पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास
सुवर्ण संचयांत घट

 परंतु आपणांस वरील पत्रकांतील डिसेंबर १९२१ मधील दिलेल्या आंकड्यावरून असें दिसून येतें को, १९२० जानेवारींत जेथें इंग्लंडमध्यें ९४ कोटि १२ लक्ष रुपयांचे रोख सोनें व स्टर्लिंग रोखे मिळून होतें, तेथें आता फक्त ५ कोटि ८५ लक्ष रुपये किंमतीचे स्टर्लिंग रोखेच शिल्लक आहेत. तेव्हां ८८ कोटि २७ लक्ष रुपयाचें सोनें व स्टर्लिंग रोखे गेले कोठें ? तसेंच हिंदुस्थानांतील सोन्याचा सांठाही सुमारे ११ कोटि रुपयांनी घटलेला दिसतो याचें कारण काय ?
 पहिला प्रयोग - १९२०-२१ सालांत रुपयाचा भाव २४ पेन्सावर कायद्याने कायम करण्यांत आला, परंतु चांदीचा भाव घसरू लागल्यामुळे रुपयाचा भावही घसरूं लागला व तो १५-१६ पेन्सापर्यंत खालीं गेलेला भाव २४ पेन्सा- वर टिकविण्याचा सरकारनीं जो अट्टाहास केला त्यांत 'रिव्हर्स कौन्सिल बिल्स' ( परत हुंड्या) काढून हा सुवर्णाचा संचय फस्त केला गेला, व यांत हिंदु- स्थानचे सुमारें ३५ कोटि रुपयांचे नुकसान झालें; फायदा सरकारचे भाई- बंदांचा झाला, व शेवटीं रुपयाचा भाव २४ पेन्खावर टिकविण्याचा प्रयत्न पांचसहा महिन्यांतच हताश होऊन सरकारास सोडून द्यावा लागला हैं आपण मार्गे पाहिलेच आहे.
 दुसरा प्रयोगः -- वरीलप्रमाणे रुपयाचा भाव २४ पेन्सावर टिकविण्याच प्रयत्न करण्यांत आलेल्या अपयशावरून सरकारने घडा न घेतां पुन्हां १९२६-२७ साली रुपयाचा भाव १८ पेन्स कायद्यानें कायम करण्यांत आला, व त्याचा परिणाम कसा अनिष्ट झाला हे वरील पत्रकांतील मार्च १९२६ व सप्टेंबर १९३१ ( २१-९-१९३१ रोजी इंग्लंडने आपल्या चलनाचा सोन्याशी असलेला संबंध सोडला व रुपयाचाही सोन्याशीं अस- लेला संबंध सोडून त्याचें नातें कागदी पौंडाशी जोडण्यांत आलें, त्यावेळीं ) या महिन्यांतील कागदी चलननिधातील आंकडे व सुवर्णपरिमाण निधि- सील आंकडे पाहिले असतां दिसून येईल.
 मार्च १९२६ मध्ये कागदी चलननिधीमध्ये २९ कोटि रुपयाचे स्टर्लिंग