Jump to content

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग दुसरा)

विकिस्रोत कडून

आव्हान जागतिक स्पर्धेचे (भाग दुसरा)

गच्या लेखात आपण भारतीय उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या महत़्त्व्याच्या चार आव्हानांचा आणि त्याच्या कारणांचा परामर्श घेतला. समस्या अनेक असल्या तरी त्यावर उपाय एकच असू शकतो, याचा बोध त्या लेखात दिलेल्या बिरबलाच्या गोष्टीवरून होतो. आपण गेली ५० वर्षे स्वीकारलेल्या नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये आक्रमकतेपेक्षा सुरक्षिततेला जास्त प्राधान्य आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रात घडणारे नवे बदल धडाडीने स्वीकारणंं अपलयाला शक्य होत नाही. नव्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेचंं स्वरूप केवळ कागदोपत्री बदलून उपयोग होत नाही, तर हा बदल उद्योगधंद्यांच्या मालकांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांच्या मनात मुरावा लागतो. त्यानंतर तो कृतीत उतरतो आणि मग त्याचे चांगले परिणाम दृृष्टिपथात येत असतात.

 उद्योगाचे व्यवस्थापक हे मालक व ग्राहक यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत.त्यामुळेही बदलाची प्रक्रिया सुरू करून ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मुख्यत्वे व्यवस्थापकाची आहे. समस्या व आव्हाने अनेक असली तरी त्यावर कालमानाप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवून आणणं म्हणजेच उद्योगविषयक आपल्या संकल्पना परिस्थितीनुसार फिरवून घेणे आवश्यक आहे, हे मागच्या लेखातील बिरबलाच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं आहेच. तोच धागा पकडून या आव्हानांचा स्वीकार आपल्या व्यवस्थापकांना

कसा करता येईल याचा विचार या लेखात करू.
 जागतिक बाजारपेठ आपल्या कब्जात आणणंं व स्वतःच्या देशातील बाजारपेठ राखणं याकरिता तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य द्यावं लागणार आहे. गेल्या पन्नाास वर्षात आपल्या देशात तंत्रज्ञानाचा विकास झाला नाही असं. अवकाश संशोधन संरक्षण व काही प्रमाणात कृषी व औषधनिर्मिती या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन, झालं आहे. तथापि, त्याचा व्यापारी फायदा उठविण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. याचा अर्थ केवळ संशोधन करून काम भागतंं ,असा नव्हे तर ते संशोधन बनविणे व त्याला ग्राहकांपर्यंत पोहोचविणं हे देखील तितकंच महत्त्वाचे आहे. सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञानात आपली प्रगती चांगली झाली आहे. पण केवळ तेवढ्यावर अवलंबून राहता येणार नाही, असाच विकास अन्य क्षेत्रांमध्ये होणंंही तितकंच आहे. त्याचप्रमाणे ग्राहकोपयोगी वस्तू रसायने, वाहने, दूरसंचार इत्यादी महत्त्वाच्या उद्योगसेवांबाबत आपल्याला आजही मोठ्या प्रमाणावर परकीय तंत्रज्ञान किंवा परदेशांत तयार झालेल्या वस्तूुंवर गुजराण करावी लागते. ही उत्पादनेे व सेवा यांना मागणी मोठी व कायम असते व फायद्यांचे प्रमाणही चांगलं असतं. त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत ही परिस्थिती बदलायची असेल तर तंत्रज्ञानविषयक व्यवस्थापनाच्या साहाय्याने संशोधन व तंत्रज्ञान विकास याला प्राधान्य द्यावे लागते. यासाठी पुढील मुद्यांचा विचार होणं आवश्यक आहे.
१. ग्राहकांची गरज समाधानकारकरीत्या भागेल अशा वस्तू तयार करण्यास तांत्रिक संशोधनास प्रोत्साहन -
 आपल्याला असे दिसून येतं की, जागतिक बाजारपेठेत आज जे देश आघाडीवर आहेत त्यांनी तंत्रज्ञानाच्या विकासाकडे सर्वाधिक लक्ष पुरविलं आहे. त्यामुळेच त्यांची आघाडी टिकून आहे. भारतीय व्यवस्थापकांनी संशोधन व तंत्रज्ञान विकास प्रोत्साहन देणं अनिवार्य आहे.
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या समाजवादी अर्थरचनेमध्ये तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात आला नाही. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा व गरजा जाणून घेण्यामध्ये आपलं व्यवस्थापन कमी पडलं. संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या अन्य देशांच्या मानाने आपण या क्षेत्रात बरेच पिछाडीवर आहोत. गरज ही शोधकार्य जननी आहे असं आपण फक्त म्हणतो. प्रत्यक्षात गरज आहे. पण शोधकार्य होत नाही अशी स्थिती दिसन येते. ती बदलण्याची ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा व त्यांची क्रयशक्ती (वस्तू विकत घेण्याची क्षमता) यांचा सांगोपांग अभ्यास करून त्या पध्दतीची उत्पादनं तयार करण्यासाठी संशोधकांना उद्युक्त करणं व्यवस्थापकांची जबाबदारी आहे.ही माहिती जितकी अधिक व अचूक तितकं संशोधन कमी वेळेत व कमी गुंतवणुकीत होतं असा अनुभव आहे. त्यामुळे व्यवस्थापकाने भिन्नभिन्न स्रोताचा वापर करून ग्राहकांच्या अपेक्षांबाबत माहिती मिळविणे व त्यानुसार संशोधन करवून घेणं आवश्यक आहे .
संशोधन व तंत्रज्ञान विकासातील गुंतवणूक : विकसित देशांमधील बहुतेक सर्व कंपन्या आपल्या वार्षिक उलाढालीच्या दहा ते वीस टक्के रक्कम संशोधनासाठी खर्च करतात. त्यामुळे हरघडी नव्या आकर्षक, सुबक त्याचबरोबर टिकाऊ किफायतशीर वस्तू बाजारात उतरवणं व ग्राहकांची मनं जिंकणे त्यांना शक्य होतं. भारतीय कंपन्यांनी या पैलूकडे फारसं लक्ष पुरविलं नाही, भारतात संशोधनाचं कार्यही सरकारकडूनच केलं जातं. त्यात खाजगी सहभाग कमी प्रमाणात आहे. सरकारी प्रयोगशाळांमध्ये सरकारी पध्दतीने कामकाज चालत असल्याने संशोधनावर पैसा तर खर्च होतोच, पण फारसं काही हाताला लागत नाही. बदलत्या अर्थव्यवस्थेत संशोधन क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी व्यवस्थापकांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. संशोधनावर खर्च होणारा पैसा म्हणजे वायफळ खर्च असं न समजता ती उज्ज्वल भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक आहे अशी भावना निर्माण होणे आवश्यक आहे.
सामुदायिक संशोधन : आपल्या धर्मग्रंथामध्ये एक अर्थपूर्ण श्लोक आहे.

ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै ॥

 याचा अर्थ असा की, आपण सर्व एकत्र येऊ या, एकत्र जेवू या, एकत्र बलोपासना करू या (आपल्यात तेज आणि बल निर्माण होवो) आणि हे करताना परस्परांबद्दल, द्वेषाची भावना निर्माण न होऊ देऊ या.
 आधुनिक काळामध्ये संशोधन करताना याच तत्त्वाचा उपयोग केला जात आहे. जुन्या काळात शास्त्रज्ञ त्याच्या व्यक्तिगत प्रतिभा व बुध्दिमत्तेच्या आधारावर स्वतंत्रपणे निरनिराळे शोध लावत असत. थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने एकट्याने एक हजाराहून अधिक शोध लावले होते. सध्याच्या काळात संशोधन व्यक्तिगत पातळीवर न होता सामूहिक किंवा गटाच्या स्वरूपात असा की, कल्पना संकल्पनेची देवाणघेवाण होते. एक व्यक्ती संशोधनाच्या सर्व पैलूंवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकत नाही. मात्र चार पाच त्याहून किंवा अधिक शास्त्रज्ञाच्या संघाने एखाद्या विषयावर संशोधन केल्यास त्याची गती वाढते. शिवाय संशोधन अधिक अचूक होण्याची शक्यता वाढते. एका गटात विविध क्षमतांचे संशोधक असू शकतात. त्यापैकी प्रत्येकाची बौध्दिक पातळी, मानसिकता, प्राथमिकता व व्यक्तिगत संकल्पना यात फरक असू शकतो. त्यामुळे प्रत्येक संशोधकाच्या उत्तम गुणांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मनुष्यबळाचे सुयोग्य व शिस्तबध्द व्यवस्थापन हा तंत्र व्यवस्थापनातील कळीचा मुद्दा आहे. संशोधनाबरोबरच उत्पादनाचा विक्रय ही महत्वाची बाब आहे. या प्रक्रियेला व्यवस्थापन शास्त्रात व्यापारी व्यवस्थापन (कमर्शियल मॅनेजमेंट) असं म्हणतात.
यामध्ये-
 १. गरजेचे रूपांतर आवश्यकतेमध्ये करणे.
 २. आवश्यकता भागविण्यासाठी सदर वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणे.
 ३. उपलब्ध वस्तू विकण्यासाठी विक्री कौशल्य (सेल्समनशिप) विकसित करणे.
 ४. विक्री किंमत किफायतशीर राखणे यांचा अंतर्भाव आहे.
 सामूहिक संशोधन करताना समूहातील सदस्यांमध्ये संघभावना निर्माण करण हे सर्वाधिक महत्वाचे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी व्यवस्थापकांना पुढील तीन गुण स्वतःमध्ये विकसित करावे लागतात.
 १. कर्तव्यनिष्ठा (सेन्स ऑफ मिशन)
 २. कृतिशीलता (सेन्स ऑफ अँँक्शन)
 ३. प्रामाणिकता (सेन्स ऑफ लॉयल्टी)
कर्त्यवनिष्ठा:
 धौम्य ऋषी आणि त्यांचा लाडका शिष्य आरुणी यांची कथा सर्वपरिचित आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेल्या शेताची जबाबदारी धौम्य ऋषींनी आरुणीवर सोपविली होती. एके दिवशी शेताचा बांध फुटून भरलेले पाणी वाहून जाऊ लागले.ते पाहून छोट्या आरुणीने माती घालून बांध बुजविण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. शेतातील पाणी वाहून गेले असते तर पीक उगवू शकले नसते,याची जाणीव झाल्यानंतर त्याने स्वतःच बांधावर आडवे पडून पाणी वाहणे थांबविलं. आपलं वय आणि शक्ती याचा कोणताही विचार न करता त्याने स्वतःला स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झोकून दिलं. यालाच कर्तव्यनिष्ठा किंवा सेन्स ऑफ मिशन असे म्हणतात. आधुनिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकांनाही हा आदर्श डोळ्यासमोर लागतो.
कृतिशीलता :
 काही वर्षांपूवीं वन मिनिट मॅॅनेजमेंट नावाची व्यवस्थापनशास्त्रावरील सोपं पुस्तक प्रसिध्द झाले होते. त्यामध्ये तीन संदेश देण्यात आले होते. ते असे होते की, व्यवस्थापकांने कर्मचाऱ्याला त्याच्यावर सोपविलेलं काम मिनिटांत सांगावयाचंं, कर्मचाच्याने ते व्यवस्थित केल्यास एका मिनिटात त्याचं कौतुक करायचं व कर्मचाऱ्याने ते काम समाधानकारक न केल्यास त्याची झाडाझडती एका मिनिटातच घ्यावयाची.  वर वर पाहता हा प्रकार विचित्र वाटेल. पण कर्मचार्यांमध्ये कृतिशीलता निर्माण करण्यासाठी यापेक्षा अधिक प्रयत्नांची आवश्यकता नसते हे अनुभवांवरून आपल्या लक्षात येते. याच पुस्तकात एक प्रसंग असा दिला आहे की, एका व्यवस्थापकाने कर्मचार्याला एकाच वेळी पाच कामं सांगितली. संध्याकाळी कर्मचार्याने त्यापैकी चार पूर्ण केली होती, पण एक राहिले होते .संध्याकाळी कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाला कामाचा अहवाल दिल्यानंतर त्याला सांगण्यात आलं, “अरे हे पाचवं काम महत्त्वाचे होते ,तू केलेली चार कामं उद्या केली असती तर चाललं असतं.‌‌"
 झाल्या प्रकारात कर्मचाऱ्याची चूक नव्हती. कारण त्याला कामाचंं नेमकं स्वरूप व महत्त्व सांगण्यात आलं नव्हतं. अशा परिस्थितीत त्या कर्मचाच्यांमध्ये कृतिशीलता कशी निर्माण होईल? कामाबद्दलचा संभ्रम कृतिशीलतेवर वाईट परिणाम घडवतो. यासाठी मोजक्या शब्दांत पण कामाचंं नेमकं स्वरूप कर्मचाच्याला सांंkगण्याचा गुण व्यवस्थापकाने विकसित करणे आवश्यक आहे.
 काम समजावून देताना नको इतक्या सविस्तरपणे ते समजावणं किंवा अर्धवट समजावणंं या दोन्ही बाजू चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण मानता येणार नाही. तसंच काम यशस्वी झाल्यानंतर त्याचं अति कौतुक करणे किंवा अयशस्वी झाल्यानंतर वाजवीपेक्षा जास्त कठोर शब्दांत, कर्मचाच्याला फटकारणं विशेषत: त्याचा त्याच्या सहकाच्यांसमोर थोडक्या चुकीसाठी उपमर्द करणं, त्याच्या कृतिशीलतेला घातक ठरू शकतं. अशा व्यवस्थापकांच्या हाताखालचे कर्मचारी नेहमी दडपणाखाली वावरतात. कामाचा दर्जा राखण्यापेक्षा त्यात काही चूक राहू नये, याचीच चिंता त्यांना अधिक वाटत राहते. त्यामुळे योग्य त्या ठिकाणी धोका पत्करून किंवा स्वतःची कल्पनाशक्ती वापरुन आपली जबाबदारी पूर्ण करणंं त्याला जमत नाही. अंतिमत: त्याचा परिणाम पूर्ण संस्थेला भोगावा लागतो. त्यामुळे कौतुक व समज या दोन्ही गोष्टी संयमित नियंत्रित व किमान शब्दांत दिल्या गेल्या पाहिजेत.
प्रामााणिकपणा :
 आपण काम करत असताना मनात दोन तर्हेची धास्ती असते .पहिली म्हणजे मी काही चुकीचे केलं तर दुसर्याला याचा त्रास होईल .तर दुसरी धास्ती म्हणजे मी काही चुकीचं केलं तर मलाच दुसच्यांकडून त्रास होईल. माणूस जेव्हा उच्च पदावर पोचतो व त्याच्या हातात अधिकार येतो त्यावेळी त्याला पहिली धास्ती अधिक जाणवते. हाच प्रामाणिकपणाचा निकष आहे. आपल्याला त्रास होऊ नये यासाठी सर्वजण जागरूक असतातपण आपल्यामुळे दुसच्याला त्रास होऊ नये म्हणून सावध राहणंं यालाच कामाच्या बाबतीत प्रामाणिकता असं म्हणतात. आपले पद कोणतंंही असलं तरी हा गुण प्राधान्याने विकसित करणे ही उत्तम व्यवस्थापकाची जबाबदारी आहे .याबरोबरच इतरही अनेक बाबींकडे व्यवस्थापकाला लक्ष पुरवावे लागते. याचा विचार पुढच्या लेखात करू.