पान:व्यायामशास्त्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ३१ ] व्यायामाचा परिणाम व्यायामापासून निरनिराळे इंद्रियांवर परिणाम पुढे लिहिल्याप्रमाणे होतो. । फुफ्फुसे—व्यायाम करित असतां वासोट्टास जोराने चालून फुफ्फुसे हवेने पूर्ण भरतात. यामुळे शुद्धीकरितां फुफ्फुसांत येणा-या रक्तास हवा भरपूर मिळून रक्तशुद्धि चांगली होते. निरोगी स्थितीत रक्तशुद्धीस मोकळ्या हवेतील व्यायामासारखा दुसरा कोणताही उपाय नाहीं. फुफ्फुसे जेवढी अधिक मोठी, तेवढी त्यांत हवा जास्त मावणार; म्हणून फुफ्फुसांचा आकार वाढणे ही गोष्ट शरिरास हितावह आहे. व्यायाम करीत असतां आपण जोराने श्वासोच्छास घेतों, यामुळे फुफ्फुसांत पुष्कळ हवा भरून ती चांगली फुगतात. या योगाने त्यांचा आकार वाढते, वे रक्ते आणि ऑक्सिजन यांचा भरपूर पुरवठा होऊन त्यांना पुष्टि ( ब बळकटीही ) येते, आणि विकाराचा प्रतिकार करण्यास ती समर्थ होतात. | फुप्फुसांत एक प्रकारचे जंतु गेले म्हणजे त्यांच्या योगाने फुफ्फुसे कुजू लागून कफक्षय हा विकार होतो. जेथे शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन भरपूर आहे, तेथे हे जंतु जिवंत राहू शकत नाहींत. फुफ्फुसांचा वरची टोके लहान असून ती फुफ्फुसांच्या हालचालीच्या

  • आपण बसलो असतां, श्वासाबरोबर जितका कावनिक आसिड वायु बाहेर पडतो, त्याच्या चौपट, आपण पळत असतां, बाहेर पडतो. यावरून रक्तशुद्धीचे काम व्यायामापासून किती होते याची कल्पना होईल,