पान:व्यायामशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३२] । मुख्य ठिकाणापासून दूर आहेत; यामुळे श्वास जोराचा घेतला नाही किंवा वाईट हवेत श्वासोच्छास केला, तर या (टोंकांचे ) भागास ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होत नाही. यामुळे या भागांत वरील जंतूंचा प्रवेश झाल्यास तो भाग कुजू लागून कफक्षय हा रोग होतो. व्यायामाने फुफ्फुसांच्या वरील टोंकांतही हवा भरत असल्याने कफक्षय होण्याची भीति राहत नाहीं. । व्यायामानंतर रक्तांत ऑक्सिजन जास्त प्रमाणाने आढळतो ही गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झाली आहे. अर्थात् तो पुढे उपयोग पडावा म्हणून रक्तांत सांठविलेला असता, ऑक्सिजनयुक्त रक्ताचे महत्व इतके आहे की, रक्तांत ऑक्सिजनचे प्रमाण पुष्कळ असते, तेव्हां रिपयोगी रस उत्पन्न करणारे शरिरांतील पिंड जास्त जोराने काम करीत असतात. एकाद्या प्राण्याचे मस्तक छाटल्यावर त्याच्या मस्तकांत ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह कृत्रिम रीतीने सोडला, तर मेंदूमध्ये क्षणभर जीव आल्याची चिन्हें दिसू लागतात. रक्ताशय व रक्तवाहिन्या–व्यायाम करीत असतां रक्ताशयाचा जोरानें संकोच व विकास होते, व तसेच रक्तवाहिन्यांतून जोराने रक्त वाहते; त्यामुळे रक्ताशय व रक्तवाहिन्या यांना बळकटी येते. स्नायु-व्यायामाने सर्व स्नायूंचे आकुंचन व प्रसरण होऊन सर्वांगास बळकटी येते.