पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चेक म्हणजे काय ?

१९

व इलेक्ट्रिक कंपनीनें तो चेक आपले खात्यावर जमा करण्याकरितां बँकेत पाठविला.
 'क्ष'र्ने भुसांराच व्यापाप्यास. दिलेला ५० रुपयांचा चेक दुकानाचा मालक, कापड दुकानदार व इलेक्ट्रिक कंपनी इतक्या लोकांचे हातांत खेळून शेवटीं बँकेत जमा होणेस गेला, या व्यवहारांत बँकेस सदर चेकचे पैसे द्यावे न लागतां, इतक्या लोकांच्या देण्यायेण्याची वजावाट परभारेंच झाली व " क्ष" चे पैसे बँकेस निर्वेध वापरणेस सांपडले, अशा रितीनें चेकचे उपयोगानें चलनाची बचत होते. या व्यवहारांत चेकचा संबंध नसतां ठर ५० रुपयांच्या चलनी नोटा अगर रोकड रुपये यांचा उपयोग करावा लागला असता; तो करावा न लागतां तें काम चेकनें केलें म्हणजे या चेकनें चल- नांत ५० रुपयांची भर घातली असें दिसून येईल. चेक प्रमाणेच व्यापारी हुंड्यांचाही उपयोग राष्ट्रीय चलनांत भर घालणेकडे होतो हे आपण मागें पाहिलेच आहे. हल्लींच्या सुधारलेल्या जगांत राष्ट्रहिताचे दृष्टीनें 'बँकिंग' या संस्थेस विलक्षण महत्व प्राप्त झाले आहे.
 बँकिंगचें महत्वः– समाजांतील सर्व वर्गाचा चरितार्थ नीट चालावा, एवढ्यासाठी राष्ट्रामध्ये संपत्तीचें उत्पादन, चलन, विनिमय आणि विभा- गणी ही समाधानकारक रीतीने होणे आवश्यक आहे. सध्याच्या यांत्रिक युगांत तर भांडवलावांचून, आणि तें मोठ्या प्रमाणांत असल्यावांचून एकही पाऊल पुढे पडेनासें झालें आहे. आधुनिक कालांत भांडवल, क्रेडिटच्या किंवा चलनाच्या स्वरूपांत वापरावें लागते. लोकांनी आपल्या कमाईतून संपत्तीची, बचत शक्य तितक्या कार्यक्षम पद्धतीने जास्तीत ज्यास्त उपयोग करून घेण्यावरच समाजाची आर्थिक स्थिती बरोवाईट असणें पुष्कळ अंशांनीं अवलंबून रहाणार हैं क्रमप्राप्तच आहे. है सर्व बँकिंग संस्था कशी करूं शकते हें पाहणे हा एक स्वतंत्र निबंधाचाच विषय असलेमुळे हा विषय सोडून आपण आतां हुंडणावळ म्हणजे काय याचा विचार करूं.

हुंडणावळ ( Exchange )

 आपल्या सर्वच गरजा भागविणेकरितां लागणाऱ्या जिनसांचे उत्पादन आपापल्या देशांतच करण्याइतपत सर्वच देशांत त्यांच्या