पान:व्यायामशास्त्र.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८६ ] वगैरे विकार फार चेंगट व त्रासदायक आहेत व त्यांकरितां औषधे घेता घेतां मनुष्य कंटाळून जातो. शिवाय पुष्कळ दिवस औषधे घेतल्याने औषधांचा परिणाम होईनासा होतो व प्रकृति अशक्त होऊन जाते. अशा विकारांस व्यायामाचे कांहीं प्रकारांपासून फायदा होतो; म्हणून त्यांविषयी पुढे माहिती दिली आहे. तरी आरोग्येच्छू लोकांनी या माहितीचा उपयोग करून घ्यावा. पुढील उपायांपासून हजारों लोकांस फायदा झाला आहे. मुंबईचे प्रसिद्ध लक्षाधीश बोमनजी पेटिट यांचे क्षुधामांद्यादि विकार सँडोनें व्यायामाच्या पद्धतीने बरे करून १॥ लाख रुपये मिळाविले ही गोष्ट प्रसिद्ध आहे. या उपायांसंबंधाने ही विशेष गोष्ट आहे की, त्यांच्याकरितां खर्च मुळींच करावा लागत नाही व त्यांचेपासून प्राप्त होणारा गुण चिरस्थायी असतो. म्हणून आमची अशी विनंति आहे की, पुढे सांगितलेल्या विकारांपैकी एखादा विकार ज्यांना झाला असेल त्यांनी पुढील उपायांचा उपयोग अवश्य करून पहावा. | अन्नांतील पोषक भाग शोषून घेणे, शरिरास आवश्यक असा रस उत्पन्न करणे, अथवा शरिरांतील अपायकारक द्रव्यास बाहेर घालवून देणे अशा स्वरूपाची निरनिराळ्या इंद्रियांची कामें आहेत. शरिरांतील सर्व इंद्रियें स्नायुरूपी तंतूंचीं बनलेली आहेत, व या तंतूचा संकोच-विकास त्या त्या इंद्रियांचे कामास आवश्यक आहे. म्हणून शरिरांतील एखादें इंद्रिय विकृत होणे म्हणजे संकोच-विकासाची क्रिया करण्यास