पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५]

मदत झाली आहे. श्री. लोहोकरे यांनीं प्रारंभी दिलेले वर्तमानपत्री कात्रणांचे व इतर ग्रंथांचे संदर्भ लक्षांत घेतां त्यांच्या व्यासंगी व उद्योगी स्वभावाची कल्पना येते. व या विषयावर स्वतः श्रम करून संपादन केलेली तज्ज्ञता त्यांना खचित कौतुकास्पद आहे. चलन विषयक प्रश्नांचे जागतिक स्वरूपच अलीकडे पालटत आहे.
 ( सुवर्णचलनाच्या शक्यतेसंबंधी ) लोक सांशक आहेत. सुवर्ण हैं परिमाण म्हणून उपयोगिलें तरी चलन म्हणून उपयोगू नये असे पुष्कळांस वाटू लागले आहे. ' क्वाँटिटि थिअरी ऑफ मनी' पूर्वी सर्वसंमत असें आतां अधिक परिशीलनानें तिच्यावर अनेक आक्षेप निघालेले आहेत. )
 ही चलनाच्या प्रश्नाची अद्ययावत् बाजू या पुस्तकांत येऊ शकली नसली तरी मराठी वाचकांची या प्रश्नासंबंधीची पहिली मनोभूमिका तयार करण्यास हें पुस्तक निःसंशय उपयोगी पडेल असें माझें मत आहे.

पुणे ता , ९-४-३८

प्रो. रा. वि. ओतूरकर एम्. ए.

_____
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास [ किंमत १२ आणे. ]

 हिंदुस्थानांतील चलन व हुंडणावळ या बाबतचें धोरण परकीयांच्या दात राहिल्यानें आपली आर्थिक परिस्थिति सुधारत नाहीं. यासंबंध सामान्य जनतेस विशेषशी माहिती नसते. अशा तन्हेची थोडीबहूत तरी माहिती होण्यासाठी हे पुस्तक श्री. लोहोकरे यांनी लिहिले आहे. हात घेतलेल्या या महत्त्वाच्या विषयाचे विवेचन त्यांनी सोप्या सुटसुटीत रीतीनें केले आहे. या विषयाच्या मुळाशी असलेलीं सामान्य आर्थिक तत्त्वें आणि हिंदी चलनपद्धति यांची त्यांनी यथार्थ माहिती दिली असून, त्यासंबंधीचें विवेचन सविस्तर व मार्मिक रीतीने केले आहे. आर्थिक विषयाच्या ज्ञानाचा प्रसार होण्यास या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल.

'गोरक्षण' पुणे.