पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण तिसरें
"कौन्सिल बिलें, व रिव्हर्स कौन्सिल बिले"

 आपली हल्लीची चलनपद्धती, म्हणजे ना धड रौप्य चलनपद्धति ना सुर्वण चलनपद्धति, तर जीस सुवर्ण विनिमय मापन पद्धति म्हणतात, ती आहे. रुपये हैं उपनाणें ( Token coin) असून त्याचा सोन्याशी ठरीव संबंध कायम राखणें हा या चलन पद्धतीचा आत्मा आहे. हें कार्य कसें घडवून आणलें जाते हैं समजणें आवश्यक आहे. याकरितां हिंदी चलन पद्धतीला वैशिष्ट्य म्हणून गाजलेला प्रकार म्हणजे कौन्सिल बिलें व रिव्हर्स कौन्सिल बिलें, याविषयीं आतां आपण थोडक्यांत विचार करूं.
 इंग्लंडमध्यें सेक्रेटरी ऑफ स्टेट ( भारतमंत्रो ) म्हणून जो अधिकारी असतो त्यास सल्लागार मंडळ दिलेले आहे. या मंडळास इंग्रजीत " कौन्सिल " असे म्हणतात. या कौन्सिलने काढलेलीं जीं बिलें त्यांस कौन्सल बिलें म्हणतात. बिल म्हणजे हुंडी. यास आपण सरकारी हुंडी असे म्हण.
 हुंडी म्हणजे तिसन्या माणसास अमुक रुपये देण्याबद्दल एका माणसानें दुसन्या इसमास लिहिलेले पत्र, अर्थात् हुंडी म्हटली म्हणजे तेथे तीन माण- सांचा संबंध येतो. पत्र देणारा, ज्याच्या नांवानें पत्र दिलें असेल तो, व ज्याला पैसे द्यावयाचे असतील तो. वरील प्रकारांत ( कौन्सिल बिलांत) स्टेट सेक्रेटरी हा हिंदुस्थान सरकारवर हुंड्या काढतो; म्हणजे स्टेट सेक्रेटरी हिंदुस्थान सरकारास असें लिहितो कीं, तुम्ही अमूक इसमास : अमुक रुपये द्या. तेव्हां स्टेट सेक्रेटरी व हिंदुस्थान सरकार या दोन व्यक्ति सरकारी