पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास

 "परराष्ट्रीय हुंडणावळीचा दर चढीचा ठेवल्यामुळे हिंदी जनतेचें १८९३ पासून १९३२ पर्यंतच्या ४० वर्षांच्या अवर्धीत कच्चा माल व धान्य यांचे निर्गत मालास आलेल्या किंमतींत व कापड वगैरेसारख्या इंग्लंडच्या पक्का मालाचे खपामुळे येथील उद्योगधंदे डबघाईस आले. त्यांत हिंदी जनतेचें कमीत कमी ३०० कोटि रुपयाच्यावर नुकसान झालें. व हिंदी जनतेच्या गांठी असलेल्या चांदीच्या किंमतींत (चढीच्या हुंडणावळी. मुळे झालेल्या चांदीच्या किंमतीच्या उतारामुळें,) झालेल्या नुकसानीचा आंकडा निदान ५०० कोटि रुपयांच्यावर आहे म्हणजे या हुंडणावळीच्या चढीच्या दरामुळें हिंदी जनतेचें हिंदुस्थान सरकारच्या हिशोबांत न दिसणारें असे अप्रत्यक्ष नुकसान ८०० कोटि रुपयांचेवर झालें.
 १९२०-२१ सालांत चढीचा २४ पेन्साचा हुंडणावळीचा दर टिक- विण्याकरितां परत हुंड्या (रिव्हर्स कौन्सिल बिलें ) काढल्यामुळे हिंदुस्थान- सरकारचे तिजोरीवर ३५ कोटि रुपयांचा पडलेला बोजा, व गोन्या खरकारी नोकरांना कांहीं काल देण्यांत आलेल्या हुंडणावळ विषयक भक्त्या - करितां ( exchange allowance ) सरकारने खर्च केलेले ५ कोटि रुपये म्हणजे एकूण ४० कोटि रुपये मात्र सरकारचे हिशोबावरून सहज दिसून येण्याजोगे आहेत.
 एकूण १८९३ ते १९३२ पर्यंतच्या ४० वर्षाचे अवर्धीत चढीच्या हुंडणावळीच्या दरामुळे हिन्दी जनतेचे सरकारच्या जमाखर्चावरून दिसून येणारे ४० कोटी रुपये खर्च झाले; तर सहज समजून न येणारें नुकसान ८०० कोटी रुपयांचें झालें.
 यावरून आपल्या हल्लींच्या चलन व हुंडणावळ विषयक धोरणाच्या कृत्रिमपणास मूलतः कारणीभूत झालेली ' होमचार्जेस ही बाब हिन्दुस्था- नास, (१८७३ ते १८९३ पर्यंत ८५ कोटि, १९२०-२१ सालांत ३५ कोटी व हुंडणावळ विषयक भत्ता ५ कोटी रुपये ) सरकारचे जमा- खर्चावरूनच १८७३ सालापासून १९३२ पर्यंतच्या कालांत १२५ कोटि (रूपयांनीं व अप्रत्यक्षरीत्या ८०० कोटी रुपयांनी म्हणजे एकूण ९२५ कोटि रुपयांनी नुकसानीची झाली,