पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३]

की प्रत्येक मनुष्यास तो अर्थशास्त्री नसला तरी त्याचा विचार करणे भाग पडले आहे.
 अशा विचारास सुलभ रीतीनें लिहिलेल्या पुस्तकांचा अतिशय उपयोग होतो. ही पुस्तकें तज्ज्ञांनी लिहावी हैं उत्तम एवढेच नव्हें त्यांनीच लिहावी; हैं त्यांचे कर्तव्य होय. रा. लोहोकरे यांचा प्रयत्न हौशीचा पण कळ- कळीचा आहे. ते आपली गणना तज्ज्ञांत करीत नाहींत आणि तें योग्यच आहे.
 पुस्तक वाचून त्या एका कठिण विषयाची पुष्कळ सुलभ व थोडक्यांत मांडणी करण्याचे काम रा. लोहोकरे यांस बरेंच यश मिळालें आहे असे मला वाटतें. रा. लोहोकरे म्हणतात त्याप्रमाणें ब्रिटिश राज्याचें व सत्तेचे धोरण ब्रिटिश हितावर नजर देऊन चालावें यांत वावगे तर कांहीं नाहीं परंतु आश्चर्यही नाहीं. परदेशांची कविजात कोणी परो- पकारासाठी करतो असें मानणें म्हणजे मानवी इतिहासांस विसरणें होय. मात्र अशी खोटी माया जेव्हां निर्माण होतें तेव्हां तिचा निषेध दृढनिश्व- यानें करावा लागतो. नुसत्या दृढनिश्चयानें भागत नाहीं. हा मायाभास शास्त्रीय रूपानें पुढें येतो तेव्हां शास्त्रीय भूमिका स्वीकारूनच तोंड द्यावें लागतें. हिंदी अर्थतज्ज्ञांनी आजवर अनेक वर्षे हिंदी बाजू मांडली आहे. संशोधन मात्र केलें नाहीं. परंतु ही बाजू ही सरकारासमोर मांडली, लोकां- समोर नाहीं. रा. लोहोकरे यांनी वरील सुलभ पुस्तकांत हुंडणावळीच्या प्रश्नांची हिंदी बाजू मराठीत समजावून दिली आहे. तीत विरुद्ध बाजूचें खंडण शास्त्रीय पद्धतीने केलेले नाहीं. फक्त हिंदी तज्ज्ञांचे म्हणणे सोप्या भाषेत मांडलें आहे. या ग्रंथाच्या वाचनानें व्यापारी शिक्षक व नवे नवे प्राथमिक अर्थशास्त्राचें विद्यार्थि यांस हा विषय समजण्यास व पुढे अभ्यास- ग्यास चांगलें साहाय्य होईल. या लहान ग्रंथांवरून मोठ्या ग्रंथावर वाचकानें गेले पाहिजे. म्हणजे त्यांचे कार्य झालें. संवाद पद्धतीनें ग्रंथ अधिक सोपा झाला असता शिवाय वाक्यें व मांडणी कोठें कोठें अजूनही सोपी व स्प करावयास हवी आहे.

चैत्र शु. १३ - शके १८६० पुणे
ता. १२-४-३८

प्रो. दत्तो वामन पोतदार BA.