अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय भ्रष्टाचार : एक चिंतन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
ष्टाचार आपल्या जीवनाचा जणू एक भागच बनला आहे. इच्छा असो वा नसो, त्याच्याशी जुळवून घेणंं भाग पडतं. नैतिकतेच्या कोणत्याही नियमानुसार तो समर्थनीय ठरू शकत नाही. औद्योगिक विश्वात तर त्याचा बराच बोलबाला झाला आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीनंं पाहिल्यास भ्रष्टाचारामुळे व्यवस्थापकाच्या प्रयत्नांची दिशा विस्कळीत होते. त्याच्या योजनांवर पाणी फिरतंं. त्यामुळंं तो अवांछनीय आहे. मात्र, उद्योग क्षेत्रात भ्रष्टाचार होत राहणार आहे. कित्येक व्यवस्थापकांना भ्रष्टाचार हटविण्याची चिंता नसते, तर भ्रष्टाचार करूनही बचावायचं कसं याची चिंता असते. अशा भ्रष्टाचार पचविलेल्या व्यवस्थापक- संचालकांचा अभ्यास करता त्यांनी पुढील तीन मार्ग अवलंबिल्याचं लक्षात येतं.

 १) भ्रष्टाचाराचा गाजावाजा होऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करणंं.
 २) आपल्या भ्रष्टाचारात अन्य व्यक्तींनाही समाविष्ट करून घेणंं.
 ३) लोकांच्या नजरेत भरेल अशा पध्दतीनं खर्च न करणंं.
 एखाद्या व्यवहारात भ्रष्टाचार झाला की, त्यासंबंधी आरडाओरड सुरू होतेच. काही वेळा भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा त्याबद्दलची चर्चाच अधिक होते. तर काही वेळा भ्रष्टाचाराच्या मोठ्या 'डील'संबंधीही इतकी बोलवार होत नाही. चलाख व्यवस्थापक भ्रष्टाचारातून होणारा फायदा अधिक असावा, पण त्यासंबंधी होणारी आरडाओरड कमीत कमी राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हे ज्याला यशस्वीरीत्या करता येतं, तो भ्रष्टाचार करूनही नामानिराळा राहू शकतो.
 भ्रष्टाचारातून मिळणारे फायदे पुढील प्रकारचे असतात.
 १.थेट आर्थिक लाभ
 २.अप्रत्यक्ष आर्थिक लाभ
 ३.सग्यासोयाऱ्यांंना नोकरी
 ४.‘सेक्स'च्या दृष्टीनंं फायदा.
 यापैकी 'सेक्स'बद्दल सर्वाधिक चर्चा होते. संस्थेतील एखाद्या महिलेला पुरुष सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग दुसरा)

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
ढता व्यापार आणि तांत्रिक प्रगती यामुळं जग जवळ येत चाललं आहे. विविध पा मानवसमूहांना एकमेकांपासून दूर करणाऱ्या भिंती ढासळत आहेत. सीमाविरहित जगाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू झाला आहे. अशा जगातील व्यवस्थापनाला कोणती आव्हानं पेलावी लागतील व ती कशी पेलता येतील याचा विचार आपण मागच्या लेखापासून करीत आहोत. व्यवस्थापक हे सर्वसामान्य नागरिकांमधूनच निर्माण होत असल्यानं त्यांच्यात समाजात असणारे सर्व गुणदोष सामावलेले असतात. या गुणदोषांचं प्रतिबिंब त्यांच्या व्यवस्थापकीय कामगिरीतही पडलेलं असतं. जात, प्रांत, वंश, रंग इत्यादी भेदाभेदांपासून तेही सामान्य माणसाप्रमाणं पूर्णपणे मुक्त नसतात. हे खरं असलं तरी कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थापकांवर असणारी जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांपेक्षा वेगळी व अधिक असते. जगरहाटीप्रमाणं चालायचं ही सर्वसामान्यांची जीवनशैली असते. तर येणाऱ्या काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणं धोरण आखायचं ही जबाबदारी व्यवस्थापकांची असते. त्यात यशस्वी होणारे व्यवस्थापक आपली संस्था व स्वतःचा विकास साधू शकतात. व्यवस्थापक लहान संस्था की मोठ्या, त्याला सर्वसामान्यांप्रमाणे प्रवाहतपतित असून चालत नाही.

 त्यामुळं सीमाविरहीत जगाकडं आपली वाटचाल चालली असताना व्यवस्थापकांवर नवी आणि अधिक अवघड जबाबदारी येऊन पडली आहे. एकेकाळी स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या भिंती आता आर्थिक व सांस्कृतिक विकासाला अडथळे ठरत आहेत. त्यामुळं त्या तोडण्याची सुरुवात व्यवस्थापकांपासून व्हायला हवी. केवळ आपला समाज, जात, भाषा, राज्य, प्रांत यांच्या पलीकडे पाहण्याची मानसिकता विकसित होणं आवश्यक आहे. या भिंती २१ व्या शतकात कुचकामाच्या ठरत आहेत.

 विज्ञानामध्ये दोन प्रकारचे जोर महत्त्वाचे मानले जातात. एक बहिर्गामी (सेंटिफ्यूगल फोर्स). या जोरामुळं वस्तू केंद्रस्थानापासून दूर फेकल्या जातात. तर दुसरा केंद्रगामी जोर. या मुळं वस्तू केंद्राकडं आकर्षिक होतात. मानवी मनावरही अशाच प्रकारचे दोन सामाजिक जोर कार्य करीत असतात. त्यामुळं समाज आत्मकेन्द्री व बहिर्मुख अशा दोन गटात विभागला गेला आहे. याच विभागांचे आणखी उपविभाग असल्याचंं दिसून आलं आहे.
 १. कोणत्याही जाहीर समारंभात आपल्या पत्नीचे कपडे व दागिने इतर उपस्थित बायकांप्रमाणेच असतील, याची काळजी घेतली जाते.
 २. आपला बॉस किंवा सहयोगी यांच्याकडंं असणारी कार, फ्रीज, टीव्ही, व्ही.सी.आर, एअर कंडिशनर इत्यादी वस्तूंपेक्षा अधिक महाग वस्तू आपल्याकडे नसतील हे पाहिलं जातं.
 ३. सार्वजनिक ठिकाणी अतिमहागडं मद्य किंवा खाणंं यांचंं सेवन टाळलं जातं. निदानपक्षी प्रदर्शन टाळलंं जातंं. उदाहरणार्थ, स्कॉच व्हिस्की, पीटर स्कॉचच्या बाटलीत टाकून प्याली जाते. म्हणजे पाहणाऱ्याला वाटावं की, हे मद्य इतकं महाग नाही.
 ४. आपले कुटुंबीय किंवा पाहुणे यांचा आपल्याच शहरातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये पाहुणचार केला जात नाही. किंवा तसं करण्याची वेळ आलीच तर पैसे अगोदरच पाहुण्यांकडंं दिले जातात आणि त्यांनाच बिल देण्यास सांगण्यात येतं.
 ५. आपण राहत असलेल्या शहरात आलिशान घर न बांधण्याची दक्षता घेतली जाते. त्याऐवजी तीन, चार छोटी घरं किंवा फ्लॅट्स घेतले जातात. किंवा मोठंं घर बांधावयाचंच असेल आणि निवृत्तीनंतर तिथं वास्तव्य करायचंं असेल तर ते दुसऱ्या शहरात बांधलं जातं.
 ६. आपले नातेवाईक, विशेषत: पत्नीच्या माहेरची मंडळी खूप श्रीमंत आहेत असं सर्वांना सांगितलं जातं. त्यामुळंं आपणच विकत घेतलेल्या महागड्या वस्तू सासूरवाडीकडून मिळालेल्या आहेत असं सांगून वेळ मारून नेता येते.
 ७. पैसा उडवायचा असेल, तर आपल्या शहरात तसं केलं जात नाही. घरापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या हॉलिडे रिसॉर्टची निवड केली जाते किंवा शक्य झाल्यास परदेशवारी केली जाते. तिथं निकटवर्तीय किंवा मित्रांपैकी कुणी येण्याची शक्यता कमी असल्याने ते ठिकाण सुरक्षित असतं.
 सरतेशेवटी, भ्रष्टाचार हा होतच राहणार हे गृहीत धरलं तरी तो प्रमाणाबाहेर झाल्यास कंपनी किंवा संस्थेच्या मुळावर येऊ शकतो. त्यामुळं त्यावर नियंत्रण ठेवणं भाग आहे. दक्ष व्यवस्थापनाला भ्रष्टाचाराची अपरिहार्यता लक्षात घेऊन त्याच्या नियंत्रणासाठी योग्य ते उपाय शोधण्याची खबरदारी घ्यावी लागते. भ्रष्टाचार होतच राहणार म्हणून त्याकडे दुर्लक्षं करणं भ्रष्टाचारापेक्षाही घातक आहे. कधी तरी आपण जाणारच आहोत, म्हणून जिवंतपणी प्रकृतीची हेळसांड करणं जसं चुकीचं आहे, तसंच भ्रष्टाचाराकडं कानाडोळा करणं चुकीचं आहे हे व्यवस्थापनानं जाणलं पाहिजे.