पान:व्यायामशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ११ वा. - ९७० ब्रह्मचर्य. शारीरिक संपत्ति संपादण्यास मुख्य उपाय व्यायाम आहे; म्हणून त्यासंबंधाने पूर्वी माहिती दिली आहे; परंतु या उपायास ब्रह्मचर्य व योग्य आहार यांचीही मदत जरूर आहे. म्हणून त्यांसंबंधानें संक्षिप्त माहिती या व पुढच्या भागांत देण्याचा प्रयत्न केला आहे. | द्रव्यरूपी संपत्ति वाढविणा-या मनुष्याने निष्कारण फाजील खर्च, किंवा उधळेपणा टाळणे जसे आवश्यक आहे, तसे शारीरिक संपत्ति संपादू इच्छिणा-याने ब्रह्मचर्य पाळणे अत्यावश्यक आहे. खर्चामध्ये नियमितपणा नसेल तर वाटेल तेवढ्या संपत्तीची राखरांगोळी होण्यास ज्याप्रमाणे उशीर लागणार नाही, त्याप्रमाणे ब्रह्मचर्याचे उल्लंघन मनुष्याच्या हातून होईल तर त्याची मूळची शारीरिक संपत्ति केवढीही असली तरी, तिचा क्षय होण्यास विलंब लागणार नाहीं. , रक्त में अन्नाचे सार आहे आणि वीर्य हे रक्ताचे सार आहे. अर्थात् वीर्याचा व्यय झाल्याने शरिरांतील अत्यंत महत्त्वाचे द्रव्याचा व्यय होतो. वीर्योत्पत्तीचा व वीर्यबाहुल्याचा जो तारुण्यकाल, त्या कालीच मनुष्याच्या सर्व शक्ति अतिशय जोमांत असतात. जग नंदनवनमय