनुष्याच्या शक्तिनें किंवा एंजिनाच्या शक्तिनें येतें. या ठिकाणीं मानवी शक्ति व एंजिनाची शक्ति हें त्याचें मूर्त कारण तर हवेचा दाब हें त्याचें अमूर्त कारण होय. आपण दगड हातांतून फेंकला म्हणजे तो जमिनीवर आपटतो. याचें मूर्त कारण आपण त्यास दिलेला गति होय, पण त्याचें अमूर्त कारण गुरुत्वाकर्षण होय. एखाद्या कार्याला अमूर्त कारणें मूर्त कारणांइतकींच अवश्यक असतात. अमूर्त व मूर्त यांमध्यें अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कारणें असा परंपरेचा संबंध नसती. दोन्हीं कारणें त्या कायचिों प्रत्यक्ष कारणेंच असतात. परंतु अमूर्त कारणें त्याच कार्याला अनन्य सामान्य असतात असें मात्र नाहीं. त्या कारणापासून आणखीही पुष्कळ कार्ये होत असतात. तेव्हां अमूर्त व मूर्ती यांमध्यें सामान्य-विशेष असा संबंध असतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां प्रथमतः संपत्तीच्या उत्पतीचीं अमूर्त कारणें कोणतीं याचा विचार पुढील भागांत करूं.

भाग दुसरा.

संपत्तीचीं अमूर्त कारणें.

 देशांतील संपत्तीची उत्पति व वाढ करणारें पहिलें अमूर्त कारण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा होय. संपत्तीची व्याख्या करतांना संपत्ति ही कोणाच्या तरी मालकीची असली पाहिजे, अर्थात तिच्यामध्यें अधीनता हा गुण असला पाहिजे हें मागें सांगितलेंच आहे. आतां या संपत्तीच्या गुणाचा व संपत्तीच्या पहिल्या अमूर्त कारणाचा निकट संबंध आहे. कारण देशामध्यें खासगी मालकीचा हक्क प्रस्थापित होऊन त्याला स्थैर्य आल्याखेरीज खासगी मालकी हा गुण संपत्तीत येऊं शकणार नाहीं. अर्थात् मालमत्तेचा व जीविताचा सुराक्षितपणा हा मालकीहक्क प्रस्थापनेचा पायाच आहे. हा सुरक्षितपणा देशांत स्थापित करून तो सतत टिकविणें हें सुधारलेल्या राज्यपद्धतीचें पहिलें व प्रमुख कर्तव्यकर्म समजलें जातें. ज्यामध्यें समाजव्यवस्था व सुयंत्रित राज्यव्यवस्था सुरू झालेली नसते अशा अगदीं रानटी स्थितीमध्यें "बळी तो कान पिळी" हा न्याय असतो. अशा स्थितींत खासगी मालकीहक्क मानला जात नाहीं, व यामुळे अशा स्थितींत संपत्तीची वाढ होऊं शकत नाही; कारण आपल्या श्रमाचें फळ आपल्याला उपभाेगण्यास मिळेल अशी खात्री नसते. आज आपण मोठे श्रम करून एखादी वस्तु तयार केली तर उद्यां एखादा शिरजोर माणूस येऊन ती वस्तु आपल्यापासून हिरावून नेईल अशी भीति सर्वांस असते. यामुळे संपात्ति उत्पन्न करण्याचे श्रम घेण्यास कोणीही धजत नाहीं. वरील विवेचनावरून या अमूर्त कारणाचें स्वरुप ध्यानांत येईल. मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा हा संपत्तीच्या वाढीचा मूळ पाया आहे, व राखणें हें आपलें आद्य कर्तव्यकम समजतें. देशांतील प्रचंड सैन्यें व आरमारें, देशांतील पोलिसखातें व न्यायखातें, व देशांतली दळणवळणाचीं सुधारलेलीं साधनें वगैरे सर्व गोष्टींनीं हा सुरक्षितपणा स्थापन केला जातो व राखला जातो. कारण हा सुरक्षितपणा सार्वत्रिक होण्यास देशांत नेहमी शांतता पाहिजे. तेथें लढाया होतां कामा नयेत, आपसांत मारामाऱ्या दंगधोपे होतां कामा नयेत, व्यक्तीच्या हक्काचें उत्तम त-हेनें संरक्षण झालें पाहिजे, व्यक्तीव्यक्तीमध्यें न्याय उत्तम मिळाला पाहिजे. सारांश, देशामध्यें कायद्याचें साम्राज्य पाहिजे. व्यक्तीचे हृक स्पष्टपणें निर्दिष्ट होऊन त्याप्रमाणें राज्यव्यवस्था सारखी चालली पाहिजे. अशी जेव्हां सुधारलेली राज्यपद्धति देशांत प्रचलित असेल त्याच वेळीं मालमत्तेला व जीविताला उत्तम सुरक्षितपणा आला आहे, अशी मनुष्याच्या मनाची खात्री होते व मग मनुष्याला श्रम करण्यास स्फुरण येतें व त्यामुळे संपत्तीची झपाट्यानें वाढ होते. कारण या स्थितींतच आपण केलेल्या श्रमांचे चीज होऊन आपल्याला व आपल्या मुलाबाळांना आपल्या श्रमाचा फळें उपभोगण्यास सांपडतील अशी खात्री समाजांतील व्यक्तीच्या मनांत उत्पन्न होते.
 मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारण संबध आहे हें जगांतील निरनिराळ्या देशांच्या इतिहासावरून सिंद्ध करतां येतें व या याेगें या अमृत कारणाच्या सत्यतेबद्दल
 शंका राहात नाहीं. इतिहासावरून आपल्याला असें दिसून येतें कीं, ज्या ज्या राज्यामध्यें हा सुराक्षितपणा उत्तम प्रकारानें प्रस्थापित झाला आहे, तेथें तेथें संपत्तीची वाढ व देशाची भरभराट झालेली आहे. जेथें जेथें हा सुरक्षितपणा प्रथमपासूनच स्थापित झाला नाहीं तेथें तेथें संपत्तीची वाढ होऊं शकली नाहीं. सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारणभाव दाखविणारीं हीं अन्वयव्यतिरेकाचीं निरनिराळ्या देशांचीं उदाहरणें देतां येतात; इतकेंच नाहीं, तर आपल्याला एका देशाच्या निरनिराळ्या स्थित्यंतराचें उदाहरण देतां येतें; म्हणजे जोंपर्यंत देशामध्यें मालमतेचा सुराक्षितपणा स्थापित होऊन तो टिकलेला असतो तोंपर्यंत देशाची सांपत्तिक भरभराट होत असते व ती टिकते. परंतु सुधारलेली राज्यपद्धति जाऊन हा सुरक्षितपणा नाहीसा झाल्याबरोबर सांपत्तिक भरभराटीलाही उतरती कळा लागून तो देश दारिद्र्याच्या खोल दरींत बुडतो. हा सिद्धांत प्रस्थापित करण्याकरितां आतां आपण थोडीशीं ऐतिहासिक उदाहरणें घेऊं व प्रथमतः जुन्याकाळांतील मोठया प्रमाणावरील दोन दाखले घेऊ. पहिला रोमन पादशाहीचा व दुसरा पर्शियन पादशाहीचा.
 जुन्या जगांत रोमन पादशाहीच्या इतकें चिरस्थाई असें दुसरें साम्राज्य झालें नाहीं. परंतु त्याच्या या चिरस्थाईपणाच्या मुळाशीं रोमन लोकांचा कायदा होता असें दिसून येतें. रोमन साम्राज्य हें कायद्याचें साम्राज्य होतें व या कायद्यानें व्यक्तीच्या हकांचें उत्तम रक्षण केल जात असे व यामुळे या साम्राज्यांत मालमत्तेला व जीविताला उत्तम तऱ्हेची सुरक्षितता असे. या व्यक्तीच्या हक्कांच्या पवित्रपणामुळें व मालमत्तेच्या सुरक्षितपणामुळेंच रोमन पादशाहीमध्यें लोक फार सुखी होते व त्या साम्राज्याची कित्येक शतकेंपर्यंत सांपत्तिक भरभराट होत होती. रोमन राज्यपद्धतीमध्यें मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा किती होता व व्यक्तीच्या हक्कांचे रोमन कायदा किती उत्तम त-हेनें रक्षण करीत असे हें दाखविणारी एक आख्यायिका रोमन इतिहासकार सांगत असतात. ही आख्यायिका रोमन राज्याचा जेव्हां फारसा विस्तार झालेला नव्हता तेव्हांची आहे. अशा त्या राज्याच्या बाल्यावस्थेमध्यें सुद्धां राज्यांतील व्यक्तीमध्यें रोमन कायद्याच्या अंमलानें व्यक्तीच्या हक्काबद्दल व करारपालना बद्दल केवढा विश्वास उत्पन्न केला होता हें त्या अख्यायिकेवरुन् दिसून् येतें व असा विश्वास जेव्हां सार्वत्रिक दिसून येतो तेव्हां मालमत्ता व जीवित यांचा सरक्षितपणा पूर्णपणें स्थापन झालेला आहे, असें ह्मणतां येईल व अशा सार्वत्रिक विश्वासाने सांपत्तिकदृष्टया श्रम करण्याची व उद्योग करण्याची हुरूप लोकांमध्यें उत्पन्न होते. ही आख्यायिका हानिबालच्या काळची आहे. हानिवालानें आपल्या मोठ्या सैन्यानिशीं इटालीच्या एका भागामध्यें तळ दिला होता. रोमन राज्यकर्ते त्याचा प्रतिकार करण्याच्या तयारीत् होते; परंतु कोणत्या पक्षाचा जय होईल हें सांगणें कठिण होतें. अशा निश्चित व आणीबाणीच्या प्रसंगांत देशाचे सरकार असतांना दोन रोमन गृहस्थ ज्या जागेवर हानिबालच्या सैन्याचा तळ पडला होता त्या जागेसंबंधीं विक्रीच्या उद्योगांत गुंतलेले होत व एक गृहस्थ आपल्या मालकीची ती जमीन कांहीं किंमतीला दुस-याला विकण्याचा करार करीत होता. या आख्यायिंकेवरुन रोमन कायद्यानें लोकांच्या खासगी व्यवहारावर् केवढा परिणाम केलेला होता हें फार चांगल्या त-हेनें दिसून येतें. यामध्यें रोमन लोकांची आपल्या सरकारची सरशी होणार ही खात्री तर दिसून येते. पण याच्याहीपेक्षां जास्त महत्वाची गोष्ट ही की, या युद्धाचा परिणाम कांहींही झाला तरी आज जे आपण करार करीत आहोंत व आज जी आपण मालकीहककाची अदलाबदल करीत आहोत, त्यामध्यें रतिभरही राज्यक्रांतीनें सुद्धां बदल होणार नाहीं, कायदा आपले नवे संपादित हक पवित्र मानील अशी दृढ समजूत बहुजनसमाजामध्ये रोमन कायद्यानें उत्पन्न करून दिली होती, असें या आख्यायिकेवरून दिसून् येतें.
 या कायद्याच्या अंमलामुळेंच व त्यानें उत्पन्न केलेल्या व्यक्तीच्या मालकाहकावठ्ठलच्या दृढविश्वासानेंच रोमन साम्राज्य इतकीं शतकें टिकलें व जरी कालांतरानें रानटी टयूटन लोकांच्या हल्याखालीं रोमन पादशाहीचा हळू हळ -हास झाला व त्याचे जागी नवीं राष्ट्रॅ निर्माण झाली, तरी या नव्या राष्ट्रांमध्यें रोमन कायदा व त्याची न्यायपद्धति यांचा अंमल कायमच राहिला.
 याच्या उलट उदाहरण ह्मणजे पांशयन साम्राज्यार्च आहे, हे साम्राज्यही स्थापन झालें त्या वेळीं रोमन साम्राज्याप्रमाणे विस्तृत् व ज्या राजांनीं हें प्रथम स्थापन केलें. त्यांचे काळीं त्या साम्राज्यांत सुयंत्रित राज्यव्यवस्था होती व म्हणूनच साम्राज्यांत सांपत्तिक भारभराटही झाली.या साम्राज्याखालीं असणारे प्रांतही फार सुपीक असून सृष्टीदेवीचे जणूं कांहीं आवडते होते. इतकी विपुल स्वाभाविक संपत्ति व सृष्टीशक्ती या प्रांतांत होती. परंतु अशा प्रकारच्या संपत्तीच्य वाढीस अनुकूल सर्व स्वाभाविक गोष्टी असतांना हें प्रांत हजारों वर्षें ओसाड पडले व बहुतेक निर्जन बनले.या सांपत्तिक ऱ्हासाचें कारण पुढील राजांची अनियंत्रित सत्ता व त्याच्या योगानें लोकांना लागलेल्या वाईट संवयी होत.परंतु या सर्व गोष्टींचे पर्यवसान मालमत्तेची व जीविताची सुरक्षितता नाहींसें करण्यांत झालें.कारण या सर्व साम्राज्यांत सुयांत्रित राज्यव्यवस्था राहिली नाहीं.सरदार लोक व जमीनदार आपआपसांत तंटेवखेडे करीत;त्यांना आपल्या शेजारच्या लोकांना लुटून आपली तुमडी भरण्याची संवय लागली.या सवयींमुळें स्वतः श्रम करण्याची बुद्धि कमी झाली व इतर लोकांमध्यें मालमत्तेची सुराक्षितता नाहींशीं झाली.यामुळें संपत्तीचा सर्व झराच मुळीं आटून गेला व हे अत्यंत सुपीक प्रांत ह्लांत व दारिद्र्यांत राहणाऱ्या लोकांचे वस्तीचे प्रांत बनले. तेव्हां पर्शियन साम्राज्याच्या ताब्यांत असलेल्या प्रांताच्या सांपत्तिक अवनतीचें मूळ मालमत्तेच्या व जीविताच्या सुरक्षितपणाच्या आभावांत आहे व हा आभाव अंदाधांदीचा व मोंगलाई राज्यपद्धातीचा परिणाम होय. कारण या हजारों वर्षे बहुतेक ओसाड बनलेल्या प्रांतांत जेथें जेथें सुयांत्रित राज्यपद्धति सुरु होऊन मालमत्तेला व जीविताला सुरक्षितता आलेली आहे तेथें तेथें पुन्हा हे भाग सांपत्तिक भरभराटीच्या मार्गाला लागलेले दृष्टोत्पत्तीस येतात.
 या सिद्धांताचें समर्थक असें अर्वाचीन काळांतील उदाहरण म्हणजे आयर्लेंड देशाचें आहे. त्या देशांत बहुत काळपर्यंत सुव्यावास्थित राज्यपद्धति सुरु झाली नाहीं व तेथील लोकांमध्ये लुटारूपणाची प्रवृत्ति फार काळ राहिली व हा देश रोमन लोकांच्या ताब्यांत कधींच न गेल्यामुळें तेथें रोमन कायद्याची पद्धति युरोपच्या इतर प्रांतापेक्षां फार मागाहून सुरु झाली. खरोखरीं आयार्लेंडात इंग्रजांनीं रोमन कायदे नेले. आयरिश लोकांमध्ये आपआपसांत तंटे करण्याची प्रवृत्ति फार होती. तसेंच अंतःकलह व द्वेष हे फार होते. यामुळें मालमत्तेला व जीविताला विशे षसा सुरक्षितपणा आला नाहीं व ह्मणून त्या देशाची सांपत्तिक स्थिति सुधारली नाहीं. कारण संपत्तीच्या वाढीचा झराच मुळीं फार कालपर्यंत दूषित राहिला.
 हिंदुस्थानचा संगतवार असा इतिहास उपलब्ध नसल्यामुळें इकडील उदाहरणें फारशीं देतां यावयाचीं नाहींत. तरी पण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व सांपत्तिक भरभराट याचा कार्यकारणसंबंध सिद्ध करतां येण्यासारखीं पुष्कळ उदाहरणें देतां येतील. अयोध्याप्रांताचें एक उदाहरण आहे. हा प्रांत फार सुपीक असून कांहीं कांहीं नबाबांच्या कारकीर्दींत तो फार भरभराटींत होता. परंतु पुढील नबाबांची कारकीर्द फार जुलुमी व अंदाधुंदीची झाल्यामुळें राज्यांत सुनियंत्रित राज्यपद्धति नाहींशी झाली व त्यामुळेंच त्या प्रांताची भरभराट नाहींशी होऊन तो प्रांत कांहीं कालपर्यंत उजाड पडल्यासारखा झाला. अकबराच्या कारकीर्दीमध्यें राज्यव्यवस्था फार चोख असल्यामुळें व जिकडे तिकडे उत्तम शांतता नांदत असल्यामुळें त्या कारकीर्दीत लोक सुखी होते व एकंदर देशामध्यें सुबत्ता नांदत होती. परंतु अवरंगजेबाच्या कारकीर्दीपासून अंदाधुंदीस व अंतःकलहास सुरुवात झाली व अकबराच्या काळीं प्रस्थापिंत झालेली शांतता व त्यायोगानें उत्पन्न होणारा सुरक्षितपणा कमी झाला व त्याचा परिणाम देशांतील सांपत्तिक स्थितीवर झाल्याखेरीज राहिला नाहीं असें इतिहासावरून दिसून येतें.
 संपत्तीच्या उत्पत्तीचें व वाढीचें दुसरें अमूर्त कारण म्हणजे मानवी वासना व त्यांची वाढ हें होय. मनुष्याच्या सुखाचें खरें साधन वासनांची वाढ किंवा वासनांचा छेद हा एक नीतिशास्त्रांतील मोठा वादग्रस्त प्रश्र आहे; व सर्व देशांत दोन्ही प्रकारचीं मतें मोठमोठ्या तत्ववेत्यांनीं प्रतिपादन केलेलीं आहेत. हिंदुस्थानांत आमच्या तत्वज्ञानाचा बहुधा कटाक्ष वासनाछेदाकडेच दिसून येतो. 'जहीहि धनागमतृष्णाम्' हें आमच्या तत्वज्ञान्यांच्या उपदेशाचें पालुपद आहे. परंतु या ठिकाणीं या वादाशीं आपल्याला कांहीं एक कर्तव्य नाहीं. आपल्याला फक्त येथें अर्थशास्त्रदृष्ट्या वासनांचा विचार करावयाचा आहे, व या दृष्टीनें त्यांची वाढ ही संपत्तीस व समाजाच्या आधिभौतिक सुधारणेस अत्यंत आवश्यक आहे यांत कांहींएक संदेह नाहीं. मनुष्याच्या अगदीं रानटी स्थितींत मनुष्य व पशु यांच्या वासनांत फारसें अंतर नसतें. दोघांचीही राहण्याची तऱ्हा व उपजीविकेचे उद्योग यांमध्येंही साम्य असतें. तरी पण मनुष्यामध्यें विचारशक्ति व कल्पना हे दोन गुण विशेष आहेत. मनुष्यस्वभावांतील हे दोन गुण संस्कृतामधील दोन प्रसिद्ध सुभाषितांमध्यें मोठ्या मार्मिक रीतीनें सांगितले आहेत. मात्र विचारशक्तीऐवजी पहिल्या सुभाषितांत धर्म हा मनुष्याचा विशेष म्हणून सांगितला आहे. परंतु खरा धर्म हा नेहेमींच विचारशक्तीपासून निष्पन्न होतो. मनुष्याला विचारशक्ति आहे म्हणून तो या अनंत विश्वाच्या गुढाचा विचार करूं लागतो व त्याचें जें उत्तर त्याला सयुक्कि दिसतें त्यालाच ताे आपला धर्म मानूं लागताे. म्हणून अर्वाचीन कल्पनेला अनुसरून या सुभाषितांत थोडा फरक करून ती खालीं देतों.

   “आहारनिद्राभयमैथुनं च । सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |
   मतिर्हि तेषांमधिको विशेषः । मत्या विहीनाः पशुभिः समानाः ॥”
   “ साहित्यसंगीतकलाविहीनः । साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
   तृणं न खादन्नपि जीवमानः । तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥”

 या दोन गुणांपासून मनुष्याच्या पशुतुल्य वासनांचें किती तरी निरनिराळ्या प्रकारांत रुपांतर होतें; व शिवाय या दोन गुणांपासून आणखीही नव्या नव्या हजारों वासना उत्पन्न होतात. पशूपक्षी घरट्यांत किंवा ढोलींत राहतात. मनुष्यें प्रथमतः पशूप्रमाणेंच ढोलींत राहत असली तरी त्यांना झोंपडी बांधण्याची वासना होते व अगदीं रानटी झोंपडी व सर्वांगसुंदर अर्वाचीन राजवाडा यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे व हें अंतर मनुष्याच्या विचारशक्तीचा व सौंद्र्यकल्पनेचा प्रभाव होय. इतर प्रा यांना थंडीवा-या- पासून संरक्षण करण्याकरतां केंस व लोकर हीं नैसर्गिक साधनें देवानें दिलीं आहेत. मनुष्याला आपलें संरक्षण करण्यास बाह्य साधने लागतात व पशूंच्या कातड्यापासून व झाडांच्या सालींच्या वल्कलांपासून तो हल्लींच्या हजारों ताऱ्हांच्या सुंदर कापडापर्यंत मानवी वासनांचें केवढें तरी रूपांतर झालें आहे. परंतु मानवी वासना निवळ विषयसुखाबद्दलच असतात असें नाहीं. मनुष्याच्या बुद्धीमुळे त्याच्यामध्यें किती तरी बौद्धिक वासना उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे मनुष्यास ज्ञानाची लालसा उत्पन्न हेातेा. त्याला पुस्तकाची व वाचनाची जरुरी लागते. सारांश, मनुष्याच्या वासनांची वाढ अक्षरशः अमर्याद आहे. आतां वासनांची वाढ समाजाच्या आधिभौतिक सुधारणेचें मूळ होय, हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 वासनाछेदाचें उद्दिष्ट जर मनुष्यानें आपल्यापुढें ठेविलें व त्याप्रमाणें जूर बहुजनसमूजावें खरोखरीच वर्तन होऊं लागलें तर संपत्तीच्या आधिभौतेिक सुधारणेची देोलेजंग इमारत ढांसळून पडलीच पाहिजे. समाजांतील सर्व व्यकी जर ग्रीक संन्याशी डायोजिनीसनपणें एका द्रोणांत राहूं लागल्या व त्यांच्या उपजीविकेला जर सृष्टींतील नैसर्गिक फळमुळेच पुरेशीं झाली तर सर्व उद्योगधंद्रे व त्यांबरोबरच समाजांतील अधिभौतिक सुधारणा रसातळास गेली पाहिजे. किंवा आमच्या इकडील खऱ्या. निवृत्त साधूंप्रमाणे सर्व लोक सर्वसंगपरित्याग करून रानांत राहून फळांमुळांवर उपजीविका करूं लागले तर सर्व शहरें व त्यांतील सर्व धंदे नाहींसे झाले पाहिजेत हें उघड आहे.
 मानवी वामना किंवा अर्थशास्त्रांतील शब्द 'मागणीˈ व ‘ख यावर संपत्तीची उत्पति अवलंबून आहे, हें विधान कांहीं अंशां विरोधाभासात्मक आहे. संपत्तीची उत्पति त्याच्या खपावर म्हणजे त्याच्या उपभोगावर अगर नाशावर अवलवून आहे असा अर्थ होतो. परंतु याच्या सत्यतेबद्दल सर्व मानवी सुधारणा साक्ष देईल. कारण सर्व मानवी सुधारणा ह्मणजे मनुष्याच्या वासनांची वाढ व त्या तृप्त करण्याच्या विपुल साधनांची वाढ होय. व जसजसें मानवी गरजा व वासना यांचें स्वरूप मनुष्याच्या ज्ञानवृद्धीनें त्याच्या परिस्थितिभेदामुळें बदलत जातें तसतशी समाजांत उत्पन्न होणारी संपत्ति हिचें स्वरूपही बदलत जातें. उदाहरणार्थ, एका काळीं मनुष्याचें स्वसंरक्षणाचें साधन व लढाईचें व सैन्यातील शिपायाचें हत्यार म्हणजे तिरकमठा होता व तिरकमठा, तीर व भाता करण्याचा धंद्रा म्हणजे एक संपतेि उत्पादन करणारा धंदा होता. परंतु तो आतां कोठें गेला ? हजारों प्रकारचीं शस्त्रात्रे कोठे गेलीं? पूर्वींच्या काळच्या चिलखताचें काय झालें ? एखाद्या पदार्थसंग्रहालयांीिल शस्त्रागाराकडे दृष्टि फॅकली म्हणजे या बाबतींत केवढी क्रांति झाली आहे हैं दिसून येईल. म्हणजे मनुष्यांनीं केलेल्या नव्यानच्या शोथांनी मनुष्याच्या व राष्ट्राच्या संरक्षणाची गरज जरी कायम असली तरी त्याचे स्वरूपांत विलक्षण बदल झाला व यामुळें जसजशी मागणी बदलली तसतसे जुने धंदे नाहींसे होऊन त्याचे ठिकाणीं नवे धंदे आले. हाच प्रकार सर्वत्र दिसून येतो. हिंदुस्थानच्या एका शतकाच्या पूर्वीच्या व हल्लीच्या काळाकडे पाहिलें तरीही हेंच दिसून येईल. ज्या ज्या गरजांचें रुपांतर झालें आहे त्यासंबंधींचे जुने धनोत्पादक धंदे जाऊन त्याचे ठिकाणीं नव्या गरजा भागविणारे धंदे आले किंवा या गरजा परकी देशांतील मालानें भागवितां येऊ लागल्या.
 सारांश, संपत्तीच्या मागणीवर संपत्तीची उत्पत्ति अवलंबून आहे हें वरील विवेचनावरून उघड दिसून येईल. निवळ गरजा वाढून उपयोग नाहीं हे खरें. तर त्या गरजा तृप्त करण्यास लागणारें सांपत्तिक सामर्थ्यही लोकांमध्यें आलें पाहिजे हें निर्विवाद आहे. परंतु वासना उत्पन्न झाली म्हणजे मनुष्य ती तृप्त करण्याच्या उद्योगाला लागती व श्रम करून ती वासना तृप्त करण्याचीं साधनें म्हणजे संपत्ति मिळवू लागतो. आफ्रिकेंतील पुष्कळ नीग्रो जाती या श्रम करण्यास मुळींच तयार नसतात. कारण त्यांच्यामध्यें वासनाच उत्पन्न झालेल्या नसतात. परंतु निरनिराळे पदार्थ दाखवून व त्याचा उपयोग शिकवून त्यांच्या वासनाशक्तीला एकदां चालन दिलें म्हणजे अशा जाती श्रम करण्यास प्रवृत्त होतात असा पुष्कळ मिशनरी लोकांनीं आपला अनुभव लिहून ठेविला आहे. ज्या समाजांतील व्यक्तीमध्यें वासना व गरजा यांच्या अल्पतेमुळे समाधानी वृत्ती असते तेथें संपत्तीच्या वाढीस वावच नसतो. ही समाधानवृत्ति नाहींशी होऊन वासनांच्या व गरजांच्या वाढीने असमाधान किंवा असंतोष उत्पन्न होणें ही सांपत्तिक प्रगतीची पहिली पायरीच होय. ‘असंतोषःश्रियोमूलम् ? या संस्कृत म्हणीचे रहस्य यांतच आहे.
 मागणीचा संपत्तीच्या उत्पत्तीवर व वाढीवर कसा फलदायक परिणाम होतो यांचें ताजें उदाहरण हिंदुस्थानांतील गेल्या चार पाच वर्षांचा औद्योगिक इतिहास होय. कांहीं राजकीय व औद्योगिक कारणामुळे जी देशी मालाला मागणी उत्पन्न झाली त्याच्या योगानें गेल्या चार पांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत किती तरी झपाट्यानें संपत्तीची वाढू झाली आहे हे सर्व श्रुतच आहे. या मागणीमुळे जे लोक आपआपली धंदे टाकून नवीन धंद्याला लागू लागले होते ते लोक आपल्या पूर्वीच्या धंद्याला परत आले व आपला धंदा फायदेशीर रीतानें करूं लागले. तसेंच किती तरी नवे उत्पादक धंदे आस्तित्वांत येऊ लागले आहेत.
 संपत्नीच्या उत्पत्तीची वर विवेचित अमूर्त कारणें यांकडे आभिमतपंथानें अगदीं कानाडोळा केला; किंवा यांचें अस्तित्व व महत्व हें त्यांच्या ध्यानांत नव्हतें व म्हणून त्यांनीं काढलेले पुष्कळ सिद्धांत खोटे व प्रत्यक्ष व्यवहाराला कुचकामाचे आहेत अशा प्रकारचे आक्षेप कांहीं आधुनिक ग्रंथकारांनीं काढलेले आहेत. रिकाडाच्या उदाहरणानें या शाखाला ज तर्किक स्वरुप आलें त्याचा परिणाम अर्थशास्त्रांतील कांहीं सिद्धांतांवर झाला खरा; परंतु हा आरोप अभिमतपंथाच्या जनकावर लागू करतां येत नाहीं. सर्व संपत्त्तीची अंतिम हेतु उपभोग किंवा व्यय आहे हें अडाॅम स्मिथ नें पुष्कळ ठिकाणी स्पष्टपणें सांगितलें आहे, इतकेंच नव्हे तर संपत्तीची वाढ ही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हेंही अॅडाम स्मिथला ठाऊक होतें व तें त्याच्या एका विधानावरून सिद्ध करितां येतें. अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकाच्या प्रथमारंभींच श्रमविभागाच्या तत्त्वाचा उहापोह केला आहे व या तत्वाचा संपत्तीच्या वाढीस केवढा मोठा उपयोग होतो हें सप्रमाण सिद्ध केलें आहे. परंतु श्रमविभागाचे तत्व अमलांत येणें हें बाजाराच्या परिघावर अवलंबून आहे असें त्यानें याच विवेचनांत सांगितलें आहे. म्हणजे कोणत्याही धद्यात श्रमविभागाचें तत्व अमलांत येणें न येणें हें खपावर किंवा मागणीवर अवलंबुन आहे. आतां श्रमविभागावर संपत्तीची वाढ अवलंबून आहे. अर्थात संपत्तीची वाढही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हे उघड झाले.
 यावरून अभिमतपंथाच्या प्रवर्तकांस हीं अमूर्त कारणें अश्रुतपूर्व होतीं व म्हणून त्यांची सर्व इमारत डळमळीत पायावर उभारलेली आहे, या आरोपास फारशी जागा नाहीं. वस्तुस्थािति अशी आहे की, हीं अमूर्तकारणे या पंथानें सुव्यवस्थित व प्रगतीच्या मार्गात असणाच्या समाजात असतात असें गृहीत धरून आपलें विवेचन केलें आहे. हीं अमृतकारणें स्पष्टपण सतत डोळ्यांपुढें न ठेवल्याकारणानें केव्हां केव्हां त्यांच्या विवेचनांत व विचारसरणींत चुक्या झाल्या आहेत, ही गोष्ट खरी वं अशा चुक्या दाखविणें निराळे व त्यांचे सर्वच ग्रंथ केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे आहेत असें म्हणणे वेगळे. या दुस-या म्हणण्याला तज्ञ मनुष्य कांहींच मान देणार नाहीं. परंतु हीं अमूर्तकारणें ह्मणजे सर्व कारणसर्वस्व नव्हे. संपत्तीच्या वाढीस पुष्कळ मूर्तकारणें हीं लागतात व त्याशिवाय नुसत्या अमूर्त कारणाच्या आस्तित्वानेंच संपत्ती उत्पन्न होणार नाहीं हेंही निर्विवाद आहे. तेव्हां पुढील भागांत या मूर्त कारणांचा विचार करु.

भाग तिसरा.

मूर्त कारणे-जमीन

 संपत्तीच्या उत्पत्तीचीं पहिलीं मूर्त कारणें दोनच आहेत व त्यांतूनच आणखी दोन कारणें निष्पन्न होतात. पहिलीं दोन कारणें म्हणजे सृष्टी व तिच्या शक्ती वें मनुष्य व त्याच्या शक्ती. या दोहोंच्या मिलाफानेच सर्व संपत्ति उत्पन्न होते. मनुष्याला कोणतीही नवी गोष्ट जगांत उत्पन्न करतां येत नाहीं; त्याची शक्ती फक्त सृष्टींतील वस्तूंची घडामोड करुन किंवा तिच्यांत इतर फेरफार करून त्यांना नवें स्वरूप व आकार देऊं शकतें, व यालाच आपण संपत्तीची उत्पत्ती म्हणतो. समाजाच्या अगदीं बाल्यावस्थेंत संपत्तीच्या उत्पत्तीचीं हींच दोन कारणें आस्तित्वांत असतात. परंतु समाज सांपत्तिक बाबतींत वरच्या पायरीवर येऊं लागला कीं, दुस-या दोन कारणांचा प्रादुर्भाव होती व सुधारलेल्या काळांत एका दृष्टीनें याच कारणांना पहिल्या दाहापेक्षां जास्त महत्व येतें. हीं दोन कारणें म्हणजे सृष्टि शक्ती व मानवीशक्ती यांचा मिलाफ घडवून आणणारी प्रवर्तक कारण होत. ज्याच्या योगानें हा मिलाफ घडून येतो तें भांडवल व जो हा मिलाफ घडवून आणतो तो योजक अगर कारखानदार. ज्या हत्याराच्या योगानें, ज्या यंत्राच्या योगानें, ज्या उपकरणांच्या योगानें मनुष्याला सृष्टीच्या शक्तीच्या आपल्या संपत्तीच्या उत्पादनाकडे उपयोग करून घेतां येतो तें सर्व भांडवल या संज्ञत मोडतें, व जो योग्य सृष्टीच्या शक्ती, योग्य मानवी शक्ति व योग्य उपकरणें या सर्वांची जुळवाजुळव करून व त्यांची एके ठिकाणीं योजना करून प्रत्यक्ष संपात तयार करतो ती योजक किंवा कारखानदार होय. हीं चारों कारणें हल्लीच्या काळीं परस्परांपासून स्वतंत्र असतात. तेव्हां प्रत्येकाच स्वरुप काय व त्याच्या योगानें संपात कशी उत्पन्न होते या गोष्टीचें आतां विवेचन करावयास पाहिजे.
 सृष्टीच्या शक्तीचें समाजाच्या सर्व सांपत्तिक स्थितींत एक मुख्य अंग म्हणजे देशांतील जमीन होय. आधिभौतिक शास्त्राच्या प्रगतीनें देशांतील दुस-या नैसर्गिक शक्तींना औद्योगिक महत्त्व आलें आहे खरें; तरी जमीन व शेतकी हे नैसर्गीिक शक्तीचे सनातन भाग आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून जमीन हें एक संपत्तीच्या उत्पत्तीचे कारण आहे असें सांगण्याचा अभिमतपंथाचा संप्रदाय आहे.
आतां जमीनीची संपत्ति उत्पादन करण्याची शक्ती ज्या तिच्या कित्येक गुणांवर अवलंबून आहे त्यांचा थोडक्यांत विचार करणें जरूर आहे. प्रदेशाचें हवापाणी हें एक त्याचें मुख्य अंग आहे. कारण पृथ्वीच्या पाठीवर कांहीं भाग असे आहेत कीं, तेथें थंडीच्या तीव्रतेमुळे मनुष्यवस्तीच बहुधा शक्य नसते; व शक्य झालीच तर मनुष्याचें श्रमसर्वस्व निवळ जिवंत राहण्यांतच खर्च होतो व अशा प्रांतांत शेतकीचा उदयच होणें शक्य नसतें. तसेंच कांहीं प्रांत निवळ वालुकामय असून तेथें पाणी मुळीच नसतें. यामुळेंही तेथें धनोत्पादक शतकीचा प्रादुभाव होऊ शकत नाहीं. यामुळे आधिभौतिक सुधारणा बहुतेक समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशांत व प्रांतांत झालेली आहे, असें दृष्टोत्पत्तीस येतें. कारण तेथें ती होण्यास हवापाणी इत्यादि प्रकारची अनुकूल परिस्थिती असते.
 जमिनीचा धनोत्पादक दुसरा गुण म्हणजे तिची भूगर्भसंबंधीं स्थिती होय. ज्या ठिकाणी निरनिराळ्या धातूच्या खाणी आहेत तेथें संपत्तीची वाढ झपाट्यानें होते. ज्या ज्या ठिकाणीं सोन्यारुप्याच्या खाणी सांपडल्या आहेत ते ते प्रदेश पूर्वी अगदी ओसाड असतांना पांच पन्नास वर्षात आधिभौतिक सुधारणेंत अग्रेसर झालेले आहेत. उदाहरणार्थ, आस्ट्रेलिया देशाची भरभराट पहा. इंग्लंडची सांपत्तिक प्रगती पुष्कळ अंशीं लोखंड व कोळशांच्या खाणीच्या शोधापासून झालेली आहे हें सर्वश्रुतच आहे.
 जमिनीचा तिसरा गुण म्हणजे तिची सुपीकता अमेरिकेंतील जमिनीच्या विलक्षण सुपीकतेमुळे त्या देशाची इतक्या लवकर सांपत्तिक भरभराट झाली. इंग्लंडच्या भरभराटीलाही तेथल्या जमिनीच्या सुपीकतेची व विशेषतः तेथल्या थंड हवेची व सततच्या पावसाची फार मदत झालेली आहे.
 देशांतील नद्या, समुद्रकिनारा, बंदरें, वायुप्रवाह व पर्वताच्या रांगा वगैरे पृष्ठभागाच्या स्थितीचाही देशाच्था सांपत्तिक स्थितीवर परिणाम होतो, हेंही पुष्कळ देशांच्या इतिहासांवरून दिसून येतें.
 या सर्व बाबतींत हिंदुस्थान देशाची स्थिती फार अनुकूल आहे. आधीं सर्व देश समशीतोष्ण कटिबंधांत असून त्याच्यामध्यें अत्यंत थंड हवेपासून तों अत्यंत उष्ण हवेपर्यंतचें बहुविधत्व आहे. तसेंच सर्व देशांतील बराच मोठा भाग सुपीक असून त्याची सुपीकता अनेकविध कारणांवर अवलंबून आहे. इजिप्त देशाची सुपीकता नाईल नदीच्या पुरावर व त्याच्या कालव्यावर अवलंबून आहे. तशा प्रकारची ही स्थिति-हिंदुस्थानांत मोठमोठ्या नद्या असल्यामुळे-कांहीं प्रांतांत आहे. गंगा, यमुना, सिंधु, व कृष्णा, या नद्यांच्या सभोंवतालचे प्रांत फार सुपीक आहेत; व त्यांची सुपीकता इजिप्तप्रमाणें नदीच्या पुरावर अवलंबून आहे. तसेच कांहीं भागांमध्यें ऋतुमानानें पाऊस मुबलक व निश्चितपणें पडल्यामुळे ते सुपीक झालेले आहेत. जें विशेषण सर्व वसुंधरेला लावतात तेंच विशेषण हिंदुस्थानासही अन्वर्थक आहे. कारण नैसर्गिक संपत्तिच्या दृष्टीनें हिंदुस्थान देश हा बहुरत्ना वसुंधरा याप्रमाणेंच आहे असें म्हणण्यास हरकत नाही.

 भूगर्भसंवंधीही हिंदुस्थानची स्थिती असमाधानकारक नाहीं. येथें मँगॅनीस आहे, रॉकेल आहे, सोनें आहे, तांबे आहे, लोखंड व कोळसा आहे, भूपृष्टविषयक बहुविधताही येथें आहे. तेव्हां धनोत्पाद्नाला जे गुण जमिनीत पाहिजेत ते सर्व येथें आहेत व म्हणून पूर्वकाळीं हिंदुस्थान सांपत्तिक सुधारणेच्या बऱ्याच वरच्या पायरीला गेलेले होतेव आताही भांडवल व योजक या दोन कारणांची जोड झाल्यास हिंदुस्थान युरोपांतील इंग्लंड व जर्मनी व अमेरिका या देशांशीं बरोबरी करूं शकेल यांत तिळमात्रं शंका नाहीं.


भाग चवथा.

श्रम

 अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्यें हाती घेतलेल्या व्यवसायातील आनंदा खेरीज दुस-या कोणत्या तरी हेतूनें ह्मणजे मोबदल्याच्या हेतूनें केलेला मानसिक किंवा शारीरिक व्यवसाय ह्मणजे श्रम होय. या व्याख्येनें विरंगुळ्याकरितां, विश्रांतीकरितां किंवा करमणुकीकरितां जो मानसिक अगर शारीरिक व्यवसाय केला जाती तो श्रमारवाली येत नाहीं, तसेंच ज्या व्यवसायाचा हेतु दुस-या कोणत्याही कामाला उपयोगी पडण्याचा नाहीं तोही व्यवसाय श्रमारवालों येणार नाहीं. उदाहरणार्थ, क्रिकेट, टेनिस, आठयापाटया, तालिम इत्यादि शारीरिक खेळ किंवा पत्ते, गंजिफा, सोंगट्या व बुद्धिबळे इत्यादि बैठे खेळ हे श्रम या संज्ञेखालीं येणार नाहींत. तसेंच मनुष्य फक्त स्वतःच्या करमणुकीकरितां व विरंगुळा ह्मणून सुतारीवर, बागेवर. चित्रकलेवर किंवा ललितकलेवर जो परिश्रम करती तोही श्रम या संज्ञेखालीं येणार नाहीं या श्रमांमध्यें अगदी साध्या हातकामापामून तों बुद्धिसर्वस्व लागणाच्या सर्व व्यवसायाचा अंतर्भाव होतो. जो जो माणूस मजुरी घेऊन श्रम करतो तो तो मजुरदार व त्याचा व्यवसाय ह्मणजे अर्थशास्त्रदृष्ट्या श्रम होय. आपल्या मेहेनतीबद्दल कांहींएक ठरींव मोबदला घेणारा तो मजूर, मग त्याची मेहनत मानसिक असो, किंवा शारीरिक असो. खरोखरी शारीरिक किंवा मानासक व्यवसाय हैं वर्गीकरणच बरोबर नाहीं, कारण साध्या हातकामांत सुद्धां थोडा तरी मानसिक श्रम असतो व अत्यंत बिकट अशा मानसिक श्रमांतही थोडी तरी शारीरिक मेहनत असते.
 अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांनीं श्रमाचे उत्पादक व अनुत्पादक असे दोन विभाग केलेले आहेत. या वर्गीकरणाच्या संकुचितपणामुळे अभिमत पंथ हा कांहीं आधुनिक ग्रंथकारांच्या कडक टीकेस पात्र झाला आहे. या वर्गीकरणाच्या इतिहासावरून संपति व तिचीं कारणें याबद्दलच्या कल्पनांत कसकशी उत्क्रांति होत आली आहे हें दिसून येईल. हा भेद प्रथमतः निसर्गपंथी अर्थशास्त्रकारांनीं ठरविला व तो त्यांनीं आपल्या एककंल्ली संपत्तीच्या कल्पनेवरून ठरविला. त्यांचे मतें शेतकी किंवा जमीन हैं काय तें एकटें संपत्नीची वाढ करणारें कारण. तेव्हां जमीनदार व शेतकरी हे दोन वर्गच कायते उत्पादक वर्ग. कारखानदार, व्यापारी, नोकरचाकर हे सर्व अनुत्पादक. ह्मणजे जमीनदार व शेतकरी यांच्या शिल्लक संपत्तीवर या सर्व वगचिी उपजीविका अवलंबून आहे. हे वर्ग नवीन संपत्ति उत्पन्न करीत नाहींत. येथें संपत्ति म्हणजे धान्य इतकाच संकुचित अर्थ गृहीत धरल्यासारखा दिसतो व या दृष्टीनें जमीनदार व शेतकरी, हे सगाजांतील इतर सर्व वर्गाना अन्न पुरवितात हें खरें आहे, परंतु यावरुन हे दुसरे वर्ग दुस-या प्रकारची संपत्ति उत्पन्न करीत नाहींत असें मात्र नाहीं. या अत्यंत संकुचित कल्पनेवर बसविलेला भेद टाकून देऊन अॅडम स्मिथनें त्याला थोडें विस्तृत स्वरूप दिले. अॅडाम स्मिथनें ज्या श्रमाचा परिणाम अगर फल एखाद्या टिकाऊ माळामध्यें होतो तो उत्पादक श्रम, अशी उत्पादक अमाची व्याख्या केली आहे. या व्याख्येनें जमीनदार, शेतकरी, कारखानदार, मूजूर, वगैरे सर्व वर्गाच्या लोकांचे श्रम उत्पादक ठरतात. परंतु शिक्षक, शिपाई, नावाडी, वकील, डॅक्टिर व शेवटीं घरगुती नोकर या सर्वांचे श्रम अनुत्पादक ठरतात. मिल्लने उत्पादक हें पद आणखी जास्त व्यापक केलें. त्याचे मतें शिक्षक, शिपाई व वकील यांचे श्रम अनुत्पादक म्हणता येणार नाहींत. कारण शिक्षणानें अमाची कर्तबगारी वाढते व कर्तबगार मजूर लोक जास्त संपत्ति उत्पन्न करतात. तसेंच शिपाई, वकील, न्यायाधीश हे मालमत्तेला सुरक्षितता आणून अप्रत्यक्ष रीतीनें धनाच्या उत्पत्तीस मदत करतात. म्हणून मिल्लनें उत्पादक श्रमाची व्याख्या केली आहे ती ही कीं,प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें संपत्ती उत्पन्न करण्यास मदत करणारं व्यवसाय म्हणजे उत्पादक श्रम होय. परंतु ही व्याख्या इतकी विस्तृत आहे कॉं.या व्य्स्येप्रमाणें सर्व व्यवसाय जे अर्थशास्त्राच्या श्रम या शब्दांत अंतर्भूत होतात ते सर्व उत्पादकच ठरतात. उत्पादक व अनुत्पादक हा भेद व्यर्थ होता. कारण ज्या ज्या व्यवसायाबद्दल समाजांत मनुष्याला मोबदला मिळतो तो तो व्यवसाय उत्पादक श्रमांत येतो व अनुत्पादक श्रम हा शब्दप्रयोगच मुळीं असंबद्ध होती.
 वरील विवेचनावरुन उत्पादक व अनुत्पादक ही शब्दांची जोडी किती निरनिराळ्या अर्थानें वापरली जाते हें दिसून येईल व शब्दांच्या अर्थामध्यें अशी व्यापकता व संदिग्धता उत्पन्न झाली ह्मणजे ते शब्द शास्त्रीय विवेचनाला निरुपयोगी होऊन जातात. तोच प्रकार या शब्दांचाही झाला आहे. मागील भागांत सांगितलेलीं संपत्तीच्या उत्पत्तीचीं अमूर्तकारणें व या पुढील भागांत सांगावयाचीं मूर्तकारणें यांपैकीं कोणत्याही कारणाला आस्तित्वांत आणून संपत्नीच्या उत्पादनाला मदत करणारे वर्ग ह्मणजे उत्पादक वर्ग होत व अशा वगचेि श्रम ते उत्पादक श्रम होत. अर्थात उत्पादक व अनुत्पादक या भेदाचा उपयोग सामान्यतः आपल्या श्रमानें आपलें पोट भरणारे व भिक्षेने किंवा अन्य तऱ्हेनें टुस-याच्या जीववर उपज़ीविका करणारे ऐदी लोक असे समाजाचे दीन वर्ग दाखवण्याकदे हाईल.
 आतां या श्रमाची कर्तबगारी किंवा कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवरअवलंबून आहे हैं पाहावयाचें राहिलें.
 पहिली गोष्ट आनुवंशिक गुण. या बाबतींत निरनिराळ्या देशांमधील मजुरदारांमध्यें किती तरी अंतर आहे. काम करण्याची शक्ती, राकटपणा, सामर्थ्य, हे गुण निरानराळ्या लोकांमध्यें निरनिराळ्या प्रमाणांत दिसून येतात. या भेदाचीं - कारणें शोधून काढणें हें अर्थशास्त्राचें काम नाही; परंतु हा भेद आहे व त्यामुळे निरनिराळ्या देशांच्या श्रमांत विलक्षण अंतर पडतें ही गेोष्ट अर्थशास्त्राने नमूद करावयाची आहे. राशीयन मजुरापेक्षां फ्रेंच मजूर तितक्याच वेळांत दीडपट काम करतो तर इंग्रज मजूर फ्रेंच मजुरांपेक्षांही जास्त काम करतो. या बाबतींत सर्व युरोपामध्यें इंग्रज मजुरांचा नंबर वर लागतो. व अमेरिकन मजुरांचा नंबर इंग्रज मजुराच्याही वर लागतो असे ह्मणतात.
 हिंदुस्थानांत तर हे आनुवंशिक गुण जातिभेदामुळे निरनिराळ्या जातींत अगदीं निरनिराळ्या प्रमाणानें दिसून येतात, उत्तराहिंदुस्थानांत परदेशी, पठाण वगेरे लोक शरीरबांध्यानें, सामथ्र्यर्नेि, व मजबुतीनें सर्व हिंदुस्थानांत वरिष्ठ आहेत. यामुळं हैं लोक शिपाई उत्तम बनतात, व म्हणूनच या लोकांचा भरणा हिंदुस्थानच्या सैन्यांत पुष्कळच केला जातो. निवळ मुंबई इलाख्याकडे दृष्टि दिली तरी किती तरी फरक दिसुन येतो.
घाटावरील घाटवळ लोक हे शरीरसामर्थ्याने सर्वांत वर आहेत. यामुळे सर्व मोठ्या मेहनतीचीं कामें याच लोकांचे हातांत आहेत. मुंबईतील हमालांचीं कामें, गोंदीतील कामें, स्टेशनावरलि मोठमोठे बोजे उचलण्याचीं कामें बहुधा या लोकांच्या हातीं आहेत. तोच कोंकणांतील मजूर जरी घाटीलोकांइतका शक्तिमान व मजबूत नसतो तरी पण चलाखपणांत कंटकपणांत व हुशारींत त्याचा वर नंबर लागतो. यामुळे मुंबईत घरगुती कामांत, आफीसाच्या कामांत व गिरणींतील कामांत याच लोकांचा जास्त भरणा आहे. तरी पण सुधारलेल्या देशांच्या मानानें हिंदुस्थानांतील सर्व ठिकाणचा व सर्व वंशांचा मजूरवर्ग कमी प्रतीचा आहे हें कबूल करणें भाग आहे.
 दुसरी गोष्ट मजुरांना मिळणारें खाणेंपिणें व अन्न यांवर त्यांची कार्यक्षमता अवलंबून असते. ज्या ज्या ठिकाणीं मजुरांना खाणेंपिणें भरपूर मिळून त्यांचें अन्न पौष्टिक असतें तेथें तेथें मजुरांची कार्यक्षमता जास्त असते. या बाबतींतही अमेरिकेंतील मजुरांचा नंबर सर्वांत वर लागतो. युरोपमध्यें आयर्लंडच्या मजुरांचें अन्न निःसत्व बटाट्यांचें असतें. यामुळे त्यांची कार्यक्षमता फार कमी असते. मनुष्यप्राणी याची स्थिति कांहीं अंशों एंजिनासारस्वी असते. ज्या मानानें एजिनांत कोळसा व पाणी घालावें त्या मानानें एंजिनापासून कमजास्त उष्णता व शक्ति उत्पन्न होऊं शकते, त्याचप्रमाणें मनुष्याला जास्त व पौष्टिक खायला घातलें तर त्याचे हातून काम जास्त होतें. परंतू हा क्रम कांही काळपर्यंत चालतो. एजिनच्या आटोकाट शक्तीबाहेर जर कोळसा घातला तर एंजिन एकदम फुटून जाइल, तसेच मनुष्याच्या अटोकाट पाचकशक्तीपेक्षां जर अन्न जास्त घातलें तर मनुष्याच्या जीवालाच अपाय होईल. परंतु या मर्यादेच्या आधीं जितकें जास्त अन्न तितकें जास्त काम हा नियम खरा आहे.
 हिंदुस्थानाध्यें एकंदर दारिद्य फार असल्यामुळे पुष्कळ लोकांना पोटभर व पुरेसें अन्न मिळतें किंवा नाहीं, याबद्दल शंका आहे. तेव्हां तें अन्न कमी पौष्टिक आहे किंवा जास्त पौष्टिक आहे यांची तुलना फारशी शक्य नाहीं. यामुळे येथल्या एकंदर मजूरवर्गीची कार्यक्षमता कमी . आहे; तरी अन्नाच्या पौष्टिकपणावर सामर्थ्य अवलंबून आहे हें येथेंही चांगल्या तऱ्हेनें दिसून येतें. उत्तरहिंदुस्थानांत गहूं हें सामान्य लोकांचे सुद्धां अन्न आहे. यामुळे तेथील लोक जात्या धिप्पाड, मजबूत व सामर्थ्यवान् आहेत. त्यापेक्षां ज्वारी किंवा बाजरी खाणारे लोक कमी सामर्थ्यवान् आहेत व भात खाणारे तर अगदींच कमी मजबूत आहेत. मद्रास, बंगाल व मुंबई इलाख्याचा किनारा हे सर्व भात किंवा त्यापेक्षांही कमी पौष्टिक अन्न खाणारे प्रांत आहेत यामुळे तेथला मजूरवर्ग शक्तींत पुष्कळ कमी आहे.
 मजुरांच्या कार्यक्षमतेबद्दलची तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्यकारक राहणी. जे जे लोक रोगकारक परिस्थतीत गलिच्छ तऱ्हेनें कोंदट हवेंत व लहान घरकुलांत पुष्कळजण अशा तऱ्हेनें राहतात त्या त्या लोकांमध्यें कार्यक्षमता कमी होते, हें शारीरशास्त्रानें व आरोग्यशास्त्रानें सिद्ध करून दाखविलें आहे. या बाबतीतही निरनिराळ्या देशांत निरनिराळी स्थिति आहे. हा एकंदर राहणीचा प्रश्न आहे व यामुळे येथें धार्मिक कल्पना, सामाजेिक चालीरीती, समाजांतील लोकांच्या वेडगळ समजुती व त्यांचें एकंदर ज्ञान व त्यांची सांपत्तिकस्थिति, या सर्वांवर ही गोष्ट अवलंबून आहे. परंतु या बाबतींत स्वाभाविकपणेंच नवीन वसाहतीची स्थिति बरी असते. जेथें दाट वस्तीस आहे व जेथें शहरांत राहण्याची प्रवृत्ति आह तेथें आरोग्यहारक गोष्टी फार असतात व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें यासंबंधीं बहुजनसमाजाची स्थिति सुधारण्याकरितां हजारों रुपये सार्वजनिक पैशांतून खर्च केले जातात. हिंदुस्थानांत या विषयाचें महत्व आतां कोठे थोडें थोडें लोकांच्या दृष्टोत्पत्तीस येऊ लागलें आहे.
 चवथी गोष्ट बुद्धिमत्ता व ज्ञानवत्ता. जितका जितका मजूरवर्ग हुषार तितकी तितकी त्याची कार्यक्षमता जास्त. कारण बुद्धिमान कामकऱ्यास कोणतीही कामें शिकण्यास वेळ लागत नाही; यंत्रांचा उपयोग याला लवकर करतां येतो; कच्या मालाची नासधूस त्याचे हातून कमी होते; व त्याच्या कामावर देखरेख कमी लागते. शिक्षणानें मजुरांची कार्यक्षमता वाढते हें सिद्ध झाल्यापासून सर्व सुधारलेल्या सरकारांनीं प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें केलें आहे. कारण शिक्षण हें एक सांपत्तिक प्रगतीचें प्रमुख साधन आहे, असें अनुभवानें ठरलें आहे. ज्या ज्या देशांना आपली सांपत्तिक प्रगति व्हावी असे वाटत आहे त्यांना त्यांना आपल्या देशांत शिक्षणाचा व कलाकौशल्याचा सार्वत्रिक प्रसार केल्यावांचून गत्यंतर नाही. या बाबतीत इंग्लंडमध्यें फार मागाहून जागृति झालेली दिसते. शिक्षणाचा संपत्तीच्या वाढीशी असलेला कार्यकारणभाव जर्मनी व अमेरिका यांनीं जाणून त्यांनीं आपआपल्या देशांत सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण यांचा विलक्षण प्रसार केला. म्हणून हीं दोन्ही राष्ट्रे अल्पकालांत सांपत्तिक वैभवाच्या व औद्योगिक प्रगतीच्या शिखरास पोहोंचलेल्या इंग्लंडाला मागें टाकू लागलीं आहेत. पौर्वात्य जपाननें या बाबतींत जर्मनी व अमेरिका यांचाच कित्ता गिरविला आहे व यामुळे तेथें एकदोन पिढ्यांत शिक्षणाचा इतका प्रसार झाला आहे कीं, या बाबतींत जुन्या सुधारलेल्या राष्ट्रांना मान खालीं घालण्याची पाळी आलेली आहे. हिंदुस्थानांत याही बाबतींत सुधारलेला ब्रिटिश अम्मल सुरू असून आजपर्यंत विशेष जोराचे प्रयत्न होऊं नयेत, ही दुःखाची गोष्ट आहे. तरी पण अलीकडे सरकारचें लक्ष या विषयाकडे लागत चाललें आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे व जसजसें या प्रश्नांवर जोराचें लोकमत तयार होईल, तसतसें सरकारासही जास्त जोरानें पाऊलं घडवून पडेल यांत शंका नाहीं. हिंदुस्थान सरकार हल्ली सामान्य अज्ञान व आणण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीं येणार. तरी सांपत्तिक स्थिति अक्षरशत्रूपणा पॅर्यिा म्हणजे प्राथमिक शिक्षण आहें हें जाणून् तें शिक्षण मोफत व हळूहळू सक्तीचें केल्याखेरीज हिंदुस्थानांतील श्रमाची कार्यक्षमता वाढल्याखेरीज सांपत्तिक वाढ होण्यास मोठा प्रतिरोध होईल.
 या बाबतींतील शेवटली गोष्ट म्हणजे मजुरांच्या नैतिक व सामाजिक संवयी व आकांक्षा. देशांतील मजूरलोक आनंदानें व खुषीनें काम करणारे असले व तसेंच त्यांच्यामध्यें सचेोटी, कर्तव्यदक्षता इत्यादि गुण असले ह्मणजे या सर्व गुणसमुचयानें त्यांची कार्यक्षमता वाढते.गुलामाच्या या नैतिक गुणांच्या अभावामुळे गुलामांचा श्रम अगदी कुचकामाचा ठरतो.कारण गुलामाला खुषीने काम करण्याची संवय नसते व तो चाबकाच्या भितीनें काम करतो.परंतु अशा नाखुषीनें केललें काम अर्थात फारच कमी असतें. सचोटी व कर्तव्यदक्षता हे गुण नसले म्हणज देखरेखीचा खर्च फार मोठा होतो; व त्यामुळे एकंदरींत कामाच्या दृष्टीनें खर्च फार वाढतो. हिंदुस्थानच्या मजुरदार लोकांमध्यें या गुणाचा अभावच आहे. येथल्या मजुरांमध्यें कुचरपणाचा व आळशीपणाचा अवगूण फार आहे, यामुळेच हिंदुस्थानांतील मजुरी इतकी स्वस्त आहे. कारण मजूरलोक जितके तास काम करतात त्या मानानें त्यांचे हातून काम मुळींच उरकत नाहीं. काम अळंटळं करण्याची व काम करतांना इकडे तिकडे रमण्याची त्यांना मोठी खोड आहे. यामुळे देखरेखीचा खर्च हिंदुस्थानांतील कामांवर फार वाढतो व म्हणून एकंदरींत खर्च जास्त येतो. हिंदुस्थानाइतकी स्वस्त मजुरी जगामध्यें दुस-या कोठेही नसतांना हिंदुस्थानाइतका रेलवेला दरमैलीं खर्च कोठेंच येत नाही, यावरून ही गोष्ट सिद्ध होते.

भाग पांचवा,

भांडवल,

 अर्थशास्त्रामध्यें भाडवलाच्या व्याख्यबद्दल व स्वरूपाबद्दल फार वाद माजून राहिलेला आहे. सामान्य व्यवहारांत व व्यापारांत शब्द नेहमी वापरण्यात येतो. भांडवल म्हणजे कोणत्याही धंद्याच्या सुरुवातीस लागणारा पैसा असा सामान्यतः अर्थ केला जातो; तसेंच ज्याच्या योगानें मनुष्याला वार्षिक उत्पन्न येतें तें त्या मनुष्याचें भांडवल असें गणलें जातें. हा सामान्य अर्थ अगदीं चूक आहे असें नाहीं. परंतु ज्याप्रमाणें संपत्ति म्हणजेच पैसा अशी सामान्य समजूत असते व ती कांहीं अंशी खरी असते. परंतु पैशाखेरीज संपत्तीचीं दुसरींही पुष्कळ रूपें असतात; त्याप्रमाणेंच प्रस्तुतची गोष्ट आहे. औद्योगिक समाजांत पैशाच्या रूपानें भांडवल मापतात व पुष्कळ अंशीं पैसा हा एक भांडवलाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे खरा; तरी भांडवल पैशाखेरीज दुस-याही स्वरूपाचें असतें व हीं सर्व स्वरूपें कोणतीं व त्या सर्वांमध्यें एखादा सामान्य गुण आहे किंवा नाहीं हें अर्थशास्त्रदृष्ट्या ठरवावयाचें आहे.
 भांडवलाचा मूळचा अर्थ मुद्दल असा आहे. म्हणजे सावकार जी रकम कर्जाऊ देतो ती त्याची मुद्दल रक्कम अगर भांडवल होय, व या मुदलापासून त्याला व्याजाच्या रुपानें वार्षिक उत्पन्न येतं, तेव्हां भांडवल म्हणजे वार्षिक उत्पन्न देणारी संपत्ति होय. अॅडाम स्मिथनें भांडवलाचा हृाच अर्थ धरला आहे; व हा अर्थ व्यवहारास धरुन आहे. कारण पहिली भांडवलाची कल्पना हीच दिसते. या दृष्टीनें सर्व संपत्तीचे दोन भाग होतात; ते भांडवल व उत्पन्न हे होत, व या दोहीं मिळून सर्व संपति होते. ज्या संपत्तीपासून वार्षिक उत्पन्न येतें तें भांडवल व जी संपत्ती मनुष्य ताबडतेाबच्या उपभोगास लावतो तें त्याचें उत्पन्न होय.
 परंतु संपत्तीच्या कारणात्रयींपैकीं जें भांडवल त्याचा अर्थ वरच्यापेक्षां थोडा संकुचित आहे. अर्थशास्त्रकारांच्या परिभाषेप्रमाणें जी जी पूर्वी उत्पन्न झालेली संपत्ती नवीन संपत्ती उत्पन्न करण्यास कारणीभूत होते ती ती सर्व संपत्ती भांडवल या नांवाखालीं मोडते. कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री, कच्चा माल व मजुरांस द्याव्या लागणा-या मजुरीचे पैसे या सर्वांचा धनोत्पादक भांडवलांत समावेश होतो. अर्वाचीन काळीं पेसे असले म्हणजे या सर्व गोष्टी सहज विकत घेतां येतात; म्हणून साधारण व्यवहारांत भांडवल म्हणजे पैसा असें समजलें जातें. अर्वाचीन काळीं। कोणाचाही धंदा किंवा कारखाना उभारावयाचा म्हणजे प्रथमतः पेशाच्या रूपानें भांडवल जमवावें लागतें. कारण असें भांडवल सज्ज असल्याखेरीज हल्लीच्या काळीं कांहीं चालावयाचें नाहीं. या दृष्टीनेंच " सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः ' ही म्हण प्रचारांत पडली आहे. परंतु भांडवलाचा शास्त्रांतील अर्थ म्हणजे धनोत्पादक संपत्तिसमुदाय हाच करणें इष्ट आहे.
 भांडवलाचे हे दोन प्रकार झाले. थोड्या बारकाईनें विचार केला म्हणजे आणखीही एक प्रकार दृष्टोत्पत्तीस येतो. संपत्तीचे कांहीं प्रकार अगदीं क्षणभंगुर असतात; म्हणज त्यांचा एकदां उपभोग घेतला असता ते नाश पावतात. जसें खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ. परंतु कांही उपभोगाचे पदार्थ चिरकाल टिकणारे असतात, यांना चिरस्थायी उपभोगाचे पदार्थ असें म्हणतां येईल. या पदाथापासून पुष्कळ काळपर्यंत सतत उपभोग घेतां येतो. जसें घरदार, गाडीघोडा, टिकाऊ सामानसुमान, डाग डागिने वगैरे. हे एक प्रकारचे भांडवल आहे. कारण यापासूनही वार्षिक उपभोग मिळतो. एखाद्या माणसानें ४००० रुपये ब्याकेंत ठेविले व त्याच्या व्याजांत तो भाड्याच्या घरांत राहीला काय,किंवा ४००० रुपयांचे स्वतःचे घर बांधलें काय, वास्तविक अर्थ एकच आहे. पहिल्या प्रकारांत त्याचे ४००० भांडवल असून त्याला व्याजाच्या रूपानें उत्पन्न मिळते. परंतु दुसऱ्या प्रकारांत ते भांडवल रुपयांच्या रूपांत न राहतां घराच्या रूपांत आहे. परंतु त्याला घराचा उपभोग या रूपानें वार्षिक उत्पन्न येतच आहे. तेव्हां असे टिकाऊ संपत्तीचे प्रकार म्हणजे एक भांडवलच आहे.
 वरील विवेचनावरून भांडवलाचे तीन प्रकार सिद्ध होतात. पहिलें उपभोगाचे भांडवल; दुसरें उत्पन्नाचे भांडवल; तिसरें धनोत्पादक भांड वल. धनोत्पादक भांडवल हे वार्षिक उत्पन्न देते म्हणून सर्व धनोत्पादक भांडवल उत्पन्नाच्या भांडवलांत अन्तर्भूत होते. परंतु सर्व उत्पन्नाचे भांड वल मात्र धानोत्पादक भांडवल असते असे नाही. उदाहरणार्थ, अनें बला कर्जाऊ रुपये दिले व त्याच्याबद्दल त्याची लागवडीची जमीन गहाण लावून घेतली; तर आतां अला वार्षिक उत्पन्न येऊ लागलें खरें. परंतु बचे उत्पन आतां कमी झाले. कारण त्याच्या इस्टेटींतून या कर्जाचे व्याज जाऊ लागले. येथे धनोत्पादक भांडवल होतें तितकेच राहिले. मात्र पूर्वी त्या भांडवलाचा ब हा एकटाच मालक होता; तेथे आतां अ आणि व यांमध्ये मालकी विभागून गेली इतकाच फरक झाला.
 वरील विवेचनावरून भांडवलाचे तीन प्रकार होतात. पाहिल्यामध्ये वार्षिक उत्पन्न देण्याच्या गुणाला प्राधान्य असतें. दुस-यांत नवीन धनो त्पादकता याला प्राधान्य असते;तर तिसऱ्यात उपभोगसातत्याला प्राधान्य असते. आतां या तिन्ही प्रकारच्या भांडवलांच्या कल्पनेमध्ये कोणची मूळ कल्पना सामान्य आहे याचा विचार करतांना सर्वास समान अशी एक मूळ कल्पना सांपडते व या मूळ कल्पनेप्रमाणे सर्व प्रकारच्या भांडव लाची खालील व्याख्या ठरते. ‘‘ अप्रत्यक्ष रीतीने किंवा प्रत्यक्ष रीतीनें भावी गरजा भागविण्याकरितां निराळी काढून ठेविलेली संपत्ति म्ह्णजे भांडवल होय." मग या गरजा मनुष्य आपली संपत्ति दुसऱ्यास कर्जाऊ किंवा भाड्याने देऊन येणाऱ्या उत्पनाने भागवो, अगर भावी धनोत्पादनां- तृन भागवो; अगर सतत आनंद देणाऱ्या स्थिर संपत्तीच्या मालकीने भागवो.
 भांडवलाच्या या तीन प्रकारांपैकी धनोपत्तीशी प्रत्यक्ष कर्यकारण- संबंध धनोत्पादक भांडवलाचाच आहे व अर्थशास्त्रकार ज्या वेळीं भांडवल या शब्दाचा उपयोग करतात त्या वेळी हा धनोत्पादक प्रकारच त्यांच्या डोळ्यांपुढे असतो. याच प्रकाराचे दोन पोटभेद अर्थशास्त्रकार करितात.
 धनोत्पादक भांडवल दोन तऱ्हेचे असते. एक स्थिर व एक चल. ज्या भांडवलापासून एकसारखी पुष्कळ काळपर्यंत संपत्तीची परंपरा उत्पन्न होते तें स्थिर भांडवल होय. कारखान्याची इमारत, यंत्रे, ह्त्यारे व इतर स्थायिक उपकरणे ही या सदरांत येतात. ही पुष्कळ काळपर्यंत टिक- णारी असतात व यांचेपासून एकसारखें धनोत्पादन होऊ शकते. मात्र या स्थायिक भांडवलाची होणारी मोडतोड, नासधूस यांची ; नेहमीं दुरुस्ती करीत राहिलें पाहिजे हे उघड आहे. ज्यापासून एकदांच धनोत्पादन होते तें चलभांडवल होय.कारखान्यांतला कच्चा माल,मजुरांची मजुरी व उत्पन्न केलेला पक्का माल ही सर्व 'चलभांडवल' या सदरांत येतात. एकदां एक कातड्याचा बूट, जोडा अगर पिशवी झाली म्हणजे ते भांडवल नाहींसें झाले. तसेंच मजुरांना एक मजुरी दिली म्हणजे ते भांडवल संपलें व एकदा कारखानदाराने आपला पक्का माल विकला म्हणजे त्याचे ते भांडवल संपलें.
 भांडवलासंबंधीं आणखीही पुष्कळ वादग्रस्त प्रश्न आहेत. भांडवल हें नेहेमीं श्रमाचेंच फळ असले पाहिजे किंवा काय व भांडवल या सदरांत जमीन व सृष्टीच्या इतर फुकट देणाग्या यांचा समावेश करावयाचा किंवा नाही, हे प्रश्न खरोखरी वादग्रस्त नाहीत.सामान्य व्यवहारामध्ये या सर्वांचा समावेश भांडवलांत करतात खरा; परंतु सृष्टीच्या फुकट देणग्या व विशेषतः जमीन यांचे धनोत्पादनाचे कार्य इतर भांडवलांपेक्षां इतक्या निराळ्या प्रकारचे असतें कीं, या दोहाचा एकाच नांवामध्ये समावेश करण्यापासून कांहीएक फायदा न होता उलट गोंधळ मात्र होण्याचा संभव आहे.शिवाय धनोत्पादनाचीं चार निरनिराळी कारणे सांगितल्यावर भांडवल व जमीन ही निरनिराळीं समजणेच इष्ट आहे.
 येथपर्यंत भांडवलाच्या व्याख्येचा व तत्संबंधी एकदोन आक्षेपांचा विचार झाला. परंतु भांडवलाच यथाय स्वरूप,त्याची उत्पत्ति व विशेषतः औद्योगिक प्रगतीमध्ये त्याचा कार्यभाग या गोष्टींचा जास्त स्पष्टपणें उल गडा होण्याकरितां मिल्लच्या भांडवलासंबंधींच्या प्रसिद्ध प्रमेयांचा ऊहापेहा येथें करणें जरूर आहे. या प्रमेयांच्या सत्यत्वाबद्दल अर्थशास्त्रकारांत फारच वादविवाद माजलेला आहे व आपलीं प्रमेयें वादग्रस्त आहेत हें जाणूनच मिल्लनें आपल्या प्रमेयांचें समर्थन पुष्कळ अंगांनिं निरनिराळ्या विचारसरणीनें, पुष्कळ दाखल्यांनीं व उदाहरणांनीं वाचकांस सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या सर्व स्पष्टीकरणामध्यें सत्य आणि असत्य यांचें अशा अजब तन्हेनें मिश्रण झालेलें आहे व मिल्लची शब्दयोजनाही कित्येक ठिकाणीं इतक्या घोंटाळ्याची व संदिग्ध आहे कीं, मिलल्या प्रमेयांतील सत्य व असत्य निवडून काढणें फार बिकट काम आहे. प्रथमतः उत्पत्तीचा प्रश्न सोडविण्याच्या मिषानें या प्रमेयांत मिल्लनें वांटणीचे प्रश्न हातीं घेतलेले आहेत. शिवाय या सर्व विवचनांत ' भांडवल व श्रम यांचें पूर्ण परिवर्तन ' व ' मजुरीफंड ' या नांवांचीं दोन तत्वें गृहीत धरलीं आहेत व या दोन तत्वांच्या सत्यत्वाबद्दल पुष्कळ अर्थशास्त्रकारांचा प्रतिकूल अभिप्राय पडलेला आहे. तरी पण या सर्व वादांत आतांच न पडतां मिल्लच्या प्रमेयांचा सरळ अर्थ काय आहे व त्याची सत्यता कोठपर्यंत आहे हें थोडक्यांत दाखविणें इष्ट आहे.
 मल्लचें पहिलें प्रमेय असें आहे. देशांतील उद्योगधंद्याच्या वाढीची मर्यादा देशामध्यें अस्तित्वांत असलेल्या भांडवलावर अवलंबून आहे. ह्मणजे देशांत जितकें भांडवल आहे त्याच्या सीमेपर्यंतच उद्योगधंदे देशांत वाढूं शकतील. हें प्रमेय भांडवलाच्या एका सत्यापासून तर्कानेच निष्पन्न होतें .भांडवल हें जर संपत्ती एक अवश्यक कारण आहें, तर उद्योगधंद्याची व संपत्तीची वाढ, त्याचें कारण जें भांडवल त्याच्या वाढीखेरीज होणार नाहीं हें उघड आहे. खरोखरी एक विधान दुसऱ्या विधानाच्या अर्थांतून निघतें. अर्थात् हीं दीन विधानें एकाच अर्थाचीं पर्याय विधानें आहेत. परंतु हें प्रमेय प्रतिपादन करतांना मिल्लच्या मतापुढें खुला व्यापार व संरक्षण या वादग्रस्त प्रश्नांचे मनोमय चित्र सारखें उभें होतें असें दिसतें; व संरक्षणमताचें खंडण करण्याकरितां व त्या मतांतील हेत्वाभास दाखविण्याकारतां मिल्लने हें अगदीं स्पष्ट प्रमेय नव्या शोधाप्रमाणें मोठ्या जोरानें पुढें आणिलें. उदीमपंथानें समाजामध्यें एक सामान्य समज पसरून ठेविलेला होता. तो हा कीं, उद्योगधंद्यांची वाढ करण्याचा सुलभ मार्ग म्हणजे आयात मालावर जबर जकात बसविणें हा होय. अर्थात् निवळ कायद्याच्या व नियमांच्या घटनेनें उद्योगधंदे वाढवितां येतात असा सामान्य समज झालेला होता. या समजांतील हेत्वाभास दाखवण्याकरितां मिल्लनें आपलें पहिलें प्रमेय सांगितलें आहे हें उघड दिसतें. ते हें कीं, उद्योगधंद्याची वाढ देशांत आस्तित्वांत असलेल्या भांडवलावर अवलंबून आहे व जोंपर्यंत निवळ कायद्यानें नवीन भांडवल उत्पन्न करण्याची शक्ति येत नाहीं तोंपर्यंत नुसत्या जकातीच्या कायद्याच्या हातचलावानें एका धंद्याच्या ऐवजीं दुसरा धंदा देशांत वाढवितां येईल खरा; परंतु एकंदर धंद्यांमध्यें वाढ करतां येणार नाहीं. म्हणजे मिल्लच्या लिहिण्याचा रोंख असा होता कीं, कायद्यानें उद्योगधंद्यांस कधींच उत्तेजन देतां येणार नाहीं; परंतु अर्वाचीन अर्थशास्त्रयांना हें विधान सर्वांशीं कबूल नहीं. कारण कांहीं कांहीं बाबतींत कायद्यानें सुद्धां धंद्यांची वाढ करतां येईल असें त्यांचें म्हणणें आहे. प्रजेच्या चैनीच्या खर्चावर कर बसवून त्यांतून उत्पादक धंदेही सरकारास काढतां येतील. सारांश, या एका प्रमेयावरून अप्रतिबंधव्यापार व संरक्षण ह्या वादग्रस्त प्रश्नांचा निकाल लागणार नाहीं इतकें मात्र खास. बाकी सामान्यतः मिल्लचें प्रमेय खरें आहे. कारण अवाचीन काळीं भांडवलाखेरीज कोणत्याच बाबतींत सुधारणा करतां येणार नाहीं. भांडवलावांचून शेतकी सुधारतां येणार नाहीं'; भांडवलावांचून नवे धंदे निघणार नाहीत; भांडवलावांचून खाणीही चालूं शकणार नाहींत व भांडवलावांचून कारखाने उभारले जाणार नाहींत. या दृष्टीनें मिल्लचें प्रमेय सत्य आहे.
 मिल्लचें दुसरें प्रमेय भांडवलाच्या उत्पत्तीबद्दल अगर वाढीबद्दल आहे. ' भांडवल हें काटकसरीनें सांचलेल्या शिलकेचें फळ आहे. ' या प्रमेयाचा अर्थ उघड आहे. ज्याप्रमाणें एका व्यक्तीच्या संपत्तीची वाढ, आदा व खर्च यांतील सालोसालच्या वजाबाकीवर अवलंबून आहे. त्याप्रमाणेंच राष्ट्रीय भांडवलही काटकसरीचें फळ आहे, हा या प्रमेयाचा सरळ अर्थ आहे. ज्याप्रमाणें पहिलें प्रमेय हें संरक्षणवाद्यांच्या मताचें खंडण करण्याच्या हेतूनें मिल्लनें प्रतिपादन केलें; त्याचप्रमाणें हें प्रमेय व पुढें सांगावयाचें चवथें प्रमेय हींही एका सामान्य मताच्या खंडणार्थ मिल्लनें प्रतिपादिलीं आहेत. हें सामान्य मत म्हणजे उधळेपणा हा उद्योगधंद्यास व कामगारांच्या मजुरीस उत्तेजक आहे व चिक्कूपणा हा उद्योगधंद्यांच्या आंड येणारा आहे. या समजांतील हेत्वाभास दाखविण्याकरितां मिल्लने भांडवलाची वाढ कशी होते हें या प्रमेयांत सांगितलें आहे. परंतु या प्रमेयांतील काटकसर हा शब्द् भ्रामक व संदिग्ध असल्यामुळेंच मिल्लच्या या प्रमेयाबद्दल फारच शुष्कवाद वाढला आहे. जर प्रत्येक मनुष्य आपल्या उत्पन्नांत काटकसर करुन खर्च कमी करूं लागला तर संपत्तीच वाढणार नाहीं. कारण संपत्तीच्या वाढीचें मूळ :बीज मानवी वासनांच्या वाढींत आहे. अर्थात् मनुष्याचा जितका खर्च जास्त तितकी मालास मागणी अधिक व त्याच मानानें संपत्तीच्या वाढीस उत्तेजन येईल. परंतु काटकसर याचा मिल्लनें संकचित अर्थ केला नाहीं व त्याच्या या प्रमेयांत असा संकुचित अर्थ घेतला नाहीं म्हणजे हें प्रमेय सत्यरूप आहे. काटकसर याचा अर्थ आद्याच्या बाहेर खर्च न करणें इतकाच आहे. भांडवल हें काटकसरीचें फळ आहे; ह्मणजे जे भांडवल जमवितात ते आपल्या गरजा मारतात व मोठया हालअपेष्टा सोसतात असा अर्थ नाहीं. तर देशांतील संपत्तीची उत्पत्ति व संपत्तीचा व्यय यांमधील अंतरावरच भांडवलाची वाढ अवलंबून आहे. अर्थात् संपत्तीची वाढही पुष्कळ झाली पाहिजे व खर्चही पुष्कळ झाला पाहिजे. परंतु भांडवलाची वाढ या दोहोंच्या अंतरनिंच होते हें कांहीं खोटें नाहीं. देशांमध्यें पेढ्यांसारख्या संस्था विपुल झाल्या म्हणजेसुद्धां भांडवल प्रत्यक्ष शिलकेशिवाय पेढ्यांच्या कृतीनें वाढतें हें खरें आहे. परंतु सामान्यतः मिल्लचें प्रमेय सत्य आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
 मिल्लचें तिसरें प्रमय भांडवलाच्या कार्यभागासंबंधीं आहे / भांडवल हें जरी काटकसरीचें फळ आहे तरी त्याचा सं५त्ती उत्पन्न करण्याचा कार्यभाग त्या भांडवलाच्या व्ययानेंच होती.' या प्रमेयामध्यें मिल्लनें ‘शिल्लक किंवा काटकसरीचें फल' यांमधील व निवळ चिक्कूपणाच्या सांठ्यांतील फरक दाखविला आहे. जी संपत्ति निवळ पेटींत, जमिनींत अगर भुयारांत सांठविली जाते ती खरोखरी भांडवल नव्हे. तें अनुद्भूत भांडवल आहे किंवा फार तर तें उपभोगाचें भांडवल असेल. परंतु तें धनोत्पादक भांडवल नव्हे. धनोत्पादक भांडवल बनण्यास त्याचा योग्य प्रकारें विनियोग अगर व्ययच झाला पाहिजे. धान्य जमिनींत पेरलें गेलें पाहिजे, म्हणजे धान्यस्वरूपांत त्याचा व्यय किंवा नाश झाला पाहिजे तरच त्यापासून पुष्कळ धान्य उत्पन्न होईल. तसेंच मजुरींत देण्याचें भांडवलही मजुरांच्या खाण्यापिण्यांत खर्च झालें पाहिजे, तर मजुरांच्या मेहनतीच्या रुपानें संपत्तीच्या उत्पत्तीस त्याचा उपयोग होणार. कापूस किंवा कातडें हीं त्या स्वरुपांत नाहींशीं झालींच पाहिजेत. तर त्याचें कापड अगर बूट बनणार. सारांश, भांडवलाला सततचें आस्तित्व नसर्त. तें आपल्या पुनरुत्पत्तीच्या रुपानें राहूं शकतें. फार वर्षे त्याच स्वरूपामध्यें राहणारें भांडवल अगर संपत्ति कोणत्याही देशांत फारच थोडी असते. जमीन व फार झालें तर घरेंदारें व इमारती या टिकाऊ आहेत; परंतु त्यांनासुद्धां नेहेमीं दुरुस्त ठेवाव्या लागतात. तरच त्यांच्या हातून भांडवलाचा कार्यभाग होऊं शकतो.
 मिल्लचें चवथें प्रमेय नुसतें वादग्रस्त आहे एवढेच नव्हे तर सकृद्दर्शनीं तर तें विरोधाभासात्मक आहे. * मालाला मागणी म्हणजे श्रमाला मागणी नव्हे. ” हें विधान वस्तुस्थितीला, व्यवहाराला व नेहेमीच्या अनुभवाला प्रथमदर्शनीं अगदीं विरुद्ध आहे. कारण मागणी अगर खप हा तर व्यापाराचा व उद्योगधंद्यांचा आत्मा होय असें व्यवहारज्ञ समजतो. मागणी अधिक ह्मणजे धंद्याची तेजी व मागणी कमी ह्मणजे धंद्याची मंदी, अशी व्यवहारांत म्हणच आहे. या ग्रंथाच्या विवेचनांतही वासनांची वाढ अगर मागणी हें एक संपत्तीच्या वाढीचें गूढ व अदृष्ट कारण आहे असें दाखविलें आहे. तेव्हां या सर्व वस्तुस्थितीच्या उलट असें प्रमेय मिल्लनें कां व कसें प्रतिपादन केलें हें समजण्याकरितां मिल्लच्या विचारसरणींत किती गोष्टी गृहित धरल्या आहेत हें ध्यानांत आणलें पाहिजे. पहिली गोष्ट उद्योगधंद्यांस उपयोगी पडणारें देशांतील भांडवल मर्यादित असतें; दुसरी ही कीं, उद्योगधंद्यांची वाढ भांडवलावर अवलंबून असते; तिसरी श्रमाचा सर्व मोबदला अगर मजुरदारांची सर्व मजुरी संपत्ति उत्पन्न होण्याच्या आधीं दिली जाते व दिली गेली पाहिजे; चवथी गोष्ट माल मागणारा मालाच्या किंमतीचे पैसे आगाऊ देत नाहीं अथवा आपल्या संपत्तीला भांडवलाचें रूप देत नाहीं .पांचवी गोष्ट्र देशांतील भांडवल व श्रम यांचा नाश न होतां पाहिजे त्या उद्योगधंद्यांत तीं पुनः योजितां येतात. इतक्या सर्व गोष्टी अक्षरशः ख-या व वस्तुस्थितीला धरून आहेत असें समजलें म्हणजे मिल्लच्या प्रमेयाचें प्रतिपादन करतां येतें. मिल्लच्या प्रमेयाचा अर्थ असा आहे कीं, कोणीही मनुष्य एखाद्या मालाला मागणी करण्याच्या योगानें श्रमाला मागणी करीत नाहीं ह्मणजे या त्याच्या कृत्यानें अधिक मजुरदारांना मजुरी मिळते असें नाहीं किंवा पूर्वी असलेल्या मजुरांना जास्त मजुरी मिळते असें नाहीं. तेव्हां मजुरांच्या हिताच्या दृष्टीनें प्रत्यक्ष मजुरींत पैसे खर्च करणें म्हणजेच त्यांच्या हिताची गोष्ट आहे. मागणीचा परिणाम फक्त देशांतील पूर्वीं अस्तित्वांत असलेलें भांडवल व श्रम कोणत्या धंद्यांत योजिले जावे हें ठरविण्याकडे होतो. त्याच्या योगानें श्रमाला किंवा मजुर लोकांना उत्तेजन दिलें असें होत नाहीं. उदाहरणार्थ, एखाद्या माणसानें शंभर रुपये मखमाल खरेदी करण्यांत घालविले किंवा आपल्या घराभोंवतीं बाग करण्यांत घालविले तर या पैशाच्या दोन प्रकारच्या विनियोगांत फरक काय? सामान्य समजूत अशी आहे कीं, दोहोंमध्यें फरक नाहीं. पहिल्या विनियोगांत मखमालीच्या कारखान्यांतील मजुरांस मजुरी जास्त मिळाली तर दुस-यांत बागवानास. व कामकऱ्यांस मजुरी जास्त मिळाली. परंतु मिल्लच्या मतें या दोन विनियोगांत जमीनअस्मानाचें अंतर आहे. १०० रुपयांची मखमाल घेतल्यानें मजुरांना जास्त मजुरी मिळत नाहीं, कारण मजुरांची मजुरी कारखानदारांकडून आधींच त्यांना मिळालेली असते. परंतु १०० रुपये बागेंत खर्च करण्याच्या योगानें मजूरदार लोकांच्या श्रमाला ही नवी मागणी उत्पन्न झाली, व म्हणून त्यांना उत्तेजन मिळालें. परंतु अशी शंका घेण्यांत येईल कीं, जर त्या माणसानें १०० रुपयांची मखमाल घेतली नाहीं तर कारखानदारांचें तितकेंच नुकसान होईल. व त्या योगानें मखमालीच्या कारखान्यांतील मजुरांना मजुरी कमी मिळेल. तेव्हां मकमालींत खर्च न करण्यानें या गृहस्थानें मजुरांना जास्त उत्तेजन दिलें असें होत नाहीं. परंतु याला मिल्लचें उत्तर असें आहे कीं, मखमालवाल्याचें नुकसान ती मखमाल मुळींच न खपली तर होईल. परंतु त्याचा माल एका मनुष्यानें घेण्याचें नाकारलें म्हणून पडून राहील अशांतला भाग नाहीं. मखमालवाल्याला मखमालीची मागणी हळूहळू कमी होत आहे असें दिसून आल्यास तो आपलें भांडवल दुस-या एखाद्या धंद्यांत घालील. एवंच, मालाच्या मागणीच्या फरकानें देशाचें भांडवल कमी होत नाहीं. कारण तितका माल तयार करणारें भांडवल देशांत आहेच; व एक प्रकारच्या मालाला मागणी कमी झाली तर दुसरा मागणी असलेला माल उत्पन्न करतां येईल. तेव्हां मागणीच्या कमीअधिकपणानें देशाचें नुकसान होत नाहीं. फक्त देशांतील भांडवलाची इकडून तिकडे हलवाहलव होते इतकेंच.
 या विचारसरणींत एका धंद्यामधून दुस-या धंद्यांत भांडवल व श्रम कांहीं एक नुकसान न होतां घालतां येतात असें गृहीत धरलें आहे हें स्पष्टपणें दिसेलच. परंतु ही गोष्ट वस्तुस्थितीस धरून नाहीं. एका धंद्यांतून दुस-या धंद्यांत भांडवल घालतांना बहुतेक भांडवल नाहींसें होतें. कारण प्रत्येक धंद्याची यंत्रसामुग्री अगदीं वेगवेगळी असते. तेव्हां एका धंद्याचीं यंत्रें दुस-या धंद्यास कशीं उपयोगी पडणार ? तेव्हां कोणत्याही धंद्याच्या मालाला मागणी कमी झाल्यास त्या धंद्याला उतरतीकळा लागते. तसेंच मालाला मागणी वाढली ह्मणजे संपत्ति जास्त करतां येते. कारण देशांतील पुष्कळ भांडवल निकामीं पडलेलें असतें. परंतु मागणी अगर खप याचा संपत्तीच्या वाढीस कसा उपयोग आहे हें मागें एका भागांत दाखविलेंच आहे. तरी त्याची पुन्हां येथें पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं.

 वरील प्रमेयें प्रतिपादन करण्यांत भांडवलाबद्दल दोन गोष्टींचें महत्व वाचकांस सांगण्याचा मिल्लचा हेतु होता. त्या दोन गोष्टी ह्याः पहिली भांडवल; हें संपत्तीच्या उत्पत्तीस अपरिहार्य आहे व भांडवलाची वाढ तात्कालिक उपभोगाच्या विलंबावर अवलंबून आहे.

भाग सहावा.

योजक अगर कारखानदार.

 या भागांत संपत्तीच्या उत्पत्तीच्या शेवटच्या कारणाचा विचार करावयाचा आहे. समाजाच्या व उद्योगधंद्याच्या उत्क्रांतीमध्यें हें कारण शेवटीं प्रादुर्भूत होतें. परंतु जरी तें मागाहून अस्तित्वांत येतें तरी त्याचें महत्त्व मात्र कमी नाहीं. उलट जसजसा समाज आधिभौतिक मार्गांत पुढें पाऊल टाकतो तसतसें या शेवटच्या कारणाचें महत्व अधिक वाढतें. समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्तीची उत्पत्ति बहुधा नसतेच म्हटलें तरी चालेल; व त्या वेळीं मनुष्याला आपल्या गरजा सृष्टीच्या फुकट देणग्यांनीं भागवितां येतात. म्हणजे या काळीं संपत्तीचें पहिलें कारणच प्रधानभूत असतें. पुढें त्याला मनुष्याच्या श्रमाची जोड लागते, व त्या श्रमाला थोंडेंसें प्राधान्य येतें. समाजामध्यें ज्ञानवृद्धि व संपत्तीची वृद्धि होऊन भांडवल उत्पन्न झालें म्हणजे श्रमपेक्षां भांडवलाचें पारडें वर जातें व अत्यंत सुधारलेल्या देशांत तर शेवटच्याचें म्हणजे योजकाचें अगर कारखानदाराचें महत्त्व जास्त वाढतें. कारण समाजामध्यें सृष्टीच्या शक्ति असतील; समाजांत श्रम करणारे लोकंही विपुल असतील व समाजांत इतस्ततः पडून राहिलेलें भांडवलही पुष्कळ असेल; परंतु या तीन कारणांपासून संपत्ति उत्पन्न करण्यास या सर्वांचा मिलाफ करणारा योजक पाहिजे व "योजकस्तत्र दुर्लभः" या न्यायानें योजकाची फार बाण असते. कारण अर्वाचीन काळीं आधिभौतिक शास्त्रांचे ज्ञान पुष्कळ वाढल्यामुळें व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष धंद्यांत व व्यवहारांत पुष्कळ उपयोग होऊं लागल्यामुळें प्रत्येक धंद्याला उपयोगी अशीं हजारों यंत्रें व नैसर्गिक शक्तीचीं उपकरणें प्रचारांत आलीं आहेत. यामुळें हल्लीं उद्योगधंदे घरगुती तऱ्हेचे राहिले नाहीत. तर त्यांना प्रचंड कारखान्याचें रूप आलें आहे, व हे प्रचंड कारखाने चालविणें हें एक स्वतंत्र व मह्त्वाचें उत्पादनाचें अंग झालेलें आहे.
 कारण हठींच्या काळच्या प्रचंड कारखान्यांत हजारों मजूर असतात; या सर्वांच्या कामांचें एकीकरण करणें; प्रत्येकाकडून आपापलें नेमून दिलेलें काम वेळच्या वेळीं करून घेणें; इतक्या मोठ्या मजूरवर्गाला शिस्तींत राखणें; एकंदर कारखान्यावर देखरेख करणें व सर्वांना लागेल ती विशेष माहिती देणें; इतकेंच हल्लींच्या कारखानदाराचें काम नाही; तर त्याचें कर्तव्य यापेक्षांही जबाबदारीचें आहे; त्याला सर्व संपत्तीच्या उत्पादनाची जबाबदारी अंगावर घ्यावी लागते; कोणचा माल कारखान्यांत काढावा; तो कोणत्या नमुन्याचा काढावा; तो किती प्रमाणांत काढावा; व कोणत्या वेळीं काढावा; तसेंच तो कोणास व कोणत्या दरानें विकावा; पैसे वसूल कसे करावे; कच्चा माल खरेदी कोठें, कसा व केव्हां करावा; मालाला गि-हाइकी कशी मिळवावी; या सर्व गोष्टी कारखानदारालाच कराव्या लागतात व हीं सर्व कामें उत्तम तऱ्हेनें पार पडण्यास मनुष्यामधल्या सर्वोत्तम मानसिक शक्ति लागतात. पूर्वींच्या काळच्या सैन्यांत सेनापतीला इतकें महत्व नव्हतें; प्रत्येक शिपायाच्या शौर्यावर लढाईचा जयापजय अवलंबून असे; परंतु अर्वाचीन काळीं सैन्यांतील व्यक्तीचें महत्व कमी झालें आहे; जयापजय हे सेनापतीच्या हुशारीवर व सर्व सैन्याच्या हालचाली धोरणानें करविण्यावर आहे; कारण शिकलेलें सैन्य ह्मणजे कळसूत्री बाहुल्याप्रमाणें आहे; सूत्रधार जिकडे नेईल तिकडे तें जाणार. हीच स्थिति हल्लींच्या उद्योगधंद्याची आहे. ज्याप्रमाणें हल्लींच्या काळीं सेनापती व सेनानायक यांच्याखेरीज सैन्याचें क्षणभरसुद्धां चालावयाचें नाहीं; त्याप्रमाणेंच हल्लींच्या काळीं उद्योगधंद्यांतही नायक व धंद्याचा सेनापती यांखेरीज चालावयाचें नाहीं व असे नायक ह्मणजे कारखानदार अगर योजक होत. संपत्तीच्या उत्पत्तीची सव जबाबदारी यांच्यावरच असते. धंद्यांत नफा होणें व यश येणें हें त्यांच्याच कर्तबगारीवर अवलंबून असतें. हल्लींच्या काळी अशीं पुष्कळ उदाहरणें दृष्टीस पडतात कीं, एखादा कर्तृत्ववान् माणूस एखाद्या गांवच्या धंद्याला ऊर्जितावस्था आणतो. परंतु त्याच्या पश्चात् भांडवल, मजुरी व इतर सर्व साहित्य तयार असतांना धंदा बुडतो. कारण त्याच्या मुलाच्या अंगांत योजकाचे गुण असतातच असा नेम नाहीं, व अयोग्य माणसाच्या हातांत धंदा गेल्यामुळें त्या धंद्याचें मातेरें होतें.
 हिंंदुस्थानाकडे पाहिलें तर या शेवटच्यां वर्गाची हिंदुस्थानांत फारच उणीव आहे असें दिसून येईल. हिंंदुस्थान हा देश सुपीक आहे; सृष्टीच्या नैसर्गिक शक्ति येथें मुबलक आहेत. मजूरवर्ग तर हवा तेवढा आहे. भांडवल मात्र पुष्कळ कमी आहे. परंतु योजक अगर कारखानंदार त्यापेक्षांही दुर्मिळ आहेत. म्हणूनच हिंदुस्थान देश उद्योगधंद्यांत सुधारलल्या राष्ट्रांच्या इतका मागें आहे. हल्लींच्या काळींं संपत्तीच्या वाढीस योजकांचें केवढें साहाय्य होतें याचें हिंदुस्थानांतील ताजें उदाहरण म्हणजे केै० टाटासाहेबांचा मध्यप्रांतांतील प्रचंड लोखंडाचा कारखाना होय. हा कारखाना सुरू झाला म्हणजे हिंदुस्थानची लोखंडाची बरीचशी मागणी या एका कारखान्यानें भागविली जाईल. यावरून त्याचें अवाढव्यत्व लक्षांत येईल. परंतु एवढा मोठा कारखाना कै. टाष्ट्रा यांच्यासारखा योजक मिळाला म्हणूनच अस्तित्वांत आला; नाहीं तर जमीनींत लोखंड होतें; मजूर कामाखेरीज देशांत मरत होते व भांडवलही नव्हतें असें नाहीं. परंतु या सर्व सामग्रीला एकत्र आणणें, कारखान्याची जुळवाजुळव करणें, कारखाना यशस्वी होईल अशां भरंवशावर प्रथमतः लाखों रुपये खर्च करून प्रयोग करून माहिती मिळविणें व प्रथमपासून कारखान्याची जबाबदारी अंगावर घेणें इतक्या गोष्टी करणारा दुर्लभ योजक मिळाला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ति उत्पन्न करणारा एक कारखाना निघाला. केै० टाटाशेटजींंच्या कल्पकतेचें व योजकतेचें दुसरें उदाहरण म्हणजे खंडाळ्याच्या घाटांतील वीज उत्पन्न करणा-या कारखान्याची कल्पना. हिला अजून मूर्तस्वरूप आालें नाहीं हें खरें, तरी पण हा कारखाना झाला म्हणजे तोही योजकाच्या श्रमाचें व कल्पकतेचेंच मोठें स्मारक होईल. वरील विवेचनावरून अर्वाचीनकाळींं संपत्तीच्या उत्पादनाच्या कामांत कारखानदाराचा केवढा मोठा कार्यभाग आहे हें सहज दिसून येईल.
 यासंबंधींं आणखैीही एका कारखान्याचें उदाहरण घेण्यासारखें आहे. तें म्हणजे अलेंबिक केमीकलवर्कचें होय.हा कारखाना केै० टाटाशेटजींच्या वर निर्दिष्ट केलेल्या कारखान्याइतका प्रचंड नसल्यामुळें तो तितका चमत्कृतिजनक नाहीं. तरी पण या कारखान्यामध्यें सुद्धां योजकाचें महत्व दिसून येतें. पश्र्चिम हिंदुस्थानांत तरी असला कारखाना अगदीं नवीन आहे यांत शंका नाहीं. या कारखान्यांत हरत-हेच्या वनस्पतींंचे अर्क व सुगंधी फुलांचींं अत्तरें अर्वाचीन रासायनिक पद्धतीनें काढण्यांत येतात. येथेंही कच्चा माल, मजूरवर्ग, वगैरे इतर साधनें असतांना असा कारखाना गेल्या पन्नास वर्षांत निघूं शकला नाहींं. कारण शास्त्रीय ज्ञान असलेल्या योजकाची वाण. परंतु या कारखान्यास केै० कोटीभास्करांसारखे उत्तम रसायन पदवीधर लाधले व त्यांच्या परिश्रमानें हा कारखाना ऊर्जितावस्थेप्रत पावला. परंतु देशाच्या दुर्दैवानें रा. कोटीभास्कर यांस काळानें अकालीं या जगांतून ओढून नेलें व पुन्हां असा योजक मिळून कारखाना उत्तम तऱ्हेनें चालतो किंवा नाहीं, अशी लोकांना व मालकांना भीति उत्पन्न केली.
 परंतु हें काम किती अवघड असलें व त्याला केवढ्याही मोठ्या मानसिक शक्ति लागत असल्या तरी योजक अगर कारखानदार याचा संपत्तीच्या उत्पत्तीमधला कार्यभाग 'श्रम' या कारणांत येतोच; कारण श्रमाची जी व्याख्या दिली आहे ती इतकी व्यापक आहे कीं, त्यामध्यें सर्व प्रकारच्या श्रमांचा अन्तर्भाव होतो; निवळ सांगकाम्या रोजमजुराच्या मेहनतीपासून तों श्रेष्ठ मानसिक गुणांनीं युक्त अशा कामगाराच्या श्रमापर्यंत सर्व अर्थशास्त्रदृष्ट्या 'श्रम' च होत; तर मग योजक व कारखानदार यांना संपत्तीच्या उत्पत्तीचें स्वतंत्र व निराळें कारण मानण्याचें काय कारण असा एक आक्षेप वरील विवेचनावर येईल. त्याला उत्तर असें आहे कींं, मजुरांची अगदींं खालपासून वरच्या दर्जापर्यंत एक चढती माला झाली तरी या सर्व चढत्यामालेमध्यें व कारखानदारामध्यें जातीचा किंवा प्रकाराचा भेद आहे. सर्व मजूर कांहीं एक ठरींव मुशाहिरा घेऊन कांहीं एक ठरींव काम करतात. म्हणजे त्यांच्या श्रमाचा मोबदला करारानें अगर रुढीनें ठरलेला असतो. हे लोक संपत्तींच्या उत्पादनाला मदत करतात; परंतु हे संपत्त्युत्पादनाच्या साधनवर्गामध्यें येतात; हे संपत्तीच्या उत्पादनाची जबाबदारी अंगावर घेत नाहींत. आतां कारखानदाराचा हा विशेष आहे कीं, तो कोणत्या तरी तऱ्हेची संपत्ति करण्याची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतो व जबाबदारीबरोबर धोकाही येतोच. कारण अर्वाचीन काळींं संपत्त्युत्पादन हें मनुष्य स्नत:च्या गरजा भागविण्याकरितां कधींच करीत नाहीं. कारण तो जी संपति उत्पन्न करतो ती इतक्या मोठ्या प्रमाणावर करतो कीं त्याची स्वतःची गरज किंवा मागणी म्हणजे 'दुर्यामे खसखस' या मासल्याची असते. अर्थात ही सर्व संपनि विकून किंवा तिला गि-हाईक शोधून काढून ती संपति योग्य किंमतीला विकून झाल्यावर व बाकीच्या संपत्तीच्या उत्पादक वर्गीच्या मोबदल्याची भरपाई झाल्यावर जें कांहीं राहील तो त्याचा नफा असतो. म्हणजे मजुराप्रमाणें कारखानदाराचा मोबदला ठरलेला नसतो; त्या मोबदल्यामध्यें धोक्याचा अंश सदोदित आस्तित्वांत असतो. त्यामुळेच कारखानदाराचें काम इतकें कठिण असतें. सर्व कारखाना सुयंत्रित चालवून होतां होईल तितकी काटकसर करून जर तो कारखाना चालवील तर त्याला नफा अगर फायदा मिळेल, नाहीं तर त्याचा कारखाना आंतबट्ट्याचा होईल. म्हणून कारखानदाराचें इतकें महृत्व आहे. कमी कर्तृत्ववान् मनुष्याच्या हातीं जर कारखाना जाईल तर तो संपत्ति वाढविण्याच्या साधनीभूत न होतां संपतिनाशाचें मात्र कारण होईल. समाजाच्या बाल्यावस्थेंत व उद्योगधंदे घरगुती स्थितींत असतांना प्रत्येक उद्यागी मनुष्य कारखानदारच असतो. या स्थितीत मजूर व कारखानदार यांचें पृथकरण झालेलें नसतें. परंतु जसजशी समाजाची अधिभौतिक प्रगति होते तसतसा मजुरापासून कारखानदाराचा वर्ग भिन्न व. स्वतंत्र होतो.

 येथें संपत्तीच्या मूर्त कारणांचा विचार पुरा झाला. या कारणांपैकीं पहिलिं तीन कारणें साधनासारखीं अहित, तर शवटचें साधकासारखें आहे. म्हणजे पहिलीं तीन साधनें एकत्र आणून त्यांचेपासून प्रत्यक्ष संपत्ति उत्पन्न करणें हें साधकाचें काम अहि. परंतु हीं साधनें एकत्र आणण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा अगर पद्धति आहेत व त्यांवर संपनीच्या वाढीचा कमीअधिकपणा अवलंबून आहे. तेव्हां आतां त्या पद्धतीचें विवेचन करणें ओघोनेंच प्राप्त होतें. तरी त्या विवेचनास पुढील भागांत प्रारंभ करूं.


भाग सातवा.

श्रमविभाग.

 अॅडम स्मिथनें आपल्या अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा प्रारंभ श्रमविभागाच्या तत्त्वाच्या विवेचनापासून केला आहे. कारण संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा विचार करतांना हें तत्व त्याचे ध्यानांत प्रथम आलें व त्याचा हा एक मोठा शोधच होता. शिवाय अर्थशास्त्रांतील आपल्यापूर्वी झालेल्या पंथापासून आपल्या पंथाचा निराळेपणा पुढें मांडण्याकरिता श्रम व श्रमविभागाचें तत्व यांनाच अॅडम स्मिथनें प्राधान्य दिले. त्याच्या वेळच्या दुसऱ्या ग्रंथकारांनीं व त्याच्यामागून झालेल्या ग्रंथकारांनीं या तत्त्वाला दुसरा पारिभाषिक शब्द योजण्याचा प्रयत्न केला. परंतु या तत्वाला अँडाम स्मिथनें दिलेलें 'श्रमविभाग' हेंच नांव सर्वसंमत होऊन प्रचारांत आले.
 'श्रमविभाग' या पदाचा अंडाम स्मिथनें संकुचितार्थानें उपयोग केलेला नाहीं, तर त्यानें तें पद फार व्यापक अर्थानें योजलेलें आहे. पुढील ग्रंथकारांनीं ज्याला श्रमसंयोग म्हटलें आहे त्याचाही अन्तर्भाव श्रमविभाग या व्यापक पदांत त्यानें केलेला आहे.
 'श्रमविभाग' या तत्वाचीं दोन अंगें आहेत. एक श्रमविभाग (सकुंचित अर्थाने) व दुसरें श्रमसंयोग; हीं दोन अंगे परस्परावलंबी व परस्परपूरक अशीच आहेत. एकाचा जितका प्रसार अगर विकास होतो तितकाच दुसऱ्याचाही होतो हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
 संकुचित अर्थाच्या श्रमविभागाचे तीन पोटभाग होतात; एक सामाजिक श्रमविभाग, दुसरा औद्योगिक श्रमविभाग व तिसरा स्थानिक श्रमविभाग.
 सामाजिक श्रमविभागाचें तत्व समाजाच्या प्रारंभापासून अमलांत येतें. मनुष्याच्या अगदीं रानटी स्थितींत प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा आपण भागवीत असतो. शिकार आपण करावयाची; बाण व तिरकमठा आपणच तयार करावयाचा; मासे आपले आपणच धरावयाचे व जाळेंही आपणच करावयाचें; झोंपडीही आपणच बांधावयाची व थंडी निवारण करण्याकरितां कातडींही आपणच तयार करावयाचीं व आपण मिळवून आणलेल्या संपत्तीचें संरक्षण आपणच करावयाचें; अशा बहुविध प्रकारचा प्राथमिक स्थितींतील माणसाचा व्यवसाय असतो. परंतु या स्थितींतही बायका व पुरुष यांच्या कामांमध्यें पृथक्करण झालेलें असतेंच.घरातली कामें बायकांचीं व बाहेरचीं कामें पुरुषांची, हा पहिला श्रमविभाग होय. मनुष्य गुरेंढोरे बाळगून आपली उपजीविका करून राहूं लागल्यावर तर हा श्रमविभाग जास्तच दृढ होतो. दुहितृ हा संस्कृत शब्द या काळाचा द्योतक आहे. त्या काळीं मुलीचें काम दूध काढण्याचें होतें असें दिसतें. म्हणून या कामावरून ' दुहिता ' ' दूध काढणारी ' ह्मणजे मुलगी असा पुढें अर्थ झाला. परंतु पुढें मनुष्याच्या असें अनुभवास आलें कीं, एका माणसानें एकाच कामांत आपला सर्व वेळ व सर्व सामर्थ्य खर्च करणें हें त्याच्या व समाजाच्या दृष्टीनेंही फायद्याचें आहे. कारण या योगानें हीं कामें चांगलीं होऊन सगळ्यांच्या गरजा जास्त सुलभ रीतीनें भागविल्या जातात. अर्थात धंद्याचा हा श्रमविभाग समाजाच्या वाढीस व सुखास अत्यंत अवश्य अहे असें दिसून येतें. प्लेटोने हैंच श्रमविभागाचें तत्त्व समाजाच्या उत्पत्तीचें कारण म्हणुन दिलें आहे. धंद्याचें पृथक्करण हे तत्वही आर्यलोकांच्या जातिभेदाच्या मूळाशीं आहे. समाजाचे चार वर्ण हे मुख्य धंद्याचे पृथक्करण. एका वर्गानें समाजाच्या संरक्षणाचें काम हातीं घ्यावे एकाने समाजाचा धार्मिक व ज्ञानविषयक कार्यभाग हाती घ्यावा; राहिलेल्यांनी वरील तिन्ही वर्गांची सेवाचाकरी करून त्यांना आपआपल्या धंद्यांत पूर्ण लक्ष घालण्यास फुरसत द्यावी; हे चार मुख्य धंदे मनुष्यानें आपआपल्या गुणा प्रमाणें करावे. ही वर्णव्यवस्थेची कल्पना व उपपत्ति ह्मणजे श्रमविभागाचेच तत्व होय. या व्यवस्थेचें पुढें औयोगिक स्वरूप गौण हेऊन त्याच्या धार्मिक व सामाजिक स्वरूपाला प्राधान्य आलें ही गोष्ट निराळी. तेव्हां समाजाच्या गरजा वाढतात तसतसे निरानराळे धंदे वाढतात, व हे स्वतंत्र धंदे करणा-या लोकांचे तितके निरनिराळे वर्ग होतात. हें अमविभागाचें तत्त्व समाजाला व्यवस्थित स्वरूप देतें. इतकेंच नव्हे तर प्रत्येक मनुष्य आपआपल्या गुणानुरूप एक काम सदोदित करू लागला ह्मणजे त्याचें कौशल्य वाढतें. त्याला पुष्कळ लोकांच्या गरजा चांगल्या तहेनें भागवितां येतात व समाजांत कलाकौशल्य व हस्तकौशल्य यांची फार वाढ हेोते व त्यायोगें संपत्नीही पुष्कळच वाढते.
 ज्याच्या योगानें संपत्तीचीं वरच्यापेक्षांही जास्त विलक्षण वाढ होते तो श्रमविभाग ह्मणजे औद्योगिक श्रमविभाग होय. यामध्यें एका धंद्यांतील निरनिराळ्या कृतींचे पृथक्करण केलें जातें. याचें इतिहासप्रसिद्ध उदाहरण ह्मणजे अॅडाम स्मिथनें दिलेलें टांचण्यांच्या कारखान्याचे उदाहरण होय. एक लोहार जर दिवसाचे दहा बारा तास काम करून टांचण्या करूं लागला तर त्याला एका दिवसांत २०/२५ टांचण्या होणें मुष्किलीचें होईल. परंतु येथें श्रमविभागाचें तत्व अमलांत आणलें म्हणजे १० कामगार एका दिवसांत हजारों टांचण्या करूं शकतील. कारण टांचणी करण्याच्या सर्व व्यापारांपैकी एकच कृति एक मनुष्यू करतो व यामुळं काम जलद व सुबक होतें. एक मनुष्य तार कापतो; एक तीओढतो; एक नेढें तयार करतो; एक नेढें बसवितो; व एक त्याला पाणी देतो व शेवटी एक टांचण्या कागदांत हारीनें लावतो. याप्रमाणे तारं तुष्टण्यापासून तों टांचण्यांचीं बिंडोळीं बनेपर्यंत सारखा क्रम चालतो, हिदुस्थानांत टांचण्यांचा कारखाना पाहाण्यांत येण्याचा संभव नाही. म्हणुनु आपल्या इकडील नेहमींच्या व्यवहारांतील एका पदार्थांचे उदाहरणही येथे उपयोगीं पडेल. आपण जेवण्याला पितळी वाट्या घेतों. या हल्ली कारखान्यांत यंत्राच्या साहाय्यानें करतात, व त्या किती जलद होतात हें कारखाना प्रत्यक्ष पाहिल्यावांचून ध्यानांत येणार नाहीं. येथें सर्व काम यंत्रानेंच होतें. प्रथमतः एक मनुष्य पितळेच्या पत्र्याचे, वाट्या जेवढ्या पाहिजे असतील तितक्या रुंदीचे तुकडे यंत्रानें पाडतो; हे तुकडे घेऊन दुस-या यंत्रानें दुसरा मजूर त्याचे चौकोनी तुकडे करतो.तिसरा मजूर तुकडे सारखे जुळून चवथ्या मजुराजवळ देतो.तो तिसऱ्या यंत्राने चौकोनी तुकड्यांचे वर्तुळ तुकडे बनवितो. पुढे हे वर्तुळ तुकडे चवथ्या यंत्रामध्यें घालूंनें दाबानें त्याला वाटीचा आकार एक मजूर आणतो. येथें ओबडधोबड वाटी तयार होते. पुढें ही वाटी एका यंत्राला लावून् तिची कडा साफ व गुळगुळीत केली जाते. वाटी दाबतांना पत्र्याल्या जो खडबडीतपणा आलेला असतो तो एका यंत्रानें साफ केला जातो व शेवटीं ही वाटी चरकावर धरून तिला पालिश आणिले जातें. पत्र्यापासून याप्रमाणें वाटी तयार होण्यास फक्त आठ कृति लागतात व या सर्व यंत्रानें होत असल्यामुळे अत्यंत जलद होतात. यामुळे हीं आठ माणसें एका दिवसति हजारों वाटया तयार करूं शकतात. एकएकटा तांबट या वाट्या करावयास बसला तर त्याच्यानें पांच पंचवीस वाट्या सबंध दिवसांत होण्याची मारामार पडेल. परंतु आठ तांबट जर साध्या हातानें काम करूं लागले तरी त्यांच्या भ्रमविभागानें पूर्वीपेक्षां किती तरी पट काम होईल. दुसरें, आपल्या इकडील श्रमविभागाचें नेहमींचें उदाहरण ह्मणजे गवताच्या गंजी रचण्याचें होय. येथेंही प्रत्येक कामकरी जर एकटा काम करूं लागला तर त्याचे हातून फारच थेडे काम होईल. परंतु गंजी रचतांना मजूर हाताहाताच्या अंतरावर शिड्यांवर हारीनें बसतात व गवताची पेंढी एकाच्या हातून दुस-याच्या हातीं याप्रमाणें काम चालतें. हें काम इतके जलद चालतें कीं, दहा वीस मजूर डोंगराएवढाल्या गंजी हां हां ह्मणतां घालू शकतात. या उदाहरणांत श्रमविभाग व श्रमसंयोग हीं दोन्हींही तत्वें दिसून येतात. गंज रचली जाण्यांत सर्व मजुरांचे श्रमाचा संयोग व्हावा लागतो. परंतु श्रमविभागाच्या रूपानें संयोग झाला ह्मणजे काम फार जलद होतें व तें चांगलेंही होतें.
 संपत्तीच्या उत्पादनाच्या बाबतींत या तत्वाचे फायदे खालील होत.
 पहिला फायदा म्हणजे कामदाराच्या कौशल्याची वाढ हा होय.मअनुष्य तेच तेच काम बारमहा करीत असला ह्मणजे त्याची हातचलाखी विलक्षण वाढते ' सवयीनें पूर्णता येते.' या म्हणीचा हाच अर्थ आहे. रेलावेवरील टेलिग्राफ सिग्नलच्या कामाकडे पाहिलें म्हणजे संवयीनें किती जूलद काम करतां येतें याचा उत्तम प्रत्यय येतो. सिमलर लोक आपण जितक्या जलद बोलतों तितक्या जलद बहुतेक तारा देऊं शकतात .तसेंच संवयीने बाजुच्या पेटीवाल्याला कती विलक्षणहस्तचापल्य येते हे पाहून नेहेमीं सराफाचा धंदा करणाराला रुपये किती जलद मोजतां येतात हें पाहून नवशिक्या माणसाला विलक्षण नवल वाटतें.
सारांश, सरावानें मनुष्याला काम चांगलें करतां येऊन तें लवकरही करतां येतें. ह्मणजे संपत्तीच्या गुणांत व प्रमाणात अशी दुहेरी वाढ होते.
 दुसरा फायदा-एका कृत्यापासून दुस-या कृत्याला जातांना फुकट जाणारा वेळ वांचतो. जेव्हां एक कामदार एखाद्या वस्तूच्या उत्पादनांतील सर्व क्रिया एकटाच करतो त्या वेळीं इकडून तिकडे जाण्यांत हीं हत्यारें टाकून दुसरीं घेण्यांत कितीतरी वेळ जातो. शिवाय येथें मानसिक शास्त्रांतलें एक तत्व लागू पडते. एका कामापासून दुस-या कामांत मन गुंतविण्यास थोडा काळ जातो. यामुळे या नव्या कामांत प्रथमतः मन लागत नाहीं व मन लागल्याखेरीज काम चांगलें व जलद वठत नाहीं हें उघड आहे. परंतु मनुष्य एकच काम करीत असला ह्मणजे त्याचें एकाग्र चित्त लागतें व काम जलद उठतें.
 श्रमविभागाचा तिसरा फायदा ह्मणजे त्याच्या योगानें श्रम वांचविणा-या यंत्राचा शोध लागतो. मनुष्य एक काम एकसारखे करीत असला म्हणजे कामांतील सर्व खुब्या त्याच्या ध्यानांत येतात व यामुळे हत्याराच्या व यंत्राच्यामधील दोष लक्षांत येऊन नवीन शोध लागण्याचा संभव असतो व असलेल्या यंत्राची सुधारणा होते. अर्वाचीन काळीं मोठमोठे शोध आधिभौतिकशास्त्रज्ञांनीं किंवा शाखांचीं तत्वें माहीत असणारांनीं केले आहेत हें खरें. तरी पण त्या शोधांमध्यें कामक-यांनीं वारंवार सुधारणा घडवून आणून त्या शोधांची उपयुक्तता वाढविली आहे यांत शंका नाहीं. अँँडाम स्मिथनें श्रमविभागाचे हे तीन प्रमुख फायदे सांगितले आहेत. दुसन्या फायद्याबद्दल मिल्लवगैरेंनीं प्रतिकूल टीका केली आहे. त्यांचें ह्मणणें एकसारखें एकच काम केलें म्हणजे तिकडे मन उत्तम लागतें हें सर्वस्वी खरें नाहीं. कामाच्या अशा एकतानतेने मन उलट त्या गोष्टीकडे लागत नाहीं व क्षणोक्षणीं नवें नवें काम करणारा मनुष्य केव्हां केव्हां चलाख व ताज्या मनाचा राहू शकतो. हें खाणावळींतील किंवा दुकानांतील नोकरांच्या उदाहरणांवरून दिसून येईल. परंतु अॅडाम स्मिथचें म्हणणें सामान्यतः खरें आहे; व श्रमविभागानें वेळाचा पुष्कळ फायदा होऊन काम जलद होऊं लागतें हैं कांहीं खोटें नाहीं आतां मानसिक विकासाच्या दृष्टीनें एका मनुष्यानें सतत एकच काम करीत राहणें चांगलें किंवा बाईट हा वादग्रस्त प्रश्न असेल, परंतु त्याचा येथें विचार करण्याची जरूरी नाहीं.  पुढील ग्रंथकर्त्यांनीं श्रमविभागाचे आणखीही दोन तीन फायदे दाखविले आहेत.
 श्रमवभागाच्या योगानें काम शिकविण्याचा वेळ पुष्कळ कमी होता. एखादा सर्व धंदा शिकावयाचा असल्यास किंवा पुष्कळ धंदे शिकावयाचे असल्यास किती तरी वर्षे शिक्षणांत व उमेदवारीत घालवावीं लागतात. परंतु जेथें एखाद्या धंद्यांतील एखादी कृतीच शिकावयाची असत तेथें फारदिवस शिक्षण व फार दिवसांची उमेदवारी लागत नाहीं.
 श्रमविभागाचे योगानें कामदारांचें वर्गीकरण करता येऊन प्रत्येकाला आपआपल्या शक्तीप्रमाणें, कौशल्याप्रमाणें व इतर गुणांप्रमाणें काम करतां येऊन त्या त्या प्रमाणें कमीअधिक मोबदला मिळवितां येतो. जेव्हां एकाच मनुष्याला एखादा सबंध माल तयार करावा लागतो त्या वेळीं त्यांतल्या कांहीं कृति सोप्या व कांहीं कमी श्रमाच्या असल्यामुळं व कांहीं जास्त कुशलतेच्या असल्यामुळे असा माल तयार करण्यास सर्वांत कुशल कामदार नेमावा लागतो; व याच कामगाराला कमी कुशलतेच्या कृति कराव्या लागतात व त्याची मजुरी मात्र जास्त कुशलतेच्या कामाप्रमाणें द्यावी लागते. यामुळे सर्व मालाला खर्च जास्त येतो. परंतु श्रमविभागाचें तत्व अमलांत आल्यानें कुशल कामगाराला त्याच्या गुणाप्रमाणें मजुरी मिळून शिवाय माल स्वस्तच पडतो. श्रमविभागाच्या तत्वामुळे अर्वाचीन काळीं बायकांच्या व मुलांच्या कामाला विशेष मागणी उत्पन्न झालेली आहे. जि कामें फार मेहनतीचीं नाहीत अशा कामाला पुरुष कामगार लावण्याची गरज नाही. श्रमविभागाच्या तत्वानें थोडेंसें शारीरिक व्यंग असलेला माणूसही काम करूं शकतो व त्याच्या श्रमाला किंमत येते वजास्त कौशल्याच्या माणसाला आपला सर्व वेळ जास्त कौशल्याच्या कामांत खर्च करता येऊन मजुरी जास्त मिळविता येते .
 शेवटचा फायदा म्हणजे श्रमविभागाच्या योगानें धंद्यामध्ये यंत्राचे साहाय्य हवें तितकें घेतां येतें खरोखरी यंत्राची वाढ व श्रमविभाग या परस्परावलंबी गोष्टी आहेत. एखादा नवा शोध लागला म्हणजे तितके कम यंत्रांनीं होऊं लागतें व तें यंत्र चालविण्यास एक मनुष्य लागू लागतो व श्रमविभाग जास्त करतां येतो व श्रमविभाग जास्त झाला ह्मणजे यंत्राची वाढ अगर सुधारणा होते.
 हा श्रमविभाग जसा जसा वाढत जातो त्या मानानेंच श्रमसंयोगही वाढत जातो. हीं दोन तत्वें परस्परारावलंबी आहेत अगर एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत असें ह्मटलें तरी चालल. हा संयोगही दोन तऱ्हेचा आहे. एक साधा व दुसरा संमिश्र, एक काम करण्याकरितां जेव्हां एकाच जातीचा पुष्कळ श्रम एकत्र आणावा लागतो तेव्हां त्याला साधा श्रमसंयोग ह्मणतात. ज्याप्रमाणें एखादं मोठं जड ओझें उचलण्यास दहावीस मजुरांचे श्रम एकसमयावच्छेर्देकरून एकवटावे लागतात. घर बांधण्यास पुष्कळ गंवडी, पुष्कळ सुतार, पुष्कळ मजूर लागतात, संमिश्र श्रमसंयोग ह्मणजे एक काम करण्यास जेथें निरनिराळ्या जातींच्या पुष्कळ श्रमांचा संयोग लागतो. ही श्रमविभागाचीच दुसरी बाजू आहे. एक टांचणी किंवा एक वाटी करण्यास दहाबारा निरनिराळ्या कारागिरांचे निरनिराळ्या प्रकारचे श्रम लागतात. हें श्रमसंयोगाचें तत्व सर्व समाजभर पसरलेलें आहे व जसजसा समाज सुधारत जातो तसतसा हा संमिश्रश्रमसंयोग वाढतच जातो. कित्येक क्रमिक पुस्तकांतून दिलेल्या " आश्चर्यकारक लाडू " च्या गोष्टींत हेंच तत्व गोवलेलं आहे. या उदाहरणावरून साधा श्रमसंयोग व संमिश्रश्रमसंयोग यांमधला भेदही चांगला व्यक्त होतो. एका गृहस्थानें आपल्या लहान मुलांना सांगितलें कीं, सणाच्या दिवशीं मी तुह्मांला हजार लोकांनीं केलेला लाडू नजर देणार आहे. ‘हजार लोकांनीं केलेला लाडू ' हे शब्द ऐकतांच मुलांना वाटलें कीं, हा लाडू ह्मणजे डोंगराएवढा किंवा निदान टेकडीएवढा तरी मोठा असला पाहिजे. म्हणून मुलें या लाडुची मार्गप्रतीक्षा मोठ्या उत्कंठेनें करीत बसली. सणाच्या दिवशीं त्या गृहस्थानें नेहमींच्या आकाराचे नेहमींसारखेंच दिसण्यांत असे लाडू मुलांना नजर केले. मुलें ते लाडू घेऊन आश्चर्यचकित झाली. तेव्हां त्या गृहस्थानें मुलांस पाठीपेन्सिल घेण्यास सांगून ते लाडू बनविण्यांत किती लोकांचे श्रम कारणीभूत झालेल आहेत हैं टिपण्यास सांगितलें व मोजतां मोजतां ही संख्या हजारांच्याही वर् गेली.तेव्ह त्या गृहस्थानें हे लाडू हजार लोकांच्या श्रमानें कसे झालेले आहेत हैं मुलांना समजावून दिले. यावरून ज्या ज्या मानानें समाजामध्यें सामाजिक व औद्योगिक श्रमविभाग वाढेल त्या त्या मानानें संमिश्रश्रमसेयोगही वाढलाच पाहिजे. अर्वाचीन काळीं तर औद्योगिक, बाबतींत सर्व जगामध्य एक प्रकारचा श्रमविभाग चालू असतो. ह्मणुन सर्व जग हैं संयुक्त झाल्यासरखें झालें आहे. यामुळें एके ठिकाणीं कांहीं फरक झाला कीं, त्याचा परिणाम दुसरीकडे दिसून आल्याखेरीज राहत नाहीं.
 श्रमविभागाचा तिसरा पोटभाग ह्मणजे स्थानिक श्रमविभाग होय. हेही एकप्रकारें सर्वव्यापी तत्व आहे. उष्ण प्रदेशांत कांहीं विशिष्ट माल तयार होतो; तर शीत कटिबंधांत कांहीं एक माल तयार होतो. तसेंच कांहीं प्रदेश किंवा प्रांत यांमध्यें कांहीं कांहीं धंद्यास नैसर्गिक सोई जा स्त अस तात. तेथें तेथें ते धंदे उदयास येतातं. या स्थानिक श्रमविभागाचं सर्वत्र दिसून येणारें उदाहरण ह्मणजे शहर व खेडेगांव यांमधला श्रमविभाग हेोय.शहर हे उद्योगधंदे व कारखाने यांचे मुख्य स्थान असतें.तर खेडे हे शेतकीचं मुख्यस्थान असतें, व शहरातील लोकसंख्येस लागणारी अवश्यकें खेडी पुरवितात तर खेड्यास लागणाऱ्या सोयी व चैनी ही शहरे पुरवितात. असा हा शहर व खेडें यांतला श्रमविभाग देशाच्या एकंदर फायद्याचा, त्याचप्रमाणें दशडेशांमधील स्थानिक श्रमविभागही देशाच्या व जगाच्या फायद्याचाच असला पाहिजे व अप्रतिबंधव्यापाराचें तत्त्व म्हणजे एक श्रमविभागाचेंच तत्व होय, असें पुष्कळांचें म्हणणं आहे. ज्या देशाला जो माल जास्त सुलभ रीतीनं व मुबलक तयार करतां येईल तोच माल तयार करण्यात त्या देशाचा फायदा आहे. अशा देशाच्या इतर गरजा दुस-या देशांनीं पुरवाव्या, असें खुल्या व्यापाराचें तत्व आहे. उदाहरणार्थ,एका देशानें शेतकीकडेच आपला सर्व भर घालावा तर दुसऱ्य देशानें कांहीं विशेष कारखान्याकडेच आपले सर्व लक्ष लावावे. या मध्ये त्या देशाचे काही एक नुकसान न होता एकंदर जागांमध्ये संपत्तीची उत्पत्ती जास्तच झाली पाहिजे; असे पुष्कळ अर्थशास्त्रकारांचे मत आहे परंतु अप्रतिबंधव्यापर विरुद्ध संरक्षण हा बराच वादग्रस्त प्रश्न आहे व त्याचा सविस्तर विचार या ग्रंथाच्या चवथ्या पुस्तकात करावयाचा आहे, तेव्हा या मुद्याचाही विचार त्या वाड्याच्या प्रसंगी करता येईल.
 श्रमविभागाच्या तत्वपासून समाजातील आधिभौतिक प्रगतीस पुष्कळच मदत झालेली आहे , हे वरील विवेचनावरून दिसून येईल. परंतु त्या तत्वाने समाजात काही अनिष्ठेही घडून आलेली आहेत . अर्थात श्रमविभागाचे कांहीं तोटेही आहेत हें विसरतां कामा नये व त्याचाही येथें थोडक्यांत विचार करणें जरूर आहे. हे तोटे शारीरिक, मानसिक, नैतिक व सामाजिक आहेत. श्रमविभागाच्या योगानें मजुरांना विशेष प्रकारचे रोग जडतात व प्रचंड कारखान्याच्या पद्धतीपासून मनुष्यजातीची वाढ खुंटली आहे व त्यांना हजारों तऱ्हेच्या व्याधी जडलेल्या आहेत असें ह्मणण्यास पुष्कळ आधार आहे. अर्वाचीन कारखान्याच्या पद्धतींतील हे देष नाहींसे करण्याकरितांच सर्व सुधारलेल्या जगांत कारखान्याचे कायदे झालेले आहेत.
 मानसिक तोटा ह्मणजे कामाची एकतानता-अर्वाचीन काळच्या धंद्यांतला माणूस म्हणजे वर्षानुवर्षे दररोज आठ दहा तास तीच ती एक क्रिया करणारें यंत्र होय. यंत्रसाहाय्यानें संपत्तीची वाढ होते व यंत्र हैं मनुष्याचे श्रम वांचविते हें खरें. तरी पण यंत्र हें " आपल्यासारिखे करिती तात्काळ " या कोटीपैकीं आहे. यंत्र चालविण्यास जेवढी मनुष्याच्या कृतीची जरुरी असते तेवढे कृत्य मनुष्यास सदोदित करावयास लावून मनुष्याला अर्वाचीन सुधारणा ही यंत्र बनविते रसकिन, कारलाईल, वगेरे ग्रंथकारांच्या मतें हल्लीच्या सांपत्तिक युगानें मनुष्याचें सबंध मनुष्यत्व नाहींसें करून त्याचे लहान लहान तुकडे बनविले आहेत. हा तोटा आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु या पृथ्वीवरील सर्व गोष्टींप्रमाणें यालाही दुसरी एक बाजू आहे. मनुष्याला तेंच तें काम करावें लागल्यानें तो मनुष्य यंत्रासारखा जड बनतो अशी समजूत आहे खरी, तरी पण यंत्राच्या योगानें मनुष्याला श्रम व काम कमी पडतें व फुरसत जास्त सांपडते हें खरें आहे; व या फुरसतीमध्यें त्याला ज्ञानानें आपलया मानसिक शक्तीही वाढवितां येण्यास सवड होते हें विसरतां कामा नये. लॅकॅस्टर किंवा मँचेस्टर येथील मजुरांमध्यें वाचनाभिरुचि किती वाढली आहे हैं पाहिले म्हणजे हा तोटा अगदीच केवळ अनिष्टमय आहे असें नाहीं असे दिसून येईल. शहरांत राहणारे मजूर व कामगार हे खेडेगांवांतील लोकांपेक्षा बुद्धीने व चलाखीनें जास्त असतात असा सार्वत्रिक अनुभव अहि. वरील विवेचनावरून या एकतानतेच्या प्रमाणांत फारसा तथ्यांश नाही असें दिसून येईल.
 तिसरा तोटा सामाजिक आहे. श्रमवभागाच्या योगानें लोकसंख्या शहरांत येऊन भरते व शहरांमध्यें स्वाभाविकच खेड्यासारखी आरोग्यकारक परिस्थिति नसल्यामुळें मजुरांना निरोगी राहतां येत नाही व त्यांचे हाल वाढतात. तसेंच एखाद्या नव्या यंत्राच्या शोधानें हजारों लोकांना एकदम काम नाहींसें होतें.
 परंतु या तोट्यालाही प्रतिकार आहेत हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. हल्लीं सुधारलेल्या सर्व राष्टांत शहरसुधराईचे प्रयत्न जोरानें चालले आहेत. त्यामुळें शहरांत राहण्यापासून होणारे तोटे बरेच कमी झालेले आहेत. या शहरांच्या आरोग्यसुधारणेच्या कामांत सुधारलेलीं सरकारें व म्युनिसिपालिटया लाखों रुपये रवर्च करीत आहेत. शहराला उत्तम शास्त्रीय पद्धतीचीं गटारें करणें; शहराला उत्तम व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणें; सर्व शहरांत हवा उत्तम तऱ्हेनें खेळेल अशी शहराची रचना करणें; शाहरांत उघाणभूमिका राखून ठेवणें; चांगला व निकोप माल शहरवासीयांस मिळेल अशी तजवीज करणें; अशा प्रकारच्या किती तरी गोष्टी अर्वाचीन काळीं होत आहेत. याचा सुपरिणामही दिसून येत आहे. सर्व सुधारलेल्या देशांत शहरांतील दर हजारीं मृत्युसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यावरून या आक्षेपांतही फारसा तथ्यांश नाहीं हें उघड आहे.

भाग आठवा.


मोठ्या प्रमाणावर व अल्प प्रमाणावर उत्पातेि.


 श्रमविभागाच्या तत्वानें संपत्तीच्या उत्पत्नीच्या वाढीत विलक्षण फरक कां व कसा होतो, याचें विवेचन मागील भागांत केलें. परंतु कोणत्याही घंघांत हा श्रमविभाग अमलांत येणें हें मालाच्या खपावर अवलंबून आहे. कारण घंघांच्या क्रियेचे विभाग करून एक एक क्रिया एक एक माणूस करूं लागला म्हणजे माल अतोनात तयार होणार. हा माल जर ताबडतोड खपला गेला नाहीं तर हा श्रमविभाग होणें शक्य नाहीं. या भागात विचार करावयाच्या विषयाचाही श्रमविभागाशीं निकट संबंध आहे; नव्हे तो श्रमविभागाचा एक प्रकारचा परिणाम आहे. समाजाची वाढ होत चालली म्हणजे त्या समाजांत सामाजिक श्रमविभाग अगर धंद्याचें पृथक्करण होऊं लागतें. अर्थात् एक मनुष्य व त्याच्या कुटुंबांतील माणसें मिळून एक धंदा करून एक प्रकारचा माल काढूं लागतात. अशाच तन्हेनें समाजांत शेतकरी, सुतार, गवंडी, लोहार, सोनार, परीट वगैरे किती तरी धंदेवाले उत्पन्न होतात. या सांपत्तिक स्थितीला घरगुती कारागिरीचा काळ म्हणतात. या सामाजिक श्रमविभागानें प्रत्येक धंद्य‍‍‌ांच्यां माणसांचें कौशल्य बरेंच वाढतें व त्या योगें संपत्तींत बरीच भर पडते. परंतु औद्योगिक श्रमविभागास सुरुवात झाली म्हणजे तर संपत्तीच्या वाढीस ऊतच येतो. कारण मार्गे सांगितल्याप्रमाणें एका धंद्यामधल्या निरनिराळ्या क्रिया निरनिराळ्या माणसांकडून होऊं लागल्या व विशेषतः ही प्रत्येक क्रिया जलदीनें घडवून आणणारीं यंत्रें निघालीं म्हणजे संपत्तीच्या वाढीस अधिकच जोर येतो; व त्यांत आणखी वाफेच्या व इतर नसर्गिक शक्तीनें यंत्रे चालविण्याचा शोध लागला म्हणजे घरगुती कारखान्य चेिं स्वरूप जाऊन त्या कारखान्यांना प्रचंड विराटरूपी फॅक्टरी व गिरण्या यांचें रूप येतें. युरोपांतील उद्योगधंद्यांची वरप्रमाणेंच वाढ होत आली आहे. हिंदुस्थानांत पूर्व काळीं सामाजिक श्रमविभागाच्या योगानें घरगुप्ती धंदे उत्तम स्थितीत आले परंतु यापुढें मात्र त्यांची वाढ झाली नाही.
 इंग्लंडमध्यें वाफेच्या शक्तीच्या शोधानंतर व एंजिनच्या शोधापासून मोठमोठे विराटस्वरूपी कारखाने प्रथमतः कापसापासून कापड काढण्याचे झाले, व पुढें प्रत्येक धंद्यांत असेच कारखाने, फॅक्टरी व गिरण्या होऊंं लागल्या व हल्लींच्या काळीं विराटस्वरूपी कारखाना हा सामान्य सिद्धांत आहे. अजूनही पुष्कळ धंदे घरगुती स्वरूपाचे आहेत, परंतु ते अपवादादाखल आहेत. हिंदुस्थानांत व नुकत्याच औद्योगिक प्रगतीच्या मार्गाला लागलेल्या जपानांत अजून कारखान्यांचें अल्प स्वरूप नाहींसे झालें नाहीं. अल्प प्रमाणावरील कारखाने हेच येथें सामान्य नियमासारिखे आहेत व प्रचंड कारखाने हे अजून अपवादादास्वल आहेत. मोठ्या प्रमाणावरील कारखान्याचे फायदे अगदीं उघड व ताबडतोब दिसणारे आहेत.
 मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांचे फायदे अगदी उघड व ताबडतोड दिसणारे आहेत. मोठ्या कारखान्यात नैसर्गिक शक्ति व यंत्रसामग्री यांचा शक्य तितका फायदा घेण्यास सांपडतो व म्हणून श्रमविभागही पाहिजे तितका अमलांत आणावयास सांपडतो. यामुळें मालाची पेैदास अतोनात वाढते.
 मोठ्या कारखान्यांत देखरेखीचा खर्च लहान कारखान्यांपेक्षां कमी होतो. तुमचें एंजिन ५ हार्सपावरचें असो किंवा १० हार्सपावरचें असो; एक एंजिनियर, एक एंजिन चालविणारा, एक म‌‌‍ॅनेजर, एक कॅशीयर पाहिजे, परंतु मोठें एंजिन असल्यानें काम जास्त होतें व म्हणून मालावर देखरेखीचा खर्च कमी हेोतो. तसेंच कापसाच्या गिरण्या ५ लाखांच्या दोन करण्यापेक्षां दहा लाखांची एक करणें हैं किती तरी कमी खर्चाचें होतें. आधीं जाग्याचा खर्च कमी होतो व म्हणूनच लहान प्रमाणावरील कारखान्याचा टिकाव मोठ्या प्रमाणावरील कररवान्यापुढें लागत नाहीं. कारण लहान कारखान्यामध्यें मालाच्या उत्पत्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांपेक्षां जास्त होतो; व म्हणूनच अशा अल्प कारखानदारांना आपला माल विराटस्वरूपी कारखानदारांच्य' मलाइतका स्वस्त देण्यास परवडत नाहीं. यामुळेच मोठे कारखाने व घरगुती किंवा लहान कारखाने यांच्या चाढओढीत दुसऱ्या प्रकारच्या कारखान्यांचा पाडाव होती. हिंदुस्थानांतील सर्व घरगुती धंदे याच कारणांनीं नामशेष झाले. इंग्लंडमध्यें वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर वाफेच्या मागांशीं हातमागांचा टिकाव लागेना व म्हणूनच हिंदुस्थानांतील हातमागांचा धंदा हळुहळू बुडत गेला. तीच स्थिात साखरेच्या धंद्याची झाली व तीच स्थिति तैल गाळण्याच्या धंद्याची होत आहे.
 परंतु असे विराटस्वरूपी कारखाने सुरू होण्यास प्रारंभीं भांडवल फार मोठेंच लागतें व असें भांडवल देशांतील एक एका व्यक्तीजवळ फार्स नसतें. यामुळे संयुक्त भांडवलाचें तत्व प्रचंड कृारखान्याच्या पद्धतीबरोबर सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें जारीनें अमलांत येऊं लागतें.
 अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपमध्यें उद्योगधंद्यांस व व्यापारास जो जोराची उसळी मिळाली त्या वेळेपासून या संयुक भांडवलाच्या तत्वाचा अंमल सुरू झाला व त्याचा उपयुक्तपणा सर्वसंमत होऊन त्याचा सार्वत्रिक प्रसार झालेला आहे. परदेशांशीं व्यापार करण्याकरितां त्या काळीं ज्या संस्था इंग्लंडमध्यें निर्माण झाल्या त्यांना व्यापारी कंपन्या म्हणत असत. या व्यापारी कंपन्यांना इंग्लंडचे राजे व्यापाराच्या मक्त्याच्या सनदा करून देत. या कंपन्या दोन प्रकारच्या असतः एक नियमबद्ध कंपनी व दुसरी संयुक्तभांडवली कंपनी. पहिल्या प्रकारच्या कंपनीला एखाद्या देशाशींं व्यापार करण्याचा सर्व मत्का मिळालेला असे; परंतु यामध्यें कंपनीचा सभासद आपआपल्या भांडवलावर स्वतंत्र व्यापार करी. कंपनीचे असें स्वतंत्र भांडवल नसे. प्रत्येक सभासदाला कांहीं प्रवेश फी द्यावी लागे व कंपनीच्या खर्चाकरितां वार्षिक वर्गणीही यावी लागे व कंपनी जे जे नियम करील ते ते नियम प्रत्येक सभासदाला पाळावे लागत. परंत अशा कंपनीला परदेशामध्यें किल्ले, बंदरें किंवा दुसऱ्या मोठ्या खर्चाचीं स्वसंरक्षणाचीं कामें करणें कठीण पडे. यामुळे अशा कंपन्यांचा तादृश उपयोग होत नसे.
 संयुक्तभांडवली कंपनीचे भागीदार असतात. या भागीदारांच्या भागानें एकत्र झालेलें भांडवल म्हणजे कंपनीचें भांडवल हेोय. या कंपनींत भागीदार स्वतः कंपनीचें काम पहात नाहींत. तर भागीदार लोक आपल्यांतील कांहींजणांना डायरेक्टर म्हणून नेमून देतात व हें डायरेक्टरांचें मंडळ कंपनीचा सर्व व्यापार किंवा धंदा पाहतें. संयुक्तभांडवली कंपनी व खासगी पातीचा धंदा यांमध्यें मुख्य भेद असा आहे कीं, संयुक्तभांडवली कंपनीत भागीदारासं आपलें भांडवल वाटेल तेव्हां कंपनीतून काढून घेतां येत नाही. त्यांला आपला भागदुसऱ्या विकून आपलें भांडवल मोकळे करतां येतें व या विक्रीस दुसऱ्या भागीदारांच्या संमतीची जरूरी नसते. खासगी पातीमध्यें इतरांच्या संमतीशिवाय नवा पातीदार घेतां येत नाहीं.
 इंग्लंडमध्यें परदेशांशीं व्यापार करणाऱ्या कांहीं कंपन्या संयुक्तभांडवली होत्या. जिनें एका शंभर वर्षांमध्यें सर्व हिंदुस्थान देश काबीज केला, ती ईस्ट इंडिया कंपनीही संयुक्तभांडवली कंपनीच होती. परंतु त्या काळीं हें संयुक भांडवलाचें तत्त्व बाल्यावस्येंत होतें व म्हणून अशा कंपन्यांचा व्यापारधंदा चांगला चालत नसे. अँँडाम स्मिथ याचें मत त्याच्या काळच्या अनुभवावरून या तत्वाच्या विरुद्ध झालें होतें.
 अँँडम स्मिथला संयुकभांडवली कंपनीच्या कारभारांत दोन दोष अपरिहार्य वाटत. संयुक्तभांडवली कंपनीच्या मॅनेजरास आपलेपणा वाटणे शक्य नाहीं. यामुळे खासगी धंदेवाला जितकी काळजी घेईल, जितकी काटकसर करील, व जितक्या दक्षतेनें देखरेख ठेवील तितकी मॅनेजराकडून ठेविली जाणें शक्य नाहीं. यामुळे संयुक्तभांडवली कंपनीच्या कारभारांत जास्त पैसा खर्च होतो, व म्हणून असे धंदे फायदेशीर होत नाहींत; दुसरें, कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तेथें सरकारी तऱ्हेंनें बादशाही थाटावर सर्व व्यवस्था व खर्च चालतो.
 या दोन दोषांमुळें पुष्कळ धंद्यांत व व्यापारांत संयुक्त भांडवलाचें तत्व फायदेशीर नाहीं असें. अॅडाम स्मिथचें मत झालें होतें. जे धंदे व व्यापार अगदीं नियमबद्ध करून कांहीं एक ठराव रुळीप्रमाणेंच चालावयाचे असतात, अशा धंद्यांत संयुक्त भांडवलाचें तत्व उपयोगी आहे; व या तत्वावर काढलेले धंदे यशस्वी होतात. हे धंदे म्हणजे पेढी, सार्वजनिक दळणवळणाच्या सोयी वगैरे होत. बाकी ठिकाणीं खासगी मालकीचेच धंदे यशस्वी होतात व म्हणूनच असे धंदे चांगले असें अँँडाम स्मिथचें मत होतें.
 हें अँँडाम स्मिथचें मत त्याच्या काळच्या संयुक्त-भांडवली कंपनीच्या अपयशावरून झालेलें होतं; परंतु अर्वाचीन काळीं हें तत्व सर्वसंमत झालेलें आहे. हल्लींचा काळीं व्यापारधंद्यासंबंधीं जर कोणाचीं दोन महत्वाचीं तत्वें असूतील तर ती सुंयुक भांडवलाचें तत्व व परस्परसाहाय्यकारित्वाचें तत्व हींच होत. यांपैकीं दुस-याचा विचार आपल्याला पुढल्या पुस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां येथें फक्त पहिल्याचेंच विवेचन पुरे आहे. यांपैकीं दुसऱ्याचा विचार आपल्याला पुढल्या पूस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां येथें फक्त पाहिल्याचेंच विवेचन पुरे आहे.
 संयुक्त भांडवलाचें तत्व हल्लीं सर्वगामी झालेलें आहे व ज्या ज्या देशांनी औद्योगिक बाबतीत प्रगति करून घ्यावयाची आहे त्या त्या देशांनी य तत्वाचा अवलंव केल्यावांचून गत्यंतर नाहीं. कारण या तत्वापासून खालील फायदे होतात.
 कांहीं कामें इतकों प्रचंड व अवाढव्य असतत कीं, तीं खासगी व्यक्तीच्या सांपक्तिक स्मर्थ्याबाहेरचीं असतात. अशा कामांला सरकार किंवा संयुत्क भांड़वल यांखेरीज गत्यंतर नसतें. उदाहरणार्थ, रेल्वे, पाट्रबंधारे, गोदी, बंदराचे धक्के किंवा अशांसारखीं दुसरी व्यापाराच्या सोईचीं कामें सरकारनें तरी हाती घेतलीं पाहिजेत किंवा संयुक्त भांडवलाच्या कंपन्यांनां तरी हातीं घेतलीं पाहिजेत. आतां सरकारी व्यवस्था ही नेहेमीं फार खर्चाची असते, असा सार्वत्रिक अनुभव असल्यामुळें अशीं कामें संयुक्त भांडवलाच्या तत्वावर उभारणें देशाच्या हिताचें असतें. संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर उभारलेले धंदे जास्त चिरस्थाई व अपघातापासून मुक्त असतात. खासगी धंद्यांत कर्ता पुरुष नाहींसा झाला तर धंदा तेव्हांच बुडतो. कारण मुलगा त्या कामांत चांगला निघेलच असा नियम नाहीं. परंतु संयुत्क-भांडवली कंपनीला एक मॅनेजर नाहींसा झाला तर दुसरा नेमतां येतो. यामुळे अशा धंद्यास एक प्रकारचा स्थाईकपणा येतो.
 खासगी धंदेवाल्यांस नफ्याची फारहांव असते व पुष्कळ नफा असल्या खेरीज ते आपलें भांडवल एखाद्या धंद्यांत घालीत नाहींत. परंतु संयुक्तभांडवली कंपनीचे भागीदार हे स्वत: धंदे करणारे नसल्यामुळे त्यांना नफ्याची एवढी मातबरी नसते. देशांत जो सामान्यतः व्याजाचा दुर असतो त्यापक्षा थोडा जास्त नफा मिळाला म्हणजे त्यांचें समाधाना असतें. यामुळ नवीन धंदा संयुक्त भांडवलाच्या तत्वावर काढणें सोईचें असतें.
 संयुक्त-भांडवली कंपनीचे जमाखर्च नेहमीं प्रसिद्ध होत असल्यामुळेंही दोन फायदे होतात. प्रथमतः कारभारांत लबाडी होत असेल तर ती लवकर उघडकीस येण्याचा संभव असतो व प्रसिद्ध जमाखर्चावरून देशांतील धंद्याची स्थिति कळण्यासही सुलभ मार्ग होतो.
 संयुक्तभांडवली धंद्याचा आणखीही एक फायदा आहे तो हाच कीं, या धंद्याचें भांडवल थोडया थोड्या प्रमाणानें पुष्कळ व्यक्तींजवळून घेतलेलें असतें. शिवाय या कंपन्यांच्या भांडवलाचा कांहीं भाग न मागितलेला असा असतो. यामुळे धंद्याला एकप्रकारची सुराक्षतता असते व खासगी धंद्यापेक्षां या संयुक्तभांडवली धंद्यास व्यापारांतील अडचणींतून सहज रीतीनें पार पडतां येतें व यदाकदाचित् नुकसान झालें तर तें नुकसानही थोड्या व्यक्तींवर न पडतां पुष्कळजणांवर थोड्या प्रमाणानें वांटून जातें. यामुळें हैं नुकसान फारसें भासत नाहीं.
 परंतु संयुक भांडवलाच्या तत्वाचा सर्वात महत्वाचा फायदा देशांतील भांडवलाची वाढ होय. या तत्वानें जे पैसे व्र जी संपात्ति खासगी व्यक्तींजवळ निरुपयोगी पडून राहिलेली असते. ती एकूब होऊन त्याचें शक्तिमान् असें भांडवल बनतें. ज्याप्रमाणें पाण्याच्या वेगवेगळ्या थेंबामध्यें शात्कि नसते, परंतु हेच थेंब एकत्र जमून त्यांचा प्रवाह वाहूं लागला म्हणजे त्यामध्यें मोठी शक्ति उंत्पन्न होते; त्याप्रमाणेंच जी संपत्ति व पैसा देशांतील व्यत्कींजवळ अल्पप्रमाणानें असतांना त्यांत शत्कि नसते, तोच संयुक्त भांडवलाच्या तत्वानें एकत्र झाल्यानें त्याचें अवाढव्य भांडवल तयार होतें व मग विराटस्वरूपी कारखाने देशांत निर्माण होऊं शकतात. या फायद्यामुळे हें तत्व जगांत इतकें पसरलें आहे.
 हिंदुस्थानची या तत्वासंबंधींची सध्यांची स्थिति इंग्लंडांतल्या अॅडम स्मिथच्या काळच्या सारखी आहे. हें तत्व अजून येथें बाल्यावस्थेतच आहे म्हणावयाचें. कारण संयुक भांडवलाचे पुष्कळ कारखाने आपले इकडे बुडालेले आहेत किंवा किफायतशीर झालेले नाहींत. हिंदुस्थानांत ज्या जाती पिढीजाद व्यापारीपेशाच्या आहेत त्यांनीं हें तत्व आपलेंसें करून तें फायदेशीरही करून दाखविलें आहें. पार्शी, भाटे, गुजराथी व मारवाडी या लोकांचे संयुक्त भांडवलाचे कारखाने चांगल्या तऱ्हेंनें चालतात; परंतु ब्राम्हण व इतर जातींनीं काढलेले संयुक्त भांडवलाचे कारखाने चांगले चालत नाहींत, याला दोन कारणें आहेत. पहिलें कारण या जातींमध्यें अजून व्यापाराचा आत्मा जी सचोटी तो पूर्ण मुरला नाहीं. यामुळे संयुक्त भांडवलाच्या कंपन्यांचे मॅनेजर व व्यवस्थापक हेच स्वतः पैशाची अफरातफर करतात व कंपनीच्या कारभारास धोका आणतात; केव्हां केव्हां धंद्याचें व कारभाराचें ज्ञान बरोबर नसल्यामुळेही नुकसान होतें. दुसरें कारण आपल्या लोकांमधील सामाजिक कर्तव्याची अंधुक कल्पना होय. संयुक्त भांडवलाच्या कंपन्या डायरेक्टर मंडळीच्या देखरेखीखालीं चालतात; परंतु डायरेक्टर लोकांना आपल्या कर्तव्यांची म्हणण्यासारखी जाणीव नसते व यामुळे भागीदारांच्या होणाऱ्या नुकसानाकडे त्यांचा कानाडोळा होतेी किंवा डायरेक्टर लोक कंपनीच्या कारभारापासून आपला खासगी फायदा करून घेण्याचा स्वार्थी विचार करतात. परंतु योग्य विचार केल्यास असें दिसून येईल कीं, कंपनीचा कारभार चोखरीतीनें व दक्षतेनें चालविल्यास त्यांत स्वार्थ व परमार्थ हे दोन्हीही साधतात. कारण डायरेक्टर लोकांचे बऱ्याच किंमतीचे भाग कंपनींत असतातच. तेव्हां कंपनी यशस्वी झाली तर त्यांत सर्व भागीदारांप्रमाणें त्यांचा स्वतःचाही फायदा होतो. शिवाय संयुक्तभांडवलाचे कारखाने व धंदे यशस्वी होत गेले म्हणजे तितक्याच भागीदारांचा फायदा होतो असें नाहीं, तर यापासून सामाजिक हितही होतें. तें हैं कीं, अशा संयुक्त भांडवलाच्या धंद्यांत लहानसहान शिलकी घालण्यास बहुजनसमाजाची प्रवृत्ति होते व या योगानें देशामध्यें भांडवलाचा पुरवठा पुष्कळ वाढतो व कोणत्याही नव्या उद्योगधंद्यास भांडवलाचा तुटवडा पडत नाहीं.
 देशामध्यें उद्योगधंदे जर वाढावयाचे असतील तर या संयुक्त भांडवलाच्या तत्वाच्या प्रसाराखेरीज गत्यंतर नाहीं, व या तत्वाचा प्रसार होण्यास बहुजनसमाजाचा या तत्वाच्या यशस्वीपणाबद्दल विश्वास बसला पाहिजे. हा विश्वास बसण्यास संयुक्तभांडवली कारखाने किफायतशीर झाले पाहिजेत व हे धंदे किफायतशीर होण्यास व्यवस्थापक व मॅनेजर व डायरेक्टर लोक यांना आपल्या धंयाची उत्तम माहिती असून शिवाय सचोटी व कर्तव्यदक्षता हे दोन नैतिक गुणही त्यांच्यामध्यें वास करीत असले पाहिजेत; तेव्हां ज्यांना आपल्या देशाची औद्योगिक प्रगति व्हावी असें मनापासून वाटत आहे त्यांनीं युा दोन गोष्टी आपल्या समाजांत वाढतील अशांबद्दल खटपट केला पाहिजे.
 येथपर्यंत उद्योगधंद्यांत विराटस्वरूपी कारखाने संपत्तीच्या वाढीस कसे व कां अनुकूल असतात याचा विचार झाला. या विवेचनावरुन जसजसा श्रमविभागाच्या तत्वाचा फैलाव होतो तसतसा विराट्स्वरूपी कारखान्यांकडे देशांतील उद्योगधंद्यांचा कल असतेी हैं दिसून येईल. अल्पस्वरूपी धंदे विराटस्वरूपी धंद्यांच्या बरोबर अस्तित्वांत असतात खरे, तरी एकंदरीत अल्पस्वरूपी धंद्यांचा विराटस्वरूपी धंद्यांपुढें टिकाव लागणें कठीण, असा सर्व देशांतील अनुभव आहे.
 आतां संपत्तीचा उत्पादक दुसरा मोठा धंदा शेतकी. यासबंधों विराटस्वरूप चांगलें किंवा अल्पस्वरूप चांगलें याचा विचार केला पाहिजे. हा प्रश्न पहिल्यापेक्षां जास्त वादग्रस्त आहे व मोठमोठ्या अर्थशास्त्रकाररांची मतें परस्परविरोधी आहेत.
 प्रथमतः शेतकीमध्यें इतर उद्योगधंद्यांप्रमाणें श्रमविभागाच्या तत्वाच्या प्रसारास फारसा अवकाश नसते. या धंद्यांत प्रत्येक शेतकऱ्याला शतकीचीं बहुतेक कामें यावीं लागतात व करणेंही भाग पडत. सतत बारा महिने बारा काळ एकच काम करण्यास येथे सवड नसते. तरी पण विस्तीर्ण शेती चांगली किंवा अल्प शेती चांगली हा वादाचा मुख्य प्रश्न आहे. विस्तीर्ण शेतींत शेतकरी हा एक प्रकारचा कारखानदार असतो. ती हजारों एकर जमीन-मालकीची अगर भाड्यानें घेऊन-तिची लागवड करतो. ही लागवड करण्यास लागणारें सर्व भांडवल हा शेतकरी-कारखानदार पुरवितो, व शतीस लागणार सर्व श्रम मजुरांना मजुरी देऊन तो मिळवितो. अल्प शेतीमध्यें पांचदहा एकर जमीनच एक शतकरी आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या श्रमानें लागवडीस आणतो. या दोन लागवडींच्या पद्धतींत आधिक किफायतशीर कोणती हें ठरवावयाचें आहे.
 विस्तीर्ण शेतीच्या बाजूनें बहुशः खालील फायदे पुढें आणले जातात. या लागवडीच्या पद्धतीमध्यें शेतकींच्या शक्तिमान् यंत्रांचा उपयोग करतां येतो. वाफेचा नांगर, धान्य कापण्याचें यंत्र, धान्य मळण्याचें यंत्र वगैरे खर्चाच्या यंत्रांचा उपयोग करतां येतो व यंत्रानें मजुरांच्या श्रमापेक्षां पुष्कळ फायदा होतो हें उघड आहे. परंतु या यंत्रांना भरपूर काम मिळेल एवढी मोठी शेतकी एकट्या मालकाची पाहिजे तर ही यंत्रं काटकसरशीर होतात.
 दुसेंर, विस्तीर्ण शेतींत कुंपणें, रस्ते, बांधवंधारे वगैरेसारख्या बाबतींत जमीन कमी फुकट जाते. तींच लहान लहान शेतें असलीं म्हणजे या बाबतींत खर्चही जास्त होतो व पुष्कळ जागा वायां जाते.
 विराटस्वरूपी कारखान्याला सामान्य असे फायदे व काटकसर या विस्तीर्ण शेतींत होतात. देखरेखीचा खर्च कमी होतो. उदाहरणार्थ, मेंढ्यांचा कळप १०० चा असला काय किंवा ४०० चा असला काय त्याला गोपाल एकच लागतो; माल थोडा काय किंवा फार काय परंतु नेण्याआणण्याकरिवां गाडी बमैरेसारखा खर्च सारखाच येतो.
 तिसरें, विस्तीर्ण शेतींत पिकाची योग्य परंपरा लावण्यास सुलभ पडतें म्हणजे पहिल्या वर्षी एका जमिनीच्या तुकड्यांत एक पीक; दुसऱ्या वर्षी दुसरें योग्य पीक; तिसया वर्षी जमीन ओसाड टाकणें, वगेरे गोष्टी जमिनीचा कस व मगदूर कायम राहण्यास कराव्या लागतात व त्या विस्तीर्ण शेतींत करणें सोईचें असतें; परंतु अल्प शेतींत हैं करणें शक्य नसतें.
 विस्तीर्ण शेतीच्या पद्धतीचे हे फायदे निर्विवाद् आहेत. परंतु अल्प शेतीच्या समर्थकांचें म्हणणें असें आहे की,हे फायदे जरी त्या पद्धतीत असले तरी त्यांत एक जबरदस्त दोष आहे. तो हा कीं, शेतकीवर श्रम करणारे मजूर हे निवळ सांगकामे असतात. त्यांची आपल्या कामावर आसत्कि नसते. कारण काम काळजीनें करण्यापासून त्यांचा फायदा नसतो. ठरलेल्या मजुरीपलीकडे त्यांना जास्त फायद्याची आशा नसते. यामुळे विस्तीर्ण शेतींत पुष्कळ श्रम वांया जातात. परंतु अल्प शेतींत शेतकऱ्याला मालकीची जाणीव असते व या मालकीच्या जाणीवेनें ते आपल्या शेतीची अतोनात काळजी घेतो; तो काटकसर करतो; लहानसहान गोष्टींकडे सुद्धांदुर्लक्ष करीत नाही; आपल्या शेतीची आपण जितकी मशागत करूं तितका आपलाच फायदा आहे अशी त्याची खात्री असते; यामुळें अल्प शेतीमध्यें शतीपासून शेतीची संपत्ति जास्त उत्पन्न होते असें अल्प शेतीच्या समर्थकांचें म्हणणें आहे; परंतु या विषयाचा विचार या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां सध्याचें विवेचन येथेंच थांबविणें बरें.

[भाग नववा.]

[उतरत्या व चढत्या पदाशींचा सिद्भांत व त्याचें विवरण.]

 संपत्तीच्या उत्पत्तीचीं कारणें व त्या कारणांचा संयोग ज्या तत्त्वांनीं होतो त्याचा येथपर्यंत विचार झाला. आतां प्रत्येक कारणाची वृद्धि कशी होते हैं पहावयाचें राहिलें, तें या पुस्तकाच्या राहिलेल्या चार भागांत उरकावयाचा विचार आहे.
 संपत्तीच्या उत्पत्तीचें पहिलें कारण म्हणजे देशांतील जमीन व स्रष्टीशक्ति हें होय. आतां देशांतली जमीन कांहीं प्रत्यक्ष आकारानें वाढूं शकत नहीं हैं खरें. तरी पण जमिनीपासून कमी अधिक उत्पन्न काढतां येतें. या बाबतींतच मथळ्यांत निर्दिष्ट केलेल्या सिद्धांताचा शोध लागला व याच सिद्धांतावर अर्थशास्त्रांतील व विशेषतः वांटणी या भागांतील कित्येक प्रमेयें व विधानें अवलंबून आहेतू तेव्हां या सिद्धांताचा येथें विचार करणें प्राप्त आहे. चढत्या् व उतरत्या पैदाशीचा नियम प्रथमतः शेतकी व इतर उद्योगधंदे यांचा भेद दाखविण्याकरितां प्रतिपादन केला जात असे. अभिमत अर्थशास्रकारांचें असें ह्मणणें आहे कीं, उतरत्या पैदाशीचा नियम शेतीस लागू आहे व इतर धंद्यांस चढत्या पैदाशीचा नियम लागू आहे. या नियमांचा अर्थ व त्यांतील भेद खालील एका उदाहरणावरून स्पष्ट होईल.
 समजा, एका शेतक-यानें १० एकर जमिनीच्या तुकड्याची मशागत १०० रुपये भांडवल व २५मजुरांचे श्रम लावून केली व त्यांत धान्य पेरलें तर त्याला कांहीं एक धान्याची पैदास होईल. आतां शेतक-यानें त्याच जमिनीच्या तुकड्यांतून जास्त पैदास करण्याकरितां आणखी १०० रु. भांडवल व २५ मजुरांचे श्रम त्या जमिनीला लावले तर त्याला उत्पत्राची पैदास पहिल्यापेक्षां जास्त होईल; परंतु ती पहिल्याच्या दुप्पट होणार नाहीं. समजा, त्या शेतक-यानें तिस-या वर्षी भांडवल व श्रम हे पहिल्यापेक्षां आणखी १०० रुपयांनीं व २५ मजुरांच्या श्रमानें वाढविले ह्मणजे या वर्षी ३०० रु. व ७५मजुरांचे श्रम इतके त्या जमिनीला लावले तर त्याचे उत्पन्नाची पैदास दुस-या वर्षांपेक्षां जास्त होईल; परंतु कमी प्रमाणानें जास्त होईल. ह्मणजे पहिल्या १०० रुपयांच्या भांडवलापासून व २५ मजुरांच्या श्रमापासून जितकी पैदास जास्त झाली त्यांपेक्षां दुस-यापासून कमी होईल व दुस-यापासून जितकी पैदास झाली त्यापेक्षांही कमी तिस-यापासून होईल. भांडवल व श्रम हे कांहीं प्रमाणाच्या पलीकडे गेल्यास निरुपयोगी होतील इतकेंच नव्हे तर सर्व शेताचा फाजील खतानें नाश हेोईल व सर्व उत्पन्न बुडून जाईल. यालाच उतरत्या पैदाशीचा नियम म्हणतात. ही झाली एकाच जमिनीच्या तुकड्याची मशागत करण्याची स्थिति. हाच नियम देशांतील सर्व विस्तीर्ण जमिनीस लागू आहे. देशातील सर्व जमिनी सारख्या सुपीक नसतात; कांहीं जास्त सुपीक व कांहीं कमी सुपीक व कांहीं तर अगदीं नापीक असतात. यामुळे येथेंही उतरत्या पैदाशीचा नियमु लागू पडतो. ह्मणजे सुपीक जमिनीवर भांड्वल श्रम यांचें कांहीं एक प्रमाण किंवा माप खर्च केले तर जी उठूनची पैदास होते त्यापेक्षां कमी पैदास तितकेंच माप कमी सुपीक जमिनीवर खर्च केल्यापासून होते व नापीक जमिनीवर तेंच माप खर्च केल्यानें खर्चाइतकीही पैदास होण्यास पंचाईत पडते. या उतरल्या पेद्रा शीच्या नियमामुळे सर्व देशांत शेतीच्या मालाच्या किंमती नेहेमीं वाढत जातात. कारण जसजशी जास्त जमीन लागवडीस येते-वही जमीन अर्थातू पहिल्यापेक्षां कमी सुपीक असते-तसतसें उत्पत्तीच्या खर्चचें प्रमाण वाढतें व पैदाशीचें प्रमाण कमी होतें व म्हणून त्या उत्पन्नाची किंमत वाढत जाते. त्याचप्रमाणें जमिनीची जसजशी जास्त मशागत होत जाते तसतसा उत्पत्तीचा खर्च वाढतो व पैदाशीचें प्रमाण कमी होतें व ह्मणूनच या अधिक खचनेिं तयार झालेल्या मालाची किंमत वाढत जाते. यावरून असें अनुमान निघतें कीं, देशाच्या आधिभौतिक भरभराटीबरोबर खाण्याचे पदार्थ महाग होत जातात व मनुष्याला निवळ जीवनास जास्त जास्त खर्च लागू लागतो.
 परंतु उद्योगधंद्याची याच्या उलट स्थिति आहे. त्याला चढत्या पैदाशीचा नियम लागू आहे. समजा, एका कारखानदारानें १० हजार रुपयांवर एक धंदा काढला आहे. यानें जर आपले भांडवल २० हजार करून एक जास्त मोठं यंत्र आणलें व धंद्यामध्यें श्रमविभाग जास्त अंमलांत आणला तर त्या धंद्यांतील मालाची पैदास दुपटीपेक्षां जास्त होईल. आणखी कांहीं काळानें त्या कारखानदारानें आणखी १० हजारांनीं आपलें भांडवल वाढविलें व श्रमाची काटकसर करणारें आणरवी एक दुसरें यंत्र आणविलें तर मालाची पैदास जास्त पटीनें वाढेल. सारांश जस जसा धंदा विराटस्वरूपाचा करावा तसतशी मालाची पैदास जास्तच वाढत जाते, हा नियम ह्मणजे श्रमविभागाच्या तत्वाचें व विराटस्वरुपी कारखान्याच्या तत्वाचें उलट बाजूनें विवरण करण्यासारखें आहे. या नियमाचा इत्यर्थ हा कीं, भांडवलाच्या वाढीच्या प्रत्येक मापाबरोबर पैदाशीचें प्रमाण त्याहून जास्तच वाढत जातें. यालाच चढत्या पैदाशीचा नियम म्हणतात. याच्या परिणाम असा होती कीं, देशामध्यें जसुजशी मालाला मागणी वाढते व जसजसेंधंद्यात जास्त जास्त भांडवल घातलें जातें तसतसें पैदाशांचें प्रमाण वाढत जातें व म्हणूनच माल उत्पन्न करण्याचा खर्च कमी कमी होत जातो व माल स्वस्त होऊं लागतो. म्हणजे संपत्तीचे जे सामान्यत: तीन वर्ग करण्यांत येतात, त्यांच्या किंमतीची वाढ व्यस्त प्रमाणानें होते. अवश्यक, सोई व चैनी अशा तीन प्रकारच्या संपत्ति आहेत. तेव्हां चढत्या व उतरत्या पैदाशीच्या नियमानुरूप देशाची लोकसंख्या वाढत चालली व त्याची आधिभौतिक सुधारणा होत चालली म्हणजे संसाराचीं अवश्यी जास्त जास्त महाग होत जातात व सोई व चेनी या मात्र स्वस्त होत जातात. परंतु बहुजनसमाजाच्या नेहमींच्या राहणीमध्यं खचचा मुख्य भागं आवश्यकांचा असल्यामुळे सुधारणेबरोबरच बहुजनसमाजाची राहणी महागाईची झाल्यामुळे जास्त कष्टमयच होत जातेया प्रकारचे अभि मतपंथी अर्थशास्त्रकारांनी या नियमावरून पुष्कळ उपसिद्धांत काढले आहेत. याचा आणखी जास्त ऊहापोह या ग्रंथाच्या बांटणी ’ या भागांत व्हावयाचा आहे; तेव्हां त्याचा येथे विस्तार करण्याची जरूरी नहीं.
 परंतु अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांचे वरील विवरण चुकीचे आहे निदान त्यामध्ये कांहीं दोष आहेत असे ऐतिहासिकपंथाच्या लेखकांनी दाखवले आहे.
 अधीं शेतकी व इतर उद्योगधंदे यांमध्यें जो विरोध अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांनी दाखविला आहे तो बरोबर नाही; उतरया व चढत्या पैशचे असे दोन्ही नियम शेतकीस व उद्योगधंयास सारखेच लागू आहेत हें ऐतिहासिकपंथी अर्थशास्त्रकारांनी दाखविलें आहेएक अगदी सुपीक परंतु कधींही लागवड न केलेली जमीन घेतली तर कांहीं कालपर्यंत त्या जामिनलि चढस्या पैदाशीचा नियम लागू पडतो. म्हणजे कांहीं एक भांडवल श्रम जमिनीला लावले व कांहींएक धान्याच व या पैदास झाली व पुढे त्या जमिनीवरील भांडवलाची व श्रमाची दुप्पट केली तर पैदास चैौपट होते. असा क्रम कांह मर्यादेपर्यंत चालतो व मग मात्र उतरत्या पैदाशीचा नियम लागू पडू लागतो. एक म्हणजे प्रत्येक जमिनीची ठराविक पराकाष्ठेची सुपीकता असते. ती पराकाष्ठेची सुपीकता येईपर्यंत त्या जमिनीला चढत्या पैदाशीचा नियम लागू होतो व पुढी उतरत्या पैदाशीचा नियम लागू पडू लागतो. यामुळे नव्या वसाहतींत जसजशी लोकसख्या बाढते व लोकांमध्ये भांडवल वाढते व जसजशी जमिनीचः मशागत जास्त खचची होत जाते, तसतसे धान्याच्या पैदाशीचे प्रमाण जास्त वाढते. अर्थात् धान्याच्या उत्पत्तीचा खर्च कमी होतो व धान्य लोकसंख्यच्या वाढीबरोबर स्वस्त स्वस्त होत जाते. अमेरिकेतील वसाहतीचा अनुभव असाच आहे व म्हणन अमेरिकेत धान्याचे भाव सारखे उतरत आहेत, असे कॅरे या अर्थशास्त्रकाराने अकडयन सिद्ध करून दाखविलें आहे. परंतु ज्या देशामध्यें सर्व सुपीक जमीन लागवडीला येऊन तिच्या सुपीकतेची पराकाष्ठा ओलांडून गेलेली आहे, व जेथें वस्ती फारा दिवसांची व फारं दाट आहे अशा देशांना अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांचे सिद्धांत ळागू आहेत. तथें धान्याच्या किंमती-नव्या वसाहतीच्या परदेशांतून धान्य न आल्यास-दिवसेंदिवस वाढत जातील हैं म्हणणें खरं आहे यांत शंका नाहीं. अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनीं हे नियम प्रतिपादन केले त्या वेळीं त्यांच्या डोळ्यांपुढे इंग्लंडची स्थिति उभी होती ही गेष्ट निर्विवाद आहे.
 त्याचप्रमाणें उद्योगधंद्यांनाही दोन्ही नियम लागू आहेत. ' कांहीं मर्यादेपर्यंत भांडवलाच्या वाढीच्या प्रमाणांपेक्षां पैदाशीच्या वाढीचें प्रमाण जास्त असतें. दोन लाखाच्या कारखान्याऐवजीं चार लारवांचा एक काररवाना काढणें जास्त किफायतीचें आहे हें रवरें; परंतु या काररवान्याच्या वाढीलाही मयदिा आहेच व या मयदेिबाहेर कारखाना गेल्यास देखरेख बरोबर होणार नाहीं, मालाचा नाश होईल व कारखान्याची पैदास खर्चाच्या मानानें कमी होईल. याप्रमाणें अभिमतपंथी सिद्धांतामध्यें पुढील ग्रंथकारांनीं दुरुस्ती केली आहे. अभिमतपंथाचें या सिद्धांताचें प्रतिपादन एककलीपणाचें हातें. ती एककलीपणा काढून टाकून त्याचें यथार्थ रूप पुढील ग्रंथकारांच्या टीकेनें स्पष्ट केलें हें खेरें. तरी पण शेतकी व इतर धंदे यांमधील विरोध विसरतां कामा नये. तो विरोध असा आहे: शेतीची चढत्यापैदाशीची मर्यादा लवकर येते; इतर धंद्यांची ही मर्यादा येण्यास जास्त काळ लागतो हा पहिला विराध. व दुसरा विरोध हा कीं, शेतीला लागणारी जमीन हिची मर्यादा ठरलेली असते; कांहीं केलें तरी देशातील जमीन कांहीं वाढवितां येत नाहीं. यामुळे देशामध्यें जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसा धान्याचा तुटवडा केव्हांना केव्हां तरी भासूं लांगलाच पाहिजे. कारण जमिनीचा विस्तार कांहीं केल्या वाढवितां येत नाहीं. इतर धंद्यांची स्थिति याहून निराळी आहे. मालाला खप असेल व तितक्या वेळाचा अवधि मिळेल तर नवीन कारखाने काढतां येतील. याच गोष्टीचें एका उदाहरणानें स्पष्टीकरण करतां येईल. जमिनीच्या परिमिततेमुळे व उतरत्या पैदाशीच्या नियमानें थोड्या जमिनीपासून सर्व जगाला धान्य पुरविणें कालत्रयींही शक्य नाही; परंतु एखाद्या ठिकाणा हून सर्व जगाला एखादा माल पुरविणें शक्य आहे. दुस-या देशाची चढाओढ बंद झाली व गिरण्या बांधण्यास पुरेसा अवकाश मिळाला ह्मणजे एकटे मॅचेस्टर शहर सर्व जगाला कापड पुरवू शकेलू. तेव्हां शेती व इतर धंदे यांमधील परिमित वाढ व अपरिमित वाढ हा भेद् दृष्टिआड करून चालावयाचें नाहीं व अभिमतपंथी अर्थशास्रकारांच्या सिद्धांताचें व अनुमानाचें हेंच खरें पर्यवसान होय.

भाग दहावा.


लोकसंख्येची वाढ.


 संपत्ताचें दुसरें कारण श्रम. या श्रमांची जसजशी वाढ होईल तसतशी संपत्तीमध्ये भर पडत जाईल हें उघड आहे. परंतु मानवी श्रम वाढण्याचा एक स्वाभाविक मार्ग म्हणजे देशांतील लोकसंख्येची वाढ होय. तेव्हां लोकसंख्येच्या वाढीची मीमांसा काय व त्या वाढीचा देशाच्या सांपत्तिक स्थितीशीं काय संबंध आहे याचें या भागांत विवेचन करावयाचें आहे. अर्थशास्त्रामध्यें या प्रश्नाची भर प्रथमतः मॅलथस या ग्रंथकारानें केली हि या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांतील पहिल्या भागांत सांगितलें आहे व तेथेंच मथलसच्या मीमांसेचा इतिहास दिला आहे. या भागांत या प्रश्नाच, आतां तात्विक दृष्ट्या विचार करावयाचा आहे.
 मॅलथसच्या विवेचनामध्यें त्यानें दोन गोष्टी स्वयंसिद्ध म्हणून घेरल्या आहेत व या दैॉन सिद्धांतांपासून त्याची उपपत्ति ओघानेंच प्राप्त होते असें त्यानें दाखविलें आहे. पहिली गोष्ट ही की, मानवी जीवनास अन्न अवश्य अहिं. मनुष्याचें ज्ञान कितीही वाढलें, त्याची केवढीही सुधारण झाली; त्यानें योगसाधनानें आपल्या मानसिक शक्ति कितीही वाढविल्या तरी मानवी आयुष्यास व मानवी कर्तबगारीस अन्नाची अवश्यक्त आहे हैं निर्विवाद होय. दुसरी गोट लग्न करन्याची प्रवृत्तिही मनुष्यमात्रात सनातन आहे.'आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ? या प्रसिद्ध सुभाषितांत या दोन्ही प्रवृत्तींचा उल्लेख आलेला आहे व या दोन्ही प्रवृत्ति, वासना किंवा गरजा सर्व प्राणिमात्रांमध्यें दिसून येतात इतकेंच नाहीं तर मनुष्याच्या अगदीं रानटी स्थितीपासून तों सुधारलेल्या स्थितीपर्यंत सर्व अवस्थांमध्यें ही प्रवृत्ति सारखीच दृष्टोत्पत्तीस येते व मनुष्याची जेथपासून आपल्याला मुाहिती उपलब्ध झाली आहे त्या जुन्या काळापासून आजपर्यंतच्या हजारों वर्षांच्या अवधीत या प्रवृत्तीमध्यें म्हणण्यासारखा फरक झालेला नाहीं. लग्नाची वासना नसलेल्या कांहीं व्यक्ति सर्व काळीं व सर्व ठिकाणीं दृष्टीस पडतात; परंतु अशा व्यक्ति अपवादादाखल होत. त्यावरून मनुष्यजातीच्या सामान्य प्रवृत्तीला बाध येत नाहीं. या दोन गोष्टी निर्विवाद आहेत हें कबूल झालें म्हणजे मॅलथसच्या लोकसंख्येच्या मिमांसेविषयीं फार वाद राहत नाहीं. या मीमांसेचें सर्व रहस्य खालील तीन विधानांत गोवलेलें आहे. देशांतील लोकसंख्या ही उपजीविकेच्या साधनांनीं अवश्यमेव मर्यादित झालेली । असते. ह्मणजे उपजीविकेच्या साधनांच्या पलीकडे लोकसंख्येची वाढ होणें शक्य नाहीं. उपजीविकेच्या साधनांत फक्त अन्न व उदक इतकेंच येतें असं नाहीं. ज्या गेौटीं समाजांत प्रत्येक माणसाला अत्यंत अवश्यक गणल्या जातात त्या सर्वांचा समावेश उपजीविकेच्या साधनांत केला पाहिजे. आतां या ज्या उपजीविकेला अत्यंत अवश्यक गोष्टी त्यांच्या प्रमाणापलीकडे लोकसंख्या वाढू शकणार नाहीं हें उघड आहे. या गोष्टींपेकीं धान्य हें प्रधान अंग होय हेंही स्पष्टच आहे. परंतु पुष्कळ दिवस वसाहत केलेल्या देशांत व जेथें जमीनीच्या सुपीकतेची पराकाष्ठा होऊन । गेली आहे अशा देशांत उतरत्या पैद्राशीचा नियम लागू असतो व म्हनूनच धान्याची पैदास वाढण्यास श्रम व भांडवल हे जास्त जास्त लागू लागतात. या गोष्टी मनांत धरूनच मॅलथसनें मनुष्याची वाढ भूमितिश्रेढनें होते असें ह्मटलें आहे. वास्तविक सर्व सजीव वस्तूंना. भूमिति श्रेधींचे प्रमाण लागू आहे. सर्व वनस्पति व प्राणिमात्र यांमध्यें सृष्टीनें उत्पादनशक्ति इतकी जबरठेविली आहे कीं, या वाढ °° परि- - स्थित असल्यास एका वनस्पतीच्या बीजापासून थोड्या काळांत सूर्व पृथ्वी भरून टाकतां येईल. नवीन वसाहतीमध्यें जीं जनावरें पूर्वी नव्हतीं उदाहरणार्थ, आस्ट्रेलियांत बकरीं घ्या-त्यांच्या थोड्याशा बाहेरून नेलेल्या. जोडप्यांपासून त्या वसाहतीभर त्यांचा आतां प्रसार झाला आहे. ह्मणजे भूमितिश्रेढीने वाढण्याचें प्रमाण सर्व प्राण्यांत व वनस्पतींत आहे खरें; प्ररंतु मनुष्यप्राण्याच्या वाढीत व त्याच्या वनस्पतीरुप अन्नाच्या वाढीत खालील प्रकारचा विरोध उत्पन्न होतो. जोंपर्यंत लागवड न केलेली जमीन पुष्कळ आह तोपर्यंत अन्न पुष्कळ वाढू शकतें ह्मणूनच नवीन वसाहत झालेल्या अमेरिकेमध्यें लोकसंख्या झपाठयानें बाढ़ली. कारण त्या ठिकाणीं लोकसंख्येच्या वाढीस निग्रह नाहीत; सुपीक जमीन मुबलक, लोकांची राहणी साधी, लोक जास्त शुद्ध व पवित्र, यामुळे तेथें स्त्रीपुरुष वयांत आल्याबरोबर लग्ने होत. कारण संततीच्या जोपासनेची व उपजीविकेची अडचण नव्हती. यामुळे अमेरिकेंत दर पंचवीस वर्षीमध्यें लोकसंख्येची दुप्पट होत असे. कांहीं ठिकाणीं तर दर वीस वर्षानीं किंवा पंधरा वर्षानीं सुद्धां दुप्पट झाल्याचीं उदाहरणें आहेत. यामध्यें मॅलथसनें परदेशांतून येणा-या लोकसख्येची वजावाट करुन तेथील लोकसंख्या वाढत्या प्रमाणानें होत गेली आहे असें अमेरिकेच्या दीडशें वर्षांच्या अनुभवावरून दाखविलें आहे. तेव्हां लोकसंख्येचा निग्रह करणा-या कोणत्याही गोष्टी नसल्या ह्मणजे सामान्यतः दर पंचवीस वर्षांनीं लोकसंख्येची दुप्पट होते असा सिद्धांत निघतो. उदाहरणार्थ, एखाद्या देशांत १ लाख लोक आहेत असें धरलें तर २५ वर्षांनीं ते २ लाख होतील; ५० वर्षांनीं ४ लाख होतील; ७५ वर्षांनीं ८ लाख होतील व १ शतकानें १६ लाख होताल. परंतु इतक्या झपाट्याने अन्न मात्र वाढणार नाहीं. कारण एकतर सुपीक जमीन सर्व पृथ्वीवर मर्यादित आहे व एकंदर जमीनही मर्यादित आहे. ही जमीन वाढविणें शक्य नाहीं. तेव्हां धान्य वाढविण्याचा उपाय ह्मणजे लागवडीस असलेल्या जमिनीचीच जास्त मशागत करून त्यात खतमूत घालून जास्त धान्य उत्पन्न करणें हैं होय. आतां या साधनांनीं धान्याची पैदास जास्त होते खरी. तरीपण ती उतरत्या प्रमाणांत होते. यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नाचा तुटवडा हा पडलाच पाहिजे. ह्मणजे या अन्नाच्या पैदाशींच्या बाहेर लोकसंख्या जाणें शक्य नाहीं देशांत जर लोकसंख्येस पुरेसे धान्य व जीविताचीं इतर साधनें नसली तर मानवी संतति निरोगी व पूर्ण वाढीची होणार नाहीं हैं उघड'आहे .ह्रणजे लोकसंख्येच्या आधीं अन्नाची वाढ झाली पाहिजे.  मॅलंथसच्या मीमांसेंतील दुसरें विधान असें आहे. ' सबळ व स्पष्ट अशा निग्रहाच्या अभावीं उपजीविकेच्या साधनांच्या वाढीबरोबर नियतपण लोकसंख्येची वाढ होतेच होते. या विधानास मॅलथस यानें एक महत्वाचा उपाधि जोडला आहे. तो हा कीं, उपजीविकेच्या साधनांची वाढ अगर अन्नाची वाढ सामान्य लोकांपर्यंत पोंचली तरच लोकसंख्या वाढेल. वाढलेलें अन्न कायद्याच्या योगानें किंवा दुस-या कांहीं कारणांनीं श्रीमंत लोकांच्याच हातीं राहून त्याचा दुसरीकडे विनियोग झाला तर या अन्नवाढीचा परिणाम लोकसंख्येवर होणार नाहीं. अन्नाच्या वाढीचा परिणाम होण्यास तें अन्न बहुजन समाजाच्या वांट्याला मजुरीच्या वाढीच्या रूपानें आलें पाहिजे किंवा दुस-या रूपानें बहुजनसमाजाच्या हातीं पडलें पाहिजे; तरच लोकसंख्येच्या वाढीस सुरुवात होईल.
 मेंलथसचें हें विधान पुष्कळ वेळां विसरल गेलें आहे किंवा त्याचा भलताच अर्थ केला गेला आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे उपजीवकेचीं साधनें दुर्मिळ होतात व लोकसंख्येचा मारा त्यावर पडतो असें नव्हे. त्र अन्नाची वाढ झाल्याबरोबर जर सबळ असे लोकसंख्येचे निग्रह अस्तित्वांत आले नाहींत तर लोकसंख्या अवश्यमेव वाढते. तेव्हां लोकसंख्येची वाढ ही लोकसंख्येच्या वाढीस अनुकूल कारणें व प्रतिबंधक कारणें या दोहोंचा एकवटलेला परिणाम होय.
 तिसरें विधान असें आहे, 'लोकसंख्येला उपजीविकेच्या साधनांच्या मयर्देित ठेवणारे सबळ निग्रह ह्मणजे ब्रह्मचर्थ, व्यसन व विपत्नि हे हीत. या निग्रहाचे साक्षातू व प्रतिबंधक निग्रह असे दोन वर्ग करतां येतात. ज्या निग्रहाच्या योगानें लोकांतील मरणांची संख्या वाढून लोकसंख्या कमी होते ते साक्षात् निग्रह होत व ज्या निग्रहाच्या योगानें लोकांतील जननाचें प्रमाण कूर्मी होऊन लोकसंख्या कमी होते ते प्रतिबंधुक निग्रह होत. प्रतिबंधक निग्रहामध्यें ब्रह्मचर्य व व्यसन यांचा समावेश होतो.
 ब्रह्मचर्य ह्मणजे बाहेरख्यालीपणा न करितां लुगऩखेरीज बेंत्स्य राहणें होय. आपल्या कुटुंबाचें व भावी मुलाबाळांचें संगोपन करण्याचें सामथ्र्य येईपर्यत शुद्ध राहून लक्ष लांबणीवर टाकणें याला मॅथलसने ब्रह्मचर्य म्हटलें आहे. आजन्म ब्रह्मचर्य असा त्याचा अर्थ नव्हे. प्रजोत्पति बंद करणारी व्यसनें इतकाच व्यसन याचा संकुचित अर्थ मैंलथसनें केला आहे. स्त्रीपुरुषांमध्यें अनियंत्रित अस्वाभाविक व्यवहार व बाहेरख्याली वगैरेसारख्या व्यसनांचा यामध्यें अन्तर्भाव होती, हीं व्यसनें केव्हां केव्हां अगदीं रानटी समाजांत तर केव्हां केव्हां अगदीं सुधारलेल्या समाजांतही दिसून येतात.
 साक्षात् निग्रह हे हव्या तितक्या कारणांनीं उत्पन्न होतात; यांपेकीं कांहीं स्वाभाविक किंवा सृष्टिनिर्मित होत. जसे दुष्काळ, सांथ, भूकंप, जलप्रलय वगैरें; व कांहीं मनुष्यकृत असतात. जसें लढाया, दंगेधोपे, रोगराई, दुखणेंबाणें व उपासमार. या साक्षात निग्रहांचा समावेश विपति या एका सदरांत होतो. म्हणजे एकंदर पूर्वोत्त तीन निग्रहच शेवटीं कायम ठरतात. पकीं व्यसन व ब्रह्मचर्य हे प्रतिबंधक निग्रह होत व विपति हा साक्षातू निग्रह होय.
 साक्षात् निग्रह व प्रतिबंधक निग्रह यांच्यामध्यें व्यस्त प्रमाण असतें. परंतु त्यांचे परिणाम जी जननमरणसंख्या ती समप्रमाणांत असते. ह्मणजे जेथें जनन जास्त तेथें मरण जास्त व जेथें जनन कमी तयें मरण कमी. जेथें साक्षात निग्रह जास्त प्रमाणांत असतात तेथें प्रतिबंधक निग्रह कमी प्रमाणांत असतात व जेथें साक्षात निग्रह कमी प्रमाणांत असतात तेथें प्रतिबंधक निग्रह जास्त प्रमाणांत असतात. उदाहरणार्थ, ज्या समाजांत दुष्काळ, उपासमार,सांथ व रोग इत्यादि विपत्तीमुळे लोकसंख्येचा नाश फार होत असते त्या समाजांत व्यसन किंवा ब्रह्मचर्य कमी असतें म्हणजे तेथें लग्ने फार लवकर होतात. अर्थात् अशा समाजांत जननसंख्या ही फार मोठी असते, व मरणसंख्याही जबर असते. परंतु ज्या ज्या समाजांत ब्रह्मचर्य पाळल्यामुळे जननप्रमाण फार बेतांत असतें त्या त्या समाजांत मरणसंख्याही पुष्कळ कमी असते.
 मॅलथसची लोकसंख्या-मीमांसा वर वर्णिलेल्या तीन विधानांत आहे. यांपैकी पहिलें बुिधान अगदीं उघड निर्विवाद आहे. दुस-या टोन विधानांचें समर्थन मॅलथसनें निरनिराळ्या देशांच्या व समाजांच्या इतिहासांवरुन केलें आहे व हा प्रत्यक्ष पुरावा व ती गोळा करण्याची खटपट हाच मॅलथसच्या ग्रंथाचा विशेष आहे. अगदीं रानटी स्थितींतील समाजापासून तों युरोपांतल्या अगदीं सुधारलेल्या समाजाचें मॅलथसनें सिंहावलोकन केलें आहे व या प्रत्येक समाजामध्यें अन्न व लोकसंख्या यांच्यामध्येंकोणत्या निग्रहानें समीकरण घडून आलेलें आहे हें त्यानें दाखविलें आहे. व त्याच्या सिंहावलोकनाचें पर्यवसान असें आहे की, जसजसा। समाज सुधारत जातो तसतसा त्या समाजामध्यें साक्षात् निग्रहापेक्षां प्रतिबंधक निग्रहाचा प्रभाव जास्त जास्त होत जातो व असें होणें समाजांतील लाकाच्या कल्याणाच्या दृष्टीनं इष्ट आहे.
 रानटी स्थितींतील समाजांतील लोकसंख्या व अन्न यामधील समीकरण निरनिराळ्या त-हेच्या विपत्तींनी व व्यसनें, दुर्गुण व आपत्नी यांनीं घडून येतें. अंदुमानसारख्या किंवा टेराडेलफुगोसारख्या नापीक जमिनीत लोकांचा उद्योगसर्वस्व ह्मणजे जमिनींत व समुद्रांत मिळणारें स्वाभाविक अन्न मिळविणें हा होय. येथें त्यांच्या नेहमींच्या उपासमारीनें व सततच्या दुष्काळानें लोकसंख्या कमी होते, तर कोठे स्त्रीपुरुषांच्या व्यसनी संवयी व दुष्ट चालीरीती या विपत्तींनीं लोकसंख्या कमी होतेः तर कोष्ठं आपापसांतील भयंकर लढाया व आजन्म हाडवैर यांनीं लोकसंख्या कमी होते. सारांश, रानटी स्थितींतील समाजांत लग्रासंबंधीं दूरदर्शींपणाचा किंवा ब्रह्मचर्य या निग्रहाचा जोर नसतो. तर विपत्ति, व्यसन, गुन्हे वगैरे निग्रहाचा पगडा जास्त असती. परंतु समाज जसजसा ज्ञानवान् व सुधारलेला होत जातो तसतसा ब्रह्मचर्य हा नैतिक निग्रह प्रधान होत जातो व असें होण्यांतच समाजाचें हित आहे.
 मॅलथसच्या या मीमांसात्मक निबंधानें त्या काळच्या विद्वान् लोकांत अगदी गडबड उडवून दिली. पाद्री, धर्मोपदेशक व इतर धार्मिक लोकांनी मॅलथसवर शिव्यांचा वर्षाव उडवून दिला; तर श्रीमंत व इनामदार लोकांनीं मॅलथसच्या मताचा तेव्हांच स्वीकार केला. कारण मॅलथसच्या मताप्रमाणें गरीब लोकांच्या विपत्तीबद्दल आपल्यावर जबाबदारी नाही; ही विपनि गरीब लोकांनीं लक्षासंबंधींच्या आपल्याच अविचारी वर्तनानें आपल्यावर औढून घेतली असें त्यांना समर्थन करता येऊ लागलें. मॅलथसच्या मतें अन्नाच्या प्रमाणांत लोकसंख्या आणण्याकरितां विपत्ती, गुन्हे व दुव्यसनें हीं स्वाभाविक साधनें आहेत व मनुष्याच्या लग्र करण्यानेंहीं त्याच्यावर विपति। ओढवते असें झालें. हीं दोन्हीं विधानें ख्रिश्चन धर्मावर व ईश्वरी व्यवस्थेवर काळिमा आणणारी आहे. व या मुद्यावर मॅलथसवर धर्मपर लोक रागावले.
 परंतु मॅलथसचा हा निबंध लिहिण्यांत दारिद्यावस्थेचे एक कारण समाजापुढें मांडण्याचा होता. त्याच्या मीमांसेचा मथितार्थ इतकाच कीं, मानवी प्राण्यामध्यें ही जी स्वाभाविक लग्नाची इच्छा व तिचा स्वाभाविक परिणाम लोकसंख्यावृद्धि यावर दाब राहिला नाहीं तर लोकसंख्या झपाट्यानें वाढून समाजांत विपत्ति, दुःख, व्यसनें व गुन्हे उत्पन्न झाल्याखेरीच राहणार नाहींत. तरी समाजांतील हे अनर्थ नाहीसे करावयाचे असतील तर ब्रह्मचर्याची कल्पना समाजांत व विशेषतः खालच्या वर्गात प्रचलित झाली पाहिजे. आपल्या कुटुंबाचें व भावी संततीचें पालनपोषण योग्य तऱ्हेने करतां यईल अशा प्रकारची आपली सांपत्तिक स्थिति असल्याखेरीज लग्न करावयाचें नाहीं अशा प्रकारची भावना व तदनुरुप प्रवृत्ति सुधारलेल्या समाजांतील सुशिक्षितांमध्यें व उच्च वर्गामध्यें आधींच उत्पन्न झालेली असते; हीच प्रवृत्ति कामगार व मजूरलोकांमध्यें वाढली पाहिजे; व हें होण्यास सर्व लोकांस शिक्षण फुकट मिळालें पाहिजे व त्यांना चांगलें राहण्याची वासना उत्पन्न झाली पाहिजे; समाजांतील लोकांना सुखी होण्याचा हा खरा मार्ग आहे. संपत्तीची सारखी वांटणी करणें किंवा सरकारी खात्याकडून गरिबास दान देवविणें हें त्यांना सुधारण्याचे खरे मार्ग नव्हेत; एवढेंच मॅलथसचें म्हणणें होतें. लोकांच्या सुखाकरितां देशांतील लोकसंख्या कमीच झाला पाहिजे व माणसानें लग्र करणें व प्रजेात्पादन करणें हें पाप आहे अशा प्रकारचें प्रतिपादन मॅलथसनें कोठेच केलेलें नाहीं. उलट उपजीविकेचीं साधनें वाढतील न्या मानानें लोकसंख्या वाढावी अशी त्याची इच्छा होती. मात्र ही वाढ जन्मास येतील तेवढी मुलें जगून तीं सदृढ निरोगी निपजून व लेाकामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होऊन व्हावी एवढीच त्याची इच्छा होती.
 मॅलथसची मीमांसा ही अर्थशास्त्रांतील एक प्रमुख भाग होऊन बसली आहे. ज्याप्रमाणें अॅडाम स्मिथनें समाजांतील संपत्तीच्या वाढीचीं कारणें शोधून काढून लोकांचें लक्ष तिकडे वेधलें, त्याप्रमाणें मॅलथसनें दारिद्याचें एक कारण शोधून काढून त्याकडे लोकांचें लक्ष वेधविलें व त्यापासून आपला बचाव करण्याचा उत्तम मार्ग कोणता हे दाखविलें. तो मार्ग म्हणजे लोकांच्या स्वाभाविक वासनांची सुधारणा व जास्त उन्नत अशी सामाजिक कल्पना इचा प्रसार होय.
 मॅलथसने आल्या मीमांसेमध्यें ज्या दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत म्हणून वर सांगितलें आहे त्यांपैकीं एका गोष्टीबद्दल कांहीं उत्क्रान्तिवाद्यांनीं आक्षेप घेतला आहे. विवाहवासना ही त्याच्या उन्नतीबरोबर कमी होते व त्याची प्रजोत्पादनशक्तिही कमी होते असे त्याचें म्हणणें आहे. हर्बर्ट स्पेन्सरनें असें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे कीं, जसजसा समाज उत्क्रान्तीच्या व भरभराटीच्या वरच्या पायरीवर जाऊं लागतो तसतशी प्रजोत्पादनशक्तिही कमी होते. सुाशिक्षित माणसांची व बौद्धिकधंदे करणाराची प्रजोत्पादनशक्ती कमी होत जाते असें दिसून येतें. परंतु ही गोष्ट स्वाभाविकपणें होते किंवा बह्मचर्याच्या प्रवृत्तीनें होते याचा निर्णय झालेला नाहीं व या विषयासंबंधीं उत्क्रान्तिवाद्यांमध्यें कोणतेंही ठाम मत झालेलें नाहीं. तेव्हां सामान्यतः मॅलथसचें म्हणणें सर्वसाधारण समाजाला अजूनही लागू आहे यांत शंका नाही.
 लग्नाची वासना व प्रजोत्पादनाची शक्के यांचा समाजाच्या सांपत्तिक स्थितीशीं व मनुष्याची भरभराट किंवा विपत्ति यांच्यांशीं संबंध आहे, हें आमच्या हिंदूसमाजाला अश्रुतपूर्वच आहे. आमच्यांतील या संबंधाच्या चाली व कल्पना यांचा धर्माशीं निकट संबंध असल्यामुळे या चाली व कल्पना परिस्थिति कितीही बदलली तरी ' बदलल्या नाहींत. हिंदूसमाजांत अशी एक कल्पना प्रचलित आहे कीं, प्रत्येक मुलीचें लग्न झालेंच पाहिजे. तसेच प्रत्येक पुरुषानें गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. या धार्मिक कल्पनेमुळे मुलांमुलींचीं लग्ने करून देणें हें आईबापांचें आद्यकर्तव्य आहे असें समजलें जातें, यामुळे आमचीं लग्ने म्हणजे अर्थशास्त्रकार ज्याला बालविवाह म्हणतात त्या काळाच्याही आधींच होतात. स्त्रीपुरुष उपवर झाल्याबरोबर विवाह होणें म्हणजे मुलीचा चवदापंधराव्या वर्षी व मुलाचा सतराअठराव्या वर्षी होणारा विवाह याला ते बालविवाह म्हणतात. आमचे इकडील विवाह यापूर्वीच घडून आलेले असतात. यामुळे लोकसंख्येचा ब्रह्मचर्य अगर आत्मसंयमन म्हणून जो निग्रह मॅलथसनें सांगितला आहे.त्याला येथे अवकाश राहत नाही. आमच्या सर्व जातींमध्यें मुलांमुलींचा विवाह करून देणं हें आईबापांचें पहिलें कर्तव्यकर्म समजलें जांतें. आपल्या मुलाबाळांचें शिक्षण कसें होईल व ते आपल्या पायांवर उभे राहण्यास कसे तयार होतील याची इतकी काळजी आईबापांना नसते. परंतु मुलाचे दोहोंचे चार हात कधीं होतील ही मोठी काळजी आईबापांना असते व मुलाचें लग्न झाल्यावर नातवाचें तेंड कधीं पाहीन असें त्यांना होऊन जातें. आमच्या समाजांत मुलाच्या शिक्षणाला पैशाची अडचण असतांना त्याकडे कानाडोळा करून मुलाचें आधीं लग्न करून देण्यास तयार असणारे बाप पुष्कळ असतात. अलीकडे हुंडयाचें मान वाढल्यामुळें मुलाचें लग्न करणें हा एक किफायतशोर धंदा होऊं पहात आहे व मुलाची जास्त किंमत येण्याच्या आशेनें कांहीं आईबाप आपल्या मुलाचें लग्न लांबणीवर टाकतात. सारांश, युरोपामध्यें विवाहाचा प्रश्न हा प्रौढ पुरुषांनीं किंवा स्त्रियांनी आपआपल्याबद्दल सोडविण्याचा प्रश्न आहे तर येथें विवाह जमविणें न जमविणें हा आईबापांच्या इच्छेचा व नफ्यातोट्याचा प्रश्न झालेला आहे. तेव्हां लोकसंख्येचे आमच्या समाजांत साक्षात निग्रहच अस्तित्वांत आहेत. प्रतिबंधक निग्रहाला येथें जागाच नाही. सुधारलेल्या देशांत वरच्या वर्गामध्ये या निग्रहाचें प्राबल्य असतें. मात्र कनिष्ट वर्गामध्ये ही भावना वाढवावयाची हें तिकडील समाजसुधारकांचें काम आहे. परंतु आमचे इकडे लग्न करणें हे स्त्रीपुरुषांचें प्रौढ़ वयांत आल्यावर आपल्या इच्छेप्रमाणें करण्याचें कर्तव्यकर्म होय; येथें आईबापांचें कांहीं काम नाही; आईबापांनीं मुलांमुलींना शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास शिकविलें म्हणजे झालें ही भावना प्रथम उत्पन्न करावयाची आहे व आपल्या बायकोचें व मुलांचें पालनपोषण करण्याचें सामर्थ्य आल्याखेरीच लग्र करणें ही गोष्ट फार अनिष्ट आहे व प्रत्येक मनुष्यानें आपल्या पायावर उभे राहण्यास शिकलें पाहिजे ही भावना सर्व वर्गाच्या लोकांमध्यें उत्पन्न करावयाची आहे. अशा प्रकारची भावना उत्पन्न झाल्यानेंच आमच्या समाजांतील पुष्कळ विपत्ती व दुःखें कमी होणार आहेत. हल्लीच्या आमच्या समाजांत रानटी समाजांतील स्थिति दृष्टोत्पनीस येते.म्हणजे आमच्या समाजांत अन्न व लोकसंख्या यांचें समीकरण साक्षात निग्रहांनीं घडून येत आहे. म्हणूनच मार्गे सांगितल्याप्रमाणें आमच्या समाजांत जननाचें प्रमाण फार आहे. कारण, बालविवाहाचा व प्रत्येक स्त्रीचें लग्न करण्याचा प्रवात जारीनें चालू आहे. मात्र विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नसल्यामुळे लग्न झालेल्या पुष्कळ बायकांना वैधव्यावस्थेंत राहून जुलुमानें आत्मसंयमन अवश्यमेव करावें लागतें. अशा स्थितीमुळें हिंदुस्थानांत लोकसख्या साक्षातू निग्रहानें कमी होते म्हणजे येथें मृत्यूचें प्रमाणही फार जबर आहे.
 वर दिलेल्या विवेचनावरून असें दिसून येईल कीं, जरी हिंदुसमाजाची सामाजिक स्थिति व चालीरीति युरोपांपेक्षां अगदीं निराळ्या आहेत तरी अन्न व लोकसंख्या यांचें समीकरण मॅलथसच्या तत्त्वाप्रमाणेंच घडून येत आहे. परंतु समाजांतील निरनिराळ्या जातींतील लोकांची सुधारणा करावयाची असल्यास त्यांच्यामध्यें जास्त उन्नत अशा राहणीची आवड उत्पन्न केली पाहिजे, याकरितां शिक्षण सार्वजनिक झालें पाहिजे व प्रौढपणों लग्न करण्याची व आपली स्थिति सुधारण्याकरितां लग्नाच्या बाबतींत कांहीं काळ आत्मसंयमन करण्याची भावना लोकांमध्यें उत्पन्न केली पाहिजे. याची पहिली पायरी म्हणजे प्रेौढविवाहाचा प्रचार सुरू झाला पाहिजे, व हें होण्यास मुलीच्या लग्नाची पराकाष्ठेची मर्यादा म्हणजे ऋतुप्राप्ति ही जी धार्मिक कल्पना आहे ती नाहींशी झाली पाहिजे. ही सुधारणा व हा कल्पनाविच्छेद सुशिक्षितांनीं आपल्या उक्तींनी व कृतींनी घडवून आणिला पाहिजे.

[भाग अकरावा.]

[भांडवलाची वाढ.]

 संपत्तीच्या उत्पत्तीच्या मूर्त कारणांचा विचार करतांना असें दाखविलें आहे कीं, समाजाच्या प्रथमावस्थेंत सृष्टीशक्ती व मानवी श्रम या दोहोंच्या साहाय्यानेंच संपत्ति उत्पन्न होते व भांडवल हें या दोहोंचा परिणाम आहे. तरी पण समाजाच्या परिणतावस्थेत या मागाहून आलेल्या कारणालाच प्राधान्य येतें. आतां या भांडवलाची देशांत वाढ कशी होत जाते हें पहावयाचें आहे. भांडवल हें संपत्तीचेच एक विशेष स्वरुप असल्यामुळे भांडवलाच्या वाढीचा प्रश्न म्हणजे पर्यायानें संपत्तीच्या वाढीचाच प्रश्न आहे व म्हणूनच या बिकट प्रश्नाबद्दल अजूनही अर्थशास्त्रज्ञांमध्यें बराच सामान्य व सहज मनांत येणारा अर्थ धरून चालावयाचें नाहीं. कारण, जर प्रत्येक मनुष्य आपली वासना कमी करूं लागला तर संपत्ति उत्पनच होऊं शकत नाहीं. कारण, संपत्तीच्या उत्पत्नीचें एक अमूर्त कारण नाहींसे होतें व संपत्तीचा उत्पत्तिच बंद झाली म्हणजे भांडवल वाढत नाहीं इतकें नव्हे तर देशांताल असलेलें भांडवल नाहींसें होतें.
 तेव्हां भांडवल वाढण्याचें खरें कारण म्हणजे संपत्तीची पुष्कळ उत्पत्ति व पुष्कळ व्यय होय. अर्थात संपत्तीचा जोरानें व्यय होऊं लागला कीं उत्पत्तीला उत्तेजन मिळतें व उत्पति व ध्येय या दोहोंची वाट म्हणजे लोकांच्या नफ्याची वाढ व नफ्याची वाढ म्हणजे भांडवलाची वाढ होय. याला हिंदुस्थानच्या गेल्या दोनचार वर्षांचें उदाहरण उत्तम आहे. मुंबईस गिरण्यांचा व्यापार आज पुष्कळ वर्षे चालू आहे, परंतु गेल्या वीस किंवा पंचवीस वर्षांत भांडवलाची वाढ झाली नसेल इतकी वाढ गेल्या ३॥४ वर्षांत झाली. ही वाढ कशी झाली ! या गिरणीवाल्यांनी आपला खर्च अगदीं कमी करून सर्व उत्पन्न मागें टाकलें काय ? नाहीं. या भांडवलाच्या वाढीशी त्यांच्या खासगी उत्पन्नाचा किंवा खर्चाचा संबंध नाहीं. ही भांडवलाची वाढ व्यापाराच्या विलक्षण तेजीनें झाली व ही व्यापाराची तेजी म्हणजे तरी काय ? हिंदुस्थानामध्यें जी एक स्वदेशीची लाट उसळली त्या लाटेमुळे मुंबईच्या ,मालाला मागणी फार वाढली. यामुळे गिरणीवाल्यांनी आपल्या मालाची पैदास आपल्या गिरण्यांच्या पराकाष्ठेच्या शक्तीपर्यंत वाढविली व त्यांचा माल उत्पन्न झाल्याबरोबर किंवा आधींच विकला जाऊं लागला. या संपत्तीच्या उत्पति व व्यय यांच्या भराभर परिवर्तनानें भांडवलाची वाढ झाली. गेल्या २॥३ वर्षात पांचपंचवीस नवीन गिरण्या निघून मुंबईच्या कारखानदारांनी २-३ कोटींच्या ब्यांका काढल्या व टाटाच्या लोखंडाच्या कारखान्यास २ कोटी भांडवल पुरविलें. इतका हा भांडवलाचा पूर कशानें झाला? काटकसरीनें साफ नव्हे. तर कारखानदारास नफा फार झाला त्याच्यायोगानें होय.
 वरील विवेचनावरून मिल्लच्या सिद्धान्तामधील ख-याखोट्याचा भाग तेव्हाच ध्यानात येईल. ज्या वेळीं प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा स्वतःच्या श्रमाने भागवितो त्यावेळीं काटकसरीनें शिल्लक पडते व त्याच्यायोगानें भांडवल तयार होतें हें म्हणणें खरें आहे। परंतु ज्या काळीं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर चालतात त्या वेळीं संपत्तीची उत्पत्ति व व्यय यांच्या अंतरानें भांडवल शिल्लक पडत जात नाहीं; तर कारखानदाराचा माल भराभर खपला पाहिजे म्हणजे दुस-या लोकांनींं त्याचा उपभोग घेतला पाहिजे व अशा त-हेनें व्यापाराला तेजी असली म्हणजे कारखानदारास नफा होती व या नफ्यापेैकीं त्यानें कमी खर्च केला व शिल्लक ठेविली म्हणजे भांडवल वाटतें. तेव्हां सुधारलेल्या औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या समाजांत नफ्याच्या शिलकेंतून भांडवल वाढतें; निवळ संपत्तीच्या शिलकेंतून भांडवल वाढत नाहीं. समाजाच्या बाल्यावस्थेमध्यें प्रत्यक्ष संपत्ति शिल्लक टाकल्यानें भांडवल वाढतें. परंतु पुढें हा साधा प्रकार राहत नाहीं व त्याला मोठें गुंतागुंतीचें स्वरूप येतें.
 तेव्हां काटकसर याचा मर्यादित अर्थ घेतला पाहिजे. व काटकसर याचा चटकन् ध्यानांत येणारा अर्थ-खर्च कमी करणें-हा अर्थशास्त्रांतील खरा अर्थ,नव्हें हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. अर्थशास्त्रदृष्टया काटकसर ह्मणजे [प्रत्येक मनुष्यानें पुष्कळ खर्च करणें; परंतु आपलें उत्पन्न खर्चापेक्षांही जास्त करणें होय; असा अर्थ धरला म्हणजे नव्या जुन्या अर्थशास्त्रकारांच्या मतांची संगति लागते.
 आतां या मयोदित अर्थीं शिल्लक टाकण्यास कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत याचा विचार करणें इष्ट होईल.
 शिल्लक टाकण्याला पहिली अनुकूल गोष्ट म्हणजे मनुष्याची दूरदृष्टि ही हेोय. अगदीं रानटी स्थितींत या बाबतींत पशू व मनुष्य यांमध्यें फारसें अंतर नसतें, परंतु जसजसे मनुष्याचें ज्ञान वाढतें तसतशी ही दूरदृष्टि वाढत जाते. भावी वासना किंवा भविष्यत्काळी उत्पन्न होणा-या गरजा याची आधीं तरतूद करण्याची प्रवृत्ति जसजशी वाढलेली असते त्या त्या मानानें मनुष्यसमाजाची सुधारणा झालेली आहे असें म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे ही दूरदृष्टि हें मानवी सुधारणा मोजण्याचें एकप्रकारचें माप आहे असें म्हटलें तरी चालेल. कांहीं रानटी जातींंची सुधारणा कधींंच होत नाहीं. कारण, त्यांच्यामध्यें हा गुण उद्भूतच झालेला नसतो. कारण भावी वासना आपल्या मनापुढें मूर्तिमंत उभी करणारी कल्पनाशक्ति इचा या लोकांमध्यें अभाव असतो. रानटी मनुष्य आतांची वासना तृप्त करण्याकरितां उदाहरणार्थ, फळ काढण्याकरितां झाड तोडण्यास कमी करणार नाहीं. ही अदूरदृष्टी किंवा अविचार मुलें, रानटी लीक, गरीब लोक व उडाणटप्पू लोक या सर्वांमध्यें दृष्टीस पडते. दूरदृष्टिपणाची वाढ ही भांडवलाच्या वाढीस अनुकूल आहे हें मागें दिलेल्या भांडवलाच्या मूळ कल्पनेवरूनही दिसून येईल. अप्रत्यक्षपणें किंवा प्रत्यक्षपणें भावी वासनांची तृप्ती करण्याकरितां राखून ठेविलेली संपत्ति अशी भांडवलाची मूळ कल्पना आहे, परंतु अशी तरतूद करण्याची नेहमींची संवय म्हणजेच दूरदृष्टि होय.
 शिल्लक टाकण्यास दुसरी अनुकूल गोष्ट म्हणजे टिकाऊ संपत्तीचें अस्तित्व होय. मृगयावृत्ति माणसाला दूरदृष्टि असली तरी शिकार फार दिवस राहणें शक्य नसतें. यामुळें त्याला शिल्लक टाकण्याची बुद्धि होत नाहीं, व बुद्धि झाली तरी तिचा तादृश उपयोग नसतो. कारण, शिकारीचें फळ थोड्या काळांत नासून जाणारें असतें. त्या काळींं कातडींं वगैरे टिकाऊ असतात खरीं, परंतु कातडींं कमावण्याची कला मृगयावृत्ति माणसाला ठाऊक नसते. परंतु मनुष्याच्या गरजा या काळीं फार कमी असतात व लोकवस्ती फार कमी असल्यामुळें मृगया न मिळण्याची केव्हांही धास्ती नसते. यामुळें भावी वासनांची तरतूद करण्याची त्या काळीं मनुष्यास जरूरी नसते व तितकी त्याची कल्पनाशक्तिही वाढलेली नसते. म्हणून त्या वृत्तीमध्यें समाजांत संपत्ति व भांडवल हीं दोन्हींही उत्पन्न होऊं शकत नाहींत. गोपालवृत्ति समाजांतील संपत्ति गुराढोरांची व शेळ्यामेंढ्यांची असते व या संपत्तीची वाढ आपोआप नैसर्गिक क्रमानेंच होते. येथें सर्व संपत्ति ही भांडवलही असते, व मनुष्याच्या श्रमाखेरीज पशूरूपी संपत्ति आत्मसदृश संपत्तीला प्रसवते. यामुळें या समाजाच्या स्थितींंत जरी दूरदृष्टीची फार वाढ झाली नाहीं तरी नैसर्गिक कारणांनींंच प्रत्येक मनुष्याची संपत्ति वाढत जाते. कृषिवृत्ति समाजांत मात्र संपत्तीची वाढ ज्याप्रमाणें झपाट्यानें होते त्याचप्रमाणें भांडवलाचीही वाढ झपाट्यानें होऊं लागते. कारण या स्थितींत पुष्कळ टिकाऊ संपृत्तीचे प्रकार अस्तित्वांत आलेले असतात व मनुष्याच्या अवश्यकापैकीं मुख्य जें धान्य तेंही पुष्कळ कांळपर्यंत टिकूं शकतें व म्हणून दुष्काळासारख्या आपत्तींंत उपयोगी पडण्याकरितां धान्य पुरून ठेवण्याची पद्धति सुद्धां अमलांत येते. तरी पण धान्य हें थोड्या फार कालानें नासणारेंच आहे. शिल्लक टाकण्याच्या प्रवृत्तीला सोन्यारुप्याच्या नाण्याच्या प्रसारापासून जास्त उत्तेजन मिळतें. कारण, सोनेंरुपें व त्यांचींं नाणींं हीं अत्यंत टिकाऊ संपति आहे. तशीच ठेवल्यानें किंवा पुरून ठेवल्यानें ती नासत नाहीं, गंजत नाही किंवा कमी होत नाहीं. शिवाय नाणी किवा पैसा हा सर्व सपत्तीचा विनिमय-सामान्य असल्यामुळें कव्हांही त्याच्या मोबदला आपल्याला पाहिजे ती माल मिळतो. तसेंच नाण्याचें मोलही स्थिर असल्यामुळें पैसे शिलुक टाकल्यानें आपलें नुकसान केव्हांही होण्याचा संभव नसतो. आपण खर्च केलल मोल केव्हांही आपल्याला परत मिळतें. परंतु उद्योगवृत्ति समाजांत पैशापेक्षां आणखीही एक नवीन साधन शिल्लक टाकण्याचें तयार होतें, तें साधन म्हणजे सरकारी प्राॅमिसरी नोटा, निरनिराळ्या खासगी व सार्वजनिक संस्थांचे शेअर्स व डिबेंचर्स होत. या रूपानें शिल्लक टाकण्यापासून व्यक्तीचा व समाजाचा असा दुहेरी फायदा होतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शिलकेपासून वार्षिक उत्पन्न मिळूं लागतें व देशांतील शिल्लक पैसा नाण्याच्या रूपानें अनुपयुक्त न राहतां उत्पादक भांडवलाच्या रूपानें देशांतील उद्यागधंद्यांची वाढ करतो.
 भांडवल वाढण्यास शेवटली अनुकूल गोष्ट म्हणजे शिल्लक टाकण्यास उत्तेजन देणा-या संस्था होत. पेढ्या, सहकारी पतपेढ्या, मजुरसंघ, परस्पर सहकारी मंडळ्या, आयुष्याचा विमा उतरणा-या मंडळ्या वगैरे प्रकारच्या संस्था या प्रत्यक्षपणें व अप्रत्यक्षपणें मनुष्याला संपत्ति शिल्लक टाकण्यास व काटकसर करण्यास उत्तेजन देणाऱ्या संस्था आहेत. देशामध्यें अशा संस्थांचा जितका जितका जास्त प्रसार होईल तितकें तितकें भांडवलाच्या वाढीस उत्तेजन मिळतें असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा संस्था निघणें हा लोकांच्या काटकसरीच्या प्रवृत्तीचा परिणाम आहे. अर्थात् या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. म्हणजे पहिल्याचा परिणाम दुस-यावर होतो व दुस-याचा परत पहिल्यावर होतो. ज्याप्रमाणें मालाचा पुरवठा व खप या परस्परावलंबी गोष्टी आहेत तसाच येथें प्रकार आहे. देशांत जसजशा असल्या संस्था वाढतात तसतसें देशांत भांडवलाच्या वाढीस उतेजन मिळतें व देशांत जसजसें भांडवल वाढूं लागतें तसतशा अशा संस्थ वाढूं लागतात. या संस्थांपैकी ब-याच संस्थांचें पुढील पुस्तकांमध्यें योग्य प्रसंगीं वर्णन यावयाचें आहे. तेव्हां संस्थांच्या नामनिर्देशापलीकडे व त्यांच्या सामान्य हितकारक परिणामापलीकडे येथें जास्त विचार करण्याची जरूरी नाहीं, या संस्थांचें स्वरूप व त्यापासून बहुजनसमाजावर होणारा सांपत्तिक परिणाम यांचें सविस्तरं विवेचन पुढें होईलच. परंतु अशा संस्थांपैकीं अलीकडे सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें अगदी सार्वांत्रिक झालेली संस्था म्हणजे पोस्टल सेव्हिंग बँक ही होय. हल्लींच्या काळीं ज्या ज्या ठिकाणीं पोस्टाचें ऑफिस असेल त्या त्या ठिकाणी गरीब लोकांच्या शिलकांची ठेव देण्याची सेहिंग बँकेची शाखा असतेच असते. या बँकेंत ८४ आण्यापासून सुद्धां रकमा ठेवीदाखल घेतल्या जातात व अशा बँका पोस्टांत असल्यामुळें खेडेगांवांतील लोकांससुद्धां त्याचा उपयोग करून घेतां येतो. या ठेवीवर लोकांना थोडेंबहुत व्याज मिळतें. ज्याप्रमाणें सहकारी पतीचें तत्व किंवा परस्पर साहाय्यकारित्वाचें तत्व या तत्वांनीं अलीकडे सामाजिक क्रांति घडवून आणली आहे त्याचप्रमाणें ही पोस्टल बँकांची कल्पना हा एक सामाजिक शोधच असून त्यानें जगांत मोठी क्रांति घडवून आणली आहे. गरीब लोकांची स्थिति सुधारण्यास त्यांच्यामध्यें दूरदर्शीपणा व काटकसर हे गुण वाढविण्यास व अतएव देशांत भांडवल वाढवून देशाचा व व्यक्तीचा असा दुहेरी फायदा करण्यास ही संस्था एक उत्तम साधन झालेलें आहे. वर सांगितलेंच आहे कीं, या संस्थांमध्यें अगदीं लहान लहान रकमाही ठेवी म्हणून घेतल्या जातात व असे पैसे मनुष्याच्या हातांत नसल्यामुळे खर्च होण्याचा संभव कमी असतो. आपल्याच घरांत पैसे आपल्या पेटींंत ठेवणें किंवा पुरून ठेवणें व पैसे बँकेंत ठेवणें यांमध्यें जो मोठा फरक आहे ते या गोष्टीमध्यें आहे. घरांत ठेवलेला पैसा आपल्या हातींच असतो व बँकेंतील पैसा दुस-याच्या हातांत असतो. दुसराही एक महत्वाचा फरक या दोन शिल्लक टाकण्याच्या पद्धतींत आहे; तो हा कीं, पहिल्या पद्धतींत आपल्या शिलकेपासून कांहीं एक उत्पन्न होत नाहीं, परंतु दुस-या पद्धतींत ठेव ठेवणाराला आपल्या शिलकेवर व्याजाच्या रूपानें वार्षिक उत्पन्न येऊं लागतें. या संस्थांनीं जगांत किती नवें भांडवल उत्पन्न केलें आहे हें दर वर्षीं प्रसिद्ध होणा-या स्टेट्समन व इतर बुकांमधील पोस्टल बँकेतील दर देशाच्या ठेवीच्या आंकड्यांवरून सहज दिसून येईल.
 हिंदूस्थानांत संपत्तीची वाढ होत चालली आहे किंवा नाहीं हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे व ज्यापेक्षां त्या प्रश्नाचा विचार सविस्तरपणें या ग्रंथाच्या सहाव्या पुस्तकांत करावयाचा आहे त्यापेक्षां येथें त्याचा विचार करण्याची जरूरी नाहीं. भांडवलाच्या वाढीला अनुकूल म्हणून ज्या गोष्टी वर सांगण्यांत आल्या आहेत त्यांसंबंधानें हिंदुस्थानच्या लोकांची काय स्थिति आहे याचा थोडक्यांत विचार करून हा भाग संपवावयाचा आहे.
 दूरदृष्टि व काटकसर या बाबतींत आमच्या सर्व जातींतील सर्व लोकांची पुष्कळच उन्नति झालेली आहे. आपलें उत्पन्न कितीही थोडें असो त्यांतूनच शिल्लक टाकण्याची प्रवृति अगदीं सार्वांत्रिक आहे. आमच्या लोकांची एकंदर राहणीच अगदीं साधी असल्यामुळें व प्रत्येक जातीची राहणी व चालीरीती अगदीं आंखून टाकल्याप्रमाणें असल्यामुळें मनुष्याच्या कमी जास्त प्राप्तीप्रमाणें आमच्या लोकांत कमी जास्त खर्च होत नाहीं. ह्मणून उत्पन्न जास्त झाल्यास त्या मानानें खर्च वाढत नाहीं व शिल्लक आपोआप वाढत जाते. इंग्रजी शिक्षणानें, शहरांतील राहणीनें व परकी लोकांच्या सहवासानें नव्या नव्या सोयींच्या व चैनीच्या वस्तूंच्या पुरवठ्याचीही प्रवृत्ति जात चालली आहे हें खरें आहे. परंतु भांडवलाच्या वाढिला अनुकूल असलेली पहिली गोष्ट आमच्यामध्यें आहे यांत शंका नाहीं; व जें कांहीं थोडेंबहुत भांडवल वाढत आहे तें या प्रवृत्तीचेंच फळ आहे यांत शंका नाहीं. मात्र ही दूरदृष्टी व काटकसरीची प्रवृत्ति धार्मिक कल्पनांमुळे दोन बाबतींंत विफल होते. त्या बाबती म्हणजे लग्रकार्यांदि धार्मिक कृत्यें व मरणानंतरचीं मेलेल्या माणसाचींं दिवसादिक धर्मकृत्यें होत. लग्रकार्यांमध्यें आमच्या लोकांचा अतोनात खर्च होतो व या वेळींं काटकसरीपेक्षां उधळेपणाकडे व कर्ज काढून सण करण्याकडे आमच्या लोकांची प्रवृत्ति आहे. ही प्रवृत्ति पांढरपेशा व इतर सर्व जातींच्यामध्यें सर्वसाधारण आहे. मर्तिकाकारतां विलक्षण खर्च करण्याची प्रवृत्ति खालच्या जातींत विशेष आहे. या देन उधळपट्टीच्या खालच्या वर्गाच्या प्रवृत्तीवरून आमच्या समाजाची पूर्ण माहिती नसणारे युरोपियन लोक, आमचा शेतकरीवर्ग अत्यंत उधळा आहे; व त्यांच्या कर्जबाजारीपणाचें कारण त्यांचा उधळेपणा होय; या कर्जबाजारीपणाचा संबंध जबर सरकारी साऱ्याशीं किंवा सारा वसूल करण्याच्या पद्धतीशीं किंवा इंग्रजी अमलानें आणलेल्या दुस-या कोणत्याही गोष्टीशीं नाहीं असें बेधडक विधान करतात. या विषयाचा विचार आपल्याला पुढें करावयाचा आहे. तेव्हां सध्यां येथें इतकेंच विवेचने बस्स आहे,परंतु आमचा शेतकरीवर्ग सररहा उधळा आहे हें मात्र खरें नाहीं. काटकसर हा गुण आमच्या सर्व जातींतील लोकांच्या हाडींमांशीं खिळलेला आहे. परंतु देशाच्या भांडवलाच्या वाढीला या प्रवृत्तीचा व्हावा तितका उपयोग होत नाहीं याचें कारण दुस-या व तिस-या अनुकूल गोष्टींचा अभाव होय.
 हिंदुस्थानांत बहुजनसमाजाचें उत्पन्नच इतकें कमी आहे कीं, मनुप्याच्या अवश्यकांला तें धडपणें पुरत नाहीं व अशा स्थितींत काटकसर झाल्यानें संपत्तिच्या उत्पत्तिच्या एका कारणाला कमतरता येत जाते. तोच प्रकार येथें चालू आहे. देशांतील मजूरवर्ग कमी शक्तिमान् व कमी कर्तृत्ववान् होत जात आहे व यामुळे संपत्तीचा मूळ झराच खराब होत चालला आहे.
 तिस-या अनुकूल गोष्टीसंबंधानें मात्र हिंदुस्थानांत ब्रिटिश अमलांत पुष्कळच सुधारणा घडून येत चालली आहे. व या संस्थांचा जसजसा प्रसार होईल तसतसा भांडवलाचा पुरवठा वाढत जाईल. कारण या तिस-या अनुकूल गोष्टींमुळेच देशांत तरतें चल भांडवल वाढतें व अशा भांडवलाचा संपत्तीच्या उत्पत्तीस फार उपयोग असतो.
 पूर्वकाळीं देशामध्यें शांतता नव्हती; जिकडे तिकडे दंगेधोपे असत; यामुळें मालमत्तेला सुरक्षितता नव्हती. ह्मणून लोकांची प्रवृत्ति आपली शिल्लक डागडगिन्यांच्या रूपानें व पैशाच्या रूपानें पुरून ठेवण्याची फार होती. अशा रुपांत ठेवलेल्या संपत्तीचा देशाला, व्यापाराला किंवा संपन्युत्पादनाला मुळींच उपयोग होत नाहीं. यामुळेंच हिंदुस्थानांत सोनें, रुपें गडप होत असे व युरोपियन लोकांना हा देश फार सधन आहे असें वाटत असे. आमच्या पुराणप्रियतेमुळे ही प्रवृत्ति अजून पुष्कळ अंशांनीं आहे तशीच आहे. खानदेशासारख्या भिल्लादि लुटारू लोकांनीं भरलेल्या प्रांतांत अजूनही लाखों रुपये पुरलेले आहेत असें ह्मणतात व असें पुरलेलें व ह्यणून व्यापारवृद्धीस निरुपयोगी झालेलें फार मोठें भांडवल हिंदुस्थानांत आहे असा पुष्कळ माहीतगार युरोपियनांनीं अंदाज केलेला आहे व या ह्मणण्यांत बरेंच तथ्य आहे यांत शंका नाही. तेव्हां हल्लीच्या सुधारलेल्या व सुरक्षिततेच्या काळांत आमच्या लोकांनीं डागडागिन्यांत पैसे वाजवीपेक्षां फाजील घालण्याची प्रवृत्ति तसेच पैसे पुरून ठेवण्याची प्रवृत्ति सोडून दिली पाहिजे व आपले पैसे पेढ्यांमध्यें ठेवण्याची पद्धति सुरू केली पाहिजे. तसेंच नवीन निघणाऱ्या कारखान्यांत-विशेषतः अशा कारखान्यांस सरकारनें ग्यारंटी दिली असतां-घालण्यास तर एका पायावर तयार झालें पाहिजे. देशी भांडवलास उत्तेजन देण्याकरितां सरकारनें देशी रेल्वे कंपन्यांना ग्यारंटीच्या व दुस-या विशेष सवलती देऊं केल्या आहेत व त्यांचा फायदा आमच्या लोकांनीं आपले पुरलेले किंवा डागिन्यांत अद्वातद्वा खर्च केलेले पैसे यांतून पैसे बाहेर काढून अशा धंद्यांत घालण्याचें धाडस केलें पाहिजे. यानें स्वार्थ व परमार्थ किंवा देशकल्याण असे दोन्ही अर्थ साधत आहेत. परंतु असें होण्यास मार्गे सांगितल्याप्रमाणें कारखाने काढणा-यांमध्यें धंद्याचें पूर्णज्ञान, सचोटी व कर्तव्यपरायणता हे गुणही पाहिजेत. ह्मणजे धंदे किफायतशीर होऊन लोकांना धंद्यांत भांडवल घालण्यास उतेजन येईल.

भाग बारवा.

सामान्य व औद्योगिक शिक्षण.

 अर्वाचीन काळीं संपत्तीच्या उत्पत्तीस सृष्टीची शक्ति, भांडवल व श्रम या सर्व कारणांचा बरोबर मिलाफ घडवून आणून संपत्तीच्या उत्पत्तीची, तिच्या विक्रीची वगैरे सर्व धोक्याची जबाबदारी घेणारा योजक अगर कारखानदार हा एक संपत्तीच्या उत्पादक घटकांपैकीं एक महत्वाचा घटकच आहे हें मागें दाखविलें आहे. आतां समाजांतील या वर्गाची वाढ कंशी होते हें या पुस्तकाच्या या शेवटल्या भागांत पहावयाचें राहिलें. या वाढीचें कारण शिक्षण व अनुभव हे होत.
 शिक्षण दोन प्रकारचें आहे-सामान्य व औद्योगिक अगर धदेंशिक्षण. यांतही प्राथमिक व उच्च असे दोन भेद होतात. ह्मणजे प्राथमिक सामान्य शिक्षण व प्राथमिक धंदेशिक्षण. दुसरें सामान्य उच्च शिक्षण व उच्च धंदेशिक्षण. यपैकीं पहिलें सर्व सुधारलेल्या देशांत मोफत व सक्तीचें केललें आहे. कारण प्राथमिक सामान्य शिक्षणांत लिहिणें वाचणें, साधारण अंकगणित इतक्या गोष्टी येतात.याच्यायोगानें मानवी बुद्धीस थोडेंसें चालन मिळतें व मानवी दृष्टि थोडी तरी फांकते. प्राथमिक धंदेशिक्षणांत साधारण उपकरणें व हत्यारें यांच्या उपयोगाची माहिती व साधारण हस्तकौशल्य इतक्यांचा अंतर्भाव होतो. हें दुहेरी शिक्षण पुढील सर्व धंद्यांना पायारूप आहे. अशा द्विविध शिक्षणानें सामान्य मजुरांची कर्तबगारी पुष्कळ वाढते असा सर्व सुधारलेल्या देशांत अनुभव आलेला आहे व मजुरांच्या कर्तबगारीवर संपत्तीच्या उत्पत्तीचे प्रमाण पुष्कळ अंशानें अवलंबून आहे हें मार्गे दाखविलेच आहे.
 सामान्य उच्च शिक्षण व उच्च धंदेशिक्षण हें कारखानदार किंवा व्यापारी किंवा स्वतंत्र विराटस्वरूपी धंदा करणा-यांना अवश्यक आहे. कारण सामान्य शिक्षणानें निरनिराळ्या मानस शक्तींचा विकास होतो व निरनिराळे बौद्धिक गुण व इतर मानसिक गुण मोठ्या प्रमाणावरील कारखानदारांस कसे अवश्यक आहेत हें मागल्या भागांत दाखविलेंच आहे. अर्वाचीन काळच्या प्रचंड कारखान्याचे कारखानदार म्हणजे सेनापतीसारखे आहेत व ज्याप्रमाणें सेनापति जितका बुद्धिमान् व जितका कल्पक, जितका विचारी व जितका शिकलेला असेल तितका उत्तमच; त्याचप्रमाणें कारखानदारांची गोष्ट आहे. उच्च धंदेशिक्षणांत त्यांच्या विशिष्ट धंद्याच्या सर्व ज्ञानाचा समावेश होतो. अशा द्विविध शिक्षणानें तयार झालेला कारखानदार कारखाना यशस्वी केल्याखेरीज राहणार नाहीं. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचें महत्व औद्योगिक प्रगतीला किती आहे हें अमेरिका व जर्मनी या दोन देशांच्या उदाहरणांवरून चांगलें दृष्टीस पडतें. आणखी अलीकडील व विशेषतः पूर्वेकडील उदाहरण पाहिजे असल्यास जपानचें आहे. अमेरिका व जर्मनी हे दोन्ही देश औद्योगिक व व्यापारी बाबतींत इंग्लंडच्या किंती तरी मागे होते. अमेरिका ब्रिटिश अंमलाखाली होती तोंपर्यंत त्याची औद्योगिक वाढ इंग्लंडच्या व्यापारी वर्गाच्या हेव्यानें झाली नाही. अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतर थोडीबहुत प्रगति होऊं लागली. परंतु गुलामाचा प्रघात कांहीं ठिकाणीं तरी उद्योगवृद्धीला प्रतिबंधक झाला यांत शंका नाहीं. पुढें या गुलामगिरीच्या कारणांवरून उत्तरेकडील संस्थानें व दक्षिणेकडील संथानें यांमध्यें तुमुल युद्ध झालें व त्यांत उत्तरे कडील ह्मणजे गुलामगिरीच्या विरुद्ध असलेल्या संस्थानांचा विजय होऊन अमेरिकेचे विभाग होण्याचा प्रसंग टळला. याप्रमाणें संयुक्त संस्थानें सर्व तऱ्हेनें व सर्व बाबतींत संयुक्त झाली; व नंतर त्यांनीं उद्योगधंद्यांच्या वाढीकडे आपलें सर्व लक्ष घातलें,व सर्व उद्योगधंद्यांच्या मुळाशीं लोकशिक्षण आहे हें जाणून सामान्य शिक्षणाचा व धंदेशिक्षणाचा झपाट्यानें देशांत प्रसार केला. व या झपाट्याच्या प्रसारामुळें अमेरिका देशानें इतक्या थोड्या अवकाशांत औद्योगिक बाबतींत इंग्लंडच्या पुढें अघाडी मारली. जर्मनीच्या राजकीय फाटांफुटीनें व धार्मिक लढायांनीं जर्मनी युरोपांतील इतर देशांच्या फार मागें पडला होता. परंतु जर्मनीची प्रशियाच्या राजाच्या छत्राखालीं एकी झाल्यापासून देशांतील सरकारनें औद्योगिक वाढीकडे लक्ष घातलें. सरकारला व लोकांना असें दिसून आलें कीं, इंग्लंड देश औद्योगिक बाबतींत फार पुढें आहे व हें त्याचें व्यापारी वर्चस्व बहुत काळाचा परिणाम आहे. परंतु आपल्याला जर हीच प्रगति थोडक्या अवधींत घडवून आणावयाची असेल तर सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण या दोहोंचा लोकांमध्यें एकसमयावच्छेदेंकरून प्रसार केला पाहिजे. या विचारानें सरकारनें या दुहेरी शिक्षणाकरितां मागेंपुढे न पहातां पाण्यासारखा पैसा खर्च केला, व त्याचीं गोड फळें लवकरच दिसून येऊं लागलीं. देशांत शास्त्रीय ज्ञान व धंद्यांचें ज्ञान मुरत चाललें. शिकलेल्या कारखानदारांचा वर्ग वाढत चालला व त्याबरोबरच देशांत निरनिराळे कारखाने निघूं लागले. परंतु बाल्यावस्थेंत असलेले कारखाने पूर्णावस्थेस पोहोंचलेल्या ब्रिटिश कारखान्यांच्या चढाओढीनें चिरडले जाऊं नयेत, म्हणून अमेरिका व जर्मनी या दोन्ही देशांनीं शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच अप्रतिबंध व्यापाराचें तत्व सोडून संरक्षणाच्या तत्वाचा स्वीकार केला. याप्रमाणें विद्या व कायदा या दोन अस्त्रांनीं अमेरिका व जर्मनी यांनीं आपली औद्योगिक प्रगत करुन घेतली व इंग्लंडच्या पुढें पाऊल टाकण्याच्या तयारीस हीं दोन्हीं राष्ट्रे लागलीं.
 यामुळेच इंग्लंडांतील लोक जागे झाले व आपण या दोन देशांच्या मारगे पडत चाललों कीं काय, अशी त्यांना शंका येऊं लागली व ही शंका येतांच या दोन राष्ट्रांच्या पहिल्या अस्त्राचा इंग्लंडनें ताबडतोब अंगीकार केला, व प्राथमिक शिक्षण सक्तीचें करून धदेशिक्षणाकरितां स्वतंत्र विश्व ९ विद्यालय काढलीं व जुन्या विश्वविद्यालयांना व्यापारी व धंदेशिक्षणाच्या शाखा जोडल्या. दुसरें अस्त्र संरक्षणाचें. याचा अवलंब करावा किंवा नाहीं याबद्दल अजून इंग्लंडमध्यें एकमत झालें नाहीं. परंतु संरक्षणाचा स्वीकार इंग्लंडनें आतां करण्याची वेळ आली आहे अशी हाकाटी इंग्लंडच्या युनियनिस्ट पक्षानें चालविली आहे व कांहीं कालपर्यंत इंग्लंडांतील लिबरल व युनियनिस्ट या दोन मोठ्या पक्षांमध्यें अप्रतिबंध व्यापाराविरुद्ध सवलतीच्या जकाती अगर संरक्षण हा प्रक्ष मोठ्या कडाक्याच्या वादाचा प्रश्न राहणार यांत शंका नाहीं.
 इंग्लंड देशाची बरोबरी करण्याच्या बुद्धीनें अमेरिकेनें औद्योगिक शिक्षणाकडे लक्ष घातलें, त्याच प्रमाणें अमेरिकेचा अत्यंत मोठा धंदा जो शेतकी त्यामध्येंही त्या देशानें सुधारणा घडवून आणली व शेतकीच्या धंद्याला शास्त्रीय स्वरूप दिलें. ज्याप्रमाणें औद्योगिक कारखान्यांतील यंत्रांच्या शोधांचा मान इंग्लंडला विशेष प्रकारें मिळालेला आहे. त्याप्रमाणें शेतकींतील पुष्कळ नवीन यंत्रे शोधनाचा मान अमेरिकेला मिळालेला आहे. व या शोधांना तेथील परिस्थिति अनुकूलही होती. तो देश अत्यंत सुपीक असून कधींही लागवडीस न आलेल्या अशा हजारों एकरांच्या मोठमोठ्या जमिनी तेथें आहेत. यामुळें स्वाभाविकच तेथें प्रचंड शेतीचा फैलाव जास्त झाला. परंतु अमेरिकेची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळें तेथल्या शेतीला मोठी अडचण म्हणजे मनुष्याच्या श्रमाची होय. म्हणून तेथें होतां होईल तितकें काम वाफेच्या यंत्रांच्या व इतर नैसगिक शक्तींच्या साहाय्यानें करून घेणें अवश्यक असे; व अशीं यंत्रें शोधून काढण्याकडे लोकांना विशेष मन घालावें लागे व 'गरज ही शोधाची जननी आहे' या म्हणीनमाणणें अमेरिकेमध्येंच शेतकीच्या पुष्कळ यांत्रिक उपकरणांचा शोध लागला आहे. तसेंच अमेरिकेमध्यें पुष्कळ शास्त्रीय नवीन खतांचा शोध लागलेला आहे, व औद्योगिक शिक्षणाचें एक प्रमुख अंग म्हणजे शास्त्रीय शेतकीचें शिक्षण होय असें लोकमत बनलेलें आहे.तिकडे स्वतंत्र शेतकीचीं किती तरी कॉलेजें व शाळा आहेत.
 इंग्लंडमधील व्यापारी व औद्योगिक प्रगति फार प्राचीनकाळापासून झाल्या कारणानें लोक लवकर श्रीमंत होऊन स्वावलंबी झालेले होते व सुधारणा त्यांनी आपआपल्या प्रयत्नांनीं घडवून आणल्या. त्याला सरकारची प्रत्यक्ष मदत लागली नाहीं. तसेंच इंग्लंडमध्यें जमीनदारी पद्धतीचा सार्वत्रिक प्रघात असल्यामुळें व हे जमीनदार सुशिक्षित व सुखवस्तु असल्यामुळें व त्यांना भांडवलाचीं वगैरे साधनें अनुकूल असल्यामुळें शेतकीची सुधारणाही त्यांनीं आपआपल्या एकट्याच्या प्रयत्नांनीं किंवा संघटित प्रयत्नांनीं घडवून आणली. येथें सुद्धां सरकारच्या प्रत्यक्ष प्रयत्नाची किंवा मदतीची गरज लागली नाहीं. इंग्लंडची बाल्यावस्थेंतील औद्योगिक प्रगति कायद्याच्या मदतीनें झाली हें निर्विवाद आहे. परंतु एकदां झाड जोमांत व आपल्या भरांत आल्यावर ज्याप्रमाणें त्याला माळ्याच्या काळजीची व देखरेखेची गरज न पडतां तें झाड नैसर्गिक रीतीनेंच फोफावत जातें; व मग रोपाच्या संरक्षणाकरितां माळ्यानें रोप्याभोंवतालीं घातलेल कुंपणच त्या झाडाच्या वाढीला प्रतिबंध करूं लागतें व असें कुंपण काढून टाकावें लागतें, त्याप्रमाणेंच इंग्लंडच्या औद्योगिक वाढीची गोष्ट आहे. त्याच्या बाल्यावस्थेत इंग्लंडच्या राजांनीं व मुत्सद्यांनीं या औद्यौगिक प्रगतीची काळजी घेतली व त्यांच्या संरक्षणाकरितां जकातीचें भलें थोरलें कुंपणही त्या उद्योगधंद्यांसभोंवतीं केले. परंत हे उद्योगधंदे एकदां जोमांत आल्यावर त्यांना या काळजीची व या कुंपणाची जरूरी नाहींशी झाली व जकातीरूपी कुंपण काढून टाकून अप्रतिबंध व्यापाराच्या स्वीकारापासून इंग्लंडचा उद्योगवृक्ष फारच फोफावत जाऊन त्याचा प्रचंड विस्तार झाला. या इंग्लंडच्या विशेष परिस्थितीमुळे इंग्लंडमध्यें व्यापार किंवा इतर उद्योगधंद्याची वाढ देशांत आपोआप होते असा दृढ समज झाला व या सार्वत्रिक लोकमताचा परिणाम इंग्लंडशीं अगदीं विसदृश अशी परिस्थिति असणा-या हिंदुस्थानवर अगदीं विपरित झाला. म्हणजे येथें सुधारलेला ब्रिटिश अंमल सुरू झाला तरी उद्योगधंद्यांच्या वाढीचा प्रश्न सरकारनें पुष्कळ काळपर्यंत हाती घेतला नाहीं. कारण हें काम सरकारच्या कर्तव्यमर्यादेमध्यें येत नाहीं, असा इंग्लंडमधील अनुभवावरून ब्रिटिश मुत्सद्यांचा समजें झालेला होता.
 या कारणांमुळे व इतर कारणांमुळे हिंदुस्थानांत हिंदुस्थान सरकारचें लक्ष या गोष्टीकडे,फारा दिवसांनीं लागलें. परंतु 'अकरणाद्मंदकरण श्रेयः'या न्यायानें उशीरानें कां होईना परंतु हिंदुस्थानसरकारचें लक्ष उद्योगधंद्याच्या वाढीकडे अलीकडे लागलें आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे, हिंदुस्थानचा अमेरिकेप्रमाणें अत्यंत मोठा धंदा शेतकी असल्यामुळें शेतकीच्या शिक्षणाची सोय या गेल्या सातआठ वर्षांत विशेष तऱ्हेने होऊं लागली आहे. पुसा येथें एक सर्व हिंदुस्थानाकरितां प्रयोगशाळा व फार मोठें कॉलेज सरकारनें काढलें आहे. त्याचे खालोखाल पुण्याचें शेतकी कॉलेज होत आहे. तसेंच पुष्कळ ठिकाणीं लहान लहान प्रयोगक्षेत्रें निर्माण झालीं आहेत, त्यांमध्यें हिंदुस्थानांतील गहूं, कापुस, तंबाखू, चहा वगैरे विशेष प्रकारच्या मालाची सुधारणा करण्याचे प्रयोग चालू आहेत. तसेंच शेतक-यांमध्यें शेतकीचें हें नवें ज्ञान त्यांच्याच भाषेंत त्यांना देण्याची तजवीजही सरकार करीत आहे. याला लोकनायकांचीही सहकारिता पाहिजे व अशी सहकारिता ठिकठिकाणीं मिळतही आहे. इतर धंद्यांच्याही औद्योगिक शिक्षणाची सोय थोडीबहुत होऊं लागली आहे. या बाबतींत कै० टाटाशेटजींची शोधशाळाही एक हिंदुस्थानांत अपूर्व संस्था निर्माण होत आहे यांत शंका नाहीं, व ही संस्था उत्तम तऱ्हेनें चालून त्यांतून शिकलेले पदवीधर बाहेर पडूं लागले म्हणजे त्यांचा देशांतील उद्योगधंद्यांवर सुपरिणाम झाल्याखेरीज राहणार नाहीं. याप्रमाणें हिंदुस्थानांत आतां या प्रश्नाबद्दल थोडीशी जागृति झाली आहे ही शुभसूचक गोष्ट आहे. इतर सुधारलेल्या देशांच्या मानानें हिंदुस्थान अगदीच मागें आहे हें मात्र विसरतां कामा नये.
 परंतु या सर्व शिक्षणाचा देशांत प्रसार होण्यास प्राथमिक शिक्षण सक्तीचें व मोफत केलें पाहिजे हें निर्विवाद आहे. सरकार परकी असल्यामुळें लोकांवर सक्ति त्यांना भय वाटतें. तेव्हां या बाबतींत

लोकनायकांनीं पुढाकार घेऊन सरकारचे हात दृढ केले पाहिजेत व हा लोकशिक्षणाचा प्रश्न सरकारच्या डोळ्यापुढें वारंवार आणून शिक्षणाचा प्रसार हल्लीं मंदगतीनें चालला आहे त्यापेक्षां पुष्कळ वेगानें होईल अशा तऱ्हेची खटपट करणें व सरकारकडून हें करवून घेणें हें सुशिक्षितांचें काम आहे.

अर्थशास्त्राची मूलतत्वें.पुस्तक तिसरें.

भाग १ ला.

वांटणी.

 दुस-या पुस्तकांत संपत्तीची उत्पत्ति व तिचें स्वरूप आणि नियम यांचा विचार झाला. आतां अर्थशास्त्रांतील "संपत्तीची वांटणी" या विषयाचा या भागांत ऊहापोह करावयाचा आहे. संपत्तीची 'उत्पत्ति' संपत्तीची 'वांटणी' व संपत्तीचा 'विनिमय' असे अर्थशास्त्राचे तीन भाग करण्याचा जो सांप्रदाय आहे तो विवेचनाच्या सोईसाठीं पडलेला आहे. वास्तविक हे भाग अगदीं परस्पर संलग्न आहेत; इतकेंच नाहीं तर परस्परावलंबीही आहेत, हें या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांत दाखविलेंच आहे. हे भाग सोईसाठींच केलेले असल्यामुळे पुष्कळ अर्थशास्त्रज्ञांच्या विवेचन पद्धतीत फरक दिसून येतो, काहीं अर्थशास्त्रकार विनिमयाचा विषय आधीं विवेचनास घेऊन मग वांटणीचा घेतात; कांहींजण तर 'वांटणींचा अन्तर्भाव' विनिमयांत' करतात. कारण हे असें ह्मणतात कीं, हल्लीं सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें संपत्तीची वांटणी विनिमयानेंच फक्त होते. मजूरदार आपल्या श्रमाबद्दल कांही तरी मोबदला घेऊन ती दुस-यास विकत देतो. जमीनदार आपली जमीन भाडें घेऊन कसणारास देतो. सारांश, ज्याच्याजवळ संपत्ति किंवा संपत्तीस लागणारें एखादें साधन आहे तो ती संपत्ति किंवा तें साधन अदलाबदलीनें दुस-यास देऊन आपल्यास लागणारी संपत्ति अगर साधन पैदा करतो. एखाद्या देशांत जें धान्य किंवा दुसरी एखादी संपत्ति उत्पन्न होते तिची देशांतील लोकांमध्यें वांटणी अदलाबदलीनेंच होते. यावरून वांटणीचे स्वतंत्र असे नियम नाहींत व म्हणून वांटणीचा विचार 'संपत्तीच्या अदलाबदलींच्या' प्रकरणांतच करणें योग्य आहे. जे ग्रंथकार 'वांटणी’ला स्वतंत्र स्वरूप देत नाहींत त्यांची विचारसरणी वरील प्रकारची असते. परंतु खालील विवेचनावरून वांटणीचें निराळे स्वरूप आहे व त्याचे नियमही विचार करण्यासारखे आहेत व त्या नियमांचें महत्वही उत्पत्तीच्या नियमांप्रमाणेंच असून समाजांत संपत्तीची वांटणी होण्याचे नियम समाजांतील संपत्तीच्या उत्पत्तीच्या पद्धतीवर पुष्कळ अंशीं अवलंबून आहेत असें दिसून येईल. प्रथमतः वांटणी ह्मणजे काय व या प्रश्नाच्या मुळाशीं कोणत्या सामाजिक संस्था व कल्पना आहेत याचा विचार करणें अवश्य आहे. ह्मणजे वांटणीच्या सामान्य सिद्धांताचें व नियमांचें स्वरूप व महत्व हें चांगल्या तऱ्हेनें दृग्गोचर होईल.
 ज्या वेळीं मनुष्य अगदीं रानटी स्थितींत असून आपल्या गरजा आपल्या एकट्याच्याच श्रमानें भागवीत असतो त्यावेंळीं संपत्ति म्हणण्यासारखी तयार नसते व तिच्या वांटणीचा प्रश्नच उद्भवूं शकत नाहीं. संपत्तीचा उत्पादक एकटाच असतो व तिचा तो एकटाच उपभोक्ताही असतो. म्हणजे या काळांत प्रत्येक मनुष्य हा एका दृष्टीनें पशूप्रमाणें स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण प्राणि असतो. परंतु जेव्हां श्रमविभागाचें तत्व अमलांत येऊन एक मनुष्य एकाच जातीच्या वस्तु करण्यांत आपलें श्रम-सर्वस्व अर्पण करतो व आपल्या इतर गरजा दुस-याच्या श्रमाच्या फलापासून भागविण्याची अपेक्षा करतो; तसेंच जेव्हां एक वस्तु करण्यास पुष्कळ साधनें व पुष्कळांचे श्रम लागूं लागतात तेव्हां संपत्तीच्या वांटणीचा प्रश्न उद्भवतो. कारण प्रत्येकाच्या श्रमाच्या मानानें किंवा संपत्तीचीं साधनें पुराविण्याच्या मानानें त्याला त्या संपत्नीचा वांटा मिळाला पाहिजे हें उघड आहे. शेतांत जें उत्पन्न पिकतें तें जमिनीचा मालक शेतीच्या औताचा व साधनांचा मालक म्हणजे कसणारें कूळ व शेतांवर हंगामी काम करणारे मजूर या तिघांच्या श्रमाचें फळ होय. तेव्हां शेतांतील उत्पन्नाचे तीन वाटे झाले पाहिजेत हें उघड आहे. हे वांटे कोणत्या प्रमाणानें व्हाववाचे याबद्दल निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळी पद्धति अंमलांत असेल. परंतु यथ वांटणीचा प्रश्न उद्भवतो हें निर्विवाद आहे. तेव्हां देशांत पिकणा-या संपत्तीची वांटणी समाजांतील निरनिराळ्या वर्गामध्यें कशी व कोणत्या नियमांनीं होते याचा या पुस्तकांत निर्णय करावयाचा आहे. परंतु या वांटणीच्या प्रश्नाशीं खासगी मालकी अगर स्वत्त्व या कल्पनेचा अत्यंत निकट संबंध आहे हें सहज ध्यानांत येईल. कारण प्रत्येक मनुष्य आपापल्या गरजा आपल्या एकट्याच्या श्रमानें पुरवीत असतांना ज्याप्रमाणें वांटणीचा प्रश्न निघत नाहीं. त्याप्रमाणें जेथें खासगी स्वामित्वाची कल्पना नाहीं, तेथेंही वांटणी अगर वांटणीचे नियम हा प्रश्न उद्भवत नाहीं. एखाद्या कुटुंबामध्यें पुष्कळजण मिळवते असले तरी ते आपली सर्व मिळकत एकत्र करतात व सर्व कुटुंबाच्या माणसांच्या गरजा भागविण्याकरितां त्याचा व्यय करतात. अशा संयुक्त कुटुंबांत अमक्याची वांटणी अमुक असा प्रश्न कोणी काढीत नाहींत. कारण कुटुंबामध्यें प्रत्येक व्यक्तीला खासगी स्वामित्व नसतें. सर्व मिळकत संयुक्तकुटुंबाची समजली जाते. परंतु तेच निरानराळे गृहस्थ जेव्हां एकत्र भांडवलावर एखादा धंदा करतात तेव्हां नफ्यामध्यें वांटणीचा प्रश्न येतो व प्रत्येकाच्या भांडवलाच्या हिस्सेरशीनें प्रत्येकास नफ्याचा वांटा मिळतो. यावरून जेथ श्रमविभागाचें तत्त्व अंमलांत आलेलें नसेल किंवा जेथें समाईक स्वामित्वाचीच कल्पना रूढ असेल अशा ठिकाणीं वांटणाचा प्रश्न निघत नाही खरा. तरी पण प्रत्येक समाजांत थोड्याबहुत प्रमाणावर श्रमविभागाचें तत्व अंमलांत असतेंच व खासगी स्वामित्वाची कल्पनाही थोड्या फार प्रमाणानें अस्तित्वांत आलेली असते, यामुळेंच प्रत्येक समाजांत संपत्तीच्या वांटणीचा प्रश्न उद्भवतो. तेव्हां समाजांतील निरानराळ्या वर्गांमध्यें संपत्तीची वांटणी कशी होते व त्या वांटणीचे सामान्य नियम काय, हें आपल्यास या पुस्तकांत ठरवावयाचें आहे.
 परंतु संपत्तीच्या उत्पत्तीचे नियम व संपत्तीच्या वांटणीचे नियम यांमध्ये फार मोठा भेद आहे असें मिल्लनें आपल्या ग्रंथाच्या या भागांत प्रतिपादन केलें आहे. या फरकाचें त्याला किती महत्व वाटत असे याची साक्ष त्याच्या आत्मचरित्रावरून येते. या चरित्रांत या नियमांमधील फरकाचा बोध हा एक आपला मोठा सामाजिक शोध होता असें त्यानें हृाटलें आहे. तेव्हां प्रथमतः या मताचा विचार करणें जरूर आहे.
 मिल्लच्या मतें संपत्तीच्या उत्पत्तीचे नियम हे नैसर्गिक सृष्टिनियमाच्या जातीचे आहेत. ह्मणजे त्यामध्यें मानवी कृतीनें ह्मणण्यासारखा फरक करतां येण्याजोगा नाही. जमिनीच्या उतरत्या पैदाशीचा नियम, संपत्नीच्या उत्पतीचीं नैसर्गिक साधनें, शास्त्रीय ज्ञान व शोध वगैरे गोष्टी मनुष्याच्या हातच्या नाहीत. यामुळें मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणें वाटेल तेव्हां संपत्तीची वाढ हवी तशी करता येणें अशक्य आहे. ह्मणजे उत्पत्तीचे नियम हे मानवीशक्तीबाहेरील सृष्टिनियमांसारखे आहेत. परंतु संपत्तीच्या वांटणीचे नियम हे मनुष्यकृत व समाजकत आहेत. एकदां संपत्ति उत्पन्न झाली म्हणजे तिची वांटणी अगर हिस्सेरशी रूढीनें व सरकारी कायद्यानें हवी तशी करतां येईल. अर्थात संपत्तीच्या वांटणीचे नियम त्रिकालाबाधित सृष्टीनियामाच्या जातीचे नाहीत; त्यांमध्यें समाजाला व सरकारला पाहिजे तसा फरक करतां येण्यासारखा आहे. तेव्हां संपत्तीच्या वांटणीचे नियम सर्व समाजास सर्व काळीं सारखेच लागू असतात असें नाही. तर ते पुष्कळ अंशीं रूढींवर व समाजाच्या कायद्यावर अवलंबून असतात.यामुळें या नियमांत जर कोठें असमता किंवा अन्याय असेल तर तो नाहींसा करण्याचा अधिकार समाजास व सरकारस आहे, असें मिल्लचें म्हणणें आहे.
 तेव्हां संपत्तीच्या उत्पतीचे नियम नैसर्गिक असल्यामुळें संपत्तीचा उत्पत्तीच्या बाबतींत सरकारने ढवळाढवळ करून संपत्ति वाढविणें शक्य नाही म्हणून उद्योगधंद्यांच्या बाबतींत समाजानें तटस्थ रहावें ह्यांत समाजाचें हित आहे; परंतु संपत्तीच्या वांटणीचे नियम हे मुळीं मनुष्यकृतच असल्यामुळें समाजानें त्यांत हात घालून ढवळाढवळ केली तरी हरकत नाही; असें उत्पत्ति व वाटणी यांमधील भेदावर जोर देऊन दाखविण्याचा मिल्लचा हेतू होता. यात्याच्या मतामुळें मिल्लनें सामाजिक पंथाच्या पुष्कळ सुधारणांचें समर्थन केलेलें आहे. संपत्तीच्या वांटणीचे नियम हवे तसे फिरविले तरी संपत्तीच्या उत्पत्तींत फरक पडणार नाही, ही गोष्ट मिल्लने या वादांत गृहीत धरली आहे. या पुस्तकांच्या प्रास्ताविक भागांत वांटणी व उत्पत्ति या परस्परावलंबी गोष्टी आहेत,असे दाखविले आहे. त्यावरून मिल्लचे म्हणणें सर्वांशी खरें नाहीं असे दिसून येईल. शिवाय मिल्लच्या या मतानें सरकारला हवा तो कायदा करून तो अंमलांत आणण्याचें पूर्ण सामर्थ्य आहे असें गृहीत धरलें आहे; परंतु हीही गोष्ट सर्वांशी खरी नाहीं. ज्या कायद्याला थोडेंसें तरी लोकमत अनुकूल नाहीं असा कायदा जरी सरकारनें केला तरी तो मृत कायद्याप्रमाणेंच राहतो असा सर्व देशांचा अनुभव आहे. तेव्हां सरकारचें सामर्थ्यही या बाबतींत मर्यादित आहे हें विसरतां कामा नये. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीच्या नियमांपेक्षां संपत्तीच्या वांटणीच्या नियमांमध्यें थोडाफार फरक करतां येण्यासारखा असतो, ही गोष्ट निर्विवाद आहे व यामुळे संपत्तीच्या वांटणीसंबंधानें निरनिराळ्या समाजांत भिन्न भिन्न स्थिति दिसून येते. हा फरक विशेषतः शेतकीच्या उत्पन्नाच्या बाबतींत विशेष तऱ्हेनें दृष्टीत्पत्तीस येतो. ह्मणून या पुस्तकांत आपल्याला शेतकींतील निरनिराळ्या वांटणींच्या पद्धतींचें वर्णन करावें लागणार आहे. प्रथमतः औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या देशांमध्यें संपत्तीची वांटणी कोणत्या नियमांनुसार होते हें पहावयाचें आहे. हें पहाण्याकरितां वांटणीच्या मुळाशीं कोणतीं तत्वें गृहीत धरलीं आहेत, याचें थोडक्यांत विवेचन केलें पाहिजे. सर्व सुधारलेल्या देशांत ही संपत्तीची वांटणी विशिष्ट रुढी अगर कायदे यांनीं होत नसून ती एकप्रकारें अगदीं स्वाभाविक तऱ्हेनें होते व ती स्वाभाविक तऱ्हा म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारे जे जे समाज - तील वर्ग त्या त्या वर्गांमध्यें प्रथमतः वांटणी होणें ही होय. हे वर्ग चार आहेत, असें मागल्या पुस्तकांत सांगितलें आहे. एक जमिन व इतर नैसर्गिक साधनें यांच्या मालकांचा वर्ग; दुसरा मजुरांचा वर्ग; तिसरा भांडवलवाल्यांचा वर्ग व शेवटचा कारखानदारांचा वर्ग. प्रत्येक प्रकारच्या संपत्तीच्या उत्पत्तीला या चार वर्गांच्या मालकीच्या साधनांचें एकीकरण व्हावें लागतें व संपत्तीच्या उत्पत्तीस केलेल्या मदतीबद्दल त्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो व या मोबदल्याला या वर्गाचें उत्पन्न म्हणतात. मालकवर्गाला भाड्याचे रूपानें उत्पन्न मिळतें, मजुरांना मजुरीच्या रूपानें उत्पन्न मिळतें, भांडवलवाल्यांना व्याजाच्या रूपानें उत्पन्न मिळतें व शेवटीं कारखानदारांना नफ्याच्या रूपानें उत्पन्न मिळतें. तेव्हा भाड, मजुरी, व्याज व नफा हे समाजांतील उत्पन्नाचे चार मुख्य प्रकार झाले, किंवा संपत्तीचे हे मुख्य चार वांटे झाले. या प्रत्येकाचें स्वरुप काय व त्याचे नियम काय यांचें या पुस्तकांत प्रथमतः निरूपण करावयाचें आहे. नंतर शेतीचें उत्पन्न ही एक महत्त्वाची उत्पन्नाची बाब असल्यामुळें जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या पद्धतीच विवेचन करणें इष्ट आहे. त्याच ठिकाणीं हिंदुस्थानांतील निरनिराळ्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचें निरूपण करण्याचा विचार आहे. पुढें वर निर्दिष्ट केलेल्या संपत्तीच्या वांटणीच्या स्वरूपांत कशी असमता उत्पन्न होते व त्यामुळें संपत्तीच्या वाढीबरोबर समाजांतील बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति त्या मानानें कां सुधारत नाहीं व ती सुधारण्यास कोण कोणते उपाय योजण्यांत अगर सुचविण्यांत आलेले आहेत त्याचा विचार करणें इष्ट होईल. हे उपाय दोन प्रकारचे आहेत, एक स्वावलंबनपर व दुसरे सामाजिक पंथानें सुचविलेले. सामाजिक पंथानें सुचविलेल्या उपायांचा विचार करण्यापूर्वी या पंथाचा साग्र इतिहास एका भागांत देण्याचा विचार केला आहे व शेवटीं या दोन्ही उपायांच्या शक्याशक्यतेबद्दल विवरण करून हें पुस्तक संपवावयाचें आहे.

भाग दुसरा.

वांटणीच्या मुळाशीं असलेल्या कल्पना व सस्था.

 संपत्तीच्या वांटणीच्या मुळाशीं असलेली पहिली कल्पना ह्मणजे खासगी स्वामित्वाची कल्पना होय, हें पहिल्या भागांत सांगितलेंच आहे. खासगी स्वामित्व ह्मणजे काय, हें स्वामित्व समाजांत केव्हां व कसें उत्पन्न झाले; त्यामध्यें कोणकोणत्या हक्कांचा समावेश होतो, वगैरे या संबंधाचे बरेच प्रश्न आहेत. परंतु या कल्पनेचा साकल्येंकरुन विचार करणे हें ख़रोख़री कायदेशाखाचें काम आहे. येथें आपल्याला या प्रश्नाचा फक्त अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करावयाचा आहे.
 कोणत्याही वस्तूवर एखाद्याचें स्वामित्व आहे ह्मणजे काय ? तर त्या वस्तूचा कोणताही उपयोग करण्याचा, ती उपभोगण्याचा, ती विकण्याचा आगर देण्याचा व आपल्या पश्चात तिची विल्हेवाट लावण्याचा हक्क त्या माणसास आहे. म्हणजे उपयोग, ह्यातींत व मरणानंतर विल्हेवाट इतक्या गोष्टींचे हक्क स्वामित्व या कल्पनेंत अन्तर्भूत झालेले आहेत. हा झाला स्वामित्व किंवा मालकी या कल्पनेंतील अर्थ. परंतु ही कल्पना अर्थशास्त्रांतील कांहीं तत्वांवर बसविलेली आहे, त्या तत्त्वाचा थोडक्यांत येथें विचार केला पाहिजे.
 या कल्पनेंतील पहिलें तत्व हें कीं, प्रत्येक मनुष्याला आपल्या निढळच्या घामानें मिळविलेल्या वस्तूचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. आपल्या श्रमाचें जें फळ तें आपलें आहे त्यावर आपला अनन्य सामान्य हक्क आहे हें पहिलें अर्थशास्त्रांतील तत्व होय. । हें तत्व पूर्णपणें अर्वाचीन काळांतच सर्वमान्य झालें आहे. गुलामगिरीच्या काळांत गुलामांना आपल्या श्रमाच्या फळावर आपला हक्क सांगता येत नसे. गुलामाच्या श्रमापासून उत्पन्न झालेल्या वस्तूंवर गुलामाच्या मालकांचा सर्वस्वी हक्क असे. अगदीं रानटी स्थितीत 'बळी तो कान पिळी' हाच न्याय होता. अशा स्थितींत आपण मिळविलेल्या वस्तूचा आपण उपभोग घेऊं अशी मनुष्यास खात्री नसे, ही गोष्ट सर्वांनाच अनिष्ट आहे अशी जाणीव उत्पन्न होऊन नैसर्गिक स्थितींतील मनुष्यांनीं समाज व सरकार हीं अस्तित्वांत आणलीं व प्रत्येक मनुष्यानें आपल्या श्रमानें उत्पन्न केलेलें फळ त्याला उपभोगितां यावें अशी तजवीज व्हावी, अशा बुद्धीने या दोन संस्था मनुष्यांनीं निर्माण केल्या. तेव्हां आपल्या श्रमाचें फळ आपणांस उपभोगतां यावें या हक्काच्या तत्वाचा सांभाळ करणें याच करितां सरकार अस्तित्वांत आलें व या मानवी हक्काला सुरक्षितपणा आणणें हें सरकारचें एक आद्य कर्तव्य आहे, असें सर्व सुधारलेलीं राष्ट्रें समजतात. कारण अशी खात्री असल्याशिवाय मनुष्याचे हातून श्रम होणारच नाहींत. याच दृष्टीनें खासगी स्वामित्वाला व कल्पनेला पुष्कळ अर्थशास्रकारांनीं रानाचें उपवन बनविणारी जादूची कांडी म्हटलें आहे. कोणत्याही मनुष्याला आपल्या श्रमानें मिळविलेल्या वस्तू आपल्याला मिळतील अशी खात्री असली म्हणजे तो आपलें श्रमसर्वस्व संपत्ति मिळविण्यांत खर्च करतो. व त्या योगानें देशांत संपत्तीची वाढ जारीनें होते. स्वामित्त्वाच्या कल्पनचें अर्थशास्त्रदृष्ट्या जें इतकें महत्त्व आहे तें या मानवी स्वभावामुळेंच होय.
 खासगी स्वामित्त्वाच्या कल्पनेंत असलेलें दुसरें तत्त्व असें आहे. दुस-यांशीं करार करून मिळविलेल्या वस्तूंवर आपला हक्क आहे. ज्याप्रमाणें स्वकष्टार्जित वस्तूंवर आपला स्वामित्वाचा हक्क चालतो. त्याप्रमाणें ज्या वस्तु आपण आपल्या स्वतःच्या श्रमानें उत्पन्न केल्या नाहीत परंतु, ज्या आपल्याला दुस-यांशीं करार करून मिळालेल्या आहेत त्यांवरही आपला सारखाच हक्क आहे. ह्मणजे करार करणें हाही एक श्रमाचाच प्रकार आहे; व प्रत्येक सरकारानें कराराच्या शर्ती व्यक्तीस पाळावयास लावल्या पाहिजेत. ज्याप्रमाणें जीवित व मालमत्ता यांचें संरक्षण करणें हें सरकारचें काम आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीकडून करारपालन करुन घेणें हेंही एक सरकारचें काम आहे. ही कल्पनाही हळूहळू वाढत आलेली आहे. कोणत्या प्रकारचे करार कायदेशीर समजले जातात व कोणते अनीतिवर्धक किंवा समाजविघातक म्हणून बेकायदेशीर गणले जातात, वगैरे गोष्टींचा सविस्तर विचार कायदेशास्त्रांत केला जातो. त्याचा येथें विस्तार करण्याचें प्रयोजन नाहीं.
 स्वामित्वाच्या कल्पनेंतील तिसरें तत्व ह्मणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या शिलकेचा फायदा घेण्याचा हक्क आहे. आपण मिळविलेली संपत्ति शिल्लक टाकणें हें एक श्रमाचें फळच आहे. व या फळाचा पूर्ण फायदा घेणें हा एक मनुष्याचा हक्क आहे. हें तत्त्व ह्मणजे पहिल्या तत्त्वाचाच एक भाग होय, तेव्हां त्याचें विशेष विवेचन करण्याची जरूरी नाहीं.
 स्वामित्वाच्या कल्पनेंतील चवथें तत्त्व म्हणजे ज्या वस्तूवर आपला अव्याहत ताबा आहे तिचें स्वामित्व आपल्यकडे येतें, हें तत्त्व खरोखरी अर्थशास्त्रीय नाही.तर तें एक कायद्याचें तत्त्व आहे व म्हणून त्याचा येथें ऊहापोह करण्याची जरुरू नाहीं.
 अर्थशास्त्रदृष्ट्या श्रम,करार व शिल्लक हीं तीन स्वामित्वाचीं अंगें होत व खासगी स्वामित्व किंवा खासगी मालकी या संस्थेचें महत्त्व या तीन अंगांवरच अवलंबून आहे. स्वामित्वाचीं ही अंगें जर नाहींशी झालीं तर मनुष्याच्या हातून संपत्ति उत्पन्न होण्याचेंच बंद पडेल.कारण मानवीश्रमाचा एक मोठा आधारस्तंभ नाहींसा होईल. परंतु आपल्या पश्चात मिळकतीची विल्हेवाट करण्याचा हक्कही स्वामित्वाच्या कल्पनेत येतो यांत शंका नाहीं. पूर्वकाळीं हा हक्क व्यक्तीस नव्हता. कारण त्या काळीं मिळकत ही कुटुंबाची समजली जात असे व एक मनुष्य मेला म्हणजे ती मिळकत कुटुंबांतील दुसऱ्या कर्त्या पुरुषाच्या ताब्यांत येई. हिंदुस्थानात संयुक्तकुटुंबाच्या कल्पनेंत याच गोष्टीचा समावेश झालेला आहे. संयुक्तकुटुंबांतील पुरुषास आपल्या पश्चात् आपल्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा हक्क नाहीं. स्वकष्टार्जित मिळकतीवर आपलें पूर्ण स्वामित्व आहे व या स्वामित्वामध्यें मिळकतीची हवी ती विल्हेवाट करण्याचा अधिकार येतो ही कल्पना आपल्या इकडे नवीन आहे. परंतु आपल्या पश्चात् आपल्या इंष्टेटीची मृत्युपत्रानें विल्हेवाट करण्याचा हक्क सर्व सुधारलेल्या समाजांत मानला जातो. व मनुष्य मृत्युपत्र न करतां वारल्यास त्याचा हक्क त्याच्या जवळच्या नातेवाइकांस जातो. हा जो वडिलोपार्जित मिळकतीवर हक्क आहे तो मर्यादित केला तरी स्वामित्वाच्या कल्पनेला बाध येत नाही. तेव्हां हा हक्क मर्यादित करणें किंवा वडिलोपार्जित मिळकतीवर मोठा कर बसविणें ही सरकारला एक मोठी उत्पन्नाची बाब आहे व तिचा जास्त जास्त प्रमाणावर उपयोग करण्यास हरकत नाहीं; ही गोष्ट अर्थशास्त्रदृष्ट्या वावगी नाहीं असें पुष्कळ अर्थशास्त्रकारांनों आपलें मत दिलेलें आहे व हल्लींच्या सुधारलेल्या पुष्कळ राष्ट्रांमध्यें हा हक्क मर्यादित करण्याकडे प्रवृति दिसून येते. सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें वांटणीच्या नियमांच्या मुळाशीं असलेल्या स्वामित्वाच्या संस्थेचा येथपर्यंत विचार झाला.
 अर्वाचीन काळच्या वांटणीच्या नियमांच्या मुळाशीं असृलेलें दुसरें तत्व ह्मणजे चढाओढीचें होय. हें तत्व सर्व देशांत व सवं ठिकाणीं व सर्वदा लागू होतें असें नाहीं; उलट हें अगर्दी अर्वाचीन तत्व अाहे. अजूनही पुष्कळ गोष्टींमध्यें संपत्तीची वांटणी ही रूढीने ठरलेली किंवा कायद्यानें ठरलेली असते. उदाहरणार्थ, जमिनीचें भाडे किंवा शेतकीच्या उत्पन्नाची वांटणी ही अजून पुष्कळ देशांत रूढीनें ठरलेली आहे; जमिनीच्या मालकानें उत्पन्नाचा कितवा हिस्सा घ्यावा, जमीन करणारानें कितवा घ्यावा ही गोष्ट पुष्कळ ठिकाणीं देशाचारावर अवलंबून आहे असे दिसून येतें; व या पुस्तकाच्या पुढील एका भागांत निरनिराळ्या देशांत व हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या पद्धतींचें वर्णन करावयाचें आहे. तेव्हां या रूढीची विविधता दिसून येईल. परंतु औद्यागिक बाबींत पुढारलेल्या देशांत रूढींचें प्राबल्य कमी होऊन चढाओढीच्या तत्त्वाला महत्त्व आलेलें आहे व संपत्तीची वांटणी समाजाच्या निरनिराळ्या वर्गांत सुधार-
लेल्या देशांत चढाओढीच्या तत्वावर होऊं लागली आहे. हल्लींच्या काळीं निव्वळ रूढींकडे पाहून कोणीच चालत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्याला जितका जास्त वांटा मिळेल तितका मिळविण्याचा प्रयत्न करतो. सारांश, हल्लींच्या काळीं समाजाच्या निरनिराळ्या वर्गामध्यें राष्ट्रीय संपत्तीचा वांटा मिळण्याकरितां सारखी धडपड चालू आहे व या परस्पर चढाओढीनें प्रत्येक वर्गाच्या वांटणीचा अंश ठरला जात आहे.
ही चढाओढ म्हणजे प्राणिशास्त्रांतील जीवनार्थ-कलहाचें तत्त्व होय. व्यापारधंद्यांमध्यें प्रत्येक कारखानदारांमध्यें चढाओढ असते. आपला माल होतां होईल तितका स्वस्त करून आपल्याकडे गि-हाइकी ओढण्याचा कारखानदाराचा प्रयत्न चालू असतो. वांटणीच्या बाबतींतही समाजांतील निरनिराळ्या धनोत्पादक वर्गामध्यें चढाओढ सारखी चालू असते. जमीनदार लोकांची जितकें जास्त भाडें कुळांकडून मिळेल तितकें काढण्याबद्दल कुळांशीं चढाओढ चाललेली असते. कारखानदार मजूर जितक्या कमी वेतनानें मिळेल तितक्या कमी वेतनावर ठेवावयास पहात असतो. यामुळे सुधारलेल्या देशांत व्यक्तीव्यक्तीची चढाओढ जाऊन तेथें समाईक चढओढ सुरू झाली आहे. मजुरी कमी करण्याकरितां व आपला नफा वाढविण्याकरितां कारखादार आपले संघ करूं लागले तर उलट आपली मजुरी कमी न होऊं देण्याकरितां व ती वाढवून घेण्याकरितां मजुरांचे संघ होऊं लागलं आहेत. या संघांचा मजुरीवर काय परिणाम झालेला आहे याचा आपल्याला पुढें विचार करावयाचा आहे.
तेव्हां ज्या ठिकाणीं खासगी मालकीची संस्था पूर्ण अमलांत आलेली आहे व जेथें सर्व व्यवहार रूढींच्या किंवा कायद्याच्या तत्वावर न चालतां पूर्ण चढाओढीच्या तत्वावर चालतात अशा सुधारलेल्या देशांत संपत्तीची वांटणी कोणत्या नियमांनी होते हें प्रथमतः पाहिलें पाहिजे. येथे आपल्याला समाजांतील व्यक्तींचा व्यक्तिशः विचार करावयाचा नाही.ज्याप्रमाणें संपत्तीच्या 'उत्पत्ति' या पुस्तकांत आपण संपत्तीच्या विशिष्ट कारणांचा विचार न करतां सामाजिक कारणांचा विचार केला त्याचप्रमाणे वांटणीचाही सामाजिक दृष्ट्या विचार करावयाचा आहे; व वांटणीचे प्रश्न उत्पत्तीच्या प्रश्नाशीं अत्यंत संलग्न आहेत असें जें वर म्हटलें आहे त्याचें कारणही उघड आहे. संपत्तीच्या उत्पत्तीला जितकीं साधनें
लागलीं आहेत तितक्या साधनांमध्यें किंवा त्या साधनांच्या मालकांमध्यें त्या संपत्तीची वांटणी व्हावी हें उघड आहे. आतां देशांतील संपत्तीला प्रत्यक्ष कारणें चार आहेत. तीं जमीन, श्रम, भांडवल व योजना; व या चार कारणांची मालकी असणारे समाजांत चार वर्ग असतात, ते मजूर, जमीनदार, भांडवलवाला व कारखानदार हे होत. या चार प्रमुखवर्गामध्यें संपत्तीची मुख्यतः वांटणी होते व याच वर्गांपासून समाजांतील इतर वर्गाना संपत्तीचा वांटा मिळतो. संपत्तीच्या वाढीस कारणीभूत होणारी राज्यव्यवस्था हिलाही संपत्तीचा एक वांटा मिळतो, परंतु सुधारलेल्या देशांत तो कराच्या रूपानें मिळतो, व या करांच्या तत्त्वांच्या व सरकारच्या जमाखर्चाचा विचार या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत स्वतंत्रपणें करावयाचा आहे. तेव्हां या ठिकाणीं आपल्याला संपत्तीच्या चार हिश्शांचा मुख्यत: विचार करावयाचा राहिला. ते हिस्से अगर वांटे ह्मणजे भाडें, मजुरी, व्याज व नफा हे होत. आतां प्रत्येक वांट्याच्या स्वरूपाचें व त्याच्या नियमांचें क्रमश: विवेचन पुढील चार भागांत करावयाचें आहे.

भाग तिसरा.

भाडें अगर खंड.

 सामान्य व्यवहारांत भाडें हा शब्द फार व्यापक अथनेिं वापरला जातो. कोणत्याही स्थावर व जंगम वस्तूची मालकी असलेला मनुष्य जेव्हां त्या वस्तूचा नियतकालिक उपयोग दुस-यास करण्यास देती तेव्हा तो त्या वस्तूबद्दल भाडें घेतो. उदाहरणार्थ:-घरवाला आपल्या घराबद्दल बिऱ्हाडकऱ्यापासून भाडें घेतो. टांगा किंवा गाडी यांच्या मालकास त्याच्या टांग्यांतून व गाडींतून प्रवास करण्याबद्दल प्रवासी जें देतो त्यालाही भाडेंच ह्मणतात. तसेंच जंगम वस्तु-भांडींकुंडीं, चटया, सतरंज्या, गालिचे, टेबलें, खुर्च्या वगैरे हजारों जिन्नस भाडयानें बाजारांत मिळतात, तेव्हां भाडें हें मालकीच्या वस्तूंबद्दल नियतकालिक उपयोगाकरितां दिलेला मोबदला होय व ज्याप्रमाणें सर्व व्यवहारांत विक्री व खरेदी व त्याच्या किंमती ही गोष्ट अत्यंत व्यापक आहे त्याचप्रमाणें भाड्याची गोष्टही फार व्यापक आहे.परंतु अर्थशास्त्रांत भाडें हा शब्द इतक्या व्यापक अर्थाने वापरीत नाहीं तर तो फार संकुचित अर्थानें वापरतात. जमीनुदारास जमिनीच्या स्वाभाविक व अनश्वर सुपीकतेबद्दल जो पैशाच्या रूपानें मोबदला मिळतो तें भाडें, इतक्याच अर्थानें हा शब्द येथें वापरला आहे. यालाच खंड किंवा मक्ता म्हणतात, असा संकुचित अर्थ घेतला म्हणजे एका संलग्न अशा विषयाचा अन्तर्भाव या शब्दांत होतो. प्रत्येक देशामध्यें जमीनदारांचा एक वर्ग असतो व सुधारलेल्या देशांत जमीनदार अगर जमिनीचे मालक हे जमीन कसणारे शेतकरी नसतात. ह्मणजे श्रमविभागाचें तत्व अंमलांत येऊन जमिनीचे मालक व शेतकीचा धंदा करणारे असे दोन निरनिराळे वर्ग होतात, व धंदेकरी शेतकरी आपल्या सोईच्या जमिनी मालकापासून भाडयानें अगर खंडानें घेतात व त्यांची लागवड करतात. तेव्हां जमीनदार असा एक स्वतंत्र वर्ग सुधारलेल्या समाजांत अस्तित्वांत येतो व या वर्गाचें उत्पन्न म्हणजे त्याला मिळणारें भाडें अगर खंड होय. तेव्हां भाडें हा राष्ट्रीय संपत्तीचा एक निराळा हिस्सा अगर वांटा पडतो व जमिनीचे मालक व जमीन कसणारे हे जरी एकच असले तरी सुद्धां त्यांना जमिनीपासून जें उत्पन्न मिळते त्याचे स्वाभाविक दोन हिस्से पडतात. एक ते जमिनीचे मालक ह्मणून मिळणारा हिस्सा, व एक जमीन कसणारे म्हणून मिळणारा हिस्सा. हा दुसरा हिस्सा ह्मणजे त्यांच्या श्रमाची मजुरीच होय. तेव्हां प्रत्येक देशांत भाडें ह्मणून संपत्तीचा एक हिस्सा झालाच पाहिजे. आतां या भागांत या भाड्याचें स्वरूप कोणत्या प्रमाणानें ठरलें जातें व तें निर्माण होण्याचीं कारणें काय व या भाड्यांच्या नियमांवरून कोणते उपसिद्धांत निष्पन्न होतात वगैरे विषयांचें विवेचन करावयाचें आहे.
 हा विषय अर्थशास्त्रांतील एक अत्यंत वादग्रस्त विषय आहे. 'भाड्याची उपपत्ति' ही प्रथमतः रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानें शोधून काढिली हे या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांत सांगितलेंच आहे व त्या काळीं इंग्लंडची सांपत्तिक स्थिति कशी होती; व कोणत्या परिस्थितींत ही उपपत्ति उदयास आली हेंही त्या ठिकाणीं दाखविलें आहे. तेव्हां येथें या ऐतिहासिक अंगाकडे न वळतां प्रथमतः रिकार्डोच्या उपपत्तीकडे वळूं.
 "ज्या देशांत सुपीक व उंची जमीन मुबलक आहे अशा कोणत्याही नव्या वसाहतीच्या देशांत तेथील लोकांच्या उपजीविकेकरितां सर्व जमीनाची लागवड करण्याची जरुरी नसते व लोकांच्या जवळ तितकें भांडवलही नसतें. अशा स्थितींत जमीन कसणारे लोक सर्वांत सुपीक अशीच जमीन लागवडीस आणतील व या काळीं जमिनीबद्दल भाडें अगर खंड याचा प्रादुर्भावच होणार नाहीं. कारण जोंपर्यंत देशांत फुकट पडलेली मुबलक जमीन आहे व ज्याला वाटेल त्यानें जमीन घेऊन कसावी अशी स्थिति आहे तोपर्यंत जमिनीच्या उपयोगाकरितां कोणीही भाडें अगर खंड देणार नाहीं. ' मागणी व पुरवठा' या सामान्य तत्वानुरूप ज्याप्रमाणें अमर्याद प्रमाणांत सांपडणा-या हवा पाणी किंवा सृष्टीच्या इतर देणग्या यांना भाडें अगर खंड मिळणार नाहीं त्याप्रमाणेंच या काळीं जमिनीच्या उपयोगाबद्दल खंड मिळणार नाहीं. जर देशांतील सर्व जमीन सारखीच सुपीक असती, जर बाजारापासून सर्व जमीन सारख्याच अंतरावर असती, जर ती संख्येनें अमर्याद असती व गुणामध्यें सारखीच असती तर तिच्या उपयोगाकरितां कोणताही आकार मागतां आला नसता. ह्मणून ज्या अर्थी जमीन ही परिमाणांत अमर्याद नाहीं व गुणांतही समान नाहीं व देशाच्या वस्तीच्या वाढीबरोबर व भरभराटीबरोबर हलकी जमीन लागवडीस आणावी लागते त्या अर्थीं जमिनीबदल खंड देण्याचें कारण पडतें. समाजाच्या प्रगतीमध्यें दुस-या दर्जाची जमीन लागवडीस आल्याबरोबर पहिल्या दर्जाच्या जमिनीवर खंड सुरु होतो व त्या खंडाची रक्कमही त्या दोन जमिनीच्या मगदुरांच्या फरकावर अवलंबून असते."
 या उपपत्तीचा मथितार्थ हा आहे कीं, देशामध्यें निरनिराळ्या मगदुरांची जमीन असते व ती बाजारापासून कमी अधिक अंतरावर असते. या दोहों मिळून जमिनीची सुपीकता ठरते. तेव्हां देशामध्यें कर्म अधिक सुपीक जमीन असली ह्मणजे जमिनीचें भाडें या कमी अधिक सुपीकतेवर अवलंबून असतें. या खंडाची रकम लागवडींत असलेली अगदीं वाईट जमीनजिचा खंड येऊं शकत नाहीं अशी बिनखंडी जमीन-व सुपीक जमीन यामधील फरकावर अवलंबून आहे. समजा एखाद्या प्रांतांत ४ मगदुराच्या १० जमिनी आहेतत. जोपर्यंत तेथील लोकसंख्येची गरज पहिल्या मगदुराच्या जमिनीवर भागत आहे तोंपर्यंत खंडाचा उदयच होणार नाहीं. परंतु त्या प्रांताची लोकसंख्या वाढली व तिला जास्त धान्य लागू लागलें असतां हें जास्त धान्य दुसऱ्या मगदुराच्या जमिनीच्या लागवडीवांचून मिळणार नाही. आतां पहिल्या मगदुराची जमीन दर एकरीं खंडीभर भात पिकविते व दुस-या मगदुराची जमीन १५ मण पिकविते असें समजा. लोकसंख्येच्या गरजेमुळे १५ मणांची जमीन तर लागवडीस आलीच पाहिजे. तेव्हां पहिल्या जमिनीला आतां ५ मण खंड येऊं लागेल व दुस-या मगदुराची जमीन ही बिनखंडी जमीन होईल. परंतु समजा कीं प्रांताची लोकसंख्या आणखीही पुष्कळ वाढली. तिच्या उपजीविकेकरितां आणखी धान्य अवश्यक झालें आहे. हें धान्य तिस-या मगदुराच्या जमिनीपासून काढणें अवश्य आहे. परंतु ही जमीन दर एकरीं १० मणच धान्य पिकविते. तेव्हां आतां पहिल्या मगदुराच्या जमिनीचा खंड १० होईल. दुस-या मगदुराची जमीन जी आतांपर्यंत बिनखंडी होती तिला आतां ५ मण खंड येईल. याप्रमाणें लोकसंख्येच्या गरजेवर जमिनीच्या लागवडीचें मान अवलंबून आहे; म्हणजे जसजशी देशांतील लोकसंख्या वाढते तसतशी कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें अवश्यक होतें. परंतु उत्तम मगदूराची जमीन असो अथवा अगदीं कमी मगदुराची असे त्या जमिनीचें उत्पन्न एकाच तऱ्हेचें असलें म्ह्णजे त्याला बाजारांत सारखीच किंमत येते. मात्र कमी दर्ज्याच्या जमिनीच्या मशागतीस खर्च अधिक येतो व बाजारांतील किंमती निदान शेतक-यांस लागणारा खर्च व त्यांची मजुरी बाहेर पडण्याइतकी पाहिजेच; नाहीं तर शेतकरी ती जमीन लागवडीसच आणणार नाही. ह्मणून बाजारांत जें धान्य येतें त्यापैकी सर्वात वाईट जमिनीच्या धान्याला जो खर्च झाला असेल त्या खर्चावरून धान्याची किंमत ठरते. ह्मणजे धान्याची किमंत बिनखंडाच्या जमिनीच्या लागवडीच्या खर्चाइतकी तरी असलीच पाहिजे; तर ती जमीन लागवडीस येईल. या जमिनीला लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणतात.लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणजे अर्थात् धान्याच्या किंमतीच्या मानानें ज्या जमिनीला लागवडीचा खर्च तितका येतो व ज्या जमिनीवद्दल खंड देतां येत नाहीं. जोपर्यंत तेथील लोकसंख्येची गरज पहिल्या मगदुराच्या जमिनीवर भागत आहे तोंपर्यंत खंडाचा उदयच होणार नाहीं. परंतु त्या प्रांताची लोकसंख्या वाढली व तिला जास्त धान्य लागू लागलें असतां हें जास्त धान्य दुसऱ्या मगदुराच्या जमिनीच्या लागवडीवांचून मिळणार नाही. आतां पहिल्या मगदुराची जमीन दर एकरीं खंडीभर भात पिकविते व दुस-या मगदुराची जमीन १५ मण पिकविते असें समजा. लोकसंख्येच्या गरजेमुळे १५ मणांची जमीन तर लागवडीस आलीच पाहिजे. तेव्हां पहिल्या जमिनीला आतां ५ मण खंड येऊं लागेल व दुस-या मगदुराची जमीन ही बिनखंडी जमीन होईल. परंतु समजा कीं प्रांताची लोकसंख्या आणखीही पुष्कळ वाढली. तिच्या उपजीविकेकरितां आणखी धान्य अवश्यक झालें आहे. हें धान्य तिस-या मगदुराच्या जमिनीपासून काढणें अवश्य आहे. परंतु ही जमीन दर एकरीं १० मणच धान्य पिकविते. तेव्हां आतां पहिल्या मगदुराच्या जमिनीचा खंड १० होईल. दुस-या मगदुराची जमीन जी आतांपर्यंत बिनखंडी होती तिला आतां ५ मण खंड येईल. याप्रमाणें लोकसंख्येच्या गरजेवर जमिनीच्या लागवडीचें मान अवलंबून आहे; म्हणजे जसजशी देशांतील लोकसंख्या वाढते तसतशी कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें अवश्यक होतें. परंतु उत्तम मगदूराची जमीन असो अथवा अगदीं कमी मगदुराची असे त्या जमिनीचें उत्पन्न एकाच तऱ्हेचें असलें म्ह्णजे त्याला बाजारांत सारखीच किंमत येते. मात्र कमी दर्ज्याच्या जमिनीच्या मशागतीस खर्च अधिक येतो व बाजारांतील किंमती निदान शेतक-यांस लागणारा खर्च व त्यांची मजुरी बाहेर पडण्याइतकी पाहिजेच; नाहीं तर शेतकरी ती जमीन लागवडीसच आणणार नाही. ह्मणून बाजारांत जें धान्य येतें त्यापैकी सर्वात वाईट जमिनीच्या धान्याला जो खर्च झाला असेल त्या खर्चावरून धान्याची किंमत ठरते. ह्मणजे धान्याची किमंत बिनखंडाच्या जमिनीच्या लागवडीच्या खर्चाइतकी तरी असलीच पाहिजे; तर ती जमीन लागवडीस येईल. या जमिनीला लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणतात.लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणजे अर्थात् धान्याच्या किंमतीच्या मानानें ज्या जमिनीला लागवडीचा खर्च तितका येतो व ज्या जमिनीवद्दल खंड देतां येत नाहीं अशी जमीन होय. व देशांतील बाकीच्या सर्व जमिनीचा खंड या बिनखंडी जमिनीवरील उत्पन्न व त्या त्या जमिनीचें उत्पन्न यामधील वजबाकीनें ठरतो.
 वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, खंडाच्या या उपपत्तीपामन तीन प्रमेयें निष्पन्न होतात. एक देशांतील जमीन ही उत्तम मगदुरापासून कनिष्ठ मगदूर या क्रमानेंच लागवडीस येते व कमी मगदुराच्या जमिनीची लागवड होण्याचें कारण लोकसंख्येची वाढ हें होय;व त्या संख्येच्या गरजेनुरूप धान्याच्या किंमतीची वाढ हें होय. तेव्हां देशाची लोकसंख्या प्रथम वाढते. या वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनें धान्याची किंमत वाढते व ही धान्याच्या किंमतींतील वाढ कायम राहिली म्हणजे शेतक-यास कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें परवडतें. परंतु धान्याची किंमत कमी झाल्यास लागलीच लागवडीच्या धारेवरील जमीन शेतक-यास परवडत नाहींशी होते व ती जमीन तो टाकून देतो व यामुळे बाकीच्या जमिनीचे खंडही कमी होतात. परंतु जेथपर्यंत लोकसंख्या वाढत जात आहे-व सर्व सुव्यवस्थित देशांत लोकसंख्या वाढत जातेच-तेथपर्यंत धान्याच्या किंमती वाढत जातात व धान्याच्या किंमती वाढत चालल्या ह्मणजे लागवडीची धार खालीं उतरत येते. व मग जमीनदारांचीं भाडीं अगर खंड वाढत जातात.
 या खंडाच्या उपपत्तीपासून रिकार्डोनें देशांतील लोकांच्या सांपत्तिक स्थितीबद्दल जीं अनुमानें काढलीं आहेत, त्यावरून त्या उपपत्तीचें त्याला इतकें महत्व कां वाटत असे हें दिसून येईल. कोणत्याही देशाची जसजशी भरभराट होत जाते तसतशी त्याची लोकसंख्या वाढत जाते व जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतशा धान्याच्या किंमतीही वाढत जातात. व धान्याच्या किंमतीमध्यें कायमची वाढ झाली ह्मणजे देशांतील बहुजनसमाजाची रहाणी जास्त खर्चाची होते. कारण त्यांच्या गरजांपैकीं अत्यंत अवश्यक गरज जी धान्य ती मिळविण्याकरितां त्याला उत्पन्नाचा बराच भाग खर्च करावा लागतो. देशांतील बराच मोठा वर्ग केवळ मजुरीवर राहणारा असतो. धान्याच्या किंमतीच्या कायमच्या वाढीनें या वर्गाचे हाल जास्त वाढतात. मात्र या देशाच्या भरभराटीबरोबर जमीनदार लोकांचा खंड सारखा वाढत जातो व त्यांची स्थिति सुधारत जाते. कारण श्रम न करतां त्याचें भाडयाचें अगर खंडाचें उत्पन्न देशाच्या सुस्थितीबरोबर आपोआप वाढत जातें. निवळ लोकसंख्येच्या वाढीनें जी जमीनदारांची खंडाच्या उत्पन्नाची वाढ होते त्याला मिल्लनें अनुपार्जित वाढ असें ह्मटलें आहे व ज्या अर्थी जमीनदारांना ही वाढ त्यांच्या श्रामाखेरीज मिळते, त्या अर्थी तिचा बराचसा वांटा सरकारला मिळणें रास्त आहे. कारण लोकसंख्येची वाढ ही सुव्यवस्थित राज्यपद्धतीमुळेंच होते. तेव्हां जमीनदारांच्या या अनुपार्जित वाढीवर जर कोणाचा हक्क असेल तर तो सरकारचा आहे व म्हणून जमिनीवर कर बसवून ही वाढ सरकारनें आपल्या उत्पन्नाची एक बाब करावी ह्मणजे प्रत्येक सरकारच्या वाढत्या खर्चाला एक आपोआप वाढणारी उत्पन्नाची बाब तयार होऊन सामान्य जनांवरील कराचें ओझें कमी होईल; अशी मिल्लची विचारसरणी आहे.
 वरील विवेचनावरून रिकार्डोच्या भाड्याच्या उपपत्तीची बरीचशी कल्पना वाचकांस होईल असें वाटतें. ही उपपत्ति 'उपपत्तीं'च्या पुस्तकांत उतरत्या पैदाशीचा जो एक सिद्धांत सांगितलेला आहे त्यावर बसविलेली आहे हें उघड आहे. प्रत्येक देशामध्यें उत्तम सुपीक जमीन थोडीच असते व त्या सुपीकतेची मर्यादा संपल्यानंतर उतरत्या पैदाशीच्या नियमास सुरुवात होते असें मागल्या एका भागांत दाखविलें आहे.परंतु रिकार्डोनें उतरत्या पैदाशीचा नियम जमिनीस सदासर्वदाच लागू आहे असे गृहीत धरून त्यावर बसवलेली भाड्याची उपपत्ति ही सर्व काळीं व सर्व ठिकाणीं सारखीच लागू आहे असें ठाम मत ठोकून दिले. वास्तविकपणें रिकार्डोची उपपत्ति इंग्लंडच्या त्या काळच्या परिस्थितीवरून वरून काढली होती व इंग्लंडपुरती ती सर्वथा खरीही होती.यांत शंका नाही. कारण इंग्लंडमध्यें मोठमोठे जमीनदार आहेत. व ते जमीनदार स्वत: न कसतां खंडानें आपल्या जमिनी शेतक-यांस देतात व हे शेतकरी म्हणजे चांगले भांडवलवाले लोक असून ते शेतकीमध्यें इतर धंद्याप्रमाणें फायदा मिळविण्याकरितां आपलें भांडवल शेतकींत घालतात व त्यांच्याप्रमाणें जमिनीच्या खंडाबद्दल चढाओढ असून संर्वजमिनीचा खंड याप्रमाणें चढाओढीनें ठरत असतो व तो खंड बहुतेक रिकार्डोच्या उपपत्तीशी जुळतो हें खरें आहे . परंतु वर निर्दिष्ट केलेल्या सर्व गोष्टी जेथें अस्तित्वांत नाहींत तेथें रिकार्डोची उपपत्ति खोटी ठरते.ही उपपत्ति व इतर देशांतील वस्तुस्थिति यांचा विरोध येऊं लागल्यामुळे रिकार्डोच्या उपपत्तीबद्दल पुष्कळ आक्षेप येऊं लागले.
 पहिला आक्षेप नवीन वसाहतींतील कॅरे या अमेरिकन ग्रंथकारानें काढला आहे. यानें असें सिद्ध केलें कीं,रिकार्डोची उपपत्ति आधीं नवीन वसाहतींना मुळींच लागू पडत नाहीं. कारण रिकार्डोच्या उपपत्तीचें एक प्रधान कलम असें आहे कीं, लोकवस्तीच्या वाढीबरोबर कमी मगदुराची जमीन लागवडीस येते ह्मणजे लागवडीची धार खालीं जाते व धान्याचे भाव वाढतात व जमिनीचा खंड वाढतो. परंतु नव्या वसाहतीमध्यें प्रथमतः जी जमीन लागवडीस येते ती किना-याजवळची हलकी, रेताळ जमीन असते किंवा जिच्या लागवडीला फारसें भांडवल लागत नाहीं अशी जमीन प्रायः लागवडीस येते. म्हणजे वस्तुतः कमी मगदुराची जमीन प्रथमतः लागवडीस येते व जसजशी लोकसंख्या वाढते व लोकांजवळ जास्त जास्त भांडवल जमतें तसतशी अांतील सपाट प्रदेशांतील उंची सुपीक जमीन लागवडीस येते. व याचे योगानें धान्याच्या किंमती लोकसंख्येच्या वाढीबरोबर न वाढतां उलट उतरतात. तेव्हां 'जास्त मगदुराकडून कमी मगदुराकडे' असा, जो लागवडीचा क्रम रिकार्डोनें दिला ऒहे ते मुळीं वस्तुस्थितीस धरून नाहीं असा कॅरेचा पहिला आक्षेप होता. रेिकार्डोच्या कैवा-यांनीं लागवडीच्या क्रमाचा मुद्दा इतका महत्वाचा नाहीं व ती जरी खरा नसला तरी त्यानें रिकाडींची उपपत्ति खोटी ठरत नाहीं असा कोटिक्रम लढविला आहे; परंतु रिकार्डोच्या ग्रंथांतील जो उतारा आम्हीं वर दिला आहे त्यावरून हा कोटिक्रम वृथा आहे असें ह्मणणें प्राप्त आहे. खरोखर पाहतां रिकार्डोला जमिनीला सुद्धां चढत्या पैदाशीचा नियम कांहीं काळपर्यंत लागू असतो हें तत्व ठाऊक नव्हतें; त्याची समजूत अशी होती कीं, जमिनीला प्रथमपासूनच उतरल्या पैदाशीचा नियम लागू आहे. यामुळें कोणत्याही देशामध्यें सर्वकाळीं देशाच्या भरभराटीबरोबर धान्याचे भाव वाढून मजूरदारांची स्थिति वाईट होत गेलीच पाहिजे असा सार्वत्रिक सिद्धांत त्यानें काढला. परंतु नवीन वसाहतीला हा नियम लागू नाहीं. उलट लोकवस्तीच्या वाढीनें धान्याचे भाव कमी होऊन मजूरदारांची सांपत्तिक स्थिति सुधारत जाते असें वसाहतीचा इति हास शिकवितो हें कॅरेनें सप्रमाण सिद्ध केलें आहे असें कबूल केलें पाहिजे. कॅरेचा दुसरा आक्षेप म्हणजे रिकार्डोच्या सर्व उपपत्तीचें मूळच नाहींसें करण्यासारखा आहे. रिकार्डोच्या उपपत्तीचें रहस्य ह्मणजे हें कीं, जमिनीचा खंड हा जमिनीच्या स्वाभाविक व अविनाशी अशा शक्तींचा मोबदला होय. भांडवल किंवा श्रम यानें जी जमिनीची शक्ती वाढली असेल व त्याबद्दल जी खंडाचा भाग जमीनदारांस मिळतो तो व्याज व नफा या जातीचाच आहे. परंतु जमिनीच्या ज्या मूळच्या शक्ती आहेत, त्याबद्दलचा मोबदला म्हणजेच अर्थशास्त्रांतील खंड होय व असा खंड देशाच्या सांपत्तिक प्रगतीबरोबर आपोआप वाढत जातो, व नफा व व्याज हीं तर देशाच्या भरभराटीबरोबर कमी कमी होत जातात म्हणजे खंडाचें स्वरूप व व्याज आणि नफा यांचें स्वरूप अगदीं एकमेकांविरुद्ध आहे असें ह्मणण्याचा रिकार्डोच्या प्रतिपादनाचा अर्थ आहे.कॅरेने अगदीं याच्या उलट प्रतिपादन केलेलें आहे. त्याचें म्हणणें हें कीं, जमिनीची सुपीकता ही मुळीं भांडवल व श्रम यांचाच सर्वस्वी परिणाम होय. न लागवड केलेली जमीन जरी मूळची सुपीक असली तरी ती रानानें व झाडाझुडुपांनीं अगदीं भरून गेलेली असते व अशा जमीन लागवडीस आणण्यास जितकें भांडवल व जितके श्रम लागतात त्याचें व्याज जर आकारलें तर असें दिसून येईल कीं, जमिनीचा सर्व खंड हा मूळचें भांडवल व श्रम व लागवडीस लागणारें भांडवल व श्रम या दोहोंच्या व्याजापेक्षां जास्त न येतां कमीच येतो. परंतु कॅरेच्या या आक्षेपांत फारसा तथ्यांश नाहीं असें विचारांतीं दिसून येईल. कारण कॅरेंनें केलेली मोजदाद ही अगदीं भ्रामक आहे. जमिनीची सुपीकता मूळची कशीही उत्पन्न झालेली असो; परंतु सुपीक जमीन व कमी मगदुराची जमीन यांच्या खंडांत पुष्कळ अंतर पडतें व हा खंड या वाढीबराबर नफ्याप्रमाणें किंवा व्याजाप्रमाणें कमी न होतां वाढत जातो; हा अनुभव सार्वत्रिक आहे व तितक्यापुरती रिकार्डोची उपपत्ति सत्यास धरून आहे यांत शंका नाहीं.
 रिकार्डोच्या उपपत्तीविरुद्ध आणखी दुसरेही पुष्कळ आक्षेप आहेत, त्याचाही येथें थोडक्यांत विचार करणें अवश्यक आहे. रिकार्डोच्या उपपत्तीमध्यें बिनखंडी जमीन देशांत असलीच पाहिजे असा एक मुद्दा आहे. कारण खंड बिनखंडी जमीन व दुसरी जमीन यांच्या उत्पन्नामधील फरकावरच अवलंबून आहे असें उपपत्तींत म्हटलें आहे. यावर आक्षेप असा आहे कीं कोणत्याही देशांत बिनखंडी जमीन कधीही नसते. प्रत्येक मालकीच्या जमिनीला कांहींना कांहीं खंड मिळालाच पाहिजे. म्हणून रिकार्डोची उपपत्ति ही खंड या सांपत्तिक गोष्टीची कारणमीमांसा नव्हे, असाही त्याच्या पुढील आक्षेप आहे. या ग्रंथकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खंड हा उत्पन्न कां होतो, तर जमीन ही खासगत मालकीची गोष्ट आहे व ती मर्यादित आहे, या दोन कारणांनीं खंड उत्पन्न होतो. तेव्हां खंड किंवा भाडें हें खासगत मालकीच्या संस्थेचा परिणाम आहे. जेव्हां एकाच्या मालकीच्या वस्तूचा उपयोग दुस-यास देण्यांत येतो तेव्हांच भाडें घेण्यांत येतें तेव्हां खासगत मालकी हें भाड्याचें खरें कारण आहे व म्हणून देशामध्यें जरी एकाच मगदुराची व समानसुपीकतेची जमीन असली-परंतु ती जर खासगी मालकीची असली-तरी सुद्धां भाडें किंवा खंड उदयास येईल.परंतु रिकार्डोच्या उपपत्तीप्रमाणें अशा स्थितींत भाडें हा सांपत्तिक प्रकार उदयास येऊंच नये.
 या आक्षेपास रिकार्डोच्या विधानावरून बराच आधार मिळतो असें कबूल करणें भाग आहे. खंड हा जो एक प्रकार आहे, तो कमीअधिक सुपीकतेमुळें होतो असें रिकार्डोच्या विधानावरून वाटतें खरें; तरी पण खंडाची रक्कम ही जमिनीच्या मगदुरावरून ठरते असें म्हणण्याचा त्याचा रोंख आहे. शिवाय देशाच्या नवीन वसाहतीच्या स्थितीचें वर्णन करतांना रिकार्डोनें ही मालकीची कल्पना अप्रत्यक्षपणें आणिली आहे. देशाच्या प्राथमिक स्थितींत भाडें निर्माण होणारच नाहीं. कारण जोंपर्थत देशामध्यें बिनमालकीची मुबलक जमीन पडलेली आहे तोंपर्यंत मालकीच्या उपभोगाबद्दल कोण भांडें देईल, असा रिकार्डोनें प्रश्न विचारला आहे, यावरून खंड किंवा भांडें हा प्रकार मुळीं मालकीपासून निर्माण होतो असें रिकार्डोच म्हणणें होतें, असें म्हणण्यास हरकत नाही. मात्र या खंडाची रक्कम ठरण्यास व ती कमीअधिक होण्यास लागवडीची धार कारण होतें, असें त्याचें म्हणणें आहे.
 पहिल्या आक्षेपांत जास्त सत्यांश आहे. ज्या ज्या देशांत खासगी मालकीची संस्था आहे त्या त्या ठिकाणी बिनखंडी जमीन असणें शक्य नाहीं हें खरें आहे, कारण वर प्रतिपादन केल्याप्रमाणें भाडें हें स्वामित्वाबद्दलच मिळतें. तेव्हां एका मनुष्याची जमीन दुसऱ्यास उपयोगास पाहिजे असल्यास त्याला कांहीं तरी स्वामित्वाबद्दल दिलें पाहिजे, हें उघड आहे. रिकार्डोनें देशांतील सर्व जमीन एकाच धान्याला द्यावयाची अशी कल्पना केली आहे व अशा कल्पनेप्रमाणें कांहीं जमीन इतकी निकस असेल कीं, तीमध्यें गहूं पेरून गहूं उत्पन्न काढण्याला इतका खर्च लागेल कीं, शेतकऱ्याला अशी जमीन भाइयानें घेणें परवडणारच नाही. परंतु जरी ती जमीन गव्हाला निरुपयोगी असली व गव्हाच्या पिकाकरितां ती कोणी खंडानें घेतली नाहीं तरी ती गवताकरितां पुष्कळ सुपीक असेल व गवत वाढवण्याकरितां व तें विकण्याकरितां जमिनीच्या मालकापासून एखादा शेतकरी ती जमीन खंडानें घेईल. मात्र या जमिनीचा खंड गव्हाच्या जमिनीइतका येणार नाहीं. तेव्हां देशांतील जमीन उंची मगदुरापासून अगदीं खालच्या मगदुरापर्यंत असली तरी निरनिराळ्या प्रकारांच्या पिकांकरितां तिचा उपयोग होतो व अगदीं प्रत्यक्ष खडक किंवा दलदल अशा जमिनीखेरीज देशांतील सर्व जमिनीवर थोडाबहुत खंड येतो यामध्यें शंका नाही. व म्हणून रिकार्डोच्या उपपत्तीविरुद्ध हा एक आक्षेप सत्यरूप आहे, असें कबूल करणें भाग आहे.
 येथपर्यंत रिकार्डोच्या उपपत्तीवरील आक्षपांचा विचार झाला परंतु त्या उपपत्तीवरून काढलेले सिद्धांतही त्रिकालाबाधित नाहींत, हें आतां दाखवावयाचें आहे. उदाहरणार्थ, रिकार्डोच्या उपपत्तीचा एक मोठा सिद्धांत म्हणजे जमिनीचा खंड हा नेहमी वाढतच जातो हा आहे. परंतु हेंही सर्वस्वी खरें नाहीं. ही वाढ कांहीं प्रसंगीं न होण्याचीं कारणें दोन आहेत. एक नवीन सुपीक जमिनीचा शोध लागून त्या लागवडीचें स्वस्त धान्य देशांत येऊं लागलें म्हणजे त्या देशातील लागवडीची धार वर जाते व म्हणून जमिनीचे खंड कमी होतात. अमेरिकेमध्यें शेतकीची वाढ झाल्यानंतर इंग्लंडमध्यें तेथून धान्य येऊं लागल्यापासून इंग्लडांतील भाडी कमी होत गेलेलीं आहेत, दुसरें कारण लागवडीच्या कलेंत सुधारणा. याचे योगानेंसुद्धां धान्य स्वत होते व तें स्वस्त झालें म्हणजे लागवडीची धार वर जाऊन जमिनीचे खंड कमी होतात. यावरून देशांतील खंड सतत वाढत गेलेच पाहिजेत असें नाहीं.
या क्रमाला बाधक अशीं कारणें उद्भवूं शकतात व अशीं बाधक कारणें अस्तित्वांत असतां खंडाचा क्रम उलटही होऊं शकतो.
 रिकार्डोच्या या उपपत्तीला अनुकूळ व प्रतिकूळ असें इतकें वाङ्मय इंग्रजी भाषेंत आहे कीं, त्या सर्वांचा सविस्तर विचार करण्यास आपल्याजवळ पुरेशी जागा नाहीं. परंतु वर दिलेल्या अल्प विवेचनावरून या उपपत्तींतील ग्राह्यांश व त्याज्यांश वाचकांच्या ध्यानांत येईल, असें वाटतें.

 समाजांतील संपत्तीचे निरनिराळ्या वर्गामध्यें जे हिस्से पडतात त्यांपैकीं जमिनीचा खंड हा एक आहे. सुधारलेल्या देशांत इतर हिश्शाप्रमाणें हा हिस्साही चढाओढीनें ठरला जातो व जरी पूर्वकाळीं हा पुष्कळ ठिकाणीं रुढीनें ठरून गेलेला असला व अजूनही पुष्कळ ठिकाणीं तो रुढीनेंच ठरतो, तरी पण रुढीच्याऐवजी चढाओढ येण्याचा जिकडे तिकडे कल दिसून येतो. हा खंड चढाओढीनें ठरण्याचा परिणाम असा होतो कीं, खंडानें जमीन करणारा शेतकरी सुपीक जमीन कसो कीं कमी मगदुराची जमीन कसो, त्याला दोन्हीं लागवडींपासून सारखाच फायदा मिळतो; व या दोनही लागवडींतील अंतर खंडाच्या रूपानें जमीनदारास जातें. हेंच रिकार्डोच्या उपपत्तींतील मूळ बीज आहे; व दुसरें हें कीं, बाधक कारणें अस्तित्वांत आलीं नाहीत तर हा खंड सारखा वाढत जातो. कारण देशामध्यें लोकवस्ती वाढून एकंदंर सर्व जमीन लागवडीस आल्यावर उतरत्या पैदाशीचा नियम लागू होतो व असा नियम लागू झाला म्हणजे मग धान्यांचे भाव वाढतच ज्राण्याच्या कल उत्पन्न होतो व त्याबरोबरच खंडही वाढत जातो. इतका रिकार्डोच्या उपपत्तींतील भाग त्रिकालाबाधित राहतो यांत शंका नाहीं. बाकी लागवडीचा दिलेला क्रम, खंड हा प्रकार मुळीं जमिनीच्या कमी अधिक मगदुरानें उत्पन्न होतो व देशांमध्यें बिनखंडी लागवडीची जमीन असते वगैरे या उपपत्तीतील भाग त्याज्य आहेत असें म्हणणें प्राप्त आहे.

भाग चवथा.

मजुरी व तिचे सिद्धांत.

 देशांतील संपत्तीचा दुसरा मोठा वांटा म्हणजे मजुरी होय. मजुरी हा श्रमाचा मोबदला आहे. संपत्ति उत्पन्न करण्यास जे मानवी श्रम लागतात त्या सर्वाचा अन्तर्भाव येथें होतो, मग ते श्रम शारीरिक असोत, मानसिक असोत; त्या श्रमाला शिक्षणरूपी पूर्वतयारी लागो न लागो; ते श्रम अगदीं सांगकाम्या दिसमजुरापासून तें एंजिनीयर म्यानेजरापर्यंत असोत. जे जे लोक कांहीं ठराविक काम करून त्या मानानें मजुरी घेतात; किंवा दिसमजुरी करतात किंवा महिनेमाल मजुरी मिळवितात त्या त्या सर्वांचा अन्तर्भाव मजूर या वर्गामध्यें होतो हें या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकांत स्पष्ट करून दाखविलेंच आहे. आतां या भागांत या मजूरवर्गाच्या वांट्याला येणारी मजुरी हिचा सविस्तर विचार करावयाचा आहे. निरनिराळ्या धंद्यांत निरनिराळे मजुरीचे दर असतात हें उघड आहे. आतां हे निरनिराळे दर कां होतात हा एक या भागांतला महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेंच या सर्व धंद्यांतील मजुरीच्या दराची सरासरी काढली म्हणजे एक मजुरीचा सामान्य दर निघतो. तेव्हां ह्या मजुरीचा सामान्य दर कसा ठरतो हाही एक या भागांतला महत्वाचा प्रश्न आहे. या बाबतींत निरनिराळ्या देशांकडे पाहिलें म्हणजे विलक्षण फरक दिसून येती. इंग्लंड, अमेरिकेसारख्या औद्योगिक बाबतींत शिखरास पोंचलेल्या देशांत मजुरीचा सामान्य दर किती तरी मोठा असतो. तोच हिंदुस्थानांत सामान्य दर अगदींच कमी असतो. तेव्हां हें कां होतें हें प्रथमतः पाहिलें पाहिजे. परतु या विचारास लागण्यापूर्वी मजुरी या पदामधील एक संदिग्धता लक्षांत आणिली पाहिजे.
 देशामध्यें पैसा वापरण्याची प्रवृत्ति झाली म्हणजे मजुरी हि नेहमीं पैशांतच दिली जाते.परंतु पैशाच्या रूपानें दिलेलीं मजुरी हि नांवाची होय.या मजुरीवरून मजुरांच्या सांपत्तिक स्थितीचा खरा अंदाज करतां येणार नाहीं. उदाहरणार्थ, शहरांत एखाद्या मनुष्याला दरमहा पंचवीस रुपये मिळत असले व खेड्यामध्यें एखाद्यास पंधरा रुपये मिळत असले, तर नांवाच्या मजुरींत दोहोंमध्यें जवळजवळ दुपटीचा फरक आहे; तरी खेडेगांवांतल्या माणसाचीच खरी मजुरी शहरांतल्या माणसांपेक्षां जास्त असूं शकेल. शहरांतल्या मनुष्यास २५ रुपये मिळत असतील. परंतु त्याला जागेकरितां ३ किंवा ४ रुपये भांडें द्यावें लागेल; तेंच खेडेगांवांत तितकीच जागा १॥ रुपया भाड्यानें मिळेल; तसेंच शहरांत लांकूडफाटा महाग असेल तर या खेडेगांवांत तें फारच स्वस्त असेल. शहरांत ज्या वस्तूबद्दल पैसे द्यावे लागतात त्या वस्तु खेड्यांत मोफत मिळत असतील. सारांश, नांवाच्या मजुरीवरून खऱ्या मजुरीचा अंदाज करणें बरोबर नाहीं. शिवाय मजुरांस मजुरीचा कांहीं भाग पैशाच्या रूपानें मिळत असेल तर कांहीं भाग प्रत्यक्ष गरज भागविणाऱ्या पदार्थाच्या रुपानें मिळत असेल. तेव्हां अशा मजुरांच्या मजुरीच्या दराचा विचार करतांना या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, घरगुती मजुरांना जेवणखाण मालकाच्या घरीं मिळतें. याशिवाय वर पगार मिळतो; कांहीं नोकरांस नुसता कोरडा पगार मिळतो कोंकणांत मजुरांना अडेसरी नांवानें धान्याच्या रूपानें मजुरी देण्याचा प्रघात आहे. शिवाय वर्षास एक घोंगडी, एक पायतण व दोनचार लंगोट् हे मिळतात व वर्षाचे दहावीस रुपये रोख मिळतात. म्हणजे त्यांची संपूर्ण मजुरी या तीन गोष्टींची बेरीज मिळून होते. तेव्हां नांवाची मजुरी व खरी मजुरी या मधील फरक चांगला ध्यानांत ठेवला पाहिजे. नांवाच्या मजुरीचा दर पुष्कळ असला म्हणजे मजुरांची सांपत्तिक स्थिति चांगलीच असली पाहिजे असें मात्र नाहीं. या म्हणण्याची सत्यता आमच्याइकडील लंकेंत सोन्याच्या विटा! या म्हणीवरून चांगली दिसून येते. म्हणजे जरी लंकेत मजुरास रोजची एक सोन्याची वीट मजुरीदाखल मिळाली तरी त्याला पोटापुरतें अन्न मिळण्यास सोन्याच्या विटाच द्याव्या लागतात, सारांश, जेथे पैसा अत्यंत विपुल असतो तेथें मजुरीचा दर पुष्कळ असतो तरी पण सर्वच पदार्थांची इतकी महागाई असते कीं जास्त मजुरी अवश्यक वस्तूंच्या विक्रीतच खर्च होते व मजुराला आयुष्यांतील सोयी किंवा चैनी उपभोगण्यास सांपडत नाहींतच.असो.
एखाद्या देशांतील मजुरीचा सरासरीचा दर कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो हें प्रथमतः ठरवावयाचें आहे. या बाबतींत निरनिराळ्या देशांत मजुरीच्या दरांत विलक्षण फरक असतो हें वर सांगितलेंच आहे. आता असा फरक कां होतो हे पहावयाचें आहे.
 यासंबंधींच 'मजुरीफंडा’ची कल्पना अभिमत अर्थशास्त्रकारांनीं काढलेली आहे. याचा मथितार्थ असा आहे कीं, देशांतील मजुरीचा दर हा देशांतील भांडवल व लोकसंख्या या दोहोंच्या भागाकाराइतका असती. मजुरीचाचा दर = भांडवल/लोकसंख्या म्हणजे लोक संख्या तितकीच राहून जर मजुरास देण्याचें भांडवल वाढलें तर मजुरीचा दर वाढेल; किंवा भांडवल तितकेंच राहून जर लोकसंख्या वाढली तर मजुरीचा दर कमी होईल,मजुरीफंडाच्या वादाच्या मुळाशीं तीन विधानें आहेत.पहिलें, प्रत्येक देशांत चल भांडवलाची अशी एक ठराविक रक्कम असते कीं ती मजुरींत खर्च झालीच पाहिजे. ही रक्कम कालेंकरून कमी होईल किंवा जास्त होईल. परंतु एका विशिष्ट वेळी ही रक्कम कायमची ठरलेली असते.ती कोणत्याही कारणांनी कमी होणार नाहीं किंवा जास्त होणार नाहीं.
दूसरें, देशांमध्ये अशी लोकसंख्या असते कीं, तिला मजुरीचा दर काहींही असो परंतु मजुरी करूनच पोट भरलें पाहिजे त्याखेरीज गत्यंतर नसतें. तेव्हां ही संख्या एका विशिष्ट वेळी ठरलेलीच असते.
 तिसरें, मजुरीचा दर हा भांडवलवाले व मजूर यांचा आपआपसांतील चढाओढीनेंच ठरला जातो. म्हणजे भांडवलवाल्यांची मजूर मिळविण्याकरिता चढाओढ चालू असते व मजूरदारंची भांड्वलवाल्यांकडे श्रम करून मजुरी मिळविण्याची चढाओढ चालू असते व सर्व मजुरीचे दर अशा दुहेरी चढाओढीने ठरले जातात. या तीन विधानांच्या एकीकरणानें मजुरी फंडाची कल्पना बनलेली आहे. ती ही कीं मजुरीचा दर हा भांडवल व लोकसंख्या यांच्या भागाकारावर अवलंबून असतो.
 'मजुरीफंडा' च्या या कल्पनेमध्यें मजुरीच्या दाराच्या कमी अधिकपणाची दिलेलीं दोन कारणें खरीं आहेत. यांत शंका नाही.कांहीं एका आगंतुक कारणानें देशांतील लोकसंख्या जर एकदम कमी झाली व उद्योगधंदे तेच राहिले म्हणजे देशांतलें भांडवल कायम राहिलें तर मजुरीचा सरसकट दूर वाढला पाहिजे हें उघड आहे. कारण मजुरांना मागणी आहे तितकीच राहिली मात्र पुरवठा कमी झाला; यामुळे मजुरीचे दर वाढलेच पाहिजेत. या विधानाची सत्यता स्थापन करणारीं इतिहासांतलीं पुष्कळ उदाहरणें दाखवितां येतात. इंग्लंडमध्यें जेव्हां प्लेगची सांथ आलेली होती तेव्हां ८|१० वर्षांत इंग्लंडांतील सुमारें अर्थी लोकवस्ती कमी झाली. परंतु त्यायोगानें एकंदर मजुरीच्या दरामध्यें विलक्षण वाढ झाली. यामुळें मजूरलोकांची सांपत्तिक स्थिति सुधारली व एकदां वाढलेल्या मजुरीचा दर कायमचाच झाला. कारण मजुरांची राहणीच जास्त खर्चाची झाली. हल्ली हाच प्रकार हिंदुस्थानांतही घडत आहे. गेल्या दहा बारा वर्षातील प्लेग व दुष्काळ यांनीं लोकसंख्या पुष्कळ कमी झालेली आहे; विशेषतःशहरांत मजूर फारच कमी झाले आहेत व यामुळें मजुरीचे दर भराभर वाढत चालले आहेत. उलटपक्षीं देशांतील भांडवलांत कांहीं आगंतुक कारणांनीं जर एकदम भर पडली व लोकसंख्या तितकीच राहिली तरी सुद्धां मजुरीचा दर वाढलाच पाहिजे. सारांश, मजुरीच्या दराच्या कमीअधिकपणाला वरील दोन कारणें लागू आहेत यांत संशय नाहीं. तरी पण मजुरीच्या वाढीचीं एवढिंच दोन कारणें आहेत असें मात्र नाहीं. शिवाय मजुरीफंडाच्या कल्पनेमध्यें एक प्रकारचा विरोध आहे तोही वस्तुस्थितीस धरून नाहीं. ह्मणजे लोकसंख्या वाढली कीं मजुरी कमी झालाच पाहिजे. तसेंच भांडवल वाढलें ह्मणजे मजुरीचे दर वाढलेच पाहिजेत असा कांहीं सार्वत्रिक नियम नाहीं. मजुरीफंडाच्या पुरस्कर्त्यांनी या कल्पनेला जें एक सार्वत्रिक स्वरुप दिलें ती त्यांची चुकी होती व म्हणून या कल्पनेवर पुष्कळ आक्षेप येऊं लागले व हल्लीं ही कल्पना अर्थशास्त्रांत बहुतेक त्याज्य ठरली गेली आहे.
 या कल्पनेपासून प्रसिद्ध तत्ववेत्ता मिल्ल यानें बरींच अनुमानें काढिलीं आहेत. मिल्लची ही कल्पना व मिल्लचीं भांडवलासंबंधीं प्रमुख तत्वें हीं एकाच तऱ्हेची आहेत. ज्याप्रमाणें त्या प्रमुख तत्वांच्या संरक्षणाविरुद्ध रोंख होता त्याप्रमाणेंच या कल्पनेचाही एक विशेष रोख होता. तो हा कीं, मजुरांची सुस्थिति अगर दैना ही त्यूांच्याच हातीं आहे. ती कायद्यानें, संपानें किंवा दुस-या कृत्रिमू उपायांनी नाहींशी होणारी नाही. कारण एका काळीं मजुरांस यावयाचें भांडवल हैं औद्योगिक नियमानीं ठरलेलें असतें, तें कमीजास्त होणें शक्य नाहीं. तेव्हां मजुरांची संख्या वाढली तर त्यांचे मजुरीचे दर अवश्यमेव कमी झाले पाहिजेत.तेव्हां मजूरलोकांनीं लग्राच्या बाबतीत आत्मसंयमन करून लोकसंख्येवर हितकर दाब ठेविल्याखेरीज त्यांची स्थितिं सुधारण्यास दुसरा मार्गाच नाही. परंतु या बाबतीत मजूरलोक अगदीं बेफिकीर असतात व भराभर लग्नें करून लोकसंख्या वाढवितात व आपल्याच मजुरीच्या चढाओढींत आपल्या हातानें भर घालतात. हें कृत्य आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा ओढून घेण्यासारखें आत्मघातकी आहे. तेव्हां मजुरांची दैन्यावस्था ही स्वयंकृत आहे. कारण ते अविचारानें लग्नें करून लोकसंख्येंत भर घालतत; असें मिल्लनें मोठ्या जोरानें प्रतिपादन केलें आहे. तेव्हां मजुरांची स्थिति सुधारण्यास त्यांच्यामध्यें वरिष्ठ वर्गाप्रमाणें अशी भावना उत्पन्न झाली पाहिजे कीं, आपल्या मुलांबाळांचें संगोपन करण्याचें सामर्थ्य येण्यापूर्वी लग्न करणें हें मोठे सामाजिक पाप आहे.
 या कल्पनेपासून अभिमत अर्थशास्त्रज्ञ दुसरें एक अनुमान काढतात; तें अनुमान संपाच्या फोलपणाबद्दल होय. त्याचें ह्मणणें हें कीं, मजुरीफंडाच्या कल्पनेवरून संपाचा फोलपणा उघड होतो. संपाचा उद्देश पुष्कळ वेळां मजुरी वाढविण्याचा असतो; परंतु जोपर्यंत देशांतील भांडवल व लोकसंख्या यांमध्यें फरक झालेला नाहीं, तोंपर्यंत मजुरीच्या सरासरीच्या सामान्य दरांत फरक होणें शक्यच नाहीं. कारण संपानें जर एका धंद्यांतील लोकांची मजुरी वाढली तर दुस-या धंद्यांतील मजुरी कमी झालीच पाहिजे. म्हणजे एकंदरीत संप मजूरवर्गाच्या हिताचे विघातक असतात. परंतु या विषयाचा पुढें एका भागांत स्वतंत्र विचार करावयाचा आहे,तेव्हां सध्यां इतकें विवचन बस्स आहे.
 या वादांचे सार तीन विधानांत आहे असें वर दाखविलेंच आहे. या प्रत्यक विधानांवर या उपपत्तीच्या विरोधकांनीं आक्षेप आणलेले आहेत.पहिलें विंधान म्हणजे मजुरी देण्याकरितां भांडवलाचा कांहीं एक भाग प्रत्येक देशांत अलग राखलेला असतो व तो बिनअट खर्च होतोच हें होय, परंतु हें म्हणणें खरें नाहीं.कारखानदाराजवळ भांडवल असलें म्हणजे त्यानें तें मजुरींत खर्च केलेंच पाहिजे असें नाही.संपत्तीच्या उत्पादनानें आपल्यास फायदा होईल अशी अटकळ असली तरच कारखानदार मजुरीत आपलें भांडवल खर्च करील.फायदा होणें हें मालाच्या किंमतीवर व गिऱ्हाईकांच्या संख्येवर अवलंबून असते. कारखान- दारांना गिऱ्हाईक कमी होणार असे दिसलें कीं, ते आपल्या कारखान्यांचे काम कमी करतात व लागलीच कांही मजूर कमी करतात किंवा कारखाने कांही दिवस बंद ठेवू लागतात. तसेच एखाद्या मालाचा खप जास्त होण्याचा रंग दिसला की लागलीच कारखानदार मजूरलोक वाढवितात किंवा त्यांना मजुरी जास्त देऊन त्यांजकडून काम जास्त करून घेतात.तेव्हां मजुरांना यावयाचें चल भांडवल ही कांहीं एक ठरीव वस्तु नाहीं, तर व्यापाराच्या तेजीमंदीप्रमाणे ती कमीजास्त होणारी आहे.म्हणूनच मालाचे भाव वाढते असले म्हणजे मजुरीचे दरही वाढते असतात. परंतु मिलला हें म्हणणे कबूल नव्हते, कारण त्याच्या उपपत्तीप्रमाणे मजुरीचे दर वाढण्यास आधीं भांडवल वाढलें पाहिजे. परंतु मालाचे भाव चांगले असले,कारखानदारांना नफा चांगला होऊ लागला म्हणजे त्याचा परिणाम भांडवल वाढण्यात होते हे मिलला कबूल आहे. तेव्हां या कल्पनेच्या पुरस्कर्त्याप्रमाणे सुद्धां मालाच्या खपावर मजूरी अवलंबून आहे असे सिद्ध होते. परंतु मजूरी ही मालाच्या खपावर प्रत्यक्षपणे अवलंबून नाही; तर ती खपावर अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे एवढेच या मजुरीफंडाच्या कैवाऱ्याचे म्हणणे आहे.
 या उपपत्तींतील दुसरें विधान म्हणजे देशांतील मजुरांचा वर्ग हाही अगदी ठराविक असतो व मजुरी कांहींही असो त्या सर्वांना मजुरी केलीच पाहिजे. हेंही विधान सर्वथा खरें नाहीं. कांहीं लोक केव्हां केव्हां मजुरी करतात,केव्हां केव्हां करीत नाहीत.शिवाय भांडवल व मजूर हे देशाबाहेर जाऊं शकतात. परंतु पहिल्या विधानापेक्षा दुसरें विंधान पुष्कळ अंशाने खरे आहे असे कबूल केलें पाहिजे. तिसरें, मजुरी ही सदोदित पूर्ण चढाओढीने ठरली जाते हे विधानही सर्वस्वी खरें नाहीं. सुधारलेल्या देशांत दिवसेंदिवस कारखानदारांचे संघ होत आहेत, त्याचप्रमाणें मजुरांचेही संघ बनत आहेत. तेव्हां हल्लीच्या काळी व्यक्तीव्यक्तीमधील चढाओढ कमी झाली आहे व त्याचे ऐवजी दोन वर्गामध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.
 ज्या तीन विधानांमिळून मजुरीफंडाची कल्पना बनलेली आहे ती तिन्हीही विधाने सर्वाशीं खरीं नाहींत इतकाच या कल्पनेवर आक्षेप आहे असें नाही; तर मजुरीच्या सरासरी दराची मीमांसा या दृष्टीनेंही या कल्पनॅत पुष्कळ वैगुण्य आहे असें आक्षेपकांचें म्हणणें आहे. ते हे की, मजुरीचा सरासरी दर लोकसंख्या व भांडवल या दोन कारणांवरच अवलंबून आहे असें नाहीं तर तो मजुरांच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे . इंग्लडमध्यें रशियापेक्षां मजुरीचा सरासरीचा दर पुष्कळच जास्त आहे. याचं कारण इंग्लंडमध्यें भांडवल जास्त व लोकसंख्या त्या मानानें कमी एवढेच नव्हे ; तर इंग्लंडचे मजूर कर्तबगारीत रशियन किंवा आयरिश मजुरांपेक्षां जास्त आहेत. यामुळे त्यांच्या श्रमानें मालाची पैदासच पुष्कळ होते व ह्मणूनच मजुरांच्या वांट्यास अधिक मजुरी येते.
 तसेंच शेतकीमध्यें चढत्या पैदाशीच्या अवस्थेंत मजुरांच्या वाढीबरोबर शेतकीच्या उत्पन्नाची किती तरी वाढ होते; यामुळे मजुरांची मजुरी वाढते. कारण संपत्तीची दर माणशी वाढ जास्त होते व ह्मणूनच श्रमांचा मोबदलाही दर माणशीं वाढतो; अर्थात् मजुरीचा दर वाढतो.
 तसेंच वर दाखविलेंच आहे कीं, मालाचा खप वाढला ह्मणजेही मजुरीचा दर वाढतो.
 आतां निर्दिष्ट केलेल्या सर्व कारणांचा विचार केला म्हणजे लोकसंख्या व भांडवल यांपेक्षां मालाची पैदास हें मजुरीच्या दराचें विशेष महत्वाचें कारण भासू लागतें व यामुळेच कांहीं अर्थशास्त्रकारांनीं 'मजुरीफंडाची कल्पना' मजुरीच्या दराची मीमांसा या नात्यानें अजीबाद टाकाऊ आहे असें ठरवून मजुरीचे दर हे मालाच्या पैदाशीवरच अवलंबून आहेत, अशा प्रकारची मीमांसा केली आहे. ह्मणजे मजुरीचा दर हा सामान्यतः मजुरांच्या श्रमाच्या फलावर अवलंबून आहे. ज्यांच्या श्रमापासून जास्त उत्पन्न होतें त्यांस जास्त मजुरी मिळते ज्यांच्या श्रमापासून कमी उत्पन्न होतें त्यांस मजुरी कमी मिळते. या मीमासेचा परिणामही मजुरांची सांपत्तिक स्थिति सर्वाशीं त्यांच्याच हातीं आहे असे ह्मणण्यांत आहे, जर एखाद्या देशांत मजुरीचे दर फारच कमी असले तर तो क्षेप मजुरांचाच आहे. कारण त्यांची कर्तबगारी कमी असल्यामुळे त्यांच्या श्रमापासून मालाची उत्पत्तिच कमी होते व म्हणून त्यांच्या वाट्यास कमी संपत्ती येते.
 ही ही कल्पना मजुरीफंडाच्या कल्पनेप्रमाणें एककल्लीच आहे. म्हणजे या कल्पनेंत दिलेलें कारण खरें आहे. परंतु मजुरीचें हें एवढेंच मात्र कारण नव्हे. खरोखर मजुरीफंडाची कल्पना व पैदाशीची कल्पना या परस्परविरोधी नाहींत तर परस्परपूरक आहेत. म्हणजे मजुरीचा दर, भांडवल, लोकसंख्या, मजुरांची कर्तबगारी, मालाची पैदास व मालाचा खप या सर्व कारणसमुच्चयावर अवलंबून आहे; व या कारणांपैकी एखादें कारण एकदम कमी झालें तर त्याचा मजुरीच्या दरावर परिणाम झालाच पाहिजे.
 येथपर्यंत मजुरीच्या सरासरीच्या दराचा व त्याचा कारणांचा विचार झाला. आतां प्रत्येक देशांत निरनिराळ्या धंद्यांत निरनिराळे मजुरीचे दुर कां असतात व देशांमध्यें सर्व मजुरांमध्यें सारखी चढाओढ असतांना सुद्धां ते दर एकरूप न होतां कायमचे कमीअधिक कां राहतात याचा विचार करावयाचा राहिला. मजुरीच्या सामान्य दरासंबंधी अॅडाम स्मिथच्या ग्रंथांत फारसा ऊहापोह केलेला दिसत नाही. परंतु अभिमतपंथामध्यें वादभूत झालेल्या' मजुरीफंडाची कल्पना' व ‘पैदाशीची कल्पना' या दोहोंचा उल्लेख अॅडाम स्मिथच्या पुस्तकांत आहे. मात्र मजुरीच्या दरांत फरक कां होतो याच्या कारणांचा अॅडाम स्मिथनें विस्तारतः विचार केलेला आहे व याबाबतींतील त्याची कारणमीमांसा सर्वसंमत झालेली आहे. पुढील अर्थशास्त्रज्ञांनीं ती बहुतेक जशीच्या तशीच उतरून घेतलेली आहे, व आपल्यालाही तोच मार्ग अवलंबणें श्रेयस्कर होईल. या कारणमीमांसेमध्यें मजुरी व नफा या दोन्हीचाही अॅडम स्मिथनें एकत्र समावेश केलेला आहे हें येथें ध्यानांत ठेविल पाहिजे.
 धंद्याच्या मजुरीच्या दरांत किंवा नफ्यामध्यें चढाओढीच्या अमदानींतही कायमचे फरक कां राहतात याचीं खालील कारणें अॅडाम स्मिथने नमूद केलीं आहेत.
 पहिलें--धंद्याचें प्रियत्व अगर अप्रियत्व. जो धंदा स्वाभाविकपणें मनास आनंद देणारा आहे त्या धंद्यांतील श्रमाचा मोबदला इतर धंद्यांपेक्षां कमी असतो. कारण श्रमाचा कांहींसा मोबदला त्या धंद्याच्या मनोरंजकतेनें मिळतो. परंतु जो धंदा कंटाळवाणा, त्रासदायक व मनाला दुःख देणारा असतो त्या धंद्याची मजूरी जास्त असते. उदाहरणार्थ, फांशी देणा-या माणसाला पगार जास्त द्यावा लागतो. तसेंच घाणेरडीं कामें ११ करणारांना मजुरी जास्त यावी लागते. उदाहरणार्थ, भंगी, मोऱ्या व गटारें साफ करणारे लोक. तसेंच जो धंदा समाजामध्यें हलकट समजला जातो त्याची मजूरी जास्त असते. उदाहरणार्थ, आमच्या समाजांत मास्तरापेक्षां आचाऱ्याची मजूरी जास्त आहे.
 दुसरें--धंद्याचा निश्चितपणा किंवा अनिश्चितपणा. ज्या धंद्याचें काम नेहेमीं बारा महिन्यांचें व निश्चित असतें त्याची मजूरी याच्या उलट प्रकार असणाऱ्या धंद्यांपेक्षां कमी असते. शेतकामी मजुराला कांहीं हंगामांतच काम असते. म्हणून त्या हंगामांत त्याची मजूरी जास्त असते. गंवडी, पाथरवट वगैरे कामदारांचें काम भरपावसांत चालूं शकत नाहीं. यामुळें त्यांना कांहीं दिवस रिकामें बसावें लागतें व ह्मणून त्यांना जेव्हां काम मिळतें तेव्हां त्यांची मजूरी जास्त असते. तसच हंगामी लागणारे एंजिनीयर वगैरे जिन्स व प्रेसमधले लोक यांना आठमहिने पगार जास्त द्यावा लागतो. सारांश, ज्या धंद्याचें काम सारखें वर्षभर चालू असून काम मिळण्याची शाश्वती असते त्या धंद्यांत इतर हंगामी व अनिश्चित कामाच्या धंद्यांपेक्षां मजुरी कमी असते.
 तिसरें-धंद्यांतील मजुरी धंदा शिकण्यास लागणारा खर्च व धंद्याचा कठीणपणा यांवर अवलंबून असते. अडाणी मजूर व हुशार मजूर यांच्या मजुरीमधील फरक या तत्वानेंच उत्पन्न होतो. अडाणी मजुरास धंदा शिकण्यास खर्चही लागत नाहीं किंवा त्रासही पडत नाहीं. त्याचें काम ह्मणजें सांगकाम असतें. परंतु हुशारीचीं कामें करण्यास कठीण असून ता शिकण्यास खर्चही पुष्कळ होतो ह्मणून अशा मजुरांना जास्त मजुरी द्यावी लागते. कांही धंद्यांची कला अवगत करून घेण्यास तपेचीं तपें लागतात.म्हणून त्या धंद्यातील मजुरी फारच मोठी असते.परंतु खर्च व त्रास या मानानें जास्त नसते. ज्यांना बौद्धिक धंदे म्हणतात-उदाहरणार्थ, वकिली, एंजिनिअर, शिक्षक आणि डॉक्टरी-या धंद्यांत प्राविण्य मिळविण्यास फार श्रम, खर्च व त्रास सोसावा लागतो. यामुळें या धंद्यांतील मजुरी ही बरीच मोठी असावी लागते.
 चवथें-धंदेवाल्यावर ठेवावा लागणारा विश्वास. पेढीवाले, सोनार व इतर मोल्यवान पदार्थांची कामें करणारांची मजुरी जास्त असावी लागते. कारण सर्वांवर विश्वास टाकणें शक्य नसतें; व ह्मणून जे विश्वासाने वागतात अशांना मजुरी जास्त द्यावी लागते. वकील व डॉक्टर यांचेवर हीं विश्वासाचीं कामें टाकावयाचीं असतात. डाकतरचे हातांत तर मनुष्याचें जीवित असतें व वकिलाचे हातांत मालमत्ता असते. यामुळेंही या धंद्यांतील मजुरी जास्त असावी लागते.
 पांचवें-धंद्यांतील यशस्वीपणाचा संभव कांहीं धंद्यांत फायदा होणें न होणें हें निवळ तवकलीचें काम असतें. ह्मणून अशा धंद्यांची मजुरी जास्त असते. उदाहरणार्थ, सोन्याच्या खाणीचा धंदा;मासेमा-याचा धंदा;चिताऱ्याचा धंदा; नटाचा धंदा व वक्त्याचा धंदा व नाटकें लिहिणाराचा धंदा; या धंद्यांमध्यें यश येणें न येणें हें आधीं सांगतां येत नाहीं. दहा माणसांतील एक मनुष्य उत्तम चितारी बनतो किंवा नट बनतो किंवा उत्तम वक्ता बनतो, यामुळे जो विजयी होतो त्याला अकल्पित पैसे मिळतात. ही जी एका व्यक्तीला मिळकत होते ती खरोखरी दहा बारा लोकांचे श्रम वायां जातात त्यांपासून होते. ह्मणून या ठिकाणीं सुद्धां ह्या धंद्यांतील एकंदर श्रम त्रास व व्यासंग यांचा खर्च पाहिला ह्मणजे मजुरी जास्त होते असें नाहीं. तरी पण ज्याचें नशीब उदयास येतें त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त फिरतो व त्याची मजुरी मग सामान्य मजुरीच्या प्रमाणाबाहेर जाते.
 वरील सर्व कारणांचा संकलित परिणाम असा होतो कीं, निरनिराळ्या धंद्यांतील मजुरी व नफे हे सदोदित निरनिराळे राहतात. चढाओढीच्या पूर्ण अमदानीत सर्व मजुरीचा दर व सर्व नफा सारखा होण्याचा कल असतो खरा. तरी पण वर निर्दिष्ट केलेल्या कारणांनीं चढाओढीचा प्रभाव कमी होतो व मजुरीचे दर व नफा यांना कांहीं अंशीं रूढीच्यासारखें रूप येतें. तरी पण एकंदरींत खऱ्या मजुरीकडे पाहिलें ह्मणजे मजुरीच्या सामान्य उपपत्तीला या कारणांनीं बाध येत नाहीं, हें निर्विवाद आहे.

-

भाग पांचवा.

व्याज.

देशांतील संपत्तीचा तिसरा मोठा वांटा म्हणजे व्याज होय. अभिमत अर्थशास्त्रकारांचीं संपत्तीचीं, जमीन, श्रम व भांडवल, अशीं तीनच कारणें सांगण्याचा सांप्रदाय असल्यामुळे देशांतील संपत्तीचे या कारणपरत्वें वांटेही तीन होतात असें त्यांनी प्रतिपादन केलें आहे; व त्या वांट्याला त्यांनीं नफ़ा हें नांव दिलें आहे व या नफ्याची तीन अंगे असतात असे त्यांनीं सांगितलें आहे. कारण भांडवल हे काटकसरीनें उत्पन्न होतें; व या काटकसरीचा मोबदला भांडवलवाल्यास मिळाला पाहिजे. तसेंच भांडवलवाला कारखाना चालवून स्वतः मेहनत करतो. त्याबद्दलही त्याला मोबदला मिळाला पाहिजे. शिवाय प्रत्येक धंद्यांत भांडवल हडपण्याचा कमीअधिक संभव असतो; तेव्हां या धोक्याबद्दलही त्या भांडवलवाल्याला कांही तरी किफायत पाहिजे असते. या तीन गोष्टी मिळून नफा बनतो.
 याप्रमाणें अभिमतअर्थशास्त्रकारांनीं नफा हा शब्द व्यापक अर्थाने उपयोगांत आणिला आहे. परंतु या ग्रंथाच्या दुस-या पुस्तकांत संपत्तीर्ची चार कारणें मानणें कसें आवश्यक आहे हे दाखविलेंच आहे. प्रत्येक सुधारलेल्या देशांत भांडवलवाला व कारखानदार हे एक नसतात व जरी ह्या व्यक्ति एक असल्या तरी भांडवल व संपत्तीच्या सर्व कारणांचें एकीकरण करून संपत्ति उत्पन्न करणें या दोन गोष्टी अगदीं भिन्न आहेत व ह्मणून त्याचे वांटे निरनिराळे समजणें इष्ट आहे. ज्याप्रमाणें लहान प्रमाणावर शेती करणारा शेतकरी हा जमीनदार असतो व मजूरही असतो व त्याला शेताचें जें उत्पन्न येतें त्याचे प्रत्यक्ष जरी दोन वांटे केले नाहींत तरी शेतकऱ्याला जें उत्पन्न येतें ते दोन नात्यांनी येतें; एक जमिनीचा मालक ह्मणून व एक जमीन कसणारा म्हणून, व अशा शेतकऱ्यानें आपली जमीन जर दुस-यास खंडानें दिली तर त्याला पूर्वीच्या उत्पन्नाइतका खंड येणार नाहीं. कारण आतां त्या उत्पन्नांतून श्रमाची मजुरी कमी होईल व त्याला जमीनदार म्हणून कायतो खंड मिळेल. हीच स्थिति नफ्यासंबंधीं आहे. भांडवल व त्याची योजना हीं एका व्यक्तीचीं असलीं तरी वस्तुतः भांडवलाचा मोबदला निराळा असते. त्याला व्याज ह्मणतात व योजनेचा मोबदला निराळा असतो त्याला नफा म्हणतात. तेव्हां व्याज व नफा हे संपत्तीचे दोन निराळे वांटे आहेत असें समजणें शास्त्रीयदृष्ट्या रास्त आहे प्रत्यक्ष व्यवहारांत व व्यापाऱ्यांच्या जमाखर्चातही हा भेद नेहेमीं ठेवलेलां असतो. जरी कारखानदाराचें स्वत:चें भांडवल असलें तरी कारखान्याचा नफातोटा पाहतांना कारखानदार भांडवलाचें व्याज हें कारखान्याच्या खर्चापैकीं एक बाब धरतो व माल विकून खर्चवेंच जाऊन मग राहील ती शिल्लक नफा म्हणून समजतो. तेव्हां या भागांत आपल्यास व्याजाच्या स्वरूपाचा व त्याच्या दराचा विचार करावयाचा आहे.
 अर्थात् व्याज म्हणजे भांडवलाच्या उपयोगाकरितां दिलेली किंमत होय. भांडवलाच्या स्वरूपांचा विचार करतांना भांडवलाचे तीन वर्ग होतात असें सांगितलें आहे. उत्पन्नी भांडवल, उत्पादक भांडवल, उपभोग्य भांडवल व या तिन्ही भांडवलांच्या प्रकारामध्यें भावी वासनांच्या तृप्तीकरितां सद्यःकालीन उपभोग लांबणीवर टाकणें ही सामान्य कल्पना आहे असें दाखविलें आहे. ह्मणजे भांडवलामध्यें आत्मसंयम हा गुण दृग्गोचंर होतो व व्याज हें या आत्मसंयमनाचा एक प्रकारचा मोबदला आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कोणत्याही माणसानें उत्पन्न केलेल्या संपत्तीचा तात्कालिक उपभोग न घेतां ती शिल्लक टाकली म्हणजे त्यानें भांडवल उत्पन्न केलें असें आपण समजतों; तेव्हां भांडवल हें एक प्रकारें श्रमाचेच फल आहे. प्रत्यक्ष उत्पन्न केलेली वस्तु आपण शिल्लक टाकतों असें मात्र नव्हे. कारण या वस्तू नश्वर असतील किंवा फार वेळ टिकणा-या नसतील. तेव्हां आपण जी शिल्लक टाकतों ती पैशाच्या रुपाने टाकतों. व भांडवल याचा सामान्यतः आपण पैसा असाच अर्थ करतों. व हें भांडवल आपल्या मालकीचें असतांना जेव्हां त्याचा उपयोग करण्याकरितां आपण दुस-यास देतों तेव्हां या आपल्या मालकीच्या वस्तूच्या उपयोगाचा मोबदला म्हणून आपण व्याज घेतों. यावरून व्याज हें खंडाच्याच स्वरूपाचें आहे. ज्याप्रमाणें जमिनीच्या उपयोगाचा मोबदला म्हणजे खंड होय; त्याप्रमाणें भांडवल व सामान्यतः त्याचें स्वरूप जो पैसा त्याच्या उपयोगाचा मोबदला म्हणजे व्याज होय. खंड व व्याज यांच्या स्वरूपामध्यें याप्रमाणें साम्य असलें तरी त्यांच्या नियमांमध्यें व समाजांतील त्यांच्या वाढीच्या नियमांमध्यें जमीनअस्मानचें अंतर पडतें हें पुढील विवेचनावरून दिसून येईल.
 उसन्या दिलेल्या भांडवलावर अगर पैशावर व्याज घेणें हें पापाचें कृत्य आहे असा बराच काळपर्यंत युरोपामध्यें समज होता. कारण ही गोष्ट धर्माची एक बाब होती."नफा मिळविण्याच्या बुद्धीनें उसनवार पैसा देऊं नको" या अर्थाची कांही वाक्यें बायबलांत सांपडतात. यावरून व्याजबत्ता करणें हें क्रिश्चनधर्माच्या मनुष्यास अयोग्य आहे असा समज उत्पन्न झाला. यामुळें क्रिश्यनधर्मी बहुतेक देशांत व्याज घेणें किंवा बट्टा करणें हें गैरकायदा कृत्य मानलें जात असे. हा धंदा बहुधा ज्यू लोक करीत व या कारणामुळे क्रिश्चन लोक ज्यू लोकांना इतकें तुच्छ मानीत; व त्यांचा द्वेष व तिट्कारा करीत. बायबलांतील प्रत्येक निषेधपर विधानाशिवायआणखीही कांही प्रमाणांवरून व्याज घेणें अयोग्य आहे असें त्या काळीं पाद्री लोकांनी ठरविले होते. उदाहरणार्थ, पैसा हा वांझ आहे; पैसा पैशाला कांही वीत नाही; म्हणून उसन्या दिलेल्या पैशाबद्दल व्याज घेणें म्हणजे जेथें पेरले नाही तेथून उत्पन्न काढण्यासारखें आहे. हे आरिस्टाटलचें मत क्रिश्चन पाद्री व्याजाविरुद्ध युक्तीचें प्रमाण म्हणून पुढें करीत असतं. याला उत्तर असें देतात कीं, खरोखरी पैसा उसना दिला जातो असें नाहीं, तर उत्पादक भांडवल उसनें दिलें जातें व भांडवलापासून अधिक संपत्ति उत्पन्न होते हे सिद्धच आहे व त्यापैकीं एक हिस्सा भांडवल उसने देणारास देणें रास्तच आहे. दुसरा मुद्दा हा कीं, आपल्याजवळ शिल्लक असलेला पैसा उसना देण्यांत मनुष्याचा कोणताही तोटा होत नाहीं म्हणून त्याबद्दल व्याज मागणें गैर आहे. याला उत्तर असें आहे कीं, पैसा शिल्लक टाकण्यास मनुष्यास कांहीं तरी उपभोग कमी करावे लागतात व या त्याच्या मेहनतीबद्दल त्याला कांही तरी मोबदला मिळणें रास्त आहे.
 व्याजाचें सातत्य गैर आहे. कारण मनुष्यानें सतत व्याज दिलें तरी मुद्दल कायमच राहतें हा अन्याय आहे. याला उत्तर असें आहे कीं,मालकी हक्क विकणें व निवळ उपयोग विकणें या दोन गोष्टी भिन्न आहेत. ज्याप्रमाणें जमीन खंडानें दिली म्हणजे खंड सतत येतो व शेवटीं आपली जमीन परत मिळते; त्याचप्रमाणें भांडवलाचेंही आहे. व्याज भांडवलाच्यां उपयोगाचा मोबदला आहे व म्हणून शेवटीं उसनें घेतलेलें भांडवल परत करणें अवश्यक आहे. शेवटीं उसनें देणाराला उसनें घेणा-याला मिळालेल्या वस्तूपेक्षां जास्त संपत्ति मिळते व ह्मणून व्याज घेणें गैर आहे. याला उत्तर असें आहे कीं, खरोखरी उसनें देणाराला जास्त फायदा होतो असें नाहीं. समजा,आज अनें बपासून १०० रुपये घेतले व ते पांच वर्षांनीं परत द्यावयाचें कबूल केलें. आज हातीं असलेल्या १०० रुपयांची किंमत ५ वर्षांनीं हातीं येणा-या रुपयांच्या पेक्षां जास्त आहे हें उघड आहे. कारण सद्यःकालीन वस्तु भावि वस्तूपेक्षां जास्त किंमतीची आहे हें स्पष्टच आहे. म्हणून जेव्हां अ आपल्या हातांत असलेली प्रत्यक्ष वस्तू बला देतो तेव्हां तो बला जास्त किंमतीची वस्तू देतो व म्हणून पांच वर्षांनीं बनें नुसते शंभर रुपये देणें रास्त नाहीं, तर रुपयांच्या प्रत्यक्षपणाच्या जास्त किंमतीचा मोबदला अला दिला पाहिजे, ती मोबदला अला व्याजाच्या रूपानें मिळतो.
 येथपर्यंत व्याजाचें सामान्य स्वरूप व त्याविरुद्ध असलेल्या आक्षेपांचा विचार झाला. आतां व्याजाच्या दराबद्दल विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत व्याजाचे दर पुष्कळ असतात व हे पुष्कळ दर असण्याचें कारण भांडवल परत मिळण्याच्या हमीचा कमीअधिकपणा हें होय. जो मनुष्य अगदीं भुकेबंगाल आहे, ज्याला उसने पैसे दिले त परत करण्याची शक्ति नाहीं अशा माणसाला कर्जाऊ पैसे मिळत नाहींत, मिळालेच तर जबर व्याजानें मिळतात. कारण धनकोला आपलें भांडवल अजीबाद बुडण्याची भीति असते. यामुळें जबर व्याजाच्या आशेनें फक्त ती पैसे कर्जाऊ देण्यास तयार होतो. म्हणजे ज्या माणसाची पत कमी त्याला कर्जाऊ रकमेवर व्याज जास्त द्यावें लागतें. परंतु जेथें कर्ज परत मिळण्याची पूर्ण खात्री असते तेथें व्याजाचा दर एकच असतो, तोच त्या काळच्या सामान्य व्याजाचा दर असें समजलें जातें; सर्व औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या देशांमध्यें सरकार व म्युनिसिपालिट्यासारख्या सार्वजानिक संस्था या नेहमीं कर्ज काढतात व यांना सर्वांत कमी व्याजानें पैसे मिळतात, अशा कर्जरोख्याचें जें व्याज तें उत्तम हमीवरील कर्जरोख्याचें व्याज समजलें जातें. त्याचे खालोखाल म्हणजे उत्तम पतीच्या व्यापारी लोकांना ज्या दरानें कर्ज मिळतें तो दर होय. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांत सरकार हल्लीं ३॥ शेंकडा व्याजानें कर्ज काढतें. परंतु वास्ताविक हिंदुस्थानांत उत्तम हमीचा दर ३|| नाहीं. कारण सरकारी प्रामिसरी नोटा यांवर नेहमीं कसर मिळते. म्हणजे १०० ची नेोट बाजारांत ९५|९६ रुपयांस मिळते, तेव्हां उत्तम हमीच्या कर्जाचा दर हीं हिंदुस्थानांत दर शेंकडा ४ आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं व सामान्य व्यापारी दर शेंकडा ६ आहे असें म्ह्णण्यास हरकत नाही; हा व्याजाचा दर कायम व जास्त काळ टिकणा-या कर्जाचा होय. व हा दर देशांतील एकंदर भांडवलाच्या कमीअधिकपणावर व देशामध्यें मालमत्तेच्या व जीविताच्या सुरक्षितपणावर कांहीं अंशीं अवलंबूल असतो. हा दर देशांत खेळणा-या नाण्यावर अवलंबून नसतो. ज्या देशांत नेहमीं दंगेधोपे होतात; जेथें न्यायपद्धृती चांगली नाही; जेथें करार पाळण्यास लावण्याबदल व कर्ज वगैरे परत मिळण्याबद्दल चांगलीशी व्यवस्था नसते तेथें व्याजाचे दर जबर असतात व सुव्यवस्थित राज्यपद्धतीच्या स्थापनेपासून व्याजाचे दर सैलावत जातात. व सुव्यवस्थित राज्यपद्धतीच्या योगानें देशांत जसजसें भांडवल जमत जातें त्या त्या मानानें व्याजाचा दर कमी कमी होत जातो. हालंडमध्यें एके काळीं देशांत भांडवल व संपत्ति इतकी वाढली होती कीं, व्याजाचा दर दर शेंकडा २ व दोहोंच्याही खाली गेलेला होता. भांडवलाची वाढ कशी होते हें दाखवितांना या गोष्टीचा विचार आधीच झालेला तेव्हां पुन्हां आतां याचा निर्देश करण्याची जरूरी नाहीं.
 व्याजाचा दर व कसरीचा दर यांमध्यें भेद आहे. वर दर्शविल्याप्रमाणें व्याजाचा दर हा देशांतील भांडवलाच्या प्रमाणावर असतो. तें जसजसें वाढेल किंवा कमी होईल तसतसा व्याजाचा दर कमी होईल किंवा जास्त होईल. परंतु बँकेच्या कसरीचा दर मात्र वेळोवेळीं बदलत असतो, व तो नाण्याच्या विपुलतेवर किंवा दुर्मिळतेवर अवलंबून असतो. बँकेमध्यें रोख शिल्लक कमी होत चालली कीं, बँका हुंडीवरील कसरीचा दुर वाढवितात; ह्मणजे तीन महिन्यांनी भरपाई करावयाच्या हुंडीवर तीन महिन्यांचें व्याज कापून त्याब्बद्ल आजची जी रोख रक्कम देत ती या कसरीच्या दरावर अवलंबून असते. कसरीचा दर नाण्याच्या विपुलतेवर अवलंबून असतो.  युरोपामध्यें फार काळपर्यंत व्याजबट्टा करणें म्हणजे अधर्म समजला जात असे व हा धंदा ज्यू लोक करीत. यामुळे क्रिश्चन मनुष्याच्या मनांत ज्यू लोकांबद्दल इतका तिट्कारा व वीट भरलेला असे हें वर सांगितलेंच आहे. व या धंद्याबद्दल समाजामध्यें तिरस्कार बुद्धि असल्यामुळे अॅडाम स्मिथनें सांगितलेल्या मजुरीच्या व नफ्याच्या बाबतींतील विशिष्ट कारणानुरूप ज्यू लोक व्याजही जबर घेत. हें जबर व्याज ह्मणजे कांहीं अशीं तिरस्कृत धंद्याबद्दलचा मोबदला असे. उद्योगधंदे याची वाढ झाली नाहीं अशा समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्ति उसनी किंवा कर्जाऊ घेण्याचे प्रसंग ह्मणजे मनुष्याला अवश्य असणा-या गरजा भागविण्याकरितां येणार. अर्थात् या काळीं संपत्तीच्या उत्पत्तीला भांडवलाची फारशी जरुरी नसे. तर संपत्ति तात्कालिक उपयोगाकरितां हवी असे. कोणाला खायला नाहीं म्हणून दुस-यापासून उसनें घेण्याचें कारण पडे, किंवा दुस-या अशाच अकल्पित प्रसंगीं दुस-याची मदत लागे. अशा वेळीं कर्जाबद्दल किंवा उसन्या वस्तूबद्दल व्याज मागणें म्हणजे प्रसंगांत असलेल्या माणसापासून नाडून फायदा करून घेण्यासारखे असे. व 'शेजा-यास मदत करीत जा' या धर्मवचनास धाब्यावर बसविल्यासारखें असे. अर्थात समाजाच्या बाल्यावस्थेंत संपत्ति उसनी किंवा कर्जाऊ देणें म्हणजे आपल्यास नको असलेल्या वस्तूचा दुस-यास उपयोग करून देणें होय व हें एक मनुष्याच्या नैतिक कर्तव्याचाच भाग समजला जात असे. या समजामुळें व्याज मागणें हें क्रूरपणाचें व अन्यायाचें भासे. परंतु जसजशी समाजाची प्रगति होत जाते तसतशी संपत्ति उत्पादनाकरीतां भांडवलाची जास्त अवश्यकता लागूं लागते व कर्ज काढण्याचा मुख्य हेतू अधिक संपत्ति उत्पन्न करणें हा असतो व जर दुस-याच्या भांडवलाचा उपयोग करून एकानें आपल्याला नफा करून घेतला तर त्या नफ्याचा कांहीं अंश भांडवलाच्या मूळ मालकांस देणें हें अगदीं रास्त आहे असे दिसून येतें. ह्मणूनच पूर्वकाळीं सुद्धां कर्ज उसने देणारानें व्यापारांतील धोक्याचा वाटेकरी होण्याचें कबूल केल्यावर मग व्याज घेण्याबद्दल समाज आड येत नसे. कारण अशा स्थितींत उसने देणारा हा एक व्यापारांतला भागीदारच होई व जरी व्याजाबद्दल लोकमत प्रतिकूल होतें तरी पण नफ्याबदल ते कधींही प्रतिकूल नव्हतें.  हिंदुस्थानांत व्याजाबद्दल कांहीं एक धर्मबंधन नव्हतें. यामुळे व्याज घेण्याची पद्धति व व्याजबट्टा करणा-याचा धंदा फार काळापासून येथें प्रचारांत आहे. मात्र हा धंदा समाजांतील वरिष्ट जात जां ब्राह्मण तिनें करूं नये असा सक्त नियम असे. ब्राह्मणानें कसीदं म्हणजे व्याजबट्टा करणें हें मोठे पाप आहे अशा प्रकारचीं स्मृतिवचनें सांपडतात. परंतु वैश्य जातीस हा धंदा करण्याची पूर्ण मुभा होती. परंतु हिंदुस्थानांत अन्तःस्वास्थ्य किंवा जीविताची व मालमत्तेची सुराक्षितता फारशी नसल्यामुळे, तसंच अंदाधुंदीच्या काळांत न्यायाची पद्धतही चांगलीशी अमलांत नसल्यामुळे शिल्लक पैसा पुरून ठेवण्याचा परिपाठ फार होता. यामुळे भांडवलाची फार दुर्मिळता असे व ह्राणूनच व्याजाचा दरही फार असे. पेशवाईंतील रोजनिशा–ज्या हल्ली प्रसिद्ध होत आहेत-त्यांवरुन पेशव्यांनासुद्धां रोकडा १२ पासून २५ पर्यंत व्याज द्यावें लागे असें दिसतें. परंतु या पेशवाईंतील माहितीवरूनही व्याजाच्या उपरेि निर्दिष्ट तत्वाचेंच समर्थन होतें. जसजसे देशांतील सरकार बद्धमूल होतें व त्यावर लोकांचा विश्वास बसतो तसतसें सरकारला व्याज कमी कमी द्यावें लागतें. पहिल्या बाजीरावास दरमहा दरशेंकडा २ रुपयांनीं कर्ज काढावें लागलें; तेंच पुढें नानासाहेबांच्या कारकीर्दींत १॥ रुपयार्न कर्ज मिळू लागलें व सवाई माधवरावांच्या कारकीर्दीमध्यें दरमहा दरशेंकडा १ रुपयाचा व्याजाचा दर झाला होता. यावरून व्याजाचा दर सावकाशपणें पण कमीकमी होत चालला होता असें दिसतें.
 सरकारची जर ही स्थिति तर खासगी व्यक्तींना किती तरी व्याज द्यावे लागत असलें पाहिजे हें उघड आहे. परंतु इंग्रजी अमलापासून पैसे पुरून ठेवुण्वाची पद्धती जात चालली आहे; अजूनही आमच्या पुराणप्रियतेमुळें आह्मीं ती अजिबात साइन दिली नाहीं हें मागें एके ठिकाणीं सांगितलें आहे. यामुळे व्याजाचा दर कमी कमी होत चालला आहे. तरी पण अजून गरीब शेतक-यांना जबर व्याज द्यावे लागतें व अशा गरीब लोकांची पत वाढविण्याकरितांच सहकारी पेढ्या काढण्याचा हल्लीं चालू झाला आहे. त्याची हकीकत दुस-या एका भागांत द्यावयाची आहे म्हणून त्याचा येथें उल्लेख करण्याची जरूरी नाहीं.
 वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, व्याज या उत्पन्नाच्या वांट्याचें स्वरूप जमिनीच्या खंडाच्या स्वरूपापासून अगदीं भिन्न आहे. देशाच्या भरभराटीबरोबर जमिनीचा खंड वाढत जातो तर व्याजाचा दर कमी होत जातो, व व्याजाचा हलका दर हें एक देशाच्या सुस्थितीचेंच लक्षण आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं.

भाग सहावा.

नफा.

 आतां संपत्तीच्या वांटणीच्या शेवटच्या एका वांट्याचा विचार करावयाचा राहिला. तो वांटा म्हणजे नफा होय. संपत्तीच्या वांटणीमध्यें या वांटयाचें महत्व फार आहे. विशेषत: समाजाची जसजशी उन्नति होत जाते तसतसा हा वांटा फार मोठा होत जातो. संपत्तीच्या उत्पत्तीचें चवथें व शेवटचें कारण म्हणजे योजक किंवा कारखानदार होय. कच्चा माल, श्रम व भांडवल या कारणात्रयीला एकसूत्रांत आणून कारखाना उभारून प्रत्यक्ष संपत्ति उत्पन्न करणें हें काम योजकाचें किंवा कारखानदाराचें आहे. संपत्ती उत्पन्न झाल्यावर ती गि-हाइकाच्या हातीं पाडणें हाही व्यवसाय संपत्तीच्या उत्पत्तीचाच एक भाग आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. कारण ज्याप्रमाणें रानांत पडून राहिलेल्या जिनसा ह्मणजे अजून प्रत्यक्ष संपत्ति नव्हे; तर ती अनुद्भूत संपत्ति होय. परंतु तीच शहरांत आणली म्हणजे ती संपत्तिस्वरूपाप्रत पावते; त्याचप्रमाणें उत्पन्न केलेली संपत्तीसुद्धां गि-हाइकाच्या दारी आल्याखेरीज उत्पत्नीचें कार्य पूर्ण झालें असें म्हणतां येत नाहीं व गि-हाइकाच्या दारी संपत्ति पोंचविण्याचें ज्याचें काम घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी व फिरते व्यापारी या सर्वांमिळून होतें. तें तसेंच मालाची नेआण करणाच्या निरनिराळ्या साधनांच्या मालकांकडून होतें; व ह्मणूनच या सर्वांचा संपत्तीच्या उत्पाद्कांत समावेश होतो व ह्मणूनच कारखानदार व व्यापारी या दोघांच्या वांट्यांला नफा हें एकच नांव व्यवहारांत देतात व त्याचें शास्त्रीयदृष्ट्याही समर्थन करतां यत  कांहीं अर्थशास्त्रकारांचें म्हणेणें असें आहे कीं, नका हा संपत्तीचा एक स्वतंत्र वांटा आहे असें मानण्याचें कारण नाहीं. कां कीं, नफा म्हणज वास्तविक कारखानदार किंवा व्यापारी यांच्या श्रमांचा मोबदला होय व श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी होय. तेव्हां इतर मजुरदार व कारखान दार किंवा व्यापारी यांचेमध्यें फरक मानण्याचें कांहीं एक कारण नाहा व म्हणूनच मजुरी व नफा असे संपत्तीचे दोन स्वतंत्र वांटे मानण्याचेंहीं कारण नाहीं.
 परंतु कारखानदारांमध्यें कोणकोणते विशेष गुण लागतात व कारखानदार म्हणून एक संपत्तीचें कारण मानणें कसें इष्ट आहे हें मागे दुसऱ्या पुस्तकांत दाखविलेंच आहे. मजूर व कारखानदार किंवा व्यापारी हे दोन्ही वर्ग जरी श्रम करीत असले तरी त्यांच्या श्रमांमध्यें फार मोठा फरक आहे. मजूर कोणत्याही दर्ज्याचा असो-अगदीं सांगकाम्या दिसमजुरापासून एखाद्या मोठ्या कारखानदाराच्या पगारी मॅनेजरापर्यंत-परंतु या वर्गातले सर्व लोक कांहीं अटींवरठरलेल्या मोबदल्याप्रमाणें काम किंवा श्रम करतात. भग ही मजुरी दीवसाची ठरलेलीअसो, दर आठवड्याची ठरलेली असो, दर महिन्याची ठरलेली असो किंवा दर वर्षाची ठरलेली असो, म्हणजे मजूरी ही संपति उत्पन्न होण्याच्या आधीं ठरलेली रक्कम असते. संपत्युत्पादनाचे संबंधीं कांहींएक विशिष्ट ठराविक दृति त्यानें केली किंवा कांहीं एका ठराविक वळांत त्यानें कांहीं वस्तु तयार करून दिल्या म्हणजे मजुरावरची जबाबदारी संपते व त्याला कराराप्रमाणें पगार किंवा मजुरी मागण्याचा हक्क येतो. सारांश, मजूर व कारखानदार यांमध्यें चाकर व मालक या तऱ्हेचा भेद असतो. चाकरही श्रम करतो व श्रम करतो; म्हणून ते जसे एक कधींही समजले जाणार नाहींत, त्याचप्रमाणें मजूर व कारखानदार हे जरी श्रम करीत असले तरी ते एक मानले जाणार नाहींत. कारण नोकर किंवा चाकर मनिले यांचेवर करार पुरा करण्यापुरतीच मर्यादित जबाबदरी असते. परंतु मालकाची जबाबदारी अमर्याद असते. तोच प्रकार मजूर व कारखानदार यांमध्येंही असतो. मजूरावर संपत्त्युत्पाद्नाबद्यल मर्यादित अशी जबाबदारी असते. परंतु कारखानदाराची जबाबदारी अमर्यादित असते. त्याला संपत्ति उत्पन्न करण्याची सर्व जबाबदरी शिरावर घ्यावी लागते; त्याला संपत्तीचीं निरनिराळीं कारणें एकत्र करण्याची काळजी असते; त्याला उत्पन्न केलेली सर्पाने विकण्याकरेतां गि-हाईक शोधून काढावयाचें असते. त्याच्या उत्पन्नामध्ये मजु प्रमाणें निश्चितपणा मुळींच नसतो. वरील विवेचनावरून कारखानदार व व्यापारी यांना संपतीचा मिळणारा वाटा कसा स्वतंत्र आहे है दिसून येईल.आतां या नफ्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे.
 नफा म्हणजे कारखानदार किंवा व्यापारी यांना आपला कारखाना किंवा व्यापार चालविण्याचा खटाटोपीचा मोबदला होय.
 हा नफा पुष्कळ घटकावयवांनीं झालेला असतो. प्रथमत: कारखानठ्ठाराच्या देखरेखीच्या श्रमाचा माबद्ला हा एक त्यांतला घटकावयव होय. दुसरा प्रत्येक व्यापारांत कांहीं एक धोका किंवा सट्टा याचा अंश असतो.व त्याबद्दलहि काही मोबदला कारखानदारास मिळाला पाहिजे.शिवाय कारखानदारांमध्ये कारखाना चालविण्यात कांही एक योजकता व घटनाशक्ती असावी लागते. त्याबद्दलही मोबदल्याचा अंश नफ्यांत असतो. मनुष्यामध्ये योजकता व घटनाशक्ती हे दोन गुण फार विरळा दृष्टीस पडतात व ते सर्व कारखानदारांमध्ये सारख्या प्रमाणाने असतात असाही नेम नाहीं. ते कमीअधिक प्रमाणानें असतात. ज्याप्रमाणें देशांतील जमीन कमी-अधिक सुपीक असते व त्यामुळे जमिनींच्या खंडांत कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणें नफ्याचीही गोष्ट आहे, नफ्यामध्येहि कारखानदाराच्या योजकतेप्रमाणें व घटनाशकीप्रमाणें कमीअधिक नफ़ा होतो. दोघां माणसांनीं एका तऱ्हेचे कारखाने काढले; भांडवल, श्रम, कच्चा माल, यंत्रसामग्री वगैरे सर्व बाबतींत अगदीं साम्य असून एका मनुष्याचा कारखाना किफाइतशीर होतो तर एखाद्याचा आंतबत्त्याचा होतो. आंता हा फरक कारखानदाराच्या योजकता व इतर विशेष गुणांवर अवलंबून असतो व प्रत्येक धंद्यात कारखानदार अगदीं नादानापासून तें अत्यंत हुशारापर्यंत असतात व नादान कारखानदारांना नफा मूळींच मिळत नाहीं. चांगल्या कारखानदारांच्या योजकतेच्या मानानें कमीअधिक मिळतो. यावरून नफा हा खंडासारखा निरनिराळा असतो. त्याचा एकच दर कधीही असत नाहीं, म्हणजे नफ्याचें स्वरूप मजुरीसारखें नसतें. देशमध्यें सामान्य मजुरीचा दर एकच असतो. परंतु नफ्याचा सामान्य असा एक दर नसतो. तर जमिनीच्या खंडाप्रमाणें शून्यापासून हवा तितका वाढता असतो. नफ्याच्या स्वरूपाचें अशा प्रकारचें विवेचन अर्वाचीन अर्थशास्रकारांनीं केलेलें आहे. अभिमत अर्थशास्रकारांनी नफ्याचें स्वरूप एकच असतें व नफ्याचा सामान्य दूर एकच असतो असें प्रतिपाद्न केलेलें आहे. व त्यांचे मतानें देशाची संपत्ति जसजशी वाढते त्या मानानें नफ्याचे दर कमी होत जातात. या बाबतींत स्वाभाविकपणें पडणाऱ्या संपत्तीच्या चार वांट्यांमधील साम्य व विरोध यांचा विचार करण्यासारखा आहे. नफा व व्याज यांमध्यें अत्यंत साम्य आहे. कांहीं अंशीं ते एकच आहेत असें अभिमत अर्थशास्त्रकारांचें म्हणणें आहे. ज्याप्रमाणें समाजाच्या औद्योगिक प्रगतीबरोबर व्याजाचा दर कमी कमी होत जातो तोच प्रकार नफ्याचाही होतो. म्हणजे समाजाच्या औद्योगिक प्रगतीबरोबर देशांतील धंद्यांतील नफ्याचा सामान्य दर कमी कमी होतो. कारण नफा हा उत्पन्न केलेल्या संपत्तीला येणारी किंमत व उत्पन्न करण्यास लागलेला खर्च यांच्या वजाबाकीपासून येतो व एखाद्या धंद्यांत मालाला मागणी जास्त झाली म्हणजे त्याची किंमत वाढते व अशी किंमत वाढली म्हणजे नफा जास्त होती व एका धंद्यांत याप्रमाणें नेहमीपेक्षां नफा जास्त होऊं लागला म्हणजे त्या धंद्यांत लोकांची गर्दी होते व नवीन नवीन कारखाने निघून मालाचा पुरवठा वाढतो व यामुळे मालाचा दर पुनः पूर्वीच्या सरासरीवर येऊन पोंचतो. तेव्हां देशामध्यें जी नेहमीं चढाओढ चालू असते त्यामुळे देशांतील नफ्याचे दर व्याजाच्या दरांप्रमाणें नेहमीं कमी होतात.
 परंतु जमिनीचा खंड व मजुरी यांचा क्रम याच्या उलट असतो. देशाच्या प्रगतीबरोबर हीं दोन्हीं वाढत जातात. कारण जसजशी वाईट जमीन लागवडीस येते तसतशी लागवडीची धार खालीं खालीं येते व म्हणून जमिनीचा खंड वाढतो व जीविताच्या अवश्यकांची किंमत वाढल्यामुळं मजुरीचे दरही वाढत जातात. अभिमतअर्थशास्त्रकारांनी याप्रमाणें जमिनीचा खंड व मजुरी आणि व्याज व नफा यांमध्यें विरोध आहे असें दाखविलें आहे.विशेषतः मजुरी व नफा यामध्यें विशेष प्रकारचा विरोध आहे असें त्यांचें ह्मणणें आहे. कारण वर दर्शविल्याप्रमाणें नफा हा मालाला येणारी किंमत व मालाला लागणारा खर्च यांच्या वजाबाकी इतका असतो व मालाला लागणाऱ्या खर्चाचा मुख्य भाग मजुरीमध्येंच खर्च होतो. तेव्हां कांहीं कारणांनीं मजुरी वाढल्यास नफा कमी झालाच पाहिजे व मजुरी कमी झाल्यास नफा वाढला पाहिजे. म्हणजे मजूर व कारखानदार यांचें हित परस्परावलंबी नसून परस्परविरोधी आहे. जी गोष्ट मजुराच्या हिताची ती कारखानदाराच्या अहिताची व उलटपक्षीं जी गोष्ट कारखानदारांच्या हिताची तीच गोष्ट मजुरांच्या अहिताच. मजूर व कारखानदार यांमधील हा विरोधाभाव रिकार्डोनें आपल्या ग्रंथांत मोठ्या प्रामुख्यानें पुढे आणला आहे व सामाजिकपंथ म्हणून जो स्वतंत्र पंथ अर्थशास्त्रामध्यें निघाला आहे तो रिकार्डोच्या एककल्ली मताचाच परिणाम होय हें पुढें सामाजिक पंथाचा इतिहास देतांना सांगावयाचें आहे.
 परंतु रिकार्डोचें हें म्हणणें सवस्वी खरें नाहीं. कारण जर मालाला मागणी वाढली व पदार्थाच्या किंमती वाढल्या तर मजुरी व नफा हे दोन्हींही वांटे एकदम वाढूं शकतात. म्हणजे मजूर व कारखानदार यांच्या हितांत, नेहेमीं विरोध असतो व विरोध असलाच पाहिजे असा कांहीं नियम नाहीं. वास्तविक पाहतां मज़र व कारखानदार या दोघांचेंही हित परस्परावलंबी असून तें व्यापाराच्या व धंद्याच्या तेजीवर अवलंबून आहे. कोणत्याही कारणानें मालाला मागणी कमी झाली तर दोघांचेंही चुकसान होतें.
 आभिमत अर्थशास्रकारांचा नफ्याबद्दल आणखी एक वादग्रस्त सिद्वांत आहे. तो हा कीं, सर्व धंद्यांतील नफा समाजाच्या प्रगतविरोबर कमी कमी होत जातो. इतकेंच नव्हे तर सर्व धंद्यांवरील व सर्व व्यापारांतील नफ्याचा दर एकच होत जातो. निदान नफ्याच्या दराचा एकीभावाकडे कल तरी असतो. हा सिद्धांतही अभिमत अर्थशास्त्रकार चढाओढीच्या तत्त्वानेंच प्रतिपादतात. एका धंद्यामध्यें दुसऱ्या धंद्यापेक्षां नफ्याचें प्रमाण जर जास्त असेल तर देशांतील भांडवलाचा ओघ त्या धंद्याकडे जास्त वळेल व जोंपर्यंत या धंद्यांतील नफ्याचें प्रमाण इतर धंद्यांतील नफ्यांच्या प्रमाणापेक्षां जास्त राहील तोंपर्यंत हा क्रम अव्याहत चालू राहील. ज्याप्रमाणें दोन निरनिराळ्या पातळींत असलेल्या तळ्यांतील पाणी एका पातळीला येईपर्यंत एकांतून दुसऱ्यामध्यें पाण्याचा सारखा ओघ चालेल त्याप्रमाणेच धंद्यांची गोष्ट आहे. तेव्हां सर्व धंद्यांचा नफा सारखाच. असणे हीच धंद्यांची स्थिर स्थिति होय. तेथपर्यंत चढाओढीचें कार्य सारखे सुरू राहिलेंच पाहिजे. आतां अॅडम स्मिथनें मजुरी व नफ्याच्या दरांमध्यें भेद करणारी जीं विशिष्ट कारणें सांगितली आहेत त्यांनीं जो काय नफ्यांत फरक राहील तेवढा मात्र कायम स्वरूपाचा असेल. उदाहरणार्थ, एखादा धंदा अगर व्यापार फार किळसवाणा अगर घाणेरडा अगर तिरस्छत असेल तर त्या धंद्याचा नफा इतर सुलभ व कमी मेहनतीच्या किंवा मानाच्या धंद्यांपेक्षां नेहमीच जास्त राहिला पाहिजे, हें उघड आहे; परंतु या विशिष्ट कारणाखेरीज बाकी सर्व नफ्याचा दर एकरूप होण्याकडे कल असलाा पाहिजे असा अभिमत अर्थशास्त्रकारांचा एक सिद्धांत आहे.
 परंतु या सिद्धांताचा खोटेपणा दाखवितांनाच नफा हा जमिनीच्या खंडासारखा आहे; म्हणजे त्याचा एकरूप होण्याकडे कल असण्याऐवजीं विविधतेकडे कल आहे असें अर्थशास्त्रज्ञांनीं दाखाविलें आहे; व हें अर्वाचीन अर्थशास्त्रकारांचें म्हणणें पुष्कळ अंशीं खरें आहे. कारण नफा हा कारखानदारांच्या योजकतेचा, कल्पकतेचा व वाटनाशक्तीचा परिणाम होय. कारण आपण असें पाहतों कीं, सारख्याच स्थितींतील दीन कारखाने किफाईतशीर किंवा आंतबट्याचे होतात व याचें कारणा कारखानदारांच्या कल्पकतेंतील फरक होय. तेव्हां सर्व धंद्यांतील व धंद्याच्या प्रत्येक प्रकारांतलि नफ्याचा दर एकल्प होत जाती हें म्हणणें वस्तुस्थितीस धरून नाहीं. उलट नफ्यामध्यें जमिनीच्या खंडाप्रमाणें एकप्रकारची विविधताच येत असते व याचा प्रत्यक्ष अनुभव संयुत्कभांडवलानें काढलेल्या कंपन्यांच्या नफ्यातोट्यांच्या हिंशोबाबरून खासा येतो. या हिशेबांत अांतबट्ट्याचा व्यापार करणाच्या कंपन्यांपासून तों थेट शेंकडा वीस पंंचवीस किंवा तीस नफा मिळवणाऱ्या कंपन्या दृष्टीस पडतात. याचरून नफ्याच्या दुराचा विविधतेकडेच कुल आहे असें म्हणणें भाग आहे.
 नफ्यााच्या एकीभावांपेक्षा विविधतेकडे कल आहे याला दुसरेंही एक प्रमाण आहे. तेंं हें कीं, संपत्तीच्या इतर सर्व वांट्यांपेक्षां नफ्याचें स्वरूप निराळें आहे. जमिनीचा खंड, मजुरी किवा व्याज या सर्व वांत्यांमध्येंं एकप्रकारचा निश्चितपणा आहे. कारण यांतील पहिले दोन भाग करारावरच बहुशा अवलंवून असतात व तिसराही देशांतील भांडवलाची विपुलता अगर दुर्मिळता यावर अवलंबून असतो. परंतु हे सर्व वांटे कारखानदाराला माल त्यार होण्याच्या आधीच किंवा त्या समयींच द्यावे लागता व प्रत्येक वेळींं त्याची रक्कम ठरलेलीच असते. परंतु नफा हा कधींही करारानें ठरलेला वांटा नसतो. तो कारखानदाराला संपत्तीची विल्हेवाट लावल्यावर मिळावयाचा असतो व त्यांत एक प्रकारचा सट्टयाचा अंश असतो. माल तयार करतांना पुष्कळ वेळ जातो व या अवधींत मालाच्या किंमतींत फरक होण्याचा संभव असतो. जर कारखानदाराच्या सुदैैवानें त्यानें अटकळ केलेल्या किंमतीपेक्षां मालाची किंमत वाढली तर त्याला अनपेक्षित नफा होईल. परंतु दुर्दैवानें किंमत कमी झाल्यास नफ्याच्या ऐवजीं व्यापारांत व धंद्यांत त्याला ठोकर लागण्याचाही संभव असतो. याप्रमाणें नफ्यामध्यें एक प्रकारचा अनिश्चितपणा हा स्वभावसिद्ध असतो व म्हणून सर्वांना सर्व वेळीं व सर्व ठिकाणीं सारखा नफा मिळणें अशक्य असतें. उलट नफ्याची बाब ही सट्टयासारखी असते. कांहीं व्यापार तर निवळ जुगारीच्या खेळासारखे असतात. हल्लींच्या काळीं सर्वजग म्हणजे एकच व्यापारी पेठ झाल्यासारखी झाली आह व यामुळे या व्यापारी पेठेचे जे जिन्नस-उदाहरणार्थ, कापूस, गहूं, कोळसा, राकेल, सोनें, रुपें वगैरे जिनसांचा घाऊक व्यापार म्हणजे एकप्रकारचा जुगारच झाला आहे. यामुळे जुगारीप्रमाणेंच याही व्यापारांत क्षणांत मनुष्य लक्षापति किंवा भिक्षापति होऊं शकतो. यावरून नफ्याचा विविधतेकडेच कल आहे असें म्हणणे प्राप्त आहे.
 येथपर्यंत औद्योगिक बाबतीत प्रगतीस गेलेल्या समाजामध्ये संपत्तीचे मुख्य वांटे कसे व कोणते होतात हें दाखविलें. संपत्ति मुख्यतः चार वर्गांच्या संगनमतानें उत्पन्न होते. तेव्हां उत्पन्न झालेल्या संपत्तीचे जे चार मुख्य वांटेकरी आहेत ते जमीनदार, मजूर, भांडवलवाले कारखानदार व व्यापारी हे होत. समाजांतील इतर सर्व वगचेिं उत्पन्न या चार मुख्य वांट्यांच्या पोटांतून होतें. सर्व व्यवहार चढाओढीनें चालले आहेत, समाजांतील सर्व वर्ग सारखे शिकलेले असून प्रत्येक मनुष्याला आपलें हित कळत आहे, तसेच समाजामध्यें संपत्तीची वांटणी ही रूढीने न ठरतां फक्त करारानेंच ठरते, वगैरे गोष्टी गृहीत धरून समाजामध्यें संपत्तीचें वांटे कसे व कोणते पडतात, हें आपण आतांपर्यंत पाहिलें. परंतु या गृहीत गोष्टी सर्व ठिकाणी व सर्व धंद्यास लागू असतांत असें नहीं. कमी अधिक प्रमाणाने सर्व ठिकाणी रुढीचा अंमल चालूच असतो. शिवाय शेतकीच्या बाबतींत लागवडीच्या निरनिराळ्या पद्धती निरनिराळ्या ठिकाणीं अस्तित्वांत असतात व या निर निराळ्या पद्धतीने समाजामधील वर्गात संपत्तीची वांटणींही निरनिराळ्या तऱ्हेने होते. शिवाय शेतकी हा संपत्तीच्या उत्पत्तीचा एक बराच महत्वाचा धंदा असल्यामुळे शेतकीच्या निरनिराळ्या पद्धतीचा अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करणे अवश्य आहे. म्हणून पुढील भागांत प्रथमतः युरोपांतील जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या प्रकारांचे वर्णन देऊन धनोत्पादनाच्या व लोकहिताच्या दृष्टीने कोणती पद्धत चांगली, या गोष्टीचा विचार करव वाचा वेत आहे; नंतर हिंदुस्थानांतील निरनिराळ्या पद्धतींचा याच दृष्टीने विचार करून मग वांटणीच्या अवशिष्ट प्रश्नाकडे वळण्याचा मानस आहे.

भाग सातवा.

जमीनधाऱ्याच्या पद्दती.

 सर्व जगात सर्व काळीं जमीन ही संपत्तीची मुख्य जनयित्री असल्या मुळे जमीनधाऱ्याच्या पद्धती फार महत्वाच्या गणल्या जात असत. युरोपांत ग्रीक व रोमन लोकांमध्ये जमिनी ह्या खासगी मालकीच्या असत. नागरिक हे जमिनीचे पूर्ण मालक असत. परंतु या काळी गुलामगिरीचा प्रघात असल्यामुळे ज्याप्रमाणे इतर धंदे गुलामच करीत त्याप्रमाणे शेताची लागवडही गुलामच करीत. नागरिक देखरेख मात्र करीत. पहिल्य पहिल्यांदा शेताचे आकार साधारण बेताचेच असत; परंतु पुढेपुढे शेताचे आकार मोठे मोठे होऊ लागले व नागरिकांना राजकीय कामामुळे शेताची प्रत्यक्ष देखरेख करतां येणेसुद्धांअशक्य झाले. यामुळे शेताची देखरेखही नागरिकांनी नेमलेल्या नोकरांकडे किंवा गुलामांपैकींच जास्त विश्वासाच्या गुलामाकडे दिली जाई व याचा परिणाम पहिल्यापेक्षां अनिष्ट झाला हे उघड आहे. रोमन राज्याच्या बाल्यावस्थेत रोमन लोक स्वतः शेतें लागवडीस आणीत व स्वतः शेतें कसणे हे मानाचे समजले जात असे; परंतु पुढे तेर्येही सर्व लागवड गुलामांमार्फतच होऊ लागली. नागरिकांच्या मालकीची पुष्कळ एकर जमीन असे व मालकांच्या सामान्य देखरेखीखाली जमिनीची लागवड होत असे. या शेतकीच्या लागवडीच्या पद्धतीला दासंकृषि म्हणतां येईल. या पद्धतीमध्यें गुलाम हे प्रत्यक्ष जमीन कसतात, गुलामांचे मालक गुलामांना खावयाला घालतात, व हा खर्च जाऊन जी शिल्लक राहील तें या पद्धतींत सर्व मालकाचें उत्पन्न समजलें जातें; त्यांत कोणीही वांटेकरी नसतो. गुलाम मालकांच्या सत्तेचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या श्रमाबद्दल मजुरी यावी लागत नाहीं. परंतु ही पद्धत अर्थशास्त्रदृष्ट्या फारच कनिष्ठ दर्जाची आहे. कारण गुलामांना शेतकीची लागवड चांगली हुरूपानें करण्याची बुद्धि होणें शक्य नसतें. कारण शेतीचें उत्पन्न वाढलें तरी त्यांचें त्यापासून हित मुळींच नसतें. गुलाम हे स्वाभाविक कामचुकार असतात. धन्याच्या चाबकाच्या भीतीनेंच फक्त ते काम करतात. यामुळे अशा जुलुमाचें काम अगदीं कनिष्ठ दर्ज्यांचे असतें हे सांगण्याची जरुरी नाहीं. या पद्धतीपासून शेतीचें उत्पन्न फार कमी येतें, इतकेंच नव्हे तर शेताची मशागत व निगा नीट न राहिल्यामुळे लागवडीची जमीन दिवसेंदिवस कमकस होत जाऊन शेवटीं ती जमीन अगदी नापीक होते. अमेरिकेमध्यें गुलामांच्या श्रमानें जी शेतकीची लागवड होत असे, त्यामध्येंही असाच अनुभव आलेला आहे. ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलामांची स्थिति अमेरिकेंतील गुलामांइतकी वाईट नव्हती. त्यांना घरांतल्या चाकरमाणसांप्रमाणें वागविलें जात असे. ग्रीक गुलाम व मालक यांच्यामध्यें तीव्र वर्णभेदही नव्हता यामुळे गुलामांबद्दल अमेरिकेमध्यें दिसून येणारी तुच्छताबुद्धी नव्हती, शिवाय ग्रीक गुलामांना मालकाच्या परवानगीनें आपली दास्यांतून मुक्तता करून घेतां येत असे; यामुळे धन्याला खुष करून पुढेंमागे आपली सुटका करून घेतां येईल अशी आशा ग्रीक गुलामांना असे. म्हणून ग्रीक व रोमन लोकांच्या काळीं दासष्ट्षीचे अमेरिकन दासकृषीइतके वाईट परिणाम दिसले नाहीं इतकेंच. परंतु दासकृषी ही सर्वात कनिष्ठ दर्ज्याची कृषिपद्धति होय ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.या पद्धतीमध्यें शेतीची जमीन फार झपाट्यानें निकस होत जाते व या शेतलागवडीच्या पद्धतीनें धनोत्पादनही फारच कमी प्रमाणावर होतें. या कारणानें ही पद्धति अर्थशास्त्रदृष्ट्या अगदीं त्याज्य ठरते. शिवाय मानवी जातीबद्दल आदरभाव उत्पन्न झाल्यापासून गुलामगिरी अमानुष वाटू लागला; यामुळे ही पद्धत नीतिदृष्ट्याही गर्हणीय वाटू लागली व म्हणून क्रिश्चन धर्माच्या प्रसाराने युरोपांतील गुलाम गिरी बहुतेक नाहींशी झाली व गुलामगिरीच्या रुढींच्या नाशाबरोबर् दासकृषीची पद्धतिही नाहींशी झाली. शिवाय रोमन पादशाहीचा नाश ज्या उत्तरयुरोपांतील रानटी जर्मन लोकांनी केला, त्यांच्यामध्यें गुलामगिरीच्या प्रघात नव्हता. यामुळे सर्व रोमन साम्राज्यावर जेव्हां हे लाक पसरले व त्यांनीं निरनिराळीं राष्ट्रे युरोपांत निर्माण केलीं, त्यावेळीं रोमन लोकाच्या काळीं प्रचलित असलेली दासकृषिपद्धति स्वाभाविकपणें नाहीशी झाली; व या उत्तरेकडील लोकांमध्यें प्रचलित असलेल्या दासकल्पऋषि व जहागिरीपद्धति प्रचारांत येऊं लागल्या. ही दासकल्पऋषिपद्धति गुलामगिरीसारखीच असल्यामुळे तिचा प्रसार फ्रार जलद्र व सर्व युरोपभर झाला. त्यांतल्या त्यांत पूर्वयुरोपमध्यें तिचा फैलाव विशेष झाला व तेथें ही पद्धति फार काळपर्यंतही टिकली.पश्चिमयुरोपांत जहागिरीपद्धतीचा विशेष फैलाव झाला व त्यामुळे तेथें दासकल्पऋषीने फारसें मूळ धरलें नाहीं. तेव्हां आतां प्रथमतः दासकल्पऋषीचा विचार करूं.
 या पद्धतींतील जमीन कसणारे दासकल्प असत. ते मालकाचे गुलाम नसले तरी मालकाच्या शेतीचे गुलाम असत; ह्मणजे त्यांना मालकाचें शेत सोडून जाता येत नसे. ज्या शेताचे ते शेती समजले जाता असत त्यावर त्यांनीं काम केलंच पाहिजे असा निर्बध असे. तसेच जरी त्यांना खासगी मिळकतीचा अधिकार असे तरी ते पुष्कळ बाबतींत आपल्या मालकाचे तांबेदार असत. आपले तंटेबखेडे मालकाकडूनच त्यांना तॊडवून घ्यावे लागत, तसेंच मुलांमुलीचीं लग्ने करणें याला मालका परवानगी लागे व त्या प्रसंगीं मालकाला कांहीं नजराणा द्यावा लागे. या पद्धतींचा विशेष ह्मणजे हा कीं, मालकांची जमीन हे दासकल्प शेतकरी स्वतःच्या मेहनतीनें कशीत व आपल्या मजुरीबद्दल त्यांना जे जमिनीचा तुकडा दिलेला असे, त्याची लागवड करून ते आपलें पोट भरत. आठवड्यांतून तीन दिवस धन्याच्या शतावर काम करावयाचें व बाकीचे दिवस आपल्या शेतावर काम करावयाचें असा सामान्य नियम साथ नियमांत केव्हां केंव्हा फेरबदल होत असे.तसेच काही विशेष प्रसंगी मालक बोलावील त्या वेळीं त्यांना मालकाच्या कामाकरितां जावें लागे. आणखीही किरकोळ पुष्कळ हक्क मालकाला असत.
याही कृषिपद्धतीचा मुख्य दोष ह्मणजे शेतीच्या लागवडीची हयगय होय. दासकल्पशेतक-यांना मालकाच्या शेतावर अंग मोडून मोठ्या कळकळीनें किंवा मोठ्या हुरूपानें काम करण्याची बुद्धि होणें मानवी ‘स्वभावाप्रमाणें अशक्यच होतें. कारण अधिक काळजीनें काम केल्यास किंवा कमी काळजीनें काम केल्यास त्यांना सारखेंच होतें. अगदीं गुलामाप्रमाणें यांची स्थिति नव्हती हें खरें आहे. आपल्या जमिनीच्या तुकड्याची चांगली मशागत केल्यास त्यांचें त्यांत कल्याण होण्यासारखें होतें. परंतु ऐनकामाच्या वेळीं धन्याच्या शेतावर कामावर जावें लागल्यामुळें आपल्या शेताकडे विशेष लक्ष देण्यास त्यांना सवड सांपडत नसे. यामुळे दासकल्पशेतक-यांकडून दोन्ही शेतांची हयगय होई. एक दुस-याचें शेत म्हणून, व आपल्या शेतावर काम करण्यास पुरेसा वेळ नाहीं ह्मणून; शिवाय या पद्धतींत धन्याकडूनही देखरेख चांगली होण्याची आशा नसते, कारण यांना शेती करणें हें कमीपणाचें वाटत असे. यामुळें बहुतेक दासकृषीप्रमाणेंच या पद्धतीचे दोष असत; मात्र दगडापेक्षां वीट मऊ एवढाच काय तो फरक.
 परंतु दासकल्पकृषीचा देशांतील एकंदर मजूरवर्गावर फारच अनिष्ट परिणाम होतो. दासकल्प शेतकरी हे धन्याच्या शेतावर रडतराऊप्रमाणें कामाला आल्यामुळें तें काम ते रेंगाळत, थबकत व अत्यंत हलगर्जीपणानें करीत. परंतु यांच्या उदाहरणानें दुसरे मजूर यांनाही तचि संवय लागे. ह्मणून जेथें जेथें दासकल्पकृषि प्रचलित आहे तेथें तेथें एकंदर मजुरांची कर्तबगारी व कार्यक्षमता फारच कमी असते असा अनुभव आहे. कारण अशा ठिकाणच्या मजुरांमध्यें कर्तव्यदक्षता, चलाखी, हुरुप वगैरे गुणांचा अभाव दिसून येते. अर्थात् याचा उद्योगधंद्यावर अनिष्ट परिणाम होतो; कारण अशा मजुरांनीं केलेलें काम वाईट होतें इतकेच नाहीं तर त्यावर खर्चही अनिवार होतो.दासकल्पकृषिमध्यें शेताचें उत्पन्न फार कमी होतें व या पद्धतींत शेतकीची सुधारणा होण्याचा संभव फारच कमी असतो. दासकल्प शेतक-यांना मालकाच्या शेतावर ऐनवेळीं कामास जाणें मोठ्या जीवावर येतें व या जाचांतून आपण सुटूं तर बरें असें त्यांस होतें. कारण मग त्यांना आपल्या शेताकडे लक्ष देण्यास सांपडतें.
 धन्याच्या कामावर दासकल्प शेतक-यांना बोलाविण्याच्या युरोपां- तील पद्धतीचें व आमच्या हिंदुस्थानामधील वेठीच्या पद्धतीचें बरेंच सांम्य आहे. खोतांना किंवा इनामदारांना आपल्या गांवांतून कुळांना वेठीनें आपल्या कामास घेण्याचा हक्का असे व अझून कोठें कोठें तो चालू आहे. उदाहरणार्थ अझूनही काकणांत ही वेठीची पद्धत थोडीबहुत चालू आहे परंतु वेठीचें काम ह्मणजे अगदीं टाकाऊ असा तेथेंही अनुभव आहे. व वेठीची जेथें पद्धत असेल तेथें इतर दिसमजुरीचे गडीही तसेच कामचुकार असतात असा आपल्या इकडेही अनुभव आहे.
 रोमन पादशाही ज्या उत्तरेकडील जर्मन लोकांनीं पादाक्रांत केली त्यांनीं जमिनीच्या बाबतींत एक अगदीं नवी पद्धति युरोपांत सुरू केली; तिला जहागिरीपद्धति ह्मणतात. जरीं ही पद्धति राजकीय व लष्करी होती तरी या पद्धतीचे जमीनधाऱ्याच्या पद्धतीवरही पुष्कळ परिणाम झालेले आहेत ह्मणून त्याचा थोडासा इतिहास येथें देणें अप्रासंगिक होणार नाहीं. असें केल्यानें युरोपांत हल्लीं प्रचारांत असलेल्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचें स्पष्टीकरण लवकर होईल. कारण या सर्व पद्धती या जहागिरीपद्धतीपासूनच पर्यायानें निष्पन्न झालेल्या आहेत.
 ग्रीक किंवा रोमन:लोकांमध्यें प्रजासत्ताक राज्यपद्धति विशेष प्रचलित होती व पुढें रोमन बादशाही झाली तरी देशांतील जमीन राजाची ही कल्पना त्या काळीं नव्हती. देशांतील सर्व जमिनी खासगी लोकांच्या मालकीच्या असत व सरकारच्या कांहीं जमिनी असल्या तरी सर्व जमिनीची मालकी सरकारची ही कल्पना नव्हती. परंतु जर्मन लोकांमध्यें एकसत्तात्मक राज्यपद्धति विशेष प्रचलित असे. प्रत्येक टोळीचा एक नायक असे व तोच राजा समजला जात असे. तो टोळींतील पोक्त लोकांच्या सभेच्या सल्लामसलतींने राज्यकारभार करी खरा, तरी पण मुख्य सत्ता त्याच्या हातीं असे; जेव्हां सर्व रोमन पादशाही या लोकांनीं पादाक्रांत केली तेव्हां सर्व प्रांतावर अशी एकसत्तात्मक राज्यपद्धति सुरू झाली व काबीज केलेला प्रांत सर्व राजाच्या मालकीचा ही कल्पना या जर्मन लोकांमध्यें प्रचलित झाली. काबीज केलेली ही सर्व जमीन राजा आपल्या लष्करी अनुयायांना अगर सरदारांना वांटून देई व कांहीं भाग आपल्या स्वतःकरिता राखून ठेवी. ही जी जमीन सरदारांना मिळे,त्याबद्दल त्या सरदाराने राजा हुकूम फरमावील तेव्हां ठरलेल्या शिपायांसकट राजाला मदत करण्यास आलें पाहिजे असा करार असे. तसेंच प्रत्येक सरदारास राजनिष्ठ राहीन अशाबद्दल शपथ घ्यावी लागे. राजानें सरदारांना दिलेल्या जमिनीबद्दल राजास लष्करी मदत करणें हा मोबदला समजला जात असे. हे सरदार आपल्या जमिनी विभागून त्या आपल्या मानक-यांना याच लष्करी मदतीच्या अटीवर देत असत व या मानक-यांकडून स्वामिभक्तीची शपथ घेववीत. हे मानकरी आपल्या वांट्याच्या जमिनी कुळांना देत. जहागिरीपद्धतीचें सामान्यतः अशा प्रकारचें स्वरूप होतें. अर्थात् या पद्धतीचा विशेष हा कीं, देशांतील सर्व जमिनीचा मालक ह्मणजे फक्त देशाचा राजा, देशांतील जमीन धारण करणारे हे सर्व त्याचीं कुळे व राजाच्या स्वामित्वाबद्दल त्याला लष्करी पेशाची मदत करणें हा जमिनीबद्दलचा खंड अशी समजूत असे. या कल्पनेमुळें राजापासून तों थेट शेत कसणा-या गरीब शेतक-यापर्यंत:समाजांतील वर्गाची एकाखालीं एक अशी मालिका बने. प्रत्येक खालच्या वर्गाच्या माणसानें प्रत्येक वरच्या वर्गाच्या माणसाच्या आज्ञेंत राहिलें पाहिजे; व युद्धकाळीं त्याला जातीनें मदत केली पाहिजे असा निर्बंध असे. या पद्धतींत राजकीयदृष्ट्या सरदारांच्या हातांत सत्ता राजांपेक्षांही जास्त असे. कारण राजाचें सैन्य ह्मणजे सरदारांचें सैन्य होय. यामुळे राजा हा नेहमीं सरदारांवर अवलंवून राही. सरदार जर राजाच्या विरुद्ध उठले तर राजाला त्यांचे विरुद्ध जाण्यास शक्ति नसे. ही पद्धति देशांमध्यें दंगेधोपे होत अशा काळीं चांगली होती. परंतु जातीनें हजर राहणें हें लोकांना बरेच संकटाचें वाटूं लागलें व औद्योगिक वाढीबरोबर व देशांतील शांततेच्या वाढीबरोबर ही लष्करी मोबदल्याची पद्धत नाहींशी होऊन हळूहळू पैशाच्या खंडाची पद्धत येत चालली. म्हणजे राजाला सरदारांच्याकडून शिपाई मागविण्यापेक्षां जमिनीबद्दल पैशाच्या रूपानें खंड घेऊन त्यांतून पगारी सैन्य ठेवणें हें आपल्या सामर्थ्यास व देशाच्या शांततेस जास्त सोईस्कर वाटूं लागले. सरदारांनाही जातीनें सैन्यांत जाणें व लोक जमवून सैन्याचे पथक तयार करणें यापेक्षां पैशाच्या रूपानें राजाला खंड देणे जास्त सुखावह वाटूं लागलें. राजाला पैसे देण्याकरितां त्यांनी आपल्या कुळांडून जमिनीच्या स्वामित्वाबद्दल पैशाच्या रुपानें खंड घेण्याची सुरुवात केली. प्रत्यक्ष शेत कसणारे आपल्या धन्यास पैशाच्या रूपानें किंवा ऐनजिनसी खंड देऊं लागले. सारांश, या जहागिरीपद्धतींतील लष्करी भाग कालेंकरून नाहींसा होऊन त्याला जमीनदार व कूळ असें औद्योगिक स्वरूप प्राप्त झालें व युरोपांत सध्यां प्रचलित असलेल्या पद्धति या जहागिरीपद्धतीच्या ऱ्हासानंतर त्यांतूनच निष्पन्न झालेल्या आहेत. त्यांचें वर्णन पुढील दोन भागांत करूं.
 दासकृषि किंवा दासकल्पकृषीप्रमाणेंच ही जहागीरपद्धति अर्थशास्त्रदृष्ट्या कमी दर्ज्याचीच आहे. कारण सरदारलोक किंवा त्यांचे हाताखालील मानकरी लोकं यांना आपला लष्करीपेशा आहे असें वाटे. यामुळे त्यांना शेताच्या सुधारणेकडे लक्ष घालणें कमीपणाचें वाटे. प्रत्यक्ष शेत कसणाऱ्यांना सरदार व मानकरी हे बोलावतील तेव्हां त्यांच्या चाकरीस जावें लागे. यामुळें त्यांच्याकडूनही शेताची मशागत चांगली होत नसे. परंतु पहिल्या दोन पद्धतींपेक्षां ही पद्धत किंचित् बरी होती.त्यांतल्या त्यांत जेव्हां जातीनें चाकरी करण्याच्या ऐवजीं पैशाच्या रूपानें स्वामित्वाच्या हक्काबद्दल मोबदला देण्याची पद्धति सुरू झाल्यापासून शेत कसणाऱ्या लोकांना शेतकींत सुधारणा करण्यास सवड झाली.विशेषतः उपोद्घातांत सांगितल्याप्रमाणें धर्मयुद्धाच्या निमित्तानें सरदारांच्या जमिनी व्यापाऱ्यांच्या व मध्यमस्थितींतील लोकांच्या हातांत येऊं लागल्यापासून तर शेतीची सुधारणा जास्त जोरानें होऊं लागली. युरोपांतील निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या परिस्थितींमुळें व निरनिराळ्या कारणांनी जहागिरीपद्धत कालेंकरून नाहींशी झाली. ती कां व कशी हें येथें सांगण्याची जरुरी नाहीं. परंतु त्या पद्धतीच्या नाशाचे परिणाम काय झाले हे पहिलें पाहिजे.
 प्रथमतः सर्व जमिनीचा राजा मालक हि कल्पना जाऊन जमिन खासगी व्यक्तीच्या मालकीच्या हि कल्पना फैलावली. राजा पूर्वी जो खंड घेत असे त्याला जमीनसाऱ्याचें स्वरूप येऊन तो कायमचाच ठरून गेला.कांहीं देशांत सरदारांच्या ताब्यांत त्या जमिनी राहिल्या किंवा मोठमोठ्या जमीनदारांच्या ताब्यांत जाऊन जमीनदार व त्यांचेपासून खंडाने शेते करणारे मोठमोठे शेतकरी असा प्रकार सुरु झाला. यालाच प्रचंड शेतकी म्हणतात.काही देशांत हा सरदारांचा वर्ग नाहींसा झाला व जमिनी कुळाच्या मालकीच्या झाल्या व अल्पशेतकीची पद्धत सुरु झाली. कांहीं ठिकाणीं जमीनदार व कुळें असा संबंध राहिला; परंतु कुळें ऐनजिनसी खंड देऊं लागलीं. आतां या निरानिराळ्या पद्धतीचा अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करावयाचा आहे तो पुढील भागावर टाकणें इष्ट आहे.

भाग आठवा.

अर्धेलीची कृषिपद्धति.

 अर्थशास्त्रांतील बराच वादग्रस्त प्रश्न ह्मणजे प्रचंड शेती चांगली किंवा छोटी शेती चांगली हा होय. परंतु या प्रश्नाच्या आधीं एका लहानशा भागांत युरोपांतील कांहीं प्रदेशांत प्रचलित असलेल्या दोन पद्धतींचें वर्णन देणें इष्ट होईल. यांतील पहिली पद्धति ह्मणजे अर्धेल-तिर्धेल पद्धति होय.
 ही पद्धति इटाली देशांत विशेष प्रचारांत आहे. तसेंच ती फ्रान्स, स्वीत्झर्लंडचा कांहीं भाग, व हॉलंड वगैरे देशांतही चालू आहे. प्रवास केलेल्या पुष्कळ लोकांच्या मतानें ही पद्धति पुष्कळच वरच्या दर्ज्याची आहे यांत शंका नाही; व इटालीमध्यें शेतकीची सुधारणा या पद्धतीच्या योगान झालेली आहे. तसेंच या पद्धतीमध्यें शेतकरीवर्गही चांगला सुखी व संपन्न असा दृष्टोत्पत्तीस येतो. या दृष्टीनें ही पद्धति अर्थशास्त्रदृष्ट्याही प्रशंसनीय आहे हें कबूल केलें पाहिजे.
 या पद्धतीचा विशेष हा आहे कीं, यामध्यें जमीनदार व कुळें यांचा निकट संबंध राहून एकमेकांचे हितसंबंध विरोधी नसून परस्परावलंबी असतात. या पद्धतींत जमीनदार हा शेतावरील इमारती व शेतलागवडीस लागणारें भांडवल कुळास आपण पुरवितो व कूळ आपले श्रम देतो. व शेतांत जें उत्पन्न होईल त्याची वांटणी रूढ़ीनें ठरलेल्या प्रमाणानें होतें; कांहीं प्रांतांत व कांहीं भागांत उत्पन्नाचा अर्धा वांटा मालकास जातो व अर्धा कुळास राहतो; कोठें कोठें मालकांस तिसरा हिस्सा व कुळास दोन हिस्से जातात. आणखीही निराळ्या प्रमाणानें वांटणी होते. परंतु उत्पन्नाची ही वांटणी चढाओढीनें ठरत नाहीं तर ती देशाचारानें व रूढीनें ठरलेली असते व ती वारंवार बदलत नाहीं. या पद्धतीमध्यें कुळास शेताची मशागत चांगली करण्यास हुरुप असतो. कारण शेताचें उत्पन्न वाढल्यास त्याचा अर्धा वांटा त्याला मिळावयाचा असतो. परंतु या पद्धतीमध्यें जी शेतीची सुधारणा होते ती अंगमेहनतीनें काय होईल ती होईल. शास्त्रीय ज्ञान व भांडवल यांनी घडून येणारी सुधारणा या पद्धतींत फारशी शक्य नसते. कारण जमिनीचा मालक शेतीकडे स्वतः देखरेख करीत नसल्यामुळे जमिनींत जास्त भांडवल घालण्यास कचरतो. शिवाय । पद्धतीमध्यें पुढील भागांत वर्णन करावयाचा मिराशी पद्धतीइतका जमिनीबद्दल आपलेपणा कुळास वाटत नाहीं हें कबूल केलें पाहिजे व मिरासदार शेतक-याइतकी मेहनत या अर्धेली कुळाकडून होणें शक्य नाहीं हेंही कबूल करणें भाग पडेल.
 परंतु ज्या ज्या देशांत ही अर्धेल-तिर्धेल पद्धति सुरू आहे त्या त्या ठिकाणची शेती चांगल्या स्थितींत आहे इतकेंच नाहीं तर तेथला शेतकरीवर्ग सुद्धां सुखवस्तु आहे. कोणताही प्रवाशी इटालीभर फिरला तर त्याला त्या देशांतील व्यवस्थित टापटिपीच्या सुंदर शेतीच्या लागवडीचें कौतुक वाटल्यावांचून रहात नाहीं. तेथलीं शेतें ह्मणजे सतत माळ्याचा डोळा व हात ज्यांवर फिरत आहे अशा सुंदर बगीच्याप्रमाणें दिसतात असें प्रवाशी सांगतात हा सर्व प्रभाव कुळांना आपल्या जमिनीबद्दल स्थाईकपणा वाटतो.याचा होय. ही अर्धेली कुळें उपरी कुळें नसतात.शिवाय खंड हा रूढीनें ठरल्यामुळे चढाओढीने वारंवार बदलण्याचा संभव नसतो. यामुळें शेतकऱ्यांस आपल्या शेताची मशागत करण्यास हुरूप व हौस असते. याप्रमाणें ही जमीनधाऱ्याची पद्धति एकंदरींत बऱ्याच वरच्या पायरीची आहे यांत शंका नाही. मिराशी पद्धति मात्र यापेक्षांही चांगली इतकेंच; कारण त्या पद्धतींत शेतकरी हा शेताचा सर्वस्वी मालक असल्यामुळें शेताचें सर्वच उत्पन्न त्याला मिळावयाचें असतें. येथें उत्पन्नाचे हिस्से पडावयाचे नसतात. यामुळे शेतक-यांस आपल्या शेताच्या मशागतींत व सुधारणेंत आपलें श्रम-सर्वस्व घालण्यास बुद्धि होते.
 दुसरी पद्धति आयर्लंडांतील आहे. तिला उपरी कुळाची पद्धति म्हणतां येईल. गेल्या कांहीं वर्षांपासून इंग्रज सरकारनें या पद्धतीचे वाईट परिणाम पाहून ही पद्धति नाहींशी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत व १९०३ सालीं जो कायदा झाला त्यानें तर कालेंकरून ही पद्धति जाऊन मिराशी पद्धति सर्व आयर्लंडभर पसरेल असें म्हणण्यास हरकत नाहीं. या पद्धतीचा विशेष असा आहे कीं, यामध्यें जमीनदार आपल्या जमिनी अत्यंत दरिद्री व उपजीविकेचें दुसरें साधन नसलेल्या व जवळ भांडवल नसलेल्या अशा कुळांना चढाओढीच्या तत्वावर खंडानें देतात. जमिनी थोड्या लोकांच्या मालकीच्या व चढाओढ करणारीं कुळें अनन्यगतिक व असंख्य; या स्थितीमुळें या पद्धतींत जमिनीचा खंड जबर असतो. केव्हां केव्हां जमिनीमध्यें प्रत्यक्ष पैदास होणा-या उत्पन्नापेक्षां ठरलेला खंड जास्त असतो अशींही उदाहरणें दिसून येतात. कारण कांहीं तरी शेताचा तुकडा लागवडीस मिळण्याच्या आशेनें कुळांना पाहिजे तो जबर खंड कबूल करून जमिनी भाड्यानें घ्याव्या लागतात. परंतु इतका खंड देण्याचें त्यांना अर्थातच अशक्य असतें. यामुळे या पद्धतींत शेतकरी किंवा कुळें हीं जमीनदारांचीं नेहमीं ऋणी असतात. कारण खंडाची बाकी फिटण्याची कधींच आशा नसते. यामुळें आयरिश शेतकरी अत्यंत हलगर्जी व बेपर्वा झाले आहेत. शेतांत जास्त पिकलें काय किंवा कमी पिकलें काय त्यांना सारखेच. कारण आयुष्याला अत्यंत जरूर इतक्या उत्पन्नापलीकडे त्यांना शेतांतून मिळणें शक्यच नसतें. कारण त्यावरचें सर्व उत्पन्न जमीनदार अगर त्याचा गुमास्ता घेऊन जातो. यामुळे आयर्लंडांतील शेतक-यांची अत्यंत दैन्यावस्था असते. कारण या कृषिपद्धतीने त्यांची स्थिति सुधारणेंच अशक्य होतें व ज्या लोकांना चांगल्या राहणीची कल्पना नसते त्यांचेमध्यें लग्नासंबंधी दूरदर्शींपणा असत नाहीं. यामुळे त्यांची स्थिति नेहमीं अत्यंत हीनदीन अशी राहते. तेव्हां ही उपरी कुळाची पद्धति बहुतेक दासकृषि व दासकल्पकृषिइतकीच वाईट आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण कर्जबाजारी कुळें जमीनदाराचे बहुतेक गुलामच बनतात. त्यांना शेतींत सुधारणा करण्याची इच्छा होत नाहीं. ते स्वतः अगदीं कगाल राहतात व आपली स्थिति सुधारण्याची आशा नसल्यामुळे पिढ्यानुपिढ्या अशी कंगाल प्रजा निर्माण होत रहाते. या पद्धतीचे दोष काढून टाकणें ह्मणजे शेतक-यांचें जमीनदारांवरील परावलंबन नाहींसें करून त्यांना स्वतःच्या मालकीच्या जमिनी करून देणें होय.हाच उपाय सध्यां इंग्रज सरकार योजीत आहे व जमीनदारांकडून सरकाररी पैशानें जमिनी विकत घेऊन त्या कुळाला मिरासदार ह्मणून देत आहे व या कुळांकडून ४०-५० वर्षांच्या अवकाशांत शेताची किंमत हप्त्याहप्त्यानें वसूल करून घेणार आहे. ही नवी पद्धति सर्वत्र सुरू झाली ह्मणजे आयरिश शेतक-यांची दैन्यावस्था नाहींशी होईल यांत शंका नाही.

भाग नववा.

प्रचंड शेती कीं छोटी शेती.

 प्रचंड शेतीची पद्धति चांगली कीं छोट्या शेतीची पद्धति चांगली हा एक अर्थशास्त्रांतील मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. प्रचंड शेतींत १००|२००|४००|५०० अशा एकरांचें एक एक शेत असून तें जमीनदारापासून करारानें घेऊन त्याची लागवड मजुरांच्या श्रमानें शेतकरी करितात. ही पद्धत इंग्लंडात प्रचलित आहे. छोट्या शेतीची पद्धत युरोपांतील इतर देशांत फार प्रचलिंत आहे. यामध्यें शेताचा मालक व शेत कसणारा हे एकच असतात व शेतेंही फार लहान म्हणजे दोन चार एकरांपासून फार झाले तर ५० एकरपर्यंत असतात. यामध्यें शेतकरी आपल्या कुटुंबांतील माणसांच्या व आपल्या स्वतःच्या श्रमानें व आपल्या स्वतःच्या भांडवलानें ती शेताची लागवड करतो. यालाच हिंदुस्थानांत मिरासदार म्हणतात.,br>  प्रचंड शेतीचे फायदे म्हणजे मोठ्या प्रमाणांवर काढलेल्या कारखान्याचे फायदे होत हें नव्यानें सांगण्याचें कारण नाहीं. व लहान प्रमाणावरील कारखान्यापेक्षां मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांत जीं फायद्याचीं कलमें असतात, ती प्रचंड शेतीमध्येंही असतात.प्रथमतः प्रचंड शेतींत यंत्राचे साहाय्य घेण्यास सांपडतें.लहानशा शेताला वाफेचा नांगर किंवा धान्य कापण्याचें यंत्र किंवा खुरपण्याचें यंत्र याचा उपयोग होत नाहीं.परंतु मोठ्या शेतींत या गोष्टी फायदेशीर होतात.तसेंच यंत्राने चालणारे पाणी काढण्याचे पंप वगैरेसारख्या सोयी प्रचंड शेतीलाच फक्त शक्य असतात. शिवाय प्रचंड शेतीमध्यें देखरेखीचा खर्च उत्पन्नाच्या मानानें अर्थात कमी बसतो. १०० एकरांचे शेताला जितका देखरेखीचा खर्च येतो तितकाच बहुतेक २०० एकरांच्या शेताला खर्च येतो. मेंढ्यांचा कळप १०० चा असला काय किंवा २०० चा असला काय मेंढपाळ एकटाच पुरतो. शिवाय प्रचंड शेतीमध्यें कुंपणें,रस्ते वगैरेंमध्यें जमीन कमी जाते व यायोगानेंही शेताचें उत्पन्न वाढतें; शेवटीं प्रचंड शेतींत शास्त्रीय व खर्चाचीं खतें यांचा उपयोग करण्यास सांपडतो. छोट्या शेतीमध्यें यांपैकीं एकाही गोष्टीचा फायदा घेतां येत नाहीं. यामुळे अर्थशास्त्रदृष्टया प्रचंड शेती ही छोट्या शेतीपेक्षां जास्त फायद्याची आहे अशा तऱ्हेचें मत पुष्कळ अर्थशास्त्रकारांनीं दिलेलें आहे. व वरील कारणें सयुक्तिक असल्यामुळे हें मत खरें आहे असें वाटतें. परंतु कांहीं अर्थशास्त्रकार व विशेषतः मिल्ल हे या मताच्या विरुद्ध आहेत. त्यांचे मतें छोटी शेती हीच प्रचंड शेतीपेक्षां सर्व दृष्टीनी जास्त श्रेयस्कर आहे. कारण जरी प्रचंड शेतीमध्यें वर नमूद केलेले फायदे असतात तरी त्यांमधला एक दोष फार मोठा आहे. प्रथमतः या पद्धतींत शेताचा मालक, शेतीच्या लागवडीची जबाबदारी घेणारा शेतकरी व शेत कसणारे प्रत्यक्ष मजूर हे तिन्ही वर्ग निराळे असतात. यापासून बरेच अनिष्ट परिणाम शतीवर घडतात. शेताचा मालक कांहीं वर्षांच्या करारानें व ठरलेल्या खंडानें आपली जमीन शेतकरी-कारखानदारास देतो. या शेतकऱ्याचा हेतु आपल्या कराराच्या मुदतींत आपला जितका फायदा करून घेतां येईल तितका करून घेण्याचा असतो. यामुळें त्याचें जमिनीच्या भावी स्थितीकडे लक्ष नसतें. जमीन आपल्या उपयोगानंतर बिनकस होवो किंवा बिघडो त्याला त्याची पर्वा नसते. आपण आणलेल्या भांडवलावर आपल्याला चांगलें व्याज मिळून ठरलेल्या मुदतींत आपलें भांडवलही परत मिळावें एवढाच त्याचा मतलब असतो. शिवाय हा शेतकरी स्वत: शेत कसणारा नसतो. तर तो शेताची लागवड मजुरांकडून करून घेतो. हे मजूर तर बोलून चालून भाडोत्री आणलेले. त्यांना जमिनीची काळजी असणें शक्यच नाही.त्यांचें पाहणें इतकेंच कीं,साधारण मजूर काम करतात तितकें काम करून आपली मजुरी मिळवावयाची.ही मजुरी मिळाली कीं त्यांचें काम संपलें मग त्या शेताचे किंवा पिकाचें कांहीं का होईना; त्याबद्दल त्यांना मुळींच फिकीर नसते. शिवाय हे भाडोत्री मजूर आज या शेतावर काम करणार तर उद्या त्या शेतावर काम करणार, तेव्हां शेताबद्दल त्यांन कांहीं आपलेपणा वाटण्याचें कारण नसतें. शेताशीं संबंध असलेल्या या तीन वर्गांचा अशा प्रकारचा भाव असल्यामुळें शेतीचें काम जितक्या काळजीनें, जितक्या मेहनतीनें व जितक्या कळकळीनें व्हावयाला पाहिजे तितक्या काळजीनें, तितक्या मेहनतीनें व तितक्या कळकळीनें तें होत नाही. यामुळे यांचा शेतीमध्यें जरी यंत्रादि सामग्रीपासून व वर निर्दिष्ट केलेल्या दुस-या गोष्टींपासून फायदा होतो तरी या जिव्हाळ्याच्या अभावापासून बरेंच नुकसान होतें व म्हणूनच शेवटीं छोट्या शेतीपेक्षां त्यांचें उत्पन्न सरासरीनें कमीच पडतें.
 परंतु छोट्या शेतींत मालक, शेतकरी व कसणारा या सर्व व्यक्ति एकवटलेल्या असतात. व जमीन आपली आहे, तिची सुधारणा केल्यास, तिची मशागत केल्यास, त्याचा फायदा आपल्यास मिळवावयाचा आह इतकेंच नव्हे तर ही जमीन आपल्या मुलाबाळांना पुढें जावयाची आहे अशी जाणीव छोट्या शेतींत शेतक-यांच्या मनांत नित्य वागत असते. आतां अशी मालकीची कल्पना ही एक अजब चीज आहे. आर्थर यंग म्हणून एक प्रवासी शेतकरी होऊन गेला. त्यानें असें म्हटलें आहे की, "Magic of property will turn sand into gold" "मालकीची भावना ही एक जादुगाराची कांडी आहे. कारण त्या कांडीनें रेतीचें सोनें होतें" म्हणजे आपण श्रम केले तर त्या श्रमाचें फळ आपल्याला व आपल्या मुलाबाळांना मिळेल अशी खात्री असली म्हणजे मनुष्य फार काळजीनें व फार कळकळीनें जीवापाड श्रम करतो. अशा मिरासदार शेतकऱ्यांच्या श्रमांत व भाडोत्री मजुरांच्या कामांत जमीन-अस्मानचें अंतर पडतें म्हणूनच यंत्रादि सामग्रीचा जरी या शेतक-यांना फायदा घेतां येत नाहीं तरी सुद्धां त्यांच्या जीवापाड मेहनतीनें त्याचा सर्व वचपा निघून येतो व हे मिरासदार शेतकरी आपल्या शेतांतून आपल्याला जास्त उत्पन्न काढतात इतकेंच नाहीं तर जमिनीची कायमची सुपीकता वाढवितात. या मिराशी पद्धतीचे सुपरिणाम फ्रान्स, इटली,वगैरे देशांत दिसून येतात. तेथील शेतांची उत्तम मशागत केलेली आहे असें त्या प्रांतीं [१९१] जाणाराच्या तेव्हांच ध्यानांत येतें. प्रेमानें वाढविलेल्या सुंदर बागेप्रमाणें सर्व शेतें दिसतात. जी जमीन अगदीं ओसाड, रेताड व कुचकामाची आहे असें वाटतें अशी जमीन सुद्धां मिराशी शेतकरी दहावीस वर्षांत उत्तम दशेप्रत आणतात. ज्या देशांत ही मिराशी पद्धति चालू आहे तेथें खालीलसारखीं उदाहरणें पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. एक अगदीं ओसाड-रेताड जागा किती दिवस तरी पडलेली असावी. पुढें तेथें एक लहानशी झोंपडी होऊन एक दोन गुरें घेऊन एक शेतकरी राहूं लागतो. पहिल्या प्रथम तो या जमिनींत होणारें क्लव्हर नांवाचें गवत त्या ठिकाणीं लावतो. त्यानें गुरांस चारा होऊन या गवताच्या मुळांनीं रेताड जमिनीला थोडासा घट्टपणा येतो. गुरांचे शेणमूत यांचें खत करून तो त्या जमिनींत घालीत राहतो. चांगली माती पाटीपाटीनें आणून तो जमिनींत मिसळतो. याप्रमाणें थोडीशी जमीन सुधारली म्हणजे धान्याचें एखादं हलकें पीक करतो, जमीन आणखी सुधारत चालली म्हणजे थोडीशीं फळझाडे लावू लागतो. त्याचीं गुरेंही वाढत जातात. यामुळे जमिनींत खत जास्त जास्त पडत जातें व जमीन जास्त जास्त सकस बनत जाते. मग तो गहू पेरूं लागतो ॰ व द्राक्षांचें । पीक करूं लागतो. सारांश, सुमारें दहा वर्षांनी जर ती जागा पाहिली तर त्यांतील महदंतर पाहून मनुष्य थक्क होऊन जाईल. ज्याठिकाणीं रेती व खडक यांखेरीज कांहीं एक नव्हते; जेथे स्वाभाविक रीतीनें गवतसुद्धा उगवत नव्हतें अशा ठिकाणीं एका दहाबारा वर्षांच्या अवधींत सुंदर बाग व मळा झालेला दृष्टीस पडतो. परंतु हा सर्व प्रभाव मिरासदारीचा होय. आपण मेहनत केली तर आपल्यालाच त्याचा सर्वस्वी फायदा मिळेल ही खात्री खासगी मालमत्तेच्या भावनेनें उत्पन्न होते. यामुळे असा शेतकरी मनापासून व जीवापाड मेहनत करितो व त्याचें फळ त्याला मिळतें. अशा मिराशी शेतक-याची सांपत्तिक स्थिति पुष्कळच चांगली असते. कांहीं अर्थशास्रकार प्रचंड शेतीची तरफदारी करतांना इंग्लंडांतील शेतकरी व फ्रान्समधील शेतकरी (मिराशी ) यांची तुलना करतात; परंतु ही तुलना बरोबर नाहीं. इंग्लंडांतील शेतकरी हे भांडवलवाले मोठे शेतीचे कारखानदारच होत. हे लोक पुष्कळच श्रीमंत असतात. त्यांच्या तोडीचे फ्रान्समधले मिराशी शेतकरी नसतात हे उघड आहे. परंतु वास्तविक तुलना हे मिराशी शेतकरी व इंग्लंडामधील शेतीकडले भाडोत्री मजूर [१९२] यांच्यामध्यें केली पाहिजे. कारण या दोन वर्गांचे काम व सामाजिक दर्जा एकच असतो व अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे फ्रान्समधले मिराशी शेतकरी इंग्लंडांतील शेतकरी मजुरांपेक्षां जास्त सुखी व संपन्न असतात यांत काडीभरसुद्धा शंका नाहीं. ही छोटी मिराशी शेतकीपद्धति प्रचंड शेतीपेक्षां जास्त किफाईतशीर नाहीं हें दाखविण्याकरितां एक प्रमाण कांहीं अर्थशास्त्रकार पुढे करीत असतात. तें हे कीं, मिराशी शेतकरी दर एकरी जितकें भांडवल व विशेषत: जितके श्रम यांचा खर्च करतात तितकें भांडवल व तितके श्रम दर एकरीं प्रचंड शेतींत खर्चीं पडत नाहींत व ते जर तितके खर्चींं पडतील तर छोट्या शेतीपेक्षां प्रचंड शेतीपासूनच उत्पन्न जास्त होईल. तेव्हां अर्थशास्त्रदृष्ट्या छोटी शेती प्रचंड शेतीपेक्षां जास्त किफाईतशीर नाही; परंतु या कोटिक्रमांत एक चूक अशी आहे कीं प्रचंड शेतामध्यें इतके श्रम खर्चीं पडणें अशक्य असतें. कारण त्या शेतींत कोणाचाच निकट संबंध नसल्यामुळे असे जीवापाड श्रम व भांडवलाची योग्य योजना होऊं शकत नाहीं. ही श्रम व भांडवलाची यांची योजना मिराशी पद्धतीनें जणूं कांहीं उत्पन्न केली जाते व म्हणून जास्त झालेलें उत्पन्न या पद्धतीचें फळ होय असें मानण्यास हरकत नाही. ही पद्धत नसती तर जें शेतीचें उत्पन्न अस्तित्वांत येऊं शकलें नसतें तें उत्पन्न या पद्धतीचाच परिणाम होय यांत शंका नाही. शेवटीं या पद्धतीचा जो एक सामाजिक परिणाम आहे तो लक्षांत घेतला असतां ही पद्धतीच एकंदरींत श्रेयस्कर आहे असें म्हणणें भाग आहे. प्रचंड शेतीमध्ये देशामधला बराच मोठा वर्ग भाडोत्री शेती-मजुरांचा असतो. हा वर्ग कारखानदार-शेतक-यांवर सर्वस्वी अवलंबून असतो॰ या वर्गाला स्वतःच्या जबाबदारीवर काम करण्याची संवय नसते. हा वर्ग निव्वळ भाडोत्री व सांगकाम्या बनतो. यामुळें या वर्गाच्या दानतीवर परावलंबनाचा छाप बसतो; व स्वाभाविकच यांचा सामाजिक दर्जा कमी होतो. परंतु छोटया शेतीमध्ये प्रत्येक मिराशी शेती हा स्वतःचा मालक असतॊ. तो कोणाचा ताबेदार नसतो . त्याला सर्व व्यवहार आपल्या जबाबदारीवर करावे लागतात. यामुळें त्याच्यामध्यें कित्येक नैतिक गुण उत्पन्न होतात; हिंमत, स्वावलंबन, जबाबदरीची, [१९३ ] भावना वगैरे गुण फार हितावह आहेंत व या पद्धतींत हे गुण उद्भवण्यास व त्यांची वाढ होण्यास फार वाव असतो व यामुळेंच मिराशी शेतक-याचा सामाजिक दर्जा भाडोत्री सांगकाम्या मजुराच्या वरचा होतो. अशा मिराशी शेतक-यांमध्यें देश आपला अशी भावना दृढतर होते व देशाचा कारभार उत्तम त-हेनें चालला पाहिजे तरच त्यांत आपलें कल्याण आहे असा हितकर समज उत्पन्न होतो. वरील कारणाकारितां मिराशी छोट्याशेतीची पद्धति ही एकंदर देशांतील लोकांना जास्त हितकर आहे असें ह्मणणें प्राप्त आहे. इंग्लंडमध्यें प्रचंड शेतीची पद्धत चालू असल्यामुळें बहुतेक अर्थशास्रकारांचा कल त्या पद्धतीकडे झुकता आहे. परंतु प्रथमतः युरोपांतील मिराशी पद्धतीची चांगली माहिती मिळवून ती पद्धति प्रचंड शेतीपक्षां कशी जास्त श्रेयस्कर आहे हें मिल्लनें आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत दाखविलें. तेव्हांपासून पुष्कळ लोकांचे व लेखकांचें लक्ष या पद्धतीच्या चांगुलपणाकडे वेधलें. इंग्लंडामध्यें ही पद्धति सुरू करणें इष्ट आहे अशी चळवळ सुरू झाली. परंतु इंग्लंडांतील जामिनीचे कायदे व देवंघेवीचे कायदे शेताचे लहान लहान तुकडे पाडण्याला मोठ्या अडथळ्याप्रमाणें असल्यामुळे ह्मणण्यासारखा या पद्धतीचा प्रसार होऊं शकला नाहीं. १८९० सालीं छोट्याशेतीचा प्रसार करण्यास कोठें कोठें सवड आहे वगैरे प्रश्नांचा विचार करण्याकरितां एक कमिशन नेमलें गेलें व त्या कमिशनच्या शिफारशीप्रमाणें १८९२ मध्यें कौंटीकौन्सिलला मोठीं शेतें विकत घेऊन त्यांचे लहान लहान शेतांचे तुकडे करुन ते लोकांना देण्याचा अधिकार दिला.परंतु सक्तीच्या कायद्यानें शेतें संपादन करण्याचा अधिकार या कौन्सिलास न दिल्यामुळें व कौन्सिलांतील सभासद या पद्धतीला फारसे अनुकूल नसल्यामुळें हा १८९२ चा कायदा निवळ द्प्तरीं पडल्यापैकींच झाला. या काळांत छोट्या पद्धतीचा जो थोडाबहुत फैलाव इंग्लंडमध्यें झालेला आहे, तो खासगी प्रयत्नाचा परिणाम होय. परोपकारी लोकांनीं खासगी संस्था स्थापन करून त्यांचेमार्फत मोठमोठीं शेतें खरेदी करून तीं शेतें गरीब शेतक-यांमध्यें वांटून देण्याचें काम केलें व अशा प्रयत्नाचा कांहीं कांहीं परगण्यांत फार चांगला परिणाम दिसून येऊं लागला आहे. या पद्धतीनें मोठमोठ्या जमीनदारांचा खंड वाढून शिवाय शेतकरी-मजुरांची १३ [ १९४ ] स्थितीही पुष्कळ सुधारली आहे असें दिसूंनं येतें. या छोट्या शेतीपासून शेतकरी-मजुरांना किती फायदा होऊं लागला आहे हें खालील कोष्टकावरून दिसून येईल.

  ज्याच्या जमाखर्चाचा खर्डा खालीं दिला आहे तो शेतकरी मजुरी करून संध्याकाळीं व इतर फावल्यावेळीं व सणाचे दिवशीं काम करून या चार एकरी शेताची लागवड करितो व त्याचा त्याला इतका फायदा पडतो. 

- चार एकरांच्या छोट्या शेतीच्या जमाखर्चाचा खर्डा.

 उत्पन्नाची जमा , . " - 1_שן ר (खर्च.

पौ. शि. पे. पौं. शि.पे. १५-१८-३ ६ टन व ७॥ हंड्रंटवेट ९-०--० कर पट्टी व भाडें. )

    बटाटं ५० शि० दराप्र. 2-1३--३ भाड्याने ; आणलेला घोड्याचा खर्च .१८-०--० ६ टन बटाटे ६० शि॰   १-३--० नांगरणावळीकरितां
     दराप्रमाणे.     ०-३--९ पेरणावळीकरितां.     

१ -४--० ४ पोतीं घरी खाल्लेले. ०-३--० कुळवाकरितां.

     दर पोत्यास ६ शि॰  ०-५--० बटाट्याच्या रांगा करण्याकरितां.    

५--०--० ४ पोती बियाण्याकरितां ०-१०--० खताच्या नेअाणीकरितां.

    विकल. 

२-१०--० ४ पोतीं बियाण्याकरीता ०-८--६ वार्ली धान्य नेण्याकरितां.

    ठेविलेले.    

१--०--० ४ पोतीं बटाट्याचीं २--१३--३

    कोवळी रोपें डुकरांनी २--०--० कृत्रिम खत.
    खाल्लीं तीं.     १-१७--६ बटाट्यांचे बियाण्याक॰

६--०--० वार्ली धान्य विकले. ०-१२--० वार्लीच्या बियाण्याक॰ ६--०--० वार्ली घरखर्चास. ०--२-० केरट वा ‍‌‍मॅनगोल्ड या भाज्यांच्या

             बियाण्याकरिता.

१-१०--० कॅरट भाजी घरखर्चास. ------------ २--०--० मॅनगोल्डभाजी वरख. १६-४--९ ५९-२--३ एकंदर उत्पन्न अगर रुपयांत २४३-९

    ८८६ रुपये १३ आणे.  शिल्लक नफा पौंड ४२-१७-६ 
             अगर रु ६४३--२ अाणे. [१९५]

यावरून इंग्लंडमध्येही ही पद्धति फायदेशीर आहे यांत शंका नाही, व सरकारनें जर ही सुधारणा घडवून आणण्याचे मनावर घेतले तर त्यांत यश येण्याचा जास्त संभव आहे असा पुष्कळांचा समज आहे परंतु छोट्या शेतीपासून असा फायदा होण्याची मुख्य अट अशी आहे कीं, शेतकऱ्यास स्वामित्वाची व मालकीची जाणीव पाहिजे. म्हणजे तो शेतकरी शेताचा मिराशी अधून जमिनीवरील कर किंवा सारा हा कायमच्या स्वरूपाचा पाहिजे. तर त्याला आपल्या जमिनीची इतक्या काळजीनें मशागत करण्याची बुद्धि होईल. आपण केलेल्या जमिनीच्या सुधारणेवर दुसऱ्याचा हक्क उत्पन्न होणार अशी धास्ती शेतकऱ्यास असली म्हणजे त्याच्याकडून शेताची मशागत होणे शक्य नाहीं; व कायमचा सारा नसला म्हणजे अशी धास्ती शेतकऱ्याच्या मनांत राहणारच. मग असा शेतकरी उपरि कुळासारखाच होतो व त्याला जामिनीबद्दल आपलेपणा वाटत नाहीसा होतो.

         भाग दहावा.
      हिंदुस्थानांतील जामिनधाऱ्याच्या पद्धति.

मागील तीन भागांत युरोपामध्ये पूर्वकाळी अस्तित्वात असलेल्या व प्रचलित असलेल्या जामिनधाऱ्याच्या पद्धतीचे वर्णन देऊन अर्थशास्त्र दृष्टया व सामाजिक दृष्टया सर्वांत चांगली जमीनधाऱ्याची पद्धति कोणती या प्रश्नाचा विचार केला. आतां या भागांत हिंदुस्थानामध्यें प्रचलित अस लेल्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचा विचार करावयाचा आहे. परंतु युरो पातील व हिंदुस्थानांतील जमीनधाऱ्याच्या पद्धतीमध्ये एक मोठा भेद आहे; तो हा की, युरोपमध्ये जमीन ही खासगी व्यक्तीच्या मालकीची सम- जली जाते तर हिंदुस्थानांत सर्व जमीन सरकारची आहे असे समजले जाते युरोपमध्ये ज्यावेळीं जहागिरी-पद्धति सुरू होती त्यावेळी राजा किंवा देशा तील सरकार हे जमिनीचे मालक अशी समजूत होती खरी. तरी कालेंकरून [१९६] जहागिरी-पद्धति नष्ट झाली व त्याबरोबरच सरकारच्या जमिनीवरील स्वामित्वाची कल्पना नष्ट झाली व सर्वत्र खासगी व्यक्तीच्या मालकीची कल्पना प्रचलित झाली. अर्वाचीन काळीं सरकार जमिनीवर एक कर घेतें हे खरें आहे. परंतु सर्व ठिकाणीं हा कर कायमच्या स्वरूपाचा आहे. व तो जमिनीच्या उत्पन्नाच्या मानानें फारच माफक आहे. जमिनीच्या साच्याच्या माफकपणामुळे युरोपामध्यें जमिनधाऱ्याच्या पद्धतीचें वर्गीकरण जमिनीच्या सा-याच्या तत्वावर मुळींच केलें जात नाहीं; तर तें लागवडीच्या प्रकारावरुन केलें जातें हें मागील विवेचनावरून दिसून आलेंच असेल. सध्या प्रचलित असलेल्या जमीनधा-याच्या पद्धति म्हणजे प्रचंड शेती व छोटी अगर मिराशी शेती होय व अर्थशास्त्रदृष्ट्या कोणती पद्धति जास्त फायदेशीर हा तिकडील वादग्रस्त प्रश्न आहे व एकंदरींत विचार करतां मिराशी शेतीच जास्त चांगली असें समजण्याकडे अर्थशास्त्रकारांचा जास्त कल आहे असें मागल्या भागांत दाखविलें आहे.

 परंतु हिंदुस्थानांत लागवडीच्या प्रकाराच्या तत्वावर जमीनधान्याच्या पद्धतीचें वर्गीकरण केलें जात नाहीं. कारण लागवडीच्या पद्धतींत ह्मणण्यासारखा फरक नाहीं. जरी किरकोळ बाबतींत फरक असले तरी सामान्यतः येथें छोट्या शेतीचाच प्रघात सर्वत्र चालू आहे. येथें वर्गीकरणाचें तत्व ह्मणजे सरकारी सारा घेण्याच्या त-हा होत. कारण हिंदुस्थानांत सर्व जमीन सरकारच्या मालकीची अशी इंग्रज सरकारनें तरी आपली कल्पना करून घेतली आहे व या कल्पनेवर हिंदुस्थानांतील जमिनीचें धोरण ठरविलेलें आहे. परंतु वास्तविकपणें पाहतां जमिनीवर मालकी कोणाची हा येथें एक मोठा वादग्रस्त प्रश्न आहे व त्याचा विचार या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत हिंदुस्थानचा जमीनसारा हा कर आहे कीं खंड आहे ? या प्रश्नाचा विचार करतांना करावयाचा आहे. तेव्हां या ठिकाणीं सरकारची ही मालकीची कल्पना गृहीत धरून चालणें सोईर्च आहे. कारण वादग्रस्त प्रक्षाचा तात्विक निकाल कांहींही असला तरी संरकारचें जमिनीबाबतचें धोरण व त्यांनीं पाडलेला प्रवात सरकारी मालकी हक्काच्या कल्पनेवर बसविलेला असल्यामुळे या भागांतील जमीनधाऱ्याच्या वर्गीकरणाच्या विषयांत या वादाचा किंवा त्याच्या निकालाचा कांहीं एक उपयोग नाही.म्हणून वर म्हटल्याप्रमाणे या भागांत सरकारी मालकीची कल्पना गृहीत [ १९७]

धरूनच चाललें पाहिजे. या सरकारी मालकीच्या कल्पनेमुळे येथल्या जमिनीवर बराच मोठा सारा आहे इतकेंच नव्हे तर कांहीं थोड्या ठिकाणांशिवाय सरकार हा सारा ठरलेल्या मुदतीनंतर चढविते. वरील विवेचनावरून हिंदुस्थानांत जमीनधा-याच्या पद्धतीचें वर्गीकरण जमिनीवर घेतल्या जाणा-या सा-याच्या स्वरुपावरून करण्याचा कां प्रघात पडला हें ध्यानांत येईल. कारण येथें लागवडीची पद्धत एकच असल्यामुळे तिला महत्व नाहीं. परंतु जमीनसारा जबर असल्यामुळे त्याच्या स्वरुपाला व वसूल करण्याच्या पद्धतीला फार महत्व आहे. जमिनीच्या सा-याच्या स्वरुपाप्रमाणें जमीनधा-याच्या पद्धतीचे दोन वर्ग होतात. एक कायम धान्याची पद्धति व दुसरी मुदतीच्या धा-याची पद्धति. पहिलीमध्यें सरकारनें जमिनीचा सारा एकदम कायमचाच ठरविलेला असतो. ह्मणजे जरी सरकार आपल्याला जमिनीचे मालक समजतें व ह्मणून सरकारी अंमलदार जमिनीच्या सा-याला कर न ह्मणतां खंड ह्मणतात तरी कायम धाऱ्याच्या पद्धतींत जमिनीचा सारा सरकारनें एकदम कायमच ठरवून टाकला आहे; व खंडाप्रमाणें कमी-जास्त करण्याचा आपला हक्क सोडला आहे. दुस-या वर्गामध्यें जमिनीचा सारा हा कांहीं मुदतीपर्यंत सरकार ठरवितें. परंतु त्या मुदतीनंतर जमिनीची फेरपहाणी करून सारा वाढविण्याचा हक्क सरकारनें आपल्या ताब्यांत ठेविला आहे. ह्मणजे पाहिल्या वर्गास ' आम्ही मालकी हक्काची अंमलबजावणी करणार नाहीं, असें सरकारनें लेखी आश्वासन देऊन त्याप्रमाणें आपल्याला कायद्यानें बांधून घेतलें आहे, व दुस-या वर्गास आह्मीं सध्या ठरविलेला सारा अमुक मुदतपर्यंतच ठरविला आहे. पुढें वाटल्यास आम्ही हा सारा वाढवू, अशी इशारत लोकांना दिलेली आहे, व कायद्यानें अशी सारा वाढविण्याची मुभा आपल्याला ठेविली आहे.

 सारा वसूल करण्याच्या त-हांवरुन जमीनधा-याच्या पद्धतीचे तीन वर्ग होतात. पहिला जमीनदारी; दुसरा पटवारी व तिसरा रयतवारी. पहिल्यामध्यें सरकार जमीनदारापासून जमीनसारा वसूल करतें. हे जमीनदार स्वतः शेत कसणारे शेतकरी नसतात. यांच्या हाताखालीं मोठमोठ्या जमिनी किंवा सबंदच्या सबंद खेडी असतात. या पद्धतींत सरकारी अंमलदारांचा प्रत्यक्ष शेतक-यांशीं व कुळांशीं मुळींच संबंध येत [१९८]

नाही. प्रत्यक्ष शेतकरी किंवा कुळे हीं जमीनदारांची अशी कल्पना असते. त्यानें जमिनीचा वसूल हव्या त्या रीतीनें करून घ्यावा. सरकारच्या साऱ्याला फक्त जमीनदार हाच जबाबदार धरला जातो. अर्थात या पद्धतीमध्यें जमीनदार हे प्रत्यक्ष व्यवहारांत जमिनीचे मालकच धरले जातात असं ह्मटलें तरी चालेल. जमीनसारावसुलीचा दुसर् प्रकार ह्मणजे जमीनसारा हा गांवगन्ना ठरविला जाते. या प्रद्धतीमध्यें गांवांतील गांवक-यांच्या संघावर जमीनसा-याची जबाबदारी असते. येथें एक मोठा जमीनदारही नसतो किंवा सरकार प्रत्येक शेतक-याशीं जमीनसाऱ्याबद्दल करार करीत नाहीं. म्हणजे ही पद्धति जमीनदारी व रयतवारी यांच्या दरम्यान येते. येथें जमीनसाऱ्याची जबाबदारी एकएका व्यक्तीवर न पडतां ती समाज अगर ग्रामसंस्था या नात्यानें गांवक-यांवर पडते. या पद्धतीप्रमाणें गांवक-यांना आपल्या ग्रामसंस्थेच्या अंमलदाराकडून जमीनसारा वसूल करून तो सरकारला द्यावयाचा असा निर्बंध असतो. तुमच्या गांवावर सरकारनें अमुक सारा आकारला आहे तो तुम्ही वसूल करून सरकारतिजोरीत भरला पाहिज, असें सरकार गांवकामगारांस सांगतें. या गांवगन्ना ठरलेल्या सा-याची वांटणी गांवातील शेतक-यांवर कसकशी करावयाची हें गांवकामगार ठरवितात. जमीनदारीप्रमाणेंच या पद्धतींत संरकारी अंमलदारांचा प्रत्यक्ष शेतक-यांशीं संबंध येत नाहीं, व प्रत्येक व्यक्तीशीं सरकार निरनिराळा सारा ठरवीत नाही. मात्र जमीनदारींत एका खेड्याच्या सा-याबद्दल किंवा पुष्कळ खेड्यांच्या सा-याबद्दल एकच व्यक्ति जबाबदार असते व तिला त्या खेड्यावर मालकीवजा हक असतो; तर पटवारी पद्धतीत जमीनसा-याची जबाबदारी एका व्यक्तीवर न पडतां ती व्यक्तिसमूहावर पडते; परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत या दोन पद्धतींत फारसा फरक नाही. कारण जमीनदारीमध्यें सरकार जमीनदारापासून सारा वसल करते तर पटवारी पद्धतीत गांवपाटलापासून वसूल करतें. हण