पान:व्यायामशास्त्र.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२४ ] उजवा हात कोंपराजवळ वाकवून मूठ दंडाजवळ येई तोंपर्यंत अग्रहस्त वर न्यावा; नंतर अग्रहस्त खाली आणून हात ताठ करावा, व हे करीत असतां डावा हात उजव्या हाताप्रमाणे वांकवावा. असे आळीपाळीने करावे. हात वांकवितांना स्नायूंस रग लागेपर्यंत स्नायु ताणून धरावे. स्नायू-(या व्यायामांत ज्या स्नायूंना व्यायम घडतो, त्यांची नांवें.) द्विपद व त्रिपद. व्यायाम २ रा. हाताची मूठ पुढील बाजूस वळवून व्यायाम १ प्रमाणे कृति करावी. व्यायाम ३ रा. पूर्व तयारी- हात दोन्ही बाजूस ताठ पसरून धरावे. मान मागे टाकावी. तळहात वरच्या बाजूस येईल अशा रीतीने मूठ धरावी व मान डाव्या आंगाकडे वळवावी. उजवा हात कोंपराजवळ वाकवून मूठ खांद्याजवळ येईपर्यंत अग्रहस्त वांकवावा व हे करीत असतां मान उजवीकडे वळवावी. नंतर डावा हात वांकवून उजवा हात, हातास रग लागेपर्यंत, ताठ करावा. यांप्रमाणे आळीपाळीने दोन्ही हातांनीं करावें. जो हात बांकेल, त्या हाताकडे मान येईल अशा रीतीने या व्यायामांत मान फिरवावी लागते. स्नायु--द्विपद, त्रिपद, अधिस्कंध व मानेचे स्नायु. व्यायाम ४ था. पूर्व तयारी-- ( वरील प्रमाणे ) हात आळीपाळीने न वांकवितां दोन्ही हात एकदम वांकवावे व एकदम ताट करावे. हात वांकवितांना डोकें पुढे न्यावे व ताठ करतांना मागे न्यावे. दोन्ही हात ताठ पसरतांना खांदे वर उचलावे. स्नायु ( ३ ) प्रमाणेच. व्यायाम ५ वा. पूर्व तयारी–उभे राहून हात पुढील बाजूस ताठ पसरावे. मुठी उभ्या धराव्या.