अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व संस्था
अनैतिक प्रक्रिया आहे. मात्र त्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर ती सामूहिक
बनते. त्यानंतर भ्रष्टाचाराला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होतं. तो अंगवळणी पडतो. त्याला
विरोध करण्याऐवजी त्यापासून आपला फायदा कसा होईल या दृष्टीने विचार करण्याची
प्रवृत्ती माणसात तयार होते. भ्रष्टाचाराच्या मागनि संपत्ती मिळविण्यात काही वावगं आहे असं
वाटेनासं होतं. उलट न पकडला जातो तो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करू शकतो, तो जास्त
बुध्दिमान अशी समाजाचीही भावना निर्माण होते. थोडक्यात, भ्रष्टाचाराचा शिष्टाचार बनतो.
मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात.
{[gap}}दोन दशकांपूर्वी राजकारण्यांचे समाजातील भ्रष्टाचारी व्यक्तींशी संबंध असल्याचे
आरोप होत होते. मात्र आता प्रत्यक्ष गुन्हेगारच राजकारणात उतरत आहेत. ते भ्रष्टाचारी
आहेत हे माहीत असूनही जनता त्यांना निवडून देत आहे. भ्रष्टाचाराचा शिष्टाचार झाल्याचाच
हा सज्जड पुरावा आहे. भ्रष्टाचार करणं अनैतिक व कायदेशीरदृष्ट्या पापकृत्य आहे याची
जाणीव भ्रष्टाचाऱ्याला नसते असं नाही. तरीही तो भ्रष्टाचाराला उद्युक्त का होतो, याचं
उत्तर आधुनिक समाजव्यवस्थेत आहे. सध्याच्या युगात पैशाला सर्वाधिक महत्त्व आहे.
सर्व सोंग आणता येतील, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असे म्हणतात.पैसा
नसणे किंवा अपुरा असणं ही सर्वात मोठी कमतरता आहे अशी सार्वत्रिक भावना आहे.
‘सर्वे गुणाः कांचनम् आश्रयंते’ अर्थात सर्व गुण अखेर पैशाला शरण जातात, ही म्हण
जूनी असली तरी सध्याच्या काळात ती कधी नव्हे इतकी ‘अर्थपूर्ण' बनली आहे.
माणसाची प्रतिष्ठा व सुरक्षा त्याच्याकडे असणाच्या पैशाच्या प्रमाणावर अवलंबून आहे,
याचा साक्षात्कार पदोपदी होत आहे.त्यामुळे मिळेल त्या मार्गाने शक्य तितका पैसा
कमावणे, त्यासाठी आपल्या अधिकारांचा व स्थानाचा गैरवापर करण्यास मागेपुढे न
पाहणं हा जणू युगधर्म बनला आहे.
भ्रष्टाचाराचा शिष्टाचार होण्याच्या अनेक पायऱ्या आहेत. भ्रष्टाचाराचे शास्त्र समजून
घेण्यासाठी त्यांची माहिती असणं आवश्यक आहे.
१. व्यक्तिगत भ्रष्टाचार : आपल्याला रजा हवी आहे, पण मिळविण्यासाठी सबळ कारण नाही. अशा वेळी एखाद्या डॉक्टरकडून आजारी असल्याचं प्रमाणपत्र त्याची 'फी' देऊन मिळविले जाते. डॉक्टरचं व आपलं काम चुटकीसरशी होतं. यात आपण व डॉक्टर अशा दोनच व्यक्तींचा संबंध असतो. अन्य कुणाला त्याची कल्पनाही येत नाही. अशा मर्यादित पातळीवर चालणाऱ्या भ्रष्टाचारास व्यक्तिगत भ्रष्टाचार म्हणतात. याचा अतिरेक झाल्यास तो पुढची सामूहिक पातळी गाठतो.
२.सामूहिक भ्रष्टाचार : एका व्यक्तीस घर बांधण्यासाठी नकाशा मंजूर करून घ्यायचा आहे. या मंजुरीसाठी अनेक अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असते.अशावेळी त्या सर्वांचं समाधान करणं भाग असतं. हे सामूहिक भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे.
३. शिस्तबध्द भ्रष्टाचार : सामूहिक भ्रष्टाचाराच्या पुढची अवस्था म्हणजे शिस्तबध्द भ्रष्टाचार. यात पैसे घेणाऱ्यांची एक साखळी असते. कोणतेही काम समूहाने व शिस्तबध्द रीतीने केलं की ते हमखास यशस्वी होतं हे तत्त्व यामागे असतं.या प्रकारात काम करून देणाऱ्या व्यक्ती कधीही थेट पैसे स्वीकारत नाहीत, तर ते एका ठराविक व्यक्तीकडे देण्यास सांगण्यात येतं.अशा प्रकारे जमा झालेली रक्कम ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी या
साखळीतील प्रत्येकास त्याच्या त्याच्या अधिकाराच्या पातळीनुसार वाटली जाते. सरकारी महसूल विभागात या पध्दतीच्या भ्रष्टाचाराचा अनुभव येतो.
या साखळीत एखाद्या प्रामाणिक माणसाचा शिरकाव झाला की, ती तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा माणसांना इथे थारा दिला जात नाही. दारू पिणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये एखादा न पिणारा अडचणीचा ठरतो. त्याच्यामुळे 'पार्टी'चा बेरंग होतो.त्यामुळे एक तर अशा माणसाला कटवावं लागतं किंवा त्याला ‘तीर्थप्राशना'ची दीक्षा द्यावी लागते. शिस्तबध्द साखळी पध्दतीने चालणाच्या भ्रष्टाचारातही असंच होतं.
अप्रत्यक्ष भ्रष्टाचार :
भ्रष्टाचार समाजात कितपत स्थिरावला आहे हे या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रमाणावरून ओळखलं जातं. या प्रकारात फायदा मिळवून देणारी स्थानं किंवा कंत्राटे यांचा अक्षरशः लिलाव केला जातो. उदाहणार्थ ऑक्ट्रॉय गोळा करण्याचं कंत्राट किंवा देशी दारु वितरणाचं कंत्राट.कंत्राट घेऊ इच्छिणाऱ्याला त्यासाठी आवश्यक ते कायदेशीर शुल्क भरावं लागतं. पण कंत्राट मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना लाचही द्यावी लागते. जो सर्वात जास्त लाच देईल त्याला कंत्राट देण्यात येतं असं बोललं जातं.
वर सागिंतलेले तसेच मागच्या लेखात दिलेले भ्रष्टाचाराचे प्रकार औद्यागिक संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर चालतात. संस्थांतर्गत भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवणं अशक्य असलं तरी त्याला लगाम घालुन त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवणं व संस्थेचे भवितव्य सुरक्षित ठेवणं हे व्यवस्थापनासमोरचं कठीण व नाजूक आव्हान असतं. संस्थेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराशी लढा देण्याच्या मार्गाचा विचार करण्यापूर्वी व्यवस्थापकीय पातळीवरून चालणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत व भ्रष्ट व्यवस्थापकांच्या वर्तणुकीबाबत माहिती करून घेणं योग्य ठरेल.
संस्था देते त्या पगारावर ज्याचं समाधान होत नाही व ज्याला अवैध मागनेि संपत्ती
मिळविण्याचा मोह आहे. अशा व्यवस्थापकाला एका बाजूला भ्रष्टाचारातून मिळणारा
फायदा घेणं तर दुसऱ्या बाजूला त्याची वाच्यता होऊ न देणं व आपण पकडले न जाणं
अशी तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत जो व्यवस्थित सांभाळतो तो भ्रष्ट
राहूनही प्रतिष्ठित म्हणवून घेण्यात यशस्वी होतो. भ्रष्टाचार करण्यात यशस्वी ठरलेल्या
व्यवस्थापकांचा अभ्यास केला असता असं दिसून आलं आहे की, असे व्यवस्थापक
पुढील ‘तीन कलमी’ योजनेचा अवलंब करतात.
१. भ्रष्टाचाराचा बोलबाला होऊ न देणं.
२. भ्रष्टाचारातून मिळणारा फायदा वाटून घेणं.
३. गुप्तपणे अधिक फायदा घेण्याचा मोह टाळणं.
अनेकदा लहान प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा जास्त होते,तर मोठ्या
प्रमाणातील भ्रष्टाचार कुणाच्या गावीही नसतो. हुशार व्यवस्थापक अशा पद्धतीने
भ्रष्टाचार करतात की, त्याचा बोलबाला कमीत कमी व्हावा. किंवा झालाच तर त्यात
त्याचं नाव गोवलं जाऊ नये.
थेट पैसा स्वीकारणं, अप्रत्यक्षपणे पैसा स्वीकारणं, आपल्या सग्यासोयऱ्यांंना
नोकरी मिळवून देणं व लैंगिक सुख मिळविणं या भ्रष्टाचारातून चार प्रकारे मिळणाऱ्या
फायद्यांपैकी लैगिक भ्रष्टाचाराची चर्चा सर्वाधिक होते. यामागचे कारण नैतिकतेची बूज
हे नसून मत्सर हे असतं. यासाठी संस्थेतल्याच महिलांचा वापर केल्यास चर्चा अधिक
प्रमाणात होते. म्हणून मध्यस्थांकरवी ही हौस भागविण्याची व्यवस्था करण्याचा कमी
धोकादायक मार्ग व्यवस्थापक वापरताना दिसून येतात.
पैशाच्या भ्रष्टाचाराचा सर्वमान्य मार्ग म्हणजे कंपनीसाठी मालाची खरेदी करताना
कमिशन घेणं. यात जे छोटे पुरवठादार असतात त्यांना अधिक कमिशन देणं जमत
नाही. त्यामुळे ते जास्त आरडाओरड करण्याची शक्यता असते. म्हणूनच हुशार
व्यवस्थापक त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवत नाहीत. पुरवठादारांकडून ती
कसर भरून काढली जाते.याबाबत पॅरेटोचा ८०:२० हा नियम प्रसिध्द आहे.त्यानुसार
८० टक्के कमिशन बड्या पुरवठादारांकडून तर २० टक्के कमिशन छोट्या पुरवठादारांकडून
घेतले जातं.याचा दुहेरी फायदा होतो. मिळायचा तितका पैसा मिळतोच.शिवाय
छोट्या पुरवठादारांमध्ये त्याची प्रामाणिक म्हणून ख्याती होते. या गुडविलचा उपयोग
पदोन्नती मिळविण्यासाठी होतो.
भ्रष्ट मार्गांनी मिळणाऱ्या फायद्यात बॉस पासून कनिष्ठापासून सर्वांना सामावून घेणं हा सुरक्षित मार्ग अनेक व्यवस्थापक अंमलात आणतात. त्यामुळे सर्वांचीच तोंडं बंद राहून ‘धंदा’ सुखनैव सुरू राहतो. तेरी भी चूप मेरी भी चूप! अशा व्यवस्थापकांची ‘खाने
खिलानेवाला आदमी’ अशी प्रतिमा बनते.स्वतःच्या अधिकाराचा वापर करून आपल्या
मुलाबाळांना किंवा अन्य नातेवाईकांना नोकऱ्या किंवा कंपनीची कंत्राटं मिळवून देणं हा
भ्रष्टाचाराचा आणखी एक लोकप्रिय मार्ग आहे. मात्र स्वतःच्याच कंपनीत आपल्या
सग्यार्सोयऱ्यांना नोकऱ्या न देता दुसऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संधान बांधून त्याचे
नातेवाईक आपल्या कंपनीत घेणं व स्वतःचे नातेवाईक त्याच्या कंपनीत घुसवणं असा
उपाय केला जातो. या उपायामळे फारसा बभ्रा न होता काम होऊन जातं.
आपली `कमाई’ इतरांच्या विशेषत: आपल्या सऱ्हकाऱ्यांच्या नजरेस येऊ नये
यासाठी आणखीही काही खबरदारी घेतली जाते.
१. पार्टीच्या ठिकाणी आपल्या पत्नीचा पोशाख व दागिने आपल्या बरोबरीच्या
इतरांच्या पत्नींसारखेच असावेत, याची खबरदारी घेणं.
२. आपल्या घरातील कार, टी.व्ही., एअरकंडिशनर इत्यादी चैनीच्या वस्तू बॉस
किंवा आपले सहकारी यांच्या घरांतील अशाच वस्तूंपेक्षा महाग असणार नाहीत
याच खबरदारी घेणे आणि महाग वस्तू असेलच तर ती सासऱ्याकडून भेटीदाखल
आलेली आहे अशी जाहिरात करणं.
३. महागडे मद्य किंवा खाद्य आपण घेत नाहीत असं दाखविणं. असे व्यवस्थापक पीटर
स्कॉचच्या बाटलीत स्कॉच व्हिस्की घालून ती पिताना अथवा सर्व्ह करताना मी पाहिले
आहेत.पार्टीला हजर असणाच्या बऱ्याच जणांच्या लक्षात हा फरक येतही नाही.
४.आपल्या कुटुंबाला किंवा पाहुण्यांना महागड्या हॉटेलात घेऊन न जाणं, किंवा
घेऊन गेले तरी आपल्या एखाद्या नातेवाईकाला अगोदर पैसे देऊन ठेवून त्याला
बिल देण्यास सांगणं.
५.आपण काम करतो त्या गावात अलिशान घर न बांधणं. बहुतेक व्यवस्थापक
कामाच्या जागी एखाद्या फ्लॅटमध्ये राहणं पसंत करतात, तर बंगला आपले
सहकारी सहसा बघू शकणार नाहीत अशा गावी बांधतात.
६.आपली सासुरवाडी श्रीमंत असून त्यांच्याकडून आपल्याला किमती वस्तू भेट
मिळतात,असा प्रचार करणं.
७. मौजमजा करायची असल्यास काम करत असलेल्या गावात न करणं. त्यासाठी
दूरवरचा हॉलिडे रिसॉर्ट किंवा पर्यटन स्थळ शोधणं.
अशा अनेक प्रकारच्या युक्त्याप्रयुक्त्या करून व्यवस्थापक आपली संपत्ती इतरांपासून
विशेषतः सहकाऱ्यांपासून लपविण्याचा प्रयत्न करतात.
पुढील लेखात व्यवस्थापकीय पातळीवर चालणऱ्या भ्रष्टाचाराचा सामना करण्याच्या उपायांबाबत माहिती घेऊ.