पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास

भौगोलिक रचनेनुसार अनुकूलता असतेच असे नाहीं; तेव्हां दळणवळणाच्या साधनांच्या सुधारणेबरोबर रष्ट्राराष्ट्रांतील कच्च्या मालाच्या व धान्याच्या अगर पक्क्या मालाच्या देवघेवीस सुरुवात झाली, तेव्हां राष्ट्राराष्ट्रांतील देणीं-येण चढविगेच्या बाबत हुंडणावळ प्रचारांत आली. अर्थात् परराष्ट्रीय हुंडणावळ म्हणजे एका देशाच्या मुख्य नाण्याचे दुसऱ्या देशाच्या मुख्य नाण्याशी असलेल्या किंमतीचे प्रमाण होय.

हुंडणावळीचे स्थैर्याची आवश्यकता.

 कोणीहि व्यापारी एका देशांतील माल दुसन्या देशांत पाठविण्यास किंवा दुसऱ्या देशांतील माल आपल्या देशांत आणण्यास सिद्ध होण्यापूर्वी आपणांस तसे करण्यांत कांहीं नफा उरेल किंवा नाहीं याचा अगोदर विचार करील. त्यांत कांहीं नफा आहे असे दिसून आल्यासच वरील व्यवहार कर- ण्यास प्रवृत्त होईल; हे उघड आहे.
 आपणास या व्यवहारांत नफा होईल किंवा नाहीं, हे समजण्यास त्यांस परदेशांतील व आपले देशांतील कायदेशीर चलनांचे एकमेकांशी असलेलें प्रमाण माहीत पाहिजे; व तें प्रमाण स्थिर राहील अशी खात्री असली पाहिजे. नाहीतर १९२१ साली हिंदी १० रुपयांस इंग्लिश १ पौंड असा या दोन देशांमधील चलनांचा संबंध होता, म्हणून इंग्लंडहून दहा हजार पौंडांची यंत्रसामुग्री मागविली असतां आपणास एक लाख रुपयांस येथे येऊन पडेल, ( वाहतुकीचा खर्च निराळा ) असा हिशोब घालून एक लाख रुपयांची व्यवस्था करून ठेऊन इंग्लंडहून दहा हजार पौंडाची यंत्रसामुग्री मागविणारे गिरणीवाल्यास ती यंत्रसामुग्री पुढे वर्षदीड वर्षांनी येथे येऊन पडल्यावर इंग्लंडला दहा हजार पौंड पाठविण्याकरितां शेवटी एक लाख रुपयांचे ऐवज एक लक्ष वीस हजार, एक लक्ष चाळीस हजार, एक लक्ष साठ हजार पर्यंत रुपये पाठविण्याची पाळी आली कारण त्या वेळी रुपयाचा भाव चांदीचे भावावर हेलकावे खात ठेविला होता; म्हणून पूर्वीचे दहा हैं प्रमाण चढत चढत एक पौंडास १२, १४, १५, १६ रुपयांपर्यंत गेले होते. इतर सर्व धातूंपेक्षां सुवर्ण हैं भावांत अधिक