कार्यक्रम संपल्यावर महिलांनी मला घेरलं आणि खरा कार्यक्रम सुरु झाला. अनौपचारिक गप्पांमध्ये कळलेल्या माहिती नुसार गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात स्टिंग ऑपरेशन सुरु होती. मुलींची संख्या वाढताना दिसू लागली होती. काही डॉक्टर जेलमध्ये गेले होते. याचा परिणाम राज्याचा सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दिसू लागला होता. पूर्वी तालुक्यात डॉक्टर पकडल्यास लोक शेजारच्या तालुक्यात गर्भलिंगनिदानासाठी जात असते. तिथं कारवाई झाल्यास शेजारच्या जिल्ह्यात जात असत. असं करता - करता स्टिंग ऑपरेशनच्या धसक्यानं लोक आपलं राज्य सोडून शेजारच्या राज्यात जाऊ लागल्याचं या गप्पांमधून स्पष्ट झालं. खरं तर पूर्वीपासून मला तसे फोन येत होते. त्यातलं सत्य आज मला नंदूरबारमध्ये उलगडलं होतं. नंदुरबारची हद्द जिथं संपते तेथून गुजरातची हद्द सुरु होते. नंदुरबारच्या शेवटच्या तालुक्यात काही डॉक्टर गरोदर महिलेला तपासणीसाठी सुरतला पाठवतात अशी माहिती आम्हाला मिळाली. परंतु माहिती पुरेशी नसताना स्टिंग ऑपरेशन करायचं तर बऱ्याच
गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. फिल्डवर जाऊनच सत्यता तपासावी लागते.
कार्यक्रम संपल्यावर आम्ही हॉटेलवर आलो. सोबत आरोग्य विभागाचे अधिकारी होते. चहा झाला आणि महिलांनी दिलेल्या माहितीसंदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंत ते या माहितीविषयी अनभिज्ञ होते किंवा तसं दाखवत होते. असं काही असल्यास गंभीर गोष्ट आहे असे ते म्हणाले. मी म्हटलं."खात्री करावी लागेल. प्रत्यक्ष पाहावं लागले. आता दोन वाजलेत. आपण त्या शेवटच्या तालुक्यात तपासणी करुन घ्यावी असं मला वाटतं. जाऊया का ? एखादी चार-साडेचार महिन्यांची गरोदर महिला शोधावी लागेल. जेणेकरुन एखाद्यानं पैशाच्या हव्यासापोटी तिथंच गर्भलिंग निदान केलं तर जागीच त्याला पकडता येईल. कुणी गरोदर महिला संपर्कात असेल तर बघा" अधिकाऱ्यांनी फोन करायला सुरुवात केली. या सगळ्यात एक तास गेला. " एक महिला आपल्या आरोग्य विभागात आशाताई म्हणून काम करते. जिला पहिली मुलगी आहे. तिनं यायचं कबूल केलंय. परंतु तिच्या नवऱ्याला समजावून सांगावं लागेल" असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी त्यासाठी
होकार दिला. शहरातच तिचं घर होते आम्ही तिच्याकडे गेलो. तिच्या घरच्यांना नवऱ्याला समजावून सांगितलं, “तुम्ही शासनाला मदत करीत आहात. तुमची शासन नक्की नोद घेईल. त्याला ते पटलं आणि त्यान पत्नीला सोबत घेऊन जाण्याची तयारी दर्शवली.
मी कैलासला तिचा भाऊ बनून जायला सांगितलं. साताऱ्याहून आम्ही