पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४]

 रा. य. वा. लोहोकरे यांनी लिहिलेले ' हिंदी चलनपद्धतीचा इतिहास ' हैं पुस्तक वाचून पाहिलें. लोकशाहीच्या युगांत सामान्य सुशिक्षित माण- सासही स्वदेशाच्या आर्थिक परिस्थितीची थोडीबहुत कल्पना असणे जरूर असते. आर्थिक परिस्थितीचा विचार करतांना, अर्थात् इतर गोष्टीबरोबर स्वदेशाचा परराष्ट्रीय व्यापार व त्या व्यापारास दिलेल्या सवलती अगर त्यावर लादलेली बंधने ह्याकडेही लक्ष द्यावें लागतें. तसें करतांना चलन पद्धती व हुंडणावळ ह्या प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. रा. लोहोकरे यांनी ह्या दृष्टीनें इष्ट असा प्रयत्न केला आहे; व तो चांगला साधला आहे. पुस्तकाची भाषा सोपी व सरळ असून विषय प्रतिपादनाची पद्धतीही चांगली आहे, स्वभाषेत लिहिलेली अशा प्रकारचीं पुस्तकें निर्माण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेही रा. लोहोकरे यांची कृति स्तुत्य होय, चलन, हुंडणावळ ह्या गोष्टी क्लिष्ट आहेत, परंतु रा. लोहोकरे यांच्या पुस्तकाच्या साह्याने जिज्ञासू वाचकांचा ह्या विषयांत सुलभतेनें प्रवेश होईल. दुय्यम शाळा व प्रायमरी ट्रेनिंग कॉलेजे यांच्या वाचनालयासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. रा. लोहोकरे यांच्या हातून अशा प्रकारचीं लिखाणें आणखी निघोत असें इच्छितो.

३१९ शनिवार पुणे
ता. १४-४-३८

प्रो. शं. रा. कानिटकर एम्. ए. ( हेडमास्तर, मॉडर्न हायस्कूल पुणे व (माजी चेअरमन स्कूल कमेटी, म्युनिसिपल कमेटी पुणें. )

______

 सोलापूरचे श्री. य. वा, लोहोकरे यांनी लिहिलेलें हिंदी - चलन - पद्धतीचा इतिहास हैं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी मला त्यांनीं दाखविलें याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. या पुस्तकांत केवळ हिंदी चलनपद्धतीचा इतिहासच नसून चलन, बँका, मध्यवर्ति बँका, कागदी चलन, हुंडणावळीचा दर या संबंध तात्विक चर्चाही आहे. व तात्विक चर्चेच्या पार्श्वभागावर इतिहासाची मांडणी केली असल्यामुळे तो विषय अधिक स्पष्ट होण्यास