पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुवर्णं परिमाणनिधी

६७

रोखे होते व हिंदुस्थानांत २२ कोटि ३२ लक्ष रुपये किंमतीचें सोनें होतें. तें १९३१ सप्टेंबरमध्ये, इंग्लंडमधील २९ कोटि रुपयांच्या स्टर्लिंग रोख्यांचा तर अजिबात पत्ताच नाहीं, आणि हिंदुस्थानांतही फक्त ४ कोटि २१ लक्ष रुपयांचेच सोनें शिल्लक दिसतें ! जानेवारी १९२६ मध्ये इंग्लंड व हिंदुस्थानांत स्टर्लिंग राखे व सोनें मिळून जेथें ५१ कोटि ३२ लक्ष रुपये होते, तेथें सप्टेंबर १९३१ मध्ये फक्त ४ कोटि २१ लक्ष रुपयांचेच काय तें सोनें शिल्लक राहिलें ! बाकीचे ४७ कोटि ११ लक्ष रुपयांचे सोनें खलास झालें.
 कागदी चलननिघतील या ४७ कोटि ११ लक्ष रुपयांच्याच घटीवर हैं प्रकरण थांबत नसून त्यांत सुमारें ३६-३७ कोटि रुपयांची सुवर्ण परिमाण- निर्धीतील इंग्लंडमधील शिलकेंतील घटीची भर घालावी लागते; व असे एकूण ८३ कोटि ४८ लक्ष रुपयांचा या पांचसहा वर्षांत चुराडा झाला आणि त्यांत हिंदुस्थानचे सुमारे ६७ कोटि रुपयांचे ( रुपयाचा घसरता भाव १८ पेन्सावर टिकविण्याकरितां केलेल्या अट्टाहासांत ) परतीच्या हुंड्या काढाव्या लागल्या त्यांत नुकसान झालें.

सुवर्ण परिमाणनिधी

 वर सांगितल्याप्रमाणें परिमाणनिघतील शिलकेंद्र ३६-३७ कोटि रूप- यांची घट कशी आली हे आपण मागें दिलेल्या सदर निर्धाचें पत्रकावरून पाहूं. सन १९२८-२९ साली इंग्लंडमध्यें सदर निधत, इंग्लंड व साम्रा- ज्यांतर्गत वसाहती, यांचे सरकारी स्टर्लिंग रोखे ३ कोटि ७८ लक्ष ४४ हजार सहाशें चोवीस पौंडांचे होते, त्याचे ऐवजी १९३१-३२ सालांत ( २१- ९ - १९३१ ) रोजी इंग्लंडने आपल्या नाण्याचा सोन्याशी असलेला संबंध सोडला व रुपया स्डलिंगशी जोडण्यांत आला त्यावेळी ) १ कोट ६ लक्ष ९४ हजार सहाशें सदतीस पौंडांचे रोखे शिल्लक होते, म्हणजे २ कोटि ७१ लक्ष ४० हजार दोनशें एक्याऐंशी पौंडाचे रोखे होमचार्जेसचे खर्चाकरितां व परत हुंड्या वटविण्याकरितां कागदी चलननिर्धातील रोख्यांचे जोडीला विकले गेले. ( १८ पेन्सास १ रुपया या दरानें,सुवर्ण