पान:व्यायामशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७७ ] व्यायाम त्याने करावा, व आपल्या शक्तीप्रमाणे तो वाढवावा. प्रथम एवढी थोडी मेहनत करणे ही व्यायामाचा थट्टा होते. अशा भीतीने व्यायाम मुळीच न करणे चांगले नाही. प्रथम पावशेर दूध पचत नाही म्हणून दूध मुळीच न पिण्यासारखीच ही चूक आहे. ज्यास पावशर दूध पचत नाहीं त्यानें छटाक दुधापासून प्रारंभ केला असता ते जसे त्यास पचू लागते, तशीच व्यायामाची स्थिति आहे. व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यावर प्रथम खोकल्याचा विकार उत्पन्न झाला असतांही, व्यायाम चालू ठेवल्याने शेवटीं व्यायाम अंगवळणी पडून तो प्रकृतीस अत्यंत हितावह झाल्याची उदाहरणे अनेक आहेत. या कारणास्तव प्रत्येक मनुष्याने व्यायाम करून त्यापासून होणारा फायदा करून घ्यावा. | कृश व स्थूल अशा दोन्ही प्रकारच्या लोकांस व्यायाम आवश्यक आहे.-शरिरांत वात म्हणजे मेद किंवा चरबी वाजवीपेक्षा जास्त सांचयाने शरिरास स्थूलता येते; व शरिराच्या निरनिराळ्या भागाचे योग्य पोषण न झाल्याने त्यांना कृशता येते. व्यायामाने शरिरांतील मेद व इतर निरुपयोगी भाग जळून जातो व सवंगामध्ये रक्ताचा प्रवाह जोराने चालून सर्व भागांचे योग्य पोषण होते. म्हणून ज्यांचे शरीर स्थूल असते त्यांनी व्यायाम केल्याने त्यांचे अंगांतील फाजील चरबी जळली चाऊन त्यांचे अंग सडसडीत होते; व जे लोक कृश असतात त्यांच्या शरिरातील सर्व स्नायूंचे योग्य पोषण होऊन त्यांची वाढ होते व त्या योगाने, शाररास पुष्टि येते. या कारणास्तव स्थूल व कृश अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना व्यायामाची आवश्यकता आहे.