पान:व्यायामशास्त्र.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२५ ] हात त्याच आडव्या पातळींत, सावकाश नेववतील तितके मागे न्यावे व सावकाश पुढे आणावे. हात मागे नेतांना श्वास सावकाश पग जोराने घ्यावा. हात मागे गेल्यावर श्वास थोडा वेळ दाबून धरावा व पुढे आणतांना तो हळू हळू पण फुफ्फुसे : पूर्णपणे रिकामी होईपर्यंत सोडावा. स्नायु-अधिस्कंध, उरोज, चतुरंग, आणि वज्री. व्यायाम ६ वा. पूर्व तयारी–उभे राहून हात कोपराजवळ वाकवून मुठी खांद्याजवळ आणाव्या. कोंपर पार्श्वभागाचे जरा पुढे व अग्रहस्त ताठ उभे राहतील अशा रीतीने हात धरावे व मान मागे टाकावी. उजव्या हाताची मूठ नेववेल तितकी जोराने वर नेऊन हात वर ताश करावा व हे करीत असतां मान उजव्या हाताकडे वळवावी. असेच डाव्या हाताने करावे, व डावा हात वर नेत असतां उजवा हात खाली आणावा. याप्रमाणे आळीपाळीने करावे. स्नायु--अधिस्कंध, वज्री, त्रिपद, विशाल व मानेचे स्नायु. व्यायाम ७ वा. पूर्व तयारी-( २ ) प्रमाणे उभे रहावे. उजवा हात पुढील बाजूस ताठ होईपर्यंत, तो पुढील बाजूने वर्तुलाकार फिरवावा. तो खाली आणीत असतां उजवा हात वर न्यावा. हे करीत असतां डंबेल्स मांडीला लागू नयेत. याप्रमाणे आळीपाळीने करावें. ही क्रिया करीत असतां शरीर ताठ ठेवावे, व हाताच्या हालचालीबरोबर शरिरास झोके खाऊ देऊ नये. ( खांद्याइतक्या उंच पण हाताचे टप्याचे पलीकडे असलेल्या फळीवर आपणांस मुठीतलि पदार्थ, हात न वांकवितां, ठेवावयाचा आहे असे समजन जशी क्रिया आपण करू, तशी क्रिया या कसरतीमध्ये करावयाची असते. ) स्नायु-- अधिस्कंध, करपत्र, व उरोजाचा वरचा भाग. व्यायाम ८ वा. पूर्व तयारी--हात दोन्ही बाजूस ताठ पसरावे व मुठी उभ्या धराव्या.