पान:व्यायामशास्त्र.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८७ ] तें असमर्थ होणे होय. अर्थात् शरिराचे ज्या भागांत | विकार झाला आहे अथवा होण्याचा संभव आहे त्या भागास योग्य प्रकारच्या व्यायामाने सशक्त केले म्हणजे तो विकार टळतो. म्हणून विकृत भागास सौम्य व्यायामाने सशक्त करणे हे पुढील उपायांतील मूळ तत्त्व आहे. हे तत्त्व लक्षांत ठेवून पुढील उपायांचा योग्य उपयोग करावा. फाजील व्यायाम उपकाराऐवजी अपकार करतो व सर्व तीव्र रोगांत व कित्येक जीर्ण रोगांतही व्यायाम निषिद्ध आहे, म्हणून पुढील व्यायामरूपी उपायांचा उपयोग विचाराने करावा. व्यायाम वाजवीपेक्षा जास्त करण्यापेक्षा थोडा कमी करणे बरें, हैं। नेहमीं ध्यानात ठेवावे. क्षुधामांद्यासाठी व्यायाम सामान्य तत्त्व- ज्या व्यायामांपासून पोटाचे स्नायूंस श्रम घडतात ते सर्व व्यायाम क्षुधामांद्य व पचनेंद्रियासंबंधी इतर विकार घालविण्यास उपयोगी आहेत. ओणवे होणे, धड बाजूला वांकावणे, छाती डावीकडे व उजवीकडे फिरविणे,-एकंदरीत धड वाकवेल तितक्या प्रकारांनी वांकविणे-हे अशा प्रकारचे व्यायाम होत. अशा व्यायामाचे विशिष्ट प्रकार पुढे दिल्याप्रमाणे आहेत. पूर्व तयारी.-हात वर ताठ पसरून व कमरेस मागील बाजूस बांक देऊन आणि छाती वर काढून उभे रहावे.