अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/काम व क्षमतेचंं समालोचन'

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
प्रत काळात नोकरीकडं कशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे याबद्दल आपण मागच्या लेखात विचार केला. नोकरीप्रमाणे ज्या ठिकाणी ती केली जाते, तेथील वातावरण हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो. कंपनी मोठी आहे, तेथील नोकरीही आकर्षक आहेतरीही वातावरण अनुकूल नसल्याने कित्येक व्यवस्थापकांनी तिच्यावर पाणी सोडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे वातावरणाचं समालोचन करणे योग्य ठरत. हे समालोचन करताना पुढील प्रश्न स्वत:ला विचारून पाहावेत.

 १. आपल्यावर नको इतका दबाव किंवा तणाव तर नाही ना?
 २. आपल्या प्रगतीत मुद्दाम अडथळे आणून ती रोखली तर जात नाही ना?
तणावग्रस्त वातावरण :
 कोणत्याही व्यवस्थापकीय कामामध्ये तणाव हा असतोच. तथापि, काही कंपन्यांमध्ये आपल्या मर्जीतील नसलेल्या अधिकाच्यांवर संचालकांकडून किंवा व्यवस्थापनाकडून अतिरिक्त तणाव आणला जातो. जेणेकरून त्याला काम करणे अवघड व्हाव. तो पुढील कारणांमुळे येऊ शकतो.
 १. बिघडलेले औद्योगिक संबंध.
 २. असमंजस वरिष्ठ अधिकारी
 ३. कंपनीतील अंतर्गत राजकारण
 नको असलेल्या अधिकाच्यांचा पत्ता परस्पर काटण्याचे दोन मार्ग काही ठिकाण संचालकांकडून अवलंबले जातात. एक, त्याला अगदी कमी काम देणे किंवा त्याच्यावर कामाचा प्रचंड बोजा टाकणे. अशा अधिकाच्याला व्यवसायाशी संबंधित सम्मेलनंं, अधिवेशनं, परिसंवाद इत्यादी सामाजिक कार्यक्रमांत कंपनीच्या वतीने भाग घेऊ दिला जात नाही.
 दुसरा उपाय म्हणजे त्याच्यावर कामाचा इतका भार टाकला जातो ,की स्वतःचंं कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याकडेही लक्ष देणे त्याला अशक्य होतं. कामाव्यतिरिक्तचा त्याचा सामाजिक संपर्क सुटतो. त्यामुळंं त्याची चडफड होते.
 या दोन्हीपैकी कोणताही अनुभव आल्यास अधिकाऱ्याने स्वतःची घुसमट होऊ देेण्यापेक्षा पर्यायी नोकरीचा शोध श्रेयस्कर ठरतंं. कारण अशा तणावग्रस्त वातावरणामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
आपल्या कामाचं समालोचन:
 कामाचं समालोचन करताना स्वतःला पुढील तीन प्रश्न विचारावेत.
 आपल्या कामाला लागणारा नेमका वेळ किती?
 या नोकरीत माझे भवितव्य काय?
 ही नोकरी आपल्या क्षमतेला साजेशी आहे काय?
नोकरीच्या वेळेचं मूल्यमापन :
 वेळ हा पैशाप्रमाणंं असतो. कितीही असला तरी तो कमीच वाटतो. तसंच एकाच ठिकाणी तो खर्च केला तर अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी शिल्लक उरत नाही.
 अन्य कुणाहीप्रमाणं व्यवस्थापकाजवळही दिवसाचे २४ तासच उपलब्ध असतात. यातील बहुतांशी वेळ नोकरीसाठीच खर्च केला,तर अन्यत्र त्याची 'गुंतवणूक’ करणं अशक्य बनतं. पैशाप्रमाणेच वेळ हीदेखील संपत्ती आहे, हे व्यवस्थापकानं लक्षात घेतलं पाहिजे व त्याची नोकरी आणि इतरत्र गुंतवणूक समतोल पद्धतीने केला पाहिजे. घरदार, बायको, मुलं, स्वतःचे छंद, नव्या गोष्टी शिकणं, थोडी फार कमरणूक, नवे अभ्यासक्रम, पदव्या इत्यादी प्राप्त करणंं यासाठीही नोकरी व्यवस्थित सांभाळून वेळ शिल्लक ठेवता येतो आणि ही गुंतवणूक फायद्याची ठरते हे जरूर लक्षात ठेवलं पाहजेे. नुसतं काम एक काम केल्याने, आपली कामावरील निष्ठा सिध्द होईल, पण दीर्घकालीन विचार करता ते तोट्याचं ठरते.
नोकरीतलं भवितव्य :
 सध्याच्या नोकरीत आपलं भवितव्य काय याचाही गंभीरपणाने विचार करणं आवश्यक आहे.काही कामं अत्यंत आकर्षक असतात, पण ती अल्पजीवी असतात. ती कर्मचाच्यांच्या भवितव्याला निश्चित आकार देण्यास असमर्थ असतात. त्यातून काम केल्याचे समाधानही मिळत नाही.
आपल्या क्षमतेचं समालोचन:
 घरच्या परिस्थितीमुळे कित्येक प्रज्ञावंत व असामान्य क्षमता असणाऱ्यांंनाही शिक्षण संपल्याबरोबर मिळेल ती नोकरी करून चरितार्थाची सोय करावी लागते. तर काही जण केवळ पगार आकर्षक आहे, म्हणून स्वतःचा कल, किंवा आवडनिवड यांचा विचार न करता अशी नोकरी धरतात. कालांतराने ती आपल्या क्षमतेच्या अनुकूल नाही हे जाणवत. मग बौध्दिक घुसमट चालू होते.
 प्रारंभीच्या काळात नाईलाजास्तव कोणतीही नोकरी पत्करावी लागली, तरी जीवनात काहीसं स्थैर्य निर्माण झाल्यानंतर आपली क्षमता आणि सध्याची नोकरी यांची तुलना करावयास काही हरकत नाही. नव्या नोकरीचा शोध घेण्यास ही तुलना साहाय्यभूत होऊ शकते.
 अशा प्रकारे स्वतःच्या कार्यालयीन जीवनाचे सर्व अंगांनी त्रयस्थपणानं समालोचन करण्याची सवय अधिकारी, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांंनीही लावून घेतली पाहिजे. केवळ घाण्याला जुंंपलेल्या बैलाप्रमाणे कामाच्या पाट्या टाकत राहणे आणि आपण खूप राबतो असं समाधान करून घेणे अंतिमतः नुकसानदायक ठरते.आपली कंपनी कामाचं वातावरण, नोकरी, स्वतःची क्षमता, आवडनिवड, गरजा, आपल्यावरील कामाव्यतारक्तच्या जबाबदाऱ्या, आपल्याला उपलब्ध असणारा वेळ, त्याची योग्य पध्दतीनं गुंतंवणूक इत्यादी सर्व बाबींची एकमेकांशी सांगड घालून सध्याची नोकरी सुरू ठेवायची की त्यात बदल करणे आवश्यक आहे. याचा निर्णय घ्यावा.