अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग पहिला)

विकिस्रोत कडून

आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग पहिला)

कबराचा दरबार भरला होता. दरबारात एकदम एखादा अडचणीचा खडा

टाकून बिरबलाच्या बुध्दीची परीक्षा घेणंं हा अकबराचा आवडता छंद! त्या दिवशीही त्याने अचानक दरबारातील मानकऱ्यांना प्रश्न केला, “रोटी का करपली? घोडा का अडला? पान का सडले? या तीन प्रश्नांना एकच उत्तर व तेही एका वाक्यात द्या." त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी आठ जण डोकं खाजवू लागले. पण बिरबल शांत, त्याचं उत्तर तयारच होतं. इतरांना थोडावेळ विचार करू दिल्यानंतर तो एका वाक्यातही नव्हे तर अवघ्या दोन शब्दांत म्हणाला.
 “न फिरविल्यामुळे’
 (रोटी थापून तव्यावर टाकली की ती सारखी 'फिरवावी' लागते. नाही तर करपते. घोड्यावर बसून प्रवास करत असताना मार्गात काही अडथळा आला तर घोडा ‘फिरवून’ घेऊन बाजूने बाहेर काढावा लागतो, नाही तर पुढचा प्रवास थांबतो. खाण्याचे पान सतत उलटे पालटे करावे लागते, म्हणजेच 'फिरवावे' लागते. अन्यथा ते कुजते.)
 उदारीकरण, जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, ग्राहकांची बाजारपेठ, जागतिक स्पर्धा, भांडवलशाही, तंत्रज्ञानविकास, संगणक आदी शब्दसुध्दा भारतीयांनाच काय तर जगातही कुणाला माहीत नव्हते, त्या साडेचारशे (सुमारे) वर्षांपूर्वीच्या काळात बिरबलाने

त्याच्याही नकळत आधुनिक व्यवस्थापनशास्त्रामधलं एक महान तत्त्वच जणू या उत्तरानं उद्धृत केलं होतं.

 सुमारे १५ वर्षांपूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदलाचे वारे वाहू लागले. त्यापूर्वी समारे ४० वर्षे समाजवादी, बंदिस्त अशा अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केला होता. ही संरक्षित अर्थप्रणाली असल्याने वस्तू उत्पादन करण्याचे तंत्रज्ञानतयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी आधुनिक पध्दती विकसित करण्याकडे आपले उद्योग व सरकार यांचं दुर्लक्ष झालं. बिरबलाच्या शब्दांत सांगायचं तर अर्थव्यवस्था फिरविण्याची कुवत व मानसिकता आपल्या व्यवस्थापनात निर्माण झाली नाही. ‘कशाला उद्याचा बातबघ उडून चालली रात’ अशी वृत्ती बोकाळली. पूर्वसुरींनी घालून दिलेली पध्दतः योग्य, ती ‘फिरविण्याची’, त्यात बदल करण्याची आवश्यकताच काय? अशा भ्रमण समजुतीला आपले उद्योग, त्यांचे मालक, त्यांचे व्यवस्थापन, कर्मचारी, इतकेच नव्हे तर ग्राहक व निर्णय घेणारे राजकारणी चिकटून राहिले.
आव्हान जागतिक स्पर्धेचे :
 सध्या उद्योग क्षेत्रात पसरलेल्या व दीर्घकाळ सुरू असलेल्या मंदीमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या असुरक्षित झाल्या आहेत. या आव्हानांना तोंड देण्याचे काही मार्ग याबाबत आपण मागच्या दोन लेखांत विचार केला. ‘आधीच दुष्काळ, त्यात धोंड्याचा महिना' या म्हणीप्रमाणे याच वेळेला जागतिक स्पर्धाला तोंड देण्याचं नवं आव्हान उभे राहिल आहे. एकीकडे नोकर्यांच्या असुरक्षिततेमुळे कर्मचाच्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असताना दुसरीकडे जागतिक स्पर्धाला तोंड देण्यासाठी अधिक काम कराव, हरघडी बदलणारं तंत्रज्ञान स्वीकारण्यास सज्ज असावे, अशीही अपेक्षा कर्मचार्यांकडून केली जात आहे.
 समाजवादी अर्थरचनेत वस्तूंचे उत्पादन व विक्री आणि किंमत यावर सरकारच नियंत्रण असतं. कुणी, काय व किती उत्पादन करायचं, तसंच कोणत्या किमतीला विकायचं हे सरकार ठरवतं. तोच माल ग्राहकाला विकत घ्यावा लागतो. त्याच्या चॉईसला फारशी किंमत व संधी असत नाही. उदाहरणार्थ पंचवीस वर्षांपूर्वी स्कूटर नविण्याचे परवाने फक्त दोन कंपन्यांना दिलेले होते. त्यापैकी एक सरकारी होता, त्यामुळे या कंपन्यांनी तयार केलेली तयार केलेली स्कूटरच विकत घ्यावी लागे. या पध्दतीचा वाईट परिणाम असा की झाला, उद्योगांना स्पर्धेचा सामना करावा लागला नाही. साहजिकच नवं तंत्रज्ञान विकसित करावं, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवी वैविध्यपूर्ण उत्पादन तयार करावीत याची निकड जाणवली त्यांना नाही. बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे जगाशी असणारा संपर्क तुटला. बाहेरच्या जगात कोणते परिवर्तन होत आहे, याची जाणीव एकतर झाली नाही, किंवा त्याकडे समजूनही दुर्लक्ष करण्यात आलं. काळाप्रमाणे स्वत:ला ‘फिरविण्याचे’ आपण विसरलो.
 परिणामी मालाचा दर्जा ढासळला. युरोप व अमेरिकेत तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत असताना मागे राहिले. कालांतराने चन व जपाननेही त्यांच्या तोडीस तोड आपण मजल मारली व काही बाबतीत आघाडीही घेतली. तरीही आपण जागे झालो नाही. आपलं कुठे तरी चुकत आह व भविष्यकाळात त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, याची कल्पना मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांना व जनतेच्या वतीने निर्णय घेणाच्या राजकारण्यांनाही आली नाही. आज सर्व व्यवस्थित आहे ना, मग उद्याची काळजी कशाला अशा भावनेत ते मश्गुल राहिले. पण काळ कुणासाठी थांबत नाही.
 १२ वर्षांपूर्वी रशियामधील कम्युनिझमचा अंत झाला आणि समाजवादी अर्थरचनेचा समाजवादाला जागतिक आधारस्तभ ढासळला. चतर चीनने अर्थव्यवस्थेबाबत २० वर्षांपूर्वीच तिलांजली देऊन अमेरिकेशी ‘आर्थिक दोस्ती’ केली व भांडवलशाही अर्थकारणाच्या दिशेने पावले टाकावयास सुरुवात केली. रशिया हा जसा भारताचा संरक्षणाच्या दृष्टीने आधार होता. तसा तो व त्याच्या इशाच्यावर चालणारी इतर पूर्व युरोपियन साम्यवादी राष्ट्रे ही भारताचा आर्थिक आधार होती. भारताची बरीचशी निर्यात याच देशांना होत असे. भारताशी मधुर संबंध ठेवणं रशियाला राजकीयदृष्ट्या आवश्यक असल्याने भारतातील कनिष्ठ दर्जाचा मालही रशिया घेत असेत्यामुळे आपल्या निर्यातप्रधान उद्योजकांना मालाच्या दर्जाबद्दल सावध न राहण्याची सवय जडली. बदलत्या अर्थव्यवस्थेत ती घातक ठरत आहे.
 रशियाच्या पतनाबरोबरच भारतीय मालांची निश्चित बाजारपेठही संपली. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था किती बळकट आहे, हे त्या देशाच्या निर्यातीवरून ठरवलं जातं केवळ निर्यातीच्या प्रमाणावर नव्हे, तर निर्यात मालाचा दर्जा, किंमत पुरवठा, त्याला असणारी ग्राहकांच्या भागवणंच नव्हे तर निर्माण मागणीसध्याच्या गरजा नव्या गरजा करून त्या भागवण्याचे कौशल्य या सर्वांवर अर्थव्यवस्था अवलंबून असते.
 यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करावा लागतो. तंत्रज्ञान, मार्केटिंग, जाहिरात आदी क्षेत्रात बुडणारे नवे बदल स्वीकारावे तर लागतातच, पण स्वतःही बदल घडवून आणावे लागतातही सर्व जबाबदारी व्यवस्थापनावर असतेत्यासाठी व्यवस्थापकांमध्ये स्वत:ला व स्वतःबरोबर इतरांना फिरविण्याची’ क्षमता असावी लागते.
 बेसावध अवस्थेतील भारताय उद्योगांना ‘रशियोत्तर' जगात तीव्र जागतिक स्पर्धेचा सामना करावा लागत आहेकाहीही कसेही पिकवा आणि रशियात खपवा अशी स्थिती राहिली नाही. उघड्या जागतिक बाजारपेठेत जागतिक दर्जाचा माल तयार करून खपविण्याचे शिवधनुष्य व्यवस्थांना उचलावं लागत आहे.
 त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्याने परदेशांत तयार होणाऱ्या मालाला भारताचे दरवाजे मोकळे करून द्यावे लागत आहेत.W.T.O. कराराप्रमाणे आयातीवरचे निबंध हटवावे लागले आहेत. त्यामुळे भारतीय वस्तूंपेक्षा टिकाऊ, सुबक व स्वस्त परदेशी वस्तूंनी आपली बाजारपेठ भरून जात आहे. आईवडिलांनी केवळ भात-आमटी खाण्याची सवय लावलेल्या बालकाच्या हातात मोठा ‘कॅडबरीज'चा बार ठेवावा आणि त्याने त्यावर तुटून पडावं, तसं आपले ग्राहकही या आकर्षक वस्तूंवर उड्या मारताहेत.
 याचा परिणाम म्हणून देशी उद्योग खिळखिळे होत आहेत. अनेक तर बंदच पडले आहेत, पण त्यातील आधुनिक यंत्रांवर काम करण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे. पूर्वीच्या समाजवादी अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य नसल्याने कुशल कामगारांची फौज तयार झाली नाही. अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांची संख्या जास्त आहे.(अपवाद फक्त माहिती तंत्रज्ञान, संगणक सॉफ्टवेअर क्षेत्राचा) या अकुशल व अर्धकुशल कामगारांना आता काम मिळणं मुश्किल झालं असून त्यांच्या बेकारीची सामाजिक व मानवीय (ह्यूमन) समस्या उभी राहत आहे आणि या परिस्थितीला या कामगारांना दोषी ठरवता येणार नाही. त्यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणं ही प्राथमिकता आहे. त्यांना वाच्यावर सोडता येणार नाही.
 अशा तऱ्हेने, परकीय बाजारपेठ काबीज करणं, देशांतर्गत बाजारपेठ राखणे, बेकारी आणि जागतिक मंदी हे चार आव्हानात्मक भस्मासुर एकाच वेळी भारतीय व्यवस्थापनासमोर उभे आहेत. यातल्या एकीकडे जरी दुर्लक्ष झालं तरी तो आपल्या डोक्यावर हात ठेवेल.डिसेंबर महिन्यात सकाळी सहा वाजता अंगावरचे कपडे काढून पोहायला येत नसलेल्या एखाद्या बालकाला पोहण्याच्या पुलात उतरवावं, म्हणजे त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था आपल्या उद्योग क्षेत्राची झाली आहे.
 तथापि, माझ्या व्यवस्थापकीय मित्रांनो,घाबरून जाण्याचे कारण नाही.बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे आपण स्वतला फिरविण्याची तयारी दाखविली तर या सर्व भस्मासुरांना एकाच वेळी यमसदनी धाडणंं अशक्य नाही. यासाठी कोणते गुण विकसित करावे लागणार आहेत याची माहिती पुढील लेखात घेऊ.