पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ४ ]

विषयक धोरण परकीय सत्तेमुळे या देशाच्या नुकसानीस कसें कारणीभूत होत आहे, हें समजूत घेण्यास प्रवेशिका या नात्याने या पुस्तकाचा चांगलाच उपयोग होण्याजोगा आहे. अलीकडल्या राजकारणांत चलन व हुंडणावळ या विषयांचा अभ्यास अत्यंत आवश्यक असल्यामुळे जिज्ञासू, अभ्यासू व सार्वजनिक कार्यात भाग घेण्याची इच्छा असणान्या सर्व नागरिकांना पुस्तक वाचावें व संग्रही ठेवावें अशी शिफारस करण्यास मला कोणत हरकत वाटत नाहीं.

सोलापूर, ता. १८/२/३८.

डॉ. कृष्णाजी भिमराव अंत्रोळीकर.
M. L, A. Bombay•