पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुलांनी मागितले ते दिले की आपण आपले पालकत्व निभावले असा एक गैरसमज व सोयीस्कर आचार धर्म रूढ़ होतो आहे. मुलांच्या शिक्षण व संगोपनासंदर्भात 'व्हॉट दे वॉन्ट' पेक्षा 'व्हॉट दे नीड' हे सूत्र पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. 'फिटे अंधाराचे जाळे' हे पुस्तक ही जाण देते.

 वल्लरीचे हे आव्हान करमरकर कुटुंबीयांनी कसे पेलले? याचा अगदी ओघवता आणि काय घडले ते जसे घडले तसे सांगण्याच्या भूमिकेतून घेतलेला आढावा पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

 कहाणी आहे जवळजवळ अडीच तपाची. या अडीच तपात वल्लरीच्या आई वडिलांनी व आत्याने शांतपणे, निश्चित अशा प्रयत्नांची दिशा ठरवली व त्यावरून अत्यंत धीराने चिकाटीने निराश न होता हा प्रयत्नप्रवास आरंभला.

 प्रत्येक गोष्टीत वाट पाहायला लागणाऱ्या करमरकरांना आपल्यासाठीही थोडी वाट पाहावी लागली. वल्लरीच्या आईला खूप सोसावे लागले. प्रसुतीला विलंब होऊ लागला. म्हणून सिझेरियनचा निर्णय घेऊन डॉक्टरांना बोलावले. पण डॉक्टर येण्यापूर्वीच अडलेली असूनही प्रसूत झाली. पण बाळ रडेचना. बाळावर उपचार सुरू केले आणि जन्मानंतर अडीच तासाने बाळ रडले. जन्म घडायला वेळ लागल्यामुळे बाळ घुसमटले आणि काळेनिळे पडले होते. बाळ रडल्यानंतर आईचा जीव भांड्यात पडला. पण यामुळे तिच्या लहान मेंदूवर पक्षाघाताचा आघात झाला आणि ती सेरेब्रल प्लासी या आजाराची शिकार झाली.

 डॉक्टरांनी हे सांगताना ‘हा एकंदरीत पेशन्सचा मामला आहे' असे म्हटले आणि तिच्या कुटुंबाने हा ‘पेशन्स' अक्षरशः मुरवला.

 वल्लरीची सर्वच प्रगती अत्यंत सावकाश होत होती. पालथे पडणे, सरकणे या क्रिया यायला खूप वेळ लागला. सारखी लाळ गळे, ती गळता येत नसे. लाळ गळणे थांबेपर्यंत ती पाच वर्षांची झाली!

 प्रत्येकच बाबतीत, प्रत्येक हालचालींसाठी खूप सराव करावा लागे. दूध पिणे, औषध पिणे, वगैरे पुढील ट्रीटमेंटसाठी पुणे गाठले. डॉ. वारीअव्वा यांनी कसून तपासणी केली आणि आश्वासक धीर दिला. ते म्हणाले, “तुमच्या मुलीला आलेला हा अॅटॅक लहान मेंदूवर आघात करून गेलाय. त्यामुळे तिला शरीराचा तोल सांभाळणे अवघड झालेय, मोठ्या मेंदूवर झालेल्या आघातात होणारी हानी कधीच न भरून येणारी असते. लहान मेंदूवरची हानी भरून निघू शकते. बहुतांश दुरुस्तही होऊ शकते. हा अॅटॅक सौम्य आहे म्हणून तिच्यात सुधारणा शक्य आहे. मात्र तुम्हाला त्यासाठी फार अगदी फार फार परिश्रम

वेचलेली फुले/११६