अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शैलीत बदल आवश्यक
प्राचीन भारतीय संस्कृती, विज्ञान व व्यवसाय यांचा विस्तार भारताच्या सध्याच्या सीमांबाहेरही मोठ्या प्रमाणावर झाला होता याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. समद्रामार्गे प्रवास करण्याचे शास्त्रही भारतीयांना अवगत असल्याने जगातील विविध जनसमुदायांबरोबर व्यापार करणंं शक्य होत असे. त्यामुळे भारतीय भूखंडातील अनेक राज्ये सांपत्तिकदृष्ट्या भरभराटीला आलेली होती. त्यावेळच्या सम्राटांची प्रवती विस्तारवादी होती. या विस्तारवादाला
धर्म व अध्यात्म याच सहकार्य नसलं तरी विरोधही नव्हता. राजसत्ता आणि धर्म यांची स्वतंत्र विश्वं होती. सहसा त्यांचा एकमेकांत हस्तक्षेप होत नसे.
कालांतराने सनातन धर्माचे स्वरूप बदलत गेलं. त्यात अनेक दोष शिरले. जाती
संकलन इत्यादींना भौतिक व ऐहिक बाबी ठरवून त्याचंं महत्त्व दुय्यम असल्याच
समाजाच्या मनावर बिंबवले जाऊ लागलं. धर्माचं समष्टीप्रधान स्वरूप नाहीसं होऊन ताेे
व्यक्तिप्रधान व आत्मकेंद्री बनला. अर्थप्राप्तीपेक्षा पुण्यप्राप्ती अधिक प्रतिष्ठेची मानली
जाऊ लागली. समाजाला विचारी बनविण्यापेक्षा श्रद्धाळू बनविणं हे धर्माचार्याचं ध्येेय
झालं.सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. आपण केवळ त्याच्या हातातली साधन
आहोत. मानवी बुध्दी ही दुखाची जननी आहे. संपत्ती, वैभव या नश्वर बाबी आहे.
त्यांच्या पाठी लागणं पाप आहे इत्यादी प्रकारचा उपदेश समाजाच्या मनात पक्का रुतून
बसला. याचा परिणाम म्हणून समाजाच्या कर्तृत्वांच्या सीमांना मर्यादा पडत गेल्या.
चर्च संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणं सर्वोचं धर्मपीठापासून तळागाळातील मिशनन्यांपर्यंत
एक साखळी असते तशी पध्दती भारतातील मंदिरांबाबत निर्माण झाली नाही. इतर
धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आणावं, आपल्या धर्माची संख्या वाढवावी, अन्न
आपल्या धर्माचार्यांना कधी वाटलं नाही. उलट, आपले जे लोक इतर धर्मात गेलेे,
त्यांची परतीची वाटही या धर्मगुरूनी बंद करून टाकली. सर्व स्थळांनी व मंदिरांनी एका
नेतृत्वाखाली कधीच कार्य केलं नाही. धर्म एक असला तरी प्रत्येक धर्मगुरूचे स्वतःच
तत्त्वज्ञान असे आणि तो तेवढ्यापुरताच विचार करीत असे. धर्माचा विस्तार करण्यापेक्षाा
आपापले सवतेसुभे सांभाळणे हेच त्यांचे ध्येय होतं.
सैन्यरचनेतही तीच पध्दत:
ब्रिटिश सत्ता येण्यापूर्वी भारतीय राजांची सैन्यरचनाही अशीच खंडित होत.
स्वतःच्या सीमा राखणंं एवढ्यापुरतेच सैन्याचं काम असे. काही वेळा परराज्यांत घुसून
लूूट करण्याचे आदेश सैन्याला दिले जात. मात्र त्याचा उद्देश संपत्ती कमावणं आणि
सैन्याला युध्दाचा थोडासा सराव मिळणे एवढ्यापुरताच मर्यादित असे. परकीय मुलुख
आपल्या देशाला जोडावा, राज्यविस्तार करावा असा व्यापक उद्देश मुळीच नसे.
परमुलुखांवर आक्रमण करण्यासाठी गेलेल्या सैन्याला साधनसामुग्री पुरविण्याची संपर्क यंत्रणाही विकसित झाली नव्हती. त्यामुळे राज्यविस्तार करण्याची इच्छा काही राजांंना असूनही त्यांना ते शक्य होत नसे. याबाबत पेशव्यांचे उदाहरण पाहण्यासारखंं आहे. पहिल्या तीन पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार दिल्लीपर्यंत केला. पण कालांतरानं राजधानी पुण्यापासून शेकडो कोस दूर गेलेल्या सैन्याला कुमक पाठवणंं त्यांना शक्य झाले नाही. परिणामी उत्तरेत मोहिमेवर गेलेल्या विविध सरदारांनी तेथील भिन्न भिन्न प्रदेशांवर आपली संस्थानं स्थापन केली.त्यांच्यावर पेशव्यांचे नियंत्रण नाममात्र राहीलंं.
व्यवस्थापन शैलीवर परिणाम
आधुनिक काळातील उद्योग आणि व्यवसायांच्या व्यवस्थापन शैलीवरही या स्वभावाचा परिणाम झालेला आहे. पारंपरिक भारतीय खासगी उद्योगांचं व्यवस्थापन पाश्चात्य चर्च व सैन्य संस्कृतीप्रमाणे न चालता भारतीय मंदिरं आणि सैन्य संस्कृतीप्रमाणं चालतं. या व्यवस्थापनाचे तीन पैलू आहेत.
१) क्षमतेपेक्षा वय व वरिष्ठतेला महत्व.
२) अधिकार व जबाबदारी यांची विभागणी योग्य नसल्याने निर्माण होणारा गोंधळ व गैरसमज.
३) कामावरील निष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य.
आधुनिक काळात भारतीयांनी पाश्चात्यांचे व्यवसाय व उद्योग स्वीकारले, पण त्यांची व्यवस्थापन पध्दती स्वीकारली नाही .त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपण जगभरात आपल्या उद्योगाचं साम्राज्य स्थापन करू शकलो नाही.
तीन तर्हेची व्यवस्थापनं :
भारतीय उद्योगांमध्ये सध्या तीन प्रकारच्या व्यवस्थापन पध्दती दिसून येतात .एक खासगी उद्योगाचं नियंत्रण मुख्यत एका कुटुंबाच्या हातात असतं, त्यांची कार्यपध्दती भारतीय संस्कृतीप्रमाणे असते. मात्र , त्यांनी नेमलेले व्यवस्थापक पाश्चात्य पध्दतीचं शिक्षण घेतलेले असतात. त्यामुळे मालक आणि व्यवस्थापक यांच्यात अनेकदा वैचारिक व तात्विक संघर्ष निर्माण होऊन विकासाची गती मंदावते.
दोन ,अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांच्या उपशाखा (सबसिडिअरीज) येथे स्थापन केलेल्या आहेत. त्यांचं व्यवस्थापन पूर्णपणे पाश्चात्य पध्दतीने म्हणजेच चर्च संस्कृतीप्रमाणं चालतंं.
तीन,या दोन्ही पध्दतींमधील नकारात्मक बाबी सार्वजनिक (सरकारी) उद्योगांच्या व्यवस्थापनात दिसून येतात .या उद्योगांचं व्यवस्थापन पााश्चयात्य पध्दतीने चालविण्याची भाषा एकीकडे केली जाते, पण प्रत्यक्षात व्यक्तिनिष्ठा, राजकीय हस्तक्षेप इत्यादी खास भारतीय गुणधर्माचाच त्यात वावर असतो.
भारतीय व्यवस्थापनाची तीन तोंड अशी तीन दिशांना आहेत. त्यामुळं उद्योग क्षेत्रात असमतोल व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योग पाश्चात्यांचे पण व्यवस्थापन शैली भारतीय, यामुळे जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास भारतीय उद्योग असमर्थ ठरत आहेत. त्यांच्या मालाचा दर्जा पाश्चात्यांच्या तुलनेत कमी पडत आहेे. साहजिकच सर्वसामान्य लोकांना वाटणारंं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाचं आकर्षण वाढत आहे. याचाच फायदा घेऊन त्या कंपन्या आपलं जाळे इथं पसरवत आहेत. अस्सल भारतीय उद्योगांची पिछेहाट थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बंदी घालणंं हा यावर उपाय होऊ शकेल का? माझ्या मते नाही. आपल्याला धर्मांतर रोखावयाचंं असेल तर धर्मांतरावर बंदी घालणं हा दूरवरचा उपाय झाला. त्रुटी आणि कमतरता दूर करून स्वतःचा धर्म बळकट करणं आणि तो सोडून जाण्याची इच्छा कुणाला होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणंं हा त्यावरील कायमस्वरूपी उपाय आहेे.
त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी यशस्वी सामना करावयाचा असेल तर, त्यांच्यावर बंदी घालून फारसा उपयोग होणार नाही, तर आपल्या व्यवस्थापन शैलीत योग्य ते बदल घडवून ती पाश्चात्यांच्या तोडीस तोड बनविणंं, आपल्या मालाचा दर्जा सुधारणं आणि यासाठी पाश्चात्य व्यवस्थापन पध्दतीतील उपयुक्त बाबींचा निःसंकोच स्वीकार करणं हाच उपाय आहे. थोडक्यात, बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याला पादाक्रांंत करीत असतील तर आपण त्या शस्त्रांचा उपयोग करून प्रतिहल्ला चढविणं अनिवार्य आहे. तेवढी बौध्दिक क्षमता आपल्या व्यवस्थापकांमध्ये निश्चितच आहे.
हे साधण्यासाठी आपल्या संपूर्ण संस्कृतीलाच तिलांजली द्यायला हवी असं मुळीच नाही. आपली उपासना पध्दती आणि इतर सकारात्मक सवयी, ज्यांसाठी आपण 'भारतीय’ म्हणून जगात ओळखले जातो, त्या कायम ठेवूनही हे करता येतं. अनेक भारतीय उद्योगपतींनी ते करून दाखविलंं आहे. त्यांचा आदर्श सर्व भारतीय व्यवस्थापकांनी ठेवावयास हवा.