Jump to content

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ तणावांवर उपाय

विकिस्रोत कडून

वस्थापकावर पडणाच्या तणावांवर उपाय करण्यासाठी प्रथम तणावांचा स्त्रोत

शोधणंं आवश्यक आहे .तणावांचे मूलत: तीन स्रोत असतात.
 १. कामाचं अनिश्चित स्वरूप
 २. संबंधातून निर्माण होणारे तणाव
 ३. व्यक्तिगत समस्या
कामाचं अनिश्चित स्वरूप :
 व्यवस्थापकावर एखादी जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा कित्येकदा तिचं स्वरूप निश्चित व आखीव नसतं. किंबहुना सक्षम व्यवस्थापकांवर अशीच कामं अधिक प्रमाणात सोपविली जातात.काम सोपविताना फक्त व्यवस्थापकाला फक्त कामाची बाह्य रूपरेखा, काम संपविण्यासाठीचा अवधी आणि फलनिष्पत्तीची अपेक्षा इतकंच सांगितलं जातं. त्यानंतर व्यवस्थापकालाच त्याबाबत निर्णय घेऊन ठराविक कालावधीत अपेक्षित परिणाम साध्य करून दाखवावा लागतो.
 त्यामुळे पुष्कळदा गोंधळ निर्माण होऊन मानसिक ताण वाढतो. अशी अनिश्चित स्वरूपाची कामे करताना व्यवस्थापकाला स्वतःलाच कामामधली त्याची भूमिका, इतर सहकाच्यांचे स्थान काम करण्याची पध्दती इत्यादीबद्दलचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे सहकाच्यांशी मतभेद, कामाच्या पध्दती ठरविताना होणारी ओढाताण,अन्य सहकाच्यांना कामाचंं स्वरूप समजावून सांगताना करावी लागणारी कसरत इत्यादीमुळंं त्याच्यावरील ताण वाढतो.
 अशावेळी थेट कामाला सुरुवात करण्याऐवजी प्रथम कामाचं चिंतन करण" त्याबाबत एक निश्चित संकल्पना स्वतःच्या मनात प्रथम निर्माण करणं स्वतःच्या कंपनीतल्या किंवा बाहेरच्या अनुभवी विचारविमर्श करणं, कामाचा व्यवस्थापकांशी कागदावर सविस्तर आराखडा तयार करणं, कामाचा कोणता भाग कुणाकडून करून घ्यायचा त्याबाबत विचार करनं व त्याप्रमाणं कनिष्ठ कर्मचाच्यांची निवड करणंं (म्हणजेच कामाचं विकेंद्रीकरण करणं), आणि कामाच्या सुरुवातीपासून पूर्तींपर्यंतच वेळापत्रक तयार करणंं इत्यादी 'ग्राऊंड वर्क’ अगोदर तयार करून ठेवल्यास अनिश्चित कामाचं स्वरूप बच्याच प्रमाणात निश्चित करता येतंं आणि एकदा कामाचंं स्वरूप निश्चित झालं की, तणाव पुष्कळसा कमी होतो.
संबंधातून निर्माण होणारे तणाव :
 व्यवस्थापकाला त्याचा बॉस, सहकारी, कनिष्ठ सहकारी, कामगार संघटना, ग्राहक, पुरवठादार इत्यादींशी संबंध राखावे लागतात. हे संबंध जितके समतोल तितकी त्याची कामगिरी प्रभावी होते. मात्र हा समतोल राखणंं, ही जिकिरीची बाब आहे. हे करताना प्रचंड मानसिक ताण सोसावा लागतो.
 हा ताण सहनीय पातळीवर आणण्यासाठी पाच कलमी प्रक्रिया उपयोगी पडते.
१) संयम राखून ’थांबा आणि वाट पाहा' या धोरणाचा अवलंब करणे:
 व्यवस्थापकाला वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असते तशी त्यांनाही असते .त्यामुळंं सुरुवातीच्या काळात काही मतभेद निर्माण झाले तरी शब्दाशब्दी करून वातावरण न तापविता संयमाने स्थिती हाताळावी आणि आपलंं काम करीत राहावं. व्यवस्थापकाची कामाची पध्दत योग्य असेल तर काही काळाने ती इतरांना पटल्यावाचून राहत नाही. विशेषत: ज्या व्यवस्थापकाला' एकटं' पाडल जातं, त्याच्यासाठी हा उपाय परिणामकारक आहे.कारण चर्चेच्या वेळी अशा' आयसोलेटेड' व्यवस्थापकाचं म्हणणं इतर सहकारी मान्य करीत नाहीत.अशा वेळी ते आपल्या कामातून पटवून देणे त्याच्या हातात असतं. यासाठी संयमाची आवश्यकता आहे.
२) तणाव निर्माण करणाच्या सहकार्याश चर्चा:
 कित्येकदा सहकारी किंवा वरिष्ठांना मुद्दाम तणाव निर्माण करून स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्याची सवय असते.तर बघ्याचदा प्रामाणिक मतभेदांमुळे तणाव निर्माण हाेेतात. अशा वेळी सामोपचारानं चर्चा करून वाद मिटवणं लाभदायक आहे. यामुळे मनं मोकळी होऊन तणाव पुष्कळसा निवळतो.
३) योग्य वेळी लढाऊ बाणा प्रकट करणं :
 वाटाघाटी व चर्चा या मार्गानं तणाव दूर न झाल्यास योग्य वेळी ठामपणे आपलं म्हणणं स्पष्ट मांडण्याची हिंंमत व्यवस्थापकानंं दाखवलीच पाहिजे जो आपल्या मताशी कोणतीही तडजोड करणार नाही. त्यासाठी लढण्याची त्याची तयारी आहे हे इतरांच्या लक्षात आल्यास ते नरमाईची भूमिका घेण्याचा संभव असतो.तेही न घडल्यास वेळप्रसंगी काम सोडण्याची तयारी दाखवावयास हवी. ताण सहन करून मनाविरुध्द काम करीत राहण्यापेक्षा इतरत्र संधी शोधणे शरीरस्वाथ्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. तेव्हा एखादी कंपनी किंवा एखादं काम हा प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता त्यातून बाहेर पडण्याची तयारीही त्यानं ठेवली पाहिजे.
४) शरणागती :
 वरील तीनही मार्ग अयशस्वी ठरल्यास ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे धोरण व्यवस्थापकाला अवलंबावं लागतं. प्रत्येक वेळी नवं काम किंवा नोकरी मिळणं शक्य नसतं. अशा वेळी 'यशस्वी माघार' घेऊन स्वतःचा मान आणि अस्तित्व टिकवून धरणं ही ‘स्टॅटेजी' वापरावी लागते. लढाईत प्रत्येक वेळी विजयच होईलच अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. काही वेळा पांढरं निशाण फडकावून स्वतःला तयारीसाठी वेळ देणं आणि पुन्हा संधी मिळताच पूर्ण तयारीनिशी हल्लाबोल करणं यात लाजण्यासारखं काहीच नाही. युक्तीनं पत्करलेल्या शरणागतीचाही तणाव कमी होण्यास उपयोग होतो. तणाव कमी करण्यासाठी काय करावं हे आपण पाहिलं. आता काय करू नये हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे.
 स्वतःवरचा ताण घालविण्यासाठी दुसऱ्यावर टीका करणं, अपशब्दांचा वापर करणं, शिव्याशाप देणं हा उपाय खूपच लोकप्रिय आहे. मात्र, शहाण्या व्यवस्थापकानं तो कधीही करू नये. कारण त्यामुळं तणाव तात्पुरता वाढविण्यासच तो उपाय कारणीभूत ठरतो. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणाऱ्यांची पत आणि इभ्रत राहत नाही हे सूज्ञ व्यवस्थापकानंं लक्षात घ्यावं.
व्यक्तिगत अडचणी :
 यामुळं निर्माण होणाऱ्या तणावांवरही वरील उपाय लागू पडतात. घरगुती समस्यांचा कार्यालयीन कामावर परिणाम होऊ नये याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. व्यक्तिगत तणाव आपल्या जिवलग मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर हितगुज करून दूर करता येतात.
सारांशः
 मानसिक तणाव हा व्यवस्थापकीय कामाचा अविभाज्य आणि अटळ हिस्सा आहे. त्याचप्रमाणं अति तणाव शारीरिक अस्वास्थ्याला कारणीभूत ठरतो. हेही सत्य आहे. तेव्हा तणावाची अपरिहार्यता आणि त्याचा विपरीत परिणाम या दोन टोकांच्या मध्यभागी स्वतःला ठेवणं, ही कला प्रत्येक व्यवस्थापकाला आत्मसात करून घ्यावीच लागते. तणाव कमी करण्याचा हाच एक राजमार्ग आहे.