पान:व्यायामशास्त्र.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९९ ] | ( २ ) पोट न फुगवतां उलट तें आतील बाजूस ओढून छातीचा वरचा भाग फुगेल अशा रीतीने श्वास आंत ओढावा. श्वास ओढणे झाल्यावर थोडा वेळ थांबून श्वास बाहेर सोडावा. ( ३ ) मध्यपडदा खाली ढकलीत श्वास घ्यावा. मध्यपडदा खाली गेल्यावर श्वास थोडा वेळ दाबून धरून मध्य पडदा वर उचलावा आणि छातीचा वरचा भाग फुगेल अशा रीतीने श्वास आंत ओढावा व नंतर तो थोडा वेळ दाबून धरून सोडावा. | प्राणायामापासून पूर्ण फायदा होण्यास वरील तिन्ही प्रकारचे प्राणायाम आवश्यक आहेत; म्हणून त्या सर्वांचा उपयोग करावा. फुफ्फुसांच्या वरच्या भागांस शुद्ध हवा मिळण्यास तिस-या प्रकारचा प्राणायाम विशेष उपयोगी आहे. याकरितां कफक्षय होण्याची भीति ज्यांना असेल त्यांनी ह्या प्राणायामाचा उपयोग विशेष करावा. नेहमींच्या श्वासोच्छवासाने फुफ्फुसांचा संकोच-विकास जोराने होत नाही. यामुळे, फुफ्फुसांचे वरचे शेवटांत जी हवा असते ती प्रत्येक उच्छ्रासाबरोबर बाहेर ढकलली जात नाहीं, व प्रत्येक श्वासाबरोबर येणारी ताजी हवा फुफ्फुसांचे वरचे भागांत पूर्णपणे जात नाहीं. म्हणून फुफ्फुसांचे या भागास स्वच्छ हवेचा पुरवठा पुरेसा होत नाही. या कारणाने हे भाग अशक्त राहतात व त्यांस विकार होण्याची भीत असते. असे होऊ नये व या भागास हवेचा पुरवठा होऊन ते मजबूत व्हावे, याकरितां वर सांगितलेल्या प्राणायामपद्धतीचा उपयोग अवश्य करावा.