पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अभिप्राय

 रा. लोहोकरे यांचे ' हिंदी चलन पद्धतीचा इतिहास ' हैं पुस्तक वाचलें. या विषयावर मराठीत अगदी बोटावर मोजण्याइतकच पुस्तकें आजतागायत लिहिली गेली आहेत. रा. लोहोकरे यांचे पुस्तकामुळे मराठीतील चलन- विषयक ग्रंथसंपत्तीत चांगली भर पडली हें निःसंशय आहे. अलिकडील पद्धतीबाबत वर्णन करण्याचे आधी बरीचशी ऐतिहासिक माहिती दिलेली असून, हुंड्या, कौन्सिल व रिव्हर्स कौन्सिल बिले व आपल्या चलन पद्धतीचें नियंत्रण करण्यांत अवलंबिलेल्या इतर युक्त्या प्रयुक्त्या यांचें सांगोपांग विवे- चन केले असल्यामुळे विषय अनभिज्ञासही समजण्याची चांगली सोय झाली आहे. पुस्तक लहानच असले तरी ठिकठिकाणी आंकड्यांचे तक्ते जोडण्यांत आले आहेत. याप्रमाणें थोडक्यांत पण पद्धतशीर असें विवेचन करण्याचा प्रयत्न पुस्तकांत झाला आहे व तो चांगला साधला आहे. पारिभाषिक भाषा अजून मराठीत स्थिरावली नसल्यामुळे या बाबत कांहीं ठिकाण अडचण भासते पण हा दोष ग्रंथकर्त्यांचा नाहीं. असल्या किचकट विषयावर परिश्रमपूर्वक ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केल्याबद्दल रा. लोहोकरे हे अभिनंदन नास पात्र आहेत. ग्रंथास लहानशी आधारभूत ग्रंथांची यादी जोडली हा उपक्रमही योग्य आहे.

प्रि. ध. रा. गाडगीळ एम्. ए. ( केंब्रिज)
( गोखले इन्स्टिटयूट पुर्णे )

____

 श : यशवंत वासुदेव लोहोकरे यांनी लिहिलेल्या " हिंदी चलन पद्धतीचा इतिहास " या पुस्तकाचे हस्तलिखित त्यांनी मला वाचून दाखविलें होतें; आणि तें पुस्तक आतां छापून प्रसिद्ध केलें जात आहे याबद्दल मला फार