शिवाजी ते शाहूपर्यंतची शुद्धीकरणाची परंपरा
१९९
श्री।
आणण्यापुर्वी मराठ्यांनी तसा प्रयत्न करावा, अशी या पत्रांत स्पष्ट विनंति आहे. "
तीन छत्रपतींच्या कारकीर्दीतील शुद्धीकरणाचे धोरण समजण्यास हे पत्र उपयोगी आहे.] ले. ४२ ।।
(श. १६५७ कार्तिक शु।। ८ नकल ,
(इ. स. १७३५ ऑक्टो. १३ श्रीमंत माहाराज राजश्री दिवाण साहेबांचे सेवेशी आज्ञाधारक सेरीकर* रयेत लोक पाठरे पांच कलसे सुभा प्रांत चेऊल सेवेसी विज्ञापना सास्ट प्रगणे यास फिरगी याने बल... करून आपली यात अधीक व्हावी म्हणोन मन्हास्ट लोक याना यातींचे जन भ्रष्ट करून किरिस्ताव केले त्या लोकांमधून आमचे यातीचे लोक च्यालीस पनास घरे बाटविली ती घरें कितेक मुदत त्याचे जातींत वर्तलीं तें कलत नाही त्यामधून दहा वीस घरे ते स्थल सोडून हे स्थल प्रान्त मजकुरी येऊन सुखवस्तीस राहिलीं कितेक दिवसांनंतर आपले पूर्व जातीत यांवे हा हेत धरून कितेक प्रकारे घालमेल वसिला उपराला करून आमचे जातीचे पदरी पडले की आम्हांस यातीत घेणे जो खर्चवेच होईल तो देऊन त्यास यातीनी अंगीकार केला नाही त्या उपर कितेक मुदत जालियावर कारकीर्द महाराज (मो. जा.२) छ्त्रपत्री साहेबांच्या राज्यांत कितेक घालमेल करून बजीद होऊन कतीकाना जातीत घ्यावे म्हणौन सनद घेतली ते प्रसंगी आमचे वडील सर्व यात समुदाव मिलोन महाराजाचे सेवेसी विज्ञाप्ती केली कीं, साहेबांची आज्ञा सिरसा आहे पर येत कती कोम ? यांचे मूल पुरुश प्रथम भ्रष्ट जाहाले होते ते जातीत घेतले असते तर कार्यास येते हाली लोम प्रतिलोम पेढी दर पेढी चालत आली त्याचे नांव व त्यांचा धर्म निराला जाहाला असतां पुर्वजातीत मिलते करून जातीस लंछेन लाऊन घ्यावे येसा अर्थ नाहीं अथप देवधर्माचे सवरक्षण करणार साहेब धनी आहेत त्याउपर महाराज साहेबी विवेक चितांत आणून हे गोस्ट अमान्ये केली. त्यास कितेक वर्शे जाहालीं यानंतर माहाराज कैलासवासी (मो. जा.) आबाहेसाबांचे सेवेसी विज्ञापना करून आज्ञापत्र घेऊन आम्हा समस्तांस हुजूर नेऊन बोली। *भागीदार. १ साहय. २ मूळ पत्रांत मोकळी जागा. ३ काकुलतीस. ४ पिढी. ५ शिवाजी.
[४३
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/228
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
