पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[3]

विशेषतः व्यापारी वर्ग ज्यांना याची अत्यंत आवश्यकता आहे त्यांनी संपूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यास न केला तरी त्याचा कार्य कारणभाव समजून घेऊन . त्यावर आपला व्यवहार करण्यासाठी तरी निदान अशा पुस्तकाचा अभ्यास करणें या कालांत अत्यंत जरूरीचें आहे. या दृष्टीनें लोहोकरे यांनी ते स्वतः अर्थशास्त्रज्ञ नसतांना व नोकरी संभाळून अर्थशास्त्रविषयक एका शाखेची माहिती मिळवून तिचा स्वभाषेत आपल्या लोकांस फायदा देण्यासाठीं जी मेहनत करून ही कृति निर्माण केली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडें आहे. सध्यां राजकारणांत पडू पाहणाऱ्या तरुणांना या पुस्त- काचा अभ्यास त्यांच्या कार्यात अत्यंत उपयुक्त होईल मग व्यापारी लोकांख ' तो होईल हें निराळे सांगावयाचें प्रयोजन नाहीं.

सोलापूर, संतोषभवन
ता. १८-२-१९३८

जिवराज गौतमचंद दोशी

____

 हिंदी चलन पद्धतीचा इतिहास हा विषय फार क्लिष्ट व गुंतागुंतीचा परंतु तितकाच महत्त्वाचा असा आहे. सरकारच्या चलनविषयक घारेणाचा देशांतील व्यापारी वर्ग, मध्यम वर्ग, शेतकरी व कामकरी वगैरे सर्वोच्या हिताहिताशी संबंध असतो. आतां ही गोष्ट खरी की केवळ परराष्ट्रीय हुंडणावळीचा दर १८ पेन्सावरून १६ पेन्सावर आला म्हणजे आपल्या देशांतील सर्व आर्थिक आपत्ति दूर होतील असें नाहीं, हें जगांतील इतर देशांनी चलनाच्या किंमती उतरविल्या तरी तेथील आर्थिक आपत्ति अजून टळल्या नाहींत यावरून दिसून येईल.
 विशेष आनंदाची गोष्ट ही कीं, मराठी भाषेत या विषयावर अशा पुस्तकांची दुर्मिळता असल्यामुळे श्रीयुत लोहोकरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकानें ती अंशतः भरून काढली आहे. यामुळे श्रीयुत लोहोकरे यांचें मी अभिनंदन करतो. या विषयाची चर्चा विषयाच्या क्लिष्टतेच्या मानानें शक्य तितकी सुबोध झाल्यामुळे मराठी वाचकांना येथील चलन व हुंडणावळ