पान:व्यायामशास्त्र.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १०१ ] भासविणारी दिव्य काव्यमय दृष्टि तारुण्यावस्थेतच प्रकट होते. तसेच वंशविस्तार करवून स्वतःस लौकिकदृष्ट्या अमर करण्याचे साधन वीर्यच आहे. यावरून व वीर्याच्या न्हासाबरोबर मनुष्याच्या इतर शक्तींचाही न्हास होतो, या अनुभवावरून वीर्य ही वस्तु किती महत्वाची आहे हे समजून येण्यासारखे आहे.ज्यांच्यामध्ये वीर्योत्पत्ति होत नाही, अशा ( पुंस्त्वहीन ) लोकांमध्ये सर्व प्रकारच्या मर्दानी व उच्च गुणांचा किती अभाव असतो, ही गोष्टही वीर्याचे महत्त्व दर्शविणारी आहे. अशा प्रकारे वीर्य हा शरिरांतील अत्यंत मौल्यवान् पदार्थ असल्यामुळे त्याचा अयोग्य वेळीं व्यय करणे ही गोष्ट आरोग्यास अत्यंत घातक आहे. कांहीं प्राण्यांमध्ये स्त्रीपुरुषसंबंध जन्मांतून फक्त एकदाच घडतो व तो संबंध पूर्ण झाल्याबरोबर नर गतप्राण होतो, यावरून वीर्यपतन व शरिरांतील प्राणरूपी चैतन्याचा नाश यांमध्ये किती निकट संबंध आहे व वीर्याचा फाजील व्यय करणे, ही गोष्ट आयुष्यहानि करण्यास किती कारणीभूत होत असली पाहिजे हे दिसून येणार आहे. म्हणून शारीरिक संपत्ति राख्ने इच्छिणा-यांनी ब्रह्मचर्य पाळण्याविषयी अत्यंत दक्ष असले पाहिजे. मानसिक संपत्ति व बुद्धितेज राखण्यास ब्रह्मचर्याची किती आवश्यकता आहे, याविषयी आपले धर्मग्रंथ व इतर धर्मग्रंथ पूर्ण साक्ष देत आहेत. । आतां ब्रह्मचर्य पाळणे अवश्य आहे, म्हणून पुरुषांनी आजन्म स्त्रीपराङ्मुख रहावे, असे सांगण्याचा आमचा हेतु नाहीं. व्यवहाराच्या व भौतिक शास्त्राच्या दृष्टीने पाहतां परस्परांनी परस्परांचे दर्शन टाळावे, याकरितां परमेश्वराने स्त्रीपुरुषजाति निर्माण केल्या,