पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ २ ]

संतोष वाटतो. हिंदी चलन हा विषय अवघड आणि गुंतागुंतीचा असून तो सुलभ करून सांगण्यांत रा. लोहोकरे यांनीं विशेष कौशल्य प्रकट केलें आहे. मराठीत या विषयावर लिहिलेली पुस्तकें थोर्डी आहेत; या दृष्टीनें रा. लोहोकरे यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. हिंदी चलनाचे प्रश्न अर्थ- शास्त्रांतर्गत असले तरी त्यांस बन्याच प्रमाणांत राजकीय प्रश्नांचे स्वरूप प्राप्त झालेलें आहे हें या पुस्तकाच्या वाचनानें स्पष्ट कळून येईल. हिंदु- स्थानची प्रजा व हिंदुस्थान सरकार हे दोन पक्ष तर चलनविषयक वादांत दिसतातच, पण त्याबरोबर ब्रिटिश सरकार ( व तदंगभूत ब्रिटिश व्यापारीवर्ग ) हा तिसरा आणि सर्वोत बलिष्ठ असा पक्ष या वादांत नजरे- समोर येतो. हिंदुस्थानसरकारच्या पक्षापेक्षांही दा विलायत सरकारचा तिसरा पक्ष अनेक वेळां हिंदुस्थानच्या प्रजेच्या मताविरुद्ध दागल्यामुळे तें हिंदुस्थानांतील असंतोषाचे एक महत्त्वाचें कराण झालेलें आहे हें सदर पुस्तक वाचल्याने चांगले लक्षांत येईल. हिंदुस्थानाला आर्थिक स्वायत्तता मिळाल्याखेरीज खरे स्वराज्य मिळालें असें म्हणतां येणार नाहीं व देशाचा भाग्योदय होणार नाहीं हा ग्रंथकर्त्याचा निष्कर्ष निरपवाद आहे.

सोलापूर,
ता. ९

गो. प. पटवर्धन

____
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

 वरील ग्रंथ अर्थशास्त्राचा आहे. आणि त्यावर मी अभिप्राय देणें अनर्थ ' च होईल. म्हणून हा अभिप्राय अर्थशास्त्र सोडून शिक्षणशास्त्राच्या दृष्टीनें लिहिला आहे. आज सर्व व्यवहारचक्रानें इतकें पक्के जखडलें गेलें आहे की आपण जे खातों, पितों, जगत् आर्थिक पांघरतो, वापरतो, त्या सर्व क्रियांचा संबंध व परिणाम सर्व जीवनावर प्रबळपणें होत आहे. राष्ट्रांच्या व समाजाच्या स्वातंत्र्य, सत्ता, सुखादे अव- स्थांवर या आर्थिक चक्राचे फेरे इतक्या बळकटपणे पकडून बसलेले आहेत