पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास चाली होऊन माहाराज साहेबी आज्ञा केली की कती कोम ? ६ यास याती घेणे त्यावरून प्रति उतर अर्ज केला की उत्तम बरे साहेबांची आज्ञा अम्हिांस मान्ये असे सिरसा आहे पर येत" साहेव आमचे धनी परंतु शेरीस मध गोताई मुळे ' साहेब आमचे जवाई आहेत साहेबांचे आमचे गोत गंगा येक आहे कती कोन (?) यांस आज्ञ करून सर्व जातीस जेवण करऊन साहेबी आपणासमवेत गोतजेवण करून जातीत वर्तवावयाची आज्ञा करणे त्या उपर महाराजसाहेब ख्याल खुशालींत येऊन आम्हांसंग विनोद करून कितेक गोस्टी केल्या आण म्हणो लागले कीं बेटे हो आम्ही तुमचे जांवाई कैसे, त्या उपर सेजेसी अर्ज केला की चेऊलकर अदीकारी' ° व आम्ही शेरी संमधी असों चेऊलकर अदकारी व गाव्हाणकर व आमचे जांवइ दिनकरराऊ हानोलकर मेरीसमधी आहेत. साहेब दिनकरराङ यांचे जावाई ते येसा साहेवांचा निशा १ करून आपल्यावर मेहेरबान करून घेतले त्या उपर कती कोम यांचा गौरव केला की तुम्ही आपले मुलांमणि पोटीं गर्भ असेल त्या समवेत श्रीमहाक्षेत्र (मो. जा.) वा (रा) णीस जाऊन तेथील यात्रा करून तेथील मोया १२ घेऊन येणे त्याजवर जे आज्ञ करणे ते केली जाईल येसे बोलोन सवांस विडे देऊन बिदा ३ केले त्यावर कतीकोम आपले घरी जाऊन संवसार करू लागले त्यास कितेक वर्गे गेली त्या मागोन देवधर्म रक्षेण गौव्राह्मण प्रजापालण महाराज साहेबी अवतार घेऊन सकल छेत्ररथे निर्दाळून येकछेत्री राज्ये करून देवधर्माची वृद्धी वाढवून आम्हा प्रजेचें सवरक्षेण करीत असा येण्हे करून सकल जन संतोसी होऊन साहेबांचे राज्ये लक्षुमी आयुश्यं सदा सर्वदा वृद्धी होऊन साहेबांची छाया आमचे मस्तकी निरंतर असावी हे श्रीजवळ मुदा निरतर इच्छीत असो हाली किरिस्ताव कतीकोम जातीविसी साहेवांजवळ बजीद जाहाले असत हे गोष्ट आईकोन शेरीरीं कस्ट होऊन चित्त उदास जाहाले असे ते श्री (मो. जा.) साक्षे असे हे कतीकोमास कितेक मेढ्या व कितेक मुदत जाहाली हे कलत नाहीं आवासाहेबांचे अमलात देवघराहून कती कोभाची सोइरीक गोलदाज फिरगोयास दिलो होतो येसे असोन ते यात ६ जातीच्या नांवाचा अपभ्भ्रष्ट उच्चार. ७ परयेत, पर्यंत. ८ शरीर संबंध ९ सोयरोकोमुळे. १० अधिकारी. ११ खात्री. १३ साक्षर. १३ रवाना• १४ पेढया, पिढ्या. ४४ ]