अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/महिला व्यवस्थापक

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
ल आणि मूल ही मर्यादा महिलांनी ओलांडणं, ही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वात महत्वाची सामाजिक क्रांती म्हणावी लागेल. आज 'करिअर' ही संकल्पना केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. करिअरच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांंत खालपासूंंन वरपर्यंत सर्वत्र महिलांचा संचार होताना आपण पाहत आहोत.‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ हा काळ केव्हाच काळाच्या पडद्याआड गेला आहे. आणि ‌‌‍‌‍‍२१ व्या शतकात तर 'महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ....’ असं म्हणण्याऐवजी‘पुरुषमहिलांच्या खांद्याला खांदा लावून ...’ असं म्हणण्याची पाळी आली तरी आश्चर्यवाटावयास नको.

 दहावी किंवा बारावीच्या निकालांवर एक नजर टाकली तरी हा मुद्दा पुरेसा स्पष्टहोईल. २०-२५ वर्षांपूर्वी गुणवत्ता यादीच्या पहिल्या १० क्रमांकांमध्ये एखादी मुलगीअसायची. आज पहिल्या पाचात तीन निघाल्या तरी त्याचं विशेष वाटत नाही.शिक्षणाबरोबरच खेळ,कला, समाजसेवा, राजकारण इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला केवळ सहभागी होताना नव्हे, तर यशाचं शिखर गाठताना दिसतात.
 उद्योगव्यवसायांचं क्षेत्रही याला अपवाद नाही. डॉक्टर, वकील अशा स्वतंत्रपणे केल्या जाणाऱ्या व्यवसायांमध्ये तर महिलांनी आपला ठसा उमटविला आहेच, शिवाय उद्योगांच्या व्यवस्थापनामध्येही त्यांचा वावर वाढला आहे.
 अर्थात महिलांची ही वाटचाल सहज झालेली नाही. व्यावसायिक व व्यवस्थापकीय गुण महिलांमध्ये पुरुषांच्या तोडीस तोड असले तरी समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी फारशी बदललेली नाही.महिलांच्या प्रगतीकडे पुरुषप्रधान समाज कौतुकाच्या नव्हे तर असूया व मत्सराच्या दृष्टीने पाहतो. स्त्रीने बाहेर काम करून कुटुंबासाठी पैसा मिळवावा,पण पारंपरिक कौटुंबिक जबाबदारयाही पार पाडाव्यात अशी दुहेरी अपेक्षा कित्येकदा बाळगली जाते.कामाच्या ठिकाणीही पक्षपाती वागणूक मिळणे, मानसिक छळ होणे,क्षमता असूनही केवळ महिला असल्याने संस्थेत उच्च पद न मिळणं, पुरुष सहकाऱ्यांकडून दडपण आणण्याचा प्रयत्न होणं इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत ‘यश कसे मिळवावे’ हा गहन प्रश्न त्यांना पडल्यास नवल नाही. एक यशस्वी व्यवस्थापक बनण्यासाठी महिलांनी काय करावं हाच प्रस्तुत लेखाचा विषय आहे. काळजीपूर्वक वाटचाल:
 आपल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळविणं ही यशाची कसोटी मानली जाते.व्यवस्थापनाच्या क्षेत्रात असणाऱ्या महिलांना संस्थेतील उच्च पद, मिळविण्यासाठी आपल्या वाटचालीची आखणी काळजीपूर्वक करावी लागते.रिचर्ड के आयरिश या लेखकाचं ‘गो हायर युवरसेल्फ अँँन एम्प्लॉयर’व मॉरिसन, व्हाईट व वेल्सर या लेखक त्रयींचे 'ब्रेकिंग थ्रू दी ग्लास सीलिंग' दोन पुस्तकं त्यादृष्टीने मार्गदर्शक आहेत. या लेखकांनी व्यवस्थापन क्षेत्रातील महिलांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून अनेक व्यवहार्य सूचना केल्या आहेत.ही पुस्तकं जरूर वाचावीत.
यशाचीं तीन सूत्रे:
 महिला व्यवस्थापक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर पुढील तीन सूत्रांचा अंगीकार महत्त्वाचा आहे.
 १. पुरुषांबरोबरच्या स्पर्धेतून मागे हटू नका.
 २. आपण अन्यायाचे बळी आहोत, ही भावना झटकून टाका.
 ३. नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. नेतृत्व मिळाल्यानंतर आपल्या जीवनशैलीवर होणाऱ्या परिंणामांशी जुळवून घेण्याची तयारी करा.
स्पर्धेतील टिकाव:
 एकदा तुम्ही व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली की स्पर्धा ही अटळ आहे आणि तिचे नियम व पुरुषे व स्त्रिया यांना सारखेच असणार.साहजिकच,जिंकण्यासाठी जे परिश्रम करावे लागतील, जी तंत्रं व युक्त्या वापराव्या लागतील ती समानच असणार.स्पर्धा जिंकण्याची आवश्यकता तुमच्या पुरुष सहकाऱ्यालाही तुमच्याइतकीच असते. त्यामुळे तुम्ही स्त्री आहेत म्हणून तुम्हाला कोणतीही सवलत मिळेल तशी अपेक्षा करणेही योग्य नाही. अशी परिस्थितीत महिला कच खाण्याची असते.यांत संस्कारांचाही भाग असतो.
 करिअर हे महिलपेक्षा पुरुषांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतं. हे संस्कार लहानपणापासून मुलींवर व मुलांवरही होत असतात. अश्या संस्कारातील मुलं किंवा मुली शिकून सवरून व्यवस्थापक बनली तरी हे संस्कार पुसले गैललं नसतात.त्यामुळे ‘आपण हे भलतंच धाडस तर करीत नाही आहोत ना?' हा प्रश्न महिलांना पडतो आणि त्यांचां आत्मविश्वास कमी होतो.इकडे पुरुषांची अशी भावना असते की करिअर व यश ही माझीच जहागीर आहे. महिलांनी त्यात आपला हक्क सांगू नये.'संस्काराच्या या रस्सीखेचीत महिलांची स्थिती काहीशी कमजोर बनलेली पुरेशा आक्रमकं बनू शकत नाहीत.
 ही वस्तुस्थिती असली तरी, या ‘रॅॅट रेस'मध्ये पळत राहणे हे महिलांसाठी महत्त्वाचं आहे.‘ससा व कासव’ ही गोष्ट फारक उद्बोधक ठरावी.
 शर्यत सुरू झाल्यानंतर ससा सुरुवातीला कासवाच्या खूपच पुढे गेला. तरीही सशाचा एका दुर्गुणाचा फायदा उठवून कासव शर्यत जिंकले,कारण ते हळूहळू का असेना पण पळत राहिलं.ससा बराच पुढे गेला आहे,आता आपण शर्यत जिंकू शकत नाही असा विचार कासवाने केला असता व शर्यत सोडून दिली असती, तर, ससा वाटेत झोपूनही कासव विजयी झालं नसतं. महिला व्यवस्थापकांनी या गोष्टीचा आदर्श ठेवावयास हरकत नाही. तसं पाहू गेल्यास पुरुष व महिला यांच्या स्वभावातही ससा आणि कासव हाच फरक आहे. परंपरेने पुरुषाला जास्त अधिकार दिले आहेत, त्या गुर्मीत तो बेसावध राहण्याची शक्यता असते. याउलट संस्कारांमुळे महिलाही अधिक सहनशील, सावध,सोशिक व योजनाबध्द काम करणारी असते. या स्वभाव वैशिष्ट्यांचा फायदा तिला मिळू शकतो.अर्थात प्रत्येक वेळी असंच होईल असं सांगता येणार नाही. कारण ‘ससा आणि कासव' ही गोष्ट आता सशांनाही ठाऊक झाली आहे.तेव्हा महत्त्वाची बाब अशी की, परिस्थितीशी मिळवून घेणं आणि कोणत्याही परिस्थितीत स्पर्धेतून माघार न घेणं,हे महिला व्यवस्थापकासाठी आवश्यक आहे.
नकारात्मकता झटकून टाका:
 एकदा आपण खेळात भाग घेतलाच आहात तर तो मन लावून, गंभीरपणे व खंबीरपणे खेळा.खेळ म्हटला यश अपयश यांचा धनी व्हायची तयारी ठेवावीच लागते.सुरुवातीला अपेक्षेइतकी प्रगती झाली नाही व काही वेळा अन्याय झाला तरी परंपरेच्या व समाज व्यवस्थेच्या नावाने खडे फोडून काही साध्य होणार नाही. एखादा भरवशाचा फलंदाज पंचाच्या चुकीच्या निर्णयाने नसतानाही बाद दिला गेला तरी त्याने पंचांना दोष देण्यात वेळ न घालवता पुढच्या ‘इनिंग'ची तयारी नेटाने करायची असते.तेव्हा आपण परंपरेचे बळी आहोत, आपल्या अपयशाला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे असे नकारात्मक विचार झटकन प्रयत्नशील राहणे हे यशाचे गमक आहे.
नेतृत्व व त्याचे परिणाम : संस्थेचे किंवा त्यातील एखाद्या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळनंं हा यशाचा परमोच्च बिंदू मानला जातो. नेतृत्व करणाऱ्याला पैसा,मानमरातब व प्रतिष्ठा उपलब्ध असते. तथापि, काही तोटेही सहन करावे लागतात.ते पुढीलप्रमाणे,
लोकप्रियता घट : प्रत्येक बॉसला आपल्या कनिष्ठांच्या खासगी अथवा प्रकट टीकला तोंड द्यावंं लागते. कारण तो त्यांना मागे सारून बॉस झालेला असतो. ती असूया किंवा नाराजी कनिष्ठांच्या मनाच्या कोपऱ्यात असतेच. हा मानवी स्वभावधर्म आहे. त्यामुळे बॉसला पेचात पकडण्याच्या संधीची ते वाट पाहत असतात विशेषतः महिला जर पुरुष स्पर्धकांना मागे सारून नेता बनली तर हे पद तिला कसं मिळालं, याबद्दल गलिच्छ अफवा पसरविण्यापर्यंत कनिष्ठांची मजल जाऊ शकते. अशा वेळी खंबीरपणे उभं राहणं व परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यास वेळप्रसंगी स्वत:च्या अधिकाराचा कठोरपणे वापर करून संबंधितांना त्यांची जागा दाखवून देणं हा नेतृत्वगुण महिलेला दाखवावाच लागेल. त्याचप्रमाणे नेत्याला संस्थेच्या हितासाठी अनेकदा अलोकप्रिय निर्णय घ्यावे लागतात. महिलांनाही यातून सुटका नाही.
कामासाठी अधिक वेळ : नेतृत्व करण्याची कामाची वेळ ९ ते ५ अशी ठोकळेबाज असू शकत नाही. त्याचा शक्य तितका वेळ त्याने संस्थेसाठी द्यावा अशी अपेक्षा असते आणि येथेच महिलांची सर्वाधिक कुचंबणा होते कारण घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पुरुषांप्रमाणे पूर्णपणे दुसऱ्यावर ढकलता येत नाहीत. यात जसा परंपरेचा भाग आहे, तसा निसर्गाने स्त्रीवर जी जबाबदारी टाकली आहे तिचाही एक भाग आहे. एक वेळ महिला परंपरा झुगारून देऊ शकेल, पण नैसर्गिक जबाबदाऱ्यानुसार वेळापत्रकाची आखणी करणं मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष न करणं हा नेतृत्वगुण खास करून महिलांना दाखवावा लागतो.
हितसंबंध जपण्यासाठी अपुरा वेळ : नेत्याला केवळ कार्यालयीन कामकाज पाहून चालत नाही तर संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेबाहेरच्या लोकांशीही संबंध जोडावे व जपावे लागतात पुरुष हे काम धडाडीनं करतो. कारण समाजात कोठेही व कुणाशीही मिसळण्यास त्याला भीती बाळगण्याचं कारण नसतं. महिलांबाबत असं होत नाही. यातूनही एखादी महिला धाडसाने असं करत असेल तर तिच्याबाबत समाजाचे गैरसमज होण्याची शक्यता असते आणि ते दडपण महिलेला जाणवत राहतं. तेव्हा महिला म्हणून स्वतःची प्रतिष्ठा जपणं, घरच्या जबाबदाच्या व कार्यालयीन काम यातून तिला असे संबंध जपण्यासाठी व संधी कमी मिळते.
कठोर धोरण स्वीकारणे : एखादा अलोकप्रिय पण हिताचा निर्णय संबंधितांच्या गळी उतरवणं हे कौशल्याचं काम आहे.याबाबत पारंपरिकपणे पुरुष नेता जास्त आक्रमक बनू शकतो. महिलांनाही नेता म्हणून व्हावयाचं असेल तर ही आक्रमकता अंगी बाणावी लागते.
परिणाम देण्याचे दडपण : कोणत्याही व्यवस्थापकाला तू काम काय व किती करतोस असे कुणी विचारीत नाही. तर कामातून काय साध्य झालं हे विचारले जाते व त्यावरून त्याच्या कार्यक्षमतेची मोजदाद होते. महिलांनाही असे ‘रिझल्ट'द्यावेच लागतात.
 या सर्व अडचणींवर मात करून कित्येक महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केलं आहे पुढील लेखात अशा काही उदाहरणांचा विचार करू.