अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नवी नोकरी स्वीकारताना...

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
पल्या सध्याच्या नोकरीत आपण समाधानी नसाल तर काय केलंं पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. नवं आणि सध्यापेक्षा चांगलं अन्य काम मिळविणं सोपं नाही. विशेषत: उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तर ते फारच कठीण आहे. त्यामुळंं त्यांच्यासाठी दीर्घकालीन आणि निश्चित धोरण आखावं याचा विचार या लेखात आपण करणार आहोत.

 हे धोरण आखताना पुढील मुद्यांवर लक्ष द्यावं.
 १.वेळेची ‘गुंतवणूक'
 २.स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवणंं
 ३.स्वतःची प्रतिमा निर्माण करणं
वेळेची गुंतवणूक :
 नवी नोकरी मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीची ही पहिली पायरी आहे. प्रत्येक कंपनीची स्वतःची अशी कार्यपध्दती असते. अन्य कंपनीतून अचानकपणे आलेली व्यक्ती ही कार्यपध्दती झटकन आत्मसात करू शकत नाही. तसंच एका कंपनीत मिळालेला कार्यानुभव दुसऱ्या कंपनीत उपयोगी पडेलच असे नाही. याच टप्प्यावर वेळेच्या ‘गुंतवणुकी'ची आवश्यकता भासते.
 त्यामुळंं नव्या कामाचा शोध घेण्याअगोदर आपल्या ज्ञानाची व्याप्ती वाढविणं आणि त्यासाठी वेळ खर्च करणंं आवश्यक आहे. समाधान न देणाऱ्या कामात अखंड गुंतून न पडता, निदान फावला वेळ आपलं ज्ञान वाढविण्यासाठी आणि अन्य कंपन्यांमधली कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी वापरला पाहिजे. असं केल्यास नव्या ठिकाणी आपण लवकर जुळवून घेऊ शकाल.
लोकांसमोर राहणं :
 बरेच सक्षम कर्मचारी प्रसिध्दी पराङ्मुख असतात. एरवी हा गुण समजला गेला तरी अशा वृतीचा तोटाही होऊ शकतो. त्यामुळे नवं काम स्वीकारण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यानं,विशेषतः उच्चपदस्थ अधिकाऱ्याने योग्य मार्गानंं लोकांसमोर येणंं आवश्यक आहे. उच्च पदांच्या जाहिराती विशेष केल्या जात नाहीत. त्यामुळंं आपण स्वतःच अन्य कंपन्यांच्या व्यवस्थापकांबरोबर संपर्क ठेवणे श्रेयस्कर ठरतंं.
 आपण आपल्या कामात हुशार असला तरी अन्य कंपन्यांच्या लक्षात आपली हुशारी येईलच असे नाही. त्यामुळंं त्या कंपनीकडून आपल्याला बोलावणं येण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळंं व्यावसायिक संस्था, व्यवस्थापक संस्था किंवा सार्वजनिक संस्थांचं सदस्यत्व स्वीकारणं अणि अशा संस्थांमध्ये संधी मिळताच स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचं प्रदर्शन केल्याने आपला उद्देश साध्य होऊ शकतो. अशा संस्थाही त्यांच्या कार्यासाठी वेळ देऊ इच्छिणाच्या व्यक्तींच्या शोधात असतात.
प्रतिमा तयार करणे :
 केवळ स्वतःची जाहिराताबाजी केल्यानं कार्य साधतेच असंं नाही तर त्यासाठी स्वतःची विशिष्ट प्रतिमा जनमानसात तयार करावी लागते. ती तयार करण्यासाठी आपल्याला वेळेबरोबरच पैशाचीही गुंतवणूक करावी लागण्याची शक्यता असते.आपल्या व्यावसायिक क्षमतेची जाहिरात करणं, विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास करणं, व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये आपले विचार मांडणं, वृत्तपत्रांमधून विवक्षित विषयांवर लेख आदी लिहिणंं इत्यादी उपक्रमांद्वारे आपली प्रतिमा निर्माण करता येते. हे करण्यासाठी पैसा खर्च होत असला तरी तो वायफळ खर्च नसतो. तर ती एक प्रकारची गुंतवणूकच असते.त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणंं आवश्यक आहे, की प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य अल्पावधीत होत नाही. त्यासाठी काही महिनेच नव्हे तर कित्येकदा काही वर्षेही प्रयत्न करावे लागतात.
 एकंदरीत व्यावसायिक मंडळींमध्ये स्वतःचा राबता ठेवणंं, उच्च्पदास्थांबरोबरच्या ओळखी वाढविणं, आपली क्षमता आणि ज्ञान यांच्या दृष्टीसमोर राहील अशा तऱ्हेचे प्रयत्न करणं आणि आपली उपयुक्तता जाहीर करणं या मार्गानंं आपली प्रतिमा तयार होऊ शकते.
पर्यायी मार्ग :
 नोकरी बदलू पाहणाऱ्या कित्येक अधिकाऱ्यांना हे पारंपारिक मार्ग पसंत नसतात.केवळ गुणवत्तेचं प्रदर्शन करून नवी नोकरी मिळविणं हे भारतासारख्या देश शक्य नाही, कारण भारतात अजून व्यावसायिक व्यवस्थापन ही संकल्पना दृढ झालेली नाही. तिचा उच्चार केवळ सभा आणि चर्चामध्येच केला जातो. प्रत्यक्षात व्यक्तिगत संबंधावरचनोकरी मिळणंं किंवा न मिळणंं अवलंबून आहे असं त्यांचंं मत आहे.
 असे अधिकारी व्यावसायिक कार्यात वेळ गुंतविण्यापेक्षा समाज कार्यांत गुंतवितात. मात्र त्यांचा उद्देश सामाजिक कार्यकर्ता बनणंं हा नसून व्यावसायिकच असतो. अनेक मोठ्या कंपन्या सामाजिक उपक्रमांचंं आयोजन करतात. अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यानं मोठ्या कंपन्यांच्या नजरेसमोर आपण राहू आणि त्याचा फायदा नवी नोकरी मिळण्यासाठी होईल ही अटकळ त्यासाठी असते. अनेक अधिकाऱ्यांनी हा पर्यायी मार्ग यशस्वीरीत्या वापरला आहे.
 त्याचप्रमाणंं प्रतिष्ठितांच्या क्लबजचंं सदस्यत्व घेणं, तिथं येणाऱ्या उच्चभ्रूंंशी संपर्क वाढविणंं, त्यांच्या खेळांमध्ये किंवा इतर कार्यामध्ये सहभागी होणंं, त्यांच्यावर आपली व्यक्तिगत छाप पडेल असे प्रयत्न करणंं हे काही अन्य मार्गही आहेत.
 या पर्यायी मार्गांंचा उपयोग स्वतःची प्रसिध्दी करण्यासाठी पारंपरिक मार्गापेक्षा अधिक होतो. त्यामुळंं तिथं वेळ आणि पैसा यांची गुंतवणूक करणंं जास्त फायद्याचं आहे असं अनेकांचंं मत आहे. मोठ्या कंपन्यांचे चालक, व्यवस्थापक इत्यादी मंडळी संशोधन संस्था किंवा व्यवस्थापकीय संस्थांच्या कार्यक्रमांपेक्षा कलकत्ता क्लब, बॉम्बे क्लब येथील कॉकटेल पार्ट्यात किंवा रॉयल गोल्फ कोर्सवरच अधिक आढळतात. त्यामुळंं अशा ठिकाणी शिरकाव करून त्यांच्या सान्निध्यात येणं हे सोपंही आहे आणि जास्त उपयुक्त आहे असं समजणाऱ्यांंचाही एक वर्ग आहे.
 सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात हे खरं असेलही, पण व्यावसायिक गुणवत्ताच नजीकच्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे असं ज्यांना वाटतंं त्यांनी त्या आधारावरच स्वतःची प्रतिमा निर्माण करणं सुरक्षित आहे.
नवी नोकरी स्वीकारताना :
 सध्याच्या नोकरीवर आपण नाखुश आहोत हे ध्यानात ठेवून त्या कसोटीवरच नवी संधी तपासून पाहावी आणि ती स्वीकारायची की नाही याचा निर्णय घ्यावा हे महत्वाचं सूत्र आहे.