पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
होमचार्जेस

८९

हैं भासवणे शक्य झाले; व इंग्लंडला प्रतिवर्ष पौंडांत पाठवाव्या लागः णान्या होमचार्जेसकरितां द्याव्या लागणा-या रुपयांच्या संख्येत, कृत्रिम रीतीने चढीची हुंडणावळ ठेवल्याने बचत होते. अशी सबब पुढे करून इंग्लंडच्या पक्कया मालाला येथील बाजारपेठ निर्वेध ठेवणे व येथील कुन्। माल व धान्य इतर देशांतील भावाचे मानाने इंग्लडला. स्वस्त, मिळणे. हे उद्देश सिद्धीस नेतां आले. परंतु असे करण्य,त हिंदी जनतेचे प्रत्यक्ष, उ अप्रत्यक्ष असे सुमारे ९२५ कोटि रुपयांचे नुकसान झाले, ते कसे याचा थोड़ाधिक खुलासा केला पाहिजे.
 होमचार्जेसैकारतां प्रतिवर्षी पाठवाव्या लागणा-या रकमेकरितां १८७३ सालापासून १८९३ सालापर्यंत चांदीचा भाव घसरू लागल्यामुळे अधि: काधिक रुपये लागू लागले. त्यामुळे या २० वर्षांत सुमारे ८५ कोटि रुपयांचे आसपास हिंदुस्थानसरकारच्या बजेटमध्ये, तूट आली., हैं नुकसान लोकांस उघड उघड दिसण्याजोगें होतें. ( पण परराष्ट्रीय उतरत्या हुंडणावळीमुळे हिंदी शैतकन्यास त्यांच्या धान्यास व कच्च्या मालास चांगलाच भाव आल्यामुळे एकूण हिंदी जनतेचा या उतरत्या हुंडणावळीमुळे फायदाच झाला. नुकसान झाले ते गोच्या नोकरवर्गाचे व गोन्या भांडवलदार लोकांचं.) तेव्हां हिंदुस्थानचे असें नुकसान होते ते कमी करण्याचा बहाणा करून १८९३ साली लोकांनी चांदी नेऊन दिल्यास सरकारने टांकसाळींतून रुपये पाडून देण्याची जनतेस असलेली सृवलत रद्द करून तेव्हांपासून परराष्ट्रीय हुंडणावळ विषयक धोरणांत कृत्रिमपणा आणला गेला. व होमचार्जेसकरितां खर्च कराव्या लागणा-या रुपयांच्या संख्येत, कृत्रिम रीतीने चढीची हुंडणावळ ठेऊन बचत करण्यांत आली खरी; परंतु या कृत्रिम पद्धतीमुळे अप्रत्यक्ष नुकसान किती झाले हे जनतेच्या लक्षात येणे कठीण जाते. ते नुकसान ( हिंदुस्थानला इंग्लंडचे देणे अस* लल्या कर्जाची छाननी करण्याकरितां राष्ट्रीय सभेने नेमलेल्या समितीने आपल्या प्रतिवृत्तास जोडलेल्या परिशिष्टांत दिलेल्या आंकड्यावरून) खालीलप्रमाणे झाल्याचे अंदाजले आहे.