पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

परिमाण निर्घातील विकलेल्या स्टर्लिंग रोख्यांची किंमत ३६ कोटि १९ लक्ष ८७ हजार ८० रुपये होतात. ) या शिवाय १९२९-३० साली बँक ऑफ इंग्लंडकडे या निर्धीत ३७४८ पौंड रोकड शिल्लक होते ते १९३१ ३२ सालीं फक्त २९ पौंड शिल्लक राहिले म्हणजे यांतही सुमारें ५०००० रुपये कमी झाले.
 सदर पत्रकांत १९३१-३२ सालांत २ कोटि ७१ लक्ष ५३ हजार पौंड किंमतीचे सोनें हिंदुस्थानांत शिल्लक असल्याचे दाखविले आहे. तें सोनें १९३१ सप्टेंबर नंतर ज्यावेळीं येथून सोनें परदेशीं सपाटून जाऊं लागळें त्यावेळी हिंदुस्थान सरकारनें येथें विकत घेऊन ठेवले. १९३१ सप्टें- बरचे अगोदर सदर निर्धातील स्टलिंग रोखे वर सांगितल्याप्रमाणें विकावे लागले होते.

हिं स्थानांतील खेळत्या चलनाचें प्रसरण व आकुंचन.

 आतां आपण खेळत्या चलनाचें प्रसरण व आकुंचन याविषयी थोड़ा विचार पुढील प्रकरणांत करूँ:-