पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयारीनिशीच आलो होतो. छोटे कॅमेरे, ऑडिओ सिस्टीम अशी साधनं सोबत आणली होती. किंबहुना ती कायम आमच्यासोबत असतातच. कधी, कुठे, काय लागेल सांगता येत नाही. तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही एक १०० रुपयांचा स्टॅम्पपेपर घेतला. त्यावर गरोदर महिलेचं प्रतिज्ञापत्र तयार केलं. त्यावरचा मजकूर असा : मी शासनाला मदत करण्यासाठी, मुलगा-मुलगी तपासताना डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यासाठी जात आहे. पोटातील बाळ काहीही असो, ते मला प्रिय आहे. प्रतिज्ञापत्र करुन सोनोग्राफी सेंटर मध्ये डॉक्टरकडे गेलो. गाडी दवाखान्यापासून दूर उभी केली. तिला घेऊन कैलास आत गेला आणि “मुलगा - मुलगी तपासायचं आहे," असं सांगितलं. त्यांनी नाव विचारलं असता गावित अडनाव सांगितलं. तसे त्यांनी कैलासला हाकलूनच दिलं. त्याला काही कळलंच नाही. दवाखान्याबाहेर आल्यानंतर जरा पुढेपर्यंत ते चालत गेले. गाडीजवळून ते थोडे पुढे गेले. कारण दवाखान्याच्या बाहेर येऊन डॉक्टर सगळं बघत होते. थोड्या अंतरापर्यंत अंतरापर्यंत मागून गाडी नेली आणि कैलास गाडीत बसला.

 अडनाव ऐकून डॉक्टरांनी हाकलून दिल्याचं कैलासनं मला सांगितलं. काय अडनाव सांगितलंत,' अस सरकारी डॉक्टरांनी विचारलं. कैलासनं गावित असं उत्तर देताच सरकारी डॉक्टर म्हणाले गावित हे अडनाव आदिवासी समाजात असतं आणि आदिवासी समाजात काहीही झालं तरी गर्भलिंगनिदान करत नाहीत. हे सगळ्या डॉक्टरांना माहित आहे. त्यामुळे तुम्हाला हाकलून दिलं असणार. मी म्हणाले. बघा ज्यांना आपण आदिवसी म्हणतो तेच सगळ्यांत सुसंस्कृत आहेत. किंबहुना त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील मुलींची संख्या टिकून आहे" खर तर स्टिंग ऑपरेशनच्यावेळी आम्ही पूर्ण भागाचा अभ्यास करतो. तिथली भाषा, राहणीमान, भागातील काही ठिकाणांचा माहिती, प्रमुख आडनांवासोबत येणाऱ्या जाती, धर्म सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि मगच स्टिंगला सुरुवात करायची. परंतु यावेळी घाई झाली. डॉक्टरांना पकडायला जायचं म्हणजे प्रचंड ताण असतो. पण दुसऱ्या बाजूला मुली वाचवल्याचं समाधान असतं. तणावाच्या वेळी विनोदांमुळं वातावरण हलकं होतं. म्हणून मी म्हणला “आता दुसऱ्या दवाखान्यात जाऊ पण अडनाव काय सांगायचं हे नीट ठरवून घ्या" यावर सगळे हसले आता मी त्यांना युनिव्हर्सल अडनाव घ्यायला सांगितलं. पाटील कसं आहे छान ना ?

 संशयास्पद दवाखाने तपासायचे असं ठरलं. खरं तर आम्ही चमत्कारावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते नव्हे, पण इथं घडलेल्या चमत्काराला

१०