पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२]

विशेष महत्त्व आहे असें मी समजतों, मुळांत, अर्थशास्त्राचे शिक्षण नस- तांना परिश्रमानें त्याचें जरूरीपुरतें ज्ञान संपादन करून तें जनतेस देण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. पुस्तकाचा उद्देश सफल होऊन आर्थिक विषयाची गोडी जनतेस अधिकाधिक लागण्याचें कामी त्याचें साह्य होईल अशी मला आशा आहे.

दुर्गा निवास पुणे ४
ता. ६-२-३८

वा. गो. काळे

____
अभिप्राय

 रा. रा. यशवंत वासुदेव लोहोकरे यांनी 'हिंदी चलनपद्धतीचा इति हास ' ह्या नांवाच्या पुस्तकाची हस्तलिखित प्रत मला दाखविली व त्यावर माझा अभिप्राय देण्यास सांगितलें. त्यावरून तें पुस्तक मी लक्षपूर्वक समग्र वाचले. त्यांत त्यांनी हिंदी चलन पद्धतीचा इतिहास व त्याचा वर्तमान- कालीन धंद्यावर परिणाम यार्चे थोडक्यांत पण सहज समजेल अशा भाषेत सुरस वर्णन केलें आहे. परतंत्र अवस्थेत मनुष्य अडकला म्हणजे समर्थ व्यक्ति त्याला अडवून आपले स्वार्थ कसे साधित असतात याचें प्रत्यंतर व्यवहारांत नेहमीं पाहण्यास मिळतें व अनेक कुशल कादंबरीकार त्यावर कादंबन्या रचून त्याचें किती हृदयद्रावक वर्णन करितात है आपण नेहमी पाहतों व अशा कादंबरीकारांची समाजांत प्रशंसाही केली जाते, कारण स्यामुळे खरे जुलूम प्रगट होतात, व त्यावर चळवळ सुरू होऊन तो नाहींसा करण्याचे प्रयत्न चालू होतात. आपली आर्थिक परतंत्रता हाही एक तशा प्रकारचा जुलूमच आहे. सध्यां नाटक व सिनेमांत सावकारांचे जुलूम वगैरे प्रयोग दाखवून लोकांना त्यापासून सावध राहण्याचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणें राष्ट्रीय आर्थिक जुलमाचे ज्ञान सर्वसाधारण लोकांस झाल्यास राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची राष्ट्राल का जरूर आहे या सर्व न क पाठिंबा द्यावयास पाहिजे याचा उलगडा होईल.