पान:व्यायामशास्त्र.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७६; तीवर अवलंबून आहे. साधारणपणे असा नियम आहे की, ज्यांचा प्रकृति पूर्णपणे निरोगी नसते, त्यांना घाम लवकर येतो. म्हणून प्रकृती चांगली असल्यामुळे ज्यांना घाम लवकर येत नसेल, त्यांनी घाम फुटण्याची वाट न पाहतां, थकवा आला म्हणजे व्यायाम पुरा करावा. शरिराचे पुढील भागाच्या स्नायूंपेक्षां मागील भागाचे स्नायु कमी बळकट असतात, म्हणून हे स्नायु मजबूत होतील अशी व्यायामांत व्यवस्था असावी.—बसून पाठीस बाक सहज येतो व म्हातारपणीं शरीर पुढील बाजूस वांकत जाते, याचे कारण पाठीमागच्या स्नायूंचा स्वाभाविक कमकुवतपणा होय.हे स्नायु व्यायामानें चांगले मजबूत केले, म्हणजे उतार वयांत शरीर वांकण्याची विशेष भीति राहणार नाही. म्हणून पाठीमागच्या स्नायूंचा संकोच ज्यांत होईल असे कांहीं व्यायाम नित्य करीत जावे. | मनुष्य कितीही अशक्त असला तरी त्यास व्यायाम आवश्यक आहे.-कांहीं लोकांची अशी समजूत आहे की, व्यायाम फक्तं सशक्त लोकांसच उपयोगी आहे. पण ही समजूत चुकीची आहे. प्राणिमात्रास आहाराप्रमाणे व्यायामही आवश्यक आहे,व ज्यांना ज्वरादि तत्र विकार झाले आहेत असे लोक खेरीजकरून तो सर्वांनी करणे हितावह आहे. मात्र तो हितावह होण्यास एवढी अट आहे की, तो प्रमाणांत असला पाहिजे. व्यायाम बेताने केला व तो क्रमाक्रमाने वाढविला तर अगदी अशक्त लोकही सशक्त होतात. एखाद्यास प्रथम १० जोर किंवा १२ नमस्कार सोसतील, तर तेवढाच