पान:व्यायामशास्त्र.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७८ ] वसल्या वसल्या व्यायाम.- व्यायामामुळे स्नायूस जी बळकटी येते, तिचे मुख्य कारण व्यायामाचे वेळी होणारा स्नायूंचा संकोच हे होय. हा संकोच एरव्हीं स्वस्थ बसून करविला, तरीही स्नायूस फायदा होतो. याकरितां कांहीं कारणामुळे व्यायाम करण्यास सवड झाली नाही तर बसल्याजागी स्नायूंचा संकोच जोराने केल्याने व्यायामापासून होणारा फायदा स्नायूस अंशतः मिळतो. आपण वजन उचलतों आहोत अशी कल्पना करून एकादा मनुष्य जर आपल्या दंडांतील स्नायूंचा रोज संकोच करील, तर कांही दिवसांनीं तो दंड मोठा झाला आहे असे खास आढळून येईल. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही व्यायाम आवश्यक आहे.--व्यायामापासन काय फायदे होतात व ते कोणत्या कारणांनी होतात, याविषयीं जी माहिती दिली आहे, तिजवरून व्यायामाची आवश्यकता बायकांसही आहे असे दिसून येईल. म्हणून व्यायामासंबंधानें जी माहिती सांगितली आहे, ती स्त्रियांनाही लागू आहे, असे समजावयाचे. आतां, समाजाच्या हल्लींच्या स्थितीत या सर्व माहितीचा उपयोग करणे जरी जवळ जवळ अशक्य आहे ) त्या माहितींतील तत्त्वांचा उपयोग करून स्त्रियांची शारीरिक स्थिति सुधारणे शक्य आहे हे विसरता कामा नये. शरिरांतील महत्त्वाच्या स्नायूस चलनवलन देणे, होतां होईल तो मोकळ्या हवेत श्वासोच्छ्वास करणे इत्यादि व्यायामांतील मुख्य गोष्टी होत. म्हणन या गोष्टी ज्यांत साधल्या जातात, असे जे स्त्रियांचे नित्य