पान:व्यायामशास्त्र.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८८ ] हात भुईस टेके तोपर्यंत कमरेंत पुढील बाजूस वांकावे. व फिरून उभे होऊन कमरेचे मागील बाजूनें वांकून पाहिल्या स्थितीप्रत यावे. दुसरी तन्हा.-ताठ उभे राहून डावा पाय थोडा पुढे ठेऊन तो गुडघ्यांत वांकवावा; व पूर्वीप्रमाणे हात भुईस टेके तोंपर्यंत पुढील बाजूस कमरेत वांकावे. उभे झाल्यावर डावा पाय मागे घेऊन उजवा पाय डाव्या पायाप्रमाणे पुढे ठेवावा व वांकावे. याप्रमाणे आळीपाळीने करावे. पूर्व तयारी.-हात ताठ खाली पसरून उभे रहावे. तळ हात मांडीकडे करून मूठ मिटावी. । धड़ कमरेजवळ उजव्या बाजूस वाकवेल तितकें वांकवावे, व वांकवितांना डाव्या हातास बांक देऊन मूठ काखेजवळ आणावी. नंतर डाव्या बाजूस वांकावे व डावा हात ताठ करून उजवा हात पूर्वीप्रमाणे डाव्या हाताप्रमाणे वाकवावा. पूर्व तयारी.-हात डोक्याचे मागें ताठ पसरून जमिनीवर निजावे. पाय व हात ताठ ठेवून सावकाश उठावे-धड वर उचलावें,--ब हात पायाचे पुढे जाई तोपर्यंत-निदानीं पायास टेके तोपर्यंत-पुढे वांकावे. नंतर फिरून सावकाश पहिल्या स्थितीप्रत यावे. याप्रमाणे दमेतोंपर्यंत करावें.