पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
हिंदी वनपद्धतीचा इतिहास

कशी उत्पन्न करितात हे आपण पाहिले; याशिवाय देशांतील सर्वच लहान मोठ्या बँकांत जमा होणाऱ्या रकमांचे तीन वर्ग असतात, पहिला वर्ग मुदत- बंद ठेवींचा, दुसरा वर्ग सेव्हिंग्ज डिपॉझिटस्चा व तिसरा वर्ग चालू खात्यावरील खातेदारांनीं ठेवी ठेविलेल्या असतात. सदर ठेवी ठेवणारे खातेदार आपणास एखाद्याचें देणें असल्यास भापल्या ठेवींपैकी कांहीं रक्कम सदर देणेदारास द्यावी असा आपले बँकेस लेखी हुकूम देतात, व ती बँक सदर रक्कम लेखी हुकुमांत नमूद केलेल्या व्यक्तीस देते. या लेखी हुकमासच व्यवहारांत 'चेक' असें म्हणतात. बँका आपले खातेदारास ही जी सवलत देतात, त्यामुळे सदर चेकचा विनिमय साधन म्हणून व्यवहारांत उपयोग होतो, व अशा रीतीनें राष्ट्रीय चलनांत भर घालणेचें कार्य देशांतील सर्वच लहान मोठ्या बँका करितात, हें कसें होतें याची स्पष्ट कल्पना खालील उदाहरणावरून येईल. उ० 'क्ष' नें एका भुसार मालाचे व्यापाऱ्याकडून ५० रुपयांचे तांदूळ आणले. 'क्ष' ची येथील एका बँकेत चालू खात्यावर कांही रक्कम आहे म्हणून 'क्ष' नें भुसाराचे व्यापान्यास तांदुळाबद्दलचे देणें असलेल्या ५० रुपयाचे रकमेचा चेक सदर बँकेवर दिला. म्हणजे " माझे खात्यावर जमा असलेल्या रकमेपैकी रक्कम रुपये पन्नास सदर अ ब क " यांस देणें, " असा बँकेस हुकूम केला. या भुसाराचे व्यापायास दुकानाच्या भाड्याबद्दल दुकानाचे मालकास कांहीं रक्कम देणें होती त्यांत हा ५० रुपयाचा चेक, दुकानचें मालकाचें नांव चेकचे मागील बाजूस लिहून आपली सही करून दिला.
 वरील दुकानाचें मालकास, घेतलेल्या कापडाबद्दल कापड दुकान • छारास कांहीं पैसे देणें होते, त्याकरितां त्याने भुसाराचे व्यापायांकडून दुकान भाड्याबद्दल आलेला ५० रुपयाचा चेक मार्गे सांगितल्याप्रमाणे, चेकचे मार्गे कापड दुकानदाराचें नांव लिहून आपली सही करून दिला. या कापडाचे दुकानदारास, त्यानें वापरलेल्या विजेच्या प्रवाहाबद्दल इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीस बिल भरणें होतें, तें बिल हा चेक, इलेक्ट्रिक कंपनीचें नांव लिहून व आपली सही करून इलेक्ट्रिक कंपनीस देऊन बिल चुकते केलें,