अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/चमचेगिरीचा वापर

विकिस्रोत कडून
मचेगिरी ही व्यवस्थापकीय अपरिहार्यता कशी आहे व त्यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवणंं व तिचंं योग्य व्यवस्थापन करणं संस्थेच्या हितासाठी का व कसंं आवश्यक आहे याबाबत आपण मागच्या लेखात विचार केला. चमचेगिरीचा वापर कसा व कितपत करून घेतला जातो यावर संस्थेचं हित किंवा अहित ठरतंं.

 केवळ माहिती देणंं आणि घेणंं यासाठीच चमचेगिरी असते असं नाही. खुशमस्करी हा तिचा महत्त्वाचा पैलू आहे. यालाही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहेच.
 मडक्यांच्या उतरंडीचं उदाहरण पहा. ती खालपासून वरपर्यंत लहान लहान हहोत गेलेली दिसते आणि सर्वात वर एकच मडकं एकटेच असते.कोणत्याही संस्थेत सत्तेची उतरंड अशीच असते. सर्वात वरच्या सत्तास्थानी एकच व्यक्ती असते.हाताशी असूनही त्या व्यक्तीचे सर्वात मोठे दुःख एंकटेपणाचं असते. जितकंं सत्तास्थान वरचं तितके प्रतिस्पर्धा जास्त व भावना जाणणारी व सुखदुःख वाटून घेणारी जिवाभावाची मांणसं कमी. शिवाय कामाच्या जबाबदारीचे ताणतणाव अधिक, अशी सत्ताधीशाची स्थितीी झालेली असते.
 अशा वेळी आपला आत्मविश्वास टिकूूवूून धरण्यासाठी, अहंकार सुखावण्यासाठी आणि दडपणांचंं ओझंं हलकं करण्यासाठी त्याला एखाद्या स्तुतिपाठकाची आवश्यकता भासते. ही भूमिकाही ‘चमचा'निभावतो. तो स्वतःकडे कमीपणा घेऊन सत्ताधीशाच्या बुध्दिमत्तेचंं, निर्णयशक्तीचं आणि व्यावसायिक यशाचंं तोंड भरून कौतुक करतो.यामुळे सत्ताधीशाचं नीतिधैर्य उंचावतं. एकटेपणामुळे जाणवणारंं दडपण व ताणतणााव काहीसे कमी होतात. उत्साहवर्धन होते. अशी खुशमस्करी ही एक कला आहे.काहीजणांना ती बरोबर साध्य झालेली असते. सत्ताधीशांचं नीतिधैर्य उंचावलंं की,संस्थेच्या कामगिरीतही सकारात्मक फरक पडतो.
 पूर्वीच्या काळी राजे महाराजे व सम्राट आपल्या पदरी भाटचारण,कवी,नवलााकाार,हजरजबाबी, हुजरे आदींना बाळगत असत, ते मुख्यतः याच कारणासाठी. विजयनगर साम्राज्यातील सर्वात पराक्रमी आणि यशस्वी मानला गेलेला सम्राट कृष्णदेवराय याच्या राज्यात मानाचे अग्रस्थान पटकावलेला तेनाली राम हे उत्कृष्ट उदाहरण मानता येईल.तेनाली राम कुशाग्र बुध्दिमत्तेचा, पण अत्यंत विनोदी स्वभावाचा होता. सम्राटाची खुशमस्करी करण्याच्या ओघात तो त्याला राजकर्तव्यांची जाणीवही करून देत असे.त्याच्या चुका दाखवून देत असे. इतकेच नाही तर सम्राट अडचणीत असताना अचूक मार्गदर्शनही करत असे.पण हे सर्व हलक्या फुलक्या आणि हास्य स्फोटक युक्त्या लढवून. दरबारातील इतर मानकच्यांच्या दृष्टीने तो एक विदूषक आणि खुशमस्कच्या होता, पण राजाचा तो मोठा मानसिक आधार होता. तेनाली रामाने खुशमस्करीची कला (आर्ट ऑफ फ्लॅटरी) अशा अत्युच्च पातळीवर नेली की त्यामुळे राजाचा आणि पर्यायाने राज्याचा फायदा झाला.सकारात्मक खुशमस्करीचा हा नमुना इतिहासात क्वचितच सापडेल.
 दुसरे उदाहरण संभाजी महाराजांचं पाहा. त्यांना कुब्जा कलुषीसारखा खुशमस्कच्या भेटला. त्याने राजांना व्यसनं लावली.त्यांची खोटी स्तुती करून आपला स्वार्थ साधून घेतला. त्यामुळे संभाजीराजांचंं राजकारण व राज्यकारभारातील लक्ष उडालं. ते नादी बनले. याचा परिणाम संपूर्ण मराठी साम्राज्याला भोगावा लागला.दिल्लीचे तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी मराठी सल्तनत खिळखिळी झाली.(कित्येक इतिहासकार कलुषीी प्रकरणाला केवळ दंतकथा मानतात. संभाजी- कलुषा संबंधांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही असंं त्यांचं म्हणणे आहे. तरीही इथे हे उदाहरण इतिहास सांगण्याच्या उद्देशाने नव्हे तर नकारात्मक खुशमस्करीचा परिणाम किती घातक होते हे दाखविण्यासाठी घेतले आहे.)
 दोन्ही उदाहरणांचा सारांश असा की, चमचेगिरीची माहिती देणंं या पैंंलूंंप्रमाणे खुषमस्करी या पैलूसही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहेत.
 ऐतिहासिक संदर्भ सध्याच्या काळात जसेच्या तसे लागू होत नसले, तरी त्या मागचंं तत्त्व लक्षात घेण्याजोगंं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, माहिती पुरविणं व खुशमस्करी करणं यातून चमच्यांना फायदा होतो का? याचे उत्तर होय आणि नाही असंं दोन्ही आहे. संस्थेतील उच्च पदाधिकारी, जे चमचेगिरी चालू देतात ते जागरूक असतील तर संस्थेला घातक ठरेल इतपत फायदा ते चमच्यांना मिळवू देणार नाहीत. निव्वळ चमचेगिरीव. प्रमोशन किंवा उच्च पदं मिळण्याची उदाहरणंं अल्प आहेत. कारण कामगिरी आणि चमचेगिरी यात कामगिरी श्रेठ आहे आणि असलीच पाहिजे. व्यावसायिक पध्दतीने व्यवस्थापन करणाच्या संस्थांमध्ये कामगिरीचाच विचार प्राधान्याने होतो असा माझा अनुभव आहे.
 तरीही चमच्यांना काही सोयी सवलती मिळतातच.(त्या शिवाय हा प्रकार करणार कोण?) इतरांपेक्षा आपण बॉसच्या जवळचे आहोत. आपल्याशिवाय बॉसचे पान हलत नाही. इतरांचीही कामं आपण बॉसकडून करवून देऊ शकतो, असा भाव आपल्या सहकाऱ्यांंकडे मारणं, आणि त्यांचा जळफळाट करणंं, हे असुरी समाधानही चमच्यांना मिळत असतं. दुसच्यांच्या मनात आपल्याबद्दल मत्सर निर्माण करणं हा अनेकांना छंदच असतो. तो चमचेगिरीच्या माध्यमातून पुरेपूर भागतो.
 आणखी एक उदाहरण पाहा. पुण्याला रविवारी वन डे क्रिकेट मॅच आहे. त्याच वेळी कंपनीचं पुण्याला काही काम आहे. चमचा बॉसला सांगेल, त्या कामासाठी मला पाठवा. मी शनिवारी जातो.माझ्या नातेवाईकाने क्रिकेट मॅचचे तिकीट काढलं आहे.पुण्याला जातोच आहे,तर मॅचही बघून येईन.बॉसही विचार करेल, कुणाला तरी या कामासाठी पाठवायचचं आहे, हा गेला म्हणून काही बिघडणार नाही. तो परवानगी देईल. मग चमचा या प्रकाराची आपल्या सहकाच्यांमध्ये जाहिरात करतो.
 कंपनीच्या प्रवास खर्चाने आपल्याला मॅच बघायला मिळणार. कारण बॉसने या कामासाठी आपली निवड केली आहे, असं तो ज्याला त्याला सांगून आपले महत्व वाढविण्याचा प्रयत्न करतो. इतरांना खरी बाब माहिती नसल्याने त्यांच्या ठायी चमच्याचा भाव वधारतो. अशा प्रकारचे छोटे छोटे फायदे चमच्यांना मिळू शकतात.
तात्पर्य:
 बॉसचे चमच्याकडून दोन फायदे असतात. एक गुप्त माहिती, दोन खुशमस्करी. तर चमच्याचे बॉसकडून दोन फायदे असतात, एक सहकाऱ्यांत भाव मारण्याची संधी व दोन, छोट्या छोट्या सवलती. जोपर्यंत बॉस व चमचा यांच्यात हा अलिखित करार चालू राहील तोपर्यंत ती पूर्णपणे नाहीशी करणंं अशक्य आहे.मात्र कंपनीच्या कारभारात पारदर्शकता ठेवणंं व सर्वाशी मुक्त संपर्कात असणंं या मार्गाचा अवलंब करून व्यवस्थापन चमचेगिरी नियंत्रणाखाली ठेवू शकते.