पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कौन्सिल बिलें व रिव्हर्स कौन्सिल बिले

४९

हुड्यांच्या संबंधाने कायम असतात. तिसरी व्यक्ति म्हणजे व्यापारी वर्ग होय.
 स्टेट सेक्रेटरी हुंड्या कां काढतो ? - त्याला पैसे पाहिजे असतात म्हणून. हे पैसे त्याला कां लागतात १ होमचार्जेसकरितां, म्हणजे स्टेट सेक्रे- टरीचे कचेरीचा खर्च, हिंदुस्थानकरितां इंग्लंडमध्ये उभारलेल्या कर्जावरील व्याज देणें, सिव्हिल सर्व्हेटस्ची ( सनदी नोकर ) पेन्शनें वगैरे कारणाकरितां त्यास दोन ते तीन कोटि पौंडाचे आसपास वार्षिक खर्च करावा लागतो. याकरितां त्यास पशाची जरूर असते. आतां हिंदुस्थान सरकारावरच या हुंडा कां काढावयाच्या १ तर हा पगार देण्याची जबाबदारी : हिंदुस्थान सरकारावर आहे म्हणून.
 आतां या हुंड्या विकत घेणारे व्यापारी कोण ? हिंदुस्थानांतून जो माल इंग्लंडला जातो त्याचे पैसे तो मागविणाऱ्यांना इकडे पाठवावयाचे असतात. हे लोक हीं कौन्सिल बिलें म्हणजेच सरकारी हुंडया विकत घेतात, कारण रोख पैसे पाठविण्यापेक्षां हुंड्या घेऊन पाठविणे त्यांस सोयीचें पडतें. वरील हुंड्या विकत घेऊन त्या हे विलायतचे व्यापारी ज्यांच्याकडून माल मागविला असेल त्यांच्याकडे हिंदुस्थानांत पाठवितात. मग हिंदुस्थानांतील व्यापारी त्या हुंड्या हिंदुस्थानसरकारवर लागू करतात. हुंडी पाहतांच येथील सरकार हुंडीचे पैसे येथील व्यापान्यांस देतें. हे पैसे विलायतेंत हिंदुस्थान सरकाराकरितां खर्च केले जातात, म्हणून ते हिंदु- स्थानचे तिजोरीतून दिले जातात. हिंदुस्थान सरकारचे तिजोरीत पैसे कोठून येतात ? अर्थात हे पैसे येथील लोकांकडून करांच्या रूपानें सरकारी तिजोरींत आलेले असतात. यावरून आपल्या ध्यानांत एक गोष्ट आली असेल की, कौन्सिल बिल्सचा प्रकार हिंदुस्थानच्या विशिष्ट राजकीय परि स्थितीमुळे उत्पन्न झाला आहे, दुसन्या कोणत्याही देशांत अशी स्थिती नाहीं. वसाहती व इंग्लंड यांच्यामधील जुजबी व्यवहार पेढ्यांच्या मार्फत होत असतो. म्हणजे एखाद्या वसाहतीला ब्रिटिश सरकारास पैसे पाठवा - वयाचे असले तर वसाहत सरकार तेथील बँकेची बिले विकत घेऊन तों इंग्लिश सरकारकडे पाठवितें, हुंड्या विकण्याचें व विकत घेण्याचे काम पेढ्या करितात आणि पेढ्यांकडून व्यापारी व्यक्तिशः त्या विकत घेतात.
 व... ४