पान:व्यायामशास्त्र.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ५ वा. शास्त्रयुक्त व्यायामपद्धति ८६०५ व्यायामापासून पूर्ण फायदा होण्यास तिन्ही प्रकारचे व्यायाम पाहिजेत म्हणून पूर्वीच्या भागांत सांगितलेच आहे. पैकी पहिल्या दोन प्रकारचे व्यायाम हे स्वतंत्र विषय असल्यामुळे व त्यांचा उपयोग करणे सामान्य मनुष्यास नेहमीं शक्य नसल्यामुळे व्यायामाचा तिसरा प्रकार जी तालीम तिच्यासंबंधाने पुढे माहिती दिली आहे. तालमीच्या शास्त्रयुक्त पद्धतीध्ये कोणते गुण असावे? तालमीच योगाने सर्व स्नायूस व्यायाम घडला पाहिजे. पोट, फुफ्फुसे व रक्ताशय हीं इंद्रियें रक्तोत्पत्तीस व रक्तशुद्धीस आवश्यक आहेत. म्हणून हीं इंद्रिये मजबूत करणारे व्यायाम असावेत. असे व्यायाम कोणते हे पुढे सांगितले आहे.) निरनिराळ्या स्नायूंस व्यायाम कांहीं क्रमाप्रमाणे व्हावा. जवळजवळच्या किंवा एकमेकांशी निकट संबंध असलेल्या स्नायूस लागोपाठ व्यायाम होईल असा व्यायामक्रम नसावा. फाजील श्रम होतील असा व्यायाम नसावा. फाजील व्यायाम केल्याने फायद्याच्या ऐवजी नुकसानच होते हैं विसरतां कामा नये.