पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास


हुंडणावळीचा भाव १८ पेन्सावर टिकवून धरण्याकरितां हिंदुस्योनांतून होणान्या सोन्याच्या निर्गतीवर इतर देशाप्रमाणे निर्बंध घातलें नाहींत, अर्से 'तज्ज्ञांचे मत आहे.
 टेरी साहेब आपल्या ग्रंथांत म्हणतात की मोगल बादशहांनी सोने व चांदी परदेशीं पाठविणें हा गुन्हां ठरविला होता व त्या गुन्ह्यास फाशीची शिक्षा ठेवली होती. ( The moghul kings made it a crime not less than capital to export gold and silver ) यावरून मोगल राजघराण्यांचा अंमल इंग्रजांच्या अमलाप्रमाणें हिंदुस्थानच्या आर्थिक अधोगतीस कारणी भू झाला नाहीं. याचे कारण मोगल राजवराणे येथें राज्य स्थापन करतांच आपल्या परिवारासह हिंदुस्थानांतच येऊन राहिले व या देशासच आपली मायभूमि समजूं लागलें. त्याचप्रमाणे त्यांचा नोकरवर्गही येथेंच कायम येऊन राहिला. त्यामुळे येथून परदेशी प्रतिवर्षी ' होम चार्जेस' या सदरा- खाली पैसे पाठविण्याचा प्रश्न नव्हता. तसेंच त्यांचा आपल्या मायभूमीश व्यापार विषयक आपलेपणाचा असा संबंध कांहींच नव्हता.( कारण त्यांचा पूर्वीचा देश हिंदुस्थानपेक्षां मागासलेला होता. ) त्यामुळे त्यांच्या अमदानींत येथील चलन व हुंडणावळ विषयक विशिष्ट व कृत्रिम असें घोरण त्यांनी ठेविलें नाहीं. व त्यामुळे त्यांचे अमदानीत हा देश भिकेसही लागला नाहीं.

होमचार्जेस

 परंतु ब्रिटिश अमदानीत, परिस्थिती याच्या अगदी उलट ब्रिटिश लोक येथें पहिल्यांदा आले ते व्यापाराकरितां आले, व तत्कालीन येथील परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यसूत्रे आपल्या हातांत घेऊन आपला व्यापार वाढविणें त्यांना शक्य झालें, त्यामुळे इंग्लंडची व्यापार वृद्धि जेणें करून येथे होईल तशाच तऱ्हेचें येथील चलन व हुंड- णावळ विषयक धोरण त्यांचे राहिले हे उघड आहे. आतां ते मुत्सदी तर हिंदी जनता भोळी अशी परिस्थिती असल्या कारणाने त्यांना ते चलनव विषयक ठेवीत असलेले घारेण हिंदी जनतेच्या हिताच आहे.